मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७३

काही काळाने ऐसीचे दिवाळी अंकातील लेख फक्त जयदीप चिपलकट्टी आणि धनंजय यांनाच समजतील Sad

5
Your rating: None Average: 5 (2 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

ज्यांना हात नसतात त्यांचे

ज्यांना हात नसतात त्यांचे फिंगरप्रिंटस कसे घेतात (म्हणजे बोटांच्या जागी कशाचे/चा ठसा घेतात?)

फार पूर्वी अश्विन (?) रेळे

फार पूर्वी अश्विन (?) रेळे नामक इसम पायांच्या ठशांवरून भविष्य सांगत असे.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

ह्म्म्म तेच रमलखूणांचे

ह्म्म्म तेच रमलखूणांचे शास्त्र का?

.
ध्वज वज्र अंकुश देखा । यवांकित ऊर्ध्वरेखा ।
पद्मचक्रादि सामुद्रिका । चरण नेटका हरीचा ॥८८॥

अजून एक पर्याय

जीभ बघून पण भविष्य सांगता येईल.

"संबंधितांनी" म्हणजे नेमक्या

"संबंधितांनी" म्हणजे नेमक्या कोणी विचार करायचा आहे?

ज्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक होते, त्याचे एकूण मतदार १०७१.

मतदार होण्यासाठी काय पात्रता लागते?

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

करमणूक

>>मतदार होण्यासाठी काय पात्रता लागते?<<

भारताचे नागरिक; १८ वर्षं पूर्ण वगैरे काही किरकोळ गोष्टी आणि शिवाय संमेलनाशी संलग्न साहित्य परिषदेसारख्या संस्थेचं सदस्यत्व. पुण्याच्या साहित्य परिषदेतली पुस्तकं चाळायची होती म्हणून पूर्वी कधी तरी तिथे गेलो होतो. त्यासाठी संस्थेचं आजीव सदस्यत्व घ्यावं लागेल असं मला सांगण्यात आलं. नंतर बाहेरून कळलं की तसं सदस्यत्व घेतलं तर साहित्य संमेलनासाठी तुम्ही मतदार होता. कुणाकुणाला मत द्यावं लागेल ह्या विचारानंच मी गळपटून गेलो आणि सदस्यत्व घेतलं नाही. अशा रीतीनं ऐसी एका करमणुकीला मुकलं, कारण इतर सदस्यांना कसे निवडणुकांच्या वेळी फोन येतात आणि मत देण्यासाठी गळ घातली जाते वगैरेंचे किस्से मला माहीत आहेत.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दवण्डी आणि धमकी

तुम्हाला प्रत्यक्ष प्रवीणजी फोन करून धमकी देताहेत असे डोळ्यासमोर तरळले आणि..

नेमेचि येतो

सालाबादप्रमाणे याही वर्षी साहित्यजत्रेचा अध्यक्ष निवडला गेला आहे.
सालाबादप्रमाणे याही वर्षी तोच प्रश्न : कोण हे डॉ. अक्षयकुमार काळे?

कोण हे डॉ. अक्षयकुमार काळे?

लोकसत्तेतला अग्रलेख - उडदामाजी काळे गोरे..

आणि हे तुमच्या प्रश्नाचं एक उत्तर, पुन्हा एकदा लोकसत्तातूनच.
मागोवा गालिबच्या काव्याचा!

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पी ओ एस आणि पी ओ सी !

सध्या POS'' उपकरणांची चलती आहे.
POS = Point of Sale
याच्याशी साम्य असणारा वैद्यकीय विश्वातील एक शब्द सांगावासा वाटतो :
'POC ' = Point of Care
मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण ' Glucometer' ( रक्तातील ग्लुकोज घरबसल्या मोजण्याचे उपकरण) शी परिचित असतील.
तर काय, '' point of '' म्हणजे 'च्या जवळ'. POS हे ग्राहकाच्या जवळ आणले जाते , तर POC हे रुग्णाच्या जवळ.
आपल्या रक्ताच्या (व लघवीच्या)बर्‍याच तपासण्या आता रक्तनमुना प्रयोगशाळेत न पाठवता रुग्णाजवळ बसूनच करता येतात.त्याला म्हणतात ' POC testing'.

विज्ञान धावत येतं, ज्ञान चालत येतं पण, शहाणपण मात्र मागंच रेंगाळतं!

नाक्यानाक्यावर नगरसेवक/

नाक्यानाक्यावर नगरसेवक/ आमदार/खासदार निधीतून डबडी लावा. प्रत्येकाने दीड दोन हजाराचे यंत्र कशाला खरेदी करायचे? शारिरीक तपासण्या दोनतीन महिन्यांनी करणार.

माझ्या वाचनाप्रमाणे

माझ्या वाचनाप्रमाणे अष्टदिक्पाल व काही वेदातील देवता अशा एकूण २१ देवतांचे गायत्री मंत्र आहेत.
मग हे हंस गायत्री, दत्तात्रेय गायत्री, हनुमान गायत्री वगैरे आले कुठुन Sad
का ऊठून कोणीही त्या छंदात बसणार्‍या गायत्री लिहाव्या?

का ऊठून कोणीही त्या छंदात

का ऊठून कोणीही त्या छंदात बसणार्‍या गायत्री लिहाव्या?

