उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? -११

काल वाढदिवसाच्या निमित्ताने बाहेर जेवायला जाण्याची आणखी एकदा संधी मिळाली.आधीच्या सदरात सांगितल्याप्रमाणे हॉटेल सोनाई तर फ्यामिली बरोबर जेवायला जाण्यासाठी खूप छान ठिकाण आहे. परंतु त्याचबरोबर पुणे सोलापूर हायवेला असणारा कांचन ढाबा हि एक उत्कृष्ट पर्याय आहे.नैसर्गिक व्हुव्ह आणि काहीस अस्सल गावठी पद्धतीच्या शाकाहारी जेवणासाठी हा एक खूप छान ढाबा आहे.दुपारच्या जेवणासाठी स्पेशली भाकरी पिठलं, मसाला ताक आणि त्याचबरोबर गावाच्या जेवणाची आठवण करून देणारे इतर पदार्थ त्याचबरोबर मोहरीच्या डाळ घालून केलेले व मटक्यात घातलेले कैरीचे लोणचे यामुळे जेवणाला एक वेगळीच लज्जत येते.त्याच प्रमाणे एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण बर्याचशा हॉटेलच किचन पाहिलं तर तिथे जेवाण्याचीही इच्छा होत नाही परंतु इथे किचन च्या आणि खाद्य पदार्थ बनविताना स्वच्छतेची घेतलेली दखल अतिशय वाखाणण्याजोगी आहे.म्हणूनच हॉटेल सोनाई प्रमाणे कांचन ढाबा हि स्वच्छ आणि चवदार जेवणाचा एक उत्कृष्ट पर्याय आहे

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

खुप खुप शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन दिवसापूर्वी प्रतापगड (उ.प्र.) मधून शिंगाड्याचे लोणचे आणि कैरीचे एकदम हटके असे -अशा दोन बरण्या पोहच आल्या आहेत. त्यापैकी शिंगाड्याचे लोणचे पहिल्यांदाच खाल्ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डायमंड बेकरी फातिमानगर यांचे मिल्क कुकीज़ उत्तम आहेत.

मेनलँड चायना येथील भेटकी मासाही उत्तमच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आत्ताच थोड्या वेळापूर्वी (ईष्टर्न डेलाइट सेव्हिंग टाइमानुसार दुपारच्या सव्वादोन-अडिचाच्या सुमारास) स्लो कूकरमध्ये निहारी बनवायला टाकलेली आहे.

निहारीसाठी 'न्याशनल'(पाकिस्तानी ब्र्याण्ड)चा 'दिल्ली निहारी' मसाला वापरला आहे. निहारीसाठीचे गोमांस या खेपेस नजीकच्या गुजराती मुसलमानाच्या किराणा-दुकान-कम-मांसविक्रीकेंद्रातून आणले आहे. (एरवी इतरही स्रोतांकडून आणतो.) मसालाही तेथूनच आणला आहे.

आज रात्री खाण्याचा इरादा आहे.

वस्तुतः, या माहितीचा कोणाही त्रयस्थास काडीमात्र उपयोग असण्याच्या शक्यतेची अपेक्षा नाही, परंतु तरीही, जनरीतीस अनुसरून हा प्रतिसाद जनहितार्थ जारी करण्यात आलेला आहे. तरी किमानपक्षी 'माहितीपूर्ण' या श्रेणीची अपेक्षा एवं आकांक्षा आहे. (याउपर, 'भडकाऊ' श्रेणी मिळाल्यास ती मायबाप वाचकांची कृपा!)

..........

यास 'खाटीकखाना' असा शब्दप्रयोग कदाचित उचित ठरणार नाही. कारण, दुकानात प्राण्यांची१अ कत्तल तर सोडाच, पण मांसाची हाताळणी अथवा प्याकिंगदेखील बहुधा फारसे होत नसावे; केवळ अन्यत्रहून प्याक होऊन आलेले मांस फ्रीझरमध्ये ठेवून विकले जाताना पाहिलेले आहे. (चूभूद्याघ्या.) सबब, 'मांसविक्रीकेंद्र'च ठीक.

१अ दुकानी गायीप्रमाणेच बकरी तथा कोंबडीचे मांसही विक्रीस असल्याचे पाहिलेले आहे.

यातील 'मायबाप'चा अर्थ कोणी 'पशू' असा घेतल्यास त्याबद्दल आम्हांस कोणताही प्रत्यवाय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खा, वीकांती गोमांस खा, मत्स्यमांस खा!

तदुपरि-

"यातील 'मायबाप'चा अर्थ कोणी 'पशू' असा घेतल्यास त्याबद्दल आम्हांस कोणताही प्रत्यवाय नाही."

'उपयुक्त' टाकावयाचे राहिले काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

टाकल्यास 'माहितीपूर्ण' श्रेणी देण्यात यील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..धमकी देताय का त्यांना? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाहू किती 'उपयुक्त' ठरतेय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो न टाकल्यास "भडकाऊ" देणार नाही असं 'न'कारात्मक सांगायला हवं होतंत असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणता कट घेतलात ? स्लो कूकरमधे करताना पाकीटावरच्या कृतीत काही बदल केलेत का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणता कट घेतलात ?

मी शक्यतो शांक घेतो. स्वस्त, मस्त आणि मीटाळ! (पण ऐट द सेम टैम विथ अ हाडूक आणि म्यारो इन बिटवीन.)

हम्मा शांक

(चित्र जालावरून साभार.)

स्लो कूकरमधे करताना पाकीटावरच्या कृतीत काही बदल केलेत का ?

आता नक्की आठवत नाही, पण बहुधा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल कोरेगाव पार्कात शिशा मध्ये झेरेश पोलो नावाचा भात खाल्ला. भात, चिकन आणि कुठल्यातरी बेरीज. अप्रतीम होता. अजिबात मसालेदार नाही. तरी चविष्ट होता. थोडं तेल जास्तं होतं पण चव लैच भारी. जोडीला शिकंजबीन नावाचं पेय. (ज्याचा जंतूंनी कधीतरी इथेच उल्लेख केला होता) तेही छान.


