उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? -११

काल वाढदिवसाच्या निमित्ताने बाहेर जेवायला जाण्याची आणखी एकदा संधी मिळाली.आधीच्या सदरात सांगितल्याप्रमाणे हॉटेल सोनाई तर फ्यामिली बरोबर जेवायला जाण्यासाठी खूप छान ठिकाण आहे. परंतु त्याचबरोबर पुणे सोलापूर हायवेला असणारा कांचन ढाबा हि एक उत्कृष्ट पर्याय आहे.नैसर्गिक व्हुव्ह आणि काहीस अस्सल गावठी पद्धतीच्या शाकाहारी जेवणासाठी हा एक खूप छान ढाबा आहे.दुपारच्या जेवणासाठी स्पेशली भाकरी पिठलं, मसाला ताक आणि त्याचबरोबर गावाच्या जेवणाची आठवण करून देणारे इतर पदार्थ त्याचबरोबर मोहरीच्या डाळ घालून केलेले व मटक्यात घातलेले कैरीचे लोणचे यामुळे जेवणाला एक वेगळीच लज्जत येते.त्याच प्रमाणे एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण बर्याचशा हॉटेलच किचन पाहिलं तर तिथे जेवाण्याचीही इच्छा होत नाही परंतु इथे किचन च्या आणि खाद्य पदार्थ बनविताना स्वच्छतेची घेतलेली दखल अतिशय वाखाणण्याजोगी आहे.म्हणूनच हॉटेल सोनाई प्रमाणे कांचन ढाबा हि स्वच्छ आणि चवदार जेवणाचा एक उत्कृष्ट पर्याय आहे

0
Your rating: None

बालेवाडी हाय स्ट्रीटच्या

बालेवाडी हाय स्ट्रीटच्या 'इन्कॉग्नीटो' मधे जाणं झालं. फारच ओव्हर हाइप्ड जागा वाटली. तिथे गेल्यास तुम्हाला अर्धा-पाऊण तास वेटींग करावं लागेल असं सांगण्यात आलं तर आजिबात थांबू नका - इतकं काही वर्थ नाहिये. बाकी अँम्बीयन्स वगैरे छान आहे - टिपीकल अमेरिकन रेस्टो-बार प्रमाणे.

बालेवाडी हाय स्ट्रीट लोल! अशी

बालेवाडी हाय स्ट्रीट

लोल! अशी खरंच जागा आहे?

...आबा कावत्यात!

असं म्हणतात ब्वा त्या भागाला

असं म्हणतात ब्वा त्या भागाला लोक आता. खरं खोटं ते बालवडकर लोकच जाणो. बाकी आपले गुगल्बाबा पण ओळखतात त्या भागाला त्याच नावाने :

https://www.google.co.in/maps/place/Balewadi+High+Street/@18.5705194,73.7746042,3a,75y,90t/data=!3m8!1e2!3m6!1s-WTA1L0PQRio%2FV9TKrB0as7I%2FAAAAAAAACjs%2FwOjdsIz6TpgK-gfdavbSBD1TmdCHR5s8gCLIB!2e4!3e12!6s%2F%2Flh4.googleusercontent.com%2F-WTA1L0PQRio%2FV9TKrB0as7I%2FAAAAAAAACjs%2FwOjdsIz6TpgK-gfdavbSBD1TmdCHR5s8gCLIB%2Fs160-k-no%2F!7i4608!8i2592!4m7!3m6!1s0x3bc2b934e156997f:0xe8505386d906e6da!8m2!3d18.5701103!4d73.7747474!9m1!1b1!6m1!1e1