हेच तर करत आलेले आहेत लोक आजवर. हजारो वर्षे. वेगवेगळ्या रूपांत.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

बळवंतराव टिळकांना ही आयड्या

बळवंतराव टिळकांना ही आयड्या आवडली असती. (प्रायश्चित्त घ्यावं लागलंच. मिशी तरी वाचली असती.)

a

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

कप आवडला.

कप आवडला.

काही गावठी प्रश्न

१- टोमॅटो सॉस आणी टोमॅटो केचप मध्ये नेमका काय फरक असतो ? म्हणजे दोघांच्या प्रोसेस मध्ये जर काही फरक असेल तर तो काय असतो ?
२- फेसबुक सारखी मोठी कंपनी जो प्रचंड प्रमाणावर डेटा सेव्ह करत असते तो सेव्ह करण्याची त्यांची काही लिमीट असते का ? म्हणजे ५ वर्ष जुन्या पर्यंत इ. असे काही
नसल्यास इतका प्रचंड डेटा ते जुना अजिबात न उडवता नवा कसा काय सेव्ह करु शकता ? ते त्यांची साठवण क्षमताच फक्त वाढवता की जुना उडविण्यावरही भर असतो ?
३- काही कुत्र्यांना फरशी टाईल्स वरच ठेवलेले दिसते. अशा कुत्र्यांची पाय फाकतात फताडे होतात, हे फरशी टाइल्स वर ठेवल्याने होतात का ? मातीत बर्‍यापैकी पळवलेले कुत्रे ताठ सरळ पायाचे राहतात का ? म्हणजे फताडे पाय= टाइल्सवरील दिर्घ वास्तव्य हे खरे आहे का ?

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

३) केवळ टाईल्स च्या सहवासाने

३) केवळ टाईल्स च्या सहवासाने भुभु लोकांचे पाय फताडे होतात हे मला खरे वाटते

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

- फेसबुक सारखी मोठी कंपनी जो

- फेसबुक सारखी मोठी कंपनी जो प्रचंड प्रमाणावर डेटा सेव्ह करत असते तो सेव्ह करण्याची त्यांची काही लिमीट असते का ? म्हणजे ५ वर्ष जुन्या पर्यंत इ. असे काही
नसल्यास इतका प्रचंड डेटा ते जुना अजिबात न उडवता नवा कसा काय सेव्ह करु शकता ? ते त्यांची साठवण क्षमताच फक्त वाढवता की जुना उडविण्यावरही भर असतो ?

(लोळून हसत)

दादा ! काही चुकलं का ? सांभाळुन घ्या जरा मला

दादा
मलां खरच जेन्युइन कुतुहल आहे म्हणुन तो प्रश्न मी विचारला. मला त्या क्षेत्रातलं शुन्य ज्ञान आहे. म्हणून कुतुहल वाटत इतकच.
ते त्यांचे डेटा सर्व्हर चे भव्य फोटोग्राफ्स बघितल्याने तो प्रश्न डोक्यात आला होता.
की हा इतका करोडो लोकांचे फोटो, व्हीडीयो अमुक तमुक कसे काय सेव्ह होत असेल ? काही डिलीट पण करण्याची पॉलिसी असेल का ?

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

चिपळुणात शाकाहारी मराठी

चिपळुणात शाकाहारी मराठी पद्धतीचे साधेसुधे थाळीसारखे जेवण कुठे चांगले मिळते हे कोणी सांगु शकेल का?

चिंच नाक्यावर बापट की

चिंच नाक्यावर बापट की जोगळेकराचे हाटेल आहे.

की काणे बंधू ते आठवत नाही. पण जुन्या स्टॅण्डकडून आल्यावर अगदी जुन्या स्टॅण्डकडे/गुहागरकडे जायच्या रस्त्याला वळताना कोपर्‍यावरच आहे. (पुण्याकडून आल्यास चिंचनाक्यावर डाव्या बाजूला)

मी जेवलो आहे तिथे.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

थत्तेचाचा, ते काणे होते.

थत्तेचाचा,

ते काणे होते. हॉटेल लगेच सापडले. जेवणे "बरे+" होते. जोरदार कौतुक करावे असे नव्हते.
पोळ्या मात्र चांगल्या होत्या.

बरोबरच्या लोकांना हे हॉटेल थत्तेचाचांनी रेकमेंड केले आहे हे स्पेसिफिकली सांगीतले. त्यातल्या जवळजवळ सर्वांना तुम्ही कोण हे माहीती नसल्यामुळे, त्यांचे कुतुहल जागृत झाले. त्यामुळे तुमचे गुणवर्णन केले.

>>पोळ्या मात्र चांगल्या

>>पोळ्या मात्र चांगल्या होत्या.

साधे जेवण म्हटल्यावर मी पोळ्यांच्या दर्जावरच जेवणाचा दर्जा ठरवतो. (स्माईल)

ते काणे मला ओळखत असण्याची मुळीच शक्यता नाही. मला डोंबिवलीच्या पाटणकर नामक बैंनी ते रेकमेंड केले होते. (त्या बै त्या काण्यांच्या नात्यात असाव्यात). पण चिपळूणात थत्त्यांची बरीच घरे असल्याने (आम्ही तसे तिथलेच) त्यांना कुतुहल वाटले असेल.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

ते काणे मला ओळखत असण्याची

ते काणे मला ओळखत असण्याची मुळीच शक्यता नाही. मला

काण्यांचा संबंध नाही. मी माझ्या नातेवाइकांच्या गोतावळ्याला तुम्ही रेकमेंड केले असे सांगीतले. ती लोक ऐसी, मिपावर नसल्यामुळे त्यांना तुम्ही माहीती नाहीत.

