मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७१

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

---

हे पुण्य काय भानगड आहे ब्वॉ. ऐसीचा मालक यमराज तर नही ना? नाहीतर उगीच मेल्यावर कळायचे कि वर गेल्यावर पाप-पुण्याचा घडा बघतात तो हाच होता म्हणून.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

Oh shoot I again put my foot in my mouth. टिकलु जी what is about your posts that entice almost foolish responses on my part Sad

ऐसीचा मालक का हो ऐसीची मालक नसू शकते का? MCP कुठचे (डोळा मारत) आता गेट युझड टू बीइन्ग कॉल्ड MCP ऊठ्सूठ (लोळून हसत)

आपल्याकडे पाप-पुण्य खाते यामराजाकडे आहे. आता तो बाप्याच कश्यावरून, ती बाईच का नाही? - हा युक्तिवाद आहे का?

MCP = मार्क्सवादी कम्युनिष्ट ? :-S ?

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

ROFL अरे ये MCP नही जानता.
मी डीलीट केलेले वाक्य उधृत करुन मला कात्रीत पकडल्याच्या अक्षम्य अपराधाबद्दल, आता तुम्हाला MCP चा फुल फॉर्म सांगणारच नाही. J) J-) Crazy

MCP = मार्क्सवादी कम्युनिष्ट ?

क्या बात, क्या बात!!!! ROFLROFL

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

मी आणि बॅट्या मार्क्सवादी !!!!

ROFLROFL

त्यातसुद्धा बॅट्या हिंदुत्ववादी मार्क्सवादी !!!!!!!!

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

बघा म्हणजे झालं.ROFLROFL

बाकी भारतात काहीही होऊ शकते, नै का? ROFL

याच अर्थाच्या कन्नड वाक्प्रचाराचे मराठी भाषांतर.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

मी आणि बॅट्या मार्क्सवादी !!!!

का बुवा? तुम्ही काय किंवा बॅट्या काय, शाळाकॉलेजाच्या दिवसांत परीक्षेत जास्तीत जास्त (गेला बाजार जमतील तितक्या) मार्क्ससाठी झगडला नाहीत?

त्यातसुद्धा बॅट्या हिंदुत्ववादी मार्क्सवादी !!!!!!!!

त्यात काय विशेष? एके काळी आख्खे जर्मन राष्ट्र मार्क्सवादी होते. आणि त्यातसुद्धा शीतयुद्धकाळात पूर्व जर्मनी तर मार्क्सवादी होतेच होते, पण झाडून सारे भांडवलवादी पश्चिम जर्मन राष्ट्रसुद्धा (किंबहुना जरा जास्तच) मार्क्सवादी होते.

(पुढे मग युरो आल्यावर जर्मनांचा मार्क्सवाद ओसरला.)

सांगायचा मुद्दा, भांडवलवादीसुद्धा जेथे मार्क्सवादी असू शकतात, तेथे हिंदुत्ववाद्यांनीच तेवढा कोणता अश्वमेध केला आहे?

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

आणखी एक मार्क्सवादी

या

*********
आलं का आलं आलं?

Oh shoot I again put my foot in my mouth. टिकलु जी what is about your posts that entice almost foolish responses on my part Sad

hillary

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

भगवानके घर देर है अंधेर नही. ती विनोदी आणि अग्ली Wink vine मूळच्या ठिकाणावरुनच काढली गेली हे बरे झाले.

पुण्य, श्रेणी, इत्यादी गोष्टींची माहिती ह्या धाग्यांवर मिळेल : श्रेणीसंकल्पनेची माहिती, प्रतिसादांची श्रेणी, धाग्यांना तारे देण्याची सुविधा आणि इतर सुधारणा

अन्य माहितीची देवाणघेवाण - ऐसी हे अपौरुषेय संस्थळ आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो - एखाद्याला मारताना सुद्धा लिक्विड ऑक्सिजनमध्ये घालतात. (उदा० रॉकु)

*********
आलं का आलं आलं?

अगागागा ROFLROFLROFL

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

ऐसी हे अपौरुषेय संस्थळ आहे.

काय तरी बोलता बाई!

अपौरुषेय की अस्त्रैयकी खरंतर अमानुष? Wink

शब्द चुकलेला असेल तर सुधारून घ्यावा.

कास्टिंग काउच म्हणजे काय? खरा अभिप्रेत अर्थ काय आणि दुसरा काय?

कास्टिंग काउच म्हणजे काय? खरा अभिप्रेत अर्थ काय आणि दुसरा काय?

गुगळेंना विचारा ना, सांगतील ते...

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

माझ्या एका मित्राला मुलभुत प्रश्न पडला आहे, कोणी उत्तर देऊ शकेल का? ( हा मित्र नेहमीचा प्रश्न फेम मित्र नाहीये ). तर प्रश्न असा की,

साड्यांना खिसे का नसतात?

ह्या मुळ प्रश्नावर मी काही ठीगळे लावली आहेत

१. पुर्वी कधी साड्यांना खिसे लावायचा प्रयत्न झाला होता का? असल्यास तो फेल का झाला? कोणी केला होता.
२. जर साडीला खिसे / खिसा लावायचा ठरला तर कुठे लावणे सर्वात सोईचे पडेल ( त्या साडी नेसणार्‍या स्त्रीला )
३. ह्या स्त्रीयांच्या डीस्क्रीमिनेशेन मागे एमएसपी आहेत का?
४. स्त्रीवादी संघटनांचे ह्या बाबतीत काही मत आहे का? असल्यास काय?

कोण म्हणे हा मित्र? शनवारवाड्यावर त्याचा जाहीर सत्कार केला पाहिजे. साडी आणि खिसे, उगा काहीही?

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

एमसीपी आयडी - उत्तरे माहीती नसतील तर कबुल करा, उगाचच का माझ्या मित्राला हसताय. तुमच्या सारख्या एमसीपी चे कारस्थान आहे म्हणुनच आज साडीला खिसा नसतो.

तुमच्या सारख्या एमसीपी चे कारस्थान आहे म्हणुनच आज साडीला खिसा नसतो.

जरा दुरुस्ती.

तुमच्या सारख्या उजव्या हिंदुत्ववादी एमसीपी चे कारस्थान आहे म्हणुनच आज साडीला खिसा नसतो. बूर्झ्वा हिंदुत्ववाद्यांनी सबाल्टर्न स्त्रियांवर केलेल्या दमनाचा परिणाम म्हणजे खिसेविहीन साडी.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

जुन्या काळच्या बायकांना , पोलक्याच्या आंत एक खिसा असावा, असे माझे बाल मन सांगताय. कारण त्या, तिथे हात घालून पैसे वगैरे बाहेर काढायच्या.

