Skip to main content

सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग १)

तीन पत्तीच्या खेळात कोण टेबलावर जोरात पैसे आपटतो आणि बोली चढवतो याचा हातात प्रत्यक्ष काय डाव आहे याच्याशी काहीच संबंध नसतो. विशेषतः बाकी सगळे जण फोल्ड झाल्यावर, शेवटच्या दोघांतच डाव चालू असतो तेव्हा. फोल्ड होणारे हातात कचरा पानं आहेत म्हणून फोल्ड होतात. किंवा हातात तितकी वाईट पानं नसली तरी उधारीने पैसे घेऊन डाव लावण्याइतकी चांगली पानं नसल्यामुळे फोल्ड होतात. पण शेवटच्या दोघांकडेही चांगलीच पानं आहेत हे आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येत नाही. त्यांच्यातला एक जण फक्त एस हाय वर लाखो रुपये चढवू शकतो. त्यासाठी जिगर लागते, आणि अधूनमधून अशा बाज्या हरूनही शिल्लक रहातील इतके पैसे.

त्या दोघांपैकी जो खरंच चांगल्या डावावर बोली चढवत असतो त्याचं काय? समोरच्याचा आत्मविश्वास पाहूनच कधीकधी त्याला डळमळायला होतं. समोर पडलेल्या नोटांच्या ढिगांचा मोह असतो, पण त्यासाठी आपले किती पैसे लावायचे? जुगार खेळताना पत्त्यांबरोबर खेळण्यापेक्षा तो समोरच्या माणसाबरोबर खेळायचा असतो. त्यासाठी त्या माणसाला ओळखण्याची गरज असते. समोरचा माणूस खोटारडा असल्याची खात्री असेल तर त्याने लावलेल्यापेक्षाही मोठी थप्पी टाकून, 'चल, दाखव पानं' म्हणावं लागतं. गंमत होते ती बिनजोकरच्या कॅटमधले तीन एक्के आपल्या हातात असतात तेव्हा. कितीही का तो नाटकं करेना, जेव्हा पत्ते दाखवण्याची वेळ येईल, तेव्हा काय होणार आहे हे ठरलेलंच आहे.

सुमारे पाच वर्षांपूर्वी असा एक खेळ झाला. तीनपत्ती, पोकर वगैरे पत्त्याचा खेळ नाही. पण त्या खेळाचे स्टेक्स खूपच मोठे होते. त्याची ही गोष्ट.

खेळाडू होते रिचर्ड लेन्स्की आणि ऍंडी श्लाफ्ली. लेन्स्की एक शास्त्रज्ञ, श्लाफ्ली एक वकील. श्लाफ्लीने लेन्स्कीला पत्र पाठवून कळवलं, त्याचा सारांश असा. "तुम्ही प्रसिद्ध केलेल्या संशोधनाबाबत काही शंका उपस्थित झालेल्या आहेत. विशेषतः इ. कोलाय बॅक्टेरियात सायट्रेट पचवू शकण्याची क्षमता निर्माण होण्याबद्दल तुम्ही जे काही प्रसिद्ध केलेलं आहे त्याबाबत. तुमचं हे संशोधन जनतेच्या पैशाने झालेलं आहे. आणि नॅशनल सायन्स ऍकेडमीच्या नियमांप्रमाणे हा विदा देणं तुम्हाला पर्याप्त आहे. तेव्हा आम्हाला तुमचा सगळा डेटा पाठवा. हे पत्र व त्यावरचं तुमचं उत्तर मी आमच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करणार आहे."

वाचताक्षणीच आपल्याला काहीतरी पाणी मुरत असल्याचं लक्षात येतं. लेखकाचा स्वर अभ्यासकाचा नसून उर्मटपणा आणि अरेरावी करणाराचा आहे हे जाणवतं. लेन्स्की हा बडा शास्त्रज्ञ. त्याला आपल्या क्षेत्रात कोण कोण नक्की काय करतं आहे, आणि कोणाचे नक्की काय स्वरूपाचे आक्षेप आहेत हे अर्थातच ठाऊक होतं. हा कोणीतरी टिक्कोजीराव वकील येतो आणि ज्या विषयातलं काही कळत नाही त्यातला सर्व डेटा मागतो तेसुद्धा 'मला हक्क आहे म्हणून' यावरूनच त्याच्या मनात संशय उभा रहाणं साहजिक होतं. अर्थात लेन्स्कीला याहूनही अधिक माहीत होतं. ऍंडी श्लाफ्ली म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून 'कंझर्व्होपीडिया' या वेबसाइटचा मालक. मग त्याची आपल्याशी दुष्मनी असणारच.

हे नाट्य कळण्यासाठी आपल्याला 'कंझर्व्होपीडिया' नक्की काय आहे, आणि ती साइट कुठच्या विचारप्रवाहातून निर्माण झाली आहे हे समजावून घेतलं पाहिजे.

अमेरिकेत लिबरल आणि कंझर्व्हेटिव्ह असे दोन विचारप्रवाह आहेत. (डेमोक्रॅट व रिपब्लिकन हे पक्ष अनुक्रमे त्या दोघाचं सर्वसाधारणपणे प्रतिनिधित्व करतात. ) तसे प्रवाह जगभरच दिसतात - सुधारक आणि सनातनी. आहे ते बदलून नवीन स्वीकारणारे, पुरोगामी हे लिबरल तर जुनं ते सोनं मानणारे कंझर्व्हेटिव्ह. लिबरल हे बऱ्याचवेळा सेक्युलर असतात तर कंझर्व्हेटिव्ह हे देव-धर्माबाबत कर्मठ असतात. लिबरल हे व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करतात तर कंझर्व्हेटिव्ह कुटुंबसंस्थेच्या स्थैर्यावर भर देतात. इतके फरक असल्यामुळे अनेक विषयांवर त्यांच्यातली मतभिन्नता आणि त्यातून होणारे सास्कृतिक संघर्ष दिसून येतात. गर्भपात करणं हा स्त्रीचा अधिकार समजणारे आणि गर्भपात म्हणजे हत्या समजणारे यांच्यात होणाऱ्या शाब्दिक मारामाऱ्या कधीकधी हिंसेपर्यंतही जातात. काही अतिरेकी गर्भपाताची कायदेशीर ऑपरेशन करणाऱ्या क्लिनिक्सवर हल्ला करतात, जाळपोळही होते. या लिंकवर वेगवेगळ्या विषयांवर लिबरल आणि कंझर्व्हेटिव्ह यांच्या भूमिका कशा वेगळ्या आहेत याचा आढावा आहे. http://www.studentnewsdaily.com/conservative-vs-liberal-beliefs/

कंझर्व्हेटिव्ह विचारसरणीकडे खोलात पाहिलं की लक्षात येतं - त्यांच्यावर ख्रिश्चॅनिटीचा प्रचंड पगडा आहे. समलिंगी संबंधांना विरोध कारण बायबलमध्ये ते घृणास्पद कृत्य मानलं आहे. गर्भपाताला विरोध कारण मुलं ही देवाची देणगी आहे, आणि शिवाय गर्भपात होऊ दिले तर त्यातून व्यभिचाराला निमंत्रण मिळेल, इ. इ. याचंच आणखी एक लक्षण म्हणजे उत्क्रांतीवादाच्या शिकवणुकीला विरोध. हे जग आणि प्राणीसृष्टी ख्रिश्चन देवाने सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी निर्माण केली असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. त्याविरुद्ध काही शिकवणं म्हणजे बायबलचा शब्द खोटा आहे हे शिकवणं. हे सनातनींना कधीच मान्य होत नाही. डार्विनने उत्क्रांतीवाद मांडून दीडशे वर्षं होऊन गेली. शालेय अभ्यासक्रमात तो स्थिरस्थावर होऊनही अनेक दशकं झाली. तरीही तो शालेय पुस्तकातून पुसून टाकण्याचे प्रयत्न चालू असतात. आजही अमेरिकेतले सुमारे चाळीस टक्के लोक उत्क्रांतीवाद चूक, बायबल बरोबर असं मानतात. यावरून 'शाळेत शिकवलेलं परीक्षेत मार्क मिळवण्यापुरतं, पण आपले आईबाप जे सांगतात, आणि चर्चमधले पास्टर जे सांगतात ते खरं!'

अनेक राज्यांमधल्या स्कूल बोर्डवर आपले प्रतिनिधी नेऊन पाठ्यपुस्तकं बदलून घेण्याचे प्रयत्न तितके यशस्वी झाले नाहीत. कारण उत्क्रांतीवादामागे इतका मोठा अभ्यास, इतके पुरावे आहेत की ते न शिकवणं हे सत्य नाकारण्यासारखं आहे. अमेरिकेसारख्या आधुनिक देशात असा सत्य लपवण्याचा प्रकार व्हावा हे शक्यच नाही. त्यामुळे नव्वदच्या दशकात कंझर्व्हेटिव्ह लोकांनी एक नवीन क्लृप्ती योजली. उत्क्रांतीवाद लपवण्यापेक्षा जर विज्ञानाच्या पुस्तकात त्या शेजारीच 'देवाने पृथ्वी आणि जीवसृष्टी निर्माण केली' असं लिहिता आलं तर? म्हणजे एकाच वेळी उत्क्रांतीवाद ही दोन समान शक्यता असलेल्या थिअरींपैकी एक असं दाखवता येईल. आणि राजरोसपणे ख्रिश्चन संकल्पना शाळेच्या माध्यमातून मुलांवर भिनवता येतील. अर्थातच अमेरिकेन घटनेतर्फे सरकार कुठच्याही धर्माची भलावण करू शकत नाही. तेव्हा 'देव' किंवा 'God' हा शब्द वापरता येणार नाही. म्हणून 'इंटेलिजेंट डिझाइन' नावाची एक बोगस 'थिअरी' पुढे केली गेली. 'या जीवसृष्टीतली क्लिष्टता इतकी अफाट आहे, की कुठच्याही प्रक्रियेने ती आपोआप निर्माण होणं शक्य नाही. तेव्हा कोणातरी सुजाण शक्तीने ही सृष्टी निर्माण केली असली पाहिजे.' हा या थिअरीचा गाभा. नव्वदच्या आणि दोन हजारच्या दशकात शाळांतून 'दोन्ही शिकवा, व विद्यार्थ्यांना ठरवू द्या. उत्क्रांतीवाददेखील एक थिअरीच तर आहे शेवटी.' अशा मागण्या व्हायला लागल्या.