श्रीकांत भोजनालय, मालवण

मालवणात गेल्यावर जर का तुम्हाला शुद्ध* शाकाहारी जेवण जेवायची हुक्की आलीच तर वझेंचे "श्रीकांत भोजनालय" हा ब्राह्मणी जेवणाची (भोजनालयाच्या बोर्डावर तसं लिहिलय) लज्जत चाखायचा एक चांगला पर्याय आहे. ८४ वर्षांपासून चालू असलेली वझेंची ही खानावळ पोश्ट ऑफीस पासून फार लांब नाही. अंगणातच मांडवाखाली टेबल खुर्च्या मांडून बसायची व्यवस्था केली आहे. आत गेल्यावर चुकून पुण्यात नाहीनं आलो असं वाटून दचकण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण पुणेरी पाट्या वजा सूचना तुम्हाला वाचायला मिळतील. उदा. "ताटात जेवण टाकू नये. टाकल्यास दंड आकारला जाईल", "आज भाजी कुठली आहे हे विचारू नये. सांगितले जाणार नाही" इ. वझेंच्या जेवणात मला खास आवडल्या त्या गरमागरम मऊसूत पोळ्या आणि तिखट दिसणारी पण थोडीफार गोड चव असलेली भाजी. चार पोळ्या, भाजी, एक मूद भात, वरण/आमटी, वाटीभर ताक आणि तृप्तीचा ढेकर याचे साधारण शंभर एक रुपये होतील.
[* तशी मांसाहार आणि शाकाहार एकत्र मिळण्याची सोय गल्लोगल्ली आहे.]

"आज भाजी कुठली आहे हे विचारू

"आज भाजी कुठली आहे हे विचारू नये. सांगितले जाणार नाही"

हे जरा अतिच आहे.

बाकी माहिती रोचक!

Chile Mocha खास नाही

स्टारबक्स ची Chile Mocha खास नाही. अजिबातच खास नाही.
.
http://globalassets.starbucks.com/assets/4e9ecfb833d84cb1ae30c77a35912376.jpg
___
आज कोणीतरी ऑफिसात पम्प्किन स्पाइस लिक्विड क्रीमर्स आणुन ठेवलेत. कॉफीत छान लागतायत.

ईस्ट स्ट्रीट वर बादशहा च्या

ईस्ट स्ट्रीट वर बादशहा च्या वरती ' किंग्स ' ...मस्त फूड. मोजकी टेबल्स, मोजके ग्राहक , छोटासा मेनू. पारशी फूड आणि टिपिकल राज डेज टाईप चवीचा मेन्यू . फिश अँड चिप्स ते स्टेक , पण ते विलायतेत मिळते तसे नाही . विलायतेतल्या सायबाला गेल्या शतकाच्या सुरुवातीला त्याच्या घरचे पदार्थ इथे मिळत असतील अश्या चवीचे फूड . जरूर जा , गडबड नाही , निवांत पणे खायला जा !!!

मुंबईपुण्यात कुठे 'आफ्रिकन'

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

काल फ्रेंच विंडोलाला eclair

काल फ्रेंच विंडोलाला eclair नावाची pastry खाल्ली (koregav park ) . अजूनहि काही काही खाल्लं पण नाव याचच लक्षात राहिलं. अप्रतिम आहे .

interior पण मस्त आहे . निवांत दुपारी मोकळा वेळ असताना जावं अशी सुंदर जागा आहे . owner पण छान हसरा आहे . व्यवस्थित माहिती देत होता त्यामुळे ज्यांना काहीही माहिती नाही ती लोक्स पण बुजून जात नाही की नक्की काय घ्याव.

इक्लेअर याच नावाचा पदार्थ

इक्लेअर याच नावाचा पदार्थ जिला बेकरी या गोव्यातल्या ठिकाणी मिळतो. लोटोली गावात एका हिरव्या रानाने वेढलेल्या रस्त्याला खूपच जुनं कौलारु स्थानिक पद्धतीचं घर आहे. घरामागे बेकरीची भट्टी वगैरे आहे. घरातच कपाटात ठेवून बेकरी पदार्थ विकतात. साधं दुकानही नाही. अत्यंत मर्यादित माल बनवून ताजा विकतात दुपारपर्यंत सर्व संपुष्टात.

