Skip to main content

ही बातमी समजली का? - १४

भाग | | | | | | | | | १० | ११ | १२ | १३

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.

तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात ९०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

==============

सई परांजपे यांचं साप्ताहिक सदर लोकरंग, लोकसत्ता मधे सुरू झालं आहे. त्याचे प्रकाशित झालेले सगळे भाग इथे पाहता येतील. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' आणि अल्काझींबद्दल लिहीलेला भाग विशेष आवडला.

मन Sat, 01/02/2014 - 15:24

आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या वास्तूमध्ये माझ्या व्यावसायिक कार्यप्रणालीची मुहूर्तमेढ रोवली गेली.. माझ्या ध्यानी-मनी-स्वप्नी नसताना! माझी बी. ए.ची परीक्षा जवळ आली होती. अगदी पाच-सहा दिवसांवर. मी दुपारी घरी लॉजिकच्या सिद्धान्तांबरोबर झटापट करीत बसले होते. एक शिपाई माझ्या नावाचा काही सरकारी लखोटा घेऊन टपकला. मराठी निवेदिकेच्या चाचणीसाठी मला आकाशवाणी केंद्रावर बोलावले होते. नवलच! कारण मला या ऑडिशन्सबद्दल काहीच पत्ता नव्हता. तेव्हा मी त्यासाठी अर्ज करण्याचा तर प्रश्नच नव्हता. 'जाऊन तर पाहा..' आईने सल्ला दिला- 'नाही तरी संध्याकाळी थोडाच अभ्यास करणार आहेस तू?' पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सेंट्रल ऑफिसच्या दगडी इमारतीत दाखल झाले.
कुणी कुठेच अप्लाय न करता बर्‍अय ऑफर्स यायच्या?
भानगड काय आहे?
टीव्हीवर वृत्तनिवेदिका म्हणून स्मिता पाटिल ह्यांनाही अगदि अशीच ऑफर दूरदर्शन "आपोआप" दिली होती.
"मी अर्ज न करताही मला कसं काय बोलावलत" म्हणत त्या चिडून आधी अधिकर्‍याच्या खोलीत शिरल्या होत्या, हे आठवतय.
(नक्की कुठं वाचलय आठवत नाही पण बहुतेक भक्ती बर्वे इनामदारांचं कोणतसं पुस्तक होतं.)
.
.
तेव्हा अशा "आपोआप " ऑफर्स कशा काय यायच्या ?
अधिकार्‍अयला अमुक पोरगी कार्यकुशल आहे, हे नेमकं कसं कळायचं?
बेरोजगार लोक स्टृअगल वगैरे करत आहेत, जाहिराती देउन बोलावलं, ऑडिशन्स घेतल्या तर निदान चार इच्छुक व लायक लोकांची पोटं भरतील असा विचार आकाशवाणी व दूरदर्शन करत नसत का ?
डायरेक जी लोकं पाहण्यात,माहितीत आहेत, त्यांना थेट स्वतःच ऑडिशन आयोजित करुन "उद्यापासून यायचं कामावर" असं लागलिच ?
अधलं मधलं काही नाहिच?
अशा अधिकार्‍यांची नावं वगैरे मिळतील का ?
.
.
.
लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तकं व व्रुत्तपत्रीय सक्सेस स्टोर्‍अय ह्यातलं अतिसुलभीकरण पाहून असाच प्रश्न पडतो.
"आणि आदिवासी पाड्यावरील अशिक्षित मुलीनं एकदा ठरवलं; समाजसेवा, करायची. बस्स. ठरलं मग.
आयुष्याची आपली पहिली चोवीस वर्षे पआद्याबाहेरचं काहिच जग पाहिलेलं आणि ऐकलेलंही नसताना ती
तिकिट काढून ती जर्मनीला गेली. तिथून जर्मन तंत्रज्ञान आणून आपल्या पाड्यावर लावलं. लोकांना तंत्रशिक्षण दिलं.
आज तिच्या कार्याचा आढावा घ्यायला युनोच्या वगैरे कैक संस्था येतात."
आँ ?
कसं काय ?
.
.
.
दोन्ही केसमध्ये "कसं काय" इतकाच प्रश्न कॉमन आहे, बाकी समानता काहीही नाही.

चिंतातुर जंतू Sat, 01/02/2014 - 16:05

In reply to by मन

>> तेव्हा अशा "आपोआप " ऑफर्स कशा काय यायच्या ?
अधिकार्‍अयला अमुक पोरगी कार्यकुशल आहे, हे नेमकं कसं कळायचं?
बेरोजगार लोक स्टृअगल वगैरे करत आहेत, जाहिराती देउन बोलावलं, ऑडिशन्स घेतल्या तर निदान चार इच्छुक व लायक लोकांची पोटं भरतील असा विचार आकाशवाणी व दूरदर्शन करत नसत का ?
डायरेक जी लोकं पाहण्यात,माहितीत आहेत, त्यांना थेट स्वतःच ऑडिशन आयोजित करुन "उद्यापासून यायचं कामावर" असं लागलिच ?
अधलं मधलं काही नाहिच?

टी.व्ही. किंवा रेडिओसारखी क्षेत्रं नवी होती तेव्हा त्यांना भाव नव्हता. त्यामुळे जागा भरता यायच्या नाहीत. मग साहित्यिक, नाट्यकर्मी वगैरे लोकांच्या ओळखीतून बोलावून लोक भरती करत. इथे (परांजप्यांच्या बाबतीत) त्यांची नाटकातली कारकीर्द आधीच गाजली होती हे लक्षात घ्यायला हवं. किमान संवादफेक वगैरे गोष्टी जमत असल्या तर ते रेडिओवर उपयोगी पडतं.

मन Sat, 01/02/2014 - 16:25

In reply to by चिंतातुर जंतू

टी.व्ही. किंवा रेडिओसारखी क्षेत्रं नवी होती तेव्हा त्यांना भाव नव्हता. त्यामुळे जागा भरता यायच्या नाहीत
समजलं नाही, वृत्तपत्रात जाहिराती देउनही जागा भरल्या गेल्या नाहित म्हणून असे रेफरन्सनं बोलवायचे का ?
(तसं असेल तर संपूर्ण शंकासमाधान झालेलं आहे; कारण दुसरं काय करता आलं असतं हे माझ्याही डोक्यात सध्या येत नाहिये.)
पण :-
जाहिराती न देताच जागा भरल्या जायच्या का, ही शंका आहे.
"भाव नव्हता" हे रक्कम कमी होती, किम्वा "तिकडं कुणी करीअर म्हणून पहात नसेल" ह्या अर्थानं असेल तर :-
कुठल्याही आर्थिक व्यवस्थेत कुठलीच एक रक्कम अगदि टाकाउ म्हणून ठरवता येत नाही.
दरवेळी कुणा ना कुणासाठी तरी ती अगदि मौल्यवान असू शकतेच.
किंबहुना "अमुक गोष्टीकडे तसेही तरुण्/इच्छुक वळणार नाहित " असा परस्पर नकार गृहित धरला जातो आहे का ?
जात असल्यास नकार गृहित धरायचा अधिकार ह्यांना कसा ?
शिवाय तार्किक मुद्दे सोडूनही देउ. मुळात सरकार नावाची यंत्रणा असं काम करते का ?
त्यांना काय आणि कोनते नियम आहेत ?
(माझ्या माहितीप्रमाणे सरकार दरबारी चिटोरं जरी हलवायचं तरी तयचं डॉक्युमेंटेशन्/दस्ताऐवजीकरण करावं लागतं; ही फ्याक्ट आहे.
procedure नावाचा आता बदनाम असलेला पण तार्किक असा एक प्रकार आहे.
ह्याच डॉक्युमेंटेशनमुळं rti/माहिती अधिकारास बळकटी येते.
)
.
.
.
उदा :-
तासाला मराठीत टायपिंग केलस तर तुला हजारभर रुपये देतो असं अंबानीला म्हणलं कुणी तर तो धुडकावून लावेल.
मला म्हणालात तर मी अगदि आनंदानं तयार होण्याची बरीच शक्यता आहे.
"भाव असणं" सापेक्ष ठरतं .
.
.
अवांतर १:-
व्याम्मिश्र व कृतक ह्या शब्दांचा नेमका अर्थ काय ?
ऐसीवर व इतरत्रही काही जड म्हणा,दर्जेदार म्हणा, वाचायला घेतलं की हे शब्द मध्येच दिसतात.
.
.

अवांतर २ :-
किमान संवादफेक वगैरे गोष्टी जमत असल्या तर ते रेडिओवर उपयोगी पडतं.

कल्पना आहे. अमिताभ बच्चनप्रमाणेच मलाही ऑडिशनमधून पहिल्यांदा परत पाठवलं होतं. लय मरमर करावी लागली होती नंतर.
(मला माहिती कशी मिळाली :- शाळेतून घरी जाताना मला त्यांची आकाशवाणीच्या हापिसावरची नोटिस दिसली, तसाच आतमध्ये शिरलो व विचारत सुटलो.)

बॅटमॅन Sat, 01/02/2014 - 16:30

In reply to by मन

व्याम्मिश्र व कृतक ह्या शब्दांचा नेमका अर्थ काय?

व्यामिश्र म्हणजे गुंतागुंतीचं, अनेकपदरी, इ.इ.इ.

कृतक म्हणजे लटका, खोटा, उदा. तिने कृतककोपाने माझ्याकडे पाहिलं.

चिंतातुर जंतू Sat, 01/02/2014 - 16:36

In reply to by मन

>> कुठल्याही आर्थिक व्यवस्थेत कुठलीच एक रक्कम अगदि टाकाउ म्हणून ठरवता येत नाही.
दरवेळी कुणा ना कुणासाठी तरी ती अगदि मौल्यवान असू शकतेच.

असेलही, पण येणारा इच्छुक पात्र आहे का, हेसुद्धा महत्त्वाचं असतं. इथे नाटकातली पार्श्वभूमी असण्यामुळे किंवा वक्तृत्व/भाषा चांगली असल्यामुळे त्याचा क्षमतेत/पात्रतेत आपसूक फायदा होईल अशी अपेक्षा असे. हे किस्से तुम्हाला अनेक नाट्यकर्मींकडून ऐकायला मिळतात त्याचं कारणच ते होतं.

>> (माझ्या माहितीप्रमाणे सरकार दरबारी चिटोरं जरी हलवायचं तरी तयचं डॉक्युमेंटेशन्/दस्ताऐवजीकरण करावं लागतं; ही फ्याक्ट आहे.
procedure नावाचा आता बदनाम असलेला पण तार्किक असा एक प्रकार आहे.
ह्याच डॉक्युमेंटेशनमुळं rti/माहिती अधिकारास बळकटी येते.