(क्रमशः)

Node read time
4 minutes
4 minutes

राजन बापट Thu, 07/02/2013 - 08:58

In reply to by ॲमी

हेच म्हणतो. रंजक आणि उद्बोधक असं दोन्ही प्रकारचं एकत्र वाचायला मिळणार.

ऋषिकेश Thu, 07/02/2013 - 09:09

In reply to by राजन बापट

असंच म्हणतो.. पुढिल भाग लगेच येऊदे

मन Thu, 07/02/2013 - 09:30

In reply to by ॲमी

असेच म्हणतो.
सध्या लेख वरवर चाळलाय. त्यावरून रमताराम ह्यांच्या आंतरजालावरील "रोश विरुद्ध अ‍ॅडम्स " ह्याची आठवण झाली.

बॅटमॅन Thu, 07/02/2013 - 10:48

रोचक सुरुवात!!! पुभाप्र.

अवांतरः या एकेश्वरवादाने पछाडलेल्यांचा अतिरेक का बरे असतो नेहमी? च्यायला आमचं बघा, कोणीही या, काहीही बोला, जाळपोळ हाणामार्‍या नाहीत. शंकराचार्य आणि मंडनमिश्र, कुमारिलभट्ट आणि बौद्ध काय तो वाद घालोत, पण म्हणून कोणी गळे कापत नव्हतं ब्वॉ.

मन Thu, 07/02/2013 - 11:01

In reply to by बॅटमॅन

माझीही पूर्वी अशीच समजूत होती.
नंतर बरीच वेगळी माह्जिती ऐकण्यात आली.( त्यातही मत मतांतरे आहेतच.)
फुर्सतीत परतून टंकेन.
तथाकथित सहिष्णू धर्म वाल्यांनीही धर्माच्या नावावर लढाया,भांडणे, कत्तली वगैरे केल्या आहेत असे ऐकून आहे.

बॅटमॅन Thu, 07/02/2013 - 11:20

In reply to by मन

सर्वांना कॉमन प्रतिसाद.

ज्ञानेश्वर, बसवेश्वर, आगरकर ही उदाहरणे आहेतच. पण इथेही कोणी, निव्वळ धर्मविरोधी आहे म्हणून गळे कापले का? "इनफिडेल" म्हणून मारले का? तमिऴनाडूमधले शैव-वैष्णव झगडे हे शियासुन्नी किंवा कॅथलिक-प्रोटेस्टंट किंवा क्रूसेड्स च्या पासंगाला तरी पुरतात का? हिंदू धर्मातील विसंगती, अन्याय, जातिभेद, इ. विरुद्ध कोणी टीका केली तर ठार मारल्याचे उदाहरण द्यावे- आणि एखादे उदाहरण देऊनही भागणार नाही. आयसोलेटेड धर्मवेडे तसे सगळीकडे सापडतात. पण इस्लाम नैतर क्रिश्चिअ‍ॅनिटीमध्ये विरोधी मतप्रवाहाची पुस्तके जाळणे, त्याच्या तत्वज्ञांना हालहाल करून मारणे, इ. ची कितीक उदाहरणे जी दिसतात, त्याला आपल्याकडे पॅरलल आहे का? ते मला कोणी सांगावे.

... Thu, 07/02/2013 - 11:26

In reply to by बॅटमॅन

जिवंत माणसाची प्रेतयात्रा काढण
वाळीत टाकण मारेकरी पाठवण (महात्मा फुले) हे माझ्या मते ठार मारण्याइतकेच गंभीर गुन्हे आहेत

बॅटमॅन Thu, 07/02/2013 - 11:37

In reply to by ...

मारेकरी पाठवणे सोडून बाकी असहमत. असे मारेकरी तरी किती जणांवर पाठवले गेलेत? इंटर-पांथिक झगडे हिंदू धर्मात किती वारंवारतेने झालेत? मी उगीच समर्थन करीत नाहीये. समाज म्हटला की सुधारणेला विरोध होणार, हे ओघाने आलेच. पण त्या विरोधाची तीव्रता हीदेखील समाजप्रकृतीतूनच सिद्ध होत असते. मी म्हणतोय जनरली स्पीकिंग हिंदू धर्मात क्रिश्चन-मुसलमानांसारखा कडवेपणा दिसत नाही. रामायण-महाभारतातील पात्रांबद्दल अश्लील बोलणारेही कितीक महाभाग पाहिलेत. काही तशा व्हर्जन्स जुन्याही आहेत असेही ऐकून आहे. पण यांविरुद्ध कोणी फतवा काढत नाही. हिंदू धर्म अगदी परंपरावादी होता तेव्हाही, वेदनिंदक असोत किंवा अजून कोणी, समाजाने वाळीत टाकले तरी शेवटी सामावून घेतलेच ना. असे उदाहरण इस्लाम-क्रिश्चानिटीत सहजी सापडणारे नाही. कोपर्निकस, जिओर्डानो ब्रूनो यांनी बायबलविरुद्ध काही म्हटले तर त्यांना जाळण्यासारखा प्रकार आपल्याकडे कुठे घडला? आर्यभट्टाचा सिद्धांत चूक आहे इतके म्हणून लोक गप्प बसले, इतकेच. चार्वाकादि लोकांचे तरी असे शिरकाण कुठे झालेय?

ऋषिकेश Thu, 07/02/2013 - 11:45

In reply to by बॅटमॅन

मी स-स्मायली "खरंच" असं लिहिताना डोळ्यासमोर शैव-वैष्णव झगडे होते हे कबूल करतो. तसेच आता (गेल्या वीसेक वर्षात) निर्माण झालेले इतर धर्मियांविरूद्धचे 'कडवे हिंदुत्त्व' ही होते.
हिंदुंचा 'सहिष्णुता' हा युएसपी आहे (किंबहूना इतक्या कडव्या आक्रमाणानंतरही टिकून रहाण्याचे कारण आहे) अशी माझी मान्यताही आहे. [त्याही पुढे जाऊन हिंदूनी 'कडवे' होणे हे हिंदुत्त्व सोडून देणे आणि इतर धर्मियांसारखे वागणे किंवा त्यांच्या प्रभावाखाली येणे वगैरेही वाटते.. आणि मग त्याच ओळीत स्वतःला हिंदु म्हणवणारे गांधी आठवतात.. पटतात.. पण ते अवांतर]

तर सांगायचा मुद्दा अशी सगळी मान्यता असूनही

कोणीही या, काहीही बोला, जाळपोळ हाणामार्‍या नाहीत

हे वाक्य अजिबातच पटत नाही! :)

बॅटमॅन Thu, 07/02/2013 - 11:51

In reply to by ऋषिकेश

ओके, मी परत क्लॅरिफाय करतो. माझे वाक्य हे तुलनात्मक आहे, अ‍ॅब्सोल्यूट नाही, आणि जरा जुन्या काळाला लागून आहे. स्वीपंग स्टेटमेंटचा बोध होत असल्याने ते रिफाईन करून म्हणतो., की:

परधर्मीय किंवा स्वधर्मीय पण प्रचलित धर्माविरुद्ध काही बोलणार्‍यांप्रती बहुतांशी सहिष्णुता आणि शेवटी त्यांनाही मुख्य प्रवाहात सामावून घेणे हे हिंदू धर्माचे अन्य एकेश्वरी धर्मांच्या तुलनेत वेगळे वैशिष्ट्य आहे. निव्वळ धर्माच्या नावाखाली मारामारी करणे हे हिंदू लोकांमध्ये अपवादाने दिसते.

उपलब्ध माहितीच्या आधारे हा निष्कर्ष चूक ठरेल, असे मला वाटत नाही. अन्य विदा कुणाकडे असल्यास जरूर शेअर करावा. माझ्या माहितीत नक्कीच मोठी भर पडेल.

... Thu, 07/02/2013 - 11:56

In reply to by ऋषिकेश

एक्झटली
आय अँग्री विथ ऋषिकेश

हिँदू धर्मात जाळपोळ मारहाण खून वगैरे झालेच नाहीत म्हणजे हिँदू धर्म सहिष्णू आहे अस नाही
टाँर्चर करण्याची पध्दतीतच काय तो फरक

इथे एक ऐकलेल वाक्य आठवत
hindus are liberal only towords externals

बॅटमॅन Thu, 07/02/2013 - 12:06

In reply to by ...

हिँदू धर्मात जाळपोळ मारहाण खून वगैरे झालेच नाहीत म्हणजे हिँदू धर्म सहिष्णू आहे अस नाही

सहमत आणि असहमत.

सहिष्णू ही टर्मसुद्धा तौलनिकच आहे. इंटर-पांथिक झगडे एक तर निव्वळ धार्मिक कारणांमुळे फारसे कधी झालेत का? बरं, जेव्हा जेव्हा झाले, तेव्हा तेव्हा त्याला मुख्यतः आर्थिक अँगल किंवा वैयक्तिक स्कोर सेटलिंगचा वास होता की नव्हता?

