ही बातमी समजली का? - १४

भाग | | | | | | | | | १० | ११ | १२ | १३

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.

तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात ९०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

==============

सई परांजपे यांचं साप्ताहिक सदर लोकरंग, लोकसत्ता मधे सुरू झालं आहे. त्याचे प्रकाशित झालेले सगळे भाग इथे पाहता येतील. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' आणि अल्काझींबद्दल लिहीलेला भाग विशेष आवडला.

field_vote: 
0
No votes yet

मुळात डुक्कर हा प्राणी खाण्यासाठी बनलेला आहे, हे लक्षात घेता, कशासाठी शिव्या खाण्यासाठी बनलेला आहे ही बाब गौण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. तुमचंच आवडतं वाक्य, "काय करणार शेवटी आम्ही भटेंच". Tongue

२. सौदीसंबंधी बातमीच्या चर्चेत डुक्कर येणं हा काव्यगत न्याय म्हणायचं का कसं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सौदीसंबंधी बातमीच्या चर्चेत डुक्कर येणं हा काव्यगत न्याय म्हणायचं का कसं?

वस्तुतः, यास "काव्यगत न्याय" असे संबोधण्याबाबत व्यक्तिशः मला काही अडचण असावयाचे काही कारण नाही, परंतु या प्रश्नाशी निगडित असलेल्या इतर दोन्ही पक्षांची मतेसुद्धा या अनुषंगाने अजमावून ती विचारात घेणे माझ्या मते इष्ट ठरावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"यापेक्षा कितीतरी जास्त बायका भारतात मरतात. काय कौतुक?" छाप लिबरल प्रतिसादांच्या प्रतीक्षेत.

नक्की का प्रतीक्षा केली ते कळलं नाही. संभाव्य कारणं
- लिबरल समजल्या जाणारांनी वेळोवेळी सौदी अरेबियापेक्षा भारत वाईट (स्त्रियांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत) असं म्हटलेलं आहे.
- मुस्लिम परंपरांपेक्षा हिंदू परंपरा वाईट असं लिबरलांनी वारंवार म्हटलेलं आहे.
- लिबरलांना एकंदरीतच धार्मिकांबद्दल प्रेम आहे, त्यामुळे धार्मिकांचे अपराध ते पोटात घालतात
- खरं तर या तीनहीपैकी काहीच नाही, पण लेखकाचा लिबरलांबद्दल तसा पूर्वग्रह आहे
- खरं तर या चारहीपैकी काहीच नाही, पण लेखकाला निव्वळ सनसनाटी विधानं करण्याची हौस आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिबरलवाणी ऐकण्याचा सोस हे महत्त्वाचे कारण विसरलात. बाकी कारणे यासमोर काहीच नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या नंतर खाप पंचायतीच्या (किंवा तत्सम) एखाद्या बिनडोक निर्णयावर प्रतिक्रिया देताना कोणी भारतातल्या पुरुषप्रधानतेचा उद्धार केला तर....
"जा सौदी अरेबिया मध्ये जाऊन असं बोलून दाखवा" वगैरे बोलताना, उदाहरण म्हणून ही बातमी वापली जाण्याची शक्यता
अपेक्षीत लिबरल प्रतिक्रियांपेक्षा जास्त आहे ...
हे अर्थातच माझं स्वतःच मत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्च, चुकलात आबासाहेब. नकर्तेपणी कूल पॉइंट मिळवावयाचे असतील तर सेल्फ फ्लॅगेलेशन करायलाच लागते हो. म्हणजे दुसर्‍याबद्दल एक शब्दही बोलायचा नाही. कारण आपल्या घरात धूळ अजूनही आहे ना! जन्माचा अ‍ॅक्सिडेंट म्हणून राष्ट्र ठरते, सबब त्याचा अभिमान बाळगणे व्यर्थ आहे. पण त्याच न्यायाने लिंगही अपघातानेच ठरते त्याचा मात्र अभिमान बाळगलाच्च पाहिजे. नैतर बिरुदे चिकटवता येत नाहीत ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मायला... एवढं जबरदस्त पब्लीक कुठे भेटलं तुम्हाला काय माहीत !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळीकडेच असतं हो असं पब्लिक. स्वतःस लिबरल म्हणवून घेणारे 'कैक'(सगळे अर्थातच नाही) असे असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अशा बातम्या पाहिल्यावर आपण भारतात जन्माला आलो याचा आनंद आधी व्यक्त करावा का मृत्युबद्दल दुःख हे समजत नाही. आणि मग या अशा सर्व्हेच्या मागची पुरुषप्रधानता उघडी पडते.

