उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? -१२

आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अ‍ॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे
आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू करत आहोत.

============

मुंबईपुण्यात कुठे 'आफ्रिकन' पद्धतीचं जेवण मिळणारी हॉटेल्स आहेत का? नॉर्थ आफ्रिकनही चालतील पण अभिप्रेत आहे ते इथिओपियन वगैरे स्टाईल. इथिओपियन जेवणाची प्रशंसा परदेशी राहिलेल्यांकडून खूप ऐकलीय.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

सद्या

आमच्या शहरातील एका केरळी रेस्तराँत ओणम पेश्शल 'सद्या' हादडायचा आज योग आला. एरवी तिकडे गेलो की न चुकता तळलेली माशाची तुकडी आणि अप्पम् मागवलं जातं, पण आजचा बेत संपूर्ण शाकाहारी होता. भौगोलिक साधर्म्यामुळे अर्थातच कोकणी पद्धतीच्या शाकाहारी जेवणाशी भरपूर साधर्म्य होतं.

आधी केळीचं आडवं पान मांडलं गेलं. मग मीठ, केळ्याचे वेफर्स, वेलची केळं, तर्‍हेतर्‍हेच्या चटण्या-लोणची, एक खाज्यासारखा तोंडीलावण्याचा प्रकार (शर्करा उप्पेरी), पापड, काकडीची कोशिंबिर, अननस आणि इतर दोन प्रकारच्या पचडी असले ज्युनिअर खेळाडू आले. तदनंतर केरळी अवियल, केळफुलाची भाजी, भोपळ्याची भाजी, कोबीची सढळ हस्ते खोबरं घातलेली भाजी, चवळीची एक निराळ्या प्रकारची उसळ, आंब्याची दह्यातली भाजी असा जामानिमा आला. थेट अनसाफणसाच्या भाजीची याद दिलवणारीही एक भाजी होती, मात्र फणसाशिवाय (हाय रे कर्मा!). यातून मोकळ्या राहिलेल्या जागेत पेजेच्या तांदळासारख्या जाड भाताचा ढीग आणि सांबार येऊन विसावले.

साधारण ताट असं दिसत होतं. (फोटो इंटरनेटवरून. दुवा)

पाहताना भाऊगर्दी वाटत असली तरी, प्रत्येक पदार्थाला न्याय देण्याइतपत तुम्ही उदरमतवादी असलात की झालं! (स्माईल)

यानंतर तीन प्रकारची पायसम् आली. एक तर थेट मनगणंच होतं, दुसरं तांदळाच्या खिरीसारखं आणि तिसरं जाड गव्हाचं. तिन्ही खासच. दुर्दैवाने वर्षातून एकदाच ओणम येतो.

ओह माय गॉड!! काय मस्त ताट

ओह माय गॉड!! काय मस्त ताट आहे.

तथास्तु

बेत बघूनच पोट भरलं!
पण त्या हाटेलवाल्याला बजावून ठेव की हे सणासुदीला ठीक आहे "परंतु जे काही मूळचे सामर्थ्य" ते विसरू नकोस.
नायतर तुझ्या काकीशी गाठ आहे त्याची. मी केलेली वर्णनं ऐकून घट्ट बेत करून आहे पुढल्या वेळेस तिथे जायचा!!
(स्माईल)

घासबोध

पण त्या हाटेलवाल्याला बजावून ठेव की हे सणासुदीला ठीक आहे "परंतु जे काही मूळचे सामर्थ्य" ते विसरू नकोस.

+१

सामर्थ्य आहे केरळीयाचे, जे जे तळील तयाचे,
परंतु पैल्या अवताराचे, अधिष्ठान पाहिजे!

'सद्या'?

'सद्या' म्हणजे काय (हे कोटी न करता सांगणार का)?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

banquet

विकीवरूनः

Sadhya (Malayalam: സദ്യ, Sanskrit: सग्धिः, Sagdhiḥ) is a variety of pure vegetarian dishes traditionally served on a banana leaf in Kerala, India.[1] Sadhya means banquet in Malayalam. It is a feast prepared mainly by men, especially when needed in large quantities, for weddings and other special events.

During a traditional Sadhya celebration people are seated cross-legged on mats. Food is eaten with the right hand, without cutlery. The fingers are cupped to form a ladle. A normal Sadhya can have about 24-28 dishes served as a single course. In cases where it is a much larger one it can have over 64 items in a Sadya like the Sadya for Aranmula Boatrace (Valla Sadhya)

बाकी अशीच गुजराती/राजस्थानी/काठियावाडी थाळी परिचित आहेच; तसाच हा काश्मिरी प्रकारः https://en.wikipedia.org/wiki/Wazwan

सद्या (स्पेलिंग सद्य आहे पण

सद्या (स्पेलिंग सद्य आहे पण उच्चार सद्या- सदानंदचा सद्या नव्हे तर सद्द्या) म्ह. जेवण.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

क्या बात है! एकच नंबर.

क्या बात है! एकच नंबर.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

पोट भरल

पोट भरल

द हेग खाद्यभ्रमंती-१

पॅलेइस नोर्ड आइंडं नामक राजवाड्यापासून जवळच एक "इस्तंबूल रेस्टॉरंट" नामक तुर्की हाटेल आहे. तिथे खालील पदार्थ गेले काही दिवस रिपीट मोडवर हादडले:

व्हेजिटेरियन लह्मजुन (उच्चारी लॅह्माजुन, मेनूत "तुर्किश पिझ्झा".)
चिकन घालून लह्मजुन
बकलावा

अतिउत्तम.