टाँर्चर करण्याची पध्दतीतच काय तो फरक

पद्धत आणि तीव्रतेतही फरक होता. एका गावाने वाळीत टाकलं म्हणून कोणी मरत नव्हतं तेवढ्यासाठी. भक्तीमार्गासारख्या गोष्टींमुळे एका मर्यादेपर्यंत का होईना, जातीपातींची अडचण उरली नव्हती. आंतरजातीय बेटीव्यवहार हा तर सार्वकालिक सेन्सिटिव्ह इश्श्यू. पण तेवढे एक सोडले तर प्रत्येकाला गावगाड्यात एकमेवाद्वितीय स्थान होतेच. प्रत्येक जातीचे पौरोहित्यही वेगळे होते. ही विकेंद्रित व्यवस्थाच सहिष्णुतेला कारणीभूत ठरली. एका जातीने वाळीत टाकले तरी चोरीछिपे कोणीतरी थारा द्यायचंच.

hindus are liberal only towords externals

हे वाक्य बोलकं आहे. याच्याशी असहमत होणं सोपं नाहीये, तरी मी बदल करून असे म्हणेन, की

hindus are मोर liberal towords externals.

पण इतर धर्मांच्या तुलनेत हेही चांगलेच नाही काय? धर्माअंतर्गत बेबंदशाहीच्या उदाहरणासाठी हिंदू धर्माचे उदाहरण चपखल असले, तरी क्रिश्चानिटी आणि इस्लाम तरी सरळ आहेत का? हेही सांगावे.

मला उगीच कुणा धर्मावर टीका करायची इच्छा नाही, पण काही प्लस पॉईंट्स इग्नॉर का करावेत, हा एक प्रश्न पडतो.

नगरीनिरंजन Thu, 07/02/2013 - 12:20

In reply to by बॅटमॅन

प्लस पॉईंट बाय डिझाईन नाहीत ना नाहीतर कौतुक करायला हरकत नव्हती.
हिंदू विचारसरणीत बलात्काराने धर्मप्रसाराची सोय पहिल्यापासून ठेवली नाही ती काही इतर धर्मीयांबद्दलच्या सहिष्णुतेमुळे ठेवली नाही असे मला वाटत नाही. केवळ हिंदू धर्म सगळ्यात जुना असल्याने त्यात ती सोय नसावी असे वाटते.
या उलट स्वतःची सत्ता आणि उच्चपणाची भावना जपण्यासाठी बाटलेल्यांना पुन्हा धर्मात घेणे आणि धर्मातल्या धर्मातही वर्णांतर करणे याला नेहमीच विरोध झाला आहे.
असो.
वर्तमानकाळी कोणीही कोणत्याही धर्माचा अभिमान बाळगावा अशी परिस्थिती नाही.

बॅटमॅन Thu, 07/02/2013 - 12:25

In reply to by नगरीनिरंजन

प्लस पॉईंट बाय डिझाईन नाहीत ना नाहीतर कौतुक करायला हरकत नव्हती.

असा दावा मी कुठेच केला नाही. सहिष्णुतेसाठी वेद, गीता वगैरेंची मी उदाहरणे कुठेच दिली नाहीत :) स्वतःला हिंदू म्हणवणार्‍या लोकांच्या आचरणाचा इतिहास पाहता मी सांगतोय इतकेच.

हिंदू विचारसरणीत बलात्काराने धर्मप्रसाराची सोय पहिल्यापासून ठेवली नाही ती काही इतर धर्मीयांबद्दलच्या सहिष्णुतेमुळे ठेवली नाही असे मला वाटत नाही. केवळ हिंदू धर्म सगळ्यात जुना असल्याने त्यात ती सोय नसावी असे वाटते.

हिंदू धर्मप्रसाराची सोय का नव्हती हा रोचक मुद्दा आहे, पण अधोरेखित भागाशी असहमत.

वर्तमानकाळी कोणीही कोणत्याही धर्माचा अभिमान बाळगावा अशी परिस्थिती नाही.

अंध अभिमान, सरसकट अभिमान, आमचीच लाल, इ. करू नये हे मलाही पटते. पण म्हणून बाकी प्लस पॉईंट्स आहेत ते आहेतच. अर्थातच ते बाय डिझाईनच आहेत असेही नाही.

काळा मठ्ठ बैल … Thu, 07/02/2013 - 13:31

In reply to by बॅटमॅन

साडेतीन ट्क्क्यांनी बहुसंख्य दलितांना पायाखाली तुडवायचं.
धर्मग्रंथच काय, लिहा-वाचायलासुद्धा शिकवायचं नाही.
मग कोण धर्मावर टीका करणार?
चांगलीच मारून ठेवली तुम्ही.
आणि मग स्वतःलाच सहिष्णु म्हण्वून घेतात.
आहा रे न्याय.

बॅटमॅन Thu, 07/02/2013 - 13:51

In reply to by काळा मठ्ठ बैल …

या प्रतिसादाचा सूर खोडसाळ दिसतोय हे स्पष्टच आहे. तरी डोके ताळ्यावर ठेवून उत्तरे देतो.

धर्मग्रंथ न वाचतादेखील टीका केल्याची उदाहरणे सापडतील-तीदेखील शिक्षणप्रसार होण्याच्या आधीच्या काळातील. बाकी प्रत्येक गोष्टींसाठी ब्राह्मणांना जिम्मेदार ठरवता येणार नाही. क्षत्रियांचा सहभाग असल्याशिवाय हे तथाकथित साडेतीन टक्के कसला डोंबलाचा अत्याचार करणार होते? असो.

कमीतकमी हे तरी मान्य करावेच लागेल, की आता परिस्थिती बदललीये काही अंशी का होईना. पण अशी परिस्थिती इतर धर्मांत एक तर निर्माणच झालेली नाही, किंवा जिथे झाली तिथे खूप रक्तरंजित क्रांत्या वगैरे होऊन मग झालीये. तुलनेने हिंदूंमधील समाजसुधारणा बर्‍यापैकी शांततेच्या मार्गाने झाली असे म्हणणे आणि त्याबद्दल हिंदूंची पाठ थोपटणे यात चूक काय आहे हे मला समजले नाही.

पण नुसती मुक्ताफळे उधळायची हे ठरवलंच असेल तर मी किंवा अजून कोणीही काय बोलणार. तुमच्या नावाला साजेसे वर्तन करू नका इतकेच सांगणे.

विसुनाना Thu, 07/02/2013 - 13:56

In reply to by बॅटमॅन

गॉथॅमकर, थंड घ्या. बात को समझो. र्‍हेटॉरिक आहे ते. राजा टकल्या आहे म्हटल्यावरच राजाला राग येतो. तुम्हाला का यावा?

बॅटमॅन Thu, 07/02/2013 - 14:14

In reply to by नगरीनिरंजन

या उलट स्वतःची सत्ता आणि उच्चपणाची भावना जपण्यासाठी बाटलेल्यांना पुन्हा धर्मात घेणे आणि धर्मातल्या धर्मातही वर्णांतर करणे याला नेहमीच विरोध झाला आहे.

धर्मांतराला देवलस्मृतीत प्रायश्चित्त सांगितलंय. मेनस्ट्रीमकडून हा प्रयत्न झाला हे चांगले उदाहरण नव्हे काय?

बाकी वर्णांतराबद्दल सहमत आहे, पण तेही लार्जलि गुप्तोत्तर काळात जास्त स्तोम माजल्याचे दिसते. त्याच्या आधी तसे उदाहरण दिसत नाही.

अनुराधा१९८० Fri, 08/02/2013 - 16:19

In reply to by ...

टाँर्चर करण्याची पध्दतीतच काय तो फरक>>>> तुम्हाला बुरख्यात रहावे लागले असते तर मग कळले असते सहिष्णुता काय असते ते. तुम्ही सोडुन का देत नाही हा तुम्हाला न आवडणारा धर्म?

... Fri, 08/02/2013 - 17:42

In reply to by अनुराधा१९८०

सुचवणीबद्दल धन्यवाद

बुरखा वैग्रे प्रकार नसले तरी शिक्षणाचा हक्क नाकाराण; सतीप्रथा, बालिकाहत्या हे प्रकार माझ्या मते बुरख्या इतकेच अनिष्ट आहेत

बाकी माझा धर्म काय कोणता याबद्दल इतरांनी ऊठाठेवी न केलेल्या बरा

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 07/02/2013 - 12:00

In reply to by बॅटमॅन

शंकराचार्य आणि मंडनमिश्र, कुमारिलभट्ट आणि बौद्ध, किंवा ज्ञानेश्वर, बसवेश्वर, आगरकर सोडून देऊ. हे सेलिब्रिटी लोकं. सामान्यांचं आयुष्य बघू या. स्वतःच्याच धर्माच्या २०-२५% लोकांना पशूवत जिणं धर्माच्या नावाखाली अन्य कोणत्या धर्माने देऊ केलं आहे का?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 07/02/2013 - 19:41

In reply to by ऋषिकेश

छे, विसरणार कशी? पण बाकी कितीही फरक असले तरी या बाबतीत सगळ्या धर्मांनी सर्वधर्मसमभाव दाखवल्यामुळे एकाला झाकावं, दुसर्‍याला काढावं. एका धर्मातले धर्मगुरू म्हणायचे, स्त्रियांचा मेंदू लहान असतो. दुसरीकडचा म्हणे, "ये सब ताडन के अधिकारी।". तिसर्‍या समाजात स्त्रियांची पाळी बंद झाली की त्यांना डाकिणी, जखिणी ठरवून मारायला सुरूवात. चौथीकडे आणखी काही.

ज्या समाजाने जेवढ्या लवकर धर्माला गुडबाय केला, त्यांची प्रगती तेवढी लवकर झाली. 'उत्क्रांती'चे असे टप्पे जगात आज प्रत्यक्षात बघायला मिळतात.

बॅटमॅन Thu, 07/02/2013 - 12:19

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हिंदू धर्मातील जातींची उतरंड अन्यायकारक आहे याबद्दल शंकाच नाही. आहे/होते ते नाकारण्यात काही पॉईंट नाही.

पण हे असूनही, त्यावर मात करण्याचे प्रयत्न झाले, आणि काही अंशी का होईना, ते यशस्वी होताहेत. इनफॅक्ट, जे लोक आधी "त्या" लोकांची सावली अंगावर पडली म्हणून विटाळ मानायचे, त्यांपैकी काहींच्या कन्यांनी त्यांच्याशी विवाहही केलेले आहेत. बरेचसे हिंदू लोक आता अशा शिवाशीव वगैरे गोष्टी मूर्खपणाच्या मानतात.