तर ही इक्लेअर्स कस्टर्ड फिल्ड असतात. अनेक दशकांपासून यांनी परंपरा जपली आहे. शिल्लक असली तर दोनचार मिळतात एरवी दूरवरुन आलेले जाणकार लोक आधीच फस्त करुन किंवा बांधून घेऊन गेलेले असतात.

कॅरामलाईज्ड साखरपेरणी केलेली ती एंजेल विंग्ज नावाची बिस्किटंही यांचं फाईंड आहेत. तशा प्रकारची खारीबिस्किटं आता सगळीकडे मिळतात. पण खमंगपणा आणि ताजेपणा यांचा पाहून घ्यावा. मेल्टिंग मोमेंट्स नावाची बटरबिस्किटंही जिभेवर विरघळणारी असतात. ब्रेड तर आहेच.

आपापल्या पसंतीचं काही न काही इथे मिळतंच. फक्त प्रॉब्लेम असा की अनेक ठिकाणाहून मागणी, ऑफर्स येऊनही हे कुटुंब उत्पादन वाढवायला किंवा बाहेर दुकानांत विकायला तयार नाही. क्वालिटीवर परिणाम होईल म्हणतात असं वाचलं.

जिला या नावाचा जिल्हा बेकरी असा काही अर्थ नसून अन्ताव कुटुंबातल्या आईवडिलांच्या नावांची आद्याक्षरं घेऊन ते बनलं आहे.

सदासर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा |

https://www.zomato.com/photos

https://www.zomato.com/photos/pv-res-6504977-u_xNDYMzgwMTk3OD

गवि, मस्त लिहिलंय .

लिंक मधला फोटो आहे त्यात डाव्या बाजूला आहे ते eclair . तुम्ही सांगताय ते पण असंच होतं का ?

हो. अशीच. डेकोरेशन इतकं नाही.

हो. अशीच. डेकोरेशन इतकं नाही. वरुन चॉकलेट लावलेलं असतं.

बेसिक पदार्थ असतात त्यामुळेच अस्सल लागतात. गेलो की चुकवत नाही.

खालील लिंकवर जिला बेकरीविषयी आणखी सापडलं:

https://www.tripadvisor.in/Restaurant_Review-g297604-d2304796-Reviews-Ji...

जालावरुन:

A

सदासर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा |

इड्डोस पौड रस्ता

कोथरुडात पौड रोडवर दुर्गा हॉटेलजवळ इड्डोस नावाच्या दाक्षिणात्य शाकाहारी हॉटेलमध्ये गेल्या वीकेंडला खाल्लं. दाक्षिणात्य पदार्थांची चव अस्सल वाटली आणि किमतीही फार नाहीत. पूर्ण मेनू झोमॅटोवर पाहायला मिळेल. माझ्याकडून दणदणीत शिफारस.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कॉफी अगदीच वाया गेली नाही

तिथे मी काही खाल्लं नाही, पण कॉफी अजिबात आवडली नाही. मांजर मुतवणी होती. "थोडी गरम करून द्याल का" विचारलं तर त्यांनी "ही अशीच असते कॉफी" असा पुणेरी बाणा मद्राशीतून दाखवला. मी पुन्हा तिथे पैसा खर्च केला नाही, माझ्यासाठी कोणाला पैसा खर्च करू दिला नाही.

गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीलाच तिथे गेलो होतो. ती कॉफी अगदीच वाया गेली नाही; थोडं कॅफिन मिळालं आणि आचरट फोटो काढायला कॉफी वापरली तिथली.
इड्डोस

इड्डोसच्या जवळच एक पराठ्यांचं दुकान आहे तिथे पराठे हादडले चिकार. फोटो मात्र काढले नाहीत.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरेच दिवस जाता येता दिसतं हे.