डेन हाख सेंट्रालपासून जवळच एक 'लक्सर' नामक इजिप्शियन हाटेल आहे तिथे डोनर विथ एक्स्ट्रा पिटा प्लस त्यांचे सॉसेस इ. मस्त.

अ‍ॅम्स्टरडॅममध्ये इथिओपियन जेवण. चिकन-चीज एकत्रवाली एक डिश (विथ टेंडर लेगपिसेस), अंडे ग्रेव्हीवाली दुसरी डिश, बटाटा विथ बीन्स तिसरी डिश, घासफूस आणि इंजेरा नामक आंबोळी. आंबोळी जरा जास्तच आंबटढाण होती हे एक सोडल्यास अतिउत्तम.

चीजः नेहमीचे डच चीज (६ महिने वय), जिरा फ्लेवर्ड चीज आणि शेळीच्या दूधवाले महात्मा गांधी चीज. गांधी चीजसोबत पिस्ते इ. घातलेले सलाड मौजे एन्स्खेडे मुक्कामी चाखले. अप्रतिम.

ब्रेडः आर्टिझनल ब्राऊन ब्रेड २ च खाल्ले, आवडले पण अजून व्हरायटी ट्राय केली नाही.

फळे: स्ट्रॉबेर्‍या भारतातल्यापेक्षा चांगल्या वाटल्या. प्लम उत्तम, ग्रॅनी स्मिथ सफरचंदही छानच, रेड करंट नामक फळे लालबुंद परंतु आंबटढाण त्यामुळे सँडविचात खायला छान.

उत्तेजक पेयः जिंजर एल हे पेय जाम आवडले...

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

काळजात कळ- जळजळ फोटो पण टाका

काळजात कळ- जळजळ
फोटो पण टाका हो बॅटोबा -हौंजौदे अजून जळजळ च्यामारी!!!

हाहा फटू इशेश काढले नैत ओ.

हाहा फटू इशेश काढले नैत ओ.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

आमचं विस्कॉन्सिन अनेक

आमचं विस्कॉन्सिन अनेक गोष्टींकरता प्रसिद्ध आहे - चीझ, हार्ले-डेव्हिडसन , बीअर.
पैकी परवा ४/५ प्रकारची चीझेस विकत घेतली. काल पोळीच्या मध्ये किसून एक चीझ घातले. फेंट चव आली. मुळातच त्याला खूप फेंट चव होती आणि म्हणूनच ते निवडले होते.
हनी-सिराचा चीझ ला तिखट चव आहे. ते निवडले नाही.

क्रीमरोल हा पदार्थ मला आवडतो,

क्रीमरोल हा पदार्थ मला आवडतो, परंतु तो नेहमी असा फ्लेकी-खुसखुशीतच असतो असे वाटलेले तोवर क्यांपात हुसेनी बेकरीत महिन्याभरापूर्वी मऊ क्रीमरोल खाण्याचा सुखद योग आला. एक पीस वट्ट सहा रुपये फक्त! आणि आत क्रीमची कंजूषीही आजिबात नाही. एमजी रोडला प्यारलल रोडमध्ये कसा कोणजाणे अवचित घुसलो आणि भुकेची आठवण आली तशी योगायोगाने ही बेकरी समोर उभी ठाकली. दणदणीत शिफारस क्रीमरोलप्रेमींना.

बाकीचेही बरेच पदार्थ होते पण मी फक्त क्रीमरोलच खाल्ला म्हणून त्याची शिफारस इतकेच.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

धन्यवाद! कर्वेनगरात

धन्यवाद!

कर्वेनगरात जहागीरदार बेकरी नावाच्या दुकानात गुलकंदाचं क्रीम भरलेले क्री०रो० मिळतात. तेही भारी लागतात.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

एक नंबर

हाण्ण तेजायला. कुठेशीक आहे ही बेकरी कर्वेनगरात?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

ताथवडे उद्यानाजवळ.

ताथवडे उद्यानाजवळ.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

धन्यवाद!

धन्यवाद!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

तों पा सु

बॅट्या, आबा बास करा! यातना होताहेत वाचून वाचून. Sad

अध्यात्मका ! (मधुमका )

पावसाळा आणि मक्याची कणसं यांचं उबदार नातं आहे.बाहेर झिरमिर पाउस पडतो आहे ,वातावरणात आल्हादक गारवा आहे अशावेळी शेगडीवर भाजलेली मक्याची कोवळी कणसं, तूप- मीठ आणि कधी लिंबू लावून खाणे सुखदायक आहे.आता हातगाड्यांवर सर्रास मिळणारी तिखटमीठ, (अ)चाट मसाले आणि अमूल बटर लावलेली कणसं खाणे मला जमत नाही.मक्याचे वडे, उपमा किंवा कटलेट हे क्वचितच होणारे खटाटोपाचे पदार्थ फारच चवदार लागतात. ( पण इतके कष्ट कोण करेल प्रभो ! ) कधीतरी हॉटेलात खाल्लेल्या मिक्स भाजीत आढळलेल्या बेबी कॉर्नची चव किंवा स्वीट कॉर्न सूप मधून स्वीट कॉर्नचा स्वाद वेगळ्याने कळत नाही.मक्केकी रोटी हा खुसखुशीत प्रकार मस्त लागतो.बऱ्याच पदार्थात कॉर्न फ्लोर गुप्त रुपात वावरतो हे ज्ञान यथावकाश प्राप्त झालं शिवाय चीनी लोकं सर्वात्मका खातात असे पु.लंनी सांगून ठेवलंच आहे.असा मर्यादित मकानुभाव असूनही मधुमक्याबद्दल कुतूहल होतं आणि त्याने माझ्या स्वयंपाकघरात अजून प्रवेश केला नव्हता.