जर प्रोसीजर असेल तर ती पार पाडणं विशेष कठीण नसावं - म्हणजे परांजप्यांकडून रीतसर अर्ज भरून घेणं, वय/शिक्षण वगैरेदृष्ट्या त्या नियमात बसतात का ते पाहणं, इत्यादि.

मन Sat, 01/02/2014 - 16:53

In reply to by चिंतातुर जंतू

पात्रता हा निकष गृहित धरुनच मूळ प्रतिसाद होता.
बेरोजगार लोक स्टृअगल वगैरे करत आहेत, जाहिराती देउन बोलावलं, ऑडिशन्स घेतल्या तर निदान चार इच्छुक व लायक लोकांची पोटं भरतील असा विचार आकाशवाणी व दूरदर्शन करत नसत का ?

ह्या वाक्यात इच्छुक व लायक हा क्लॉज वापरला आहेच.
.
.
जर प्रोसीजर असेल तर ती पार पाडणं विशेष कठीण नसावं - म्हणजे परांजप्यांकडून रीतसर अर्ज भरून घेणं, वय/शिक्षण वगैरेदृष्ट्या त्या नियमात बसतात का ते पाहणं, इत्यादि.

ह्या मुलाखतीस आल्यानंतरच्या , येण्यासंदर्भातल्या व्यक्ती-स्पेसिफिक प्रोसिजर झाल्या.
पात्र उमेदवारांना जाहीर आवतण द्यायची काही पद्धत होती का ह्याची चौकशी करु इच्छितो.
performing arts मध्ये पात्र व कसलेले लोक कमीच असतात हे सामान्य निरिक्षण मान्य आहे.
(उदा :- नाट्य संमेलनात तरुण अध्यक्ष अधिक दिसतात. मुळात तुलनेनं स्पर्धा कमी. साहित्य संमेलनात रसिकांसारखीच लेखक कवी वगैरेंची लै गर्दी. )
असो, ते नाट्य्-साहित्य फारच अवांतर होतय,सॉरी.
.
.
please note :-
दिग्गज मंडळींबद्दल आपलं काहिच म्हणणं नाही. ही लोकं चॅम्पियन , जिनियस आहेतच.(हे मी इथं म्हणणं म्हणजे " सच्या चाम्गली फलंदाजी करतो "
किंवा "न्यूटनची तर्कशक्ती/गणित चांगली/चांगलं होती/होतं " असं म्हणून त्याला प्रशस्तिपत्रक देण्यासारखं आहे.)
माझी शंका सरकारी कारभाराबद्दल आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 01/02/2014 - 19:04

In reply to by मन

जाहिरात पाहूनच, परांजपे यांच्या नाटकसंबंधी ओळखीतून कोणीतरी फॉर्म भरला असेल अशी शक्यता मला तरी वाटली. (घास तोंडापर्यंत आणून न भरवणारे परदेशी सिनेमे पाहिल्याचा हा परिणाम असेल काय?)

आणि

या सगळ्या लेखांमधून फक्त सरकारी कारभार कसा आहे याबद्दलच प्रतिक्रिया नोंदवावीशी वाटली?

'न'वी बाजू Sat, 01/02/2014 - 21:15

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(घास तोंडापर्यंत आणून न भरवणारे परदेशी सिनेमे पाहिल्याचा हा परिणाम असेल काय?)

??????

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 02/02/2014 - 06:56

In reply to by 'न'वी बाजू

असे सिनेमे पाहताना वेगवेगळ्या शक्यतांचा विचार स्वतःलाच करावा लागतो. आणि काही ठिकाणी बिनमहत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ते समजून नको त्या तपशीलांकडे दुर्लक्षही करता येतं.

अजो१२३ Sat, 01/02/2014 - 17:52

In reply to by मन

१९६० च्या दशकापर्यंत शाळेत कोणी दहावी पास झाले कि त्याला सरकार नोकरी करायला बोलावायला अधिकारी घरी येई असे वडील सांगतात. आमच्या वडीलांना उद्यापासून नोकरीला ये असे ओरडून रस्त्यावर सांगून कोणी अधिकारी (बहुतेक तलाठी) निघून गेला. ते गंमत म्हणून दुसर्‍या दिवशी गेले आणि आयुष्यभर ग्रामसेवक राहिले.

'न'वी बाजू Mon, 10/02/2014 - 11:10

In reply to by मन

टीव्हीवर वृत्तनिवेदिका म्हणून स्मिता पाटिल ह्यांनाही अगदि अशीच ऑफर दूरदर्शन "आपोआप" दिली होती.

स्मिता पाटील ज्या काळी मुंबई दूरचित्रवाणी केंद्रावर वृत्तनिवेदिका म्हणून काम करत, त्या काळी 'दूरदर्शन' अशी एंटिटी अस्तित्वात नव्हती, असे आठवते. तेव्हा आकाशवाणीचाच एक विभाग दूरचित्रवाणी प्रसारण हाताळे. (प्रसारणाच्या सुरुवातीला आकाशवाणीचा लोगो आणि सिग्नेचर ट्यून असे, आणि लोगोखाली 'आकाशवाणी दूरदर्शन' असे शब्द आणि त्याखाली 'बहुजनहिताय बहुजनसुखाय' हे आकाशवाणीचे घोषवाक्य लिहिलेले असे.) त्यानंतर मग काही वर्षांनी (नक्की कधी, ते आठवत नाही, पण स्मिता पाटील यांच्या वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्दीच्या समाप्तीनंतर कधीतरी, एवढे निश्चित.) दूरचित्रवाणी प्रसारण हे आकाशवाणीच्या अखत्यारीतून बाहेर पडून 'दूरदर्शन' हा स्वतंत्र विभाग (आपल्या वेगळ्या लोगो, सिग्नेचर ट्यून आणि 'सत्यं शिवं सुंदरम्' या घोषवाक्यासहित) अस्तित्वात आला.

सबब, स्मिता पाटील यांना 'दूरदर्शन'कडून ऑफर आली होती, असे म्हणणे हे तांत्रिकदृष्ट्या बहुधा चूक ठरावे. 'आकाशवाणीकडून दूरचित्रवाणीवर वृत्तनिवेदिकेच्या जागेसाठी ऑफर आली होती' असे म्हणणे बहुधा अधिक सयुक्तिक ठरावे. (चूभूद्याघ्या.)

===================================================================================================

मुंबई दूरचित्रवाणी केंद्र तेव्हा नवेकोरे होते, असे अंधुकसे आठवते. म्हणजे, 'नवेकोरे' म्हणून वाच्यार्थाने सांगायला मी ते पाहिलेले नाही, पण 'नुकतेच स्थापन झाले होते', अशा अर्थी.

मिसळपाव Sun, 02/02/2014 - 01:43

सख्खे शेजारी अर्धवट पहाता आलं होतं. छ्या...त्यानी उल्लेख केलेली नाटकं / आकाशवाणीवरचे प्रयोग होउन विरले सगळे. याचं रेकॉर्डिंग / संवर्धन झालं असतं तर?

प्रकाश घाटपांडे Mon, 03/02/2014 - 14:30

In reply to by अमुक

दुवा शोधता येत नाही मला. कार्यक्रमाचे नाव वाचाल तर वाचाल. दुपारी ४.३० ते ५.०० या दरम्यान तो कार्यक्रम होता. दोन पुस्तके व ऐसी अक्षरेचा परिचय करुन देण्यात आला. आयबीएन लोकमतच्या साईट वर काही दिसत नाही त्याचा दुवा.

रुची Mon, 03/02/2014 - 01:10

हॉलिवूडमधल्या एका गुणी कलाकराचे निधन झाल्याची बातमी वाचली. अलिकडेच त्याच्या भूमिका असलेले 'ए बोट दॅट रॉक्ड' , 'जॅक गोज बोटींग', 'द लेट क्वार्टेट' वगैरे सिनेमे पाहिल्यावर हॉलिवूडमधे त्याच्यासारख्या कलाकारांचे असणे सिनेसॄष्टीसाठी किती महत्वाचे आहे हे जाणविले होते. त्याचे वय फक्त ४६ वर्षे होते! वाईट झाले.

अमुक Mon, 03/02/2014 - 02:35

In reply to by रुची

अरेरे ! त्याचे काम पहिले पाहिले ते पॅच अ‍ॅडॅम्समध्ये. त्याच वेळी त्याचा शैलीदार अभिनय नजरेत भरला होता. 'मिशन इम्पॉसिबल ३'सारख्या गल्लाभरूपटांत काम करतानाच ब्रॉडवेवरही त्याने अनेक कामे केली. 'कपोटी'साठी त्याला सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचे ऑस्करही मिळाले. त्यात त्याने स्वतःचा बदललेला आवाज ऐकण्याजोगा आहे. शब्दोच्चारात शेवटी थोडी खरखर असलेल्या त्याच्या आवाजाचा योग्य वापर 'मेरी अ‍ॅन्ड् मॅक्स्' या चित्रपटात दिसून येतो. Synecdoche, New York हा त्याचा एक उल्लेखनीय (पण फारसा प्रसिद्ध नसलेला) चित्रपट.
श्रद्धांजली...

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 05/02/2014 - 05:21

In reply to by चिंतातुर जंतू

असीमानंदांवर विश्वास ठेवला (आणि संघाच्या दाही तोंडांना नावं ठेवून झाल्यानंतरही) डांगसारख्या, भारताच्या मुख्य भूमीवर असणाऱ्या भागात ही अशी मोडस-अॉपरंडी काम करू शकते याबद्दल खेद झाला.

