उत्क्रांतिबद्दल प्रश्न

आज जालावर भटकताना कुठुनतरी हा दुवा सापडला;
http://www.japantimes.co.jp/news/2014/01/09/world/elephant-shark-has-bar...
त्यातला सारांश असा की "एलिफंट शार्क मासा (हा खरा शार्क नव्हे पण एक प्रकारचा मासा) काहिशे मिलिअन्स वर्ष उत्क्रांत नाहि झालाय (ईव्हॉल्व नाहि झालाय). सिलाकांथ मासा ४०० मिलिअन्स वर्ष उत्क्रांत नाहि झालाय".

माझ्या माहितीप्रमाणे सजीव दोन मुख्य कारणांमुळे उत्क्रांत होतात;
१. परिस्थितीशी जुळवून घ्यायला / परिस्थितीत यशस्वी व्हायला. उदा. डार्विनचा क्लासिक शोध. गॅलेपॅगोस बेटावर निरनिराळ्या चोची असणारे फिंच पक्षी आहेत. ज्या प्रकारची फळं/अन्न खातात त्यानुसार चोचींचा आकार बदलला.
२. प्रजननाच्या प्रक्रियेत म्युटेशन मुळे जीन्समधे थोडेफार फरक पडतात त्यामुळे बदल होतात. उदा. अशा बदलांमुळे केसांचा रंग बदलू शकतो. असा प्राणी दिसायला कठीण गेला तर जास्त जगू शकतो. त्याची संतती पण कमी वेळा मारली जाते आणि अंतिमतः अशा रंगाचेच प्राणी उरतात. (उलटा प्रकार होउन हानी पण होउ शकते. उदा. हेमोफिलिया.)

- मग एलिफंट शार्क आणि सिलाकांथ अतिशय प्रगत समजायचे की कुठल्यातरी प्रकारे त्यानी आपला DNA इतका पक्का केलाय की काहिहि बदल शक्य नाही? का आपले नशीबाने जगलेत ईतकी वर्ष पण उत्क्रांत होत राहिले असते तर अजून यशस्वी झाले असते?

- दुसरं कारण वर दिलंय त्याचे ठोस पुरावे कोणाच्या वाचनात आहेत का? हानीच्या उदाहरणांची, हेमोफिलिया सारख्या, माहिती सापडते. पण या प्रकारे फायदा झाल्याचा पुरावा आहे?

- वरची दोन सोडून उत्क्रांतीची अजून कारणं आहेत?

खरं सांगायचं तर चारशे मिलियन हा कालखंड आकलानापलीकडचा आहे. ईतक्या काळात पृथ्वीवर ईतकी परिस्थिती बदलली असेल की हे आकडे नक्कि बरोबर असतील ना असा विचार आला मनात!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्राण्यांमधे उत्क्रांतीजन्य बदल तीन गोष्टींमुळे होतात, अन्न मिळवणे, स्वतः शिकार होण्यापासून वाचवणे आणि लैंगिक पुनरुत्पादन होणाऱ्यांमधे जोडीदाराने केलेली निवड. या माशांना खाणारे मासे, प्राणी नसतील, त्यांना मुबलक अन्न मिळत असेल आणि नर-मादींना परस्परांचं रूप आवडत असेल तर बदल होण्याची आवश्यकता नाही. बहुतेकसे जनुकीय बदल हानीकारकच असतात, त्यामुळे जनुकीय बदल न झालेले मासेच जास्त टिकून रहातील.

मला आणखी एक प्रश्न पडला तो म्हणजे या माशांचे DNA गेल्या अनेक लाख वर्षांत बदलले नाहीत हे कसं समजतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्राण्यांमधे उत्क्रांतीजन्य बदल तीन गोष्टींमुळे होतात, अन्न मिळवणे, स्वतः शिकार होण्यापासून वाचवणे आणि लैंगिक पुनरुत्पादन होणाऱ्यांमधे जोडीदाराने केलेली निवड.

उत्क्रांतीवादी उलटसुलट बोलण्यात जगात प्रथम क्रमांकाने आघाडीवर असावेत. प्रथमतः बाह्य वातावरणातील बदल आणि त्यांना कसे जोडून घ्यावे याचा आणि जीन्सचा काही संबंध नसतो. बाहेर अन्न कमी मिळू लागले कि शरीर जीन्सना सांगत नाही कि आता अन्न कमी पडू लागले आहे नि उत्क्रांत व्हा.

पुढे जाऊन, समजा सगळ्या माशांना हे कळाले कि आपल्याला अन्न कमी पडत आहे आणि उत्क्रांत व्हायला हवे. पण असे होईपर्यंत लाखो वर्षे लागतात आणि ती स्पेसिज नष्ट होते.

उत्क्रांती रँडमली होते. १००%.

आणि नसली तर देवाने जग बनवले आहे म्हणण्यात आणि उत्क्रांती झाली आहे म्हणण्यात किंचितही फरक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.


"बाह्य वातावरणातील बदल आणि त्यांना कसे जोडून घ्यावे याचा आणि जीन्सचा काही संबंध नसतो"

हे असेच सरसकट टाकलेले विधान आहे की त्याला पुष्टी देणारा काही विदा आहे तुमच्याकडे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

उत्क्रांती ही अपघाताने होते. बाहेर काय चालले ते कळण्याचा जीन्सकडे कोणता मेकॅनिझम नसतो. म्हणून कितीतरी स्पेसिज इतिहासात नष्ट झाल्या आहेत. त्यांच्यासाठी गूगलून पाहा. http://www.pnas.org/content/91/15/6758.full.pdf इथे पहिल्या पानावर Darwin on existintion वाचा.

खाली मनोबांच्या प्रतिसात मानव - जिवाणूंचे युद्धवर्णन आहे. मानव प्रतिजैविके वापरू लागला म्हणून जिवाणूंनी त्याला प्रतिरोधक अशा स्पेसिज निर्माण केल्या असे म्हणणे म्हणजे जोक आहे. जिवाणूंना काही बुद्धी नसते. आपले भाऊबंद कशामुळे मरत आहेत हे त्यांना माहित नसते. आणि माहित झाले तरी आपल्या शरीरात कोणता बदल घडवून आणावा म्हणजे प्रतिजैविकांपासून आपण मरणार नाही हे त्यांना माहित नसते. माहित झाले तरी तो घडवून आणण्याचे तंत्रज्ञान त्यांच्याकडे नाही. तंत्रज्ञान असले तरी त्यांच्यात संघटन नाही तो बदल सर्वत्र पसरावयाला. त्यामुळे या जोकची गहराई कळून यावी.

जीवाणूंत अपघाती बदल होत असतात. यातल्या ज्या अपघातांत प्रतिजैविकांशी लढण्याची शक्ती असलेले जीवाणू तयार झाले त्यांनी मानवांशी युद्ध पुढे चालू ठेवले असे म्हणता येईल. इतर जीवाणू जिथे प्रतिजैविके नाहीत अशाच जागी/शरीरांत उरतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरुणजी , योग्य आणि छान प्रतिसाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

>>सगळ्या माशांना हे कळाले कि आपल्याला अन्न कमी पडत आहे आणि उत्क्रांत व्हायला हवे
बेसिक मधेच घोळ आहे हो तुमचा.
माशांना काहीच कळत नाही, अन्न संपलेलं कळत नाही आणि भरपूर झालेलंही काळात नाही. समजा जर खूप वेगाने अन्न संपून गेलं तर मासे जमात नामशेष होऊन जाईल, संपूर्ण मासे जमातीला कळणारही नाही की आपण नामशेष होत आहोत, अथवा चला आता उत्र्कांती वगैरे करुया, पण पुरेशा सावकाश वेगाने, अन्न संपू लागले, अथवा अन्न बदलले, तर त्या अन्नावर जगू शकणारे थोडे मासे अथवा त्याला मदत करणारे म्युटेशन उत्क्रांतीच्या नियमांनी निवडले जातील आणि पुढे जात राहील,
Evolution is NOT random, evolution is non-random selection of random mutations for successful survival over very long period.
( जेनेटिक्स व उत्क्रांतीवादा मध्ये ज्याना गती अथवा रस आहे अशांसाठी, वर लिहिलेलं वाक्य शक्यता अथवा भविष्यकाल नसून वास्तविक भूतकाळ आहे )

>>आणि नसली तर देवाने जग बनवले आहे म्हणण्यात आणि उत्क्रांती झाली आहे म्हणण्यात किंचितही फरक नाही.
जरा स्पष्ट करून सांगता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Evolution is NOT random, evolution is non-random selection of random mutations for successful survival over very long period.