मधुमका हा गोग्गोड शब्द गेल्या काही वर्षात अनेक वेळा वाचनात येऊनही हे नक्की काय प्रकरण आहे याची कल्पना नव्हती.आता विविध एक्झोटिक भाज्या आणि फळे नागपुरातही मिळू लागल्याने स्वीट कॉर्न म्हणजेच मधुमका याचा शोध लागून अकस्मात ज्ञानदीप प्रज्वलित झाला.सात किंवा आठ वर्षांपूर्वी प्रथमच बाजारातून स्वीट कॉर्नची २ कणसं विकत आणली. अनेक मुलायम पडदे दूर केल्यावर तलम, रेशमी केसर पांघरलेले टप्पोरे ,रसभरीत ,लोभस ,पिवळे दाणे शिस्तीत दाटून बसलेले दिसले.जाळपोळ करून त्यांना गॅसवर भाजून काढावेसे वाटेना म्हणून २/३ मिनिटे मायक्रोव्हेवमधून काढले आणि वाफाळत्या कणसाला तूप -मीठ लावून खायचे दात रुतवले.दाणे चावताना क्रंची मंची मंजुळ नाद येऊ लागला. रसाळ दाण्यातून दाट,सुमधुर दुधाचे चिमुकले घट माझ्या जिभेवर झिरपू लागले आणि चित्तशुद्ध होऊन अद्ध्यात्मिक आनंदाची अनुभूती जाहली.अवघे कणीस संपेपर्यंत मी निर्वाणाला पोहोचले होते.साध्या मक्याच्या कणसाबद्दल तात्काळ विरक्तीची भावना दाटून आली. वरणभाताशिवाय इतका सोज्वळ,सात्विक ,निष्पाप असा अन्य पदार्थ खाल्ल्याचे मला आठवत नाही.साध्या कणसापेक्षा मोठे असल्याने एक कणीस खाऊन पोट भरले आणि तृप्तीची ,समाधानाची जाणीव फक्त उरली.

स्वीट कॉर्न उर्फ मधुमक्याचे दाणे काढणे सोपे आहे.हे दाणे घालून उपमा,पोहे अतिशय रुचकर लागतात.गाजर आणि फ्रेंच बीन्सच्या शेंगा घालून चविष्ट स्वीट कॉर्न सूप सुद्धा करता येते.

लोकहो ,खरं सांगू का हे पदार्थ छान लागत असले तरी तूप -मीठ लावलेले वाफाळते कणीस म्हणजे साक्षात झेन ! अध्यात्मिक अनुभूतीमुळे जीवनात आनंदाचे डोही आनंद तरंग !

निषेध! साधा देशी मका सोडून

निषेध! साधा देशी मका सोडून स्वीट कॉर्न खाणं म्हणजे...

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

+१

अमेरिकन आक्रमणामुळे हल्ली मका (maize) मिळतच नाही; सगळीकडे मेला मधुमका! हीच तक्रार काही वर्षांपूर्वी एक ब्रिटीश मित्रही करत होता, त्याची तक्रार भाषिक आक्रमणाबद्दलही होती.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रास्ता कॅफे!

गेल्या शनिवारी बाणेर-रोडच्या 'रास्ता कॅफे' मधे जाणं झालं. फारच मस्त अनुभव.
अ‍ॅम्बीयन्स टिपीकल युरोपियन कॅफेज मधे असतो तसा आहे, आजू बाजुने आणि मधे झाडं आणि त्यामधे टेबल्स. म्युझिक आवाजाने 'लाऊड' म्हणावं असं होतं पण लावलेली गाणी कर्णकर्कश्श नव्हती त्यामुळे ते चालून गेलं. कंपाऊंडच्या भींतीवर ट्रायबल चित्रे (फार रंगरंगोटी न करता काढलेली) आकर्षक होती.
मुळ-मुद्दा जेवण (स्माईल) ते चविष्टच होतं. थाई करी, चिंच-मिरची मधे ग्रिल्ड केलेले पनीर, ग्रिल्ड कॉटेज-चि़झ -कोथिंबीर रॅप्स आणि ह्या सगळ्यावर कडी म्हणजे 'पेस्तो पिझ्झा' - अफलातून होता पिझ्झा, कमालिचा थिन-क्रस्ट. मॉकटॅल्स ही छान - आमची मॉकटेलची चोखंदळ पिदाडी पाहून त्यांनी एक मो़कटेल ट्राय करायला दिलं -काँम्प्लीमेंट्री (स्माईल)
त्यांची खासियत म्हणजे बहुतेक सर्व ग्रिल्ड, रोस्टेड पदार्थ हे 'क्ले-ओव्हन/मातिच्या भट्टीत' बनवलेले असतात. त्यामुळेच तो पिझ्झा आणि ते ग्रिल्ड पनिर अफलातून होतं. शिवाय 'याना' मधे मिळणार्‍या 'चिझ गार्लिक ब्रेड' नंतर प्रथमच तेवढंच उत्तम गार्लिक ब्रेड मिळालं (स्माईल)

त्या क्ले-ओव्हन चा फोटो - अंजावरून साभार. हे क्ले-ओव्हन अगदी मधोमध आहे त्यामूळे त्या थंडगार खुल्यावातावरणात एक मस्त उब जाणवत होती (स्माईल)

clay oven raasta cafe

रस्ताफा आहे का नाव? रास्ता

रस्ताफा आहे का नाव? रास्ता कॅफे असं काही सापडलं नाही. रास्ताफा म्हणून सापडलं बाणेरला.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