मन Wed, 05/02/2014 - 17:11

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रकरण प्रलंबित वगैरे आहे ना म्हणे ?
ह्यापूर्वी दहाएक वर्षापूर्वी दक्षिणेतील शंकराचार्याचेही बरेच किस्से छापून वगैरे आले मिडियात . अगदि शंकराचार्यानं बर्‍याच गोष्टींचं कन्फेशन दिल्याचंही टीव्हीवर प्रसारित झालं. मिडियानं ते बरच उचलून धरलं.
आता कोर्टानं त्या टेपा मान्य केल्या नाहित असं दिसतं. शंकराचार्यालाही निर्दोष मुक्त केलय.
पण ह्या अटक वगैरे केल्यावर जसं तुफ्फान कव्हरेज त्या प्रकरणाला दिलं होतं, तेवढं कव्हरेज सुटकेला दिलं नाही.
हे इतरही काही केसेसमध्ये ऐकलय.
"आमच्याविरुद्ध प्रपोगेंडा केला जात आहे. आम्हाला अडकवण्यात येत आहे." असा त्यातील आरोपींच्या किंवा एकूणच संघाशी जवळिक असणार्‍यांच्या म्हणण्यात मग तथ्य वाटू लागतं. मिडियाच्या भूमिकेबद्दल संशय येतो. व एकूणच आपल्यापर्यंत पोचणार्‍या अशा माहितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं.
मला अधून मधून भेटलेल्या संघातील काही लोकांची वागणूक दुटप्पी असूही शकेल.
किंवा त्यातील प्रामाणिक लोकांचीही भूमिका बिन्डोक,मूर्खपणाची असू शकेल.
किंवा मला न पटणारी असेल.
पण हे खरं मानलं तरी त्यांना अडकवण्यात येत आहे ; ही शक्यता शिल्लक राहतेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 05/02/2014 - 19:05

In reply to by मन

या सगळ्या शक्याशक्यता मान्य करूनही असीमानंदांनी चालवलेलं धर्मांतर, कुंभमेळा, पण मूलभूत गरजा पुरवण्याकडे सरकार आणि असीमानंद दोन्ही बाजूंनी केलेलं दुर्लक्ष, सरकारी दुर्लक्षामुळे धर्मप्रसारकांचं फावणं, (१८ वर्षांच्या वरच्या) लोकांनी केलेल्या धर्मांतराला मॅजिस्ट्रेटकडून परवानगीची गरज असणारा कायदा, तो कोणी आणि काय परिस्थितीत पास केला या गोष्टी अधिक विचारार्ह वाटल्या.
८२ लोक मरणं, पाच बॉंबस्फोट या गोष्टी होऊन गेल्या आहेत. त्याबद्दल दुःख आहेच, पण हे असंच राहिलं तर पुढचे बॉंबस्फोट थांबतील का, अशी आणखी भीती वाटते.

(लोकांना वापरून टाकून देणं, हा संघाचा प्रकार अगदी घरातही पाहिलेला आहे, त्यामुळे प्रज्ञा सिंगला वापरून वाऱ्यावर सोडणं, उच्च नैतिक भूमिकेबद्दल ट्यँवट्यँव करून गरीब लोकांचे मुख्य, मूलभूत प्रश्न सोडून देणं वगैरे प्रकारांबद्दल फार आश्चर्य वाटत नाही.)

नितिन थत्ते Wed, 05/02/2014 - 20:08

In reply to by मन

>>प्रकरण प्रलंबित वगैरे आहे ना म्हणे ?

सज्जन कुमार आणि टायटलर यांची प्रकर्णे प्रलंबित सुद्धा नाहीयेत बहुधा. पण ते असो.

मन Thu, 06/02/2014 - 13:51

In reply to by मन

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Aseemanand-blames-RSS-chi…

भागवतांचा बॉम्बस्फोटांना पाठिंबा?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना मालेगाव आणि समझौता एक्सप्रेसमधील बॉम्बस्फोटांची पूर्ण कल्पना होती, किंबहुना स्फोटांना त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबाच होता, असा सनसनाटी दावा करणारी, आरोपी असीमानंद यांची मुलाखत 'कॅरावॅन' मॅगझिनमध्ये झळकल्यानं देशात एकच खळबळ उडाली आहे. परंतु, असीमानंद यांनी अशी कुठलीही मुलाखत दिली नसल्याचा खुलासा त्यांच्या वकिलांनी केलाय. तसंच, हे आरोप रा. स्व. संघानंही फेटाळून लावले आहेत.

२००६ ते २००८ या दोन वर्षांच्या काळात समझौता एक्सप्रेस, हैदराबादेतील मक्का मशीद, अजमेर दरगाह आणि मालेगावमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले होते. मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी काही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनीच हे स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. या स्फोटांप्रकरणी अनेक हिंदुत्ववादी नेत्यांना अटकही करण्यात आलेय आणि त्यात असीमानंद यांचाही समावेश आहे. ते सध्या अंबाला सेंट्रल जेलमध्ये आहेत. तिथे जाऊन 'कॅरावॅन' मॅगझिनच्या प्रतिनिधी लीना गीता रघुनाथन यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यातच, समझौता एक्सप्रेस आणि मालेगावमधील स्फोटांना रा. स्व. संघाचाही पाठिंबा होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

.
.
.
अशी कोणतीही मुलाखत दिली नसल्याचे असीमानंदांचे/असीम्नंदाच्या वकीलाचे म्हणणे आहे.
खरे खोटे काहीही समजत नाहिये.

मन Thu, 06/02/2014 - 09:13

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/jalgaon-north-mahara…
.
.
धमाल...
लिओनार्दो डिकॅप्रिओच्या एका पिच्चरची आठवण झाली.
.
.
.

फेसबुकवरूनच खाडे बनला ‘IPS’!

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

'एक १७ वर्षांचा मुलगा भोसरी पोलिस स्टेशनला सीम कार्ड हरवल्याची तक्रार करण्यासाठी आला. बराच वेळ कोणीच त्याची दखल नाही घेतली... मग तो एका कॉन्स्टेबलला बोलला, 'साहेब, माझे सिम हरवले आहे. तक्रार नोंदवायची आहे. तो कॉन्स्टेबल आधीच वैतागलेला होता. त्यामुळे तो त्या मुलाला खूप खालच्या थराला जाऊन बोलला. त्या मुलाला खूप वाईट वाटले, अन् तो तक्रार न नोंदवताच निघून गेला. खरेच सामान्य माणसाचा या जगात कुणीच वाली नाही... त्याचा चुकीने का होईना झालेला अपमान चांगलाच जिव्हारी लागला. त्याने मनाशी पक्का निर्धार केला की एक दिवस असा आण‌ीन की त्या कॉन्स्टेबलला सलाम करायला लावीन. तो तिथून बाहेर पडला. झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी, अन् सर्वसामान्यांचा वाली होण्यासाठी त्याने अथक प्रयत्न केले. खूप मेहनत घेतली अन् अखेर तो दिवस उजाडला... तो 'आयपीएस' झाला होता ..' हे स्टेटस आहे बनावट आयपीएस हनुमंत (हेमंत)खाडेच्या फेसबुक अकाऊंटवरचे. फेसबुकवरील ही इमोशनल स्टोरी वाचून कोणीही आकर्षित होईल, प्रेरित होईल हे ओळखून हनुमंत खाडेही बनावट आयपीएस झाला आणि जळगावच्या पोलिसांना त्याने खरेच सॅल्यूट करायला लावला. मात्र, पोलिसांच्या सजगतेने त्याचे हे बिंग फुटले आणि तो अडकला.

खरे 'आयपीएस'ही भुलले

स्वतःला मान सन्मानाने जगता यावे, मग तो मान-सन्मान खोटा असेल तरी चालेल, असा चंग बांधून हनुमंत याने फेसबुकवर आयपीएस अधिकारी हेमंत खाडे या नावाने बनावट अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवर त्याने तो कुठे शिकला याची माह‌िती अपलोड केली. त्या सोबत त्याने एका लहान मुलाची स्टोरी देखील अपलोड केली. ती स्टोरी वाचून अनेकांनी त्याला लाईक केले. जवळपास १० पेक्षा अधिक खरे आयपीएस त्याच्याशी जॉईन झाले. या एका फेसबुक अकाऊंटमुळे देवाची आळंदी येथील हनुमंत हा २५ वर्षांचा युवक 'आयपीएस' म्हणून स्वतःला मिरवू लागला. अनेक तरूणांना तो फेसबुकच्या माध्यमातून आ‌कर्षित करू लागला.

पुण्यातही ठोकली व्याख्याने

पुण्याजवळील एका स्पर्धा परीक्षा केंद्रात जावून त्याने व्याख्यानही ठोकले होते. एवढेच नाही तर त्या व्याख्यानातून स्फूर्ती घेवून अनेक मुलांच्या गळ्यातील तो ताईत झाला होता. मा‌त्र जळगावात दीपस्तंभने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात त्याचा घात झाला आणि बिंग फुटले. काही क्षणांपूर्वी त्याला सॅल्यूट मारण्यासाठी वर गेलेल्या हातांचेच त्याने नंतर फटके खाल्ले. खाडे याच्या या प्रतापामुळे मात्र सर्वच अवाक् झाले.

स्वतःच्या गावात सत्कार

खाडे याने २०१० साली आळंदी येथे आमदार-खासदारांच्या उपस्थितीतीत 'आयपीएस' म्हणून मोठा सत्कार देखील स्वीकारलेला आहे. याच प्रकारचा एक खोटा आयपीएस अधिकारी सप्टेंबर २०१२ मध्ये वसई येथे आढळून आला होता. त्याच्याविरूध्द गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान ज्या सुच‌िता देशमुख नावाच्या मह‌िला आयपीएस अधिकाऱ्याने दीपस्तंभला खाडे यांचा नंबर दिला, त्यांचे फेक अकाऊंट खाडे यानेच तयार करवून तोच ते चालवित होता. सुचिता देशमुख यांच्या अकाऊंटवरून तो स्वतःचेच नाव व नंबर इतरांना द्यायचा. याच माध्यमातून त्याचा नंबर 'दीपस्तंभ'ला मिळाला होता.

दीपस्तंभच्या संचालकांचा अशा पध्दतीच्या फेक माणसाला बोलाविण्यामागे काही उद्देश होता का? हे तपासले जाईल. या प्रकरणात दीपस्तंभच्या संचालकांनी खात्री करणे गरजेचे होते. त्यांची ती जबाबदारी होती. या गुन्ह्यात कुठेही दीपस्तंभच्या संचालकांची चूक आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- एस. जयकुमार, पोलिस अधीक्षक

आयपीएस दराडेंचाही घेतला गैरफायदा

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे युवक त्याच्याशी जोडले जावू लागले. याच काळात त्याने अनेकांशी संपर्क करून स्वतः आयपीएस असल्याची माह‌िती सर्वत्र पोहचवली. यामुळेच पुणे येथील सामाज‌िक संस्थेचे काम करणारे डॉ. ज्ञानोबा मुंडे व औरंगाबादचे हेमंत दराडे हे त्याच्याशी जोडले गेले. या दोघांनीही त्याच्याशी फेसबुकवरून संपर्क साधल्यानंतर खाडे याने त्यांच्याशी बोलतांना दाखवलेली लकब त्यांना पसंत पडल्यामुळे ते खाडेच्या जवळ जावू लागले. मग खाडे याने दराडे यांचे औरंगाबाद येथील घरदेखील पाहिले. दराडे हे औरंगाबादेत स्वतःचा व्यवसाय करतात. त्या फर्मला देखील त्याने भेट दिली. नंतरच्या काळात दराडे यांच्या माध्यमातूनच त्याने औरंगाबादमधील एका बड्या घरची मुलगी देखील पाह‌िली. खाडे याचे वडील किर्तनकार असल्याने दराडे यांनी त्याच्या वडीलांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील केले. एकूणच खाडे 'आयपीएस' म्हणून स्वतःला चांगलाच मिरवून घेत होता.

