मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७२

माझ्या एका मित्राला रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल वर ताबा ठेवण्यासाठी त्याच्या आहारतज्ञाने जेवणापूर्वी apple cider vinegar घ्यायला सांगितले आहे. सोबत इतरही नेहमीच्या आहार आणि व्यायामाबद्द्ल सुचवण्या आहेत. हे apple cider vinegar प्रकरण मित्राला आणि मलाही नविन आहे. बाटलीच्या खोक्यावर अनेक दावे केलेले आहेत, जसे - साखर कमी होइल, वजन आटोक्यात राहील .... बाटलीवर 'mother of vinegar' असेही लिहिलेले आहे.
हे काही नवीन फॅड आहे काय ?

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

हलके घ्या : दिवाळी अंक

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

जेम्स बॉंड आणि पान बहार

मागे जेम्स बॉंडने पान बहारची जाहिरात केली तेव्हा रा.घा सरांनी ह्याच्यावर काहीतरी लिही असं प्रोत्साहन दिलं (काहीतरीच त्यांचं ब्वॉ). मला त्या न्यूजमध्ये जास्त comic potential दिसलं नाही म्हणून एवढा काही रस नव्हता. पण पुन्हा काही दिवसांपूर्वी पीयर्स ब्रॉसननने असं काहीतरी जाहीर केलं कि पान बहारने त्याला फसवलंय वैगेरे. तेव्हा म्हटलं बघूया तरी काय सुचतंय का. थोडं सुचलं पण काही खास ष्टोरी अशी निघून आली नाही. त्यामुळे हा प्रोजेक्ट मी बंद करतोय. मुख्य कारण – आळस. जोड कारण – अरे संसार संसार मधून वेळेचा अभाव. पण म्हटलं जो काही कच्चा ढाचा (read कचरा) झालाय तो फ्लश करण्यापेक्षा इथे टाकूया. पुढे-मागे हॉलीवूडवर एखादा स्टँडअप करायचा मनसुबा मनाशी बाळगून आहे, त्यात ह्यातलं काहीतरी उचलू शकतो.

वाक्यरचना अजून कच्ची आहे त्यामुळे पंचेस उठून येत नाहीयत.
=================

जेम्स बॉंड हा गेली कित्येक वर्षं जगातला हरहुन्नरी गुप्तचर डबल ओ सेव्हेन म्हणून ख्याती मिरवतोय. त्याच्या कामगिऱ्या बघितल्या तर प्रेक्षकांचे एकच उद्गार निघतात – “असा गुप्तचर होणे नाही”. दिलेलं प्रत्येक मिशन त्याने लीलया पार पाडलंय. व्हिलन कितीही कुशार, कितीही बलवान का असेना, हा त्याचा अगदी चित्तथरारकरित्या खात्मा करायचा. व्हिलनचा फुगा करवून हवेत उडवणे, त्याला कड्यावरून खाली ढकलणे, ट्रेनमधून बाहेर फेकणे एवढंच काय तर त्याला अंतराळात पाठवणे हे काम तो अश्या matter of factly way नी करायचा ज्या सहजतेने केजरीवाल धरण्यावर बसतो.

म्हणूनच “एम” ने एम आय ६ च्या पुढील मिशन साठी बऱ्याच आशेने बॉंडला इंडियाला धाडले. (some punches on how bond may have to adjust in india) तरी “क्यू” ने त्याला हजार वेळा बजावलं होतं कि दिल्लीला उतरतोयस, कुठेही जाशील तर पाकीट सांभाळून. पण पाकीट सांभाळायच्या नादात उतरताक्षणीच त्याचं सामान लंपास होईल हे त्याला कुणीच बजावलं नव्हतं. बरं बॉंडला बॉंड गर्लचं भलतंच वेड आहे हे तर आपल्याला माहितंच आहे. पण दिल्ली सारख्या ठिकाणी एखादी दिल्ली कि कुडी बॉंड गर्ल म्हणून पटवणं महागात पडू शकतं म्हणून पर्यायी मलाच बॉंड गर्ल म्हणून घेऊन जा असा मनिपेनीचा एक निरागस सल्ला आला होता. पण मनिपेनीचं ऐकेल तो बॉंड कसला!

हा दिल्ली कि कुडीला पटवायला रस्त्यावर पडला खरा. पण सिग्नलला गाडी उभी केल्यावर दिल्लीच्या कुडीनं ह्याला लायसन विचारलं तेव्हा गपगुमान चिरीमिरी देऊन मामला मिटवेल का नाई? आपल्या स्टाईलमध्ये नाव सांगायची खोटी कि त्या कुडीनं ह्याला विनयभंगाच्या प्रकरणात अडकवलं. लोकांनी असला बेदम मारलाय म्हणून सांगू शिवाय सोशल मिडीयावर बदनामी झाली ती वेगळीच. न्यूज चॅनलवर ह्या दाढीवाल्या बॉंडला शेवटी कुणीतरी ओळखलं आणि विचारलंच – “का नितीशजी, बिहारकी राजनीती छोडकर इहा दिल्लीमे का कर रहे हो?”

पुढे बॉंड बिहारला येऊन नितीशचा बॉडी डबल म्हणून पान बहारची जाहिरात करतो अशी काहीतरी ष्टोरी जोडायचा प्लॅन होता.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

Thoughts/ comments/

Thoughts/ comments/ suggestions?

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

नाव सांगण्याने विनयभंग कसा

नाव सांगण्याने विनयभंग कसा होतो? ते कळले नाही. बाकी हे ललीत म्हणुन टाकणार आहात की स्किट करणार आहात? मला ठीकठाक वाटले.

