अभिनव विषयांची सूची
अभिनव विषयांची सूची
१. नासकीवाडीमधील शिरपतरावांच्या बैलाला नेहमी बुळकांड्या लागतात. का ते शोधा.
२. सचिनने बॅट जड वापरायला हवी होती की हल्की ?
३. हमास आणि हिज्बुला ह्या दोन्ही सशस्त्र संघटना इस्रायलशी भांडतात. त्यांना इस्रायलविरोधात कायमस्वरुपी एकत्र अशी भक्कम आघाडी करायची असल्यास त्यातील संभाव्य अडचणी व संधी
४. वेंकीज् आणि ब्रोमार्क ह्या आघाडीच्या कंपन्यांनी व्हेनकॉब चिकनव्यतिरिक्त कोणते चिकन वापरावे ?
५. amd athlon व intel प्रोसेसरची तुलना करा. आपली त्यातील आवड निवड सांगा.
६. ढेकूण माणसाचच रक्त पितात की इतर जनावरांचंही पितात ? इतरांचं पीत असतील तर घरात इतर पशू पाळल्यास ढेकूण त्यांचेच रक्त पीत बसलेत आणि माणसाची ढेकणांच्या त्रासातून सुटका झाली असे होउ शकते का ? किम्वा ढेकूण फक्त मानवी रक्त पीत असल्यास, ते तसे का आहे ? शिवाय मानवी उत्क्रांतीनंतर त्यांची स्वतंत्र उत्क्रांती झाली किंवा कसे ?
७. विमानातील तंत्रज्ञान दर किती वर्षांनी कालबाह्य होते ? भारताने विमान निर्मिती करायची असल्यास काय करावे लागेल ?
८. सामाजिक वनीकरण :- फायदे व अंमलबजावणीतील आव्हाने
९. भोकरवाडीबुद्रुक मध्ये आढळणार्या वांग्याच्या किडीचे डिसेक्श्न जे लाल हिरवे प्याटर्न दाखवते; त्यातील ब्याक्टेरिया व फंगस वेगळे कसे ओळखावेत ?
१०. व्हाइट हाउसच्या नूतनीकरणात रंग बदलावा का ? बदलल्यास त्यास व्हाइट हाउसच म्हणवले जावे का ?
११. भूगर्भातील सर्वाधिक प्रमाणात असणारा धातू-- एल्युमिनियम दोनेकशे वर्षापूर्वीपर्यंत मानवी वापरापासून फार दूरवरच का राहिला असावा?
(नेपोलियन वगैरेच्या काळात अॅल्युमिनियम वापरणे श्रीमंतीचे लक्षण होते)
१२. विहीर खोदायची आयडीया माणसाला का सुचली असावी? "जमीन खोदल्यावर खाली अजून माती लागेल" असे वाटण्याऐवजी "जमीन खोदल्यावर पाणी लागेल " असे मानवास का वाटले असावे ?
१३. चायनिज व आफ्रिकन वंशातील जेनेतिक्सच्या फरकांची अभ्यास व चर्चा करा
१४. जातिव्यवस्थेचे नेमके मूळ व कार्यकाल निश्चिती
१५. म्रुत्युपश्चात जीवनाची शक्यता
१६. वूडी अॅलन व डेविड धवन (अथवा "गुंडा ") तुलनात्मक अभ्यास
१७. भातखंडे-पलुस्कर ते राहुल देशपांडे. शास्त्रीय संगीताची महाराष्ट्रिय परंपरा
१८. कुत्र्याची लाळ व अस्वलाच्या पित्ताशयातील घटक कोनत्या औषधनिर्मितीत उपयुक्त थरु शकतील ?
१९. चष्मा हरवण्याचे १०१ उपाय
२०. बायकोला गप्प कसे बसवावे ?
२१. गाथा सप्तशती व कुसुमाग्रज. साम्ये व फरक
२२. रामच्म्द्र गुहा ह्यांच्या विश्लेशणातील पूर्वग्रह
२३. तीन दिन में औरेकल डेटाबैस कैसें सीखें ?