नितिन थत्ते Thu, 06/02/2014 - 09:43

In reply to by मन

काहीसे भयावह चित्र आहे.

लोकांची हीरोंची गरज इतक्या थराला गेली आहे का?

सहसा काहीसे कार्य केलेल्या माणसालाही भीती असते की आपण आपले कार्य फुगवून सांगितले आपले पितळ उघडे पडू शकेल.

बाबागिरीलासुद्धा गिर्‍हाइक गाठण्यासाठी बाबांमुळे काहीतरी फायदा झाल्याचे प्रत्यक्ष सांगणारे भक्त लागतात.

इथे काहीच न केलेल्या माणसाला कसलीच शहानिशा करता असे स्वीकारले कसे जाते ? व्याख्याने वगैरे आयोजित केली जाणे आश्चर्यचकित करणारे आहे.

मन Thu, 06/02/2014 - 09:51

In reply to by नितिन थत्ते

आम पब्लिक सोडा. आम पब्लिकला आपण ३५=१० हे गणित लावून मोकळे तरी होउ शकतो क्षणभर.
खुद्द आय पी एस ऑफिसर वगैरे त्याच्या परिचयात आहेत म्हणे.
अधिक तपशील कळले तर बरं होइल. उपलब्ध विद्यावरून कायतरी भन्नाट प्रकरण दिसते आहे.
मागे कुणीतरी कार्ड दाखवली होती मुंबैत "आम्ही देशाचे मालक आहोत. नेहरुंना देश भाड्यानं आमच्या आजोबानं दिला होता" असं म्हणणारी. आता त्यावर कोर्ट कज्ज वगैरे व्हायचा तो होइलच.
आणि आता ही.
दोन्हीतील वैचित्र्य नजरेत भरतं.

मन Thu, 06/02/2014 - 18:08

In reply to by 'न'वी बाजू

कॉल सेंटर ट्रेनिंगमध्ये सुरुवातीलाच " तुम्हाला फोन आल्यावर कसा हँडल कराल ? " हे सांगताना "व्यवशित , तपशीलवार ,स्टेप बाय स्टेप माहिती द्या " असं सांगण्यासठी, टह्सवण्यासाठी
३५ = १० हे लक्षात ठेवायला सांगतात. "अमेरिकन क्लायंट कॉलवर असेल तर त्याचे तुम्ही दहा वर्षाच्या मुलाशी बोलत आहात असे समजा. तिथलं सरासरी प्रौढ बौद्धिक वय १० इतकच आहे."
असं कायतरी सांगतात.
"अमेरिकन लोकांची सरासरी बुद्ध्हीतमत्ता १० वर्शाची असते " हा समज त्यातूनच पसरला असावा.
नीट तपशील कसे द्यावेत हे सांगण्यासाठी ते एक उदाहरण आहे, हे कुणी लक्षात घेत नाही.
खरं तर अमेरिकन लोकांचं सरासरी बौद्धिक वय १० आहे, असं म्हणण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचं, आम पब्लिकचं (irrespective of American or not) १० आहे असं समजा , हे आता कॉल सेंटरमध्ये शिकवू लागलेले आहेत. कारण भारतातलेच क्लायंट बरेच आहेत.
"थोडक्यात सामान्य माणसाचं बौद्धिक वय १० असतं/माना " हा ही एक समज पसरतो आहे.
तो गृहित धरला, तरी IPS लोकं चतुर चानाक्ष असणं अपेक्षित आहेत.
एक विशिष्ट काठिण्यपातळी ते ओलांडून आले आहेत, ते मठ्ठ नाहित; असणं अपेक्षित नाही; असं मला म्हणायचं आहे.

मन Thu, 06/02/2014 - 18:21

In reply to by 'न'वी बाजू

३५ वर्षाची अमेरिकन व्यक्ती असली तरी ती बौद्धिकद्रुष्ट्या १० वर्षाची असते; असं समजा; असं शिकवण्यात येतं कॉल सेंटरमध्ये.
तुम्हाला ठाउक नसेल, ह्यावर विश्वास बसणे कठीण आहे; प्रश्नाचा उद्देश त्यामुळेच समजला नाही.

'न'वी बाजू Thu, 06/02/2014 - 18:26

In reply to by मन

कधी कॉल सेंटरात काम केलेले नसल्याकारणाने खरोखरच कल्पना नव्हती.

माहितीबद्दल धन्यवाद.

======================================================================

फार कशाला, आजवर चेतन भगतची इतकी पुस्तके वाचली - निखळ मनोरंजन म्हणून वाचली - पण तेवढे 'वन नैट @ अ कॉल सेण्टर' वाचायचे राहून गेले. असो.

मन Thu, 06/02/2014 - 18:33

In reply to by 'न'वी बाजू

'वन नैट @ अ कॉल सेण्टर' मी ही वाचलेले नाही.
तुम्ही थेट तसे म्हटला नाहित, पण उगी चारचौघात असा चेतन भगतीय वाचले असण्याचा भलतासलता आरोप नको, म्हणून स्पष्टीकरण देउन ठेवतो ;)

'न'वी बाजू Thu, 06/02/2014 - 18:46

In reply to by बॅटमॅन

'चेतन भगत वाचलाय/वाचतो' आणि 'गोविंदाचे पिच्चर पाहतो' हे पब्लिकमध्ये सांगायला लाज वाटू नये.

डोके बाजूला काढून ठेवून अनुभवायची निखळ करमणूक! (कधी जमले, तर 'टू स्टेट्स' वाचाच. आय रेकमेण्ड इट! 'लेट्स डू इट फॉर द सेक ऑफ न्याशनल इंटिग्रेशन, बेबी, रैट्ट ऑन द बीचेस ऑफ गोवा...' (शब्द माझे.))

असा लेखक झाला नाही, होणेही नाही.

बॅटमॅन Thu, 06/02/2014 - 18:51

In reply to by 'न'वी बाजू

गोविंदाबद्दल लाज तेव्हाही वाटत नसे आणि आत्ताही वाटत नाही- सेम गोज़ फॉर गुण्डा & मेनी अदर फॉर्म्स ऑफ एंटरटेनमेंट जे सरळ प्रायमली कर्मणूक इंड्यूसवितात विदौट अपीलिंग द ग्रे म्याटर मच.

पण चेतन भगत इज़ अ शॉव्हिनिस्ट असे टू स्टेट्स वाचल्यावर मत झाले आणि त्याची बाकी मुक्ताफळे पाहता त्याजबद्दल अजून प्रतिकूल मत जाहले. तस्मात ते आवडणे इल्ला. यद्यपि ५.समवन इज़ ओके-पण तेव्हा अभियांत्रिकी कालेजाच्या हाष्टिलात असल्याने तेही साहजिकच होते म्हणा. त्यानंतर त्याजपासून औटग्रो जाहल्यावर एकदाही ते पुस्तक वाचलेले नाही. असो.

'न'वी बाजू Fri, 07/02/2014 - 00:18

In reply to by आदूबाळ

वाट्टेल ती शी थोबाडावरची सुरकुती हालू न देता काहीतरी गंभीर असल्यागत मख्खपणे लिहायला (नि खपवून द्यायला)सुद्धा ट्यालेण्ट लागते.

तुम्ही लिहून पाहा बरे एकदा! वाक्यावाक्यागणिक स्वतःलाच हसू येते की नाही, सांगा.

माझ्या मते चेतन भगत हा एकविसाव्या शतकातला इंगजी भाषेतला सर्वाधिक विनोदी (अनइण्टेन्शनली पर्‍हॅप्स, पण तरीही विनोदीच) लेखक आहे. (डोण्ट टेक एनीथिंग ही राइट्स सीरियसली. अव्वल दर्जाचे ट्र्याश वाचतोय, या पुरत्या जाणिवेसरशीच वाचा. मग मजा येते की नाही, पहा.)

(अवांतर: 'मुक्तपीठ' वाचता की नाही कधी?)

बॅटमॅन Fri, 07/02/2014 - 00:21

In reply to by 'न'वी बाजू

मुक्तपीठ इज़ निर्भेळ इन इट्स नाईव्ह सिम्प्लिसिटी.

चेत्या भगत लिहितो बकवासच, पण ते निर्भेळ नैये.

असो. अजून राग न गेल्याचा परिणाम, दुसरे काय? राग गेल्यास तुमच्यासारखेच वाटेल भौतेक.

'न'वी बाजू Fri, 07/02/2014 - 00:28

In reply to by बॅटमॅन

चेतन भगतची तुलना 'मुक्तपीठ'शी करणे अंमळ चुकीचेच आहे. (दवण्यांशी करणेही चुकीचेच आहे.)

किंबहुना, चेतन भगतची तुलना कशाशीच करता येणे शक्य नाही. अतुल्य आहे तो. झाले बहु, होतिल बहु, परि यासम हाच.

सरतेशेवटी, केवळ 'ही इज़ सो रिडीक्युलस, ही इज़ फनी' एवढेच म्हणून आपले इवलेसे भाषण संपवतो.

आदूबाळ Fri, 07/02/2014 - 22:21

In reply to by 'न'वी बाजू

मुक्तपीठाची गोष्ट वेगळी आहे. त्यातला विनोद हा बरेचदा अनुभवाच्या कमअस्सल बेगडीपणापेक्षा लेखक सराईत नसतात म्हणून घडतो. (सुप्रसिद्ध "मोकलाया" हे पण तसंच एक उदाहरण. त्याच धाग्यात कविता दुरुस्त करून लिहिल्यावर "आवडली" असे पण प्रतिसाद आले होते.)

भगत मात्र कथानकातला पेच सोडवण्यासाठी योगायोग "घडवून" आणतो तेव्हा त्याच्या टकलावर गुद्दे घालावेसे वाटतात. उदा. टू स्टेट्समध्ये ती तमिळ मुलगी भावी सासरकडच्या पंजाबी मंडळींना आवडावी म्हणून हुंडा मागण्याचा एक बळंच प्रसंग घातलाय. "वन नाईट..." मध्ये क्लायमॅक्स सोडवायला पर्तेक्ष "देव" येतो तेव्हा वाचक हतबुद्ध होतो.

त्यामुळे "चेतन भगत हा एकविसाव्या शतकातला इंगजी भाषेतला सर्वाधिक विनोदी लेखक आहे" याला अनुमोदन.