मुख्य मुद्दा हा आहे, की हजारो वर्षे सुरू असलेली सिस्टीम इतक्या कमी वेळात थोडी तरी बदलू शकली याचे कारण काय असावे? हिंदू समाज जर प्रचंड धर्मांध असता, तर ते शक्यच नव्हते. जेव्हा ब्रिटिश नव्हते, तेव्हाही अशा ब्राह्मण-सुप्रीमसिस्ट चळवळींना विरोध झाला, अगदी यशस्वीपणे झाला. या इतिहासामुळे ही क्रांती पचवणे हिंदूंना तादृश अवघड गेले नाही. मुळातच जातीजातींत इतकी विविधता आहे, की इंडिया इज अ काँटिनेंट इन इट्सेल्फ. त्यामुळे आपल्यापेक्षा काही बाबतींत वेगळे लोक आपल्या जवळ राहतात, ही गोष्ट भारतात लैच कॉमन आहे. त्यामुळे हिंदू धर्मही कडवा राहणे शक्यच नाही.

अशी उदाहरणे अन्य कुठे दिसतात? युरोपातले नवजागरण अतिशय ब्लडी आहे-लै कष्टाने आणि लै वर्षांनी मिळालेय ते. क्रिश्चानिटीला इसेन्शिअली रिजेक्ट करूनच त्यांचे पुनरुथ्थान झाले म्हटले तरी चालेल. ग्रीकोरोमन विचारधारा सोडले तर युरोपातही सगळे मूर्ख लोकच होते. भारतातले जे काही नवजागरण झाले, ते तितके ब्लडी नक्कीच नाही. इस्लाममध्ये नवजागरण अजून झालेलेच नाही.

नितिन थत्ते Thu, 07/02/2013 - 14:32

In reply to by बॅटमॅन

हिंदू धर्म हा बराचसा सैलसर आहे कारण हिंदू धर्म असे प्राचीन काळापासून काही नव्हते. पूर्वीच्या काळी सिंधू नदीच्या पलिकडचे लोक इकडच्यांना हिंदू म्हणत असत ते धर्म या अर्थाने नाही तर केवळ प्रादेशिक अर्थाने.

वेदप्रामाण्य मानणारे ते हिंदू ही संकल्पनाच बरीच नंतरची (आणि किंबहुना काल्पनिक) असावी. आज वेदप्रामाण्य न मानणारेही हिंदू गणले जातात; बर्‍याचश्या पॉप्युलर देवता वैदिक नाहीत.

इथल्या समाजात वेगवेगळ्या टोळ्या वेगवेगळ्या टप्प्यांवर समाविष्ट झाल्या. त्या टोळ्यांमध्ये इतके वैविध्य आहे/होते की कुणी कुणावर त्यांच्या चालीरीती लादू शकत नव्हते. [आज हिंदू धर्म म्हणून जे समजले जाते - त्याचा उदय पुष्यमित्र शुंगाच्या काळात झाला असावा आणि परिणती शंकराचार्यांच्या काळात झाली असावी. आणि चूभूदेघे]. मुळात हिंदू धर्म असे काही नव्हतेच, त्यामुळे अहिंदू (असेही काही नव्हतेच) लोकांवर कसली जबरदस्ती करणार आणि कोण करणार?

भारतीय माणसाची ओळख त्याचा धर्म ही कधीच नव्हती त्याची जात हीच त्याची नेहमी ओळख होती. आपल्या जातीबाहेरचा तो परका ही कल्पना सर्वांनाच लागू होती. मग ते देशी अवैदिक-बौद्ध-जैन असोत की ग्रीक-यवन-म्लेच्छ असोत. जातीबाहेरच्या व्यक्तींशी पुरेसा असहिष्णुपणा होताच.

बॅटमॅन Thu, 07/02/2013 - 14:37

In reply to by नितिन थत्ते

विविधतेतून येणार्‍या सैलसरपणात सहिष्णुतेचा उगम आहे हे मान्य. त्याचबरोबर, अशा अनेक दैवतांचे कालौघात मेनस्ट्रीममध्ये लाँचिंग करणे हेही तत्कालीन धार्मिक एलिट्सचा सहिष्णुपणाच दाखवते. असो.

ऋषिकेश Thu, 07/02/2013 - 15:01

In reply to by बॅटमॅन

इतकेच नाही तर बहुतेक इतर धर्मांप्रमाणे ही 'इश्वर' या संकल्पनेवर आधारित धर्मप्रणाली नाही. असा माझ्या माहितीतला एकच धर्म आहे ज्यात 'निरिश्वरवाद' आहे. इश्वराप्रमाणे असूरही याच धर्माचे भाग आहेत वगैरे वगैरे बरेच काही

या पार्श्वभूमीवर, हिंदू हा धर्म नसून सतत बदलती जीवनप्रणाली आहे हे विवेचन (जे मी प्रथम श्री वाजपेयींच्या एका भाषणात ऐकले होते) मला अधिक योग्य वाटते. आणि त्या अर्थाने या भागात रहाणारे विविध इश्वरांना मानणारे इश्वराधारित धर्मिय मंडळी 'हिंदु'च म्हटले पाहिजेत ;) .. वगैरे त्याचे एक्टेन्शनही रोचक आहेच शिवाय काही (गेल्या वीसेक वर्षांत अधिक प्रामुख्याने समोर आलेल्या) सवयी बघितल्यास प्रसंगी योग्यही वाटते.

बॅटमॅन Thu, 07/02/2013 - 15:04

In reply to by ऋषिकेश

झालं तर, संपला वाद :) घासूगुर्जी, सॉरी हां तुमचा धागा हायज्याक केल्याबद्दल.

अवांतरः च्यायला मग मजा ती काय राहिली ;) =))

मन Thu, 07/02/2013 - 15:11

In reply to by ऋषिकेश

"दक्षिण आशियातील बृहत सामायिक स्थानिक जीवनशैली" हे त्यातल्या त्यात जवळ जाणारं वर्णन करु शकतो "हिंदु " ह्या शब्दाचं.
थोडक्यात, माझी आजी वैष्णव हिंदु होती, आजोबा स्मार्त्-भागवत हिंदु होते, बांग्लादेशात हिंदु मुसलमानांची बहुसंख्या आहे.भारतात मुस्लिमांमध्ये हिंदु मुस्लिम अधिक आहेत व वहाबी मुस्लिम अल्पसंख्य आहेत.
. ही सर्व विधाने ग्राह्य असावीत.(सिरियसली म्हणतोय.)
.
युरोपिअन संस्कृती हा जसा एक कल्चरल थ्रॅड आहे, मध्यपूर्वेतील संस्कृती(हो, तिथले ख्रिश्चनही युरोपिअन ख्रिश्चनांपेक्षा फारच वेगळे नि स्थानिक मुस्लिमांना जवळचे आहेत संस्कृतित्कदृष्ट्या.) हा एक संस्कृतीसमूह आहे, पूर्व आशिया(चीन + जपान प्रभावित क्षेत्र) हा जसा बृहत सांस्कृतिक धागा आहे, तसाच "हिंदु" हाही असायला हवा.
तुम्ही कन्फ्युशिअन(किंवा शिंटो, पिंटो धर्मानुयायी) असुंदेत नाहीतर बौद्ध असुंदेत, एकसमान बृहत चायनिज संस्कृतीचे तुम्ही पालन करता असे तिथे चित्र आहे.
.
भारतीय ख्रिश्चन हे हिंदु ह्रिश्चन , भारतीय मुस्लिम हे प्रामुख्याने हिंदु मुस्लिम असायला हवेत.
(बहुतेक हज ला गेल्यावर एतद्देशीय मुस्लिमांना तिकडील मुस्लिम "हिंदु मुस्लिम" असेच संबोधतात.)
.
सध्या भारतात हिंदु मुस्लिम व हिंदु मुस्लिमेतर ह्यांचे जोरदार दंगे सुरु आहेत.

मन Thu, 07/02/2013 - 15:44

In reply to by मन

विषय काय....
प्रतिसाद काय लिहिलात मनोबा.
गवि म्हणतात तसं हिंदु-मुस्लिम, परंपरा आणि स्त्रिया,फाळणी हे साले ऑलटाइम ग्रॅट की वर्ड आहेत.दिसले की पिन आपोआप मारल्या जाते.

चिंतातुर जंतू Thu, 07/02/2013 - 15:41

In reply to by बॅटमॅन

>>अशा अनेक दैवतांचे कालौघात मेनस्ट्रीममध्ये लाँचिंग करणे हेही तत्कालीन धार्मिक एलिट्सचा सहिष्णुपणाच दाखवते.

सहिष्णुता की सबगोलंकारी धूर्तपणा? हे म्हणजे एक प्रकारचं छुपं धर्मांतर म्हणता येईल. धर्माबाहेरच्यांना आत घ्यायचं, पण जातीच्या उतरंडीत खालच्या पायरीवर. खंडोबा, विठोबा (इतकंच काय, गणपतीसुद्धा) हे अवैदिक देव सुरुवातीला ब्राह्मणांचे देव नव्हते.

बॅटमॅन Thu, 07/02/2013 - 15:46

In reply to by चिंतातुर जंतू

इन एनी केस, अवैदिक देवतांच्या उच्चाटनासाठी जंगजंग पछाडण्याऐवजी त्यांना "आपल्यात" सामावून घेणे हे माझ्यालेखी तरी चांगलेच आहे. याला लेबल काय लावायचं हा वेगळा प्रश्न झाला.

चिंतातुर जंतू Thu, 07/02/2013 - 17:12

In reply to by बॅटमॅन

>>अवैदिक देवतांच्या उच्चाटनासाठी जंगजंग पछाडण्याऐवजी त्यांना "आपल्यात" सामावून घेणे हे माझ्यालेखी तरी चांगलेच आहे. याला लेबल काय लावायचं हा वेगळा प्रश्न झाला.