हे चित्र जालावरून घेतलय पण असाच दिसत होता

एकंदर जागा फारच सुंदर. भरपूर झाडं. काही जुनी संगमरवरी टेबलं. त्यात काल एकदम ढगाळ हवा होती त्यामुळे अजूनच भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ते शिशा म्हणजे इकडं वेस्टिन हॉटेलला लागून एबीसी फार्म्स नामक लेबलाखाली चारपाच हॉटेल्स एकत्र आहेत त्यापैकीच काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय. तेच ते. मदिरा आणि हुक्का यांची सोय देखील आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हम्म ओक्के. मी एकदोनदा गेलो होतो, पण साला तिथले ऑथेंटिक इराणी ऑप्शन्स कमीच अव्हेलेबल आहेत राव. चव अर्थातच आवडली हेवेसांनल-यद्यपि तो ज़ेरेश्क पोलो नै खाल्ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> काल कोरेगाव पार्कात शिशा मध्ये झेरेश पोलो नावाचा भात खाल्ला. [...] जोडीला शिकंजबीन नावाचं पेय. <<

हे दोन्ही पदार्थ पूर्वी 'कॅफे सनराइज'मध्ये मिळत. सनराइजच्या मालकानंच 'शीशा' चालू केलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओह... आठवल. तुम्हीच हे सांगितलेलं एका धाग्यावर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कुठल्यातरी बेरीज
........त्यांना बा/बर्बेरीज़् म्हणतात. डाळिंबाच्या दाण्यांचाही मुबलक वापर असतो.
--
<झैरात सुरू>
फोटो पाहून जवळपास वर्षभरापूर्वी एका मैत्रिणीच्या आईला पर्शियन मेजवानी म्हणून घरीच शिरीन पोलो (गोडसर बिर्याणी) नि त्यासोबत पर्शियन पद्धतीचे चिकन असा बेत केला होता त्याची आठवण येऊन तोंडाला पाणी सुटले. संस्थेतल्याच एका इरानी बाईंकडून त्यांच्या घरातले परंपरागत चालत आलेले नि वापरून जीर्ण झालेले 'अन्नपूर्णा' आणले नि त्यात पाहून सगळी पद्धत अवलंबली. करायला नी खायला जाम मज्जा आली होती.

शिरीन पोलो.......................................................................................... सोबत बिर्याणीच्या खरपुड्याही वाढतात.

वाढलेले जेवण.......................................................................................बक़्लावा (गोड पदार्थ; हा विकतचा)

<झैरात समाप्त>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरी! हा बकलावा देखील मेनूवर होता. राहिला खायचा.
बाकी पोलो/पुलाव हा शब्द द्रविडी ओरिजीनचा आहे असं विकी म्हणतं.
https://en.wikipedia.org/wiki/Pilaf#Etymology

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

वा अमूक अप्रतिम.
बक्लावा होता शिशा मधे हे ऐकून आनंद झाला. बक्लावा साठी आणि अर्थात पोलो साठी नक्कीच शिशा ला जाणे आलेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो बकलावा नेहमीच उत्कृष्ट चवीचा असतोच असं नाही. मध्यपूर्वेत बकलावे समोर आल्यावर अगदी त्यांच्याच प्रदेशात ते खातोय म्हणजे जबरदस्त टेस्टी असणार असं समजून ट्राय केले. पण त्याची चव त्यातल्या पुरणाच्या प्रकारावर अवलंबून असते. त्याची रेंज व्यक्तिनुसार बकला"वाह!!" पासून बक(ला)वास!!" पर्यंत मोठी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे बापरे, म्हणजे रिस्क आहेच. पण तरीही एकदा रिस्क घ्यायला हरकत नसावी Wink
काही वर्षांपुर्वी टीव्ही वर बकलावा ची पाहिलेली रेसीपी आणि मिपा वर देखील सानिका ने दिलेली अप्रतिम पाकृ तेव्हा पासून अतोनात सुप्त इच्छा आहे तो पदार्थ चाखायची. एक-दोन वेळा रेस्टॉरंट मधे गेल्यावर मेनू वर तो पदार्थ दिसलाही पण प्रत्येकवेळी 'बकलावा नाही' हेच उत्तर मिळालं. कदाचित भारतात तो अजून इतका खाल्ला जात नसावा किंवा परिचित नसावा त्यामुळे मेनुवर असूनही उपलब्ध नसावा.

तिरामिसू बद्दल तुम्ही म्हणता तसाच अनुभव आला होता पहिल्यांदा एका इटालियन रेस्टॉरंट मधे खाल्ल्यावर. तरीही दुसर्‍यावेळी वेगळ्या ठिकाणी ट्राय केला आणि आवडला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सानिकाच्या रेसीपीची लिंक मिळेल का? मला Mrunalini www.misalpav.com/node/19786 आणि दिपाली पाटील http://www.misalpav.com/node/8376 यांचे धागे सापडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह सॉरी... मला मृणालिनी च म्हणायचं होतं खरं तर... सानिका आणि मृणालिनी दोघींची प्रेझेंटेशन स्टाईल सारखी असल्याने जरा गोंधळ झाला.
धन्यवाद टिंकू चूक लक्षात आणून दिल्याबद्दल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बकलावा म्हणजे एग्जॅक्टली बोले तो नारळाच्या करंजीचे किंवा तत्सम विविधतापूर्ण सारण भरलेला पाकातला चिरोटा. इफ यू हॅव्ह ईटन अ गुड चिरोटा देन यू डोन्ट नीड टु मिस बकलावा मच. मिरजेच्या आपटे यांचे चिरोटे खाल्ले आहेत का? मुं-पु एक्सप्रेसवेवर दत्त स्नॅक्सच्या आतल्या दुकानात बॉक्स मिळतात. उत्कृष्ट चिरोटे इन उत्कृष्ट प्याकिंग. ठाण्यात तर मिळतातच, म्हणजे पुण्यातही असतील.

(आणि चिरोटा म्हणजे पुलंच्या मते बिघडलेल्या खारीबिस्किटाच्या साच्यात तूपसाखर पेरुन एका हुशार गृहिणीने केलेली बनवाबनवी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो खरं तर बर्‍यापैकी तशीच असणार चव. आपण चिरोटे बनवताना जास्तीत जास्त पुड्या पाडतो तश्या त्यांच्या रेडिमेड पेश्ट्री-शीटस असतात आणि पाक दोन्ही मधे असतोच...अर्थात बकलावा मधे सुक्या मेव्याचं स्टफींग असतं त्यातल्या त्यात पिस्त्यांचं प्रमाण जास्त.