अवांतरः भगतानंतर एमबीए-टर्न्ड-लेखक अशी एक अख्खी पिल्लावळ आली. त्यांच्या लेखनात पण "कुंथून कुंथून योगायोग मोटिफ" वेळोवेळी दिसतो.

'न'वी बाजू Fri, 07/02/2014 - 00:23

In reply to by बॅटमॅन

पण चेतन भगत इज़ अ शॉव्हिनिस्ट असे टू स्टेट्स वाचल्यावर मत झाले

तो तर आहेच. तो नाही असे एका अक्षराने तरी बोललो मी?

नगरीनिरंजन Fri, 07/02/2014 - 21:11

In reply to by बॅटमॅन

५.समवन वाचून आणि त्यानंतर थ्री इडियट्स पाहून चेतन भगत आणि आमीर खान यापैकी कोण जास्त ओव्हररेटेड आहे असा प्रश्न पडला आणि आजतागायत पडूनच आहे.

चिंतातुर जंतू Mon, 10/02/2014 - 17:45

In reply to by नगरीनिरंजन

>> समवन वाचून आणि त्यानंतर थ्री इडियट्स पाहून चेतन भगत आणि आमीर खान यापैकी कोण जास्त ओव्हररेटेड आहे असा प्रश्न पडला आणि आजतागायत पडूनच आहे.

राजकुमार हिरानीला विसरलात का?

मी Mon, 10/02/2014 - 19:15

In reply to by चिंतातुर जंतू

मनोरंजनकार (एन्टरटेनर्स) लोकप्रिय असणारच नाही का?, ते ओव्हररेटड नसून रेटेड आहे. लोकप्रिय रेटेडला ओव्हररेटेड संबोधणं इलीट नाहि काय?

राजेश घासकडवी Mon, 10/02/2014 - 23:09

In reply to by बॅटमॅन

मी आणि बॅटमॅनला माझाही दुजोरा! आता मी त्यांना कायमच दुजोरा द्यायचं ठरवलं आहे. अरुण जोशी, बॅटमॅन, मन, मी, भुस्कुटे आणि घासकडवी असा नवीन अक्ष तयार होतोय. सावध रहा.

चिंतातुर जंतू Mon, 10/02/2014 - 23:49

In reply to by मी

>> मनोरंजनकार (एन्टरटेनर्स) लोकप्रिय असणारच नाही का?, ते ओव्हररेटड नसून रेटेड आहे. लोकप्रिय रेटेडला ओव्हररेटेड संबोधणं इलीट नाहि काय?

आं? म्हणजे चेतन भगत आणि आमिर खान एंटरटेनर नाहीत की काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/02/2014 - 00:45

In reply to by चिंतातुर जंतू

तुम्ही नावं ठेवता तर आहेत. तु्म्ही ज्यांना नावं ठेवली ते एंटरटेनर. तुमच्या भोवती जग फिरतं.

मी Tue, 11/02/2014 - 08:35

In reply to by चिंतातुर जंतू

आं? म्हणजे चेतन भगत आणि आमिर खान एंटरटेनर नाहीत की काय?

अर्थात तो प्रतिसाद एकुण वरच्या प्रतिसाद साखळीलाच होता, मनोरंजनकारांना क्रिटीकली जज करणे वेस्ट ऑफ टाइम आहे आणि इलिटही आहे, नाही?

चिंतातुर जंतू Tue, 11/02/2014 - 13:27

In reply to by मी

>> मनोरंजनकारांना क्रिटीकली जज करणे वेस्ट ऑफ टाइम आहे आणि इलिटही आहे, नाही?

अनेकांना आमिर खान (म्हणजे 'दिल' किंवा 'गझनी'चा नव्हे, तर 'तारें जमीं पर' किंवा 'सत्यमेव जयते'चा) इंटलेक्चुअल वगैरे वाटतो. त्यामुळे ते तसं पाहात असावेत. एंटरटेनर्सना मनोरंजनाच्या दर्जानुसार जज करता येतंच. 'जाने भी दो यारों' किंवा 'अंदाज अपना अपना' किंवा 'दबंग' आणि राजकुमार हिरानी वगैरे तुलना करता यावी.

मेघना भुस्कुटे Tue, 11/02/2014 - 14:23

In reply to by चिंतातुर जंतू

अवांतर कबुली:

मला 'अंदाज अपना अपना' ओव्हररेटेड वाटतो. काही काही बाबतीत तो तेव्हाच्या सिनेमांच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उजवा आहे, मान्य. उदाहरणार्थः गोविंदा-करिश्मा-डेविड धवन यांचे सेक्साटलेले सिनेमे. त्या पार्श्वभूमीवर यातला प्रसंगनिष्ठ विनोद मजेशीर आहे. आमीर नि सलमानचं कॉमेडीचं अफलातून टायमिंग फक्त एवढ्या एकाच सिनेमात बघायला मिळतं. ठीक. हा सिनेमा खूप लोकांना खूप आवडतो, हेही ठीक.

पण मला तो पाहताना झोप येते.

हुश्श.

मेघना भुस्कुटे Tue, 11/02/2014 - 14:48

In reply to by अनुप ढेरे

खरं तर फारसा नाही! म्हणजे आंब्याचा वास आला तर नाक मुरडणार नाही, पण आंब्यासाठी लाळ गाळण्याची शक्यता कमी. हापूस का पायरी असं विचारलंच कुणी, तर डोळे झाकून पायरीस पसंती. :ड

मी Tue, 11/02/2014 - 14:34

In reply to by चिंतातुर जंतू

>>एंटरटेनर्सना मनोरंजनाच्या दर्जानुसार जज करता येतंच. 'जाने भी दो यारों' किंवा 'अंदाज अपना अपना' किंवा 'दबंग' आणि राजकुमार हिरानी वगैरे तुलना करता यावी.

तुलना करता यावी, पण ओव्हररेटेड/तत्सम हे लेबलच मुळात एलीट आहे, नॉन-एलीट-जमातीने त्याला(बहुसंख्य म्हणुन ओव्हर)रेट करुन टाकलं आहे. अर्थात एलीट गैर आहे असे नाही, पण लोकांच्या पसंतीला जज न(अधिक एलीट) करता कलाकृतीला जज करणे वेळ वाया घालवणारे असु शकते एवढेच.

>>अनेकांना आमिर खान (म्हणजे 'दिल' किंवा 'गझनी'चा नव्हे, तर 'तारें जमीं पर' किंवा 'सत्यमेव जयते'चा) इंटलेक्चुअल वगैरे वाटतो.

आता ह्याबद्दल बोलुन किती वेळ वाया घालवणार म्हणून पास. ;)

मन Tue, 11/02/2014 - 14:43

In reply to by मी

अनेकांना आमिर खान (म्हणजे 'दिल' किंवा 'गझनी'चा नव्हे, तर 'तारें जमीं पर' किंवा 'सत्यमेव जयते'चा) इंटलेक्चुअल वगैरे वाटतो.

==))

चिंतातुर जंतू Tue, 11/02/2014 - 15:57

In reply to by मी

>> लोकांच्या पसंतीला जज न(अधिक एलीट) करता कलाकृतीला जज करणे वेळ वाया घालवणारे असु शकते एवढेच.

तर्कनिष्ठ दृष्टिकोनानुसार कोणतीच गोष्ट अंतिम अशी असण्याचं कारण नाही; तद्वत विशिष्ट काळात मिळालेली कोट्यवधी लोकांची पसंतीही अंतिम नाही ('किस्मत' सिनेमाला आज किती लोकांची पसंती मिळेल?) आणि क्रिटिकल जजमेंटही. शिवाय, अनेक अंगांनी पृथक्करण करता येणं हादेखील विवेकनिष्ठ विचारपद्धतीचा एक भाग असतो. अनेकदा त्यातून आधी न उमगलेल्या / दिसलेल्या गोष्टी कळू शकतात. त्यामुळे पृथक्करणाला सरसकट नकार हा काहीसा अबोध वाटतो.

मी Tue, 11/02/2014 - 17:33

In reply to by चिंतातुर जंतू

शिवाय, अनेक अंगांनी पृथक्करण करता येणं हादेखील विवेकनिष्ठ विचारपद्धतीचा एक भाग असतो. अनेकदा त्यातून आधी न उमगलेल्या / दिसलेल्या गोष्टी कळू शकतात. त्यामुळे पृथक्करणाला सरसकट नकार हा काहीसा अबोध वाटतो.

सहमत, म्हणूनच पृथ्थकरण गैर नाही पण अशा पृथ्थकरणातून विशेष गवसल्याचे आढळत नाही* (उदा. वरील प्रतिसादांमधून आढळणार्‍या एंटरटेनर्सच्या कामाच्या पृथ्थकरणातून तुच्छता वगळता फारसे उमगल्यासारखे काही दिसत नाही) त्यामुळे ते 'मला' एलीट वाटले एवढेच.

*टक्केवारी कमी असावी.

चिंतातुर जंतू Tue, 11/02/2014 - 17:51

In reply to by मी

>> अशा पृथ्थकरणातून विशेष गवसल्याचे आढळत नाही

हे विधान मराठी आंतरजालाच्या चौकटीत पाहायचं तर ते विश्वच खूप मर्यादित आहे. व्यापक अर्थानं पाहिलं तर विधान खूप सरसकट वाटतं. अधिक माहितीसाठी दुवा.

मी Tue, 11/02/2014 - 18:45

In reply to by चिंतातुर जंतू

पॉप्युलर कल्चरचा अभ्यास कलाकृतीपेक्षा तिचा आस्वाद घेणार्‍या समाजाबद्दल अधिक सांगतो, असे पृथ्थकरण एलीट असले तरी गरजेचं किंवा वर्थ दि एफर्ट असेल. सरसकट विधान करण्याचा हेतू नव्हता.

नितिन थत्ते Tue, 11/02/2014 - 16:29

In reply to by चिंतातुर जंतू

कमिंग आउट.... :)

मला मुन्नाभाई १, २, थ्री इडियट्स, डेव्हिड धवन-करिश्मा-गोविंदा, जॉनी लिव्हर, वन नाइट अ‍ॅट कॉल सेंटर सर्व आवडतात.

Nile Thu, 06/02/2014 - 20:47

In reply to by 'न'वी बाजू

थ्री मिस्टेक्स वाचल्यानंतर चेतन भगतचे अजून एक पुस्तक वाचण्याची मिस्टेक करण्याचा स्टेटमध्ये नसल्याने टु स्टेट ला आमचा पास. त्यांची पॉप्युलॅरिटी पाहून कधी कधी वाटतं, व्हॉट यंग इंडिया वाँट्स इज रिअली मिश्ट्री टू मी. अ‍ॅन्ड सम कॉल इट रिव्होलूश्यन!!

