Skip to main content

'मूनलाइट सोनाटा'

धनंजय Wed, 08/01/2014 - 02:13

छानच आहे.

या सोनाटाची रचना (प्रसिद्ध सुरुवातीची तरी) स्वरमेळ-विकासाची (हार्मॉनिक प्रोग्रेशन)ची आहे. गायकी अंग - मेलॉडिक प्रोग्रेशन - प्राथमिक नाही. माझे कान स्वरमेळ-विकास ऐकण्याकरिता तयार नाहीत, ही खंत मूनलाइट सोनाटा ऐकताना पुन्हापुन्हा जाणवत राहाते.
माझ्या लक्षात बिंबून राहातो तो म्हणजे पहिल्या धीम्या आदाजियो मधील ट्रिप्लेटांचा ताल, हेच सूत्र (थीम).

सानिया Sun, 12/01/2014 - 00:13

In reply to by धनंजय

माझ्या लक्षात बिंबून राहातो तो म्हणजे पहिल्या धीम्या आदाजियो मधील ट्रिप्लेटांचा ताल, हेच सूत्र (थीम).

होय. मलाही हाच भाग सर्वात अधिक आवडला. ट्रिप्लेट असल्यामुळेच कदाचीत हा भाग जास्त तरल, रोमँटीक वाटला. हा भाग ऐकताना बॉलरूम डान्सिंगची(विशेषतः वॉल्ट्झ) आठवण होत होती. गंमत म्हणजे लहान मुलाला हाच सोनाटा ऐकवला असता ट्रिप्लेट नंतरचा भाग ज्यात अनेक स्टकाटो नोट्स आहेत, तो आवडला. अर्थातच हा भाग जास्त खेळकर आहे.

मुक्ता_आत्ता Thu, 09/01/2014 - 12:18

माहिती बद्दल धन्यवाद. :) पण तांत्रिक बाबींबद्दल मी फार अनभिज्ञ आहे हे खरे. आणि लेखात म्हणल्याप्रमाणे 'वादक कोण, गायक कोण, रचना कुणाची, संगीतकाराचा देश कोणता, वंश कोणता, त्यातील इतर बारकावे, पाश्चात्य संगीत श्रेष्ठ की भारतीय…' इ. गोष्टींचा एका मर्यादेपलीकडे संगीताचा प्रत्यक्ष आस्वाद घेण्याशी काहीच संबंध नसतो. कुठल्याही कलाविष्कारात आपल्याला ह्या सगळ्याच्या पलीकडे नेण्याची क्षमता आहे की नाही ते माझ्या दृष्टीने अत्याधिक महत्त्वाचं आहे.