ओह ओके !!

ओह ओके !!

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

चिपळुणात

>> मी माझ्या नातेवाइकांच्या गोतावळ्याला तुम्ही रेकमेंड केले असे सांगीतले <<

तुमचे नातेवाईक मराठी की कानडी, कोंकणस्थ ब्राह्मण की इतर कोणते? चिपळुणातलं शाकाहारी जेवण त्यांना का आवडावं ह्याची काही कारणमीमांसा कळली तर देश ऐसी आपला आभारी राहील.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कानडी का असावेत ते काही कळले

कानडी का असावेत ते काही कळले नाही.

पण एकुणात पुरोगाम्यांना जातीची चौकशी फार.

गोतावळ्यात सर्व मराठी, जवळ जवळ सर्व कोकणस्थ ब्राह्मण. त्यातल्या बायकांना शाकाहारी लागते. बाहेरचे सारखे खाऊन आता कंटाळलेल्या लोकांना साधे शाकाहारी जेवण पंजाबी वैगरे पेक्षा बरे वाटते.
पुरुषांना गरजे पेक्षा जास्त किंम्मत द्यायची आमच्यात पद्धत नाही, त्यामुळे त्यांना आवडो न आवडो, फरक पडत नाही. त्यांचे ते असतील तेंव्हा त्यांनी ठरवावे.

अन्न-जात कोरिलेशन

>> एकुणात पुरोगाम्यांना जातीची चौकशी फार. <<

पुरोगाम्यांचं माहीत नाही, पण कुणाला कोणत्या जेवणाची चव आवडते ह्यात जातवास्तवाची दखल घेतली, तर रोचक माहिती हाती लागते असा माझा अनुभव आहे. पुण्यात 'बादशाहीतली आमटी आवडते' असं म्हणणारा एक संच आहे, 'दोराबजी'तली धानसाक आवडणारा एक संच आहे, आणि त्यांचा इंटरसेक्शनही नॉन-नल आहे. जातपडताळणी केली तर त्यात अनेकदा असं दिसतं की तुम्ही कोणत्या संचात आहात आणि कोणत्या जातीत वाढलात त्याचं काही कोरिलेशन लागतं.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम्हाला डीटेल्ड उत्तर दिले

तुम्हाला डीटेल्ड उत्तर दिले तर त्याची नोंद घ्यायची नाही ( म्हणजे धन्यवाद देणे वगैरे ) हे काही बरोबर नाही.

गरती स्त्रियांमुळे गर्ता

>> तुम्हाला डीटेल्ड उत्तर दिले तर त्याची नोंद घ्यायची नाही ( म्हणजे धन्यवाद देणे वगैरे ) हे काही बरोबर नाही. <<

जिथे कोंकणस्थ ब्राह्मण महिलांना चिपळुणातलं जेवण विशेष आवडत नाही, अशा देशात मला राहावंसं वाटत नाही. पक्षी : तुमचं उत्तर तपशीलवार असलं तरी मला नैराश्याच्या गर्तेत टाकणारं होतं. आता नैराश्याच्या गर्तेत टाकण्यासाठी आभार कोणत्या तोंडानं मागायचे?

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>जिथे कोंकणस्थ ब्राह्मण

>>जिथे कोंकणस्थ ब्राह्मण महिलांना चिपळुणातलं* जेवण विशेष आवडत नाही,

आँ?
जेवण बरे+** होते असे म्हटले ना त्यांनी? मग आवडले नाही असा निष्कर्ष का काढला?

*चिपळूणात फक्त कोकणस्थाचीच हाटेलं नसतात कै !!!
** अनु राव यांनी बरे च्या वरची श्रेणी दिली म्हणजे जेवण फारच आवडलेले दिसते.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

*चिपळूणात फक्त कोकणस्थाचीच

*चिपळूणात फक्त कोकणस्थाचीच हाटेलं नसतात कै !!!

जरी स्पेसिफिकली मी प्रश्नात मी विचारले नव्हते तरी ते तसे असावे असेच अपेक्ष्रीत होते. तुम्ही ते ओळखुन उत्तर दिलेत. (स्माईल)

चिपळुणात काय घडले?

>> जरी स्पेसिफिकली मी प्रश्नात मी विचारले नव्हते तरी ते तसे असावे असेच अपेक्ष्रीत होते. तुम्ही ते ओळखुन उत्तर दिलेत. <<

जे तुम्हाला अभिप्रेत होतं ते ओळखून तेवढंच मीही गृहित धरलं. त्यामुळे चिपळुणात इतर कोणत्या जातींच्या खाणावळी वगैरे प्रश्न गौण आहेत. वर तुम्ही म्हणता की

>>जेवणे "बरे+" होते. जोरदार कौतुक करावे असे नव्हते.
पोळ्या मात्र चांगल्या होत्या.<<

'पोळ्या चांगल्या होत्या' ('मात्र' हा शब्दच मोठा बोलका आहे) हा जेव्हा बोलण्याचा विषय होतो तेव्हा उपरनिर्दिष्ट संदर्भचौकटीत ("चिपळुणात शाकाहारी मराठी पद्धतीचे साधेसुधे थाळीसारखे जेवण कुठे चांगले मिळते") ह्या प्रतिसादाचं अर्थनिर्णयन 'जेवण चांगलं होतं' असं मी तरी करणार नाही. फार तर,'मीट्स एक्स्पेक्टेशन्स, विच वर लो टू स्टार्ट विथ' असं करेन. आणि कुणी म्हणालं की शाकाहारी पद्धतीच्या साध्यासुध्या थाळीसारख्या जेवणात जोरदार कौतुक करण्यासारखं काही नसतंच, तर मग मी म्हणेन की -

शाकाहारी पद्धतीच्या साध्यासुध्या थाळीसारख्या जेवणाची बदनामी थांबवा!