२४. संजीवन समाधी प्राप्ती
२५. विस्तार करा :- कम्युनिस्ट राजवटीचा देश हा ही जागतिक मार्केट इकॉनॉमीचाच भाग आहे
२६. एखाद्या व्यक्तीला स्वतःची जीभ स्वतःच्या नाकाला लावाविशी वाटत असल्यास चेहर्अयचे काय काय व्यायाम करावे लागतील ?
इतर कोणकोनत्या उपाययोजना कराव्या लागतील ?
२७. शाकाहार्यांच्या खाण्यात आलेल्या मांसाचे पोटातल्या पोटात व्हेज अन्नात रुपांतर करण्याची गोळी बनवायची असल्यास कोणते केमिकल उपयुक्त ठरेल ?
२८. "योक्को हिट्टो बारु " (हा जपानी विषय आहे. विषय समजून घ्यायला आधी जपानी भाषा शिकून या )
२९. राखी सावंत व वीणा मलिक ह्यांच्या चंद्रशीतल, सौम्य व्यक्तिमत्वाचे रहस्य
३०. आपण अमीबा झालो तर ?
.
.
अजूनही काही विषय आहेत. पण सध्या व्यस्त आहे मी.
व्यवस्थापकः इथून धागा "मौजमजा" प्रकारात स्वतंत्र काढत आहोत. वैयक्तिक टिपणी न करता होऊ द्या मौजमजा :)
बहुधा हा
बहुधा हा रोगः
http://en.wikipedia.org/wiki/Rinderpest
माहिती इथेही मिळेलः
http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand11/index.php?o…
लक्षणे : तीन ते सात दिवसांच्या रोगपरिपाक कालानंतर (रोगकारक व्हायरसाने शरिरात प्रवेश केल्यापासून रोगलक्षणे दिसेपर्यंतच्या काळानंतर) आजाराची सुरुवात ४०°.५ ते ४१°.५ से. पर्यंत चढणाऱ्या तापाने होते. ताप २ ते ४ दिवस राहातो. या काळात चारा खाणे, रवंथ करणे बंद होते आणि नाकातील व डोळ्यातील श्लेष्मकलेला(बुळबुळीत अस्तर त्वचेला) सूज येऊन नाका-डोळ्यावाटे पाणी गळू लागते. पुढे हा उत्सर्ग घट्ट व पुवासारखा होतो. हिरड्यांना सूज येऊन त्यावर पुरळ दिसू लागतो. एकदोन दिवसात पुरळाच्या मोठ्या पुटकुळ्या होऊन त्या फुटून त्या ठीकाणी चट्टे पडून त्यांचे व्रण तयार होतात. खालच्या हिरड्यांवर, जिभेच्या कडांवर व खाली हे व्रण दिसतात. व्रणांवर कोंडा पसरल्यासारखा पापुद्रा जमतो. असा पापुद्रा हे बुळकांड्या रोगातील व्रणांचे वैशिष्ट्य आहे. तोंडातून चिकट लाळेची तार लोंबते व तोंडाला दुर्गंधी येते. व्रणावरील पापुद्रा सुटून त्याजागी स्पष्ट कडा असलेले व्रण दिसू लागतात. तीन ते पांच दिवसांच्या आजारानंतर ताप कमी होऊन जनावराला जुलाब होऊ लागतात. जुलाबांना दुर्गंधी येते आणि त्यात शेंब आणि रक्त पडते. जुलाब आपोआप व जोराने होतात. यावरूनच ढेंढाळ्या हे नांव रोगास पडले आहे. गाभण जनावरे गाभाडतात. श्वासोच्छ्वासास कष्ट होतात व खोकला असतो. जुलाबावाटे शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे ऊतकांचे (समान रचना व कार्य असलेल्या कोशिंकांच्या-पेशींच्या-समूहांचे) निर्जलीकरण होते, शरीराचे तापमान आणखी खाली घसरते व खंगत जाऊन जनावर ६ ते 1१० दिवसात मरण पावते. शेळ्या व मेंढ्यांमध्ये वरीलप्रमाणेच रोगलक्षणे दिसतात; मात्र तोंडामध्ये सहसा व्रण असत नाहीत. मेंढ्यांमध्ये फुप्फुसशोथ (फुप्फुसाची दाहकयुक्त सूज) हे नेहमी आढळणारे लक्षण आहे.