हं, मला दिल्लीत मुली सेफ

हं, मला दिल्लीत मुली सेफ नाहीयत पण मुलं पण सेफ नाहीयत हा मुद्दा पुढे आणून त्यावर कोटी करायचीय. म्हणजे मुलांनी जरा काही केलं कि लगेच कसा त्यांचावर आळ घालतात (जसं मागे एक प्रकरण झालेलं दिल्लीत). पण तो जोक एकदम व्यावास्थीत पॅक झालेला नाहीय. स्टँटअप ला पंच खूप पॅक करायला लागतो (आपटीबार फटाक्यासारखा), मोठ्या गोष्टी सांगत बसू शकत नाही. मग रटाळ होतं. त्यामुळे होतं काय कि कधी कधी सेटप थोडक्यात उरकला तर जोक लक्षात येत नही. पण धन्यवाद. ऐसीवर अशाच feedback ची अपेक्षा आहे. पण जास्त कुणी वाचतं असं वाटत नही.

सध्या तरी याचं काय करायचं ठरवलं नाहीय. पण कुठेतरी उपयोग होईलच.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

पण जास्त कुणी वाचतं असं वाटत

पण जास्त कुणी वाचतं असं वाटत नही.

वाचतात पण बोलत नाहीत (स्माईल)
वाचतात की नाही हे पाहायचं म्हणजे लेखाचा काऊंटर पहायचा. त्यातून अर्थात आपले दर तासाला स्वतःच्या लेखावर होणारे ५० क्लिक्स वजा करुन (लोळून हसत)
____

सध्या तरी याचं काय करायचं ठरवलं नाहीय. पण कुठेतरी उपयोग होईलच.

जरुर होइल. केजरीवाला/नितीश हे पंचेस मस्त असावेत पण मला राजकारणाची ओ की ठो माहीते नसल्यामुळे कळले नाहीत.

दिवाळीअंक

नक्की काय पुण्याई आहे म्हणुन आमच्यासारख्या निठल्ल्यांना, आळशांना असा दिवाळीचा वाचनफराळ मिळतो? ना आम्ही काही मदत केली ना छदाम मोजले Sad. असा प्रश्न मनात साहजिकच तरळून गेला.

ना आम्ही काही मदत केली ना

ना आम्ही काही मदत केली ना छदाम मोजले

मला हे वाक्य पटत नाही. कलाकार जसा महत्वाचा असतो, तसाच रसिक देखील. एक सच्चा रसिक नसेल तर कलाकार कला घड्वूच शकणार नाही. जेव्हा एक रसिक कलाकाराला सलाम ठोकत असतो, तेव्हा खरंतर तो कलाकार सुध्दा आतून त्या रसिकाचे आभार मानत असतो. त्याच्या कलेवर प्रेम केल्याबद्दल त्या कलेला मान दिल्याबद्दल.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

परस्परावलंबन

काहींना व्यक्त होण्याची (लेखन, चित्रं काढणं, चित्रं बनवणं इत्यादी), काहींना प्रकाशनाची, काहींना मिरवण्याची खाज आहे; जशी तुला वाचनाची आहे. आणि तुझ्यासकट सगळ्यांना उत्पन्नाचा इतर स्रोत आहे, जो पुरेसा वाटतो. मला दिवाळी अंक काढल्यावर मिरवायला आवडतं म्हणून मी काम करते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

निषेध.

मुखपृष्ठावरचं पीस आवडलं. त्याचा स्रोत भारत का पाकिस्तान हे स्पष्ट न सांगणाऱ्या व्यवस्थापकांचा निषेध.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सध्या गुगलची कोठली साइट फोटो

सध्या गुगलची कोठली साइट फोटो शेअरिंगसाठी आहे? इथे फोटो देण्यासाठी? गुगलचीच drive,photo,plus,,hangoutsवगैरे पैकी कोणती? picssa बंद केली. फ्लिकर वा इतर नकोय. गुगलचीच लेटेस्ट?

*फ्लिकर वा इतर नकोय.*= त्याची

*फ्लिकर वा इतर नकोय.*= त्याची माहिती आहे या अर्थाने.

Google Photos

Google Photos

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

हम्म् हे android appमध्येच

हम्म्
हे android appमध्येच चालतंय.विंडोज फोनात वेबसाइटमधून चालत नाहिये आता.पुर्वी drive,picasa हे सर्व साइटमधून करायचो.ते फोटो दिसताहेत पण नेविगेशन फ्रिज केलय. गुगल प्लस चालू आहे पण त्याचा उपयोग नाही.
एकीकडे माइक्रोसॅाफ्टवाले android साठीही Onedrive,Onenote देताहेत तर google android संकुचित होतंय.Wish FLICKR should not flickr in Verizon's hands. free terabyte of space for any OS.

दंगल ट्रेलर

दंगलचा ट्रेलर पाहिला. बऱ्याच दिवसांनी (वर्षांनी योग्य ठरेल) एखादा ट्रेलर बघितल्यावर फिल्म बघायची इच्छा झाली.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

हे घ्या तुम्हाला

.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

फेसबुकवर काही "आमिरचा

फेसबुकवर काही "आमिरचा पिच्चरवर बहिष्कार घाला" अशा अर्थाचे पोस्ट दिसले आणि वरील चित्राचा उलगडा झाला. ऐसीवरही अशा प्रकारचे ट्रोल्स पाहून आश्चर्य वाटले.

troll

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

(No subject)

WTF

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

मुखपृष्ठावरती जे फ्रेन्च गाणे

मुखपृष्ठावरती जे फ्रेन्च गाणे (दुवा) आहे, त्याला इंग्रजी सबटायटल्स (उपशीर्षके?) नाहीत. कळत नाहीये ते गाणं.
________

http://www.discoverwildlife.com/animals/bugs/can-butterfly-defend-itself...

हे जे कॅमुफ्लाज (पर्यावरणात मिसळून जाणं) असतं ते कीटकांत, पक्ष्यांत कसे उत्क्रांत होते? कोणता असा इन्टेलिजन्स्/सुपर इन्टेलिजन्स असतो जो या गोष्टींचे नियमन करतो?