चिरोटे आवडतात पण तुम्ही म्हणता ते अपट्यांचे चिरोटे नाही खाल्ले कधी. धन्यवाद, नक्की शोधतो पुण्यात नी खातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चे तोर नाज़ माशाल्लाह!!!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अमुकराव, पुन्हा एकदा ब-हश्त-अंग सालॉम!!! _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

परवा पिस्ता Gelato (Italian word for ice cream) खाल्ले. अतोनात आवडले. खरं तर कावरेची सर नव्हती पण इथे मिळणारे बेस्ट पिस्ता आइस्क्रीम होते. कावरेचे मँगो आइसक्रीम मिस करते आहे. एकदम सुपर्ब चव , रंग अन टेक्श्चर तर असतेच पण ते साधंसं एका स्कुपमध्ये येतं तेवढच अन तस्सच आवडतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बंगलोरच्या इंदिरानगर परिसरातल्या 'कॉर्नर हाऊस' मधे 'लीची विथ क्रीम अँड आईसक्रीम' खाल्लं. अतिशय अप्रतिम चव. कुठल्याही इसेन्सच्या वापराशिवाय असलेला, रसाळ लिचीज भरपूर घातलेला हा प्रकार is a must have.

तिथलंच ब्रिकलेन नावाचं रूफटॉप लाऊंजपण मस्त आहे. एस्पेशली तिथला एंबियन्स. आणि चकाचकपणाच्या मानानी किंमतही वाजवी वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! मला कल्पना येते आहे किती मस्त असेल त्याची. लिचीच इतकी छान लागते. आइसक्रीम तर मस्तच असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.mid-day.com/articles/food-10-lipsmacking-dishes-served-in-qui...

पैकी काय काय खायला आवडेल?

मला नूडलमध्ये गुंडाळलेला पालक खाऊन बघायची इच्छा आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पान कुल्फी (गुलकंद वगळून). आणि मेबी पावभाजी फॉंद्यू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बहुदा ठाण्याच्या टेम्प्टेशनमध्ये ही कुल्फी (का आईस्क्रिम - नक्की विसरलो) गेले दशकभर तरी मिळते असे आठवतेय. आम्ही कॉलेजात असताना याचा आणि 'मिरची" आईस्क्रीमचा फारच बोल्बाला (झाला) होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राममारुती रोडवरील टेम्टेशनमध्ये अनेक स्वादांचे (पान आणि मिरचीसकट) आईस्क्रिम गेली अनेक वर्षे मिळते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला 'आग्नेयेच्या सॉसासह' Wink असलेले अंड्याचे सँडविच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बहुत धन्यवाद! मस्त दिसताहेत डिशेस!

मला एकदा १२०-३०० कुल्फी बनवून पहायची आहे. कुल्फीचा थंड गोडवा आणि जर्द्याचा जिभेवर मुंग्या आणणारा फ्लेवर कहर करेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

छान आहेत फोटो. मला डिस्को इडली हव्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाणेर-पाषाण रस्त्यावर बादशाहीची नविन शाखा नुकतीच सुरु झाली. मागच्या विकांताला उत्सूकतेने भेट दिली पण निराशा झाली. जेवण ठिकच होतं, सर्विस अत्यंत कंटाळवाणी. (तिथे पुर्वी ऑफबीट रेस्टो कॅफे होतं त्याच वेटर्सना इथे ठेवलंय आणि त्यांना थाळी वाढण्याचा अजिबात अनुभव नसल्याने वैताग नी राग येण्यापेक्षा त्यांची धांदल पाहून किवच येत होती).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बादशाहीची नविन शाखा

संपलं तर अखेरीस सगळं. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिसळवाल्या बेडेकरांनीही हे पातक केलेलं काही वर्षांपूर्वी. वेळीच आवरता घेतला तो वेडेपणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

म्हणजे अता ते एफ.सी. रोडवर बेडेकर नाही का? समहाऊ बेडेकर मिसळ मला कधी आवडलीच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी सगळे सोडून सोडा. कोरेगाव पार्कात फ्रेंच विंडो नामक प्याटिसेरी आणि स्क्विसितो नामक इटालियन रेस्त्राँ इथे जाऊन पहाच.

पिझ्झा खावा तर स्क्विसितोमध्ये. थिन क्रस्ट आणि टॉपिंग्स मस्त असलेला उत्तम पिझ्झा. तोड नाही. लसान्या, पास्ता, एन्चिलादा वगैरे पदार्थही सुंदर.

आणि गोड पेस्ट्री खावी तर फ्रेंच विंडोमध्ये. गोड परंतु अतिगोड नाही. केळे घातलेली पेस्ट्री एरवी मला खाववली नसती परंतु तिथे खाल्ल्यावर एकदम आवडली. बनवणारा एकदम एक्स्पर्ट असावा. मालक बहुतेक पारशी असेल, दिसतो कुणी गोर्‍यांपैकीच परंतु अस्खलित मराठीही बोलतो. सर्व्हिस आणि पदार्थ दोन्ही टॉपक्लास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फार ऐकलंय ह्या फ्रेंच विंडो बद्दल, जायलाच हवं एकदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लोकांचा डबा परत देताना तो रिकामा देऊ नये या आशियाई संस्कृतीचे आभार.

आमच्या इरानी मैत्रिणीने सांबार भरून नेलेला डबा परत देताना त्यात ताहचिन नामक भाताचा प्रकार दिला. आम्ही (यूसलेस) घासफूस असल्याचं माहीत असल्यामुळे कोंबडीला विश्रांती दिली होती. केशरी भाताचे दोन थर, त्यात मध्ये किंचित आंबटसर दही, भातात संत्र्याच्या सालींचा कीस आणि पिस्त्याचे छोटे तुकडे आणि या सगळ्याची माफक आकाराची मूद असा तो प्रकार होता. या सगळ्या पाकृत मला किंचित गोड आवडलं असतं, म्हणून अगदी चिमटीभर साखर एका मुदेवर पसरून, मायक्रोवेव्हमध्ये किंचित गरम करून खाल्ला. उष्णतेमुळे तेवढीशी साखर भातात विरघळली आणि सुरेख चव आली. करून बघितला पाहिजे कधीतरी.

प्रतिमा जालावरून.
ताहचिन ताचिन

सध्या मैत्रिणीचा डबा माझ्याकडे आहे. तिला काय देऊ? अळूची भाजी दिली असती, पण अजून अळू उगवायला आणि पुरेसा वाढायला थोडा वेळ लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ताहचिनचा सौम्य, अंडं-केशर-बेरीयुक्त स्वाद छानच असतो. येथील एका स्थानिक हाटिलात, दर सोमवारी हे 'डेली स्पेशल' म्हणून मिळतं:
(सोबत खरपुडी 'ताहडिग'ही बेश्ट)

IMAG0989

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ताटाच्या पलिकडे तुर्की कॉफी काय?