अवैदिक लोकदेवतांना पुजणाऱ्यांना आदिवासी आणि निम्नजातीचे ही लेबलं लावली गेली. त्यांना खऱ्या अर्थानं "आपल्यात" सामावून घ्यायला फुले आणि आंबेडकर जन्मायला लागले. तोवर त्यांना गुलामाचंच जिणं होतं. आपल्यात सामावून घेण्याचा हा प्रवास अजूनही चालूच आहे, आणि धर्म त्यात मदत करण्याऐवजी आजही अडथळेच निर्माण करतो आहे.

बॅटमॅन Thu, 07/02/2013 - 17:24

In reply to by चिंतातुर जंतू

अवैदिक लोकदेवतांना पुजणाऱ्यांना आदिवासी आणि निम्नजातीचे ही लेबलं लावली गेली.

फारच सरसकटीकरण होतंय हे. शंकर, कृष्ण, गणपती, खंडोबा, इ. चे पूजक आदिवासी आणि निम्नजातीचेच आहेत काय? थ्रूऔट हिष्ट्री, नवीन जातींचे अ‍ॅसिमिलेशन करून घेताना सरसहा नीच जातीतच केल्याचा विदा दिसतो का कुठे? हिंदू धर्म पसरत गेला तसतसे प्रीडिफाईन्ड कॅटेगरीजमध्ये त्या त्या जातींचे वर्गीकरण केल्या गेले. यात ब्राह्मण ते शूद्रांपासून सर्वच वर्ण आले. साचेबद्धपणा आला हे कोणीच नाकारत नाही, पण तो लार्जलि गुप्तोत्तर काळापासून.

त्यांना खऱ्या अर्थानं "आपल्यात" सामावून घ्यायला फुले आणि आंबेडकर जन्मायला लागले. तोवर त्यांना गुलामाचंच जिणं होतं.

योग्य पण गैरलागू विधान. गैरलागू अशासाठी, की उच्च-नीच जातीय हे वर्गीकरण इज़ नॉट ईक्वल टु वैदिक-अवैदिक देवतापूजक. तुमच्या एकूणच प्रतिसादाचा संदर्भ सोडून हे वाक्य आलंय असं दिसतं.

आपल्यात सामावून घेण्याचा हा प्रवास अजूनही चालूच आहे, आणि धर्म त्यात मदत करण्याऐवजी आजही अडथळेच निर्माण करतो आहे.

इथे एक प्रश्न विचारतो. काही अटींवर मेनस्ट्रीममध्ये सामावून घेणारी, गावगाड्यात जन्माधारित का होईना, वेगळे स्थान प्रदान करणारी व्यवस्था चांगली, की वेगळ्या वैशिष्ट्यांसकट सामावून घेण्यास अज्जीच राजी नसलेली व्यवस्था चांगली?

चिंतातुर जंतू Thu, 07/02/2013 - 17:30

In reply to by बॅटमॅन

कोणत्याही सामाजिक उतरंडीत प्रवेश मिळतानाच वरच्या वर्गात मिळाला अशी उदाहरणं क्वचितच आढळतात. अगदी कोंकणस्थांनादेखील आधी निम्नजातींचे म्हणून हिणवलं गेलं. हळूहळू त्यांचा सामाजिक दर्जा ब्राह्मण झाला.

>>वेगळे स्थान प्रदान करणारी व्यवस्था चांगली, की वेगळ्या वैशिष्ट्यांसकट सामावून घेण्यास अज्जीच राजी नसलेली व्यवस्था चांगली?

ह्याचं उत्तर तुम्हाला जे अपेक्षित आहे ते असतं तर दलितांनी धर्मांतर केलंच नसतं नाही का?

बॅटमॅन Thu, 07/02/2013 - 17:32

In reply to by चिंतातुर जंतू

धर्मांतर केलं, पण कुठल्या धर्मात केलं यावरून कदाचित आपल्या दोघांच्या प्रश्नांचे उत्तर मिळते.

चिंतातुर जंतू Thu, 07/02/2013 - 18:59

In reply to by बॅटमॅन

>>धर्मांतर केलं, पण कुठल्या धर्मात केलं यावरून कदाचित आपल्या दोघांच्या प्रश्नांचे उत्तर मिळते.

बौद्ध धर्माच्या उत्कर्षाच्या काळात निम्न जातीच्या लोकांना त्यात स्थान मिळालं. नंतरच्या काळात निम्न जातींनी मुस्लिम किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचे दाखले भारतभर आहेत. खेदाची गोष्ट ही की तिथेही जातींची उतरंड निर्माण केली गेली; आणि 'आम्ही ब्राह्मण ख्रिस्ती आहोत' म्हणत दलित ख्रिस्तींशी रोटीबेटी न करणारे लोक उपजले.

बॅटमॅन Thu, 07/02/2013 - 19:15

In reply to by चिंतातुर जंतू

अच्छा. मी म्हणत होतो ते आंबेडकरांच्या नेतृत्वाखालच्या धर्मांतराबद्दल. असो.

बाकी मध्ययुगीन काळातील धर्मांतर हे तलवारीच्या जोरावर मुख्यत: झाले होते. आणि तुम्ही म्हणता तसे मध्ययुगीन दलित धर्मांतरांचे कारण म्हणजे तोपर्यंत आधीची व्यवस्था जास्त ऑप्रेसिव्ह झाल्यामुळे. पण प्रीमुस्लिम काळातील धर्मांतरे ही आधीच्या धर्माला कंटाळून किती आणि बुद्धिस्ट मिशनरींच्या प्रभावामुळे किती प्रमाणात झाली हाही एक प्रश्न आहेच. बुद्धिझममध्ये ब्राह्मणांचे परम वर्चस्व नसून क्षत्रियांचे आहे. तो धर्मही काही पूर्ण जातिविरहित नाही. तिबेट वगैरे भागांतही कास्ट सिस्टीम होतीच.

कमिंग बॅक टु मुद्दा ऑफ इस्लाम-क्रिश्चन धर्मांतर: तलवारीच्या बळावरचा धर्मप्रसार आणि ऑप्रेसिव्ह सिस्टिम ही दोन कारणे प्रामुख्याने दिसतात. पण याविरुद्ध भक्तीची रिअ‍ॅक्शन आलीच. "द एम्पायर स्ट्राईक्स बॅक", "संभवामि युगे युगे" हे हिंदू धर्माबद्दल जितके खरे ठरते तितके अन्य धर्मांबद्दल क्वचितच खरे ठरावे. जे दोष आहेत त्यांचे निराकरण वेळोवेळी झाल्यामुळेच बहुसंख्य लोकांनी धर्मांतर केले नाही.

त्यामुळे ही सिस्टिम अन्याय्य असली तरी करेक्टिव्ह, अ‍ॅडाप्टिव्ह आहे-एकच एक स्टॅटिक रूपाचा हव्यास लिटरली धरून बसत नाही. आणि हिची डिग्री ऑफ अ‍ॅडाप्टेशन अन्य सिस्टिम्सपेक्षा जास्त आहे, हे इतिहासावरून सिद्धच आहे.

चिंतातुर जंतू Thu, 07/02/2013 - 19:29

In reply to by बॅटमॅन

>>त्यामुळे ही सिस्टिम अन्याय्य असली तरी करेक्टिव्ह, अ‍ॅडाप्टिव्ह आहे-एकच एक स्टॅटिक रूपाचा हव्यास लिटरली धरून बसत नाही. आणि हिची डिग्री ऑफ अ‍ॅडाप्टेशन अन्य सिस्टिम्सपेक्षा जास्त आहे, हे इतिहासावरून सिद्धच आहे.

आणि ख्रिस्ती पद्धत तशी नाही? एनलाइटनमेंटच्या काळामध्ये सामाजिक सुधारणा होण्याचा त्यांच्या आज आपल्यापेक्षा अधिक प्रगत असण्याशी काही संबंध नाही? युरोपात आता गर्भनिरोधकं, गर्भपात यांना विरोध जवळपास नाहीच. उत्क्रांती शिकवावी का, पृथ्वी सूर्याभोवती फिरते का, हे काही तिथे वादाचे मुद्दे नाहीत. आता तर समलिंगी व्यक्तींना विवाह करण्याची मुभादेखील मिळते आहे. स्त्रीभ्रूणहत्या ही त्यांची समस्या नाही. उलट त्यांनी विकसित केलेलं तंत्रज्ञान वाईट रीतीनं वापरणारे आपण वेगळ्या (आणि वाईटसुद्धा) अर्थानं अडॅप्ट करतोय असं म्हणता यावं.

बॅटमॅन Thu, 07/02/2013 - 19:42

In reply to by चिंतातुर जंतू

आणि ख्रिस्ती पद्धत तशी नाही? एनलाइटनमेंटच्या काळामध्ये सामाजिक सुधारणा होण्याचा त्यांच्या आज आपल्यापेक्षा अधिक प्रगत असण्याशी काही संबंध नाही?

मी कुठे म्हणालो नाही म्हणून??? ऑफ कोर्स आहे. पण या उदारमतवादाची, स्वातंत्र्याची अन प्रगतीची लैच जबर किंमत त्यांना चुकवावी लागलेली आहे. चर्चचा विरोध या सुधारणांना किती दांडगा होता हे मी वेगळं सांगायला नको. इंदेक्स लिबोरम प्रोहिबितोरम असो, ब्रूनो सारख्यांना जाळून मारणे असो, चर्चने होता होईल तो प्रगतीच्या मार्गात खोडाच घातला होता. सामाजिक-राजकीय अशा चळवळी झाल्या तेव्हा कुठे युरोप जागा झाला. कॅथलिक चर्चला विरोध करण्यात लै रक्त सांडलंय युरोपचं. तसं आपल्याकडं दिसत नाही.

उत्क्रांती शिकवावी का, पृथ्वी सूर्याभोवती फिरते का, हे काही तिथे वादाचे मुद्दे नाहीत.