मी ही अशी वाक्ये बनवायचा प्रयत्न करतो. At random.

Democracy is NOT dictatorial, democracy is non-dictatorial process of dictatorial governance for successful survival over very long period.

काही अर्थ आहे का याला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी ही अशी वाक्ये बनवायचा प्रयत्न करतो. At random.
Democracy is NOT dictatorial, democracy is non-dictatorial process of dictatorial governance for successful survival over very long period.
काही अर्थ आहे का याला?

बरं देवा, तुमचं खरं..

बाकी ज्यांना खरंच काही इंटरेस्ट असेल उत्क्रांती समजून घेण्यात त्यांच्यासाठी..
हे वरती लिहिलेले वाक्य माझे नसून भलामोठा उत्क्रांतीजीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स यांचे आहे, त्याच्या काही पुस्तकातून (सेल्फिश जीन, अन्विव्हिंग द रेनबो) याचे विवेचन मिळेल. पुस्तक वाचायचा कंटाळा असेल तर यूट्यूब वरही पाहू शकता.
माझ्या तोकड्या बुद्धीला जसं जमेल तसं लिहेन वेळ मिळाला तर..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डेमॉक्रसीबाबत समांतर वाक्य असे होईल.

Democracy is NOT dictatorial, democracy is non-dictatorial process selection of dictatorial governance for successful survival over very long period.

यात चुकीचे वर्णन काही दिसत नाही. निवडणूक उच्चाधिकारशाहीनुसार नसते, पण निवडणुकीतून निवडून दिलेले उच्चाधिकारी शासन करतात. जेणेकरून व्यवस्था दीर्घकाळपर्यंत टिकावी.

मुळातील "सिलेक्शन" शब्द तसाच ठेवला असता, ता समांतर वाक्य अर्थपूर्ण ठरते. तो बदलून "प्रोसेस" शब्द घातल्यामुळे सिलेक्शन आणि गव्हर्नन्स म्हणजे एकच प्रक्रिअया आहे, आणि ती एकच गोष्ट एकाधिकारशाही आहेसुद्धा आणि नाहीसुद्धा, असा अंतर्गत विरोध उद्भवतो.

"सिलेक्शन" आणि "गव्हर्नन्स" या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहे, हे वाक्यात स्पष्ट असले, तर एक बिगर-उच्चाधिकारशाही आहे, आणि दुसरी उच्चाधिकारशाही आहे, असे विधान कळते, त्यात अंतर्गत विरोध येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण पुरेशा सावकाश वेगाने, अन्न संपू लागले, अथवा अन्न बदलले, तर त्या अन्नावर जगू शकणारे थोडे मासे अथवा त्याला मदत करणारे म्युटेशन उत्क्रांतीच्या नियमांनी निवडले जातील आणि पुढे जात राहील,

अन्न सावकाश संपणे म्हणजे काय?

उत्क्रांतीचे नियम कोणते? यात लॅमार्कचा नियम येतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असं बघा, मी मघाशीच तुमचं खरं असं म्हणालोच आहे, पण तरीही पुन्हा प्रयत्न करून बघतो.

Evolution is NOT random, evolution is non-random selection of random mutations for successful survival over very long period.
हाच तर उत्क्रांतीच अगदी बेसिक नियम आहे.. म्हणजेच..
म्युटेशन अगदी रँडम कुठेही कधीही कधीही होऊ शकतात, होतातही, पण त्यातली नक्की कुठली म्युटेशन पुढे हस्तांतरीत (अथवा पिढ्यांतरीत) होणार हे मात्र रँडमली ठरत नाही. त्यापैकी त्या सजीवाच्या अस्तित्वाला पोषक असणारीच म्युटेशन पुढे जातात अर्थात नॉनरँडमली सिलेक्ट होतात)
(कारण अशी म्युटेशने झालेल्या जीवांची जास्ती काळ जिवंत राहून पुनरुत्पादन करण्याची शक्यता वाढत जाते, अर्थातच एकूण जेनेटिक पूल मधील अशा जिवंत रहाण्यास अधिक उपयोगी धरू शकणाऱ्या जीन्स ची संख्या वाढत जाते.)

अन्न सावकाश संपणे म्हणजे माशांच्या मागच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीला पाण्यात राहून अन्न मिळवणे किंचित अधिक कठीण होत जाणे. जर हि प्रक्रिया अगदी सावकाश घडली, आणि लाखो माशांच्या मध्ये अनेक रँडमली होणाऱ्या म्युटेशनपैकी एक असे असेल कि ज्यामुळे माशाला, 'समजा' बाकी माशांपेक्षा दोन मिनिटे जास्त पाण्याबाहेर राहाणे शक्य झाले. तर अशा माशाची पाण्याबाहेर राहून अन्न मिळवून जिवंत रहाण्याची आणि पुनरुत्पादन करण्याची शक्यता वाढते, हे नवीन दोन मिनिटे जास्त पाण्याबाहेर रहायला मदत करणारे जीन्स स्वतःच्या जास्ती कॉपीज बनवण्यात यशस्वी ठरतात, आणि पुढच्या पिढीत अशा जीन्सची संख्या तुलनेने अर्थातच जास्ती असते, असं पिढ्यानपिढ्या झाले, सर्वच मासे दोन मिनिटे जास्त पाण्याबाहेर राहू लागतात, आणि असेच अजून कित्येक पिढ्या चालले कि मासा पाण्याबाहेर जगू शकतो. (म्हणजे टेक्निकली मासा नामशेष झालेला असतो पण त्याऐवजी नवीन प्राणी अस्तित्वात असतो...)

१. प्रत्येक प्राण्यात पुनरुत्पादनाच्या वेळी अशी म्युटेशन होऊ शकतात. ती रँडम असतात.
२. हे सिलेक्शन अनेक बाबींवर ठरते, त्यामध्ये पर्यावरण, उपलब्ध अन्न, शिकारी, तापमान, आणि इतर असंख्य घटक असतात. नक्की कुठला घटक ह्या सिलेक्शनमध्ये काय भूमिका निभावतो अथवा किती पॉवरफुल असतो ह्यावर अजून संशोधन चालू आहे.
३. तुम्ही असं किती पिढ्या चाललं कि ते नवीन जीन त्या जीनपूल मधील सगळी जीन रिप्लेस करेल, याची एक्सेलशीट लिहू शकालच. माझा तेवढा संयम व एक्सेलचा अभ्यास दोन्ही नाही. क्षमस्व]
४. असं आणखी कोट्यावधी पिढ्या केलं कि माणूस तयार होतो, Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठिक आहे. आपले म्हणणे पोहोचले.