विकेण्डला याच इरानी कुटुंबात जेवणाचं आमंत्रण होतं. तेव्हा तुर्की कॉफी चाखता आली. मला फार आवडली नाही; माझ्या कपात फार गाळ आला होता. पण ते कॉफीचं पात्र, चिंटू कप-बशा हा सगळा सेटप आवडला. वर 'तुर्की लोकांना वाटतं ते पितात तीच खरी कॉफी!' मी मराठी लोकांच्या जायफळ, वेलची, साखरपाकयुक्त कॉफीबद्दलही माहिती दिली. अशी सांस्कृतिक देवाणघेवाणही झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ताटाच्या पलिकडे तुर्की कॉफी काय?

नै, इराणी चहा. हाही काही वेळा, वेलदोडेयुक्त असू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> मी मराठी लोकांच्या जायफळ, वेलची, साखरपाकयुक्त कॉफीबद्दलही माहिती दिली. <<

कॉफीमध्ये वेलची, दालचिनी वगैरे मसाल्याचे पदार्थ घालण्याची परंपरा मध्यपूर्वेतूनच आपल्याकडे आली असण्याची दाट शक्यता आहे. Arabic coffee ह्या विकीपानावरून उद्धृत -

Coffee originates from the Arabian peninsula. In the coffee, Cardamom is often added

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

फोटो बघुन वाटलं सांबाराचा डबा न धुता त्यातच भात घातला की काय? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इथे पर्शिया ,स्पेन , इटलीच्या खाली कोणी बोलत नाहीये(मिरजेच्या आपटेंच्या चिरोटयाचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद. मी मिरजेचाच). त्यामानाने मी गेल्या काही दिवसांत ट्राय केलेले आयटम तसे साधेच आहेत पण जाम आवडले आपल्याला.
१] मुंबईत BSE च्या बाजूला परमेशा नामक दुकानात छान सॅंडविच मिळतात. ते खाल्ले. बरेच प्रसिद्ध आहेत आसपासच्या भागात. खासकरून त्याचं चीज-गार्लिक सॅंडविच.
२] मुंबईतच फ्लोरा फौंटन समोर सिटीओ वडापाव. उत्कृष्ट.
३] मुंबईतील सर्वात जुन्या इराणी कॅफेपैकी एक 'याझदानी बेकरी फोर्ट' येथील मावा केक आणि बन मस्का चाय.
४] सांगलीमध्ये अनुराधा नावाचे हॉटेल आहे तिथले मटण (सुकं) आणि पांढरा रस्सा. सांगलीतल्याच चांदणी भोजनालय येथील तांबडा रस्सा आणि मटण. सांगली-मिरज रोडवर क्रांती भोजनालय आहे तिथलं मटण ताट.
५] इचलकरंजी येथे बुगड गल्ली नामक एक गल्ली आहे (जी गांधी कॅम्प नावानेदेखील ओळखली जाते). तिथे अस्सल घरगुती पद्धतीची मांसाहारी भोजनालये आहेत. घरी गेल्यावर सतरंजीवर बैठक असते. अगदी अंगत-पंगत स्टाईलने जेवण. भाकरी , कांदा-लिंबू , मटण आणि तांबडा रस्सा. अहाहा. तृप्त होतो आत्मा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुराधामध्ये जेवलोय, मस्त मजा आली. क्रांती आणि चांदणी इथे गेलो नाही. नक्की कुठेशीक आहेत ही दोन्ही?

(मिरजकर) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

क्रांती भोजनालय - मिरजेकडून सांगलीकडे जाताना कृपामयी ते वालचंदच्या रस्त्यावरील २-३ किमी च्या पट्ट्यात डाव्या बाजूला.

चांदणी भोजनालय - सांगलीत माळी थियेटर जवळ चांदणी चौक येथे कुठेही विचारले तरी सांगतील.

टीप- चांदणीमध्ये जाताना सायंकाळी ८ ते ८.३० च्या सुमारास जावे. साधारणपणे ८.४५ पर्यंत मटण संपते. ८ च्या ठोक्यास जाऊन ठाण मांडून बसणे उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक धन्यवाद! इथे जाऊन पाहतो.

बाकी हॉटेलपैकी म्हटले तर विश्रामबागेत वालचंदच्या लायनीत जरा पुढे ते खानसामा हॉटेलही चांगलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मिरजेहून दंडोबाकडे निघाल्यावर थोड्याच अंतरावर एक ढाबा होता तिथे रात्री जेवायला मुद्दाम ठरवून गेल्याचं आणि चिकनमटण ओरपल्याचं खूपदा घडलंय. पण निश्चित नाव विसरलो. आता आठवत बसतो.

खूप खूप पूर्वी सांगलीला तमाशा थेटरसमोर पत्र्याचं छत असलेली शुद्ध मांसाहारी खानावळ होती. तीही आता शिल्लक नसावी बहुधा.

तसाच पनवेलपुढे कर्नाळ्याच्या दिशेत क्रांतिवीर ढाबा (काय नाव आहे!!!)

सावंतवाडीच्या साधले मेसला पुन्हा एकदा नुकतीच भेट दिली. गरमागरम साधं शाकाहारी पण खूप समाधानकारक जेवून आलो.

गोव्याचा मार्टिन्स कॉर्नर दर्जा / चव यांबाबत १००% वरुन ४०% वर घसरलाय. वाईट वाटलं. परत जाणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सावंतवाडीतच भालेकरांकडे मासे खाल्लेले दोन वर्षांपूर्वी. छान अनुभव होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सावंतवाडीचा उल्लेख आला म्हणून राहावलं नाही.. भालेकर, साधले Smile

गावात चंदू भुवन मधला भाजीपाव ( काळ्या वाटण्याची उसळ+बटाट्याची भाजी आणि पाव)
आणि सावंतवाडीत नव्हे पण जवळच, बांद्याच्या जरापुढे गोवा हायवेवर सावली नावाचं हॉटेल आहे (त्याच्या जरापुढे भालेकराची पण एक शाखा आहे)
तिथे रस-घावन, उसळ-घावन (घावने म्हणतात तिथे) .. मँगलोरच्या नीरु डोश्याप्रमाणे थोडसं.. निव्वळ अप्रतिम.
आणि घरी उसळ/मिसळपावाचा बेत असेल तर.. मासळी बाजाराजवळ बेकरीत मिळणारे पाव (वरुन कडक आणि आत एकदम मउ).. असे पाव जगात कुठे मिळत नाहीत Smile
बाळकृष्ण कोल्ड्रींक्समधे फुल-कॉकटेल.. अजुनही क्वांटिटी पहाता प्रचंड स्वस्त आणि मस्त..