नाही, रास्ता कॅफे असंच आहे

नाही, रास्ता कॅफे असंच आहे नाव. इंग्रजीमधे ते Raasta Cafe असं आहे. "R" नंतर दोन "a" असल्याने सापडलं नसावं तुम्हाला.
ही झोमॅटॉची लिंक https://www.zomato.com/pune/raasta-cafe-baner

धन्यवाद सर, खूप मोलाची माहिती

धन्यवाद सर, खूप मोलाची माहिती दिलीत. आता हे ट्राय करेन नक्कीच.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

पुण्यातल्या माश्यांच्या खानावळी

निसर्ग, फिश करी अँड राईस किंवा मासेमारी यांच्या अतिकिमती आणि तेवढ्याच फालतू जेवणाला शह देणार्‍या खानावळी कोणत्या?

१) आयम लायन (बावधन) अतिशय लिमिटेड सिट्स आणि दर्जेदार खाणं. सोलकढी अप्रतिम. (किमती खूप वाजवी मात्र नाहीत, पण मोजलेल्या पैशांच्या लायकीचं चांगलं नॉनव्हे़ज नक्कीच खायला मिळतं).
२) मे बी सत्कार, सिंहगड रोड?
३) मालवणी गजाली (बाणेर रोड) : अजिबात फिरकू नका.

कोथरूड बस स्टँडजवळ कोकण

कोथरूड बस स्टँडजवळ कोकण एक्स्प्रेस मध्ये अलिकडं कुणी गेलंय का?
कुमार परिसर कोथरूडला कालवण नावाचे एक हॉटेल आहे, तिथला काय कोणाचा काय अनुभव आहे?
म्हात्रे पुलाच्या कॉर्नरला बहुतेक हृषिकेश नावाचा एकदम छोटेखानी फिश पॉइंट आहे, बजेट मध्ये बरं खायला मिळते.

फिश करी राईस चांगलंय, इनफॅक्ट

फिश करी राईस चांगलंय, इनफॅक्ट बाकीचेही चांगले वाटले मला. कलिंगाही मस्तच. पण आयम लायन बघतो नक्की.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

कलिंगा केव्हाही छान आहे त्या

कलिंगा केव्हाही छान आहे त्या निसर्गपेक्षा. निसर्गचा एवढा उदोउदो का असतो हे एक कोडंच आहे.
'आय अ‍ॅम लायन' बद्दल मी ही एवढ्यात बरेच चांगले रिव्हू ऐकून आहे, जावेच एकदा.
कोथरुडचं 'फिश ओ फिश' आणि बाणेर-पाषाण लिंक रोडवरचं 'सॅफरन' दोन्ही फिश-डिशेससाठी चांगले आहे असे ऐकून आहे, पण अजून जाणे झाले नाही.

ठाण्यातील लुईस-वाडीतल्या 'हेमंत-स्नॅक्स' मधे जे मासे (मासे-थाळी) मिळतात, ते केवळ लाजवाब (जीभ दाखवत)...

सॅफरन : गोवन सुरमई करी एकदम

सॅफरन : गोवन सुरमई करी एकदम मस्त. जे लोक सहसा सुरमई-पापलेट यांच्या पलिकडे जात नाहीत त्यांना हे हॉटेल सुचवेन.
खाली तळमजल्यात त्यांनी बार सुरु केलाय तिथे जाऊ नका. खूप कुबट आहे.

सध्या इथे वातावरणानेच पोट

सध्या इथे वातावरणानेच पोट भरते आहेसे दिसतेय..

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

जिजाई, चांदणी चौक, मुळशी रोड

जिजाई कॅफे, चांदणी चौक, हा पॅराडाईज प्रमाणेच स्मोकर्स पॅराडाईज आहे. नॅशनल हायवेचा प्रवाहो पाहत हवा तेवढा वेळ तिथे घालवता येतो. खायला मिळते पण तिथे खाण्यासाठी न जाता फक्त गप्पा मारायला जावे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री दिड दोन पर्यंत सुरु असतो.

चोक्कस!

गेलेलो आहे. एकच नंबर वातावरण असते.

श्रीकृष्ण वडापाव, मौजे

श्रीकृष्ण वडापाव, मौजे हाऊन्स्लो.

मझा आला.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

नाशिकचा 'श्रीकृष्ण' वडापाव

नाशिकचा 'श्रीकृष्ण' वडापाव देखील फार 'वर्ल्ड फेमस' वगैरे होता एकेकाळी, हा तोच असावा का असं क्षणिक वाटलं. पण एवढ्यात त्या वडापावला नाशाकातच फार चांगले दिवस नाहीत असं ऐकून आहे.

वडा(पाव) म्हंटलं की बालगंधर्वचा आधी डोळ्यासमोर येतो आणि आमच्या गरवारे कालेज समोरील बिपीनचा.