बरेच दिवस जाता येता दिसतं हे. जाऊन बघतो आता.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

गुर्जींच्या गेल्यावर्षीच्या

गुर्जींच्या गेल्यावर्षीच्या भारतवारीला इथे खाल्लं होतं टोळकं जमवून.
चव ठिकठाक वाटली होती असे आठवते. फार उल्लेखनीय असे काही वाटले नव्हते. दिड वर्ष झालं म्हणा आता. एकदा जाऊन बघितलं पाहिजे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सरासर नाइन्साफी

>> गुर्जींच्या गेल्यावर्षीच्या भारतवारीला इथे खाल्लं होतं टोळकं जमवून. <<

तुम्ही 'साउथ इंडिज'मध्ये खाल्ल्याचे फोटो व्हायरल झाले होते, मग इथले कसे नाही झाले? काही गुप्त खलबतं झाली म्हणून, की खाणं खास नव्हतं म्हणून? (डोळा मारत)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

साउथ इंडीज पारच पलिकडल्या

साउथ इंडीज पारच पलिकडल्या वर्षी. हे माल्कीणबै आल्यावत्या त्या वर्षीचं म्हणतोय (गेल्या). जाहिर कट्टा वगैरे नव्हता. अचानक ठरलेली गप्पा भेट

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद, अता हे पाहणे आले.

धन्यवाद, अता हे पाहणे आले.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

औंधमध्ये 'ला बूशी दॉर'

औंधमध्ये 'ला बूशी दॉर' लावाच्या बेकरीमध्ये बेक्ड चीज केक खाल्ला. चीजकेक, किंवा चीजकेक या नावाने जे काही देतात ते, आधी खाल्ला होता. पण हा चीजकेक अद्भुत होता. दुकान जरा महागडं आहे पण. आणि साडेसातला बंद करतात.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

'ला बूशी दॉर', ट्राय करावं

'ला बूशी दॉर', ट्राय करावं लागेल. बादवे ह्याचं इंग्रजीलिपीत नाव लिहा ना... म्हणजे गुगलवर शोधायाला सोप पडेल. किंवा नेमकं कुठे ते सांगा.
मागच्या विकात औंध च्या कोबे सिझलर ला गेलो होतो, अगागा काय ती वाईट्ट् चव त्या सिझलर्सला, अजिबात आवडले नाही. ह्याआधिही कोबेचे सिझलर आवडले नव्हते पण ह्यावेळेस अगदीच वाईट्ट अनुभव. पुण्यात 'याना' आणि कल्याणीनगराचे 'बाऊंटीज' मधे उत्तम सिझलर्स मिळतात (असा माझा वयैक्तिक अनुभव).

ओ घनुदादा... "The Place -

ओ घनुदादा... "The Place - Touche The Sizzler" यांचेही एकदा ट्राय करा. क्याम्पातल्या रामकृष्ण हॉटेलसमोर. बारकाईने बघा, कारण एक बंद लाकडी दरवाजा आहे, पटकन दिसत नाही. पुण्यातला आद्य सिझलरवाला.

...आबा कावत्यात!

द प्लेस चीच धाकटी पाती झामु

द प्लेस चीच धाकटी पाती झामु 'ज पण उत्तम आहे , सिझलर्स करता

आय्ला हो की... द प्लेस

आय्ला हो की... द प्लेस विसरलोच मी... हे सिझलर्स चं उत्तम ठिकाण. धन्यावाद आठवण करुन दिल्याबद्दल, बरेच वर्षात गेलो नाही, अता जावे म्हणतो.

होय होय.. पुण्यातल्या

होय होय.. पुण्यातल्या सिझलर्सची गंगोत्री!
एकुणच क्यांप आणि तिथेली खाद्यमंदिरे असा लेखच लिहावा लागेल!

