Skip to main content

काव्यातली सृष्टी

काव्यातली सृष्टी

लेखक - धनंजय

(तीनही व्हीडीओ एकाच कवितेचे आहेत. वाचनाच्या वेगानुसार व्हीडीओ निवडता येईल.)

धीमी गती

मध्यम गती

जलद गती

राजेश घासकडवी Tue, 29/10/2013 - 13:02

एकदा 'वाचली'. खरंतर पाहिली, किंवा अनुभवली असं म्हणता येईल. अजून अनेक वेळा अनुभवण्याची इच्छा आहे.

ऋषिकेश Tue, 29/10/2013 - 13:23

छापिल दिवाळी अंकापेक्षा वेगळ्या प्रकारचे माध्यम असल्याने, वेगळ्या प्रकारची, दर्जाची अनुभुती मिळावी अशी अपेक्षा आंतरजालावरील दिवाळी अंकांकडून असते. धनंजय यांचे असे प्रयोग अंकाला केवळ वाचनीय न ठेवता, प्रक्षणीय / अनुभवणीय करून ठेवतात.

मस्त प्रयोग आणि कविता! आभार!

मन Tue, 29/10/2013 - 13:34

हापिसातून काहिच दृक -श्राव्य प्रकार जमणार नाहिये.
घरी जाइपर्यंत धीर धरावा लागेल बहुतेक.

धनंजय Tue, 29/10/2013 - 18:28

कविता किंवा दृश्य लघुनिबंध, असे काहीही म्हणता येईल. कुठल्या विवक्षित नावाबाबत माझा आग्रह नाही.

अनुक्रमणिकेच्या सोयीसाठी "कविता" यादीखाली हा धागा घातला, ते चालण्यासारखेच आहे.

वर्गीकरणाबाबत फार मूलगामी चर्चेत जाऊ नये... म्हणजे जरूर जावे, पण माझ्याशी नव्हे :-)

अक्षय पूर्णपात्रे Wed, 30/10/2013 - 00:32

पहिल्यांदा शब्द मुंग्यांसारखे चालतांना वाटले. नंतर यंत्रातून पास्ता बाहेर पडत आहे असे वाटले. यांत्रिक-कंटाळवाणे. पण मग आणखी नंतर शब्द वाचल्यावर मजा आली.

सहज Wed, 30/10/2013 - 07:10

आधीच कविता, त्यात प्रयोग , त्यावर धनंजय... अवघड आहे....

कृपया मुळ कविता नेहमी सारखी कोष्टकातपण देणार का? नाहीतर अवघड आहे आमच्यासारख्या दहा वेळा वाचून १ वेळा समजले असे वाटणार्‍या व पाव वेळा लक्षात रहाणार्‍याला?

दृश्य लय, गती आहे पण आवाज नाही आहे ना व्हिडिओ ला? का आमचे स्पीकर्स आज बगावत पे उतर आये है?

सहज Wed, 30/10/2013 - 08:23

In reply to by धनंजय

पुढचे शब्द वाचताना मागची ओळ लक्षात नाही रहात, त्याकरता मूळ कविता दिसली पाहीजे ना माझ्यासारख्या वाचकाला.

शिवाय अती जलद गतीत वाचून पडलात, चक्कर आली, दुखापत झाली तर कवी तसे ऐसीअक्षरे जबाबदार नाहीत हा वैधानिक चेतावनी इशारा नको? अमेरीकेत कोणी स्यू केले म्हणजे? :)

बॅटमॅन Wed, 30/10/2013 - 14:22

In reply to by सहज

म्हणून कविता ऐकण्याआधीची प्रतिक्रिया:

अमेरीकेत कोणी स्यू केले म्हणजे?

'स्यू'कर मेरे मन को, किया तूने क्या इसारा, बदला ये मौसम, इ.इ.इ.

उच्चारसौजन्यः वसंते(कार्टे) रंग दे(बघू).

मन Wed, 30/10/2013 - 20:11

वाहव्वा...
झकास...
कल्पक.....
आताच पाहिला पहिला विडियो. हे असे सुचण्याचे कौतुक वाटते.

मिहिर Wed, 30/10/2013 - 22:09

मस्त प्रयोग! ४-५ दा पाहिला. अजून बऱ्याचदा बघेन. सुंदर कल्पना.

ॲमी Thu, 31/10/2013 - 06:56

धनंजय _/\_ कसं काय सुचत हे तुम्हाला!!! मस्त प्रयोग! भन्नाट कल्पना!
गेल्यावर्षीपण ज्या शब्दावर क्लिक केलय त्यानुसार पुढची ओळ येण्याची कल्पना भारी होती.
पण तरीही
आधीच कविता, त्यात प्रयोग , त्यावर धनंजय... अवघड आहे.... >> +१

फूलनामशिरोमणी Fri, 17/02/2017 - 10:13

वेगळ्या माध्यमामुळे, जे म्हणायचे आहे, ते 'दाखवून' देता येते, हे किती छान जमलंय, आणि विषयाची निवडही 'दाखवण्याजोगी', थोडी सुगम, थोडी दुर्गम अशी आहे.

आवाज येणे अपेक्षित आहे का? मला आला नाही.

तांत्रिकदृष्ट्या कसे साध्य करावे हे मला माहिती नाही, पण सध्या संपूर्ण पटलाच्या केवळ मध्यभागातील चौकोनात शब्द दिसत आहेत. जर ते जास्त दूरपर्यंत रांगेत दिसले असते, तर जास्त आवडले असते असे म्हणू का? कि एकावेळी ओळीतले केवळ ३-४ च शब्द दिसणे हाही कवितेचा एक भाग आहे?

एखादे वाक्य, एखादी तान, आपल्यासमोर उलगडतांना, पुढे काय आहे, ह्या विचारात श्रोत्यांना/वाचकांना गुंगवून ठेवणे, हे कलाकाराचे मोठेच कौशल्य आहे. तुम्ही तसे मुद्दाम दाखवले आहे, का नाही, हाही एक चर्चेचा विषयच होईल!
कलाकृतीचा 'संपूर्ण' अर्थ कळण्यात मजा नाही.

कुठल्याही कलाकृतीतली हीच मजा मला फार भावते, की कलाकाराला काय म्हणायचे असते, त्याकरता कलाकार कुठले निर्णय घेतो/घेते, पण बरेचदा अनवधानाने घेतलेले निर्णयही कलाकृतीला अधिक समृद्ध करून जातात.

धनंजय Sat, 18/02/2017 - 01:50

In reply to by फूलनामशिरोमणी

धन्यवाद.

चित्रफितीत आवाज नाही - दृश्यमाध्यमच आहे या फितीत.

अगदी बाजूपासून आल्यास बरे दिसले असते, मान्य. काही नव्हे, तर मध्ये एक जाडसर रेषांची चौकट तरी हवी होती,आणि त्या चौकटीच्या कडेतून शब्द येऊ शकले असते.

तीन चारच शब्द दिसण्यामागील हेतू असा, की फक्त एकच आडवी ओळ वाचत जाण्याची नेहमीची क्रिया न होता सर्व ओळी वाचणे प्राथमिक व्हावे.