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

निष्कर्ष

योग्य ते सर्व पर्याय निवडा -
१. सोमवारी जंतूला रांग न लावता रोकड मिळाली.
२. मिळालेली रोकड देणी भागवण्यासाठी योग्य प्रकारची होती. (म्हणजे पाच रुपयाच्या कोथिंबीरीसाठी दोनहजाराची नोटच उपलब्ध असं झालं नाही.)
३. शनिवारी आणि/किंवा रविवारी फुकटात चिकार दारू मिळाली. किंवा पैसे भरून चांगली दारू मिळाली. किंवा फुकटात चांगली आणि बरीच दारू मिळाली.
४. सोमवारी जाग आल्यावर चांगली कॉफी मिळाली.
५. जंतूंना अनुरावांवर लैन मारायची संधी सापडली.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बिग सिस्टर

१. सोमवारी गुरुवारी जंतूला रांग न लावता रोकड मिळाली.
२. मिळालेली रोकड देणी भागवण्यासाठी योग्य प्रकारची होती. (म्हणजे पाच रुपयाच्या कोथिंबीरीसाठी दोनहजाराची नोटच उपलब्ध असं झालं नाही.)
३. शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी फुकटात चिकार (बरी+; जोरदार कौतुक करावी अशी नव्हती. पक्षी : चांगली नव्हे) दारू मिळाली. मासेही चिकार आणि फुकटात मिळाले. शिवाय त्यामुळे सोमवारी चिक्कार रोकड शिल्लक राहिली.
४. सोमवारी जाग आल्यावर चांगली कॉफी मिळाली.
५. जंतूला अनुरावांवर लैन मारायची संधी सापडली.

निष्कर्ष : तुम्ही माझ्यावर पाळत ठेवली आहे. ते कळू नये म्हणून तपशीलात किरकोळ बदल केले आहेत. ऐसीकरांनो वाचताय ना? पुरोगामीपणाचा आव आणून बिग सिस्टर मे बी वॉचिंग यू, टू!

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिपळूणात...

*चिपळूणात फक्त कोकणस्थाचीच हाटेलं नसतात कै !!!

'काणे' हे आडनाव बिगरकोकणस्थांत कधीपासून?

कोकणस्थ बायकांना चिपळुणातलं

"कोकणस्थ बायकांना चिपळुणातलं जेवण आवडणे" या उल्लेखामुळे चिपळुणातलं जेवण म्हणजे कोकणस्थाकडचं असं गृहीतक ष्री जंतू मानतात असं समजून प्रतिसाद दिला.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

हो ना थत्ते चाचा. मला पण कळले

हो ना थत्ते चाचा. मला पण कळले नाही चिंजं चा प्रतिसाद. जेवण चांगले होते असेच म्हणले होते मी. रादर अश्याच टाईपचे जेवण पाहिजे होते म्हणुन तर आधी तसा प्रश्न टाकला होता.

अशा तर्‍हेने जंतूंचा पराभव

अशा तर्‍हेने जंतूंचा पराभव झालेला आहे असं घोषित करण्यात येत आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

सुज्ञ

>> अशा तर्‍हेने जंतूंचा पराभव झालेला आहे असं घोषित करण्यात येत आहे. <<

मी म्याच खेळतच नव्हतो. माझं सच्च्या कोंकणस्थावर खरंखुरं प्रेम आहे. 'पहिलें उरलें नाहीं' ह्याचेंच दु:ख. (देशावरच्या कृष्णाकाठचा उल्लेख टाळला आहे हे सुज्ञांस कळणार, पण सुज्ञच कुठे उरले आहेत म्हणून अधिक सांगणे गरजेचे!)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझं सच्च्या कोंकणस्थावर

माझं सच्च्या कोंकणस्थावर खरंखुरं प्रेम आहे.

अगदी अगदी.

'पहिलें उरलें नाहीं' ह्याचेंच दु:ख

तरी बरेसचे टिकुन आहे हे ही नसे थोडके.

हा पराभव (असलाच तर) तो

हा पराभव (असलाच तर) तो चुकीच्या पीच वर मॅच खेळण्याच्या निर्णयाचा आहे.

ते ' देश बदल राहा है 'वगैरे ठीक आहे पण जंतू नी " चिपळूणातल्या बामणाच्या खाणावळीतील कस्टमर कास्ट प्रोफाइल विझावी अप्रिसिएशन ऑफ कास्ट स्पेसिफिक फूड हॅबिट्स " वगैरे मध्ये पडणे धोकादायक आहे ..