एकच योगी
बाकी सारे भोगी

माझ्या स्वाक्षरीला अनुसरून काही प्रामाणिक उत्तरे.

साडीला खिसा असणं कदाचित अवघड असेल.

परंतु खिसा असणं सोयीचं असतं हे महिलांना अजून समजलेलं/मान्य झालेलं नाही.
ज्या कपड्याला खिसा असू शकतो त्यालाही खिसा शिवण्याचा/असण्याचा आग्रह महिला धरत नाहीत.
उदा. पुरुष सदरा/झब्बा घालतात त्या झब्ब्याला साइडला खिसा असतो. महिला जो पंजाबी ड्रेस/लाँग टॉप घालतात त्याची बेसिक रचना तशीच असते पण पंजाबी ड्रेस/टॉपला खिसा शिवायला शिंप्याला सांगत नाहीत. किंवा रेडिमेड घेतला तर दुकानदाराला "खिसा असलेले टॉप नाहीत का ?"असे महिला विचारत नाहीत.

त्याचप्रमाणे महिला ज्या पर्स किंवा हँडबॅग वापरतात त्यात सुद्धा विशिष्ट गोष्टींसाठी विशिष्ट कप्पे अशी रचना नसते. हल्ली मोबाईलसाठी विशिष्ट कप्पा असलेल्या पर्स मिळू लागल्या आहेत. पण या बाबतीतली प्रगती फारच हळू आहे.

आणि आणि आणि......... महिलांच्या पर्सचं डिझाईन पुरुषच करतात असं मुळीच नाही.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

फ्रॉम अ फेलो एमसीपी.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

थत्ते चाचा, तुम्ही अगदी तुमच्या स्वक्षरीला जागुन प्रतिसाद दिलाय. सर्व स्त्रीयांवर ढकलुन मोकळे.

महिलांच्या पर्सचं डिझाईन पुरुषच करतात असं मुळीच नाही.

मोस्टली घरातला स्वैपाक सुद्धा स्त्रीयाच करतात, पण काय करायचे ते त्या ठरवतात का?

घरात स्वैपाक काय करायचा हे नवरे ठरवत असतील कदाचित/बहुधा. पण बायको टॉप शिवून घेते तेव्हा "याला (साइडचा) खिसा शिवलास तर खबरदार !!!" असं नवरा सांगतो असं वाटत नाही.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

एमसीपीला काय कळणार स्त्रियांची कम्पल्शन्स??????

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

हा मित्र नेहमीचा प्रश्न फेम मित्र नाहीये

त्या मित्राला हा प्रश्न कसा पडला नाही अशी चिंता वाटते. त्याची सुपर-पॉवर नाहिशी झाली काय?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

हो ना, नेहमीचा मित्र हा प्रश्न नक्की विचारेलशी खात्री होती पण हाय रे दैवा.....

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

साड्यांना "ऑफ द शेल्फ" स्वरूपात (म्हणजे - घेतानाच) खिसे का नसतात?
साडी, धोतर, लुंगी, सारोंग वगैरे गुंडाळायची वस्त्रं परिधान करणे हा अ‍ॅप्रॉग्झिमेशनचा प्रकार आहे. एकच सहावारी साडी टुणटुण ते कतरिना कैफ या रेंजमधल्या कोणालाही विकतात. प्रत्येकीचा सर्कमफरन्स वेगळा असल्याने खिसा शिवण्याची जागा प्रत्येकीसाठी वेगळी असू शकेल. मग साड्याही वेस्टसाईजप्रमाणे काढाव्या लागतील. आधीच साड्यांमध्ये असलेली व्हरायटी वेस्ट साईज १८ ते ४५ या संख्येने गुणावी लागेल!

साड्यांना बिस्पोक (नंतर शिवलेले) खिसे का नसतात?
परिधान करणारी एकच असेल, तरीही साडी नेसायच्या पद्धतींमध्ये स्टँडर्ड एरर मोठा असतो. (त्याउलट विजार परिधान करण्यात स्टँडर्ड एरर फारसा नसतो.) म्हणजे, परिधान करणारीच्या शरीराचा एक बिंदू वस्त्राच्या त्याच बिंदूला नेहेमीच लागेल असं नाही. उदा. चापूनचोपून नेसणे वि० बेंगरूळ नेसणे, पदराची लांबी कमीजास्त होणे, निर्‍यांची संख्या कमीजास्त होणे. मग चापूनचोपून पद्धतीने बरोबर कमरेवर आलेला खिसा बेंगरूळ पद्धतीत हिप पॉकेट होऊ शकेल.

त्यामुळे खिसे शिवणं व्यवहार्य नाही.

--------
खिसे शिवण्यासाठी जाड कापड + अस्तर लागत असावं. साड्या झुळझुळीत कापडाच्या असतात. त्यामुळे शिवलेला खिसा बाहेरून दिसेल, आणि एकंदर नजारा विचित्र दिसेल.

--------
साड्यांना खिसे लोकप्रिय झाले तर जिमी चू ते कॅथ किडस्टन वगैरे "क्लच" ते "पोतं" या रेंजमधल्या पर्सा विकणार्‍यांचा धंदा बसेल. त्यामुळे अशी कल्पना कोणाच्या डोक्यात आली तर हे ब्रँडस लॉबिइंग करून ही संकल्पना गाडून टाकतील.

--------
विशिष्ट प्रकारे (रीडः ब्राह्मणी पद्धतीने नेसलेल्या) नऊवारी लुगड्यांना ओचा नावाचा खिसा असतो. नऊवारी लुगडं घसरू नये म्हणून कमरेशी लुगडं एका विशिष्ट पद्धतीने उलटं फिरवतात (बोलीभाषेतला शब्दः केळं). तो एकप्रकारचा चोरखिसा असतो. माझी आज्जी त्यात किल्ली ठेवत असे.

*********
आलं का आलं आलं?

"क्लच" ते "पोतं" या रेंजमधल्या पर्सा विकणार्‍यांचा धंदा बसेल.