सबटायटल्स

यूट्यूबवर सबटायटल्स आहेत. मात्र ती एनेबल करायला लागतात.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओह ओके. धन्यवाद. एनेबल करुन

ओह ओके. धन्यवाद. एनेबल करुन ऐकते.

रेल्वेच्या डब्ब्यात एक होती

रेल्वेच्या डब्ब्यात एक होती मड्डम
तिने मला विचारले व्हॉट इज धिस?
मी तिला उत्तर दिले .. कोंबडीचे पीस
------

या आणि अशासारख्या तत्सम बाळगीताचे गीतकार कोण असावेत?

हे राष्ट्रं देवतांचे ... हे राष्ट्रं प्रेषितांचे |
आचंद्रसूर्य नांदो ... स्वातंत्र्य भारताचे ||

अमेरिकन राजकारण, मराठा

अमेरिकन राजकारण, मराठा मोर्चे, फेमिनाझी-एम.सी.पी धोरणे या सगळ्यांमध्ये दडलेला हा पोस्ट आवडला. ही बालगीतं आहेत काय? आम्ही लहानपणी चाळीत जोक म्हणून सांगायचो. अशा प्रकारचे -

एक इंग्लिश बाई असते आणि एक मराठी बाई असते. इंग्लिश बाई मराठी बाईला विचारते, "व्हॉट इज युवर नेम?". मराठी बाई तिला दगड मारते आणि म्हणते, "हा बघ माझा नेम". प्रचंड हशा...

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

प्रचंड हशा... हाहाहा खरय

प्रचंड हशा...

(लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत) हाहाहा खरय मुलं खूप हसतात
त्या हसण्याचं आता हसू येतं (स्माईल)

एका माणसाला फक्त ३ इंग्रजी

एका माणसाला फक्त ३ इंग्रजी शब्द येत असतात - येस, नो, थॅक यु.
एका बाईची पर्स हरवते ती विचारते "तू घेतलीस का?"
तो - येस
बाई - परत कर
तो - नो
ती बाई त्याला एक मुस्काटात देते
तो - थँक यु
____________

म्हणजे काय म्हणजे
वाघाचे पंजे
कुत्र्याचे कान
ऊंटाची मान
तुझं माझं लग्न सावधान
_____
फॉक्स्पूरची मँगोलेडी तू मला पाव

शुचीमामी शुचीमामी, तुम्ही

शुचीमामी शुचीमामी,
तुम्ही शुचीमामी आहात तर मग शु कुठाय? ती (एम.सी.प्यांची माफी मागून) / तो (फेमिनाझींना वंदून) कधी येणार?

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

'क्लुजी 'क्लुजी तुम्हीच

'क्लुजी 'क्लुजी तुम्हीच क्ल्यु द्या की शु कुठे गेला/ली? (डोळा मारत)

इथे ऐसीवरील अनेक डावी मंडळी

इथे ऐसीवरील अनेक डावी मंडळी उजव्या हिलरीचा जोर्जोरात प्रचार करताना बघुन मौज वाटली.
त्यांपैकी काहिंना विचारले तर म्हणे, "ती काही आवडती नाही. दोघांमध्ये तुलनेने बरी इतकंच. ट्रम्प वेड्यासारखा काहीही बोलतो त्यापेक्षा ही आतल्या गाठीची आहे हे माहितीये पण म्हणूनच ती इथवर पोचली!"

मग हेच लॉजिक जेव्हा राहुल विरुद्ध मोदींमध्ये पब्लिक लावत होतं तेव्हा हीच लोकं इतकी बोम्बाबोम्ब का करत होते?

उजवी हिलरी चालते तर उजवा मोदी का नाही?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गृहितक

थे ऐसीवरील अनेक डावी मंडळी उजव्या हिलरीचा जोर्जोरात प्रचार करताना बघुन मौज वाटली.

कोण जोर्जोरात प्रचार करतंय ते माहित नाही. पण हिलरी उजवी आहे या गृहितकामागे काय तर्क आहे तो जरा स्पष्ट कराल का?

फ्री ट्रेडला समर्थन हे

फ्री ट्रेडला समर्थन हे उजव्यांचं लक्षण आहे राईट?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

फ्री ट्रेडला समर्थन हे

फ्री ट्रेडला समर्थन हे उजव्यांचं लक्षण आहे राईट?

उत्तर कॉम्प्लेक्स आहे. फ्री ट्रेड ला समर्थन हे खरं म्हंजे लिबरल प्रपोझिशन असायला हवे.

अमेरिकन डावे स्वतःला लिबरल म्हणवतात. लिबरल म्हंजे - Pertaining to Liberty. स्कॉटिश इतिहासकार विल्यम रॉबर्टसन यांनी १७६९ मधे लिबरल या शब्दाचा राजकीय विषयांमधे प्रथम वापर केला. पुस्तकाचे नाव - The History of the Reign of the Emperor Charles V, 3 vol. व रॉबर्टसन यांनी त्या पुस्तकात लिबरल हा शब्द "principles of liberty and commercial freedom" अशा अर्थाने वापरला. तेव्हापासून तो शब्द अधिकअधिक वापरला गेला. "फ्री ट्रेड" ह्या संज्ञेचे मूळ त्या "commercial freedom" या शब्दप्रयोगातच आहे असं मला वाटतं.

१९९५ च्या आसपास जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेच्या दरम्यान क्लिंटन यांनी "ग्लोबलायझेशन इज द सेंट्रल रिअ‍ॅलिटी ऑफ अवर टाईम" असा प्रचारात्मक संदेश दिला होता. "फ्री ट्रेड" ह्या चा अर्थ ग्लोबलायझेशन चा एक हिस्सा म्हणून पहावा. नाफ्ता चा पुरस्कार क्लिंटन यांनीच केला होता. वुड्रो विल्सन (डेम) यांच्या कालात अमेरिकन संसदेने अनेक टॅरिफ्स कमी केली. व नंतर १९३० च्या आसपास Smoot-Hawley Tariff कायदा रिपब्लिकनांनी पास करून घेतला व टॅरिफ्स वाढवली. टॅरिफ हे "फ्री ट्रेड" ला मारक असते. तेव्हा डेम्स हे खरे "फ्री ट्रेड" वाले आहेत असं म्हणायला खूप वाव आहे.