(क्यांपाहारप्रेमी) ऋ

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत. द प्लेसचे सिझलर्स तर

सहमत. द प्लेसचे सिझलर्स तर लैच भारी!!!

ते la bouchee d'or असं

ते la bouchee d'or असं आहे.

बाकी याना सिझलर्स एक नंबर.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

धन्यवाद बॅटमॅन. काय ते नाव

धन्यवाद बॅटमॅन.

काय ते नाव "la bouchee d'or" ....मी आपलं la bushy dwar, la booshy dor, la bushy door असलं काय काय लिहून गुगलत होतो (दात काढत)

la bouchee d'or करेक्ट

la bouchee d'or

करेक्ट

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

हे नेटवर पाहून एकदा स्टेशनजवळ

हे नेटवर पाहून एकदा स्टेशनजवळ गेलो होतो पण नंतर कळालं की आता औंधात शिफ्ट झालंय.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

आजानुकर्ण ऊर्फ अतिशहाणा

आजानुकर्ण ऊर्फ अतिशहाणा ह्यांची वीकेंडला भेट झाली.
चिंचवडातल्या मोरया गोसावी देवस्थानच्या समोरच एक बारकं दोन-चार टेबलांचं हाटेल आहे.
चिंतामणी नावाचं. तिथल्या मावशींकडून थालीपीठ घेतलं.
ऑर्डर दिलयनंतर त्या पीठ मळण्यापासून सुरुवात करतात.
वेळ लागतो; पण गरम - ताजं छान मिळतं.
अतिशहाण्यालाही आवडल्याचं तो म्हणाला.
अतिशहाण्याने घरी जाउन मुद्दाम भारीवाले चॉकलेट्स आणले.
थालीपीठाचे पैसेही त्यानेच दिले.
(चॉकलेट्स नेहमीचे "कॅडबरीज् सेलिब्रेशन्स"वाले नव्हते. हल्ली तेच ते खाउन कंटाळलोय.
हे वेगळे होते खूपच. एकदम भारीवाले.)
ह्या मावशींचं थालीपीठ हे माझ्या घरचं धपाटं, आणि माझ्या घरी बनणारं थालीपीठ ह्यांचय अधला मधाला प्रकार होता.
बर्‍यापैकी मऊसर होता; खायला अडाचण नाही.
(एरव्ही थालीपीठ जास्त चावून खायला लागत असल्याने मला आवडत नाही.)
.
.
मागच्या वीकेंडला गब्बरची भेट झाली.
त्याने भरपूर दारु ढोसली.
मी बकाबका खारीमुरीवाले शेंगदाणे संपवले.
धनदांडाग्यांना शेंगदाने खायचे असतील तर फडतूसांनी शिल्लक ठेवले तर तयंना ते मिळतील;
हा संदेश मी देउ इच्छित होतो.