आणि अधूनमधून फारएण्डच्या या प्रतिसादाची आठवण होणं अधिक खेदजनक वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्या सर्व्हेत तर पुरुषप्रधान भारत ढोग नंबरला आहे. मग अडचण काय आहे? स्वतःचे मत खरे ठरल्याबद्दल बिगरफेमिनाझींचे ब्याशिंग करावयाची नामी संधी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वरचा प्रतिसाद मला काहीही समजला नाही. पण मला जे काय म्हणायचं होतं/आहे ते असं-

स्त्रियांवर बलात्कार होतात, स्त्रियांचे विनयभंग होतात, म्हणून या अशा सर्व्हेंमधे भारताचा नंबर ढेग किंवा बराच खालचा असतो. (मधे कोणत्याशा सर्व्हेत, भारत जगात शेवटून दहाच्या आत वगैरे होता, सौदीपेक्षा वाईट कोणतासा आफ्रीकन देश होता, कारण बलात्काराचं मोठं प्रमाण). तर यामागचा तर्क पुरुषप्रधान संस्कृतीमधून आलेला आहे. लैंगिक अत्याचार म्हणजे सगळ्यात वाईट प्रकारचा गुन्हा अशा पुरुषप्रधान समजापोटी आलेला आहे, ज्यात योनीशुचितेला फार पवित्र मानलं जातं.

भारतात गेल्या काही वर्षांत, दशकांत बलात्कारांचं प्रमाण का वाढलं आहे, प्रत्यक्षात बलात्कार वाढले आहेत का फक्त त्यांची नोंद वाढली आहे अशा प्रकारचा विचार केल्यास भारत, सौदीपेक्षा फारच चांगला वाटतो. (म्हणून भारतातला पुरुषांचा आणि स्त्रियांचाही स्त्रीद्वेष नजरेआड करावा असं नाही.) भारतात स्त्रियांना १९४७ पासून मतदान करता येतं, फार कष्ट न करता गर्भपाताचा हक्क १९७१ मधे मिळाला, संततीनियमनाच्या गोळ्या स्वस्तात, सहजपणे, सगळ्या स्त्रियांना उपलब्ध आहेत, शिक्षण, नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, कोणत्याही वेळेस कुठेही एकटीने फिरण्यासाठी कायद्याने मनाई नाही, डोकं झाका, पाय झाका अशी कायदेशीर सक्ती नाही म्हणून मला भारतासारखा देश, स्त्रियांच्या संरक्षणाच्या बाबतीत थोडी बोंब असली तरी, जास्त आवडतो. जिथे स्त्रियांना माणसासारखं जगण्याचे हक्कच नाहीत असल्या देशापेक्षा भारतासारखा, धडपडत का होईना, संधी देण्याचा प्रयत्न करणारा देश कधीही चांगला. हे देशभक्तीमधून आलेलं विधान नाही; हे स्त्रीवादी विधान आहे. आफ्रीकेतल्या त्या कोणत्याशा देशाबद्दल हे खरं असेल तर त्याही देशाबद्दल हेच विधान करेन.

या अशा सर्वेक्षणांच्या निकालांमधून, पुरुषप्रधान संस्कृती उघडी पडते. या निकालांना फार महत्त्व देऊ नये. हे आकडे आहेत, पण निरर्थक आहेत.

या बाबतीत भारताची बदनामी हेतूपुरस्सर होते का आणि त्यामागची कारणं काय याबद्दल मला काहीही माहिती नाही. पण अशा प्रकारचे भोंगळ सर्व्हे करून भारताचं (आणि इतरही काही देशांचं) नाव बदनाम करण्यामागे (किंवा सौदी तितकाही काही वाईट नाही असं दाखवण्यामागे) काय राजकारण असू शकतं याचा कोणी विचार, अभ्यास केला असेल तर ते वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सहमत आणि प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दार्जिलिंग चहाबद्दल - Spy secret behind Darjeeling tea

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Fortune पुरेपुर चायनिज कसा दिसला असेल बरं? मुळात ही सगळीच गोष्ट एका चांगल्या चित्रपटाला शोभेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिबरलवाणी ऐकण्याचा सोस हे महत्त्वाचे कारण विसरलात. बाकी कारणे यासमोर काहीच नाहीत.