रिपब्लिकन्स नेहमी फ्री मार्केट कॅपिटलिझम च्या नावाने जयघोष करत असतात पण "फ्री ट्रेड" चा मुद्दा आला की "स्थानिक नोकर्‍या" वगैरे ची कोल्हेकुई सुरु करतात.

हो

रिपब्लिकन एरवी कट्टर फ्री ट्रेड असले तरी डेमोक्रॅट ही फ्री ट्रेड अपोनंट्स आहेस असे नाही. सध्याचा सावळा गोंधळ अजून कन्फ्यूजिंग आहे हे सांगणे न लगे (दोन्ही पक्षात. उदा. टीपीपी वगैरे.)

बोंबाबोंब म्हणजे नक्की काय?

हेच लॉजिक जेव्हा राहुल विरुद्ध मोदींमध्ये पब्लिक लावत होतं तेव्हा हीच लोकं इतकी बोम्बाबोम्ब का करत होते?

हं... एक कारण अमेरिकेत अध्यक्षीय लोकशाही आहे, भारतात संसदीय लोकशाही आहे. भारतात संसदेला सर्वाधिक अधिकार आहेत, अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांना.

दुसरं, ट्रंपला राजकारणाचा का-ही-ही अनुभव नाही हा मुद्दा दुय्यम आहे. ट्रंप कोणाचंही फारसं ऐकत नाही, त्याच्या सल्लागारांचंही नाही. त्यानेच निवडलेल्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारालाही जाहीररीत्या तोंडघशी पाडतो; हे प्रकार राहुल गांधीने केलेले नाहीत. ट्रंप उघडउघड वंशवादी, धर्मद्वेष्टी, सेक्सिस्ट, भूमिका घेतो; हा आरोप भारतात मोदी आणि भाजपावर करता येईल; रागा आणि युपीएला उदारमतवादी म्हणण्याची वेळ येते (दगडापेक्षा वीट मऊ)! आणि ह्या मुद्द्यावर मराठीत मलाही निबंध पाडता येईल; अमेरिकी राजकारणावर माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण लेखन अमेरिकी माध्यमांमधून येत आहे.

ट्रंपला विरोध करणारे लोक 'हेच लॉजिक' वापरत नाहीत; मुळात प्रश्नातलं गृहितक चुकलंय.

१. इथे खरं तर अनेकवचन हवं. (पण सध्या वेळेची चणचण आहे.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राहूल गांधी

त्यानेच निवडलेल्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारालाही जाहीररीत्या तोंडघशी पाडतो; हे प्रकार राहुल गांधीने केलेले नाहीत

राहूल गांधींनी पक्षाने निवडलेल्या पंतप्रधानांना जाहीररीत्या तोंडघशी पाडले होते.

+१

ते अध्यादेश फाडणे वगैरे प्रकार लोकांना माहिती नसतात हे रोचक आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ऋ , तुमचा मुद्दा रोचक आणि

ऋ , तुमचा मुद्दा रोचक आणि संतुलित आहे !! आणि तुमचे म्हणणे बरोबरच आहे . फक्त एक शंका कि ट्रूम्पोबाच्या तुलनेत हिलरी उजवी कधी झाली ? ( म्हणजे अर्थात तुम्ही उजवा याचा कुठला अर्थ पकडताय ? ? ) (डोळा मारत)

ट्रम्प का काही मध्य नव्हे

ट्रम्प का काही मध्य नव्हे त्याच्या तुलनेत डाव्या-उजव्यावरून उजवे ठरवायला (डोळा मारत)

भारतात मी काँग्रेस आणि भाजपा दोघांनाही उजवे पक्ष समजतो. भारतात डावे पक्ष आता पुरते हरले आहेत.
अगदी तृणमूल वगैरे स्वतःला डावीकडे भासवणारे पक्ष सुद्धा लोकांचे 'बंगाली' या ओळखीवरून (गुजराती सारखंच) पोलरायझेशन करते तेव्हा त्यांना डावे म्हणार्‍यांची मौज वाटते

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कमीतकमी मोदी सौदीच्या

कमीतकमी मोदी सौदीच्या इशार्‍यावर तरी नाचणार नाही.

कदाचित ती सौदीच्या इशार्‍यावर नाचेल म्हणुनच ऐसीवरच्या समाजवाद्यांना आवडत असेल. आणि त्याच कारणासाठी मोदी आवडत नसणार.