क्र. २० वर चर्चा झालीच तर
क्र. २० वर चर्चा झालीच तर कोणता सदस्य काय बोलेल याचा विचार करतो आहे...
.
.
.
.
.
.
उदा.
सदस्य अ- गेल्यावेळी भारतातल्या बायकांच्या बोलण्याच्या प्रमाणाविषयी काही अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या.
१. हे प्रमाण अत्यंत कमी असतं तेव्हा सुरूवातीला एक्स्पोनेन्शियल ग्रोथने किंवा चक्रवाढीने वाढतं. चक्रवाढ म्हणजे ती संख्या विशिष्ट पटीने वाढण्याचा काळ सारखा असतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादी राशी दरवर्षी सव्वापट होत राहाते. किंवा दर तीन वर्षांनी दुप्पट होते. असं असल्यास नवव्या वर्षी ती (तीन वर्षांनी दुप्पट) गुणिले (तीन वर्षांनी दुप्पट) गुणिले (तीन वर्षांनी दुप्पट) या रीतीने आठपट होईल.
२. सुमारे ३० ते ४० टक्क्यांपर्यंतची वाढ ही चक्रवाढीची असते. नंतरची सुमारे ७० ते ८० टक्क्यांपर्यंतची वाढ ही सरळवाढीने किंवा लिनीयर ग्रोथने होते. त्यानंतर ही वाढ मंदावते आणि लॉगॅरिथमिक ग्रोथप्रमाणे हळूहळू वाढत जाते.

वरील आलेखात एक अज्ञात राशी दिलेली आहे. केवळ गणितंच करायची असल्यामुळे ती राशी नक्की काय आहे हे आत्ता तरी तितकंसं महत्त्वाचं नाही. बडबडीच्या प्रमाणासारखीच ती एक खरी, आणि मोठ्या आकड्यांची राशी आहे एवढंच आपल्यासाठी पुरेसं आहे. तसंच तिची वरची मर्यादा ही जवळपास १०० टक्के आहे. त्यापेक्षा ती वाढू शकत नाही. तेव्हा पहिली काही वर्षं जर ती चक्रवाढीने वाढताना दिसत असेल तर पुढची काही वर्षंही तशीच वाढेल हे गृहितक अगदीच चुकीचं नाही. तेव्हा प्रश्न असा आहे की ही राशी १००% कधी होईल?

हे प्रमाण १००% झाल्यानंतर सर्व बायका बडबड करत सुटतील आणि ती थांबणार नाही हे स्पष्ट आहे. तस्मात ही राशी १०-२०-३०-४० % वर थांबवण्यासाठी अखिल पुरुष समाजाने काय प्रयत्न करावेत हा आजचा आपल्यासमोरचा खरा प्रश्न आहे.
.
.
.
.
.
.
.
.
सदस्य ब- १) समाजवादी संरचनेत (व साम्यवादी संरचनेत) सुद्धा बडबडीची वाट लागली होती. उदा. सोव्हियत रशिया, चीन. (याचा विदा मधे मिळाला होता. पण हरवला. शोधतोय.)
२) साम्यवादी रशियामधे तर स्टॅलिन ने आपल्याच जनतेतील बडबड्या अतिसामान्यांची कत्तल केलेली होती. व माओ ने सुद्धा. कॅपिटलिस्ट संरचनेत कोणत्या राजकीय नेत्याने आपल्याच जनतेची (अतिसामान्यांची) थेट कत्तल केलेली होती का ?? (आता लगेच मोदींचे २००२ च्या दंगलीचे चे उदाहरण पॉलिमॉर्फिझम वापरून फिरवून गुगली टाकण्यात येईलच. की बघा मोदींनी .... . नैका ??)