ह्या बिपीन स्नॅक्स शेजारीच तशीच टपरीवजा 'प्रभाकर' नावाची छोटेखानी बेकरी होती, तिथे 'अंडा-बन-मस्का' मिळायचं. उकडलेल्या दोन अंड्याच्या फोडी बन-मस्क्यात पसरवून त्यावर तिखट-मीठ भुरभूरलेलं असायचं. स्वस्तात मस्त प्रकार होता तो. आमच्या सारख्या बॅचलर्स भुक्कडांना तर पौष्टीक परवणीच होती ती (स्माईल)
(जरा जास्त पैसे खर्चायची हौस-कम-खाज असली की समोरच्या 'पॅरा'मधले इराणी मस्के-वजा पदार्थ हदडायचो...शिवाय'शिग्रेटीचा वास'आणि धुकेबाज रोमँटीक अँबियन्स येकदम कॉम्प्लीमेंट्री)

सनराइज ते पॅराडाइज

>>जरा जास्त पैसे खर्चायची हौस-कम-खाज असली की समोरच्या 'पॅरा'मधले इराणी मस्के-वजा पदार्थ हदडायचो...शिवाय'शिग्रेटीचा वास'आणि धुकेबाज रोमँटीक अँबियन्स येकदम कॉम्प्लीमेंट्री <<

पॅराडाइजमध्ये अनेकदा गेलेलो आहे. सिगारेटपिते मित्र बरोबर असतात तेव्हा जायची वेळ मुख्यतः येते. पूर्वी डेक्कनवर सनराइज (उच्चभ्रू), गुडलक (मध्यम) आणि लकी (निम्न) अशी इराण्यांची प्रतवारी असे. (शिवाय लकडी पूल ओलांडला की रीगल) ह्या सर्वच ठिकाणी सिगारेटी चालत असत. त्यामुळे मित्र प्रतवारीनुसार निवड करत. आता सनराइज-लकी बंद पडले, रीगल इराणी राहिलंच नाही आणि गुडलकमध्ये फारच फॅशनेबल टोणग्या-टोणगींची गर्दी असते त्यामुळे चिक्कार वेळ बसून गप्पा मारण्यासाठी पॅराडाइज हा एकमेव पर्याय आहे.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गुडलकमध्ये फारच फॅशनेबल

गुडलकमध्ये फारच फॅशनेबल टोणग्या-टोणगींची गर्दी असते त्यामुळे चिक्कार वेळ बसून गप्पा मारण्यासाठी पॅराडाइज हा एकमेव पर्याय आहे.

गुडलकात आजकाल झालं असेल तर उठा असं सांगतात वेटर. मग वेळ काढायला अजून एक चहा सांगितला की खूप घाण लूक देतात.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

कृ ह घे

एवढं अवांतर केलं की आंजावरचे लोकही वैतागतात. गुडलकवाल्यांचा तर धंदा बुडवता तुम्ही लोक!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुडलकचं आऊटलेट औंधच्या नविन

गुडलकचं आऊटलेट औंधच्या नविन मौल मधे उघडलं आहे. मौल मधे शोभत नाही ते गुडलक...

Sunrise च्या मालकाचं kp मधे

Sunrise च्या मालकाचं kp मधे abc फार्मस च्या आवारात shisha cafe बऱ्याच वर्षापासून आहे. ऊत्तम मेनू. आणि योग्य दिवशी तिथे असाल तर एखादा live जॅझ परफॉर्मन्स )!!! लै भारी. ( सध्या चालू आहे का नाही ते माहित नाही पण काही काळापूर्वीपर्यंत पुणे जॅझ अँड blues क्लब तिथून चालायचा )

लकी बंद पडल्याचं लयच दु:ख

लकी बंद पडल्याचं लयच दु:ख झालं. ते रस्त्याच्या पातळीच्या खाली होतं, त्यामुळे खिडकीतून लोकांच्या कमरेखालचा भागच दिसायचा. त्याची गंमत वाटून तासन्तास बसायचो. दुसरं म्हणजे निम्नभ्रू असल्यामुळे किंमतही निम्नच असायची.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

पण पैरा पण बंद होणार अशी

पण पैरा पण बंद होणार अशी चर्चा होती ना....
चला पैरा मधे कट्टा करू या ☺

सहमत!

सहमत!

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

Yess ...count me in...फक्त

Yess ...count me in...फक्त सध्या paradise सकाळी 8 ते रात्री 10 अत्यंत गलिच्छ ( अधिपेक्षाही ) झाले आहे . सकाळी सात सव्वासात किंवा रात्री साडे नऊ नंतर उत्तम वेळ .

चला!

चला!

...नै, सिरीयसली. ऑगष्ट एंड?

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

पुण्यात आहात का ? का येणार

पुण्यात आहात का ? का येणार आहात ?

येणार आहे ऑगस्ट एंडास.

येणार आहे ऑगस्ट एंडास.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

पॅराला भेटायला नाही पण आबा ला

पॅराला भेटायला नाही पण आबा ला भेटायला नक्की येणार (स्माईल)

'लकी'चे दिवस

सहमत. तिथे अनेकदा इंटरेस्टिंग चेहरेही येत असत. दिवसाच्या कोणत्याही वेळी माणसं बघत वेळ घालवायला उत्तम जागा होती. शिवाय रात्री अलका-डेक्कन-विजय वगैरेचा शेवटचा खेळ पाहून चालत घरी जाता जाता मध्ये थांबून खाता येई ही आणखी सोय.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Prabhakar was hot.... so hot

Prabhakar was hot.... so hot that माझ्या एका मित्राने त्याच्या would be girl friend ला पहिल्यांदा बाहेर नेताना lets meet at Prabhakar असे आमंत्रण दिले होते.( हा भोटम पणा ऐकून आम्ही उर्वरित गडबडा लोळलो होतो ) paradise चे वातावरण रोमँटिक वाटणारे आपणच प्रथम... आणि एकटेच बहुधा (स्माईल)

paradise चे वातावरण रोमँटिक

paradise चे वातावरण रोमँटिक वाटणारे आपणच प्रथम... आणि एकटेच बहुधा (स्माईल)

अहो माझं ते रोमँटीकवालं वाक्य सरकैस्टीक होतं हो.