सुधारित

प्रतिसाद सुधारित करणयपूर्वी उपप्रतिसाद आले.
.
.
********सुधारित आवृत्ती **********
आजानुकर्ण ऊर्फ अतिशहाणा ह्यांची वीकेंडला भेट झाली.
चिंचवडातल्या मोरया गोसावी देवस्थानच्या समोरच एक बारकं दोन-चार टेबलांचं हाटेल आहे.
चिंतामणी नावाचं. तिथल्या मावशींकडून थालीपीठ घेतलं.
ऑर्डर दिलयनंतर त्या पीठ मळण्यापासून सुरुवात करतात.
वेळ लागतो; पण गरम - ताजं छान मिळतं.
अतिशहाण्यालाही आवडल्याचं तो म्हणाला.
अतिशहाण्याने घरी जाउन मुद्दाम भारीवाले चॉकलेट्स आणले.
थालीपीठाचे पैसेही त्यानेच दिले.
(चॉकलेट्स नेहमीचे "कॅडबरीज् सेलिब्रेशन्स"वाले नव्हते. हल्ली तेच ते खाउन कंटाळलोय.
हे वेगळे होते खूपच. एकदम भारीवाले.)
ह्या मावशींचं थालीपीठ हे माझ्या घरचं धपाटं, आणि माझ्या घरी बनणारं थालीपीठ ह्यांच्या अधला मधला प्रकार होता.
बर्‍यापैकी मऊसर होता; खायला अडाचण नाही.
(एरव्ही थालीपीठ जास्त चावून खायला लागत असल्याने मला आवडत नाही.)
.
.
मागच्या आठवड्यात गब्बरची भेट झाली.
त्याने भरपूर दारु ढोसली.
मी बकाबका खारीमुरीवाले शेंगदाणे संपवले.
धनदांडाग्यांना शेंगदाणे खायचे असतील तर फडतूसांनी शिल्लक ठेवले तर त्यांना ते मिळतील;
हा संदेश मी देउ इच्छित होतो.
तो नशेत होता. इतका नशेत होता की चक्क जिन्नस आणून देणार्‍या लोकांशी अगदि औदार्याने वागला.
घेउन येणारे ऑटोवाले वगैरेंशीही अगदि अस्थेने बोलला.
भारतीय सरासरीहून बरीच अधिक टिपही जिन्नस आणणार्‍यास दिली.
.
.
काजू आणि बदाम हे चखना म्हणून आहेत का अशी विचारणा करुन दोन्ही वेळेला त्यानं हाटेलमालकाला बुचकळ्यात टाकलं.
एके ठिकाणी काजू मिळाले.
मिळाले म्हणजे....
ते फक्त मलाच मिळाले.
समोर प्लेट आल्यावर ते मी फस्त केले.
फडतूसांचाही रिसोर्सेसवर व समृद्ध अन्नवर अधिकार असतोच हे मी सिद्ध केलं.
गब्बरला पुन्हा काजूंची ऑर्डर द्यायला लावून व तीसुद्धा एकट्यानेच फस्त करुन आम आदमीची ताकत सिद्ध केली.
बिल धनदांडग्या गब्बरला द्यायला लागल्यानं संपूर्णतः सोशालिस्ट/समाजवादी पद्धतीनं भेट साजरी झाली;
असं म्हणता यावं.
मी काहीही खाल्लं नाही मेन कोर्स, स्टार्टर्स वगैरे. कारण घरच्या स्त्रीशक्तीला मी घाबरतो.
तिला घाबरुन ऐसीवरील पुरोगामीपण मी जवळ आलेल्या वूमन्स डे चे औचित्य साधून सिद्ध केले.

+१

थालीपीठ जबरा! चिंचवडमध्ये इतकी वर्षं राहूनही तिथं इतकं चांगलं थालीपीठ मिळतं हे माहीत नव्हतं.

आपण भरल्या तोबर्‍याने बरेच

आपण भरल्या तोबर्‍याने बरेच काही सिद्ध आणि साध्य केले आहे. एका तोबर्‍यात अनेक दगड. गोफण घेऊन गेला होतात काय? धन-मन अश्या दोन दांडग्यांची ही धनामनाची भेट दांडग्या धपाट्याने साजरी झाली असती तर अधिक साजून दिसले असते नाही?
रोचक दिली आहे.
जाता जाता. 'घेऊन येणारे ऑटोवाले वगैरेशीही अगदि अस्थेने बोलला''.... घेऊन येणारे ऑटोवाले वगैरे दिसण्याआधीच/ही घेतली होती?