(सावंतवाडीकर खवय्या) बाळ सप्रे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(वरुन कडक आणि आत एकदम मउ).. असे पाव जगात कुठे मिळत नाहीत

हो.. फ्रेंच बागेतशी अत्यंत साम्य.

..

सावंतवाडीला मधल्या तलावामुळे आणि काही जुन्या इमारतींमुळे स्वतःची पर्सनॅलिटी आहे. भालेकर खानावळीचं बाह्यरुप पाहता ती अगदीच पत्र्याने झाकलेली शेड वाटते. त्यामुळे बाहेरगावचे अनेक कारवाले वाटसरु (ज्यांना माहीत नाही ते) सहकुटुंब आत जात नाहीत. साधलेमधे बूटचपला बाहेर ठेवून आत जावं लागतं. जेवणाचा मेनू जवळजवळ फिक्स असला तरी गरमागरम पोळ्या आणि फडफडीत नसलेला घरगुती प्रकारचा भात, साधीच उसळ आमटी वगैरे आणि कधीकधी अळूची पातळभाजी किंवा तत्सम काहीतरी.. हे सर्व सात्विक की काय म्हणतात तसा आनंद देतं. आणि वरुन त्यांची ती सोलकढी म्हणजे ब्लेसिंग आहे.

बहुतांश वेळेला गोव्याच्या ट्रिपहून परतताना गोव्यातल्या अभक्ष्यभक्षण आणि अपेयपानाच्या मार्‍यानंतर हे ठिकाण एकदम आनंददायक बदल म्हणून छान वाटतं.

ते सावली म्हणताय ते म्हणजे चेकपोस्टपासून थोड्याच अंतरावर रस्त्याला अगदी लागून पण दहाबारा पायर्‍या चढून वर असं आहे का? घावणे चटणी अशी पाटी नेहमी लागलेली असते तिथे. आणि नेहमी पुढे निघून गेल्यावर लक्षात येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो तेच ते चेकपोस्टजवळचं .. १०-१२ पायर्‍या चढून वर... सावली..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मासळी बाजाराजवळ बेकरीत मिळणारे पाव (वरुन कडक आणि आत एकदम मउ)

असाच कडक पाव आणि उसळचा मस्त नाश्ता गोव्यात कुठेशी मिळतो असं मित्राकडून ऐकलंय. एकदम प्रसिद्ध आहे. नाव पण सांगितलेलं पण आठवत नाहीये. काही कल्पना आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोव्यात त्याला उंडे म्हणतात.. बर्‍याच ठीकाणी मिळतात तसे पाव नाष्त्याला.. पणजीत कॅफे रीअल ( आझाद मैदानाजवळ)..

पण वाडितले पाव एकदम खासच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गावात चंदू भुवन मधला भाजीपाव ( काळ्या वाटण्याची उसळ+बटाट्याची भाजी आणि पाव)

हे कुठे आलं नेमकं? सालईवाडा/बाजाराजवळ का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाजारात मेन रोडवरच आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो दंडोबाकडचा सनी किंवा नशेमन ढाबा असावा. पंढरपूर रोडवरच्या पुलानंतर राम मंदिर येते त्याच्या जरासाच पुढे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तसाच पनवेलपुढे कर्नाळ्याच्या दिशेत क्रांतिवीर ढाबा (काय नाव आहे!!!)

अहो, तो ढाबा ज्या गावात आहे त्या गावाचे नाव आहे शिरढोण!!

आता आले लक्षात ढाब्याचे नाव असे का ते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वासुदेव बळवंतांचं गाव?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्रमांक ४ बद्दल अनेक आभार! Smile तिथे लवकरच जाणे होणार आहे तेव्हा आस्वाद घ्यायचा प्रयत्न करण्यात येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नक्कीच. सर्वप्रथम अनुराधाचा दौरा करावा. दोन शाखा आहेत.

१] त्रिकोणी बागेजवळ
२] विश्रामबाग चौकात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओक्के

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत.
मला चांगलं सुकं मटण अजूनतरी खायला मिळालं नाहीये त्यामूळे इथे जाण्याचा विचार माझा पण आहे (ऋ खास खायला जाणार असशिल तर सांग Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बुगड गल्ली... व्वा काय नाव आहे!
बादवे @ १, फार पुर्वी वाशीत जाणे व्हायचे तेव्हा आवर्जून 'गुप्ता' चे सँडवीच खाणे व्हायचे. फार अप्रतिम असायचे त्यांचे रोस्टेड्/ग्रील्ड सँडविचेस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे पर्शिया ,स्पेन , इटलीच्या खाली कोणी बोलत नाहीये (मिरजेच्या आपटेंच्या चिरोटयाचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद. मी मिरजेचाच).

बघणाऱ्यांचा दृष्टिकोनावर अवलंबून आहे. किंवा दाखवणाऱ्यांच्याही. 'आम्ही परदेशात राहतो' याची ही जाहिरात असू शकते. मनात 'इथेही कोपऱ्या-कोपऱ्यांवर उडपी आणि इराणी असते तर किती बरं झालं असतं' असं सुरू असतं.

कॉफीमध्ये वेलची, दालचिनी वगैरे मसाल्याचे पदार्थ घालण्याची परंपरा मध्यपूर्वेतूनच आपल्याकडे आली असण्याची दाट शक्यता आहे.