आता एक काल्पनिक घटना घेऊ. प्रदूषणामुळे मानवजात मरणार अशी परिस्थिती आली. तेव्हढ्यात एका माणसात प्रदूषण झेलण्याचे म्यूटेशन झाले तर त्याची पिढी जगणार आणि हळूहळू बाकी सगळे मरणार. राईट? काही वेगळे असेल तर सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रदूषणामुळे मानवजात मरणार अशी परिस्थिती आली. तेव्हढ्यात एका माणसात प्रदूषण झेलण्याचे म्यूटेशन झाले तर त्याची पिढी जगणार आणि हळूहळू बाकी सगळे मरणार. राईट?

वाहवा.. पण थोडे अजून पॅरामीटर लक्शात घ्यावे लागतील, प्रदुषण अगदी सावकाश होत राहिलं (लाखो वर्षे वगैरे ) आणि दरम्यानच्या काळात एखाद्या गर्भामध्ये 'समजा' कार्बन डायऑक्साईड पचवायचं म्युटेशन झाल्ंच तर ते जीन जास्तीत जास्त पसरेल, आणि मानवजात नष्ट होणार नाही, अर्थात जे काही शिल्लक असेल त्याला मानवजात म्हणता येईलच असे नाही.
तुमच्या विधानात एक बारीकशी चूक आहे, एका माणसात प्रदूषण झेलण्याचे म्यूटेशन झाले तर त्याची पिढीही मरणारच..
"त्याची पिढी पण मरणारच, पण बाकीच्या मानवांपेक्षा, किंचित जास्त वंशज मागे ठेऊन मारणार, मग पुढच्या पिढीत अजून किंचिंत जास्त आणि असेच पुढे चालू, आणि ज्याच्यात तसं म्युटेशन झालेलं नाही, त्याच्या वंशजांच प्रमाण त्यापुढील प्रत्येक पिढीत कमीकमी होत जाणार

प्रदूषण नक्की किती वेगाने होत आहे, त्याचा मानवी अस्तित्वावर नक्की काय परिणाम होईल वगैरे गोष्टीवर अनेक मतमतांतरे मोठेमोठे लोक मांडत आहेत, मी काही ठाम मत देणे योग्य होणार नाही. पण..
माझे वैयक्तिक मत
प्रदुषणाचा वेग खरच शास्त्रज्ञ म्हणतात तेवढा जास्त आणि उत्क्रांतीच्या वेगाला मागे टाकणारा असेल, तर मानवजात नष्ट होईल. मानवजात नष्ट होईल म्हणून उत्क्रांती बहुतेक थांबणार नाही. चालूच राहील.

१. इथे अचानक काही कारणाने पृथ्वीवरील यच्चयावत सजीव, व्हायरस बेक्टेरियासहित नाहीसे होतील हि शक्यता गृहीत धरलेली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुन्हा कन्फर्म करतो.

हा co2 पचवायची शक्ती असलेला मानव , त्याला सीओटूमानव म्हणू, जगेल. बाकीच्या पिढ्या त्याच्यासोबत असतील पण त्या पिढीगणिक कमी होत जातील. मग काही पिढ्यांनी अशी अवस्था येईल की सीओटूमानव जास्त जगू शकतील आणि बाकीचे हळूहळू नष्ट होतील. शेवटी असा क्षण येईल कि सगळे प्रथम सीओटूमानवाचेच वंशज असतील. म्हणजे आज १०० लोक असतील तर पैकी एकाचीच पिढी पुढे चालू राहील. म्हणजे बाकीच्यांचीही राहील पण so long as it contains that mutated gene.
OK?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बरोबर बट इवन बेटर because it contains that mutated gene.
and provided all other parameters constant, this one CO2MAN will be favoured by natural selection.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता खरी मजा आहे. मी इथे एक प्रश्न विचारतो. माणसाच्या अगोदरच्या स्पेसिजपेक्षा माणसाला जास्त बुद्धिमत्ता आहे. नैसर्गिक निवडीमुळे बुद्धिमान माणूस राहिला. मला सांगा, माणसाची कजिन स्पेसिज जिवंत आहेत पण फादर स्पेसिज नाहीत. तर त्या नष्ट होण्याचे कारण काय? हे सगळे एकदाच जिवंत असायला काय हरकत होती? वाकणारा माणूस सरळ चालू लागला हे उत्क्रांतीचे चित्र नेहमी दाखवले जाते. आता इतर वाकणारे हजारो प्राणी जिवंत असताना फक्त वाकणारा माणूसच का गडप झाला? हे कधी झालं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>माणसाच्या अगोदरच्या स्पेसिजपेक्षा माणसाला जास्त बुद्धिमत्ता आहे. नैसर्गिक निवडीमुळे बुद्धिमान माणूस राहिला.

नैसर्गिक निवडीमुळे माणूस बुद्धिमान होत गेला, उत्क्रांतीच्या नियमांनी, उंटाला जशी वाळवंटात रहाण्याची, चित्त्याला जशी पळण्याची प्रगत सिस्टम आहे, तशी मानवाला बुद्धीची आहे.
हे बुद्धीचं टूल नक्की विकसित का झालं असावं, सुरुवातीचे घटक कोणते यावर अभ्यास चालू आहे.

>>माणसाची कजिन स्पेसिज जिवंत आहेत पण फादर स्पेसिज नाहीत. तर त्या नष्ट होण्याचे कारण काय?

फादर स्पेसीज नष्ट नाही झाल्या, त्या मेल्या, व त्यांचे वेगवेगळ्या दिशांना उत्क्रांत झालेले वंशज जिवंत आहेत. त्यापैकी एक दिशा मानवाची,

>>आता इतर वाकणारे हजारो प्राणी जिवंत असताना फक्त वाकणारा माणूसच का गडप झाला?

पुन्हा तेच, वाकणारा माणूस गडप झाला नाही, मानवाचे वाकणारे पूर्वज गडप झाले आणि वेगवेगळ्या दिशांनी उत्क्रांत होणारे वंशज उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या मार्गांनी पुढे गेले. (आणि एका दिशेने पुढे आले, टी म्हणजे आपली )
पुन्हा एकदा सांगतो, मानवाचे सर्व पूर्वज गडप झाले, पण आताच्या मानवजमातीपैकी एकाचाही एकही पूर्वज वंश वाढवल्याशिवाय गडप झाला नाही.
नाहीतर अरुणजोशी व अर्धवट अस्तित्वात कसे असतो?

हे सगळे एकदाच जिवंत असायला काय हरकत होती?

माझे, पणजोबा, खापरपणजोबा आज जिवंत असायला जी हरकत आहे तीच , या हरकतीला साध्या मराठीत 'लाईफस्पॅन' असं म्हणतात. जो साधारण तीस ते सत्तर वर्षाचा असतो.
बायदवे मानवाच्या वाकणार्‍या पुर्वजांचे वंशज, आजही जिवंत आहेतच, आपण त्यांना हल्ली ओरांगउटांग वगैरे म्हणतो.

>>हे कधी झालं?

कमीतकमी एक लाख वर्षापूर्वी. यावर सर्व शाखांच्या शास्त्रज्ञांचं एकमत आहे
पण वेगवेगळ्या पद्धती वापरून वेगवेगळी उत्तरे मिळतात साधारण एक लाख ते अडीच लाख अशी, (फॉसिल क्लॉक, जेनेटीक क्लॉक, अटॉमीक क्लॉक, बायोअटॉमीक क्लॉ़क वगैरे) पण साधारण एक लाख वर्षांच्या आधी असं मानायला हरकत नाही.

याच न्यायाने चित्त्याचे हळू पाळणारे पूर्वज का अस्तित्वात नाहीत, हा प्रश्न विचारून बघा,
अथवा गरुडाचे न उडणारे पूर्वज का अस्तित्वात नाहीत असा प्रश्न विचारून बघा,
हळू चालणारे कासव आजही जिवंत असताना, केवळ हळू पाळणारा चित्ताच कसा गडप झाला असा प्रश्न विचारून बघा,
म्हणजे तुमच घोळ तुम्हालाच कळेल.