ओ पोतं नका म्हणु. अति अवाढव्य पर्समुळे आपण बारीक दिसतो. ;;) ;;) ;;)
अहो स्त्रियांना लिप्स्टिक ते किल्ली, पैसे, रुमाल, नॅपकिन्,पुस्तक, शॉपिंग च्या भरमसाठ वस्तु, जिम चे कपडे, शूज, पाण्याची बाटली, कॅन्डी, कॉम्पॅक्ट मिरर,लंच बॉक्स अशा किती गोष्टी लागतात. पर्सेस या आऊटडेटेड होणारच नाहीत त्यामुळे.
____

नऊवारी लुगडं घसरू नये म्हणून कमरेशी लुगडं एका विशिष्ट पद्धतीने उलटं फिरवतात (बोलीभाषेतला शब्दः केळं). तो एकप्रकारचा चोरखिसा असतो. माझी आज्जी त्यात किल्ली ठेवत असे.

होय त्याला शब्दच नाहीये त्या चोरकप्प्याला.

"ओचा" म्हणतात ना त्याला

अनुटले मस्त!!! तुला एक जादूकी झप्पि.

अरे काय!

ऐसीबायका** नऊवारी नेसल्या नाहीत का काय! ओचा वेगळा, केळं वेगळं. सॅमची आई ओच्यातून फुलं, तुळशीच्या मंजिर्‍या वगैरे आणत असे. त्रिकोणी झोळीसारखा कप्पा.

---
**मिपाबायका या फ्यामस शब्दप्रयोगासारखं.

*********
आलं का आलं आलं?

आगागा , सॅम ची आई वगैरे ओच्यातून तुळशीच्या मंजिऱ्या वगैरे .. लोळलो

...तोच सॅम मोठा होऊन ज्याला हिसडा देऊन लुगडं सोडतो ते केळं

वगैरे मजकूर "चौफुल्यात सजली रात्र" वगैरे कादंबरीतून घेतल्यासारखा वाटायला लागला म्हणून लिहून खोडला.

*********
आलं का आलं आलं?

हां केळं तसाच शेप असतो. बरोबरे.
ओचा म्हणजे ओटी घेतात तो पदराचा भाग का? असावा. असावा.
.
सॅम ROFL
हरी पोत्दार ROFLROFL

कीती सेक्सीस्ट प्रतिसाद आबा. फक्त बायकांनाच का माहीती असायला पाहिजे हे?

खरे तर पुरुषांचा सर्व वेळ बायकांकडे बघण्यात जात असल्यामुळे त्यांना जास्त माहीती हवे.

एकदम जबरदस्त प्रतिसाद! मस्तच.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

साड्यांबरोबर ब्लाऊझ नावाचा मोठ्ठा खिसा असताना असले प्रश्न पडणार्‍या लोकांच्या अरसिकतेबद्दल कीव वाटते!

असो.

मोठ्ठा? ROFLROFL

.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

खिसा कसा मिरवणार? पर्स मिरवता येते, दर महिन्याला त्यासाठी मॅालमध्ये जाता येतं.( आणखी एक पर्स आणण्यासाठी)

महामार्मिक+खवचट

साडीला खिसा का नाही हा प्रश्न वदतोव्याघात स्वरूपाचा आहे. साडी हे मुळातच न शिवलेलं, गुंडाळायचं वस्त्र आहे. कपड्यांचा इतिहास मला माहीत नाही, पण भारतात अनेक ठिकाणी पूर्वी केवळ गुंडाळायची वस्त्रंच वापरली जात. पुरुषांसाठी धोतर आणि उपरणं हीही न शिवलेल्या, गुंडाळण्याच्या कपड्यांची उदाहरणं. ज्या वस्त्रात शिवणकामाला फाटाच दिलेला आहे, त्यात खिसा काय शिवणार? पुरुषांच्या धोतरालाही खिसा नसायचा. पुरुषांनी शर्ट, पॅंटसारखे अंगानुसार शिवलेले कपडे वापरायला आधी सुरुवात केली. स्त्रियांनी तसे कपडे शिवायला नंतर सुरुवात केली. तोपर्यंत पुरुष बाहेरची कामं करणार, त्यांना खिशाची गरज पडणार हे ठरून गेलं होतं बहुधा. किंवा कदाचित शर्ट हा प्रकार आयात झाला त्याबरोबर त्याचा खिसाही आपोआप आयात झाला असेल.

हिलरी क्लिंटनच्या निमित्ताने खिशांबद्दल लिहिलेला हा लेख हल्लीच वाचनात आला.

फॅबइंडिया तयार सलवारी विकतात, त्यांना एक खिसा असतो. (निदान साताठ वर्षांपूर्वी अशा सलवारी ते विकत असत.) अशी एक सलवार आणल्यावर मी सगळ्याच सलवारींना दोन्ही बाजूंना खिसे शिववून घ्यायला सुरुवात केली. शिंपी ह्या प्रकाराबद्दल किरकिर करायचा. "हवं तर शिलाई जास्त घ्या, पण मला दोन खिसे हवेतच", असं म्हटल्यावर तोंड वाकडं केलं पण नाईलाजाने खिसे शिवले. ह्या खिशांमध्ये मोठे स्मार्टफोन, वॉलेट आणि किल्ली अशा महत्त्वाच्या गोष्टी सहज मावतात. माझ्या अशा सलवारी बघून इतर काही मैत्रिणींनीही सलवारींना खिसे शिवून घ्यायला सुरुवात केली.

कधी तयार पंजाबी ड्रेस विकत घेतले तेव्हा त्याच्या बाह्या जोडलेल्या नव्हत्या. हवं तर बाह्या जोडा किंवा स्लीव्हलेस वापरा. असे बहुतेकसे तयार ड्रेसेस मला बारीक करून घ्यावे लागतात. एका दुकानात म्हटलं, "त्या बाह्या मला खिशासारख्या जोडून द्या." त्या दुकानदाराने माझ्याशी त्यावरून वाद घातला. शेवटी मी त्याला म्हटलं, "तुमचा हेअरबँड किती वाईट दिसतो हे मी तुम्हाला सांगणार नाही; त्या बदल्यात माझ्या कपड्यांचे खिसे वाईट दिसतात हे तुम्ही मला सांगायचं नाही." तरीही त्याने खिसा अशा गचाळ पद्धतीने जोडला की नंतर दुसऱ्या शिंप्याला पैसे देऊन मी ते खिसे काढून घेतले. आणखी एका शिंप्यानेही शिवून घेतलेल्या ड्रेसच्या कुडत्याला खिसे वाईट पद्धतीने शिवले होते; तो ड्रेस मी एकदाही घातला नाही. पैसे फुकट!