हे घ्या मग, अजून एक.
Female genital mutilation: I watched my sister die in childbirth – video

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सध्या गार्डीयनमधे या विषयावर बरंच लेखन येतं आहे; काही लेख आफ्रिकन स्त्रियांचेही आहेत.

An alternative to female genital mutilation that prevents girls suffering
या लेखावरच्या काही प्रतिक्रियाही मुद्दाम वाचाव्यात अशा आहेत.

गार्डीयनचा स्त्री-विभाग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यातल्या एक कमेंटमधील दुव्यात (वाचनीय) पुढील विधाने अत्यंत महत्त्वाची आहेत.

>>The most powerful but until now, undertheorized factor inspiring FGM/C abandonment in
local communities is the introduction of participatory human rights education. In the first
observed mass abandonments, in both Egypt and Senegal, public commitments to end
FGM/C, came only after human rights deliberation was introduced into their basic education
curricula.

>>We learn something about the likely stability of a consensus based on central capabilities when
we note...that women who have become literate find literacy valuable and even delightful, that
they report satisfaction with their new condition, and that the transition in their lives begun by
literacy is not one that they would wish to reverse. The same is evidently true for health and
sanitation, for learning to stand up against domestic violence, and for acquiring political
liberties and capabilities: people who once learn and experience these capabilities do not want
to go back, and one cannot really make them go back. The delight and satisfaction that makes
people unwilling to go backwards is a very important sign that the conception we are
developing is likely to be a stable one.

>>Social convention theory was and is useful in helping to understand how for centuries nearly
all the families in certain intramarrying communities imposed a harmful and dangerous
practice on their children, how and why footbinding after a thousand years ended in a single
generation, and how and why FGM/C, while stubbornly resistant to change, yields to
organized mass abandonments.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज गार्डीयनवर हे सापडलं.
Mexico's lost daughters: how young women are sold into the sex trade by drug gangs

काही भाग तर फार अंगावर येतो -

... The collages tell an overwhelming number of stories about women who were stolen, then used or sold as prostitutes, and then jailed for working as prostitutes.

Almost every woman I meet in the prison testifies that her life here is better than it was outside. Proof of this is that the jail authorities never tell the inmates when they are going to leave. Instead, very late at night, a prisoner is taken from her cell and released quietly. The prisoner, or her friends, might otherwise do something (place drugs or a weapon in the cell or attack a guard) in order to remain in jail.

The jail smells of hair spray, nail polish remover and perfumes, and the prisoners spend most of their day painting their nails, dyeing their hair all kinds of colours and applying false eyelashes. ...Perhaps here, inside the prison, it feels safer for the women to be pretty.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'काय पाहिलं'मधे हा दुवा देता आला असता, पण इथे विषय सुरू आहे म्हणून या bitchin' good फिल्मचा दुवा इथेच डकवते.

This is What Everyday Sexism Feels Like...to a Man

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काही दशकांपूर्वी लक्ष्मीकांत बेर्डेने रंगवलेला नाटकातला एक प्रसंग आठवला (बहुधा सई परांजपे दिग्दर्शित 'सख्खे शेजारी'). प्रसंगातली परिस्थिती वर दिलेल्या फितीतल्या परिस्थितीसारखीच. शामळू लक्ष्या बस-थांब्यावर उभा आहे. काही टारगट तरुणी तिथे येतात आणि त्याची छेड काढायला लागतात (बहुधा रुई बेर्डेही होती त्यांत) लक्ष्या भांबावतो, आणि गयावया करताना उसने अवसान आणून म्हणतो 'काय बाप-भाऊ आहेत की नाही तुम्हांला ?' Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"तुम्हारे घर में बाप-भाई नहीं है क्या?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. तुम्ही आत्ता सांगितल्यावर 'राजाराम पुरुषोत्तम जोशीं'चे स्वप्न आठवले. Smile

'कथा' - पाहा १:००:२० ते १:००:५६

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरी आहे तो व्हिडीओ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुखद बातमी :-
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/doctor/article...
<बातमी मोड सुरु>
डॉक्टर, हीच औषधं द्यायची ना? या गोळ्या दिवसातून किती वेळा घ्यायच्या? या गोळ्या जेनेरिक आहेत का? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार झोलणाऱ्या डॉक्टरांना फार्मासिस्ट आण‌ि सामान्यांना सहज समजावे यासाठी प्रीस्क्रिप्शन कॅपिटल लेटरमध्ये लि‌हिण्याची सक्ती करण्याचा विचार आरोग्य मंत्रालय आण‌ि मेडिकल कौन्सिल करत आहे. पण त्याही पुढे जाऊन या सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणून 'सेफ प्रीस्क्रिप्शन' हे कम्प्युटर अॅप्लिकेशनच तयार होत आहे. हव्या त्या भाषेत आण‌ि प्रिंटेड प्रीस्क्रिप्शन उपलब्ध करून देणारे हे ‌अॅप्लिकेशन असून लवकरच ते डॉक्टरांसाठी उपलब्ध होणार आहे.

डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शन्सवरील न समजणारे अक्षर हा अनेक दशकांपासून वादाचा मुद्दा आहे. डॉक्टरचे प्रीस्क्रिप्शन हे फक्त केमिस्टलाच कळते, असेही गमतीने म्हटले जाते. परंतु, न कळणाऱ्या प्रीस्क्रिप्शनमुळे चुकीची औषधे देणे, डोस चुकीचे घेणे अशा गोष्टीही होत असतात. यासाठी इंडियन मेडिकल कौन्सिलच्या शिफारशीनंतर आरोग्य विभागही डॉक्टरांना प्रीस्क्रिप्शन कॅपिटल लेटरमध्येच लिहावे अशी सक्ती करण्याच्या विचारात आहे. परंतु, यावर तोडगा काढण्यासाठी पेशंट सेफ्टी अलायन्स ही स्वयंसेवी संस्था 'सेफ प्रीस्क्रिप्शन' हे कम्प्युटर अॅप्लिकेशन तयार करत आहे. यात कम्प्युटरच्या माध्यमातून प्रिंटेड प्रीस्क्रिप्शन देणे शक्य होणार आहे, तसेच औषधे कधी, कशी घ्यायची, पुढील अपॉइंटमेंट कधी ही माहिती पेशंटला कळणाऱ्या भाषेत देण्याचीही सुविधाही मिळेल.

प्रीस्क्रिप्शन न कळाल्याने होणारे गोंधळ हे वैद्यकीय क्षेत्राला नवीन नाहीत, यात नेहमीच डॉक्टर आण‌ि केमिस्ट यांच्यात टोलवाटोलवी होते पण यात नुकसान मात्र पेशंटचे होते, असे पेशंट सेफ्टी अलायन्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. निखिल दातार सांगतात. लिहून दिलेली औषधे, त्याचे डोस लिहून दिले तरी ते इंग्रजीत असल्याने प्रत्येकालाच कळते असे नाही. त्यामुळे प्रत्येकाला समजणाऱ्या भाषेत हे अॅप्लिकेशन संस्था तयार करत असून ते अंतिम टप्प्यात असल्याचेही ते म्हणाले.

ब्रँडनेम, जेनेरिकचाही उल्लेख

सन २००२ सालच्या मेडिकल एथिक्सनुसार डॉक्टरांनी प्रीस्क्रिप्शन लिहीताना ब्रँडनेम आण‌ि त्याचे जेनेरिक नाव लिहिणे सक्तीचे आहे. परंतु, प्रत्येक डॉक्टर करतोच असे नाही. या अॅप्लिकेशनमध्ये औषध निवडल्यानंतर त्याचे जेनेरिक नाव आपोआपच प्रीस्क्रिप्शनमध्ये येईल.

गुंतागुंतींना फाटा

अनेकदा प्रीस्क्रिप्शन समजून घेण्यात गफलत झाली की चुकीची औषधे दिली जातात, त्याने पेशंटला अपाय होतो, या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून हे टाळता येईल असे संस्थेचे सल्लागार प्रमोद लेले सांगतात. स्पेशालिस्ट डॉक्टरसाठी तो वापरत असलेली नेमकी औषधेच देऊन हे अॅप्लिकेशन सुटसुटीत होईल. लॅपटॉप, आयपॅडच्या माध्यमातूनही हे वापरता येत असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील गुंतागुंत कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*महत्त्वाचे फीचर्स

एकदा अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेटची गरज नाही.

पेशंटला एसएमएस पाठवण्याचीही सोय

प्रीस्क्रिप्शनच्या तळाला डॉक्टरचे रजिस्ट्रेशन नंबर आण‌ि डिग्री असणार.

प्रीस्क्रिप्शन किती काळ वैध आहे याचीही नोंद
<बातमी मोद समापसुरु.
.
.
.
आमचे चिपळूणकर डॉक्टर आधीपासूनच प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन देतात.
इतरांनीही त्या वाटेवर यावं, हे स्वागतार्ह.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पाने