१. फारश्या वेगाने उत्क्रांत न झालेले, अथवा वेगळ्या दिशेने उत्क्रांत झालेले पुर्वज म्हणता येइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याचं छान-छोटं उत्तर तुझ्या आधीच्या प्रतिसादातही आहेच. कार्बन डायॉक्साईड रिचवू, वापरू शकणारं म्यूटेशन आलं तर काय, याच्या संदर्भात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"प्राण्याना हवं असो वा नसो, म्युटेशन होतंच असतं आणि परिणामी एखाद्या प्रकारचे प्राणी र्‍हास पावतात किंवा प्रतिकूल परिस्थितीतही तगू शकतात." बरोबर? त्यामुळे मग नेमका प्रश्न असा की "एलेफंट शार्क आणि सिलाकांथने काय असं केलंय की त्यांच्या DNAमधे मिलिअन्स वर्ष काहिहि म्युटेशन होत नाहिये?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

"एलेफंट शार्क आणि सिलाकांथने काय असं केलंय की त्यांच्या DNAमधे मिलिअन्स वर्ष काहिहि म्युटेशन होत नाहिये?"

देवा म्युटेशन होतच असतं प्रत्येक पिढीत, फक्त तो जीव जगतोच असं नाही. फक्त ते म्युटेशन तगण्यासाठी जगण्यासाठी अथवा जास्त जगण्यासाठी उपयुक्त असतं तेव्हाच आपल्याला दिसतं (आपण काही हजार पिढ्या जगलो तर)
बायदवे एलेफंट शार्क हा सर्वात कमी वेगाने उत्क्रांत होणारा प्राणी आहे अस्म शास्त्रज्ञांचं म्हणण आहे, आणि ह्या प्राण्याचं जीनोम सिक्वेन्सिंग पूर्ण झालेलं आहे,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवा म्युटेशन होतच असतं प्रत्येक पिढीत,

सर्वसाधारण मानवांत एका पिढीत कोणती म्यूटेशन्स होतात याचा दुवा मिळेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्हाला ह्या दुव्यावर मानवामध्ये घडलेली आणि जगलेली काही म्युटेशन बघायला मिळू शकतील, हि पुढच्या पिढीत अजिबात जाणार नाहीत हे उघड आहे, का ते लिंक उघडल्यावर कळेलच. सुचना चित्रे डिस्टर्बिंग आहेत. आपापल्या जबाबदारीवर उघडावीत.
अर्थात हि तगून किमान ह्या पायरीपर्यंत पोचलेली म्युटेशने आहेत, ह्या स्टेजपर्यंत न पोचणारी किती असतील हे बहुदा कधीच कळणार नाही.

नक्की किती म्युटेशन होतात यावर अभ्यास झाला आहे अथवा चालू आहे याबद्दल नक्की माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला, हे म्हणजे म्यूटेशन.
मी आणि माझे वडील चेहर्‍याने किंचित वेगळे दिसतो. वय वैगेरे अ‍ॅडजस्ट केलं तरी काही भेद उरतात. ते म्यूटेशन आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

देवा, खरं बोलताय का आपण, आपण त्या दुव्यावारची सगळी म्युटेशन पाहिलीत.. का फक्त पाहिलं चित्र पाहिलंत.?

तुम्ही तुमच्या वडलांच्या एक चातुथांश वयात त्यांच्या वयाचे दिसायला लागलात, आणि लवकरच त्यांच्यापेक्षाही म्हातारे दिसू लागलात तर? तशी केस आहे ती..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला काय म्हणायचं आहे कि पाचच्या जागी सहा बोटं झाली कि ते म्यूटेशन. पण प्रत्येकच माणसाची बोटं वेगळी असतात. म्यूटेशन काय आहे हे ठरवायला रेफरन्स कोणता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सध्याचा जेनेटिक पूल हा रेफरन्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

What is the difference between genetic disease and mutation?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

We just 'label' certain mutations as generic diseases since they adversely affect the individual. तणाला 'तण' का म्हणतात तसंच आहे हे. गवतासारखी तण हि एक वनस्पती आहे ईतकंच. पण आपण तिला तण म्हणतो आणि तणाचा नायनाट करायला बघतो कारण आपल्याला गवत हवं असतं तण नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

I guess, there is no diffrence save the frequency it occures, however this is not expert opinion, you may find reasearches on this topic, I will try to find If I get time today.

Wil be travelling with no Internet for next 20 hours, so cant reply.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"त्यांच्या डीएनए मधे बदल होतायत पण बदल झालेले नष्ट होतायत नी हाच एक काय तो टिकून रहातोय. (बदल झालेला टिकतोय पण अगदि अगदि कमी वेळा)." हं... हे डोक्यातच आलं नव्हतं.

लेखाच्या शेवटी मी काळाबद्दल लिहिलं आहे. तो प्रश्न हॉर्सशू क्रॅब बद्दल वाचल्यापासून (बर्‍याच पूर्वी) मनात आहे. संपूर्ण जीनोम मॅप करायचं तंत्रज्ञान आत्ता आत्ता आलं. त्याआधी काय टेक्निक्स वापरायचे याचं साध्या शब्दात विवेचन करणारं एखादं पुस्तक माहिती आहे का तुला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मिसळपाव
येस्स, तुम्हाला मुद्दा समजाला असं मला वाटतंय.
पुस्तक हवं असेल तर, संपूर्ण जेनेटिक्स आणि त्यातले कन्फर्म्ड भाग व काहीवर अजून संशोधन चालू आहे अशा संकल्पना तुलनेनं साध्या शब्दात मांडणारं 'द ब्लाएंड वॉचमेकर' हे रिचर्ड डॉकिन्स चे पुस्तक नक्के रेफर करेन, 'सेल्फिश जीन' पण वाचा पण नवीन आवृती मिळाली तर बघा, पहिली आवृत्ती १९७६ सालची आहे, त्यानंतर बराच अभ्यास झालाय, मूळ संकल्पना अबाधित राहिल्या तरी जेनेटिक्स बरंच पुढे गेलंय, बरेच नवीन तपशील उपलब्ध झालेत, काही प्रश्न सुटलेतही, डॉकिन्स ने नविन आवृत्तीमधे त्या सगळ्यावर अजून दोन प्रकरणे सामाविष्ट केलियेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरच्या माझ्या प्रतिसादातली वाक्य बरीच गृहितकं मनात धरून लिहीली होती (हा प्रकार टाळला पाहिजे) हे खरं आहे. पण अर्धवटने त्यांचं योग्य स्पष्टीकरण दिलेलं आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पहिले कारण (लॅमार्कचे तत्त्व) बहुधा आता मानले जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

http://www.loksatta.com/sampadkiya-news/featured-articles-on-environment...