हे आले लगेच परप्रकाशित विचारजंत, सगळं कसं बाहेरूनच भारतात आलंय सांगत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आजानुकर्ण ऊर्फ अतिशहाणा ह्यांची वीकेंडला भेट झाली.
चिंचवडातल्या मोरया गोसावी देवस्थानच्या समोरच एक बारकं दोन-चार टेबलांचं हाटेल आहे.
चिंतामणी नावाचं. तिथल्या मावशींकडून थालीपीठ घेतलं.
ऑर्डर दिलयनंतर त्या पीठ मळण्यापासून सुरुवात करतात.
वेळ लागतो; पण गरम - ताजं छान मिळतं.
अतिशहाण्यालाही आवडल्याचं तो म्हणाला.
अतिशहाण्याने घरी जाउन मुद्दाम भारीवाले चॉकलेट्स आणले.
थालीपीठाचे पैसेही त्यानेच दिले.
(चॉकलेट्स नेहमीचे "कॅडबरीज् सेलिब्रेशन्स"वाले नव्हते. हल्ली तेच ते खाउन कंटाळलोय.
हे वेगळे होते खूपच. एकदम भारीवाले.)
ह्या मावशींचं थालीपीठ हे माझ्या घरचं धपाटं, आणि माझ्या घरी बनणारं थालीपीठ ह्यांचय अधला मधाला प्रकार होता.
बर्‍यापैकी मऊसर होता; खायला अडाचण नाही.
(एरव्ही थालीपीठ जास्त चावून खायला लागत असल्याने मला आवडत नाही.)
.
.
मागच्या वीकेंडला गब्बरची भेट झाली.
त्याने भरपूर दारु ढोसली.
मी बकाबका खारीमुरीवाले शेंगदाणे संपवले.
धनदांडाग्यांना शेंगदाने खायचे असतील तर फडतूसांनी शिल्लक ठेवले तर तयंना ते मिळतील;
हा संदेश मी देउ इच्छित होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक दिली आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरारारा...गब्बर दारू बरोबर शेंगदाणेच खातो का? मला वाटलं खारे काजू खात असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मनोबाचं 'बकाबका' शेंगदाणे खाणं पाहून गब्बर ने खारे-काजूंचा बेत रद्द केला असावा Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद सुधारित करणयपूर्वी उपप्रतिसाद आले.
.
.
********सुधारित आवृत्ती **********
आजानुकर्ण ऊर्फ अतिशहाणा ह्यांची वीकेंडला भेट झाली.
चिंचवडातल्या मोरया गोसावी देवस्थानच्या समोरच एक बारकं दोन-चार टेबलांचं हाटेल आहे.
चिंतामणी नावाचं. तिथल्या मावशींकडून थालीपीठ घेतलं.
ऑर्डर दिलयनंतर त्या पीठ मळण्यापासून सुरुवात करतात.
वेळ लागतो; पण गरम - ताजं छान मिळतं.
अतिशहाण्यालाही आवडल्याचं तो म्हणाला.
अतिशहाण्याने घरी जाउन मुद्दाम भारीवाले चॉकलेट्स आणले.
थालीपीठाचे पैसेही त्यानेच दिले.
(चॉकलेट्स नेहमीचे "कॅडबरीज् सेलिब्रेशन्स"वाले नव्हते. हल्ली तेच ते खाउन कंटाळलोय.
हे वेगळे होते खूपच. एकदम भारीवाले.)
ह्या मावशींचं थालीपीठ हे माझ्या घरचं धपाटं, आणि माझ्या घरी बनणारं थालीपीठ ह्यांच्या अधला मधला प्रकार होता.
बर्‍यापैकी मऊसर होता; खायला अडाचण नाही.
(एरव्ही थालीपीठ जास्त चावून खायला लागत असल्याने मला आवडत नाही.)
.
.
मागच्या आठवड्यात गब्बरची भेट झाली.
त्याने भरपूर दारु ढोसली.
मी बकाबका खारीमुरीवाले शेंगदाणे संपवले.
धनदांडाग्यांना शेंगदाणे खायचे असतील तर फडतूसांनी शिल्लक ठेवले तर त्यांना ते मिळतील;
हा संदेश मी देउ इच्छित होतो.
तो नशेत होता. इतका नशेत होता की चक्क जिन्नस आणून देणार्‍या लोकांशी अगदि औदार्याने वागला.
घेउन येणारे ऑटोवाले वगैरेंशीही अगदि अस्थेने बोलला.
भारतीय सरासरीहून बरीच अधिक टिपही जिन्नस आणणार्‍यास दिली.
.
.
काजू आणि बदाम हे चखना म्हणून आहेत का अशी विचारणा करुन दोन्ही वेळेला त्यानं हाटेलमालकाला बुचकळ्यात टाकलं.
एके ठिकाणी काजू मिळाले.
मिळाले म्हणजे....
ते फक्त मलाच मिळाले.
समोर प्लेट आल्यावर ते मी फस्त केले.
फडतूसांचाही रिसोर्सेसवर व समृद्ध अन्नवर अधिकार असतोच हे मी सिद्ध केलं.
गब्बरला पुन्हा काजूंची ऑर्डर द्यायला लावून व तीसुद्धा एकट्यानेच फस्त करुन आम आदमीची ताकत सिद्ध केली.
बिल धनदांडग्या गब्बरला द्यायला लागल्यानं संपूर्णतः सोशालिस्ट/समाजवादी पद्धतीनं भेट साजरी झाली;
असं म्हणता यावं.
मी काहीही खाल्लं नाही मेन कोर्स, स्टार्टर्स वगैरे. कारण घरच्या स्त्रीशक्तीला मी घाबरतो.
तिला घाबरुन ऐसीवरील पुरोगामीपण मी जवळ आलेल्या वूमन्स डे चे औचित्य साधून सिद्ध केले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> तो नशेत होता. इतका नशेत होता की चक्क जिन्नस आणून देणार्‍या लोकांशी अगदि औदार्याने वागला.
घेउन येणारे ऑटोवाले वगैरेंशीही अगदि अस्थेने बोलला. <<

>> एके ठिकाणी काजू मिळाले. मिळाले म्हणजे....ते फक्त मलाच मिळाले. <<

त्या औदार्याचा नशेशी काहीही संबंध नाही. गब्बर हिंस्र वगैरे अजिबात नाही हेच यातून सिद्ध होतं. त्यामुळे धनदांडग्यांना लुटण्यासाठी मनोबानं खूप लो हँगिंग फ्रूट्स निवडली एवढाच संदेश मी देऊ इच्छितो. पुढच्या प्रगतीस शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गब्बर हिंस्र वगैरे अजिबात नाही हेच यातून सिद्ध होतं. त्यामुळे धनदांडग्यांना लुटण्यासाठी मनोबानं खूप लो हँगिंग फ्रूट्स निवडली एवढाच संदेश मी देऊ इच्छितो. पुढच्या प्रगतीस शुभेच्छा.