काही मुली

सुनिती चौधरी/ घोष आणि शांती घोष या दोन मुली वय वर्षे १४ फक्त या दोन्ही १४-१२-१९३१ या दिवशी सध्या बांगलादेशात असलेल्या कोमीला जिल्ह्याच्या इंग्रज डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट मि. स्टीव्हन्स ला भेटण्यास त्याच्या बंगल्यावर गेल्या. स्वीमींग पुल ची परवानगी घेण्याचा अर्ज सोबत होता म्हणजे हा बहाणा होता. जेव्हा स्टीव्हन अगदी समोर आला तेव्हा त्याच्यावर जवळुन या मुलींनी गोळ्या मारल्या तो जागीच मेला. नंतर ब्रिटीश सरकारने त्यांना रीतसर पकडल जबर मारहाण केली खटला चालला व वयामुळे फाशी ऐवजी जन्मठेप मिळाली.
सुनितीचं जेल मध्ये रीतसर जबर टॉर्चर झाल. त्यात सॉलिटरी कन्फाइनमेंट होती. सर्व काही होत. पुढे सात वर्षांनी तीची सुटका झाली नंतर तीने अर्धवट सोडलेल शिक्षण पुर्ण केल. तीने मेडीकल ला प्रवेश घेतला पुढे डॉक्टर झाली पुढे १९४७ मध्ये तीने लग्न केलं
अनेक प्रश्न मनात उभे राहतात मार्च १९३१ मध्ये भगतसिंह ला फाशी झालेली.
याच गुन्ह्यासाठी आपण सर्व भगतसिह ला ओळखतो. अगदी खणुन काढल तरी दुर्गाभाभी कोणालाच फारशी माहीत नसते. असे का होते एक पुस्तक आहे दुर्गाभाभी का विसरली गेली असेल. ते वाचायचय एक सिनेमा आहे चितगाँग म्हणुन २०१२ चा मनोज बाजपेयी चा नवाज सिद्दीकी चा ज्यात सुर्या सेन प्रितीलता वडेद्दार इ. आहेत. तोही बघायचाय पण प्रश्न येतो या मुली या स्त्रीया का झाकल्या गेल्या ? दुसरा लोह"पुरुष" वल्लभभाईंनी या दोन मुलींची लाज का वाटली त्यांच्यावर टीका का केली असेल ? तेव्हाय्चा मिडीयाने या मुलींच्या कृत्याला कसे कव्हर केले असेल ?
अजुन एक म्हणजे इतक्या लहान मुली १४ वर्ष फक्त म्हणजे जास्तीत जास्त ८ वीच्या मुली त्यांना कळत होत हे सर्व ? म्हणजे ब्रिटीश भारत स्वातंत्र्य तत्व वगैरे ? आपल्या सभोवतालच्या ८वीतल्या मुली बघितल्या तर त्या अशी हत्या जवळुन गोळी मारुन करु शकतात एका मोठ्या माणसाची एका मोठ्या तत्वासाठी ?
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महीला क्रांतीकारक हा एक जबरदस्त कुतुहलाचा विषय सध्या बनलेला आहे. बाय द वे दुर्गा भाभी अगदी अलीकडे नव्वदीतच गाझियाबद मध्ये होत्या व वारल्या
यांच्या काही लिंक्स कोणाला रस असेल तर
http://hinduhistory.blogspot.in/2008/02/suniti-choudhury-later-suniti-gh...

http://www.indiatimes.com/entertainment/bollywood/7-reasons-the-forgotte...

http://yemothers.blogspot.in/p/characters-of-ye-mothers.html

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

आज ऐकण्यात आले की हाफ अ

आज ऐकण्यात आले की हाफ अ मिलिअन पेक्षा जास्त हिटस जर एखाद्या यु ट्युब व्हिडीओला मिळाल्या तर यु ट्युब त्या व्हिडिओकर्त्याशी संपर्क साधते व एका जाहीरातीच्या मागे १ पेनी का काहीतरी देऊ करते. तो स्टार वॉर्स वाला चिऊबाका चा व्हिडीओ होता ना त्या बाईने असे $५००,००० मिळवलेत.

छट् पुजा हा बिहारातला करवा

छट् पुजा हा बिहारातला करवा चौथ?

आता ही छटपूजा काय प्रकारे?

आता ही छटपूजा काय प्रकारे?

बिहारचा काहीतरी प्रकार आहे.

बिहारचा काहीतरी प्रकार आहे. मला आठवतंय बऱ्याच वर्षांपूर्वी शिवसेना आणि मुंबईतल्या बिहारयांमध्ये छटपूजा वरून बरीच वादावादी झालेली. शिवसेनेने म्हंटलेले - "छटपूजा करायची तर बिहार मध्ये जाऊन करा". लालूने वैगेरे "मुंबईत येऊन छटपूजा करून दाखवू" वैगेरे म्हंटलेले. बरीच बरीच घोषणाबाजी झालेली.

मला वाटतं छटपूजा म्हणजे करवा-चौथ नाहीय, वेगळा काहीतरी प्रकार आहे.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

छट पूजा ही छट मतलब (कार्तिक

छट पूजा ही छट मतलब (कार्तिक शुक्ल-उत्तरेतल्या पद्धतीने कृष्ण?) षष्ठीला असते. भाऊबीजेनंतर ४ दिवसांनी.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

सही आवडली

"अक़्ल को तन्क़ीद से फ़ुर्सत नहीं
इश्क़ पर आमाल की बुनियाद रख"
तुझी "बुद्धी" कायमच उणे-दुणे काढण्यात मग्न असणार आहे. तेंव्हा "प्रेम" हाच व्यवहारांचा पाया ठेवून वाग ! : इक्बाल

मिलिंद यांची सही आवडली.
_____
ऐसीची "दिन दिन दिवाळी-गाईम्हशी ओवाळी" कधी सुरु होणार????? Sad Sad

इक्बाल / दिवाळी

मिलिंद यांची सही आवडली.
Thanks! (Iqbal does have a "thing" against "mere" intellect!)

ऐसीची "दिन दिन दिवाळी-गाईम्हशी ओवाळी" कधी सुरु होणार?
23 Oct. Just heard that!

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

ऐसीची "दिन दिन

ऐसीची "दिन दिन दिवाळी-गाईम्हशी ओवाळी" कधी सुरु होणार?
23 Oct. Just heard that!

मस्त मस्त मस्त. अर्रे यार (हा शब्द तुम्हाला उद्देशून नाही मिलिन्दजी, सहज म्हणते आहे)मी केव्हाची डॉळे लावुन बसलेय कारण नातीगोती हा विषय आवडीचा आहे माझ्या.

मला आधीची सिंहाची सही

मला आधीची सिंहाची सही आवडलेली, कुठे वाचलंय का ते विचारणार होतो. तेवढ्यात कालच गोळाबेरीज वाचताना आढळलं. (स्माईल)

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

उगीच काहीच्या काही... Salute

उगीच काहीच्या काही...