आम्ही कोण म्हणोनि काय पुसता?
मनुष्य एक अफलातून प्राणी आहे. तो उंदरांसारखे गवतांचे बी, डुकरांसारखी कंदमुळे, पोपटांसारखी फळे, बगळ्यांसारखे खेकडे-मासे, वाघांसारखी रानडुकरे आणि इतर कोणीच ज्यांना मारू शकत नाहीत, असे अवाढव्य देवमासेही खातो! हा विषुववृत्तीय जंगलांपासून ध्रुवाजवळच्या बर्फिल्या वाळवंटांपर्यंत फैलावला आहे. या यशाचे रहस्य आहे त्याची अचाट ज्ञानपिपासा. मानवजातीचा विद्याव्यासंग भाषा अवगत झाल्यापासून- म्हणजे निदान साठ हजार वर्षांपूर्वीपासून- चालत आला आहे. आपण परिसरात जे काय घडते आहे त्यातली नियमबद्धता, त्यामागची कार्यकारणपरंपरा सारखी शोधत असतो. वास्तवाचे निरीक्षण आणि त्याच्या आधारे कल्पसृष्टीत चित्रण हा मानवाचा एक आगळा-वेगळा छंद आहे.
आरंभी मानवांनी हे केले जीवनाची दोरी बळकट करण्यासाठी. पण एकदा पृथ्वीवर बस्तान नीट बसल्यावर तत्कालीन प्रयोजनापलीकडे जाऊन, लोभातून नाही, तर केवळ आत्मबोधनासाठी मानव निरनिराळे प्रश्न विचारत, त्यांची तऱ्हतऱ्हेची उत्तरे मांडू लागला. असेच मूलभूत प्रश्न आहेत : आपण कोण, कोठून आलो, आणि कुठे जात आहोत? सारे सारे मानव समाज पुरातन कालापासून हे प्रश्न विचारत आले आहेत.
वेगवेगळ्या ज्ञानपरंपरा याची वेगवेगळी उत्तरे सुचवतात. विष्णुपुराण सांगते की, जीवसृष्टी अतिप्राचीन आहे, सतत परिवर्तनशील आहे. तिचा प्रवास संथपणे उद्भिज- जमीन भेदून येणाऱ्या वनस्पती, स्वेदज- घामातून उपजणारे कृमी, अंडज- अंडय़ातून जन्मणारे मासे, सरडे, पक्षी, मग गर्भधारक पशू, त्यानंतर मानव व पुढे जात जात यक्ष आणि अखेर देव अशा चढत्या भाजणीच्या टप्प्याटप्प्यांनी चालू आहे. उलट बायबल-कुराण सांगतात की, जीवसृष्टी ही ईश्वराने एकदाच, अगदी नुकतीच, काही हजार वर्षांपूर्वीच, आज जशी दिसते तशीच्या तशी निर्माण केलेली आहे.
यातले काय स्वीकारायचे आणि काय नाकारायचे, आणि ते कशाच्या आधारावर, याचा शोध घेत घेत मानवाचे ज्ञानभांडार बहरत गेले आहे. या मागोव्यातून जी एक प्रभावी कार्यपद्धती विकसित झाली आहे, ती आहे विज्ञानाची कार्यप्रणाली. जीवसृष्टीच्या उत्पत्तीबद्दल, वाटचालीबद्दल आज आपल्यापाशी खूप खोलवर समज आहे, आणि हा समज घट्ट करण्यात सर्वात मोठे योगदान केले चार्ल्स डार्वनि या एकोणिसाव्या शतकातील इंग्रज शास्त्रज्ञाने. तरुणपणी डार्वनिला बीगल या संशोधन-नौकेवर निसर्गाचा अभ्यासक म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली. सफरीच्या सुरुवातीला डार्वनिच्या मनात त्या वेळचे प्रचलित समज घट्ट रुजलेले होते. या समजांप्रमाणे साऱ्या जीवजाती देवाने एकाच वेळी, आज जिथे आहेत त्याच ठिकाणी एकदाच निर्माण केल्या आणि त्या तशाच, तिथेच जशाच्या तशा टिकून आहेत. असाही समज होता की, प्रत्येक जीवजाती निर्माण करताना ईश्वराच्या मनात काही तरी आदर्श शरीररचना होती, त्याहून जे काही वेगळे दिसते ते सगळे सदोष आहे. एकाच मुशीत ओतल्याप्रमाणे अगदी एकसाच्याचे असणे ही जीवजातींची प्रकृती आहे, जे वैविध्य दिसते ती विकृती आहे. पण डार्वनि जसजसे जगभरचे जीवसृष्टीचे अफाट वैविध्य समजावून घेऊ लागला, त्याचा निरनिराळ्या खंडांत-बेटांत विस्तार पाहू लागला, तसतसे त्याच्या मनात अनेक प्रश्न डोकावू लागले. जर देवाने स्वतंत्रपणे जिथे आहेत तिथेच सगळ्या जीवजाती निर्माण केल्या, तर मग दक्षिण अमेरिकेजवळच्या बेटांवरच्या जीवजातींत आणि दक्षिण अमेरिका खंडावरच्या जीवजातींत खूप सारखेपणा का? आणि आफ्रिकेजवळच्या बेटांवरच्या जीवजाती इतक्या वेगळ्या का? भरपूर गोडे पाणी असलेल्या सागरी बेटांवर समुद्रप्रवास सोसू शकतील असे खवलेवाले सरडे दिसतात, पण त्या बेटावरच्या गोडय़ा पाण्यात खुशीने जगतील, पण ज्यांना समुद्रप्रवास सोसत नाही असे पातळ, ओलसर कातडीचे बेडूक दिसत नाहीत हे का? डार्वनिला वाटायला लागले की, छे:, मोठय़ा खंडांवर प्रथम जीवजातींची उत्क्रान्ती झाली, मग त्या अपघाताने, योगायोगाने दूरदूरच्या बेटांवर पोचल्या आणि त्यांनी तिथल्या परिस्थितीला यथावकाश जुळवून घेतले. समुद्राच्या खाऱ्या पाण्यावरचा दूरचा प्रवास सोसू शकत नाही म्हणून दूरच्या बेटांवर बेडूक नाहीत, पण असा प्रवास सहन करू शकणारे सरडे आहेत. या बदलांचा मूलाधार आहे, सर्व जीवजातींत आढळणारे मुबलक वैविध्याचे भांडार. या निसर्गनिर्मित वैविध्यातूनच कालक्रमे नवनव्या रूपांच्या, रचनेच्या, निसर्गात नवनव्या भूमिका बजावू शकणाऱ्या जीवजाती उद्भवल्या.
डार्वनिने निसर्गनिवडीची संकल्पना विशद करीत सुचवले की, सजीवांच्या सर्व व्यापारांमागे दोन मुख्य प्रेरणा आहेत- आत्मसंरक्षण आणि प्रजोत्पादन. सगळे जीव आपला देह जपत, आपली संतती जगात यशस्वी करण्याच्या प्रयत्नांत गढलेले भासतात. अगदी साध्या रचनेचे बॅक्टेरियाच बघा. त्यांचे पुनरुत्पादन म्हणजे सरळ विभाजनाने एका बॅक्टेरियाच्या दोन हुबेहूब प्रती बनणे, मग दोनाच्या चार, चाराच्या आठ, आणि काही दिवसांतच लक्षावधी प्रती घडवणे. पण जरी हे एकाच पूर्वजाचे लाखो वंशज असले, तरी ते अगदी एकासारखे एक साच्यातले नसतात. जीवांच्या आनुवंशिकतेचा मूलाधार असलेल्या जनुकांच्या प्रती बनतानाही अधूनमधून लाखांत- दहा लाखांत एखादी अशा चुका होतातच. अशा पूर्णपणे अपघातकी चुकांतून- म्यूटेशन्समधून काही वेगळे गुणधर्म उपजू शकतात. अनेकदा ही वैगुण्ये ठरतात, पण मधूनच अधिक सरस, गुणवान अवस्थाही निर्माण होऊ शकतात. जर अशा वरचढ म्यूटेशन्समुळे तो जीव प्राप्त परिस्थितीत जास्त कार्यक्षम बनला, त्याची पदास वाढली, तर अशी सरस म्यूटेशन्स असलेल्या जीवांचे एकूण समुच्चयातील प्रमाण वाढत जाते आणि हळूहळू, कदाचित शेकडो पिढय़ांनंतर सारा जीवसमुच्चय अशा गुणवान परिवíतत जनुकांनी संपन्न होतो.
दुसऱ्या महायुद्धानंतर एक मोठी वैद्यकीय क्रांती झाली, जगभर विषमज्वरासारख्या रोगांना रोखले गेले. याचे कारण म्हणजे माणसाने आरंभलेला निसर्गातल्याच एका परिणामकारक उपायाचा- अ‍ॅण्टिबायॉटिक्सचा- वापर. निसर्गात पेनिसिलयम्सारख्या काही बुरशा बॅक्टेरियांशी लढताना अशी अ‍ॅण्टिबायॉटिक रसायने बनवतात. त्यांचा उपयोग करीत आपणही रोग उत्पन्न करणाऱ्या विषमज्वरासारख्या बॅक्टेरियांचा पाडाव करू शकतो. पण माणसांसारख्या सावजांवर हल्ला केल्यावर मानवी शरीरांत अशी अ‍ॅण्टिबायॉटिक भेटली तर बॅक्टेरियांनाही अ‍ॅण्टिबायॉटिकांवर मात करणारी म्यूटेशन्स वाचवू शकतात. इतर असे अ‍ॅण्टिबायॉटिक प्रतिरोधक जनुक नसलेले बॅक्टेरिया अ‍ॅण्टिबायॉटिकांना बळी पडतात, तर प्रतिरोधक जनुकधारी तगून त्यांचे बॅक्टेरियांच्या समुच्चयातील प्रमाण वाढू लागते. याचा परिपाक म्हणजे हळूहळू अ‍ॅण्टिबायॉटिकांना दाद न देणारे बॅक्टेरियांचे वाण पसरू लागतात. पूर्वी सहज काबूत येऊ शकणारे रोग पुन्हा डोकी वर काढतात. हीच आहे डार्वनिच्या निसर्गनिवडीची प्रक्रिया. या प्रक्रियेतून, केवळ अपघातकी घटनांतून, अ‍ॅण्टिबायॉटिकवर मात करणाऱ्या बॅक्टेरियांसारखे, बदलत्या परिस्थितीला अनुरूप, जगण्यात अधिक प्रभावी अथवा प्रजोत्पादनात अधिक समर्थ असे जीव सतत उद्भवत राहतात.
डार्वनिच्या विवेचनानंतर समज खूप वाढत जाऊन उत्क्रान्तिसिद्धान्त आज शास्त्रीय जगात सर्वमान्य बनला आहे. म्हणजे सर्व वाद मिटले आहेत असे नाही. विज्ञानात अंतिम सत्य असे काहीही मानले जातच नाही. गेली दीडशे वष्रे नक्की काय नसíगक प्रक्रियांतून उत्क्रान्ती घडते, आणि त्याची काय निष्पत्ती आहे याबद्दल नवनवे पुरावे पुढे येत राहिले आहेत, नवनवी मांडणी होते आहे. आपण कोण, कोठून आलो, आणि कुठे जात आहोत या यक्षप्रश्नांची या विज्ञानयात्रेतून आतापावेतो पुढे आलेली उत्तरे खूप समृद्ध, समाधानकारक, मनोरंजक आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