पण कधीकाळी लै डेंजर होते ना!!! बाकी उत्क्रांती शिकवावी की नाही, हा वादाचा मुद्दा अजूनही तिथे आहेच. भारतात हे दोन मुद्दे कधी तरी युरोप-आम्रिकेइतके सीरियस होते का?

स्त्रीभ्रूणहत्या हा एक मोठा फॅक्टर आहेच-पण समानता ही युरोपातही आत्ताआत्ता रुजली आहे. इतक्या चळवळी होऊनही केंब्रिजमध्ये बायकांनी सर्व परीक्षा दिल्या तरी डिग्री सर्टिफिकेट न मिळता डिग्री मिळण्यास पात्र आहात असे सांगणारे दुसरे सर्टिफिकेट मिळायचे. रेनेसाँपासून अखंड ढवळून काढल्यामुळे अन नंतरच्या कलोनियल इतिहासामुळे युरोपला एक वेगळे ब्याकग्रौंड मिळालेय, भारताचे तसे नाही. असो. अजून सुधारायला उशीर आहे आपल्याला. युरोप सुधारतोय गेल्या ५०० वर्षांपासून. आपण अजून तुलनेने बच्चे आहोत काही बाबतींत. इतके असूनही काही विरोधाभास नजरेला पडतात, तेव्हा भारताचे कौतुक वाटल्याखेरीज राहत नाही.

अतिशहाणा Thu, 07/02/2013 - 21:54

In reply to by चिंतातुर जंतू

युरोपात आता गर्भनिरोधकं, गर्भपात यांना विरोध जवळपास नाहीच

आयर्लंडमध्ये काही दिवसांपूर्वी सविता हलपनवार यांचा गर्भपात वेळेवर होऊ न शकल्याने मृत्यू झाला. त्यामुळे हे विधान मला समजलेले नाही. युरोपातील प्रगत देश वगळता इतर देशांमध्ये विशेषतः पूर्व युरोपात गर्भपातविरोधात इतका कडवेपणा असावा काय?

चिंतातुर जंतू Fri, 08/02/2013 - 13:08

In reply to by अतिशहाणा

>>आयर्लंडमध्ये काही दिवसांपूर्वी सविता हलपनवार यांचा गर्भपात वेळेवर होऊ न शकल्याने मृत्यू झाला. त्यामुळे हे विधान मला समजलेले नाही. युरोपातील प्रगत देश वगळता इतर देशांमध्ये विशेषतः पूर्व युरोपात गर्भपातविरोधात इतका कडवेपणा असावा काय?

हा नकाशा पाहिलात तर लक्षात येईल की आयर्लंड आणि माल्टा हे दोन देश ह्या बाबतीत विशेष मागासलेले आहेत. अगदी यू.के.मध्येसुद्धा उत्तर आयर्लंड हा अपवाद आहे.

नंदन Fri, 08/02/2013 - 13:20

In reply to by चिंतातुर जंतू

तिरके प्रतिसाद बरीक बारीक होत चाललेत. त्यात हातभार :)

'न'वी बाजू Fri, 08/02/2013 - 17:24

In reply to by नंदन

कदाचित आपणांस 'संकुचित' असे म्हणावयाचे असावे काय?

अनुराधा१९८० Fri, 08/02/2013 - 16:22

In reply to by चिंतातुर जंतू

बौद्ध धर्माच्या उत्कर्षाच्या काळात निम्न जातीच्या लोकांना त्यात स्थान मिळालं>> ही चुकीची माहिती आहे. बौद्धधर्मात जाणारे पूर्वीच्या काळी ब्राह्मण होते. निम्न जातीतल्या लोकांनी हिंदू धर्म सोडला नाही. बुद्धाचे आणी महावीराचे सुद्धा सर्व मुख्य शिष्य ब्राह्मण कींवा त्यावेळचे राजवंशातले लोक होते.

किंबहुना सर्वसुखी Tue, 14/05/2013 - 04:21

In reply to by चिंतातुर जंतू

बौद्ध धर्माच्या उत्कर्षाच्या काळात निम्न जातीच्या लोकांना त्यात स्थान मिळालं.>> आपल्या प्रतिक्रियेतील पहिले वाक्य तपासावे! बौद्ध 'धर्मा'बद्दल असलेल्या अनेक गैरसमजांतून व तद्विषयीच्या आजच्या राजकीय प्रभावग्रस्त सामुहिक स्मृतीतून त्याकडे पाहिल्यास असे वाटणे साहजिक आहे. पण वास्तव तसे नाही. बुद्धाला मध्ययुगीन महाराष्ट्रीय संतांप्रमाणे (केवळ?)रिफॉर्मिस्ट म्हणून पाहातानाही एकप्रकारे सावधगिरी बाळगायलाच हवी. शिवाय प्रारंभीची बौद्ध ('बुद्धाचे अनुयायी' या अर्थी- कारण धर्म हे स्वरूप त्याला अर्थात् तेव्हा मिळाले नव्हतेच)मंडळी ही ब्राह्मणादि तथाकथित उच्च जातीतून आलेली होती. असो..!

किंबहुना सर्वसुखी Tue, 14/05/2013 - 04:42

In reply to by चिंतातुर जंतू

केवळ सबगोलंकारी धूर्तपणा म्हणूनही ठोकता येणार नाही. हेसुद्धा अगदीच सरसकटीकरण होईल. राजकीयीकरण हे अपरिहार्य असेल अॅकेडमिक चर्चांसाठी आजकालच्या ट्रेंडनुसार पण तरी दरवेळी तसेच पाहायला नको. शेवटी अपवर्ड मोबिलिटी किंवा एम. एन. श्रीनिवास म्हणतात तसे संस्कृतायझेशन ही बळजबरी प्रक्रियाच असायला हवी असंही नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/05/2013 - 05:58

In reply to by किंबहुना सर्वसुखी

किंबहुना, याबद्दल मला फार माहिती नसल्यामुळे याबद्दल तुम्ही तपशीलवार काही लिहू शकाल काय?

अनुराधा१९८० Fri, 08/02/2013 - 16:10

In reply to by नितिन थत्ते

जाती व्यवस्था सर्व जगात होती आणि आहे. मध्यपुर्वेच्या इस्लाम मधे पण आहे. आत्ताच तुम्ही वासेपुर बघितला च ना. पण दुर्देवानी हिंदू मधलेच काही लोक सतत शिव्या घालत असतात हिंदू लोकांना. बरे त्यांना कोणी जबरदस्तीने ठेवले आहे का हिंदू म्हणून.

ग्रीक, रोमन लोंकांच्या मधे पण जाती होत्या. सर्व रोमन जनतेला पण सर्व अधिकार नव्हते. तिथे राज्यकर्ते काही घराण्यातुन च यायचे. आणि जे रोमन नव्हते त्यांना गुलाम म्हणुन वागवले जाई.

जुन्या बुद्धांनी का नाही नवबुद्धांना आपले मानले? मग बुद्ध धर्मावर कोणी का नाही जातियतेचा शिक्का मारत?
शीख धर्म काढण्याचे एक कारण हिंदू मधली जाती व्यवस्था होती, पण शीख धर्मीयात पण जातीव्यवस्था तशीच पाळली जाते. धर्मग्रंथा मधे जातीव्यवस्था नाही म्हणजे जमिनीवर समाजात नाही असे नाही

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 07/02/2013 - 11:16

प्रयोगाबद्दल अधिक उत्सुकता आहे. पण भडक धर्मप्रेमी आणि कडक नास्तिकांच्या देशात काही काळ राहिल्यामुळे या 'मारामारी'च्या गोष्टीतही!

विसुनाना Thu, 07/02/2013 - 12:34

पुढे काय झाले ते चावण्यात रस आहे. :)

लेखाच्या लेखकाने आपली विचारसरणी कोणती आहे तेही एका ठळक ठशात लिहून टाकावे. म्हणजे त्या बाजूच्या डोळ्याने लेखन वाचता येईल.

काय आहे, हल्ली आमच्याच डाव्या-उजव्या बाजू लढत असतात आणि डोळ्यांचे रंगही त्याप्रमाणे बदललेले आहेत. तसेच दोन्ही बाजूंना असंख्य गळवे झालेली आहेत. कोणते गळू कधी ठसठसेल त्याचा नेम नाही.;)

राजेश घासकडवी Thu, 07/02/2013 - 18:39

In reply to by विसुनाना

लेखाच्या लेखकाने आपली विचारसरणी कोणती आहे तेही एका ठळक ठशात लिहून टाकावे.

मला शक्यतो विचारसरणींची लेबलं लावायला आवडत नाहीत. लेखाचं शीर्षक 'सत्याचा विजय...' असं आहे. त्यामुळे तो 'माझ्या बाजूचा' विजय वगैरे असण्यापेक्षा निर्भेळ, विशुद्ध सत्याचा विजय आहे हे दाखवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. हा, सत्य म्हणजे काय? याबाबत काही लोकांच्या मनात वेगवेगळ्या 'बाजू' असू शकतील. त्याबाबतीत माझी 'बाजू' अशी - 'जे प्रत्यक्ष निरीक्षणांतून दिसून आलेलं आहे, आणि ती निरीक्षणं कोणालाही परत करून बघता येतात त्याला मी सत्य म्हणतो.'

'सूर्य रोज उगवतो' या सहज दिसणाऱ्या सत्याबद्दल कोणीच वाद घालत नाही. त्याचं कारण काय? याबद्दल अनेक वेगवेगळ्या शक्यता असू शकतात.
१. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो
२. पृथ्वी सूर्याभोवती फिरते

निव्वळ सूर्य रोज उगवतो इतक्याच निरीक्षणातून या दोनमध्ये फरक सांगता येत नाही. मात्र आख्खं तारांगण रोज उगवतं व मावळतं हे दुसरं निरीक्षण घेतलं की मग

१. सूर्य आणि तारे पृथ्वीभोवती फिरतात (पृथ्वी स्थिर)
२. पृथ्वी सूर्याभोवती फिरते (सूर्य, तारे स्थिर)

हे (किमान) दोन पर्याय तयार होतात. त्यात ग्रह अजूनच विचित्र फिरतात हे व अशीच इतर निरीक्षणं आली की पहिला पर्याय बोजड होतो आणि टाकून द्यावा लागतो.