ह्या पुरुषांना काय करायचंय, मी कसेही कपडे घालेन आणि खिशातही काहीही-कोणीही घालून फिरेन. विनोदाचा भाग वगळता, बदल केलेला सहज पचनी पडतो असं नाही; भले तो बदल कोणी स्वतःच्या कपड्यांत का करून घेईनात!

आता कपडे विकत घेताना, भले त्या घरात घालायच्या शॉर्ट्स का असेनात, खिसे आहेत हे बघूनच विकत घेते. जीन्स घेताना लो-वेस्ट घेत नाही कारण त्यांचे खिसे आखूड असतात आणि आताचे फोन आकाराने मोठे असतात. एका लो-वेस्ट जीन्समधून दोनदा फोन पाडून झाल्यावर ती जीन्सही बाद करून टाकली. खिसे असणाऱ्या व्यायामाच्या ट्राउजरी शोधणं महाकर्मकठीण आहे. हा अमेरिकन-भांडवलशाही-चंगळवादी डाव वाटतो. धावायला जाताना फोन खिशात ठेवायचा नाही, फोन हाताला अडकवण्यासाठी निराळा पट्टा विकत घ्यायचा!

१. दुसरे, तिसरे अर्थ काढणाऱ्यांना आमंत्रण.
२. म्हणून मला ट्रेडमिल आवडते. फोनच काय, टॅबलेट किंवा टीव्ही बघत धावता येतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आय हेट लो वेस्ट. ना खिशात वस्तू मावतात ना जीनमध्ये मी मावते ROFL
हाहाह्हा .... ते १ नंबर आहे ना त्यावरुन आठवलं. - एकदा मीटींगमध्ये कोणाचा तरी फोन टेबलवर होता तो प्रचंड व्हायब्रेट होऊ लागला अर्थात कॉल येत होता. तर एक जण म्हणाली "Oh shit! I wish mine vibrated like that ;)"
इतके हसलो आम्ही.
.

खिसे असणाऱ्या व्यायामाच्या ट्राउजरी

ह्म्म्म घट्ट बसणार्‍या टाइटस टाइप ट्राऊझर्स ना खिसा नसतो आणि त्या फार पॉलिथिनीश/नायलॉनिश मटीरीअलच्या असतात. व्यायामाकरता तू ढगळ लेंग्यासारख्या मऊसूत टाऊझर्स का नाही घेत त्यातून वायुविजनजही नीट होतं अर्थात हवा खेळती रहाते, घाम येत नाही आणि खिसेही खोल, रुंद असतात त्यांना.

फॅब इंडिया मध्ये खिसे असलेल्या सलवारी असतात, परंतु त्याचा उपयोग बहुदा प्रवासात वगैरेच होत असावा. तसेच तिथे मला खिसे असलेले कुर्ते सुधा मिळाले होते. मला तो प्रकार फार उपयोगी वाटला. त्यामुळे आता मी स्वतःच कपडे शिवताना, एक खिसा नक्की शिवते. पण सलवारीला नाही. कारण तो खिसा वापरणे तसेही शक्य होत नाही.
आणि खिसे नसलेल्यां कपड्यांसाठी मी एक पर्याय शोधला आहे. भरपूर लांब बेल्ट असलेला बटवा शिवलाय (मीच). वेल्क्रो ने त्याचे तोंड वंद केलेय. आणि त्यात फक्तं मोबाईल, रुमाल आणि किल्ली मावेल इतकाच आकार आहे. कंडक्टर जशी त्यांची बॅग अडकवतात, तसा तो अडकवला की हात मोकळे राहतात.
Satin cloth batwa

पण तरीही सर्वसमावेषक पर्सला पर्याय नाहीच ...

बटावा आवडला. स्वतःचे कपडे स्वतः शिवता येणार्‍या लोकांचा मला हेवा वाटतो. आय विश आय कुड ....

गुरुशर्ट, झब्बा, शेरवानी या सगळ्या कमीझ स्टाईल सिमिलर कपड्यांना खिसे शिवता येत असताना बायकांच्या कमीजला साईडने खिसे शिवायला काय अडचण असते कुणास ठाऊक..

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

खरं म्हणजे काहीच नाही.
पण
( एक ) म्हणजे खिसा असलेले कपडे वापरायची सवय नाही.
( दोन ) पर्स मध्ये अवघे विश्व सामावलेले असते, त्यामूळे खिसा पुरेसा नसतो.
आणि
( तीन ) काही मोजक्याच वेळा असतात, ज्या वेळी स्त्रीला बाहेर जाताना मोजक्याच वस्तुंची जरूर असते.
म्हणून ....

बायकांच्या कपड्यांना खिसे नसतात कारण चाळे करायला त्यांना पुरुषांसारखी, खिशात हात घालायची गरज नसते. पदर किंवा ओढणी पुरतात. (एलिमेंटरी वॉटसन!)

कपड्यांना खिसे जोडणं हा प्रकारच मुळात पुरुषी आहे. खिशात वस्तू ठेवल्या की आकार मोठा दिसतो. जरी बेडकी फुगली तरीही ती बैलासारखी झाली, गायीसारखी नाही. फुगायची, मोठा आकार दाखवण्याची हौस पुरुषी आहे.

खिसेकापू आणि शिंपी - हे सगळे पुरुषच असतात - ह्यांचं खिसे हे कारस्थान आहे. बायका खिसेकापू असतात का? नाही. कारण बायकांच्या कपड्यांना खिसे नसतात. पुरुष खिसेकापूंची सोय म्हणून पुरुषांच्या कपड्यांना खिसे असतात. हे पुरुष खिसेकापू बायकांच्या डब्यात शिरू शकत नाहीत. त्यामुळे बायकांच्या कपड्यांना खिसे असण्यात व्यवस्थेचा फायदा नाही. जोपर्यंत बायका स्वतःचे कपडे स्वतः शिवत नाहीत, तोवर हे असंच राहणार. त्यामुळे बायकांच्या कपड्यांना खिसे का नसतात, हा बायकांना पुन्हा घरकामात डांबण्याचा दुष्ट डाव आहे. बायांनो, स्वतःचे कपडे अजिबात स्वतः शिवू नका; हा पुरुषी कावा आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फुगायची, मोठा आकार दाखवण्याची हौस पुरुषी आहे.