मी पण 'पॅरा'चा रेग्युलर

मी पण 'पॅरा'चा रेग्युलर ग्राहक होतो. (माझ्या माहितीप्रमाणे ढेरेशास्त्रीही होते.)

धुराचे ढग, रंग ओळखता न येणार्‍या भिंती, कोणाच्याही टेबलावर रँडमली जाऊन बसणे, कितीही दंगा केला तरी कोणाला त्रास न होणे, हिशोब जमवत बसलेले रेल्वे बुकिंग एजंट, दाढ्यांचे खुंट वाढलेले वेटर/मालक ... कहर प्रकार आहे पॅरा.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

माझ्या माहितीप्रमाणे

माझ्या माहितीप्रमाणे ढेरेशास्त्रीही होते आहेत.

सिगारेट देखील तिथेच विकत घेतली पाहिजे असही नसतं. स्वतःच्या सिगारेटी देखील घेउन तासंतास तिथे टाइम पास केलेला आहे. आताही जातो पण मनमुराद तासन्तास नाही घालवता येत.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

Agreed ... मीही आता गेलो तर

Agreed ... मीही आता गेलो तर रविवारी सकाळी सात सव्वा सात ला जाऊन एक डबल बडे गिलास मे आणि एक बिडी मारून कटतो ..

अरेच्या , इथे paradise वाले

अरेच्या , इथे paradise वाले बरेच दिसताहेत... तोच तो मोहम्मद ( काउंटर वरचा ) आणि तोच तो अब्दुल ... तीच ती कोणीही न object करता सिगरेट ओढण्याची जागा !!!

एकेकाळी शरद पवारही पॅरामध्ये

एकेकाळी शरद पवारही पॅरामध्ये पडीक असायचे अशी एक अर्बन लीजंड ऐकली आहे.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

बाप रे !! !!! उपेंद्र लिमये

बाप रे !! !!! उपेंद्र लिमये काही वर्षांपूर्वी पर्यंत व त्याच्या बरीच वर्षे पूर्वी संजय पवार तिथे पडीक दिसायचा .

>>बालगंधर्वचा म्हणजे जोशी की

>>बालगंधर्वचा

म्हणजे जोशी की खत्री?

आहो म्हणजे बालगंधर्व

आहो म्हणजे बालगंधर्व रंगमंदिरात मिळतो तो वडा. तो जोशी/खत्री पैकी कुणाचा असतो का? कल्पना नाही ब्वा...असेल तर नविनच माहिती.

बालगंधर्वमध्ये मिळणारा वडा

बालगंधर्वमध्ये मिळणारा वडा खाऊन युगं लोटली. आता त्याची चव आठवतही नाही.

जोशी आणि खत्री बालगंधर्वला लागून पुलाच्या तोंडाशी आहेत. खत्रीची गाडी तर पुलावरच, बालगंधर्वच्या कंपाऊंडला लागून आहे.

योगर्ट आईस्क्रीम

Untitled

योगर्ट आईस्क्रीम विथ शुगरकोटेड क्रश्ड आमंड्स टॉपिंग

हा सगळ्यात छोटा कप होता. यावर वेगवेगळे नटस किंवा कुकीज सॉस, चॉको सॉस इ. टॉपिंग्ज्स मिळतात.

याहून मोठे कप्स आहेत त्यावर याशिवाय वेगवेगळी फ्रुट्स घेता येतात. उदा. पीच, स्ट्रॉबेरी .. इ.
कॉम्बिनेशन आपण सिलेक्ट करायचं.

हे राष्ट्रं देवतांचे ... हे राष्ट्रं प्रेषितांचे |
आचंद्रसूर्य नांदो ... स्वातंत्र्य भारताचे ||

पिंपळे सौदागर(पुणे

पिंपळे सौदागर(पुणे

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

चिकन ६५ डोसा

काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये गेलो होतो. सामिष, पोटभर आणि नेहेमीपेक्षा वेगळे असे काहीतरी हवे होते.

फूड कोर्टातील Kuttu Kurri नामक स्टॉलमध्ये 65 हा प्रकार दिसला.

हळद घालून पिवळा केलेला लुसलुशीत डोसा आणि मध्ये झणझणीत मसाल्यात चिकनचे चार पीस!!

हम्म्म्म्...

का कोण जाणे, पण यात तो डोसा आणि ते चिकन ६५, दोहोंचाही सत्यानाश होईल असे वाटते.

(कदाचित डोशाऐवजी इथियोपियन इंजेरावर खपून जाईलही, कोण जाणे. पण तरीही ते काहीसे अगेन्ष्ट न्याचरल ऑर्डर जाईल, असे वाटते. बहुधा मनात पक्के बसलेले सांस्कृतिक संकेत आड येत असावेत. कदाचित इंजेर्‍याला इंजेरा (किंवा डोशाला डोसा) आणि चिकन ६५ला चिकन ६५ न म्हणता दोहोंना काही वेगळ्या नावाने संबोधून हे काँबिनेशन दिले, तर खपेलसुद्धा. पण डोशावर फक्त तो बटाट्याच्या भाजीचा लगदाच पडू शकतो, हे जे काही चित्र डोक्यात फिट्ट बसलेले आहे, ते सुखासुखी असा कशाचाही स्वीकार करू देत नाही. (तरी बरे, मी शक्यतो सादा डोसाच खातो.))

चिकन ६५ डोसा! उद्या आमरसभात म्हणाल. परवा श्रीखंडपाव. तेरवा... जाऊद्या!