या प्रक्रियेतून, केवळ अपघातकी घटनांतून, अ‍ॅण्टिबायॉटिकवर मात करणाऱ्या बॅक्टेरियांसारखे, बदलत्या परिस्थितीला अनुरूप, जगण्यात अधिक प्रभावी अथवा प्रजोत्पादनात अधिक समर्थ असे जीव सतत उद्भवत राहतात.

सगळ्या प्रतिजैविकांवर मात करणारे जीवाणू जसे उत्क्रांत होतात तसे सगळ्या जीवाणूंवर मात करणारे मनुष्यही उत्क्रांत होत असतील. पेनिसिलिन शोधून १०० वर्षे झाली नसावीत. शंभर वर्षांत त्यांच्यात उत्क्रांती झाली आणि त्यांनी ती बर्‍यापैकी पसरावली देखिल. आता लाखो वर्षांपासून जीवाणू मानवाच्या शरीरात येत असून देखिल मानवात मात्र अशी उत्क्रांती होत नाहीय.

निसर्ग मानवविरोधी वाटतोय. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जीवाणू आणि माणसाच्या स्केलमध्ये प्रचंड फरक आहे. माणूस अ‍ॅज इट इज इतका काँप्लेक्स आहे की चेंज आला तर तो पूर्ण चौकटीत नीटपणे बसवायला वेळ लागणे हे समर्थनीय आहे. जीवाणूचे स्केल इतके चिंधी आहे की शंभरेक वर्षांत बदल झालेले लगेच कळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

The scale of bacterias is miserly compared to total number of bacterias.
1. Total number of bacteria
2. Human affecting bacteria
3. Bacteria causing fever
4. Bacterias only in those human beings who were treated with antibiotics
5. Bacterias consuming anti-biotics only for the time in life of human being when he or she was ill
6. Bacteria that mutated
7. Bacteria that got transmitted through contagion

By the way how many instances of mutations and evolution took place in them?
Also, both the species, one with immunity to antibiotics and other other with it, everything else being same must be there.

हा कोट पाहा -
Bacteria that are resistant to modern antibiotics have even been found in the frozen bodies of people who died long before those antibiotics were discovered or synthesized.
इथून घेतला आहे-
http://www.answersingenesis.org/articles/am/v2/n3/antibiotic-resistance-...

हे बॅक्टेरियांचे एवोल्यूशन आहे कि नाही याबद्दलच शास्त्रज्ञांत वाद चालू आहे. पण असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

By the way how many instances of mutations and evolution took place in them?

टक्केवारी अन आकडेवारी हा तुमचा लाडका प्रांत आहे Wink काहीएक बदल झाले इथवर माहिती आहे.

Also, both the species, one with immunity to antibiotics and other other with it, everything else being same must be there.

मस्ट या आग्रहाचे कारण नसावे असे वाटते.

आणि महत्त्वाचे म्हणजे, मॉडर्न गोष्टींना रेझिस्टंट बॅक्टीरिया नव्याने सापडणे आणि आधीच्याच बॅक्टीरियामध्ये एव्होल्यूशन होणे या वेगळ्या गोष्टी आहेत. एक सापडले म्हणून दुसरा मुद्दा रद्द होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

टक्केवारी अन आकडेवारी हा तुमचा लाडका प्रांत आहे

अहो, जीवाणू करोडो प्रकारचे आणि प्रतिजैविके हजारो प्रकाचे. ७०% जीवाणूंत एक ना एक टाईपचा प्रतिजैविकरोध आहे म्हणे. म्हणून किती उत्क्रांत्या झाल्या असे विचारले आहे. तसे म्हणत आहेत ही उत्क्रांती प्रतिजैविकांचा शोध लागण्या अगोदरच झाली होती. Evolution in advance! Great!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इथे माझ्या मते स्केल म्हणजे आकार नव्हे तर आयुष्यकाल अथवा एका पिढीचा वेळ लक्षात घ्यायला हवा, कारण उत्क्रांतीचं प्रवास, हा जीवांची संख्या ह्या स्केलवर नसून पिढ्यांची संख्या ह्या स्केलवर आहे.
बॅक्टेरियाची एक पिढी २० मिनिटे किवा अधिक इतके आयुष्य असलेली असते, म्हणजे एका वर्षात बॅक्टेरियाच्या २६००० पिढ्या होऊ शकतात, तुलनाच करायची तर इतक्या पिढ्या जायला मानवाला साधारण साडेसात लाख वर्षे लागतील. एखादे म्युटेशन इतक्या प्रचंड कालावधीमध्ये मानावाच्याही लोकसंख्येमध्ये बर्यापैकी स्थिरावलेले असेल असा अंदाज आहे. अर्थात शेवटचे वाक्य अंदाज आहे, तज्ञ मत नव्हे, कदाचित पंधरा लाख वर्षेसुधा लागू शकतात म्हणजे बॅक्टेरियाच्या आयुष्यातली दोन वर्षे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे माझ्या मते स्केल म्हणजे आकार नव्हे तर आयुष्यकाल अथवा एका पिढीचा वेळ लक्षात घ्यायला हवा, कारण उत्क्रांतीचं प्रवास, हा जीवांची संख्या ह्या स्केलवर नसून पिढ्यांची संख्या ह्या स्केलवर आहे.