शुभेच्छा

>> तो नशेत होता. इतका नशेत होता की चक्क जिन्नस आणून देणार्‍या लोकांशी अगदि औदार्याने वागला.
घेउन येणारे ऑटोवाले वगैरेंशीही अगदि अस्थेने बोलला. <<

>> एके ठिकाणी काजू मिळाले. मिळाले म्हणजे....ते फक्त मलाच मिळाले. <<

त्या औदार्याचा नशेशी काहीही संबंध नाही. गब्बर हिंस्र वगैरे अजिबात नाही हेच यातून सिद्ध होतं. त्यामुळे धनदांडग्यांना लुटण्यासाठी मनोबानं खूप लो हँगिंग फ्रूट्स निवडली एवढाच संदेश मी देऊ इच्छितो. पुढच्या प्रगतीस शुभेच्छा.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणजे

गब्बर हिंस्र वगैरे अजिबात नाही हेच यातून सिद्ध होतं. त्यामुळे धनदांडग्यांना लुटण्यासाठी मनोबानं खूप लो हँगिंग फ्रूट्स निवडली एवढाच संदेश मी देऊ इच्छितो. पुढच्या प्रगतीस शुभेच्छा.

म्हणजे 'कोण कुठला गब्बर, हिंमत असेल तर मला लुटायचा प्रयत्न करून बघा पुढच्यावेळी. त्या प्रयत्नात जास्तीत जास्त जे मिळू शकेल ते (शुभेच्छा) आत्ताच घ्या' असं का? (डोळा मारत)

दोन्ही डगरींवर पाय

मला वाटतं जंतू नेहेमीप्रमाणे दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. तू म्हणतोस ती एक; दुसरीकडे गब्बरलाही 'आपला'च म्हणायचा प्रयत्न.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अरारारा...गब्बर दारू बरोबर

अरारारा...गब्बर दारू बरोबर शेंगदाणेच खातो का? मला वाटलं खारे काजू खात असेल.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मनोबाचं 'बकाबका' शेंगदाणे

मनोबाचं 'बकाबका' शेंगदाणे खाणं पाहून गब्बर ने खारे-काजूंचा बेत रद्द केला असावा (जीभ दाखवत)

रोचक

रोचक दिली आहे!

दाखवायचे दात.

इथे पर्शिया ,स्पेन , इटलीच्या खाली कोणी बोलत नाहीये (मिरजेच्या आपटेंच्या चिरोटयाचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद. मी मिरजेचाच).

बघणाऱ्यांचा दृष्टिकोनावर अवलंबून आहे. किंवा दाखवणाऱ्यांच्याही. 'आम्ही परदेशात राहतो' याची ही जाहिरात असू शकते. मनात 'इथेही कोपऱ्या-कोपऱ्यांवर उडपी आणि इराणी असते तर किती बरं झालं असतं' असं सुरू असतं.

कॉफीमध्ये वेलची, दालचिनी वगैरे मसाल्याचे पदार्थ घालण्याची परंपरा मध्यपूर्वेतूनच आपल्याकडे आली असण्याची दाट शक्यता आहे.

हे आले लगेच परप्रकाशित विचारजंत, सगळं कसं बाहेरूनच भारतात आलंय सांगत!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इथे पर्शिया ,स्पेन , इटलीच्या

इथे पर्शिया ,स्पेन , इटलीच्या खाली कोणी बोलत नाहीये(मिरजेच्या आपटेंच्या चिरोटयाचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद. मी मिरजेचाच). त्यामानाने मी गेल्या काही दिवसांत ट्राय केलेले आयटम तसे साधेच आहेत पण जाम आवडले आपल्याला.
१] मुंबईत BSE च्या बाजूला परमेशा नामक दुकानात छान सॅंडविच मिळतात. ते खाल्ले. बरेच प्रसिद्ध आहेत आसपासच्या भागात. खासकरून त्याचं चीज-गार्लिक सॅंडविच.
२] मुंबईतच फ्लोरा फौंटन समोर सिटीओ वडापाव. उत्कृष्ट.
३] मुंबईतील सर्वात जुन्या इराणी कॅफेपैकी एक 'याझदानी बेकरी फोर्ट' येथील मावा केक आणि बन मस्का चाय.
४] सांगलीमध्ये अनुराधा नावाचे हॉटेल आहे तिथले मटण (सुकं) आणि पांढरा रस्सा. सांगलीतल्याच चांदणी भोजनालय येथील तांबडा रस्सा आणि मटण. सांगली-मिरज रोडवर क्रांती भोजनालय आहे तिथलं मटण ताट.
५] इचलकरंजी येथे बुगड गल्ली नामक एक गल्ली आहे (जी गांधी कॅम्प नावानेदेखील ओळखली जाते). तिथे अस्सल घरगुती पद्धतीची मांसाहारी भोजनालये आहेत. घरी गेल्यावर सतरंजीवर बैठक असते. अगदी अंगत-पंगत स्टाईलने जेवण. भाकरी , कांदा-लिंबू , मटण आणि तांबडा रस्सा. अहाहा. तृप्त होतो आत्मा.