३) भारतात स्वातंत्र्योत्तर कालात मूक संरचना १९९० पर्यंत होती. (आज ही ती संपुष्टात आलेली आहे असे नाही.) पण बडबड वाढतच गेली.
अपेक्षीत आरोप - "रॉबर्ट दारू पी के दंगा करता है " हे बडबडी खाली येत नाही, असं का? आता यात पॉझिटिव्ह / निगेटिव्ह externalities चा मुद्दा प्रतिवाद म्हणून मांडला जाऊ शकतोच. पण त्याबद्द्ल पुढील स्टेज मधे बोलता येईलच. तसेच प्रत्येक बडबडीबाबत प्रत्येक प्रश्न लागू पडेलच असे नाही. पण हे प्रमुख प्रश्न आहेत.
.
.
.
.
.
.
..
सदस्य क- लाडक्या लाडूकल्या प्र.....................
.
.
.
.
.
..
सदस्य ड- जनरलायझेशन , जनरलायझेशन !!!!!!!!!!!XXXXXXXXXXXX
.
.
.
.
.
.
.
सदस्य इ- हा बडबडीचा कथाभाग सर्वांत नाट्यपूर्ण, थरारक अन तितकाच करुण आहे. अख्ख्या कथेचा क्लायमॅक्स या भागात पहावयास मिळतो. ओडीसिअसचे लोकोत्तर चातुर्य, ग्रीकांची अपरिमित बडबड आणि क्रूरता तसेच ट्रोजनांची त्यांच्या दुर्दैवाने उडालेली दैना हे सर्व या भागात एकवटलेले आहे. पोस्टहोमेरिकामधील बुक क्र. ११ ते १३ मधील, तर ग्रीक एपिक सायकलमधील लिटल इलियड व इलियू पर्सिस या दोन काव्यांमधील कथाभाग यात येतो. ग्रीक साम्राज्यात बडबडीला कंट्रोल करण्यासाठी पक्के मेकॅनिझम होते हे सहज कळते.
.
.
.
.
सदस्य ई- मी सहजतेने बडबड करू देत नाही. बडबड करू देणे वाईट आहे असेही वाटत नाही व/वा मी बडबड करू देत नाही याचा अभिमान वगैरेही वाटत नाही.
जसे काही लोक शाकाहार करतात, काही मांसाहार करतात, काही दारू पितात, काही पित नाहीत, काही बडबड करू देतात, काही देत नाहीत. त्यात छान/चांगलं/वाईट/पुजनीय/तिरस्करणीय असं काही नाही.
बडबडीचा वापर हा अनेक स्त्री-पुरूषांना लहानपणापासून करताना पाहिला आहे. बडबडीबद्दलचे सोवळेपण हा खास शहरी संस्कार.. काही प्रसंगी मात्र माझे परिचित/सोबती समोरच्याचा विचार न करता मनापासून पण उगाचच कै च्या कै बडबड करू देत असले की फारसे रुचत नाही - पण समजु शकतो.
सर्वांनी हलकेच घेणे.
पैचान कौन
http://www.bbb.com/huff-wires/20150311/eu-spain-ghost-airport/?utm_hp_r…
http://www.aaa.com/huff-wires/20150310/financial-markets/?utm_hp_ref=wo…
http://www.ccc.com/huff-wires/20150310/financial-markets/?utm_hp_ref=wo…
http://www.ddd.com/huff-wires/20150310/us-right-to-work-wisconsin/?utm_…
दिलेल्या लिंका मी वाचल्या असतीलच असे नाही.
साम्यवादी रशियामधे तर स्टॅलिन
साम्यवादी रशियामधे तर स्टॅलिन ने आपल्याच जनतेतील बडबड्या अतिसामान्यांची कत्तल केलेली होती. व माओ ने सुद्धा. कॅपिटलिस्ट संरचनेत कोणत्या राजकीय नेत्याने आपल्याच जनतेची (अतिसामान्यांची) थेट कत्तल केलेली होती का ?? (आता लगेच मोदींचे २००२ च्या दंगलीचे चे उदाहरण पॉलिमॉर्फिझम वापरून फिरवून गुगली टाकण्यात येईलच. की बघा मोदींनी .... . नैका ??)