तात्पर्य : आमटी पोळी सदृश खाद्यवस्तू बद्दल लिहून जंतूंनी धोका पत्करला .

पण तरीही त्यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन

खरं तर त्यांनी होम पीच वर चरबी यकृत ते VSOP या रेंज मध्ये खेळावे ,.नेत्रदीपक फलंदाजी करावी .... ,पण नाही

(च्यायला आम्ही आमंत्रण देतोय VSOP च्या लाईव्ह डेमो चं , तिथे लक्ष नाही , याना पडलीय काण्यांच्या पोळ्यांची ... )

नाही हो ढेरेशास्त्री.

नाही हो ढेरेशास्त्री. काहीतरीच तुमचे. जय पराजयासारखे काही नव्हतेच चर्चेत.

जय-पराजय बोले तो, राव-थत्ते १

जय-पराजय बोले तो, राव-थत्ते १ - जंतू ० अशा आंग्ल वाक्प्रचाराचे मराठीकरण होते ते.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

थँक्स थत्तेचाचा.

थँक्स थत्तेचाचा. शोधीन नक्की.

GST चा, ढेरेशास्त्रींच्या

GST चा, ढेरेशास्त्रींच्या भाषेत, "ल कूपे फ्रॉन्से दि हेअर" झाला आहे.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

ऑं

बाल किधर कटे है? बाल भी नही कटें, पैसे भी गये और पता भी नही चला

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अम्मांना ऐसी च्या लोगोत स्थान

अम्मांना ऐसी च्या लोगोत स्थान का नाही?

अरे हो की राव

त्यांचा अनेक मराठी वर्तमानपत्रात आलेल्या मृत्युलेखांत उल्लेख क्रांतिकारी स्त्री असा वाचलाय.
अनेकांनी त्यांच्या आयुष्यापासुन प्रेरणा घेतलेली आहे. अनेकांच्या आयुष्यात त्यांनी आनंद निर्माण केला.
अम्मा स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या स्वतः संघर्षातुन एकाकी वाट करत उच्च पदावर पोहोचलेल्या एक कर्तुत्ववान स्त्री होत्या.
स्त्री शक्तीचे त्या प्रतीक होत्या. त्यांचा इतका अपमान झाला, खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले पण त्या सर्वांना पुरुन उरल्या.
काही चॅनलांनी मुद्दाम धर्मेंद्र बरोबरील त्यांची नृत्यफित सातत्याने दाखवुन/ एम जी आर च्या अंत्ययात्रेवेळची त्यांच्या झालेल्या अपमानाची फित दाखवत राहुन जाणीवपुर्वक
त्यांचे राजकीय कर्तुत्व झाकण्याचा प्रयत्न केला.
दहावीच्या परीक्षेत त्या संपुर्ण तामिळनाडु राज्यातुन दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या दुर्देवाने त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही.
अल्पावधीतच लता मंगेशकरांसारखा त्यांना जगण्यासाठी आर्थिक संघर्ष करावा लागला. स्वतः स्वतःची दिशा ठरवत त्या मार्गक्रमण करत राहील्या.
अशा संघर्षशील स्त्रीचे प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे शिवाय अस्सल भारतीय असलेल्या व्यक्तिमत्वाचे क्रांतिज्योतीचे चित्र लोगोवर लावले तर अनेकांना त्यापासुन प्रेरणा मिळेल.
शिवाय त्यांनी कुठल्या विचारसरणीच्या नावाखाली माणसे मारली नाहीत. निवडुन आल्या पुर्णपणे लोकशाही मार्गाने हरल्या तेव्हा ही शांतपणे माघार घेतली माणसे मारली नाहीत.
त्या रसिकही होत्या साड्या आणि चपला यावर त्यांनी रसिकतेने प्रेम केले. त्यांच्या कडे अभिजात सौदर्य दृष्टी होती. मी गेल्यावर हिरव्या रंगाच्याच साडीतच मला दफन करावे असे सांगण्याइतकी मृत्युबेपर्वा रसिकता होती.
शिवाय त्या क्रांतिकारी असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे त्या ज्या धर्मात जन्मल्या त्याच्या परंपरांना मुल्यांना न जुमानता त्यांना जी मुल्ये स्वतः महत्वाची वाटत होती त्या अनुसार माझा मृतदेह दफन करावा असा आग्रह त्यांनी केला होता. यावरुन त्यांची परंपराबाह्य विचार करण्याची क्षमता व हिमंत दिसुन येते.

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

कशाबद्दल १००० साड्यांबद्दल

कशाबद्दल १००० साड्यांबद्दल (डोळा मारत)

लोगो जाउद्या, शेजारी

लोगो जाउद्या, शेजारी श्रध्दांजलीपण नाही कुठे.
लोगोमधे स्थान नसायला, खालीलपैकी अनेक कारणे असू शकतात.
१. तुमची,आमची ब्राउजर कॅश क्लिअर नाही झाली, त्यामुळे नवीन लोगो/मजकूर दिसत नाही.
२. त्यांची मोदींशी मैत्री होती.
३. त्यांनी पहिल्या टर्ममधे भ्र्ष्टाचार केला होता. (नंतर कॅस्ट्रोंसारख्या गरिबांसाठी मोफत स्किम चालवल्या पण पहिल्या टर्मचे काय?)
४. त्या बहुमताने निवडून आल्या होत्या.
किंवा
५. काम चालू आहे, दिसेल लोगो.