बुगड गल्ली... व्वा काय नाव

बुगड गल्ली... व्वा काय नाव आहे!
बादवे @ १, फार पुर्वी वाशीत जाणे व्हायचे तेव्हा आवर्जून 'गुप्ता' चे सँडवीच खाणे व्हायचे. फार अप्रतिम असायचे त्यांचे रोस्टेड्/ग्रील्ड सँडविचेस.

क्रमांक ४ बद्दल अनेक आभार!

क्रमांक ४ बद्दल अनेक आभार! (स्माईल) तिथे लवकरच जाणे होणार आहे तेव्हा आस्वाद घ्यायचा प्रयत्न करण्यात येईल

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत. मला चांगलं सुकं मटण

सहमत.
मला चांगलं सुकं मटण अजूनतरी खायला मिळालं नाहीये त्यामूळे इथे जाण्याचा विचार माझा पण आहे (ऋ खास खायला जाणार असशिल तर सांग (स्माईल))

नक्कीच. सर्वप्रथम अनुराधाचा

नक्कीच. सर्वप्रथम अनुराधाचा दौरा करावा. दोन शाखा आहेत.

१] त्रिकोणी बागेजवळ
२] विश्रामबाग चौकात

ओक्के

ओक्के

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अनुराधामध्ये जेवलोय, मस्त मजा

अनुराधामध्ये जेवलोय, मस्त मजा आली. क्रांती आणि चांदणी इथे गेलो नाही. नक्की कुठेशीक आहेत ही दोन्ही?

(मिरजकर) बॅटमॅन.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मिरजेहून दंडोबाकडे निघाल्यावर

मिरजेहून दंडोबाकडे निघाल्यावर थोड्याच अंतरावर एक ढाबा होता तिथे रात्री जेवायला मुद्दाम ठरवून गेल्याचं आणि चिकनमटण ओरपल्याचं खूपदा घडलंय. पण निश्चित नाव विसरलो. आता आठवत बसतो.

खूप खूप पूर्वी सांगलीला तमाशा थेटरसमोर पत्र्याचं छत असलेली शुद्ध मांसाहारी खानावळ होती. तीही आता शिल्लक नसावी बहुधा.

तसाच पनवेलपुढे कर्नाळ्याच्या दिशेत क्रांतिवीर ढाबा (काय नाव आहे!!!)

सावंतवाडीच्या साधले मेसला पुन्हा एकदा नुकतीच भेट दिली. गरमागरम साधं शाकाहारी पण खूप समाधानकारक जेवून आलो.

गोव्याचा मार्टिन्स कॉर्नर दर्जा / चव यांबाबत १००% वरुन ४०% वर घसरलाय. वाईट वाटलं. परत जाणार नाही.

सदासर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा |

क्रांतीवीर ढाबा

तसाच पनवेलपुढे कर्नाळ्याच्या दिशेत क्रांतिवीर ढाबा (काय नाव आहे!!!)

अहो, तो ढाबा ज्या गावात आहे त्या गावाचे नाव आहे शिरढोण!!

आता आले लक्षात ढाब्याचे नाव असे का ते?