सूर्य रोज उगवतो या उघड दिसणाऱ्या सत्यापासून सुरूवात करून पृथ्वी सूर्याभोवती फिरते इथपर्यंत पोचणं म्हणजे अधिक सखोल सत्यापर्यंत पोचणं. ही प्रक्रिया काहीशी किचकट असते. त्यातही 'देवाने पृथ्वीची निर्मिती केली, आणि प्राण्यांना प्रकाश मिळावा म्हणून सूर्यचंद्र दिले' हे सत्य मानणारी धर्मसंस्था निर्माण झाली की मग सत्यशोधाइतकीच सत्य प्रस्थापित करण्याची प्रक्रियाही तयार व्हावी लागते. याचा आढावा उत्क्रांतीच्या उदाहरणातून या काही लेखांत मांडायचा माझा प्रयत्न आहे.

विसुनाना Thu, 07/02/2013 - 19:38

In reply to by राजेश घासकडवी

माझी उजवी बाजू मला सांगते आहे की जेनेसिसप्रणित ईश्वराचा पाडाव करणे अत्यंत सोपे आहे. ते सत्य नाहीच मुळी.
अमेरिकेतील (रोमन कॅथलिक इ.) काँझर्व्हेटीव्ह हे मूर्ख आहेत. त्यामुळे डॉकिन्ससारख्यांचे फावते.
अस्तिक्याचा पुरस्कार करायचा असेल तर तो विज्ञानाच्या पातळीवरून केला पाहिजे.

आता 'पृथ्वी केवळ सूर्याभोवती फिरते' हे पूर्ण सत्य राहिलेले नाही. किंवा 'फेनमन डायग्राम'ने दाखवले जाते ते पार्टीकल एक्स्चेंजही पूर्ण सत्य नाही.
विश्वाचे अंतिम सत्य आता केवळ शास्त्रज्ञांच्या विचारशक्तीतच सामावले आहे. त्याचे निरीक्षण करणे अशक्य आहे.
विश्व जर ऑसिलेटिंग असेल तर त्याचे निरीक्षण कसे करणार? विश्व जर मल्टीव्हर्स असेल तर त्याचे निरीक्षण कसे करणार?
व्हिज्युअल होरायझनच्या मागे काय होते ते कसे पहाणार?

अशी अनेक सत्ये आता निरीक्षणात्मक विज्ञानाच्या कक्षेबाहेर रहाणार आहेत. - असे माझी उजवी बाजू मला सांगते.

माझी डावी बाजू म्हणते की - तुझ्याहून अधिक विज्ञानाचे ज्ञान असलेली राजेश घासकडवींसारखी माणसे तुला याचेही उत्तर देतील आणि तू सत्याच्या आणखी जवळ जाऊ शकशील. कदाचित या एकमेव आयुष्यात मला असलेल्या शंकांचे निरसन विज्ञानाकडून होणार नाही. तरीही हरकत नाही.

जोवर माझ्या बुद्धीवरचा अज्ञानाचा पडदा पूर्णपणे दूर होत नाही तोवर सत्य म्हणजेच ईश्वर आणि ईश्वर म्हणजेच सत्य असे काहीतरी सबगोलंकार मानणे मला भाग पडते.
बाकी ईश्वर नैवेद्य खात नाही, नवसाला पावत नाही, मुद्दाम संकटे आणत नाही, इंटेलिजंट डिझाईनमध्ये भागही घेत नाही हे काही विशेष सत्य नव्हे. तेवढ्या खालच्या दर्जाचा ईश्वर तर मीही पराभूत करू शकतो. त्यासाठी डॉकिन्स किंवा घासकडवी कशाला हवेत?

पण जोवर सत्याचे अंतिम स्वरूप मला (मलाच काय पण इतर कोणालाही) कळत नाही तेव्हा इतरांचे असत्य अगदीच खालच्या पातळीवरचे असत्य आहे म्हणून मी त्यांना हिणवू शकत नाही.

आता सत्य समजणे हे विज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट नाहीच असे कोणी म्हणेल तर त्याला माझ्याकडे उत्तर नाही.

राजेश घासकडवी Thu, 07/02/2013 - 21:34

In reply to by विसुनाना

बाकी ईश्वर नैवेद्य खात नाही, नवसाला पावत नाही, मुद्दाम संकटे आणत नाही, इंटेलिजंट डिझाईनमध्ये भागही घेत नाही हे काही विशेष सत्य नव्हे. तेवढ्या खालच्या दर्जाचा ईश्वर तर मीही पराभूत करू शकतो.

पण सध्याच्या परिस्थितीत त्याच ईश्वराचा पगडा जगातल्या किमान ८० टक्के जनतेवर वेगवेगळ्या प्रमाणात आहे. उदाहरणार्थ अमेरिकेतली चाळीस टक्के जनता उत्क्रांतीवाद खोटा, जेनेसिस खरं असं मानते. ती पायरी ओलांडून अजून वर जाण्याच्या टप्प्यात येणाऱ्या अडथळ्यांची ही गोष्ट आहे. तेव्हा त्याहूनही वर म्हणजे नक्की कुठे, किंवा शेवटचा टप्पा वगैरेचा मुद्दा इथे तितका बरोबर नाही.

मंझिलपर्यंत पोचायला किती अंतर कापावं लागणार माहीत नाही, पण दिशा बरोबर आहे इतकंच आत्ता विज्ञान म्हणू शकतं. पण त्याविषयी नंतर कधीतरी.

राजन बापट Thu, 07/02/2013 - 21:39

In reply to by विसुनाना

तुमच्या प्रतिसादातल्या काही ठिकाणी अडखळलो. ते विचारावे असं म्हणतो.

>>> अस्तिक्याचा पुरस्कार करायचा असेल तर तो विज्ञानाच्या पातळीवरून केला पाहिजे.

हे मला नीटसं समजलं नाही. १. विज्ञानाच्या पातळीवरून - म्हणजे वैज्ञानिक दृष्टीने - असं म्हणायचं असावं. आस्तिक्याचा पुरस्कार करायला पाहिजे म्हणजे नेमकं काय ? आणि ते वैज्ञानिक दृष्टीने कसं करायचं ?

>>>'पृथ्वी केवळ सूर्याभोवती फिरते' हे पूर्ण सत्य राहिलेले नाही. किंवा 'फेनमन डायग्राम'ने दाखवले जाते ते पार्टीकल एक्स्चेंजही पूर्ण सत्य नाही.
विश्वाचे अंतिम सत्य आता केवळ शास्त्रज्ञांच्या विचारशक्तीतच सामावले आहे.

१. पृथ्वी केवळ सूर्याभोवती फिरते' असा दावा कुणी केल्याचं मला आठवत नाही. याबद्दल थोडं विस्तृत स्वरूपातलं सांगता येईल का ?
२. विश्वाचंच काय पण कुठल्याही गोष्टीचं अंतिम सत्य गवसल्याचा दावा कुठलाही शास्त्रज्ञ करत असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या विचारशक्तीतच नेमकं काय सामावलेलं आहे ते कळलं नाही.

>>>अशी अनेक सत्ये आता निरीक्षणात्मक विज्ञानाच्या कक्षेबाहेर रहाणार आहेत.

निरीक्षणे म्हणजे केवळ चर्मचक्षूंची नव्हेत. किंबहुना निरीक्षणें हा वैज्ञानिक पद्धतीचा एक भाग आहे. ढोबळ मानाने (मला समजलेली ) वैज्ञानिक पद्धत अशी :

हायपोथेसिस मांडणे -> हायपोथेसिसच्या संदर्भातली निरीक्षणे करणे -> निरीक्षणे पडताळून पाहणे -> मिळती जुळती असतील तर हायपोथेसिसचा सिद्धांत ("लॉ") बनविणे => हीच प्रक्रिया नवनवीन गोष्टींच्या बाबत परतपरत करणे -> पुन्हापुन्हा पडताळणे -> जुने सिद्धांतांपेक्षा अधिक टोकदार सत्याकडे नेणारी हायपोथेसिस मांडणे -> प्रक्रिया चालू ठेवणे.

यामधे कुठलंही सत्य "अंतिम" मानलं जात नाहीच. आजच्या सिद्धांतांवर आणि निरीक्षण साधनांवर आधारित वर्तमान काळातली सत्ये ही आहेत. ती उद्या बदलू शकतात. फक्त उपरोक्त पद्धतीतून दिलेले पुरावे द्या की झाले.

वरील शंकांमुळे मला

>>>जोवर माझ्या बुद्धीवरचा अज्ञानाचा पडदा पूर्णपणे दूर होत नाही तोवर सत्य म्हणजेच ईश्वर आणि ईश्वर म्हणजेच सत्य असे काहीतरी सबगोलंकार मानणे मला भाग पडते.

यासारख्या विधानांना अस्वीकारार्ह मानावे लागते.

विसुनाना Fri, 08/02/2013 - 12:24

In reply to by राजन बापट

माझे म्हणणे पुरेसे स्पष्ट न झाल्याचा खेद आहे.

एकाच वेळी दोन्ही बाजूंचा विचार करण्याची वेळ येते आणि प्रतिसादाला वेळही कमी असतो तेव्हा मांडणी अशी विस्कळीत होते.
हा विषय एका प्रतिसादात मावेल इतका मर्यादित नाही. पण मला सध्या इतकेच म्हणायचे आहे की 'ईश्वर आहे किंवा नाही' हा वादाचा मुद्दा घेऊन भेद निर्माण करणे आणि त्या अनुसार लोकांची प्रत ठरवणे योग्य नाही.