म्हणजे विशिष्ट अवयव मोठे असावेत आणि/किंवा दिसावेत म्हणून स्त्रिया जी मरमर करतात तीही पुरुषीच आहे तर!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

आमचे येथे, आंजाकृपेकरून, विनोदाचं तेरावं आजपासून तेराव्या दिवशी घालणे आहे. कृपया उपस्थिती आरेसव्हीपी करावी. येताना सोबत आपापल्या खिशांमधून जेवण, पेयं आणि पळी-पंचपात्रीही आणावीत.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमच्याकडून विनोद येताना पाहून भडभडून, गहिवरून वगैरे आले.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

आमच्याकडून विनोद येईल, आनंद येईल किंवा प्रेम! तुम्हाला हो कसली जळजळ?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भरपुर गरम खिसे असलेला मठ्ठ नवरा अख्खा त्यांच्या मुठीत राहतो तर कडोसरी कशाला? मुठीत बरंच काही राहतं ,राजकारणसुद्धा.

कपड्यांना खिसे जोडणं हा प्रकारच मुळात पुरुषी आहे. खिशात वस्तू ठेवल्या की आकार मोठा दिसतो.

हाच कार्यकारणभाव असल्यास पुरुषांच्या शर्टांस खिसे ठेवण्यात नेमके काय हशील असावे, ते नकळे.

(शिवाय, पुरुषांच्या शर्टांस सहसा एकाच बाजूस खिसा असतो, असे निरीक्षण आहे. ही अर्ध-अमेझोनीय प्रेरणा असावी किंवा कसे, याचा वेध घेणे रोचक तथा उद्बोधक ठरावे.)

मोठा आकार दाखवण्याची हौस पुरुषी आहे.

सिलिकोन वगैरे प्रकरणांत अधिक माहितीअभावी तूर्तास प्रवेशत नाही. असो.

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

स्तन

*श्रेय - 'जब वी मेट'

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खिसेपुराण वाचले. बायकांना वेगळे खिसे हवेतच कशाला? नवर्‍यांचे खिसे त्यांचेच की. हवे तेव्हा/तसे कापताही येतात.
पण कल्जी क्रू नये. आता लेंगारूपी तयार नऊवारी पातळांना खिसे असू शकतात.
बाय द वे, निर्‍यांचं केळं या वस्त्रभागाचा उपयोग कोणे एके काळी सुनालेकींना चोरट्या वस्तू लपवण्यासाठी होत असे. एखादा लाडू, चारदोन पैसे, आवळा, चिंचा, बाळ आंब्यांसारखी छोटी फळे वगैरे. एखादी सत्यंकाकू चहासाखरेची भुकटीसुद्धा दुसर्‍या घरच्या पोळ्या लाटता लाटता बांधून घेऊ शके.

गेले अर्धा तास मी नवीन धागा बनवून त्यात युट्युब विडीयो एम्बेड करायचा प्रयत्न करतोय. इथे लिंक साठी ऑप्शन आहे. विडीयो साठी नाही. विडीयो कसा टाकायचा?

एफ ए क्यू मध्ये पण काही मिळालं नाही.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

एक ए क्यु मध्ये मिळालं उत्तर. नेवर माईंड.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

आज कॅनेडीअन गीझ पाण्यात पोहताना पहात होते. खूप म्हणजे जवळजवळ ९५% गीझ नी स्थलांतर केले आहे. पण हे काही चुकार, आळशी की वृद्ध किंवा अपंग गीझ अजुनही उत्तरेकडच्या थंडीत बसले आहेत.
मला प्रश्न पडला की - हे पक्षी स्थलांतर करतात म्हणजे त्यांना थंडी तर वाजते पण मग ते थंड पाण्यात २४ तास डुंबतात कसे? थंडी तेव्हा कशी नाही लागत?

पाणी ० सेल्सियस = गरम
बाहेर = -४० थंड

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

शक्य आहे.

महिन्याभरात निवडणूकीचा निकाल कळल्यावर घरी परत जावं की नाही ते ठरवावं म्हणत असतील आमचे लिबरल पक्षी! Blum 3

हाहाहा

माझ्या एका मित्राच्या वतिने त्याने सद्य परीस्थितीवर स्वताच पाडलेली ही बोधकथा

-----
एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला. त्याचा सहप्रवाशांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला.

होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते. स्वत: कुत्रा तर बूडेल पण बरोबर सगळ्याना घेऊन बुडेल. राजाच्या लक्षात ही गोष्ट आली. तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला.

पण कुत्रा तो कुत्रा. तो पहिल्यापेक्षा जास्त गडबड करू लागला. हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राजाला विनम्रपणे म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो."

राजाने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाशांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले. कुत्र्याच्या काना तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले.

शेवटी जिवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तरंगू लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली. थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि कुत्रा गपचुप एका कोपर्‍यात जाऊन बसला.

त्याने हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकीत झाला व म्हणाला " पहा. आधी किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय."

प्रवाशी हसून म्हणाला " महाराज, जोपर्यंत स्वतःला त्रास होत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही. त्याला जेव्हा पाण्यात फेकले तेव्हा कुत्र्याला स्वतःच्या जिवाची काळजी वाटू लागली आणि नावेची गरजही लक्षात आली."

*भारतात राहून भारतालाच त्रास देणाऱ्या सर्व कुत्र्यांना समर्पित*

-------

.

कुत्रा लॉयल असतो असे ऐकले आहे.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

"कुत्रा" ऐवजी "साप" हवे होते.

काय वाट्टेल तशा कथा बनवणारे अन त्यावरून वाट्टेल ते निष्कर्ष काढू पाहणार्‍या गाढवांचं काय पण?

१. कुत्र्यांना पोहता येतं.
२. त्यातही कुत्र्यांचं थोडं निरीक्षण केलं तरी समजेल, आकाराने बारकी कुत्री फार भुंकतात. आकाराने मोठे कुत्रे, ज्यांच्याकडे नाव उलटवण्याची ताकद खरोखर असते, ते माजुर्डे तरी असतात किंवा समजूतदार तरी. पण ते भुंकाभुंक करत सुटत नाहीत.
३. त्यातही कुत्रे माणसांशी, मालकांशी एकनिष्ठ असतात. (मांजरंही असतात; पण ती त्याचं प्रदर्शन करत नाहीत.)
४. मांजरं अजिबात गरीब नसतात; यच्चयावत मांजर ही जात माजुर्डी असते. ससे भित्रे असतात.

सगळ्यात महत्त्वाचं, भुंकणाऱ्या कुत्र्यांमुळे नाव उलटत असेल तर ती नाव किती बोगस असेल!

