Skip to main content

ही बातमी समजली का? - ६१

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.

अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.

===========

दिल्ली बलात्कारावर बीबीसीनं केलेल्या माहितीपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न भारतीय सरकार करत आहे. दरम्यान, बीबीसीवर हा माहितीपट प्रसारित झाला आहे. आता तो यूट्यूबवरदेखील उपलब्ध आहे. तो काढून टाकण्यासाठी भारत सरकार यूट्यूबवर दबाव आणेल का माहीत नाही. सध्या तरी तो इथे पाहता येतो आहे.