फिडेल कॅस्ट्रो ने ऐसी अक्षरे वर ही प्रभाव टाकला शेवटी

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

सावकाराचं चित्र

जसजशा बातम्या येत आहेत तसतसं मुखपृष्ठावरचं सावकाराचं चित्र आणखी भेदक वाटायला लागलं आहे :
सावकार

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुखवटा पाळायचा आहे का ऐसीवर?

दुखवटा पाळायचा आहे का ऐसीवर? एक आठवडा पुरेल का?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ह घेने

मे २०१४पासून यातनातळ सुरू झाले नाहीत (८ नोव्हेंबर १०१६पर्यंत वाट बघितली) पण ऐसीवर दुखवटा सुरू झालाच की!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहो पण ऐसी अक्षरे वरील अनेकांना असणारा शक

अशाने
यकीन मे बदल जाएगा ना

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

उद्या मेसी'ज परेड पहाणार

उद्या मेसी'ज परेड पहाणार (स्माईल)
.
https://s-media-cache-ak0.pinimg.com/564x/21/32/0e/21320eac27ad777c25147eb9631c004a.jpg
.
http://pix.avaxnews.com/avaxnews/0a/ab/0001ab0a_medium.jpeg
___
ऑफिसमध्ये कालपासूनच हॉलिडे मूड निर्माण होतोय -
.

.

इतर देशांत ब्यान्क ठेवींवर

इतर देशांत ब्यान्क ठेवींवर व्याज दोन तीन टक्के तर भारतात बारा चौदापर्यंत जाऊन आता कमी होत सहा सातावर आलय.ब्यान्क ओफ जपानमध्ये वजा दोन टक्के अशी दरी कशी झाली? इकडेही दोनतीन टक्यांवर दहा वर्षांत जाईल का?

Tyler Cowen’s Third Law: All

Tyler Cowen’s Third Law: All propositions about real interest rates are wrong.

२-३% एखाद्या वर्षी नाही, आपण

२-३% एखाद्या वर्षी नाही, आपण सस्टेन्ड २-३% लेवल बोलतोय असं समजतो. वाटत नाही. तसं झालं तर एफ.डी.आय प्रचंड कमी होईल, भारत हा प्रगत झालेला असेल. पुढल्या १० वर्षात ते होईल असं वाटत नाही.

पण ३०-४० वर्षात, कदाचित. किंवा तोच राहू शकतो (जास्त शक्यता). किंवा १५-२० सुद्धा होऊ शकतो (चक्र उलटी फिरली तर पण तसं वाटत नाही). इंटरेस्टिंग टाईम्स.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

हो. असं बोकील काका म्हणतायत.

हो. असं बोकील काका म्हणतायत.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

टोईंग व्हॅनची पावती

मला टोईंग व्हॅनची पावती बघून नेहमी प्रचंड प्रमाणात चीड येते. एक टोईंग व्हॅन एका वेळेस कमीतकमी १० दुचाकी उचलत असेल आणि दिवसाकाठी कमीतकमी २० फेर्‍या मारत असेल. महिन्याचे अगदी २५ दिवस व्हॅन चालत असेल तरी मासिक उत्पन्न ५ लाखाच्या आसपास असावे. मग असे असतांना हे लोक पावतीवर सर्व्हिस टॅक्स नंबर असलेली पावती का देत नाहीत ?
किंवा जर वार्षिक उत्पन्न १० लाखाच्या आसपास असेल तर टॅक्स नंबर घेणे बंधनकारक नाही पण मग तसी सुचना सर्व्हिस बिलावर छापणे आवश्यक असते ना ?
कि ही सरकारच्या संगनमताने चाललेली चोरी आहे काय ? किंवा माझी समजूत चुकीची आहे ?

१. सोनार लोक सोने कुठुन विकत

१. सोनार लोक सोने कुठुन विकत घेतात? त्याचे रेकॉर्ड त्यांना सरकारला द्यावे लागते का?

२. सोन्याच्या खाणींवर सरकार नियंत्रण कसे ठेवते? समजा त्यांनी १०० kg सोने "तयार केले" आणि सरकार ला सांगितले की फक्त ५० kg झाले, तर?

सध्या बहुधा भारतातल्या खाणी

सध्या बहुधा भारतातल्या खाणी ऑपरेटिव्ह नाहीत.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

सरकारचा काय संबंध?

२. सोन्याच्या खाणींवर सरकार नियंत्रण कसे ठेवते? समजा त्यांनी १०० kg सोने "तयार केले" आणि सरकार ला सांगितले की फक्त ५० kg झाले, तर?

कळलं नाही. सरकारचा काय संबंध. सोन्याच्या जागी प्लास्टीकचं खेळणं घेऊन पहा. मी ते खेळणं बनवतो. मग मी १००० बवतो का ५०, यात सरकारचा काय संबंध? (सोन्यावर पेट्रोल वगैरे प्रमाणे सबसिडी वगैरे नाही, भारतात, हा माझा अंदाज.)

> सरकारचा काय संबंध. त्यांना

> सरकारचा काय संबंध.

त्यांना (खाण वाल्याना) सोने विकून फायदा होतो ना.