डोक्यात फिट्ट

पण डोशावर फक्त तो बटाट्याच्या भाजीचा लगदाच पडू शकतो, हे जे काही चित्र डोक्यात फिट्ट बसलेले आहे, ते सुखासुखी असा कशाचाही स्वीकार करू देत नाही.

बरोबर!

याला कारणीभूत दोन जमाती - तामिळ्नाडूतील द्रावीडी चळवळीमुळे महाराष्ट्रात आलेले शुद्ध शाकाहारी तामिळी ब्राह्मण आणि ठिकठिकाणी शुद्ध शाकाहारी खानावळी उभारलेले उडपीकर शेट्टी!! (उडपीकर स्वतः मांसाहारी बर्रका!)

त्यामुळे जोवर दक्षिणेतील अन्य समाजाशी संबंध येत नाही तोवर सर्वसाधारण मराठी मंडळींना दक्षिणी म्हणजे शाकाहारी असाच समज डोक्यात फिट्ट असतो.

बाकी कोकणात डोसासदृश असलेली आंबोळी मांसाहारी पदार्थासमवेत खायची प्रथा आहेच!

आमरसभात अनेकजण खातात. मलाही

आमरसभात अनेकजण खातात. मलाही पहिला तसे करणारा भेटला तेव्हा अचंबा जाहला* होता, मग आम्हीही असे करतो सांगणारे वल्ली भेटले नि तो अचंबा हळुहळु निवला

* आदुबाळाच्या कथेचा परिणाम

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी स्वतः खाल्ला नसला तरी अंडा

मी स्वतः खाल्ला नसला तरी अंडा डोसा (पिठातच अंडे फोडून घालणे), चिकन/मटन विथ डोसा हे प्रकार तमिळनाडूत तसे बर्‍यापैकी कॉमन आहेत असे ऐकून आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

असतीलही.

असतीलही. आणि असोत बापडे. मला ती कल्पना झेपत नाही, एवढेच.

(फॉर द्याट म्याटर, चिकन डोसा एकदा - एकदाच! - खाल्ला आहे. झेपला नव्हता, एवढेच आठवते. असो.)

ता. क.:

अंडा डोसा (पिठातच अंडे फोडून घालणे)

प्यानकेक, व्याफलाच्या ब्याटरात अंडे असतेच. त्याबद्दल अडचण नाही. पण तेच अंडे डोशाच्या ब्याटरात घालण्याची कल्पना (कोठेतरी प्रचलित असली तरीही) करवत नाही.

ता. ता. क.:

केरळात चिकनामटनाबीफाबरोबर आप्पे खातात, ते चांगले लागतात. पण डोशात चिकन गुंडाळण्याची कल्पना का कोण जाणे, पण कशीशीच वाटते.

डोसा विथ चिकन म्ह. डोशात चिकन

डोसा विथ चिकन म्ह. डोशात चिकन गुंडाळणे नव्हे. ते आप्पेस्टाईल म्हणतोय. तसे असेल तर झेपेल.

बाकी डोशाच्या पिठात अंडे झेपत नाही याबद्दल सहमत.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

जंगल जिलेबी

आमच्या प्रभातफेरीच्या मार्गावर वड,पिंपळ,कडुलिंब,चिंच,बहावा,गुलमोहोर अशा अनेक वृक्षांसह चिचबिलाई उर्फ विलायती चिंचेच्या झाडांची रेलचेल आहे.या रानमेव्याला हिंदीत "जंगल जिलेबी" असे मजेशीर नांव असल्याचं नुकतंच कळलं.
जंगल जिलेबी आवडत असली तरी, आवडत्या आणि हादडता येणाऱ्या फळांमध्ये तिचा समावेश होत नाही. जांभूळ किंवा सुपारी जशी घशात अडकते आणि जीव जातो की काय असा तोठरा बसतो तसंच चिचबिलाईचे दुसरेच अर्धवर्तुळ घशाखाली उतरत नाही असा आजवरचा अनुभव आहे.बाजारात प्रथमच या रानमेव्याचं दर्शन झाल्यावर भुरळ पडून हौसेने आणला तरी तो संपवण कष्टप्रद असतं .त्यामुळे या झाडांची रेलचेल असूनही थोडासा प्रयत्न केल्यास ताजा जिलब्यांचा मोसमी खजिना आपल्याला फुकट उपलब्ध आहे हा विचार कधी मनाला शिवला नव्हता. मागच्या महिन्यात, मंगल प्रभाती एका सुफलीत वृक्षाखालून जाताना, अवचित एक बाळसेदार ,गोंडस जिलेबी टपकली. उकलून बघताच शुभ्र ,गुटगुटीत गरावर एका बाजूला गुलाबी रेषांची जाळी, मोहजाल पसरवून मला खुळावत होती. तोंडात टाकताच रसाळ,मधुर आणि दळदार गराचा स्वाद जिभेवर झिरपत गेला आणि अकल्पित आनंदाची पर्वणी जाहली.
तेंव्हापासून प्रभातफेरीतली १५/२० मिनिटं रोज झाडं पिंजून, जिलब्या हेरून काठीने किंवा हाताने तोडून तर कधी श्रीयुत जोशी जीवावर उदार होऊन कंपाउंडच्या भिंतीवर चढून काढायचे. घरी येईपर्यंत त्यातल्या अर्ध्या चिंचा दोघांनी फस्त करायच्या हा आमचा गेला महिनाभराचा जोडधंदा झाला होता.हेरलेल्या झाडापैकी दोनच झाडाच्या जिलेब्या मधुर जीवनरसाने ओतप्रोत होत्या बाकीच्यांचा गर कोरडा ,सेमी तुरट आणि अलिप्त होता.
जंगल जिलब्यांचा मौसम आता संपल्यात जमा आहे. काल आशाळभूतासारखे आम्ही झाडाकडे पहात होतो तेंव्हा एक निवांत पोपट जिलबी खात बसला होता. घ्या मेल्यांनो, म्हणून त्याने एक टपोरी जिलबी आमच्याकडे फेकली हो शप्पथ !