मन Thu, 06/02/2014 - 11:43

मागील दोन पाच वर्षात भारतातील एक मोठं amusement park बनू पाहणारं अ‍ॅडलॅब्स इमॅजिका उभं रहात होतं.
मुंबै-पुणे एक्स्प्रेसवेजवळच हे आहे. दोन्हीकडचा लोकसमूह संभाव्य ग्राहक म्हणून धरला जातो.
तीनेकशे एकर इतक्या विस्तीर्ण भागावर हे पसरलं आहे. (पुणे मुंबै पट्ट्यात तीनेकशे एकर जागा असणे मोठीच गोष्ट.)एस्सेलवर्ल्डपेक्षा अ‍ॅडलॅब्जच्या किमती दुप्पट तिप्पट असल्याचे ऐकले आहे. तरी एस्सेल वर्ल्ड मागे पडलेलं दिसलं.
काल अ‍ॅडलॅब्ज मधील roller coaster ला अपघात झाला. ट्रेन रुळावरून घसरली नि तेथील ग्राहकांना जबरदस्त मार बसला म्हणतात.
आज वृत्तपत्रात ही मोठी म्हणून बातमी अशी कुठेच दिसत नाही.
पेपर चाळतो आहे, एक लहान बातमी दिसते आहे.
घटना खरेच छोटी आहे, की त्याची बातमी होउ नये म्हणून विशेष प्रयत्न केले जात असावेत ?

गवि Thu, 06/02/2014 - 12:25

In reply to by बॅटमॅन

बातमी सौम्य केली जाते आहे. किमान इमॅजिकाची अधिकृत घोषणा तर नक्कीच घटनेला फार लाईटली दाखवणारी आहे.

ज्या इमेजेस माध्यमांमधे येताहेत त्या पाहून इमॅजिकाने "रोलरकोस्टरची गाडी केवळ "टिल्ट" झाली आणि त्यात फक्त दोन जणांना किरकोळ इजा झाली" अशा सुरात जी घोषणा केली आहे ती गोंधळाची वाटते. फर्स्ट एड वगैरे शब्द वापरुन दुखापत किरकोळ असल्याचं सूचित केलं जातंय असं वाटलं.

रोलरकोस्टरचा वेग आणि त्वरण पाहता चालू अवस्थेत ही गाडी रुळावरुन निसटली तर किरकोळ जखमीपणावर भागेलसे वाटत नाही. फोटोतही ही कार्ट ज्या पद्धतीने आणि जश्या स्लोपवरच्या जागी निसटली आणि लटकली आहे ते पाहून आणि बातमीत सगळीकडे असलेला त्यातील व्यक्ती फेकल्या गेल्याचा उल्लेख वाचून दुखापती गंभीर असाव्यात असं तर्कदृष्ट्या वाटतं.

इमॅजिकाने म्हटल्याप्रमाणे:

"Two guests suffered minor injuries at approximately 1pm this afternoon at the Bandits of Robinhood. They were immediately transported to the nearest hospital to be given first aid medical services. Although the attraction is currently closed for safety precautions, the park is completely operational," said a statement by Imagica.

फर्स्ट एडने भागले का याबद्दल मौन आहे. ते तसे नसावे.. कारण डोक्याला आणि जबड्याला फर्स्टएडने बरा होईल इतपतच मार बसला असेल असे पटणे कठीण.

सुनील Thu, 06/02/2014 - 12:30

In reply to by गवि

इमॅजिका सौम्य करायचा प्रयत्न करणारच. पण TOI ने दोघी माय-लेकींना जवळील जाखोटिया रुग्णालयात ICU त ठेवले आहे, अशी बातमी दिली आहे.

गवि Fri, 07/02/2014 - 09:42

In reply to by मन

छ्या.. ही तर अगदी सरळ अफवा वाटते आहे.

त्या अपघाताबाबत असणं शक्यच नाही, कारण कोणत्याही वेळी तिथे आसपास शेकड्यांच्या संख्येत इतर कस्टमर्स / पर्यटक असणारच. आणि इतके मोठे डिझास्टर (४८ मृत वगैरे) आजच्या जमान्यात दोनतीन दिवस लपून राहणे शक्य नाही.

शिवाय या राईडमधे एकुणातच इतके लोक बसू शकत नाहीत.. तेव्हा हा कदाचित झालेल्या घटनेचा फायदा घेऊन कायतरी बदनामी करण्याचा प्रकार असू शकतो. असो. आता येणार्‍या बातम्यांनुसार दोन्ही जखमी व्यक्ती प्रथमपासूनच आउट ऑफ डेंजर आहेत, ही समाधानाची बाब आहे.

या अपघाताने अम्युझमेंट पार्क्समधले तांत्रिक चेकअप्स आणि इतर सुरक्षिततेचे उपाय आणखी मजबूत होतील आणि असे काही परत घडणारच नाही अशी इच्छा करु. (एअर क्रॅशमुळे जसे पुढचे तत्सम अपघात कमी होतात तसं.. अर्थात तितकी तपशीलवार तांत्रिक पाहणी या घटनेची होईल असं गृहीत धरुन..)

मन Fri, 07/02/2014 - 09:56

In reply to by गवि

अफवाच असावी.
कारण पुष्टीकरनारं काहीही समोर आलेलं नाही.
मी प्रतिसादच काढणार होतो, पण तेवढ्यात हा तुमचा उपप्रतिसाद आलेला होता.

सुनील Thu, 06/02/2014 - 12:19

In reply to by मन

टैम्स ऑफ इंडिया, मुंबई येथे मात्र सचित्र बातमी आहे. मार लागलेल्या आई-मुलींच्या, त्यांना दाखल केलेल्या रुग्णालयाच्या नावासकट.

नितिन थत्ते Thu, 06/02/2014 - 12:30

In reply to by मन

सकाळी कागदी लोकसत्तामध्ये पहिल्या पानावर ३ कॉलम गुणिले ७-८ सेमी इतक्या आकाराची बातमी वाचल्याचे स्मरते. त्यात मायलेकी जखमी झाल्याचे वाचले.

मुंबई आवृत्तीतली बातमी.

पुणे आवृत्तीत दिसत नाही हे खरे....

मन Thu, 06/02/2014 - 12:41

भोपाळ वायू दुर्घटना, ज्यात तीसेक वर्षापूर्वी पंचवीसेक हजार लोक मारले गेल्याचं बोललं जातं, त्याची केस कुठवर आली आहे ?
दोषींना शिक्षा झाली आहे का?
होण्याची शक्यता वाटते का ?

ऋषिकेश Thu, 06/02/2014 - 14:00

In reply to by मन

माझ्या आठवणीप्रमाणे ही केस केव्हाच बंद झाली आहे.
मुळ कंपनीने बर्‍यापैकी पैसा पिडीतांच्या कुटुंबियांना दिला होता. कारवाई झाल्याचं आठवत नाही

ऋषिकेश Fri, 07/02/2014 - 10:37

स्वतंत्र काश्मिरला आपला राजकीय पाठिंबा दर्शवण्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानात काश्मिर एकता दिवस साजरा केला जातो. या दिवसही यंदा श्री शरीफ यांनी भारताला काश्मिर प्रश्न सोडवायचे (सालाबादप्रमाणे) निमंत्रण दिले.

त्या निमित्ताने पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्राने आपल्या संपादकीयात पाकिस्तानच्या काश्मिर पॉलिसीचे केलेले सिंहावलोकन वाचनीय आहे.

या लेखाहुन अधिक धाडसी दावे द इंटरनॅशलन न्यूजच्या या अग्रलेखात आहेत. (इथे काश्मिरात 'एन्मार्क्ड थडग्यात' २००० व्यक्ती पुरलेल्या आढळल्याचे तर १०००० व्यक्ती बेपत्ता असण्याचा दावा करतो. हे आकडे भारतीय मिडीयात दिसत नाहीत हे खरेच, पण सत्यासत्यता पडताळायची सोय नाही हे अधिक चिंताजनक आहे)

अजून एक वाचनीय अग्रलेख बर्‍यापैकी भारतविरोधी असणार्‍या द फ्रंटीयर पोस्ट मध्ये आला आहे. अपेक्षित लाईन्सवर सुरवात करूनही लेखाच्या शेवटी असलेला आत्मपरिक्षणात्मक परिच्छेद बर्‍यापैकी मार्मिक आहे.

गवि Fri, 07/02/2014 - 10:44

सोनी कंपनीला एक अब्ज डॉलर्सहूनही जास्त वार्षिक तोटा झालेला आहे. पाच हजार कर्मचार्‍यांना काढून टाकले जाते आहे. व्हायो हा ब्रँड बहुधा कोणालातरी विकून त्यातून सोनी बाहेर पडते आहे. कॉम्प्युटर उत्पादनातूनच बाहेर पडते आहे.

http://www.hindustantimes.com/business-news/sony-to-cut-5-000-jobs-as-p…

नितिन थत्ते Fri, 07/02/2014 - 11:14

आम आदमीच्या इच्छुक उमेदवारांत संतप्त सुशिक्षित मध्यमवयीन लोकांचा भरणा.

या लोकांचे पूर्वग्रह असे असावेतः
१. देशासाठी काय योग्य आहे ते मला ठाऊक आहे. (सध्याच्या राजकारणातील व्यक्तींना ते कळत/वळत नाही).
२. मला सत्ता मिळताच मी ते करून दाखवू शकतो.
३. त्यासाठी माझी ग्रासरूटपासून कार्य वगैरे करायचे नाहीये/आणि तशी काही गरजही नाहीये.
४. नॉर्मल प्रोसेसमध्ये अशी सत्ता हातात येण्याची काही शक्यता नाही.
५. आम आदमी पार्टीने निर्माण केलेल्या माहौलमध्ये कदाचित जमून जाईल.

वरच्या विवेचनात पोळी भाजून घेण्याची स्वार्थी कल्पना नसल्याचे गृहीत धरले आहे (माणसे चांगली असू शकतील असे गृहीतक आहे).

मन Fri, 07/02/2014 - 12:52

In reply to by नितिन थत्ते

हे असं सगळ्यांनाच वाटत असेल असं नाही.
सारेच प्रामाणिक आहेत, असंही नाही.
आणि ह्यातले जे कुठले मुद्दे ज्या कुणाला वआटत असतील, त्यांना तसे वाटणेही चूक नाहिच.

मी Fri, 07/02/2014 - 13:33

In reply to by नितिन थत्ते

संतप्त सुशिक्षित मध्यमवयीन लोकांना आता आंदोलन करायची गरज नाही, हे असेच चालत राहिले तर अण्णासारख्यांच्या (उपद्रवी)मणक्यातला आधार काढून घेण्यात हि व्यवस्था यशस्वी झाली असे म्हणावे लागेल.