म्हणजे 'कोण कुठला गब्बर, हिंमत असेल तर मला लुटायचा प्रयत्न करून बघा पुढच्यावेळी. त्या प्रयत्नात जास्तीत जास्त जे मिळू शकेल ते (शुभेच्छा) आत्ताच घ्या' असं का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं जंतू नेहेमीप्रमाणे दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. तू म्हणतोस ती एक; दुसरीकडे गब्बरलाही 'आपला'च म्हणायचा प्रयत्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपण भरल्या तोबर्‍याने बरेच काही सिद्ध आणि साध्य केले आहे. एका तोबर्‍यात अनेक दगड. गोफण घेऊन गेला होतात काय? धन-मन अश्या दोन दांडग्यांची ही धनामनाची भेट दांडग्या धपाट्याने साजरी झाली असती तर अधिक साजून दिसले असते नाही?
रोचक दिली आहे.
जाता जाता. 'घेऊन येणारे ऑटोवाले वगैरेशीही अगदि अस्थेने बोलला''.... घेऊन येणारे ऑटोवाले वगैरे दिसण्याआधीच/ही घेतली होती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थालीपीठ जबरा! चिंचवडमध्ये इतकी वर्षं राहूनही तिथं इतकं चांगलं थालीपीठ मिळतं हे माहीत नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

औंधमध्ये 'ला बूशी दॉर' लावाच्या बेकरीमध्ये बेक्ड चीज केक खाल्ला. चीजकेक, किंवा चीजकेक या नावाने जे काही देतात ते, आधी खाल्ला होता. पण हा चीजकेक अद्भुत होता. दुकान जरा महागडं आहे पण. आणि साडेसातला बंद करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे नेटवर पाहून एकदा स्टेशनजवळ गेलो होतो पण नंतर कळालं की आता औंधात शिफ्ट झालंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'ला बूशी दॉर', ट्राय करावं लागेल. बादवे ह्याचं इंग्रजीलिपीत नाव लिहा ना... म्हणजे गुगलवर शोधायाला सोप पडेल. किंवा नेमकं कुठे ते सांगा.
मागच्या विकात औंध च्या कोबे सिझलर ला गेलो होतो, अगागा काय ती वाईट्ट् चव त्या सिझलर्सला, अजिबात आवडले नाही. ह्याआधिही कोबेचे सिझलर आवडले नव्हते पण ह्यावेळेस अगदीच वाईट्ट अनुभव. पुण्यात 'याना' आणि कल्याणीनगराचे 'बाऊंटीज' मधे उत्तम सिझलर्स मिळतात (असा माझा वयैक्तिक अनुभव).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते la bouchee d'or असं आहे.

बाकी याना सिझलर्स एक नंबर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

la bouchee d'or

करेक्ट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

धन्यवाद बॅटमॅन.

काय ते नाव "la bouchee d'or" ....मी आपलं la bushy dwar, la booshy dor, la bushy door असलं काय काय लिहून गुगलत होतो Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओ घनुदादा... "The Place - Touche The Sizzler" यांचेही एकदा ट्राय करा. क्याम्पातल्या रामकृष्ण हॉटेलसमोर. बारकाईने बघा, कारण एक बंद लाकडी दरवाजा आहे, पटकन दिसत नाही. पुण्यातला आद्य सिझलरवाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सहमत. द प्लेसचे सिझलर्स तर लैच भारी!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय होय.. पुण्यातल्या सिझलर्सची गंगोत्री!
एकुणच क्यांप आणि तिथेली खाद्यमंदिरे असा लेखच लिहावा लागेल!

(क्यांपाहारप्रेमी) ऋ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आय्ला हो की... द प्लेस विसरलोच मी... हे सिझलर्स चं उत्तम ठिकाण. धन्यावाद आठवण करुन दिल्याबद्दल, बरेच वर्षात गेलो नाही, अता जावे म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द प्लेस चीच धाकटी पाती झामु 'ज पण उत्तम आहे , सिझलर्स करता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोथरुडात पौड रोडवर दुर्गा हॉटेलजवळ इड्डोस नावाच्या दाक्षिणात्य शाकाहारी हॉटेलमध्ये गेल्या वीकेंडला खाल्लं. दाक्षिणात्य पदार्थांची चव अस्सल वाटली आणि किमतीही फार नाहीत. पूर्ण मेनू झोमॅटोवर पाहायला मिळेल. माझ्याकडून दणदणीत शिफारस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद, अता हे पाहणे आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गुर्जींच्या गेल्यावर्षीच्या भारतवारीला इथे खाल्लं होतं टोळकं जमवून.
चव ठिकठाक वाटली होती असे आठवते. फार उल्लेखनीय असे काही वाटले नव्हते. दिड वर्ष झालं म्हणा आता. एकदा जाऊन बघितलं पाहिजे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> गुर्जींच्या गेल्यावर्षीच्या भारतवारीला इथे खाल्लं होतं टोळकं जमवून. <<

तुम्ही 'साउथ इंडिज'मध्ये खाल्ल्याचे फोटो व्हायरल झाले होते, मग इथले कसे नाही झाले? काही गुप्त खलबतं झाली म्हणून, की खाणं खास नव्हतं म्हणून? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

साउथ इंडीज पारच पलिकडल्या वर्षी. हे माल्कीणबै आल्यावत्या त्या वर्षीचं म्हणतोय (गेल्या). जाहिर कट्टा वगैरे नव्हता. अचानक ठरलेली गप्पा भेट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बरेच दिवस जाता येता दिसतं हे. जाऊन बघतो आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तिथे मी काही खाल्लं नाही, पण कॉफी अजिबात आवडली नाही. मांजर मुतवणी होती. "थोडी गरम करून द्याल का" विचारलं तर त्यांनी "ही अशीच असते कॉफी" असा पुणेरी बाणा मद्राशीतून दाखवला. मी पुन्हा तिथे पैसा खर्च केला नाही, माझ्यासाठी कोणाला पैसा खर्च करू दिला नाही.

गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीलाच तिथे गेलो होतो. ती कॉफी अगदीच वाया गेली नाही; थोडं कॅफिन मिळालं आणि आचरट फोटो काढायला कॉफी वापरली तिथली.
इड्डोस

इड्डोसच्या जवळच एक पराठ्यांचं दुकान आहे तिथे पराठे हादडले चिकार. फोटो मात्र काढले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काल फ्रेंच विंडोलाला eclair नावाची pastry खाल्ली (koregav park ) . अजूनहि काही काही खाल्लं पण नाव याचच लक्षात राहिलं. अप्रतिम आहे .

interior पण मस्त आहे . निवांत दुपारी मोकळा वेळ असताना जावं अशी सुंदर जागा आहे . owner पण छान हसरा आहे . व्यवस्थित माहिती देत होता त्यामुळे ज्यांना काहीही माहिती नाही ती लोक्स पण बुजून जात नाही की नक्की काय घ्याव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इक्लेअर याच नावाचा पदार्थ जिला बेकरी या गोव्यातल्या ठिकाणी मिळतो. लोटोली गावात एका हिरव्या रानाने वेढलेल्या रस्त्याला खूपच जुनं कौलारु स्थानिक पद्धतीचं घर आहे. घरामागे बेकरीची भट्टी वगैरे आहे. घरातच कपाटात ठेवून बेकरी पदार्थ विकतात. साधं दुकानही नाही. अत्यंत मर्यादित माल बनवून ताजा विकतात दुपारपर्यंत सर्व संपुष्टात.