चिचबिलाई आणि जंगल जिलेबी ही

चिचबिलाई आणि जंगल जिलेबी ही नावं छान आहेत- माझ्यासाठी नवीन. इंग्लिश इमलीचे (असं आम्ही म्हणायचो याच चिंचेला) झाड शाळेत होतं आणि या मेव्यासाठी तिथे सगळ्यात आधी पोहोचून चिंच मिळवायची स्पर्धाच असायची. गेल्याच वीकएंडला पुण्यात कँपात याचं एक झाड चिंचांनी लगडलेलं पाहिलं.

चिंचांचा मोसम गेला म्हणता तर तुतीचे झाड हेरा- सध्या त्याचा सीझन चालू आहे.

बाय चान्स तू हुजूरपागेत होतीस

बाय चान्स तू हुजूरपागेत होतीस का? मी होते. हुजूरपागेत विलायती चिंचेचे झाड होते.

मस्त . खूप दिवस झाले विलायती

मस्त . खूप दिवस झाले विलायती चिंच खाऊन . गुलाबी रंगाची चिंच असेल तर तोठरा बसत नाही असा अनुभव . तेच पांढरी ,पोपटी रंगाची चिंच असेल तर हमखास घश्याखाली उतरत नाही .
जंगल जिलेबी नाव खूप आवडलं.

गुलमोहर

घराजवळच गुलमोहोराचे झाड होते. उन्हाळ्यात नुसते लालभडक दिसे. त्याची फुलेही मोठी चवदार असत, किंचित आंबट-तुरट चव अद्याप जीभेवर आहे.

रायआवळे तर शेकड्यानी खाल्लेत.

दीडेक वर्षांपूर्वी काश्मीर

दीडेक वर्षांपूर्वी काश्मीर प्रांती गेलो असता श्रीनगराहून केशर आणले होते. ते वापरून घरी मातु:श्रींनी श्रीखंड बनवले. चक्काही घरचाच होता. अप्रतिम चव. वासही घमघमत होता.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मस्त

वा! छान!!

घरी केलेले श्रीखंड खाण्याचे दिवस बालपणासोबतच संपले. तूर्तास ते काम आम्ही चितळे/वारणा/अमूल यांना औट्सोर्स केलेले आहे!!

जमल्यास कधी मिरजेच्या विटा

(स्माईल)

जमल्यास कधी मिरजेच्या विटा डेअरीचे श्रीखंड अथवा बासुंदी खाणेचे करावे ही विनंती.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

हनुमान यळगूडविषयी काय मत?

हनुमान यळगूडविषयी काय मत?

यळगूड, नावातच काय गोडवा

यळगूड, नावातच काय गोडवा आहे...
एकदा सांगली/मिरजला खास खाण्यासाठी भ्रमंती करावी म्हणतो (स्माईल)

कुठे मिळतं हे ?

कुठे मिळतं हे ?

जनरली द.प.महाराष्ट्रातल्या

जनरली द.प.महाराष्ट्रातल्या मुख्य बसस्टँडांवर नक्कीच.

पण आमचं सगळं जुनं. जुनी माहिती, जुन्या आठवणी. आऊटडेटेड झालं असू शकेल.

शेवटचं यळगूड दूध कोल्ड्रिंक कोल्लापूर स्टँड एण्ट्रन्सजवळच्या सुप्रसिद्ध छोट्या लाकडी पोष्टॉफिससदृश खिडकीतून दहा वर्षांपूर्वी प्यायलं.

यळगूडवाल्यांचे श्रीखंड वा

यळगूडवाल्यांचे श्रीखंड वा बासुंदी कधी खाण्यात आलेले नाही. परंतु त्यांचे ते 'दूध कोल्ड्रिंक' आणि ती घनाकृती, टॉपला केशरी रंग असलेली बिस्किटे लैच जबराट.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

घनाकृती नानकटाईइतकीच किंवा

घनाकृती नानकटाईइतकीच किंवा अनेकपट जास्त त्यांची बासुंदी.

दूध तर फेमस आहेच सर्व स्टँडांवर.

धन्यवाद, अता हे पाहणे आले.

धन्यवाद, अता हे पाहणे आले.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

तो घटाघटा तोंडाला लावून

तो घटाघटा तोंडाला लावून पिणारा मारुती लैच टेम्प्टिंग आहे. अगदी बालपणापासून.

+११११११११११११११११११११११११११११

+११११११११११११११११११११११११११११११११११११११११

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

ही पहा ती घनाकृती वरिजनल

A

ही पहा ती घनाकृती वरिजनल नानकटाई.

http://www.yalgud.com/

आता पॅकिंग लुक मॉडर्न झालाय. जुन्या बेसिक एका रंगातला लोगो आणि पिशवीत पॅक केलेली बासुंदी हा नॉस्टॅल्जियाचा विषय आहे.

ए हे मी आत्त्ताच्या

ए हे मी आत्त्ताच्या सांगली-मिरज वारीत खाल्लंय (स्माईल)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अहाहाहाहाहाहाहाहा........ लहा

अहाहाहाहाहाहाहाहा........

लहानपणी उरलेली नानकटाई अगोदर खाऊन मग ते केशरी खात असे. दोज़ वेअर द डेज़ मॅन.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.