गवि Fri, 07/02/2014 - 12:49

Jan Lokpal row: AAP calls Delhi Lt Governor a Congress agent

http://www.firstpost.com/india/jan-lokpal-row-aap-calls-delhi-lt-govern…

आप वाले असं का बोलताहेत..?! कायम काँट्राव्हर्सी करणे ही पॉलिसी आहे की नुकसानकारक अमुत्सद्दी इम्प्लल्सिव्ह वृत्ती.

कान्होजी पार्थसारथी Fri, 07/02/2014 - 23:45

In reply to by सुनील

धोरण तसे वाईट नाही.
न्यायालयाच्या कक्षेत येते का ते ठाऊक नाही, पण दाखल याचिकेला धरुनच तसे न्यायमूर्ती म्हणतात.

ऋषिकेश Mon, 10/02/2014 - 09:58

In reply to by सुनील

जोपर्यंत न्यायालये आपल्या अधिकारकक्षेबाहेर निर्णय देत नाहीत तोवर अश्या टिपण्या अनेकदा दिग्दर्शकाची भुमिका बजावतात. या दुव्यातील वातमीत ही कोर्टाची निव्वळ टिपणी आहे- बंधनकारक निकाल नव्हे.

अर्थात हे ही खरे की हल्ली काही वेळा कोर्ट आपल्या अधिकारकक्षेच्या बाहेर जाऊन निकाल देतानाही दिसत आहेत. लोकप्रिय निर्णय देताना आपली चौकट भेदून वर त्याला ज्युडिशियल अ‍ॅक्टिव्हिझम असे गोंडस नाव देण्याचा मोह भल्या भल्यांना सुटलेला दिसत नाही असे म्हटल्यास वावगे ते काय?

गवि Fri, 07/02/2014 - 20:46

Saudi woman denied ambulance, dies due to lack of male companion

सौदी विद्यार्थिनीला कॅम्पसवर हार्ट अ‍ॅटॅक आला, पण अँब्युलन्सने तिला नेले नाही कारण एक घरातला पुरुषमाणूस कंपल्सरी सोबत लागतो तसा नव्हता.

http://www.hindustantimes.com/world-news/saudi-woman-denied-ambulance-d…

यापूर्वी २००२ मधे १५ लहान मुली आगीत भाजून मेल्या होत्या कारण मुतव्वांनी त्यांचा रस्ता ब्लॉक केला कारण त्यांनी बाहेर वावरण्याच्या नियमानुसार योग्य कपडे घातलेले नव्हते.

बॅटमॅन Fri, 07/02/2014 - 23:30

In reply to by 'न'वी बाजू

म्हणजे वरील बातमी वाचून कोणी सौदीस शिव्या घातल्या तर त्याच्या मनात भारताचा आंधळा अभिमान आहे अशा तितक्याच आंधळ्या गृहीतकावर विसंबून भारतातला विविध कारणांमुळे असलेला स्त्रीमृत्यूदराचा विदा दाखवणे.

असे करणारे बहुसंख्य लोक स्वतःला लिबरल म्हणवून घेतात म्हणून म्हणालो.

- बॅट्सनजी पेस्तनजी गॉथमवाला.

'न'वी बाजू Fri, 07/02/2014 - 23:57

In reply to by बॅटमॅन

असे करणारे बहुसंख्य लोक स्वतःला लिबरल म्हणवून घेतात म्हणून म्हणालो.

म्हणजे, मी उद्या स्वतःला इंग्लंडचा बादशहा म्हणवून घेईन. मग तुम्ही माझा उल्लेख जिथेतिथे 'हिज़ म्याजेष्टी' म्हणून करणार काय?

मन Sat, 08/02/2014 - 00:05

In reply to by 'न'वी बाजू

'तथाकथित ' 'हिज़ म्याजेष्टी' असा खास जालावर परिचित असल्यासारखा वाटनारा वाक्प्रचार वापरता यावा का?

लिबरल, अ‍ॅण्टीलिबरल चालु द्या

मन Sat, 08/02/2014 - 00:16

In reply to by बॅटमॅन

ब्रिटन स्वतःला ग्रेट ब्रिटन म्हणवून घेते. कित्येक जण तो तसा शब्द वापरतातही .
मला स्वतःला ग्रेट हा शब्द त्यांना ऊठसूट वापरणे नको वाटते. "ग्रेट" काय ग्रेट ?
चला लागा पुढे कामाला भाड्याहो. असे म्हणावेसे वाटते.
जमेल तिथे नुसतेच "ब्रिटन" म्हणतो. किंवा "मला तुमच्या देशात यायला आवडेल" असे ब्रिटिश बॉसला म्हणतो.
"ग्रेट" ब्रिटनला यायला आवडेल असे म्हणत नाही.
मी काही असल्या म्याजेस्टी ला म्याजेस्टी म्हण्णार नै ब्वा.

गब्बर सिंग Mon, 10/02/2014 - 11:46

In reply to by मन

मला स्वतःला ग्रेट हा शब्द त्यांना ऊठसूट वापरणे नको वाटते. "ग्रेट" काय ग्रेट ?

सगळे समान आहेत व असायलाच हवेत आणि तुम्ही स्वतःला कितीही ग्रेट सिद्ध केले तरी - I never lacked the potential and hence I am no lesser than you - या मानसिकतेतून हा विचार येतो असा खोडसळ विचार नोंदवावासा वाटतो.

सुनील Mon, 10/02/2014 - 12:16

In reply to by मन

"ग्रेट" काय ग्रेट ?

हा गैरसमज आहे मनोबा.

ग्रेट ह्या शब्दाचा येथे ब्रुहद् असा अर्थ आहे. जसे की बृहद् मुंबई म्हणजेच बृहन्मुंबई (Greater Mumbai). ह्यात मुंबईचा ग्रेट असण्याशी काहीही संबंध नाही. मुंबई बेट अधिक उपनगरे मिळून बृहन्मुंबई बनते इतकाच काय तो त्याचा अर्थ!

तसेच, मुख्य युरोपीय भूमीच्या वायव्येला असलेले बेट मुळात तीन देशांनी (countries) बनलेले आहे. दक्षिण आणि पूर्वेस असेलेले इंग्लंड (म्हणजेच ब्रिटन), पश्चिमेला असलेले वेल्स आणि उत्तरेचे स्कॉटलंड. हे तीनही देश मिळून बनणार्‍या अखंड बेटाचा उल्लेख करावयाचा असल्यास त्याचा ग्रेट ब्रिटन असा उल्लेख करतात.

थोडक्यात, ती व्यक्ती जर इंग्लंड (म्हणजेच ब्रिटनची) असेल तर ती काही फरक पडू नये. पण जर का ती वेल्श किंवा स्कॉटिश असेल तर, तात्काळ तुमची चूक सुधारेल! तीतकी सजगता त्यांच्यात असते हा अनुभव आहे!

'न'वी बाजू Mon, 10/02/2014 - 12:31

In reply to by सुनील

वायव्य फ्रान्समधील 'ब्रिटनी' या प्रदेशासंबंधीच्या विकीपानावर पुढीलप्रमाणे नोंद आढळते:

Brittany has also been referred to as Less, Lesser or Little Britain (as opposed to Great Britain).

(थोडक्यात, हा ग्रेट/ग्रेटर विरुद्ध लिट्ल/लेस/लेसर प्रकार हा बुद्रुक विरुद्ध खुर्दसारखा काहीतरी प्रकार असू शकतो.)

बॅटमॅन Mon, 10/02/2014 - 14:06

In reply to by 'न'वी बाजू

अच्छा, तसे होय.

यासाठी शंका की एका जालमित्राबरोबरच्या चर्चेत तसा निष्कर्ष निघाला, प्रमाणभूत ग्रंथांत विदा पाहिला नाही यद्यपि पण अर्थदृष्ट्या पाहता तो चपखल वाटतो.

मन Mon, 10/02/2014 - 12:36

In reply to by सुनील

aabhaar.
ह्या तीन country, व उत्तर आयर्लंड असे मिळून UK बनले आहे इतपत ठाउक होते.
बृहन् ह्याचा अर्थ great असाच होतो, ह्याची कल्पना नव्हती.
( पण पुडह्ची शंका अशी की इतर शहरे व त्यांची उअपनगरे न्यूयॉर्क ते पॅरिस, इथेही असेच शब्द वापरतात का .)
मला वाटे हे लोक स्वतःला ऊठसूट great म्हणवून घेतात. ० अक्षांश ह्यांच्याच राजधानीजवळून जाते.(म्हणजे ह्यांचा वेळ तो ष्ट्यांडर्ड टैम. इतर सर्व देशांना पोस्टल कोड बाबत जे बंधनकारक आहे, ते ह्यांना नाही. कार्ण पोस्ट सेवा ह्यांनी सर्व प्रथम घाउक प्रमाणात सुरु केली.) थोडक्यात, सगळीकडे बोलबाला असल्याने हे स्वतःला ग्रेट म्हणवून घेत असतीलही, असा माझा समज होता.
ह्यांच्या राजधानीला आग लागली तर ती great fire of london टह्रते, ह्यांच्याकडे धुरके पसरले तर ते great smog 1952 ठरते.
म्हणजे ह्यांना समस्या आली तर ती लै मोठी.
असा सर्व समज होता.

गवि Mon, 10/02/2014 - 12:52

In reply to by मन

एक उत्तम विचार आहे तो असा की : यू कॅन टेल युअर हिस्टरी बेस्ट.

आपल्या भारतात लागलेल्या आगीलाही "द ग्रेट मुंबई फायर" किंवा भूकंपालाही "द ग्रेट किल्लारी" डिझास्टर असं आपण वर्णू शकतोच.

पण आपली प्रवृत्ती जर "बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहेती है" अशी असेल तर आपल्या सौम्य संबोधनप्रवृत्तीबद्दल आपण ब्रिटिशांना किंवा अन्यांना दोषी ठरवू शकत नाही.

फारएण्ड Mon, 10/02/2014 - 21:32

In reply to by गवि

पण थोडा दोष त्या घटनांबद्दलच्या बातम्या इतर देशांनी देताना ते 'ग्रेट' तसेच ठेवणे यालाही असेल. लंडनवासियांनी त्याचा उल्लेख पुढे कायम ग्रेट फायर म्हणून करणे बरोबर आहे (खरे म्हणजे मला त्या घटनेबद्दल फारशी माहिती नाही, त्यामुळे डिसमिस करणेही बरोबर नाही), पण अमेरिकन वृत्तपत्रांनी, टाइम्स ऑफ इंडियाने तो उल्लेख तसाच ठेवला तर तसाच रूढ होईल ना?