'आकाशातला बाप'हे ईश्वराचे रूप विज्ञानवाद्यांना हास्यास्पद वाटते हे स्वाभाविकच आहे. जगातील ८०% लोक (आकडेवारी विश्वासार्ह असावी) हे आस्तिक आहेत पण ते सर्वच अशा सहा दिवसात जग निर्माण करणार्‍या ईश्वराला मानतात असे समजण्याची गरज नाही. भारतीय तत्त्वज्ञानात असलेली ब्रह्म संकल्पना ही त्याहून बरीच गुंतागुंतीची आहे. सद्य विज्ञानाच्या जवळ पोचणारे अनेक विचार भारतीय दर्शनांत आहेत. आजचे विज्ञान पुन्हा तत्त्वज्ञानाच्या कक्षेत पोचते आहे. (कारण माझ्या वरच्या प्रतिसादातील दुव्याप्रमाणे त्याबाबत प्रत्यक्ष निरीक्षणे करण्याची तांत्रिक सीमारेषा आलेली आहे.) ईशतत्त्व ही अशीच एक तात्विक विचारधारा आहे.(ओपेनहायमर म्हणाला की त्याला अणुस्फोटात विश्वरूप दर्शन झाले तेव्हा त्याला जगाचा विध्वंस करणारा कृष्ण प्रत्यक्ष दिसला असेल काय?) बौद्ध लोक तर ईश्वर आहे असे मानतच नाहीत तरीही आस्तिक परंपरेला जवळ करणारे असे ते वर्तन ते करतात. कारण जाणीव असलेल्या सजीवास या सर्व जगाला काहीतरी अर्थ असावा असे वाटत राहते. (कलेक्टीव्ह कॉन्शसनेसवर काही (तथाकथित स्यूडो?) सायंटिफिक रिसर्चही सुरू आहे.)

http://www.princeton.edu/~pear/implications.html

ईश्वर असला काय किंवा नसला काय? त्याने लोकांच्या वागण्यात खरोखरीच फरक पडतो काय? आस्तिक लोक पूर्णपणे पापभिरू असतीलच असे नाही आणि नास्तिक लोक पूर्णपणे विवेकी असतीलच असे नाही.पूर्णपणे आस्तिक माणूसही स्वतःच्या मृत्यूनंतर देहदान करू शकतो आणि पूर्णपणे नास्तिक माणूसही आयुष्याच्या शेवटी अडखळत्या पावलांना ईश्वराची काठी हवी असे म्हणू शकतो.

त्यामुळे सरसकट सर्व आस्तिक लोकांच्या आस्तिक असण्याला नास्तिक लोकांनी आणि नास्तिक लोकांच्या नास्तिक असण्याला आस्तिक लोकांनी सातत्याने हरकत घेणे चुकीचे आहे असे माझे मत आहे.
ईश्वर असेल अथवा नसेल, त्यामुळे माझ्या सामाजिक वर्तनात काहीच फरक पडू नये ही माझी अपेक्षा आहे.

ऋषिकेश Fri, 08/02/2013 - 13:08

In reply to by विसुनाना

ईश्वर असला काय किंवा नसला काय? त्याने लोकांच्या वागण्यात खरोखरीच फरक पडतो काय?

हे अगदी योग्य आहे.. आम्ही अ‍ॅग्नॉस्टिक असेच म्हणतो.

(बाकी देव = अज्ञान [आणि विज्ञानामुळे देव टेन्ड्स टु झिरो {बट नेव्हर इक्वल टू झिरो}]हे माझे मत अजूनही असल्याने तुम्ही व्यक्त केलेली द्विधा मला जाणवत नाही. जोपर्यंत माझ्यासाठी अज्ञान शिल्लक आहे तोपर्यंत माझ्यासाठी देव आहेच)

ऋषिकेश Fri, 08/02/2013 - 13:57

In reply to by नंदन

हे रोचक आहे. हा तर्क / आर्ग्युमेन्ट हा दुवा बघेपर्यंत माहित नव्हता
नंदनच्या पोतडीतून काय निघेल सआंगणे अशक्य आहे. (नंदनची पोतडी = देव? ;) )

विसुनाना Fri, 08/02/2013 - 14:58

In reply to by ऋषिकेश

बायबलमधले क्रिएशन ढिसाळ पायावर उभारलेले असल्याने त्याचा बचाव करणे क्रमप्राप्त होते.

पण भारतात याला अपोलोजेटिक फिलॉसॉफी का म्हणावे?
भारतीय नासदीय सूक्त वेगळेच क्रिएशन सांगते. त्याला डिफेंड करायची गरज पडू नये.
आणि (मग नेहमीप्रमाणे-) भारतात 'पास्कल्स वेजर' खूप पूर्वीच सांगूनही (वररुची) झालेले आहे, नाही का?

बॅटमॅन Fri, 08/02/2013 - 15:03

In reply to by विसुनाना

+१११११११११११.

बाकी काही असो. आपले प्राचीन तंत्रज्ञान अत्याधुनिक नसले तरी तत्वज्ञान अतिशय निकोप आणि प्रगल्भ नक्की होते एवढे खरे.

नगरीनिरंजन Fri, 08/02/2013 - 13:32

In reply to by ऋषिकेश

"देव = अज्ञान" हे रोचक आहे आणि देव सर्वव्यापी आहे या वाक्याला अर्थ देणारे आहे, परंतु प्रॅक्टिकली याचा फारसा उपयोग नाही.
"देव = पृथ्वी नावाची सूर्यापासून ऊर्जा घेणारी क्लोज्ड आणि बॅलन्स्ड लाईफ सिस्टिम"(ज्याला आपण ढोबळ मानाने निसर्ग म्हणतो) असा अर्थ घेतला तर प्रॅक्टिकली बराच फरक पडेल असे वाटते. शिवाय सगळे देवातूनच निर्माण होतात आणि देवातच विलीन होतात, देव सर्वत्र आहे, आत्मा अमर आहे,ब्रह्म-परब्रह्म, द्वैताद्वैत वगैरे म्हणणार्‍यांचेही तत्वज्ञान खोटे पडणार नाही (कदाचित त्यांना ओरिजिनली तेच म्हणायचे असावे). शिवाय देवाला मारण्याचे उद्योग करण्यापेक्षा देवाला जगवण्याचे सत्कर्म करता येईल.

ऋषिकेश Fri, 08/02/2013 - 13:55

In reply to by नगरीनिरंजन

हे मागे मी बहुदा लिहिले आहे बहुदा.. पण असो..
माझ्या लेखी देव म्हणजे मला जे जे माहित नाही ते. (त्यात ब्रह्मज्ञान आलेच. शिवाय आत्माबित्मा वगैरेही आले. हे सगळे देवातच सामावलेले आहे. ;) पण.. ). मला इतरांच्या संकल्पनांना / तत्त्वज्ञानाला माझ्या व्याख्येत जागा द्यायची गरजच काय? माझा देव हा इतर कोणाहीपेक्षा वेगळा आहे कारण माझ्याइतकीच तंतोत ज्ञान/अनुभवाची स्थिती इतर कोणाची असण्याची शक्यता शुन्यवत आहे. त्यामुळे प्रत्येकाला वेगळ्या गोष्टीत देव दिसतो - तेव्हा ज्याने त्याने ज्याची त्याची व्याख्या करावी :P

बाकी जेव्हा मला "सगळ्ळे सगळ्ळे" समजेल, संपूर्ण ज्ञान होईल त्यावेळी मीच देव झालो असेन. मात्र मग ज्ञानाचा शोधही शिल्लक नसेल (विज्ञानाची प्रगती देवाच्या अर्थात अज्ञानाच्या अस्तित्त्वावरच अवलंबून आहे. एकदा का अज्ञान संपले (अर्थात देव नाहिसा झाला) की शोधायला काही उरणारच नाही ;) ). तेव्हा देवाचा नायनाट करणे हे विज्ञानाचे उद्दिष्ट नसावे असे वाटते (मात्र परिणाम खचितच आहे ;) )

बास.. अजून लिहिले तर वाटतो त्यापेक्षा अधिकच वेडा आहे या (सत्या)ची सगळ्यांना खात्री पटेल

नगरीनिरंजन Fri, 08/02/2013 - 16:09

In reply to by ऋषिकेश

:). 'व्यावहारिक' उपयोगासाठी सगळ्यांनी ठरवून तसं मानलं तर फरक पडेल असं मला म्हणायचं होतं.
पण सध्या सगळे तत्त्वज्ञानाच्या मूड मध्ये असल्याने नंतर कधी तरी.

परिकथेतील राजकुमार Thu, 07/02/2013 - 19:01

रंजक सुरुवात.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

मी Thu, 07/02/2013 - 20:36

Interesting!

पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणेच काळ-पांढरं ( लिबरल आणि कंझर्व्हेटिव्ह) ह्यांच्या मधला समन्वयवाद्यांचा मतप्रवाह लेखमालेत येईल अशी आशा करतो.

अतिशहाणा Thu, 07/02/2013 - 21:49

छान चर्चा. हिंदू धर्म जातीभेद वगैरेंसकटही इस्लाम आणि ख्ऱिश्चन धर्माच्या तुलनेत खरेच सहिष्णू होता असे वाटते. मात्र गेल्या काही वर्षात हिंदुत्ववादी संघटनांनी झपाट्याने त्याचे ख्रिस्ती-इस्लामीकरण चालवले आहे. :( हिंदू धर्माचे सहिष्णू आणि समावेशक स्वरुप जपण्यासाठी अशा संघटनांना वेळोवेळी विरोध करायला हवा.

नंदन Sat, 09/02/2013 - 23:39

मिझुरीत येऊ घातलेला कायदा:
http://www.motherjones.com/mojo/2013/02/intelligent-design-missouri-evo…

नॉर्थ कॅरोलायनात गेल्या वर्षी पास झालेल्या एका कायद्याच्या वरताण आहे हे:
http://blogs.scientificamerican.com/plugged-in/2012/05/30/nc-makes-sea-…