जोरदार टोला बर्का मंदार. एकदम स्क्वेअर ड्राईव्ह.
माझे २ पैसे
३०. आपण अमीबा झालो तर ?
तरी मी आनंदी होइन कारण मी हायड्रीला होऊ शकले असते पण झाले नाही. हायड्रीला ज्या अवयवाने अन्न ग्रहण करतो त्याच अवयवाने बाहेर फेकतो. अशी ऐकीव माहीती आहे. ईईईईईईSSSS
२८. "योक्को हिट्टो बारु " (हा जपानी विषय आहे. विषय समजून घ्यायला आधी जपानी भाषा शिकून या )
हाहाहा
२०. बायकोला गप्प कसे बसवावे ?
फारच महत्वाकांक्षी ब्वॉ तुम्ही ;)
अन तू फक्त ठराविक लोकांच्या
अन तू फक्त ठराविक लोकांच्या प्रतिसादाला हसतोस त्याचं काय? वरती पिडांनी अन मी उत्तम जोक केलेत त्याला तू हसलास का?
याचं कारण हे की आपण काही व्यक्तींशी ट्युनड असतो, आपला रॅपो असतो.
तसच काही लोक काही विचारांशी ट्युनड असतात. जाऊ देत. अन वेगवेगळ्या बातम्यातून, माईंड यु वेगवेगळ्या तोच मुद्दा मांडतात.
१०. व्हाइट हाउसच्या
१०. व्हाइट हाउसच्या नूतनीकरणात रंग बदलावा का ? बदलल्यास त्यास व्हाइट हाउसच म्हणवले जावे का ?
१२. विहीर खोदायची आयडीया माणसाला का सुचली असावी? "जमीन खोदल्यावर खाली अजून माती लागेल" असे वाटण्याऐवजी "जमीन खोदल्यावर पाणी लागेल " असे मानवास का वाटले असावे ?
१८. कुत्र्याची लाळ व अस्वलाच्या पित्ताशयातील घटक कोनत्या औषधनिर्मितीत उपयुक्त थरु शकतील ?
१९. चष्मा हरवण्याचे १०१ उपाय
२६. एखाद्या व्यक्तीला स्वतःची जीभ स्वतःच्या नाकाला लावाविशी वाटत असल्यास चेहर्अयचे काय काय व्यायाम करावे लागतील ? इतर कोणकोनत्या उपाययोजना कराव्या लागतील ?
हे विषय विशेष आवडले. ऐसीवर नवनवीन चर्चा व्हाव्यात या उदात्त हेतुतून जन्माला आलेली विषयांची यादी पाहून 'विषय सर्वथा नावडो' असं म्हणून समर्थांनी चूकच केली असावी याची खात्री पटली.
सुसंगती सदा घडो सुजन वाक्य
सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो
सदन्घ्री कमळी दडो मुरडीता हटाने अडो
वियोग घडता रडो मन भव्त्चरीत्री जडोकवी: मोरोपंत
होय तुम्ही बरोबर आहात की हे काव्य मोरोपंतांचे आहे-
पण मला एकवार मनाचे श्लोक बघून येऊ देत.
.
यु आर राइट. मनाच्या श्लोकांत "विषय" शब्द नाही.
नासकीवाडीमधील शिरपतरावांच्या
नेहमी लागतात ? अभ्यास वाढवा. मी हे विधान दोन पातळ्यांवर खोडून काढतो..
अ. बुळकांड्या हा रोग आता नाही. त्याचं जगभरातून निर्मूलन झालेलं आहे.
ब. जेव्हा होता तेव्हाही नेहमी लागण्याची शक्यता शून्यवत होती कारण एकदा बुळकांड्या रोग लागला की आठवड्याभरात गुराचा मृत्यू बहुतांशी निश्चित असल्यामुळे वारंवार होत राहणे कोणत्याच गुराला झेपणारे नव्हते.