ही बोधकथा काल फेसबुकवरही वाचली आणि खो-खो हसले. पण बोधकथा 'पाडणारी' व्यक्ती तुमच्या परिचयाची आहे, तर त्यांना किमान प्राणीजगताची काही माहिती पोहोचवा. (पुन्हा विचार करता) नका, त्यांना हे सांगू नका. कारण हे वाचून माझी प्रचंड करमणूक झाली.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती तै - त्या मित्राला सल्ला / माहीती देऊन काही उपयोग नाही, ऐकत नाही तो कोणाचेच काही.

त्यांना (बोले तो, आपल्या मित्रवर्यांना) पाण्यात फेकून दिल्यास काही उपयोग व्हावा काय?

नाही म्हणजे, (त्यांच्याच) गोष्टीतील कुत्र्यावर या उपाययोजनेने त्वरित गुण आला होता (आणि तो भुंकायचा थांबला होता), असे वाचले, म्हणून विचारले.

तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा विसरलाशी!

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

भला दांडगा आहे तो, त्याला कसे पाण्यात टाकणार? आणि कोण टाकणार?

मग ठीक आहे. राहू देत त्यांना नावेतच. नाव आपसूकच उलटेल, नि मग काम ऑपॉप फत्ते!

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

सगळ्यात महत्त्वाचं, भुंकणाऱ्या कुत्र्यांमुळे नाव उलटत असेल तर ती नाव किती बोगस असेल!

त्याहीपेक्षा महत्त्वाचे, या असल्या फडतूसांच्या बोगस नावेतून सहश्वान आम पाशिंजरासारखा (आणि तेही राजरोसपणे; आ ला हरून अल रशीद किंवा अब्दुल रहमान अंतुले गुप्तवेषात वगैरे नव्हे!) प्रवास करणारा सो-कॉल्ड राजा किती बोगस असेल!

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

पण आपल्या देशातल्या चावर्‍या कुत्र्यांना पाकिस्तानी भाकर्‍याच जास्त गोड लागतात.

एकच योगी
बाकी सारे भोगी

नवरात्रीचे दहा रंग हे फक्त कपड्यांपुरते मर्यादित ठेवायचे हा प्रकार मला अतिशय बोगस वाटतो. त्याऐवजी दहा दिवसांचे दहा स्वतंत्र सोशल मिडीया मूड्स असले पाहिजेत.

१. गोग्गोड, छबकडी, आनंदी, बालिश बडबड
२. सगळ्यांना नावं ठेवत सुटणं.
३. कंटाळा
४. फक्त इमोटीकॉन वापरूनच बोलणं.
५. विचारवंतांसारख्या, स्वतःलाही न कळणाऱ्या भाषेत बोलणं (जीएप्रेमींनी जीएंची भाषा वापरावी. त्यासाठी स्वतंत्र दिवस मिळणार नाही.)
६. खवचटपणा
७. दिसेल त्याला +१, लाईक किंवा लव्ह, हाहाहा, सॅड, इ. करत सुटणं.
८. राष्ट्रभक्ती
९. ट्रोलिंग
१०. असंबद्ध बोलण्यासाठी दसराच पाहिजे. तसली बडबड वर्षभर चालते; पण दसऱ्याला सीमोल्लंघन करायचं असतं. म्हणून दसऱ्याच्या दिवशी, आपण असंबद्ध बडबड करतो, हे मान्य करावं आणि चेंडू सीमापार धाडून द्यावा.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा प्रत्येक मूडचे मॅप्ड आय डीज डोळ्यांसमोर झळकले.
.
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला । गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ ROFLROFL
_____
अजुन काही मूड्स-
(१) प्रश्नच प्रश्न
(२) "माकड म्हणते माझीच लाल" असे वागणे ............. सॉरी असांसदिय लँग्वेज!!
(३) "फक्त दुसर्‍याची लाल" असे वागणे ............सॉरी असांसदिय ...
(४) कोणावर तरी चरफडून, खार खाऊन असणे व वागणे = सेटलिंग स्कोअर्स. असा फक्त स्कोअर्स सेटल करायचा तर खास दिवसच ठेवायला हवा. Wink
(५) आंतरजालीय "पिन मारणे" दिवस साजरा झालाच पायजेल
(६) सतत माघार घेण्याचा मूड
(७) मेल बॅशिंग
(८) फिमेल बॅशिंग ...... हे जरी वर्षातले ३६५ दिवस, २४ बाय ७, डायरेक्टली/इनडायरेक्टली होतच असते तरी ही एक स्वतंत्र दिवस ठेवाच.
(९) शेंडी तुटो वा पारंबी, स्वतःचा मुद्दा न सोडण्याचा मूड

असं नाव माझ्या शाळेच्या खिडकीतून दिसणार्‍या एका घराला दिलेलं दिसायचं.
मी माझ्या सुट्टीत गावी जातो तेव्हा दर वर्षागणिक मला दिसलेले बदल नोंदवत आहे.
साधारणतः २००० च्या आसपास माझ्या घरासमोर शेतं होती. एका फटक्यासरशी गावाजवळची ती जागा एन. ए. झाली, आणि तिथं कलाल नावाचे एक विस्तारित मुस्लीम कुटुंब आपले चार बंगले उभे करू लागले.
हळू हळू त्यांच्या आजुबाजुने इतर सुखवस्तु मुस्लीम कुटुंबे घरं बांधु लागली. ही घरं इतरांच्या मानाने अधिक ऐश्वर्यपूर्ण आहेत. ती मुस्लीम वस्ती बर्‍यापैकी सधन आणि आधीच्या पिढीपेक्षा शिकलेली आहेत. तिथे नव्यानेच बंगले बांधलेले दोन कुटुंबिय हे काही वर्षांपूर्वी आमचे भाडेकरू होते. ते अतिशय सौहार्दाने राहत आणि सचोटीने त्यांचे व्यवसाय करत. पाचवेळा तर सोडाच महिन्यातून एकदाही त्यांना नमाज वगैरे पढताना मी पाहिले नव्हते. भाषा मुख्यत्वे धारवाडी आणि मराठी.
परंतु आता तिथे सारं बदललंय. अक्सा मशीद नावाची एक मशीद उभी राहिली आहे. बाहेरून दोनतीन धर्मगुरू येऊन तिथे बौद्धिक घेत आहेत. बरेचसे लोक दाढी वाढवून घोट्याच्यावर लेंगे घालून वावरत आहेत. इतरांच्यात त्यांचे मिसळणे शून्यवत झाले आहे. त्यांच्या मुस्लीम अस्मिता फुलल्या आहेत. आमच्या चांगल्या परिचयाची कुटुंबे अंतर ठेऊन वागतात. गावातील सुफी ग्रामदैवतावर यांनी बहिष्कार टाकलेला आहे.
पैसा आल्यानंतर ही मुस्लीम कुटुंबे मूलतत्त्वांकडे ओढली जाताहेतच पण ती भवतालात स्वतःला मिसळायला तयार नाहीत हे चिंताजनक वाटतं. पूर्वी मोहरम इत्यांदींमधे उत्साह दिसे तिथे आता इर्ष्या दिसते. यामागे त्यांच्यात असुर्क्षितता आहे असं वाटत नाही कारण गावात कोणत्याही प्रकारचे धार्मिक तणाव नव्हते. बहुतांश मुस्लीम लोहारकाम, दारूविक्री बेकरी अशा व्यवसायांत होते आणि आत्यंतिक हलाखीत नसत.