तर ही इक्लेअर्स कस्टर्ड फिल्ड असतात. अनेक दशकांपासून यांनी परंपरा जपली आहे. शिल्लक असली तर दोनचार मिळतात एरवी दूरवरुन आलेले जाणकार लोक आधीच फस्त करुन किंवा बांधून घेऊन गेलेले असतात.

कॅरामलाईज्ड साखरपेरणी केलेली ती एंजेल विंग्ज नावाची बिस्किटंही यांचं फाईंड आहेत. तशा प्रकारची खारीबिस्किटं आता सगळीकडे मिळतात. पण खमंगपणा आणि ताजेपणा यांचा पाहून घ्यावा. मेल्टिंग मोमेंट्स नावाची बटरबिस्किटंही जिभेवर विरघळणारी असतात. ब्रेड तर आहेच.

आपापल्या पसंतीचं काही न काही इथे मिळतंच. फक्त प्रॉब्लेम असा की अनेक ठिकाणाहून मागणी, ऑफर्स येऊनही हे कुटुंब उत्पादन वाढवायला किंवा बाहेर दुकानांत विकायला तयार नाही. क्वालिटीवर परिणाम होईल म्हणतात असं वाचलं.

जिला या नावाचा जिल्हा बेकरी असा काही अर्थ नसून अन्ताव कुटुंबातल्या आईवडिलांच्या नावांची आद्याक्षरं घेऊन ते बनलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.zomato.com/photos/pv-res-6504977-u_xNDYMzgwMTk3OD

गवि, मस्त लिहिलंय .

लिंक मधला फोटो आहे त्यात डाव्या बाजूला आहे ते eclair . तुम्ही सांगताय ते पण असंच होतं का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. अशीच. डेकोरेशन इतकं नाही. वरुन चॉकलेट लावलेलं असतं.

बेसिक पदार्थ असतात त्यामुळेच अस्सल लागतात. गेलो की चुकवत नाही.

खालील लिंकवर जिला बेकरीविषयी आणखी सापडलं:

https://www.tripadvisor.in/Restaurant_Review-g297604-d2304796-Reviews-Ji...

जालावरुन:

A

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ईस्ट स्ट्रीट वर बादशहा च्या वरती ' किंग्स ' ...मस्त फूड. मोजकी टेबल्स, मोजके ग्राहक , छोटासा मेनू. पारशी फूड आणि टिपिकल राज डेज टाईप चवीचा मेन्यू . फिश अँड चिप्स ते स्टेक , पण ते विलायतेत मिळते तसे नाही . विलायतेतल्या सायबाला गेल्या शतकाच्या सुरुवातीला त्याच्या घरचे पदार्थ इथे मिळत असतील अश्या चवीचे फूड . जरूर जा , गडबड नाही , निवांत पणे खायला जा !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्टारबक्स ची Chile Mocha खास नाही. अजिबातच खास नाही.
.
http://globalassets.starbucks.com/assets/4e9ecfb833d84cb1ae30c77a35912376.jpg
___
आज कोणीतरी ऑफिसात पम्प्किन स्पाइस लिक्विड क्रीमर्स आणुन ठेवलेत. कॉफीत छान लागतायत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मालवणात गेल्यावर जर का तुम्हाला शुद्ध* शाकाहारी जेवण जेवायची हुक्की आलीच तर वझेंचे "श्रीकांत भोजनालय" हा ब्राह्मणी जेवणाची (भोजनालयाच्या बोर्डावर तसं लिहिलय) लज्जत चाखायचा एक चांगला पर्याय आहे. ८४ वर्षांपासून चालू असलेली वझेंची ही खानावळ पोश्ट ऑफीस पासून फार लांब नाही. अंगणातच मांडवाखाली टेबल खुर्च्या मांडून बसायची व्यवस्था केली आहे. आत गेल्यावर चुकून पुण्यात नाहीनं आलो असं वाटून दचकण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण पुणेरी पाट्या वजा सूचना तुम्हाला वाचायला मिळतील. उदा. "ताटात जेवण टाकू नये. टाकल्यास दंड आकारला जाईल", "आज भाजी कुठली आहे हे विचारू नये. सांगितले जाणार नाही" इ. वझेंच्या जेवणात मला खास आवडल्या त्या गरमागरम मऊसूत पोळ्या आणि तिखट दिसणारी पण थोडीफार गोड चव असलेली भाजी. चार पोळ्या, भाजी, एक मूद भात, वरण/आमटी, वाटीभर ताक आणि तृप्तीचा ढेकर याचे साधारण शंभर एक रुपये होतील.
[* तशी मांसाहार आणि शाकाहार एकत्र मिळण्याची सोय गल्लोगल्ली आहे.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आज भाजी कुठली आहे हे विचारू नये. सांगितले जाणार नाही"

हे जरा अतिच आहे.

बाकी माहिती रोचक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बालेवाडी हाय स्ट्रीटच्या 'इन्कॉग्नीटो' मधे जाणं झालं. फारच ओव्हर हाइप्ड जागा वाटली. तिथे गेल्यास तुम्हाला अर्धा-पाऊण तास वेटींग करावं लागेल असं सांगण्यात आलं तर आजिबात थांबू नका - इतकं काही वर्थ नाहिये. बाकी अँम्बीयन्स वगैरे छान आहे - टिपीकल अमेरिकन रेस्टो-बार प्रमाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बालेवाडी हाय स्ट्रीट

लोल! अशी खरंच जागा आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

असं म्हणतात ब्वा त्या भागाला लोक आता. खरं खोटं ते बालवडकर लोकच जाणो. बाकी आपले गुगल्बाबा पण ओळखतात त्या भागाला त्याच नावाने :

https://www.google.co.in/maps/place/Balewadi+High+Street/@18.5705194,73.7746042,3a,75y,90t/data=!3m8!1e2!3m6!1s-WTA1L0PQRio%2FV9TKrB0as7I%2FAAAAAAAACjs%2FwOjdsIz6TpgK-gfdavbSBD1TmdCHR5s8gCLIB!2e4!3e12!6s%2F%2Flh4.googleusercontent.com%2F-WTA1L0PQRio%2FV9TKrB0as7I%2FAAAAAAAACjs%2FwOjdsIz6TpgK-gfdavbSBD1TmdCHR5s8gCLIB%2Fs160-k-no%2F!7i4608!8i2592!4m7!3m6!1s0x3bc2b934e156997f:0xe8505386d906e6da!8m2!3d18.5701103!4d73.7747474!9m1!1b1!6m1!1e1

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0