चला हे ही मान्य. पण असेच असेल तर प्रतिजैविक हेच काही एक जीवाणूंसमोरचं संकट नाही. मग इतरही हजारो उत्क्रांत्या व्हायला हव्या. तेथे क सगळं थंड आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काय मजा आहे. क्ष प्रकारची उत्क्रांती झाली की विचारणार य प्रकारची का नाही अँड व्हाईस व्हर्सा. आणि इतके पॉसिबल प्रकार असताना थोडीच व्हेरिएशन्स होतात म्हणजे ना के बराबर असे म्हणताहात.

पण भारंभार बदल व्हायला पाहिजेत या अपेक्षेमागे लॉजिक काहीच नाही. समजा काहीएक आकडा दिला तर म्हण्णार यापेक्षा जास्त वा कमी का नाही. समजा याचे उत्तर आले नाही की विज्ञान अपुरे म्हणून उड्या मारणार. पण अपुरे असेल तर नक्की कुठे अपुरे आहे आणि आपल्या त्या तथाकथित प्रीमॉडर्न सुवर्णयुगात यापैकी काय शक्य होते हे पाहण्याचे कष्ट नेहमीप्रमाणेच घेणार नाही. तार्किकतेची अपेक्षा एकाच बाजूकडून का ठेवा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा युक्तिवाद मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जिवाणूंसमोरची गेल्या काही पिढ्यातली संकटं तरी तीच आहेत, (म्हणजे प्रतिजैविक हीच), म्हणूनच त्याच्याशी संबंधित उत्क्रांती आपल्याला आपल्या आयुष्यकाळात दिसते. केवळ प्रतीजैविके नव्हे सर्व शक्य दिशांनी होणाऱ्या जीवाणू उत्क्रांतीची उदाहरणे आहेतच. तुम्हाला याच संस्थळावर वाचायलाही मिळतील
आत्ता जे काही झालंय तो हजारो उत्क्रांत्याचाच परिणाम आहे.
बाकीच्या बाबी बहुतेक वेळा फार संथपणाने बदलतात, म्हणूनच उत्क्रांती शक्य होते, अन्यथा प्रत्येक बदलानंतर सगळ्या जीवसृष्टीला समूळ नवीन सुरुवात करावी लागली असती.

१. मला हा शब्द आवडलेला नाही, इथे वास्तविक उत्क्रांतीची हजारो इटरेशन्स असा शब्द हवा
२, आमच्या 'लेन्स्की'काकांनी हा ढीगभर प्रयोग करून ठेवला आहे,
३. साधारण चार वर्षे (अँड काउटींग) चाललेल्या या प्रयोगात, एकाच प्रकारच्या जीवाणूपासून सुरुवात करून सरतेशेवटी १२ वेगवेगळ्या दिशांनी उत्क्रांत झालेले, बारा नवीन प्रकारचे गुणधर्म असलेले, बारा प्रकारे जिवंत राहू शकणारे, बारा वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया तयार झालेले होते. बहुतेक सर्वांच्या मते, हा प्रयोग आणि त्याचे निष्कर्ष, हा डार्विनिअन उत्क्रांतीवादाच्या विरोधी मतांच्या शवपेटीवरचा शेवटचा खिळा ठरला, कारण इथे प्रत्यक्ष उत्क्रांती घडताना बघता आली.
४. एका लेखामध्ये ह्या प्रयोगाविषयी घासूगुर्जीनी सविस्तर लिहिले आहे, कुणी दुवा देता काय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा डार्विनिअन उत्क्रांतीवादाच्या विरोधी मतांच्या शवपेटीवरचा शेवटचा खिळा ठरला,

वर मी दिलेल्या लिंकमधे जीवाणूंत जे होते ती उत्क्रांती नसतेच असे म्हटले आहे. कृपया लिंक वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वाचली देवा, तो मुद्दा अत्यंत तोकडा आहे, जीवाणू जीन बदलू (शफलिंग) शकतात माणसे बदलू शकत नाहीत म्हणून हि उत्क्रांती नाही असा दावा आहे, पण हा दावा सपशेल खोटा आहे. माणसे जीन बदलतात, प्रत्येक गर्भधारणेवेळी जेनेटिक शफलिंग होते, )
त्याच परिच्छेदातील लॉस ऑफ फंक्शनल सिस्टम हा मुद्दा तर चक्क हेतुतः दिशाभूल करणारा आहे, जसं जिवाणूंमधे हा लॉस होतो तसा इतर सर्व सजीवांमधे होतोच, रादर तेच तर उत्क्रांतीचं उपतत्व आहे.

१. आणि फक्त तेव्हाच होते, रोज तुमच्या पेशी लाखो वेळा मल्टीप्लाय होतात तेव्हा त्या फक्त प्रतिकृती बनवतात.

अवांतर - वैज्ञानिक प्रयोगाची माहिती जर आपण वैज्ञानिक संदर्भग्रंथात अथवा त्या प्रकारच्या अधिकृत साईटवर शोधली तर जास्त बरं होईल. तुमचा अजून गोंधळ होणार नाही. इतक्या महत्वाच्या प्रयोगाची माहिती तुम्ही "बायबलच्या दृष्टीकोनातून जग" असं शीर्षक असलेल्या साईटवर शोधाल तर काहीच हाती लागणार नाही असं एक निरीक्षण जाताजाता नोदवतो.

@मिसळपाव
ह्या प्रयोगाची नेचर व इतर मॅगझिन्स मधे प्रसिद्ध झालेली माहिती इथे आणि हि मिशिगन स्टेट युनिवर्सिटीची त्या प्रयोगाचीच साईट
पण थोडी क्लिष्ट आहे हा इशारा आधीच देऊन ठेवतो, घासकडवी त्यांच्या लेखाची लिंक देतील तर बरं होईल, खूप सोप्या भाषेत चांगली माहिती वाचायला मिळेल,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बायबलच्या दृष्टीकोनातून जग"

मी ती लिंक आणि त्यातले म्हणणे मागे घेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजून कुठे वाचायला मिळेल? (गूगल शंभर दुवे देईल. होपफुली तुझ्याकडे नेमका असेक. नसला तर सोडून दे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

ही घ्या राजेशच्या उत्कृष्ट लेखमालेची लिँक
www.aisiakshare.com/node/1562
हा शेवटचा भाग आहे. यात सर्व आधीच्या भागाच्या लिँक मिळतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंक चुकली गो. तू पहिल्या भागाची दिली आहेस.