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

बोअर विषय

मला टिंगल करण्यासाठीसुद्धा करवा चौथीचा कंटाळा आला. मुळात हे प्रकरण आपल्याकडे (मराठी लोकांत) नव्हतंच; उधार उसनवार करून, सिनेमाची नक्कल म्हणत आणलेलं. त्यातून माझ्या आजूबाजूचे सगळे मूर्तीभंजक, उदारमतवादी छापाचे लोक. जोक करायला उधार-उसनवार केलेले सण कशाला वापरायचे! वटपौर्णिमा आणि हरताळका वांझ आहेत काय, म्हणून ही तिसरी आणली!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ते तर आहेच. पण हे फेसबुक बघून

ते तर आहेच. पण हे फेसबुक बघून सुचलं. जी ती करवा-चौथ पोस्ट अशे टाकतोय जणू काय आयसिसच्या तावडीतूनच वैगेरे नवऱ्याला सोडवून आल्यात.

मला वाटतं मराठमोळ्या वटपौर्णिमेचे सोशल मिडीयावर (अजून तरी) एवढे लाड होत नाहीत.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

+०.५

आपली प्रत्येक खाजगी गोष्ट फेसबुकवर जाहीर करण्याची टिंगल अर्थातच मजेशीर आहे. पण करवा चौथ करणं, हीच गोष्ट जिथे टाकाऊ वाटते तिथे त्याबद्दल बोलणं किंवा न-बोलणं, दोन्ही सारखंच वाटतं. हाच जोक मतदान किंवा १५ ऑगस्टला केला असता तर अधिक आवडला असता.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय तो पंजाब्यांचा करवा चौत

काय तो पंजाब्यांचा करवा चौत उचलतात देव जाणे. मूर्खपणा आहे. आणि मग काय ते खाजगीत करा ना त्याची जाहीरात कशाला?

**मुसलमानांमधे पिग् ला

**मुसलमानांमधे पिग् ला निशिद्ध का मानलेले आहे?**-गब्बर/16-10/फेमिनाझि...

- दोन खुर असलेला प्राणी रवंथ करणारा ते खातात. एक खुर असलेला रवंथ न करणारा खात नाहीत. ( डुक्कर बाद.घोडाही बाद परंतू निषिद्ध का ते माहित नाही.)
ज्यु लोक हाच नियम पाळतात परंतू ज्यु आणि शीख लोक हालाल मास खात नाहीत.

हे मी लिहिलंय

freedom of speech

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

हे ही दिवस जातील ... (आणि या

हे ही दिवस जातील ... (आणि या ही पेक्षा भयाण दिवस येतील.)

परत तेच!

http://www.thehindu.com/news/national/cauvery-dispute-sc-asks-karnataka-...

A three-judge Bench, led by Justice Dipak Misra, extended its October 4, 2016 order, directing Karnataka to release 2000 cusecs a day to Tamil Nadu. This interim arrangement would continue till the court gives further orders.

परत क्युसेक पर डे. सुप्रीम कोर्टाला यातली विसंगती समजत नाहीये का पेपरांना.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

१. नविन धर्म काढुन त्याला

१. नविन धर्म काढुन त्याला सरकार मान्यता मिळावी म्हणुन काय प्रोसीजर आहे.? म्हणजे मी "अबक" धर्म स्थापन केला आणि नवरा आणि मुलगी त्यात सामिल झाले तर आम्हा तिघांना अल्पसंख्य म्हणुन सर्व सोयी सवलती मिळतील का?
२. पारशी होता येत नाही हे माहीती आहे, पण जैन होयचे असेल तर काय काय करावे लागते?

ता.क. : प्रश्न अतिशय सिन्सिअर आहे ( खास करुन दुसरा ). माझ्या घेट्टोतले अनेक लोक हा मार्ग अवलंबतील जर शक्य असेल तर.

प्रत्येक नॉन-हिंदू धर्म

प्रत्येक नॉन-हिंदू धर्म अल्पसंख म्हणूवून घेऊ शकत नाही बहुधा. ज्यूधर्माला देखील आत्ता आत्ता मायनॉरिटी दर्जा मिळाला आहे. उद्या कोणी शिंतो वगैरे धर्म स्विकारला तरी सवलती नाही मिळणार.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

दीने ईलाही आणि बहाई

त्या दीने ईलाही धर्माचे कुणी अनुयायी शिल्लक आहेत का सध्या? असल्यास त्यांना मायनॉरेटीचा दर्जा आहे/मिळेल काय?

तसेच बहाई हा वेगळा धर्म की पंथ? पंथ असल्यास कुठल्या धर्माचा? त्यांना मायनॉरेटीचा दर्जा आहे काय?

बहाई वेगळा धर्म आहे. २०११

बहाई वेगळा धर्म आहे. २०११ च्या डिसेंबरात दिल्लीतील लोटस टेंपलमध्ये गेलो असताना एक सुंदर तरुणी बहाई धर्माची माहिती देत होती, तिजकडून पाम्फ्लेट्स वगैरे घेतली. पुण्यात फातिमानगर इथे त्या धर्मीयांची छोटीशी स्मशानभूमी आहे. मायनॉरिटी राईट्स वगैरे नाहीयेत आय थिंक.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

ह्यांचं लक्ष बघा कुठे....

दिल्लीतील लोटस टेंपलमध्ये गेलो असताना एक सुंदर तरुणी बहाई धर्माची माहिती देत होती,

टेंपलमध्ये देखील तरूणी सुंदर आहे की नाही ते ह्यांनी नोट केलं!!! (स्माईल)

तिजकडून पाम्फ्लेट्स वगैरे घेतली

आधीच्या वाक्यावर हसण्याच्या नादात चुकून, "तिजकडून पापलेटस वगैरे घेतली", असं वाचलं.
आणि मग हे लोटस टेंपल नसून दुसरंच स्थळ (अनेक अर्थांनी) असावं हे उमगलं!!!
(स्माईल)

हाण्ण

आणि मग हे लोटस टेंपल नसून दुसरंच स्थळ (अनेक अर्थांनी) असावं हे उमगलं!!!