सोन्याची किंमत = k / सोन्याचे प्रमाण
( k = constant )

जर "छुप्या" सोन्याचे प्रमाण जास्त असेल तर त्यांना फायदा होईल जास्त किमतीचा असे वाटते

अधिक गुंतागुंत

जागतिक मार्केटमध्ये, सोन्याची किंमत हे जागतिक उत्पादन आणि मागणी दोन्हीवर अवलंबून आहे. (तुर्तास इतर गोष्टी, उदा. स्टॉक मार्केट, हाऊझिंग वगैरेचा परिणाम, सोडून देऊ.)

अनेक उत्पादक असल्याने आणि ते एकमेकांविरुद्ध स्पर्धा करत असल्याने (वादाकरता, मागणी-उत्पादन यात प्रचंड तफावत नाही असे गृहित धरू, म्हणजे स्मलगिंग करायला सिरीअस शॉर्टेज हवं वगैरे). जर सरकारने किंमत रेग्युलेट केलेली नसेल तर ओपन मार्केट मध्ये त्यांना काळ्याबाजारात सोनं विकण्याचा काय फायदा होईल हे मला अजूनही कळलेलं नाही. जर काळ्याबाजारात विकून जास्त पैसे मिळायला उत्पादनापेक्षा मागणी खूप जास्त हवी. सद्ध्यातरी, सोन्याची परिस्थिती तशी नाही. मी सोन्याच्या खाणीत काम करतो, ही अवांतर माहिती.

काळ्याबाजारात विकण्याचा फायदा

इथे लोक काळा पैसा वापरून सोनं विकत घेतात. जर दोन लाखाहून अधिक खरेदी केली तर पॅन देणं बंधनकारक आहे. रितसर आयात केलेल्या सोन्याचा हिशोब ठेवणं सरकारला सोपं असेल. बेहिषेबी सोनं म्हणून वापरलं जात असावं.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ऐकीव माहिती

रिलायन्सच्या सुरुवातीच्या काळात धीरूभाईंनी केलेले घोटाळे अशाच स्वरूपाचे होते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. अर्थात२. कसे माहित नहीं

१. अर्थात
२. कसे माहित नहीं पण ठेवते हे नक्की.

हे नसते तर स्मगलिंगचा धंधा चालला नसता. इंपोर्ट ड्यूटी सारख्या गोष्टींना काय अर्थ राहतो मग?

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

(No subject)

Warren

हिलरी

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

छे छे छे, या अमेरिकेत असे होणे फार वाईट आहे.

लॉस एंजेलिस मध्ये एका गरीब मेक्सिकन कुटुंबाला भुकेसाठी वाळके गवत खाताना पाहून एका अमेरिकन वकिलाला फार वाईट वाटले. "छे छे छे, या अमेरिकेत असे होणे फार वाईट आहे. बसा माझ्या गाडीत."
गाडीत बसल्यावर त्या कुटुंब प्रमुखाने त्याचे आभार मानायला सुरुवात केली.
"काही काळजी करू नका आता! माझ्या घरामागे उंच, हिरवेगार गवत आहे!". वकील म्हणाला.
xxx

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

"अमेरीकन" वकील - हा इंडीअन

"अमेरीकन" वकील - हा इंडीअन होता मुस्लिम होता, मेक्सिकन होता, कृष्ण्वर्णिय होता की अमेरीकन होता ? Sad

There's many a slip 'twixt

There's many a slip 'twixt the cup and the lip (स्माईल)

अभ्या, अमुक आणि अन्य

अभ्या, अमुक आणि अन्य व्यंगचित्रकारांसाठी कल्पना:

ट्रम्प "द सेकंड सेक्स" मागून डोकावून क्यामेरात बघतो आहे. अर्धाच चेहेरा दिसतोय, आणि त्यावर त्याचं ते प्रसिद्ध लंपट हसू.

कॅप्शनः "Beauvoir कुक कुक!"

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

:-)

आबाच्या डोक्यातून काय-काय बाहेर पडतं ...

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.

.

जास्तीत जास्त किती रकमेची नोट

जास्तीत जास्त किती रकमेची नोट असावी याला काय निकष असावेत?

अमेरिकेत १०० डॉलरची नोट सर्वात मोठी आहे. परचेसिंग पॉवर पॅरिटी नुसार एका डॉलरचा रुपयातला विनिमय दर १७ रुपये असा काहीसा आहे. त्यानुसार अमेरिकेतली सर्वात मोठी नोट १७०० रुपयांची आहे. मग आपली (सध्याची) १००० रुपयाची नोट लहानच आहे त्यापुढे.

जाणकारांचे काय मत आहे?

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

या टेबलप्रमाणे तर २०० असावी.

या टेबलप्रमाणे तर २०० असावी.

table

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

जास्तीत जास्त किती रकमेची नोट

जास्तीत जास्त किती रकमेची नोट असावी याला काय निकष असावेत?

चलन हे तिन भूमिका पार पाडते मुख्यत्वे -

(१) मोजदाद करण्याचे एकक
(२) देवाणघेवाणीचे माध्यम
(३) व्हॅल्यु साठवून ठेवण्याचे साधन

यातल्या (१) चा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याशी संबंध कमी असावा. पण २ व ३ चा जवळचा संबंध असावा.