बहुतांश मुस्लीम लोहारकाम, दारूविक्री बेकरी अशा व्यवसायांत होते

???

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

स्वल्पविराम राहिला!!

हे फक्त पैशांमुळेच झालेलं असेल असं वाटत नाही.

असुरक्षितता गावातच असायला हवी असं नाही. फियरमाँगरिंग राज्य/देशपातळीवर चालू असेल, तर त्याचा परिणाम गावपातळीवरही होऊ शकतो. सध्याच्या मराठा मूक मोर्च्यांमध्ये सामील झालेल्या यशस्वी मराठा लोकांची यादी पाहता, हे लोक नक्की का सामील झाले असावेत, असा प्रश्न पडतो. 'आपला समाज (जात, धर्म) खतरे में' म्हटल्यावर बरेच लोक विवेक सोडतात असं दिसतं. संपन्न अमेरिकेत, मध्यमवर्गीय असणारे एकांडे शिलेदार आयसिसच्या नादी लागून लोकांची कत्तल करताना दिसतात. ताजं आणि 'आपल्या'तलं उदाहरणच बघा, सर्जिकल स्ट्राईक नक्की झाले का, अशी साधी शंका विचारल्यावर लगेच 'हिंदुस्थान खतरे में' असल्यासारख्या लोकांच्या आक्रस्ताळ्या प्रतिक्रिया जागोजागी, अगदी ऐसीसारख्या छोट्या आणि त्यातल्यात्यात उदारमतवादी संस्थळावरही, दिसत आहेत.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुकाटाआ

अदिती मुसलमानांचा विषय आला की हिंदूंचं लंगडं उदाहरण द्यायलाच हवं का?
.

असुरक्षितता गावातच असायला हवी असं नाही. फियरमाँगरिंग राज्य/देशपातळीवर चालू असेल, तर त्याचा परिणाम गावपातळीवरही होऊ शकतो.

रियली? त्यांचे हे असे वागणे फार सुसंगत आहे तर.
___
नील,

त्यांच्या मुस्लीम अस्मिता फुलल्या आहेत.

म्हणजे नक्की काय काय झाले आहे? सूफी ग्रामस्थानावर बहिष्कार, मिळणे-मिसळाणे बंद की आणखी काही? प्लीज विशद कराल का?

मुसलमानांचा विषय आला की हिंदूंचं लंगडं उदाहरण द्यायलाच हवं का?

कैतरीच बै! मुसलमानांचा विषय आला तेव्हा मी अमेरिकन आणि भारतीयांची उदाहरणं दिली.

खरं तर माणसांचा विषय आला तेव्हा प्राण्याचं उदाहरण देऊन लॉजिकल फॅलसी केली नाही, सफरचंदांशी संत्र्यांची तुलना केली नाही, ह्याबद्दल माझ्या अभिनंदनाचे फ्लेक्स लागले पाहिजेत.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऑफिसला येताना फ्लेक्स पहिला. काय भानगड? :O

flex

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

.

फोटो गायब का होतात? Sad

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

अहो तो फोटो कोणत्या साईटवरुन होता> तिथुन उडाला असेल. पण असा फोटो जनरेट्/मॅनिप्युलेट झालाच कसा? :O

समर्थ रामदास स्वामी काय म्हणून गेलेत?

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे Wink

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

चिनगीसाब नावाच्या सुफी संताचा चौथरा + आबाइसा नावाच्या एका साध्वीचा मुखवटा + मारुतीची प्रतिमा असलेला दगड, अशी तीन सामाईक पूजास्थाने गावातल्या एका मध्यवर्ती वाड्यात आहेत. पूर्वी या सर्वांची पूजा एक हिंदू पुजारी करत असे. असलं विचित्र क्रॉस कॉम्बीनेशन असलेल्या या कलेक्टीव देवस्थानाला सगळा गाव लोटे. गुरुवारी सामिष नवसाच्या कंदुर्‍या असत आणि त्या प्रामुख्याने हिंदुंच्या असत.
नंतर या पूजा दहा वर्षांपूर्वी एका मुस्लीम व्यक्तीला दिल्या गेल्या. काही लक्षणीय बदल असे आहेत : नियमित मशीदींत जाणार्‍या मुस्लीमांची संख्या वाढली, मशिदिंची संख्या वाढली. मूर्तीपूजा ही शुद्ध मुस्लीमांत वर्ज्य असल्याचे शोध बर्‍याच जणांना लागु लागले. हळू हळू चिनगीसाब स्युडो असल्याची खात्रीच या मंड्ळींत दिसू लागली. मुस्लीम पुजारी हिंदू प्रतिमांची पूजा करणे सोडू लागला. दसर्‍याच्या दिवशी वाड्याच्या बुरुजांवर मोठे पांढरे निशाण फडकवणे अचानक नॉन ग्लॅमरस झाले. (या पाढर्‍या निशाणबरोबरच एक छोटी काळी पट्टी बांधली जाते. ही पट्टी सुटताच राजाच्या घरी मृत्यु होतात अशा विराण्याही लोक कुजबुजेनात.) पूर्वी हे निशाण फडकवण्यासाठी अनेक मुस्लीम जमत, आता ही फक्त हिंदू लोकांनी करायची गोष्ट उरली आहे. अशा अनेक भेदभाव न मानणार्‍या छोट्या परंपरांचा आपण एक अविभाज्य भाग आहोत ही भावनाच या मुस्लीम कुटुंबांतून नष्ट होत चालली आहे. या उलट ते स्वतःला कटाक्षाने वेगळं ठेऊ पाहत आहेत. आपला आवडता हिंदू न्हावी दोस्त मेला म्हणून आजतागायत दाढी आणि केस न कापलेले माझ्या मित्राचे आजोबा आणि बाजुच्या मशीदीत सांगितलं म्हणून दाढ्या वाढवून टोप्या घालणारे त्यांची मुले या दोन पिढ्यांत खूप फरक वाटत आहे. वार्डातून मुस्लीम नगरसेवक निवडून आणण्यासाठी एक झालेल्या ह्या अक्सा सोसायटीच्या अस्मिता फुलल्या नाहीत तर काय?