हाण्ण तेजायला, डांबिसकाका मान गये. (स्माईल) _/\_

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

(No subject)

(स्माईल)

कल्पना नाही, वाचायला हवं.

कल्पना नाही, वाचायला हवं.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

म्हणजे मी "अबक" धर्म स्थापन

म्हणजे मी "अबक" धर्म स्थापन केला आणि नवरा आणि मुलगी त्यात सामिल झाले तर आम्हा तिघांना अल्पसंख्य म्हणुन सर्व सोयी सवलती मिळतील का?

धर्म स्थापन करायची काय प्रक्रिया आहे ते माहिती नाही. पण आपल्याला बाय डिफॉल्ट अल्पसंख्य म्हणून सोयी-सवलती मिळणार नाहीत. कलम १५(४) व १६(४) नुसार तुम्हाला सरकारला पटवून(किंवा पुरेसे पैसे (स्माईल)) द्यावे लागेल की तुमच्या धर्मातले मेंबर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत. सरकारला पटले तर सरकारी नोकरीत तर नक्कीच आरक्षण मिळू शकेल. (विशेषतः नविशेषतः१६(४) च्याबाबतीत काहीही करु शकत नाही.
आता राहिला प्र्श्न तुम्ही सरकारला सन्दशीर मार्गाने पटवणार कसे की नवीन धर्मातले मेंबर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत
१. सध्याचे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असे १०-१५ शोधा.
२. तुम्ही व ते सर्वजण मिळून नवीन धर्म स्थापन करा.
३. आता सरकारला पटवा - राज्यसरकारच्या नोकरीत आरक्षण तसेच तुमच्या धर्माच्या लोकांच्या संस्थांना अल्पसंख्य संस्थेच्या सर्व सवलती मिळवा.

माझ्यामते, या धर्माला शिक्षणात आरक्षण मिळूही शकते, पण जरा अवघड आहे.
बाकी सर्व सवलतीला कोणी न्यायालयात आव्हान दिले तरी त्या रद्द होवू शकत नाहीत.

आपल्याला बाय डिफॉल्ट

आपल्याला बाय डिफॉल्ट अल्पसंख्य म्हणून सोयी-सवलती मिळणार नाहीत.

असे का? मला असे असावे असे वाटत नाही. पारशी लोकांना आणि जैन लोकांना अल्पसंख्य म्हणुन सवलती मिळतात.

तुम्हाला मी आरक्षण किंवा सरकारी फुकट स्कॉलरशीप च्या मागे आहे असे वाटत असेल तर तो गैरसमज झालाय.
दुसर्‍यांना मिळणार्‍या आरक्षणातुन स्वताची सुटका करणे हा हेतू आहे.
अल्पसंख्यांना स्वताची शाळा, कॉलेज काढता येतात. अश्या शिक्षणसंस्थांना म्हणे आरक्षणाचे नियम पाळायला लागत नाही.
तसेच अल्पसंख्यांकांना स्वतासाठी हाऊसिंग सोसायट्या पण काढता येतात बाकीच्यांना प्रवेश बंद करुन.

तुम्हाला मी आरक्षण किंवा

तुम्हाला मी आरक्षण किंवा सरकारी फुकट स्कॉलरशीप च्या मागे आहे असे वाटत असेल तर तो गैरसमज झालाय.

अच्छा माझा असाच समज झाला होता की नवीन धर्म, मुख्यत्वे आरक्षणासाठी काढयचा आहात.
नवीन धर्म काढल्याने तुमची दुसर्‍यांना मिळणार्‍या आरक्षणातुन सुटका होणार नाही.

केवळ अल्पसंख्य सवलती पाहीजे असतील तर शक्य आहे का बघितले पाहिजे - वाचून सांगतो (कळाले तर)

नवीन धर्म काढल्याने तुमची

नवीन धर्म काढल्याने तुमची दुसर्‍यांना मिळणार्‍या आरक्षणातुन सुटका होणार नाही.

कशी सुटका आहे ते मी लिहीले आहे वर.
स्वताच्या धर्माची अल्पसंख्यांक नावाखाली शाळा कॉलेज काढु शकतो. अश्या शाळा/कॉलेजेस ना आरक्षणाचे नियम लागु होत नाहीत.

तुमचा तिघांचाच धर्म तर मग

तुमचा तिघांचाच धर्म तर मग तुम्ही 'अल्पसंख्यांकांची' संस्था कोणासाठी काढणार?

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

जैन होयचे असेल तर काय काय

जैन होयचे असेल तर काय काय करावे लागते?

https://www.quora.com/How-do-I-convert-to-Jainism

http://www.jainpedia.org/resources/jainism-faqs/contentpage/9.html

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

हम्म

पण यूकेत राहणार्‍यांना याची गरजच काय मुळात?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

व्यनि बघ बॅटोबा. मला गरज नाही

व्यनि बघ बॅटोबा. मला गरज नाही असेच म्हणले आहे मी. पण घॅट्टोतल्या बाकीच्यांचा विचार नको का करायला? त्या बाकीच्यांमधे तुझ्यासारखे वाळुत डोके खुपसुन बसलेले शहांमृग आहेतच, त्यांना थोडा विचार करायला तरी भाग पडेल.

स्वतःला गरज नाही तर संपले.

स्वतःला गरज नाही तर संपले. बाकी खुश्शाल बदला धर्म, अगदी शांतताप्रिय धर्मी व्हा. मला शष्प फरक पडणार नाही. गो ऑन.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

पण यूकेत राहणार्‍यांना याची

पण यूकेत राहणार्‍यांना याची गरजच काय मुळात?