मध्यंतरी एकदा तेथील विशेषणांचे अनुकरण करणार्‍या एका (मराठी) लेखात काउंटी क्रिकेटबद्दल लिहीताना लँकेशायर चा उल्लेख "एक दिवसीय क्रिकेटचे बादशहा" असा वाचला होता. आता स्थानिक वन डेज मधे असेलही. पण त्याकाळी आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेट मधे इंग्लंडलाच कोणी विचारत नव्हते, तर त्यातल्या काउंटीचे काय अशी स्थिती होती.

अलेक्झांडर ने 'जग जिंकले' बद्दल तसेच. इतर देशांच्या पुस्तकांत तसे उल्लेख ठीक आहेत. पण भारताच्या जेमतेम दारावरून तो परत गेला - तेव्हा भारतीय पुस्तकांत तसा उल्लेख करणार्‍यांना तेवढा विचार सुचला नसेल काय?

'न'वी बाजू Mon, 10/02/2014 - 21:52

In reply to by फारएण्ड

अलेक्झांडर ने 'जग जिंकले' बद्दल तसेच.

१४९२ साली कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला म्हणे.

१९९२ साली मीदेखील लावला.

माझे सोडा. कोलंबस तेथे पोहोचण्याअगोदर तेथे जे कोणी राहत होते, त्यांना आपण राहतो त्या जागेच्या अस्तित्वाबद्दल ठाऊक नव्हते काय?

बॅटमॅन Tue, 11/02/2014 - 00:17

In reply to by फारएण्ड

अलेक्झांडर ने 'जग जिंकले' बद्दल तसेच. इतर देशांच्या पुस्तकांत तसे उल्लेख ठीक आहेत. पण भारताच्या जेमतेम दारावरून तो परत गेला - तेव्हा भारतीय पुस्तकांत तसा उल्लेख करणार्‍यांना तेवढा विचार सुचला नसेल काय?

पुढे पुढे इतिहास वाचू लागल्यावर "कोण अलेक्झांडर??????" असा प्रश्न विचारावा वाटला खरेच. वैसे तो चेंगीझखान त्यापेक्षा हजारो पटीने महापराक्रमी होता. युरोपियन साले हल्कत आहेत खरेच.

'न'वी बाजू Mon, 10/02/2014 - 13:21

In reply to by मन

मला वाटे हे लोक स्वतःला ऊठसूट great म्हणवून घेतात.

उलट मी तर British understatement नामक कशाबद्दल तरी बरेच कायकाय ऐकून होतो बॉ. (जाणकारांनी खुलासा करावा.)

ऋषिकेश Mon, 10/02/2014 - 13:19

In reply to by सुनील

ग्रेट ह्या शब्दाचा येथे ब्रुहद् असा अर्थ आहे.

बृहद कसे?
अधिकृत नाव युनायटेड किंगडम आहे. तिथे आधीच युनायटेड आला आहे. जे तीन भाग युनायटेड आहेत ते या युकेमध्ये येतात. याहून अधिक बृहद् म्हणजे कोणता भाग?
जर याचा अर्थ बृहद् असेल तर युके आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात येणारा विभाग वेगळा आहे का?

थोडक्यात बृहन्मुंबईसाठी मुळ मुंबई अस्तित्त्वात आहे. तसे ग्रेट(र) ब्रिटनसाठी मुळातले ब्रिटन कोणते?

'न'वी बाजू Mon, 10/02/2014 - 13:28

In reply to by ऋषिकेश

'युनायटेड किंग्डम' म्हणजे 'ग्रेट ब्रिटन' नव्हे.

'ग्रेट ब्रिटन' म्हणजे फक्त इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स हे देश असलेली संलग्न भूमी (आणि त्याच्या आसपासची चिल्लरपिल्लर बेटे). यात आयर्लंडचा (उत्तर किंवा दक्षिण, कोणत्याही) समावेश होत नाही.

पुढे आयर्लंड जेव्हा ब्रिटिश आधिपत्याखाली आले, तेव्हा ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंड यांना मिळून 'युनायटेड किंग्डम (ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड)' अशी संज्ञा प्राप्त झाली. पुढे दक्षिण आयर्लंड स्वतंत्र झाल्यावर ती संज्ञा केवळ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंडच्या संयुक्त राज्याकरिता चालू राहिली.

ऋषिकेश Mon, 10/02/2014 - 13:31

In reply to by 'न'वी बाजू

बरोबर. पण तरी प्रश्न रहातोच. बृहद ब्रिटन कोणते आणि मुळ ब्रिटन कोणते?

जर ब्रिटन = ग्रेट ब्रिटन असे असेल तर ग्रेट बृहद् कसा?
म्हंजे ब्रिटन = इंग्लंड का?

@ मनोबा: ग्रेट ब्रिटन = इंग्लंड+स्कॉटलंड+वेल्स असावे.

'न'वी बाजू Mon, 10/02/2014 - 13:46

In reply to by ऋषिकेश

बरोबर. पण तरी प्रश्न रहातोच. बृहद ब्रिटन कोणते आणि मुळ ब्रिटन कोणते?

जर ब्रिटन = ग्रेट ब्रिटन असे असेल तर ग्रेट बृहद् कसा?
म्हंजे ब्रिटन = इंग्लंड का?

तसे कदाचित नसावे. (खात्री नाही.)

वरील 'ब्रिटनी' या फ्रेंच प्रदेशासंबंधीचा प्रतिसाद पहावा. येथे 'मुळातले ब्रिटन' विरुद्ध 'वाढीव ब्रिटन' असा भेद नसून, 'ब्रिटन (बुद्रुक)' विरुद्ध 'ब्रिटन (खुर्द)' असा भेद असावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

सुनील Mon, 10/02/2014 - 14:09

In reply to by 'न'वी बाजू

हम्म. बुद्रुक-खुर्द असेच असावे.

अर्थात, मनोबांची जी मूळ शंका - ग्रेट म्हणजे "लै भारी" का? तर ते मात्र नाही!

अनुप ढेरे Mon, 10/02/2014 - 13:29

In reply to by ऋषिकेश

इंग्लंड + वेल्स + स्कॉटलंड = ब्रिटन/ग्रेट ब्रिटन
ग्रेट ब्रिटन + उत्तर आयर्लंड = युनायटेड किंग्डम

सुनील Mon, 10/02/2014 - 13:33

In reply to by ऋषिकेश

अधिकृत नाव युनायटेड किंगडम आहे

नाही. अधिकृत नाव युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अ‍ॅन्ड नॉर्थर्न आय्रर्लंड असे आहे.

पैकी ग्रेट ब्रिटन म्हणजे मी वर सांगितलेले (ब्रिटन (उर्फ इंग्लंड) + वेल्स + स्कॉटलंड)

मन Sat, 08/02/2014 - 01:19

In reply to by 'न'वी बाजू

हर्षणेन ध्रुवं सन्तर्पणेन च |
स्वप्नप्रसङ्घाच्च कृशो वराह इव पुष्यति ||

चिंता न करणे , कायम आनंदी असणे , पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आणि भरपूर झोप घेणे या चार उपायांची
योजना केली असता मनुष्य डुकराप्रमाणे पुष्ट होतो व ताकदवान होतो.
(शब्दशः अर्थ घेउ नये)
संकलन : डॉ सौ वीणा तांबे
आजचा फ्यामिली डॉक्टरचा छापील अंक, शेवटचे पान.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 08/02/2014 - 01:37

In reply to by 'न'वी बाजू

ब्ल्याण्डिङ्ग्ज़सम्राट, डुक्कर हा प्राणी स्त्रीद्वेषाबद्दल शिव्या खाण्यासाठी बनलेला आहे, फक्त कल्पनेत अस्तित्त्व असणाऱ्या लोकांच्या नावाने शिव्या खाण्यासाठी नाही.

(अवांतर - 'न'वी बाजूंच्या प्रतिसादाला कोणीतरी खवचट अशी श्रेणी देणार काय? मीच धागा काढल्यामुळे मला देता येत नाही.)

बॅटमॅन Sat, 08/02/2014 - 01:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

डुक्कर हा प्राणी स्त्रीद्वेषाबद्दल शिव्या खाण्यासाठी बनलेला आहे

हे कसे ते कळेल काय?

नै म्हणजे बुरसटलेल्या हिंदू धर्मातील एक अवतार म्हणून याला झोडपणे समजू शकतो, पण ते सोडून अन्य काही कारण असेल तर ऐकावयास आवडेल. तेवढीच ज्ञानात भर.

बॅटमॅन Sat, 08/02/2014 - 02:07

In reply to by 'न'वी बाजू

अर्र ते होय. तसे तर मग कुत्राही (खरे तर कुत्री) पुरुषद्वेष्ट्यांना शिव्या घालण्यासाठीची लाडकी संज्ञा आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 08/02/2014 - 03:40

In reply to by बॅटमॅन

चूक, साफ चूक. "शून्य मार्क." हा शब्दही स्त्रीद्वेषाशीच संबंधित आहे, क्वचित संपूर्ण स्त्रीजातीचा द्वेष.

Dictionary.com -
3. Slang.
a. malicious, unpleasant, selfish person, especially a woman.
b. a lewd woman.
c. Disparaging and Offensive. any woman.

Merriam Webster -
a. a lewd or immoral woman
b. a malicious, spiteful, or overbearing woman —sometimes used as a generalized term of abuse

---

बाकी पुरुषद्वेष म्हणजे नक्की काय, कसं असतं याबद्दल काही अभ्यासपूर्ण वाचन करायला आवडेल. ज्यांचा अभ्यास आहे अशा सगळ्यांनीच मदत करावी ही विनंती.

बॅटमॅन Sat, 08/02/2014 - 03:46

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ते मेल शॉव्हिनिस्ट पिग आहे तशी फेमिनाझी बिचदेखील पाहिली आहे त्याबद्दल म्हणत होतो.

डुक्कर=मेल शॉव्हिनिस्ट हा स्लँग अर्थ आहे, तसाच मी म्हणतो तो शब्दही आहे.

अभिनिवेशामुळे अभ्यास कमी पडला. चालायचंच.

बाकी पुरुषद्वेष म्हणजे नक्की काय, कसं असतं याबद्दल काही अभ्यासपूर्ण वाचन करायला आवडेल. ज्यांचा अभ्यास आहे अशा सगळ्यांनीच मदत करावी ही विनंती.

विकीपासून सुरुवात केली तर उत्तमच.

http://en.wikipedia.org/wiki/Misandry

बाकी गृहपाठ नंतर.