(२) व (३) मधले संतुलन राखण्यासाठी चलनाचे denomination (मूल्यवर्ग) केले गेले असावेत. देवाणघेवाणीचे माध्यम म्हंजे लिक्विडिटी ची गरज. लिक्विडिटी मधे उपलब्ध राशी(amount) व वैविध्य (denomination) हे दोन आलेच. व्हॅल्यु साठवून ठेवण्याचे साधन म्हंजे कॉस्ट्/बेनिफिट्स ऑफ स्टोरेज हे पण आले.

हे थोडं बदलतं चित्र आहे.

हे थोडं बदलतं चित्र आहे. ५०च्या दशकात, जेव्हा अमेरिकेतल्या रिटेलच्या किमती आत्ताच्या साधारण दहापट कमी होत्या तेव्हाही शंभर डॉलरची नोट होती. किंबहुना सिव्हिल वॉर (१८६५) साली अनेक राज्यांनी शंभर डॉलरच्या नोटा (सोन्याचा आधार नसलेल्या) काढल्या होत्या. पण गेल्या शतकाभरात बॅंका, चेक्स, क्रेडिट कार्ड वगैरे गोष्टी आल्या तसतशी खिशात रोख पैसे बाळगण्याची गरज कमी व्हायला लागली. त्यामुळे शंभर डॉलरच्या वरची नोट अजूनपर्यंत सर्रास वापरात नाही. (काही इश्यू केल्या गेल्या होत्या, पण जनसामान्यांमध्ये नाही) तेव्हा 'जास्तीत जास्त कितीची नोट असावी' याचं उत्तर तितकंसं स्पष्ट नाही. हे थोडंसं 'किती वजन स्टॅंडर्ड वजन असावं' यासारखं आहे. सर्वसामान्य माणसांना मोजमाप करण्यासाठी पाउंड चालतं - कारण बटाटे काही पौंड घ्यावे लागतात. पण त्याच्या दुप्पट - किलोचं वजन असलं तरीही चालतं. कारण पाव किलो मोजता येतं तितक्याच सहजपणे अर्धा पौंड मोजता येतं. साधारण आठवडाभर पुरेल इतकं डाळ, तांदूळ, किराणामाल वगैरे घेण्यासाठी जितका खर्च येतो त्याच्या दुप्पट ते चौपट किमतीइतकी मोठी नोट असायला हरकत नाही. त्यामुळे सध्याच्या १००, ५००, १००० हे वितरण ठीक आहे. सर्वाधिक नोटेच्या किमतीच्या अनेक पटींचे व्यवहार होतात तेव्हा चेक किंवा क्रेडिट कार्ड वापरावं अशी अपेक्षा असेल. आणि या सुविधा अनेकांपर्यंत पोचायला लागतील तसतशी ती अपेक्षा वाढत जाईल.

या प्रश्नाचं थोडं उत्तर त्या विशिष्ट देशाच्या दरवाढीच्या दरावरही अवलंबून असतं. अमेरिकेत हा दर सुमारे ३ टक्क्यांवर गेली काही दशकं आहे. त्यामुळेही मोठ्या नोटांची गरज पडेनाशी झालेली आहे. यापुढे पडेल असं वाटत नाही. भारतात हा दर ८ टक्क्यांच्या आसपास असतो. त्यामुळे दर काही दशकांनी वरचा आकडा वाढू शकतो. इतकी वर्षं तो वाढवण्याची गरज नव्हती कारण पंचवीस तीस वर्षांपूर्वी जेव्हा दर कमी होते तेव्हा शंभर रुपयाच्या नोटेत काम व्हायचं. त्यावेळी मध्यमवर्गीयाकडे हजाराची नोट दिसतही नसे. आता ती सर्रास दिसते. यापुढे कदाचित दोन हजाराच्या नोटेची गरज पडेल. त्यापुढे लागेल का? आत्तातरी सांगता येत नाही.

२०००ची

२०००ची नोट येणार आहे ना!

भारी प्रश्न आहे! विचार करतो.

भारी प्रश्न आहे! विचार करतो.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

भविष्यवाणी

माझ्या मते हिलरी जिंकेल. ट्रंप आपटेल.

तुमच्या अशा

तुमच्या अशा भविष्यवाणीमुळेच ज्योतिषविद्या बदनाम झाली आहे. (ह.घ्या.)

हाहाहा.

हाहाहा. (स्माईल)

कोणीही येवो इतर देशांच्या

कोणीही येवो इतर देशांच्या राजकारणात लक्ष न देवो.

कोणीही येवो इतर देशांच्या

कोणीही येवो इतर देशांच्या राजकारणात लक्ष न देवो.

अमेरिकन निवडणुका

नुकताच असा विचार मनात आला.

अमेरिकन निवडणुकेकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून आहे. म्हणजे अगदी सगळ्या ८ बिल लोकांचे नसले तरी २-३ बिल लोकांचे तरी.
अमेरिकेची लोकसंख्या - ३३०-३५० कितीतरी मिल.
त्यातले वोटिंग पात्र - २५० मिल (२०१२ चा आकडा २३५ मिल)
प्रत्यक्ष जातात - ५०-५५%
म्हणजेच - १२५-१५० मिल

म्हणजे ज्या गोष्टीकडे अब्जावधी लोकं टक लावून बघतायत ती केवळ १५० मिल लोकं मिळून ठरवणार.

(अवांतर: यावेळी ट्रंप इफेक्ट मुळे वोटर टर्नाउट ६०%+ होईल असं वाटतंय.)

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life