अनु राव यांना युके मधल्या युगप्रवर्तक व्हायचंय.

आणि तेही कोथरुडात राहून. आहे

आणि तेही कोथरुडात राहून. आहे किनै मज्जा?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मला पहिलाच प्रश्न आवडला!

मला पहिलाच प्रश्न आवडला! अणुराव रॉक्ष!

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

+१

धर्मबदल करावा का असा विचार अलिकडेच आलेला (स्माईल)

किरिस्ताव व्हायला हरकत नाही.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

धर्मबदल करावा का असा विचार

धर्मबदल करावा का असा विचार अलिकडेच आलेला

अगदी खरे आहे. लवकरच करावा म्हणजे काही अर्ली बर्ड इंसेंटीव्ह असतील तर ते ही मिळतील.

अल्पसंख्यांक नावाखाली शाळा, कॉलेज काढली की त्यात आरक्षण ठेवावे लागत नाही.

अरेंच्च्या ऐसीचा चेहरामोहरा

अरेंच्च्या ऐसीचा चेहरामोहरा बदलला. दिवाळी सुरु झाली की काय? (स्माईल)
___
This looks AWESOME!! पण आमचा खफ कुठे गेला?
___
धाग्यांचे शीर्षक व संपादन टॅबही गायबे.
___
वी वॉन्ट "नातीगोती"
वी वॉन्ट "नातीगोती"
वी वॉन्ट "नातीगोती"
वी वॉन्ट "नातीगोती"
.
.
.
(स्माईल) (स्माईल)
____
http://4.bp.blogspot.com/-3jAUzCMpJfo/V8mXc-dtUaI/AAAAAAAAAD4/2u0FY6LaSB0fPAvGx3Qy5ubxCQFF40-gACK4B/s1600/diwalirangolidesignswithdiya.jpg

मक् येणारे.

काम करताना थोडा गोंधळ झाला. तसदी आणि अकाळी दिवाळीबद्दल क्षमस्व.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मिशेलची मैत्रीण हिलरीने

मिशेलची मैत्रीण हिलरीने सौदीकडून १० मिलियन फंडींग घेतलय म्हणे. सौदीमध्ये अडल्टरीबद्द्ल स्त्रियांना ठेचून मारायची पद्धत आहे असं ऐकून आहे. तरी मिशेल आणि हिलरी या फेमिनिश्ठ स्त्रियांच्या बीकन? मजेशीर आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

??

हिलरीने घेतले म्हणजे काय? क्लिंटन फाऊंडेशन? जरा दुवे देत चला दावे करताना म्हणजे उत्तर देताना बरे पडेल.

सौदी अरेबिया हा अमेरिकेचा 'मित्र देश' आहे हे तुम्हाला माहित नसेल तर माहित करून घ्या. अन ही वस्तुस्थिती अनेक दशकांपासून आहे. त्याची कारणं विविध आणि कॉम्प्लिकेटेड आहेत. दोन्ही पक्षांच्या राष्ट्राध्यक्षांची सौदी पॉलिसी साधारण सारखीच आहे. अन हा पेच कसा सोडवायचा हा प्रश्न अनेकवर्षे दोन्ही पक्ष/कॉंग्रेस्/सिनेट/व्हाईट हाऊस यांना सतावत आहे. नुस्तं इतकं इतकं फंडिंग घेतलंय यावरून काहीही स्पष्ट होत नाही इतकं तरी राजकारणावर बोलणार्‍यांना ध्यानात यायला हवं. अबाऊट टाईम.

बरं मग?

हे खूपच म्हणजे खूपच्च माहितीपूर्ण आहे; ह्याबद्दल विकिलीककडे तुमची शिफारस होईल. पण ह्याचा मराठी आंजावर फेमिनाझींकडून नाडल्या गेलेल्या बाळांशी, त्यांच्या रडारडीशी, त्यांनी केलेल्या विषयांतराशी संबंध काय?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या धाग्याशी थेट नाही पण इन

या धाग्याशी थेट नाही पण इन जनरल अमेरिकन निवडणुकांबद्दल आहे तो प्रतिसाद. लेखात हिलरीबद्द्ल आलं आणि स्त्रीयांबद्दल आलं म्हणून ही सर्वांना माहिती असलेली गोष्ट पुन्हा लिहिली.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

बरं मग?

तुम्ही म्हणता म्हणजे हा धागा अमेरिकी निवडणुकांबद्दलच असणार. लिहिणारी व्यक्ती बाई आहे; ती काय लिहिते हे तिच्यापेक्षा जास्त बाकी सगळ्या पुरूषांनाच समजणार!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाई

लिहिणारी व्यक्ती बाई आहे; ती काय लिहिते हे तिच्यापेक्षा जास्त बाकी सगळ्या पुरूषांनाच समजणार!

अनुप ढेरेंनी तो प्रतिसाद तुम्ही बाई असल्यामुळे दिला हा निष्कर्ष कशाच्या आधारावर काढलाय?

इमोसनल अत्याचार

विषय काय होता, प्रतिसाद कशाबद्दल होता! वड्याचं तेल वांग्यावर का, हे एकदा विचारूनही पुन्हा तेच-ते (निः)उत्तर आल्यावर मला इमोसनल अत्याचार आला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तो निष्कर्ष नसून थोडाफार

तो निष्कर्ष नसून थोडाफार केलेला त्रागा असावा. फेमिनाझी ,लैंगिक गुन्ह्याच्या विषयातही बायकाच ट्रंपचा गैरफायदा घेत आहेत वगैरे बुद्धीभेद जे होत होते त्यातून हा त्रागा आला असावा.

तुम्ही म्हणता म्हणजे हा धागा

तुम्ही म्हणता म्हणजे हा धागा अमेरिकी निवडणुकांबद्दलच असणार.

मी असं कुठं म्हणालो?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.