हा दहावा आणि शेवटचा भाग. बाकीच्या लिंका यात आहेत.
http://www.aisiakshare.com/node/1785

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हि लेखमाला आणि अर्धवटाने सुचवलेली दोन पुस्तकं - बरीच सामग्री मिळाली. तुम्हा दोघाना (आणि राजेशला लेखमालिकेबद्दल आगाउ) धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

पुण्यात असाल तर डॉकिन्स व 'हीच' ची सगळी पुस्तके माझ्याकडे मुद्रित व ऑडीओबुक स्वरूपात आहेत, कधीही घेऊन जा..
आणखी एका पुस्तकाचं नाव राहिलं डोकिन्सचंच क्लाइम्बिंग माउंट इम्प्रोबाबल हेही याच विषयावर सुंदर पुस्तक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॅक्टेरीयाचा रेझिझ्टंन्स horiZontal gene transefer या प्रकारात मोडतो. http://en.m.wikipedia.org/wiki/Horizontal_gene_transfer

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

अ‍ॅडमीनलोग,
साला बातोबातोमे बहोत खर्चा.. हे., लेखन हो गया,
सगळी प्रश्नोत्तरे वेगळी काढून घासूनपुसून एक लेख करू का? तेवढ्च एक व्युत्पन्न शात्रीय लेख संदर्भ दाखले वगैरे देउन लिहिल्याचं माझं मलाच वाटेल आणि मिशीला कोकम लावून तूप तूप म्हणून फिरता येईल.

आणखी एक निर्लज्ज सुचना - तुम्हीच कुणीतरी करा की मग, उद्योग काय आहेत तुम्हाला. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ‍ॅडमीन नको, तूच लेख लिही आणि मी त्याला, फार नाही पण "मिसळपावने एका बातमीकडे लक्ष वेधून घेऊन फार महत्वाचे, विचाराना चालना देणारे वगैरे वगैरे प्रश्न विचारले ज्यामुळे मला हा लेख लिहायची प्रेरणा मिळाली" अशी माफक प्रस्तावना लिहून तुला मदत करेन Biggrin Biggrin

त्या लेखात ही पण लिंक टाक - जनरल पब्लिकसाठी लेक्चर्स आहेत. नायल्याने पाठवली मगाशी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

अर्धवटा, हे काम तू करच. मला जमेल तशी मदत मी करेन.

---

त्या निमित्ताने ही काही लेक्चर्स ऐकली होती. अगदी उत्क्रांतीशी संबंध नाही पण गुणसूत्रांशी आहे म्हणून दुवा देते आहे. (नावामुळे घाबरून जाऊ नये. माझ्या मते, मुलांबरोबर हे व्हीडीओ बघायला हरकत नाही.)
The Meaning of Sex: Genes and Gender

हे ही वाचनात आलं आहे: The human Y chromosome is here to stay

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरीच चर्चा झालेली आहे, आणि तीत अनेक चांगले मुद्दे आलेले आहेत. माझ्या परीने मी काही उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो.

- दोन कारणांमुळे उत्क्रांती होते.... प्रस्तावात दिलेल्या लेखात जी दोन कारणं म्हणून दिलेली आहेत त्यातलं खरं तर दुसरं कारण आहे, पहिला परिणाम आहे. जिराफाच्या मानेचं उदाहरण घेऊ. जिराफाची मान लांब का होते? हा विचार करताना कुठच्या जिराफाची मान लांब होते याबाबत गोंधळ न ठेवणं महत्त्वाचं. कुठच्यातरी एका काळी जिराफांची एक पिढी आहे असं समजू. ही पहिली पिढी. आता मानेची लांबी ठरवणारा एकच एक जीन आहे असंही गृहित धरू. एकच जीन म्हणजेही समजून घ्यायला हवं. गुणसूत्रं हे जिराफ बनवण्याचं डिझाइन, ब्लूप्रिंट किंवा एक पाककृती असते. आता या पाककृतीच्या पुस्तकाच्या ४७ व्या पानाच्या चौथ्या ओळीतला सहावा शब्द हा मानेची उंची दर्शवतो. (हे खूपच सुलभीकरण आहे, पण तूर्तास सत्य आहे असं मानू) आता या काल्पनिक जिराफांच्या पहिल्या पिढीतल्या सर्व जिराफांसाठी आपण तो शब्द काय आहे असं पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की तिथे ६ फूट, ७ फूट किंवा ८ फूट असं लिहिलेलं आहे. म्हणजे या पिढीतल्या ३०० जिराफांपैकी शंभरांची मान ६ फूट आहे, शंभरांची ७ फूट आहे आणि उरलेल्या शंभरांची मान ८ फूट आहे. या आधीच्या पिढ्यांमध्ये झाडांची कमतरता नव्हती, त्यामुळे सर्वांनाच बऱ्यापैकी खाणं मिळायचं. मात्र जिराफांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे या पिढीला अन्नाचं दुर्भिक्ष्य जाणवायला लागलं आहे. आता जी अन्नासाठी स्पर्धा होईल त्या ८ फूटवाल्यांचा फायदा होईल, ६ फूटवाल्यांचा तोटा होईल. हा तोटा झाल्यामुळे त्यातल्या काही जणांना पुनरुत्पादन करता येणार नाही. या उलट ८ फूटवाल्यांना फायदा होईल, कारण त्यांना अधिक माद्या उपलब्ध होतील. म्हणजे पुढच्या पिढीत ६ फूटवाले ९८, ७ फूटवाले ९९ आणि ८ फूटवाले १०३ होतील. हेच पिढ्यान पिढ्या चालू राहिलं तर एक वेळ अशी येईल की ६ फूटवाले शून्य, ७ फूटवाले ५० आणि ८ फूटवाले २५० होतील. कालांतराने फक्त ८ फूटवाले शिल्लक राहतील. आता या पिढीत जर त्या विशिष्ट जीनमध्ये म्यूटेशन झालं आणि ८ ऐवजी ९ आकडा असलेला जीन तयार झाला तर याच पद्धतीने ९ फूट वाल्यांची संख्या वाढत जाईल. शेकडो पिढ्यांनी फक्त ९ फूट मान असलेले शिल्लक राहतील.

प्रश्न असा आहे की म्यूटेशन उलटं होईल का? म्हणजे ९ फूटवाल्या पॉप्युलेशनमध्ये असा जिराफ जन्माला येईल का ज्याच्यासाठी हा आकडा ८ फूट असेल? अर्थातच. म्यूटेशन्स होतात तेव्हा बहुतेक वेळा बदल हा बिनफायदेशीर किंवा तोट्याचा असतो. पण तो पिढ्यापिढ्यांमध्ये पुसला जातो. कारण पुन्हा तेच. ९ फूटांच्या पॉप्युलेशनशी स्पर्धा करताना ८ फूटवाल्याचा टिकाव राहत नाही. त्यामुळे म्यूटेशन्स होत राहतात, पण प्रजाती बदलतेच असं नाही.

तत्त्वतः एलिफंट शार्क ज्या परिस्थितीत राहतो त्या परिस्थितीशी त्याचे गुणधर्म मिळतेजुळते असतील तर आणि परिस्थिती बदलली नाही तर म्यूटेशन्समुळे होणारे बदल टिकून न राहणं अशक्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माकडाची शेपूट गळून पडली की माणूस होतो. झाली उत्क्रांती. इतकं सोप्पय. का वाद घालताय राव. ती शेपूट गळून केव्हा पडणार ही देवाची मर्जी.... अर्थात काही लोकांची शेपूट गळून पडावी असं देवालाही वाटंत नाही, कदाचित त्यांचा माणूस व्हायला बराच अवकाश असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

हे पहा विशालकाय सुएझमॅक्स ३ लाख पेक्षा जास्त टनांचे vlcc, सममित, क्रूड ऑयलचे टँकर! लाखों वर्षांपूर्वी तराफा असत. त्यापूर्वी हाताने वल्हवलेल्या छोट्या होड्या असत. बिलियन्स ऑफ इअर्स बॅक, झाडांची पाने पाण्यावर तरंगत (आजही तरंगतात)!! तत्पूर्वी पाण्याचे बुडबुडे असतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.