काव्यातली सृष्टी
काव्यातली सृष्टी
लेखक - धनंजय
(तीनही व्हीडीओ एकाच कवितेचे आहेत. वाचनाच्या वेगानुसार व्हीडीओ निवडता येईल.)
विशेषांक प्रकार
प्रयोग
आधीच कविता, त्यात प्रयोग , त्यावर धनंजय... अवघड आहे....
कृपया मुळ कविता नेहमी सारखी कोष्टकातपण देणार का? नाहीतर अवघड आहे आमच्यासारख्या दहा वेळा वाचून १ वेळा समजले असे वाटणार्या व पाव वेळा लक्षात रहाणार्याला?
दृश्य लय, गती आहे पण आवाज नाही आहे ना व्हिडिओ ला? का आमचे स्पीकर्स आज बगावत पे उतर आये है?
छान च प्रयोग आहे!
वेगळ्या माध्यमामुळे, जे म्हणायचे आहे, ते 'दाखवून' देता येते, हे किती छान जमलंय, आणि विषयाची निवडही 'दाखवण्याजोगी', थोडी सुगम, थोडी दुर्गम अशी आहे.
आवाज येणे अपेक्षित आहे का? मला आला नाही.
तांत्रिकदृष्ट्या कसे साध्य करावे हे मला माहिती नाही, पण सध्या संपूर्ण पटलाच्या केवळ मध्यभागातील चौकोनात शब्द दिसत आहेत. जर ते जास्त दूरपर्यंत रांगेत दिसले असते, तर जास्त आवडले असते असे म्हणू का? कि एकावेळी ओळीतले केवळ ३-४ च शब्द दिसणे हाही कवितेचा एक भाग आहे?
एखादे वाक्य, एखादी तान, आपल्यासमोर उलगडतांना, पुढे काय आहे, ह्या विचारात श्रोत्यांना/वाचकांना गुंगवून ठेवणे, हे कलाकाराचे मोठेच कौशल्य आहे. तुम्ही तसे मुद्दाम दाखवले आहे, का नाही, हाही एक चर्चेचा विषयच होईल!
कलाकृतीचा 'संपूर्ण' अर्थ कळण्यात मजा नाही.
कुठल्याही कलाकृतीतली हीच मजा मला फार भावते, की कलाकाराला काय म्हणायचे असते, त्याकरता कलाकार कुठले निर्णय घेतो/घेते, पण बरेचदा अनवधानाने घेतलेले निर्णयही कलाकृतीला अधिक समृद्ध करून जातात.
धन्यवाद - (आवाज नाही)
धन्यवाद.
चित्रफितीत आवाज नाही - दृश्यमाध्यमच आहे या फितीत.
अगदी बाजूपासून आल्यास बरे दिसले असते, मान्य. काही नव्हे, तर मध्ये एक जाडसर रेषांची चौकट तरी हवी होती,आणि त्या चौकटीच्या कडेतून शब्द येऊ शकले असते.
तीन चारच शब्द दिसण्यामागील हेतू असा, की फक्त एकच आडवी ओळ वाचत जाण्याची नेहमीची क्रिया न होता सर्व ओळी वाचणे प्राथमिक व्हावे.
एकदा 'वाचली'. खरंतर पाहिली,
एकदा 'वाचली'. खरंतर पाहिली, किंवा अनुभवली असं म्हणता येईल. अजून अनेक वेळा अनुभवण्याची इच्छा आहे.