हे वर्णन पुरेसं, माहितीपूर्ण आहे, ह्या अस्मिताच आहेत. फक्त त्याचं कारण पैसे एवढं मर्यादित वाटत नाही. पैसा आलाच, त्याच्याच जोडीला असुरक्षितताही आली. जशा स्पीकर्सच्या भिंतीसुद्धा पैशांसोबत आल्या. आपल्या जमावाला (होय, जमाव हाच शब्द वापरायचा आहे) धरून ठेवण्याची इच्छा तीव्र झाली.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पत्रकार: What is your Marathi language proficiency on a scale of 10?
टिकलू: Its my mother tongue. (blushing) I would rate it at 8 no no 9.

(१-२ आठवडे ऐसीवर वावरल्यानंतर)

पत्रकार: Now sir?
टिकलू: Lets not talk about it.
पत्रकार: No, sir. Still..
टिकलू: 4

emb

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

खी: खी:

नव्वदोत्तरी विशेषा़ंक वाचून सुचला का हा जोक?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

नाही, असंच सुचलं. इथं साधारणतः मला २०-२५% शब्दांचा अर्थ कळत नाही. पण एकूण वाक्यांवरून फिगर आउट करतो. शाळेत इंग्लिश मिडीयम आणि चाळीत आयुष्य गेलंय त्यामुळे मराठी पण कमीअधिक प्रमाणात सोकाजी त्रीकोलेकर लेवलचं.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

आपल्या अवयवांना काहीएक मेमरी(स्मृती) असते असे वाचलेले होते. अनुभवलेले आहे. परत एकदा अनुभव आला - पासवर्ड आठवेपर्यंत आधीच हात त्या अक्षरावरती जाऊन थांबलेला असतो Smile
ग्रोपिंग नंतर शरीराच्या "ग्रोपड" भागाने नंतर अनेकानेक दिवस्/वर्षे केलेला आक्रोश मी विसरु शकत नाही. (याविषयी अधिक बोलायची मला इच्छाही नाही. तेव्हा प्रश्न विचारु नयेत) फक्त मुद्दा प्रुव्ह करण्यासाठी दिलेली पण सत्य उदाहरणे आहेत.

आपल्या अवयवांना काहीएक मेमरी(स्मृती) असते असे वाचलेले होते. अनुभवलेले आहे.

मेमरी अवयवांना नसते, मनालाच असते. मी काही दिवसांपूर्वी एक पुस्तक वाचले "Thinking Fast and Slow". त्याच्या बेसिस वर सांगतोय, खरे खोटे माहित नाही.

मेमरी दोन प्रकारची असते - सिस्टम १ आणि सिस्टम २. हे दोन्ही अगदी काटेकोरपणे वेगळं नसावेत, पण लेखक पुस्तकात तसं संबोधन करतो. simplicity साठी असेल. तर सिस्टम १ म्हणजे automatic ब्रेन. ज्या गोष्टी आपण सहजासहजी करत असतो त्या. त्याला बऱ्याच गोष्टी माहित असतात आणि तो त्या हवे तश्या वापरत असतो.

सिस्टम २ म्हणजे विचार करायला लावणाऱ्या गोष्टी. उदा अवघड गणित. आता interesting गोष्ट ही कि बऱ्याच गोष्टी सिस्टम १ हमखास करत असतो पण सिस्टम २ (म्हणजे conscious ब्रेन) ला ते realize होत नसतं. थोडक्यात मला एखादी गोष्ट माहितीय हेच मला माहित नाहीय. generally art, dance, painting सारख्या गोष्टी सिस्टम १ कंट्रोल करत असतो. एखादं गाणं संगीतकाराला सुचतं पण ते का सुचलं, कसं सुचलं हे त्याला सांगता येत नही कारण सिस्टम २ (म्हणजे conscious ब्रेन) ने त्याचा विचार केलेला नसतो.

Now coming back to your example - तुमच्या सिस्टम २ ला त्या alphabet वर जायची सवय झाल्यामुळे सिस्टम २ ने ते काम सिस्टम १ ला सोपवलंय. म्हणजे auto-mode वर. जेव्हा एखादा खेळाडू प्रचंड practice करून तरबेज होतो तेव्हा हीच प्रक्रिया होत असते. त्याचं सिस्टम २ त्याच्या सिस्टम १ ला शिकवत असतं. एकदा सिस्टम १ शिकलं कि दरवेळी त्याला विचार करायला लागत नाही. आणि मग प्रक्षक म्हणतात - "wow, this comes naturally to her".

वाईट अनुभवांबद्दल थोडं फार तसंच होत असावं. सिस्टम १ ने स्टोर केलंय पण सिस्टम २ (म्हणजे conscious ब्रेन) विसरलंय.

Ref: Thinking, Fast and Slow - Daniel Kahneman

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मग १००% सायकोसोमॅटिक त्रास असावेत. किंवा ही जी हाताला त्या बरोबर अल्फबेटवरती जाऊन स्थिरावण्याची प्रक्रिया घडते तीही मग अंतर्मनातून उगम पावत असावी.

हो, खरंच खूप interesting पुस्तक आहे. त्यात आपल्या स्वाभावाबद्दल पण बऱ्याच interesting गोष्टी आहेत. म्हणजे आपण कशे influence होतो, निर्णय कशे घेतो. "दिसतं तसं नसतं" ची अनेक अनेक उदाहरणं.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

उदय यांनी कौतुक केले होते कोणत्या तरी धाग्यावरती. मी खूप ऐकले आहे. वाचेन एकदा.
___
उपाशी बोका यांनी ही म्हटले आहे - http://www.aisiakshare.com/node/1855#comment-27741

दुकाटाआ

दुकाटाआ

:quest:

काय टाकू?

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.