छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २३: एकाकी
या वेळेची कथावस्तू* (थीम) आहे "एकाकी".
एकाकी पडलेले मुल. एकाकी स्त्री. गर्दीत असुनही एकटा जाणवणारा इसम. जंगलात असुन एकटे पडलेले झाड. असे काहिही. छायाचित्र कोणत्याही सजीव/निर्जीव विषयाशी निगडीत असु शकते. पण त्या विषयाचा एकाकीपणा हा जाणवला पाहिजे.
चला तर मग!
(*) ह्या शब्दाचा वापर करण्यामागचा हेतु - माझ्या मते "एकाकी" हि एक "कथावस्तू" आहे. कारण "एकाकीपणा" हा एक बहुव्यापी गुणधर्म आहे. अनेक बाबतीत तो जाणवु शकतो (जसे स्त्री, मुल, घर, झाड ई.ई.). तो ज्या बाबतीत जाणवला तो (फक्त) तुमच्या छायाचित्राचा विषय झाला. भेद महत्वाचा नसला तरि मला तो व्यक्त करावासा वाटला. असो.
-----
अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या फोटो एडिटरमधून कॉंट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन वाढवलं, तापमान बदललं तर चित्र खुलून दिसतील. तसंच योग्य प्रमाणात कातरल्याने (क्रॉप केल्याने) मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते.
तसा प्रयत्न जरूर करावा. उत्सवी फोटो हे अनेकदा जनरल मोकळ्या पद्धतीने घेतलेले असतात .. त्यातल्या विवक्षित गोष्टि कातरून केंद्रित केल्याने वेगळा परिणाम साधता येईल..
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट २५ जुलै रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. २६ जुलै रोजी निकाल घोषित होईल व विजेता पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
मागचा धागा: विषय "यंत्र", आणि विजेते छायाचित्र "निर्जीव यंत्रेदेखील सजीव"
प्रतिक्रिया
विषय आवडला. चित्रे बघण्यास
विषय आवडला. चित्रे बघण्यास उत्सूक
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सुरवात करावी म्हणतो :)
हा नवा विषय वाचून सध्या माझ्याकडे उपलब्ध असलेले हे छायाचित्र टाकण्याचा मोह आवरला नाही.. बाकीही ह्या विषयाला अनुसरून काही संग्रहित फोटो आहेत, लवकरच तेही टाकीन...
क्र. १
१.
स्पर्धेसाठी नाही
गविंचा वरचा फोटो बघून या फोटोची आठवण झाली आणि द्यावासा वाटला. हा फोटो स्पर्धेकरता नाही.
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
क्र. २
२.
उप्पर तीन
१.
Camera Canon
Model Canon PowerShot SD850 IS
ISO 200
Exposure 1/200 sec
Aperture 2.8
Focal Length 6mm
२.
Camera Canon
Model Canon PowerShot SD850 IS
ISO 80
Exposure 1/160 sec
Aperture 2.8
Focal Length 6mm
३.
Camera Canon
Model Canon PowerShot SD850 IS
ISO 80
Exposure 1/1000 sec
Aperture 8.0
Focal Length 6mm
राधिका
संपादकः width="" height="" टाळावे
राधिका
पहिल्या चित्रातला पोत
पहिल्या चित्रातला पोत आवडला.
दुसऱ्या चित्रात एकाकीपणा चांगला साधला आहे.
दुसरे चित्र
दुसर्या चित्रात थोडी भर घालून पहा. त्याच अंधारात तीच काडी अन त्या उजेडात किंचित उजळलेला (पण एकाकी) चेहरा.
-Nile
गेल्या आठवड्यात काढलेला हा
गेल्या आठवड्यात काढलेला हा फोटो एकाकी या थीमशी सुसंगत वाटला म्हणून टाकतो आहे. घराबाहेर पडताना एका कोळ्याच्या जाळ्यात अडकलेले एक सरड्याचे लहानसे पिल्लु दिसले. ते थोड्याथोड्या वेळाने ते सुटण्यासाठी धडपड करत होते पण त्याला सुटता येत नव्हते. नंतर त्याने प्रयत्न करणे सोडून दिले. फोटो काढला तेव्हा ते जिवंत होते, दुसर्या दिवशी मेलेले दिसले. रात्रभरात थंडीने मेले असावे.
तांत्रिक माहिती:
Camera : Canon T1i
Lens : Canon EF 100mm f/2.8L Macro IS USM
Exposure mode : Manual
Aperture : f/16
Shutter speed : 1/80 S
ISO : 800
Flash use : 1 fill flash,manual settings
White balance : Manual, 4750K
Post processing details : Shot in RAW, exposure and contrast modified in Photoshop
क्र. १
इतर माहिती:
KODAK Z650 ZOOM DIGITAL CAMERA
ISO-80
1/1000 sec.
Focal length 26mm
Max aperture 3.4
विषय आवडला. चुभुद्याघ्या पण
विषय आवडला.
चुभुद्याघ्या पण काही फोटोँमधे 'एकाकी' पणा नाही जाणवला मला. जवळुन फोटो घेतल्याने असेल बहुतेक, एक आहे पण एकाकी नाही वाटतय.
राधिका चा तिसरा फोटो आवडला.
एकाकी-१
Camera SONY
Model DSC-W70
ISO 320
Exposure 1/8 sec
Aperture 2.8
Focal Length 6mm
Flash Used false
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एकाकी बुद्ध
Camera NIKON
Model COOLPIX S60
ISO 64
Exposure 1/728 sec
Aperture 3.8
Focal Length 6mm
Flash Used false
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एकाकी-२
Camera SONY
Model DSC-W70
ISO 100
Exposure 1/200 sec
Aperture 7.1
Focal Length 6mm
Flash Used false
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
चर्चगेटच्या कोलाहलातले सर
चर्चगेटच्या कोलाहलातले सर जमशेटजी जीजीभॉय
प्राचीन शहरातला एक अर्वाचीन रहिवासी (इफेसस)
खडकावरील अंकुर (ब्राईस नॅशनल पार्क)
द लोन सायप्रस, कॅलिफोर्निया (स्पर्धेसाठी नाही)
१. रुसूबाई रुसूबाई कोपर्यात
१. रुसूबाई रुसूबाई कोपर्यात बसू :- मित्रांवर रुसलेलं हे गोड पिल्लू असं एकाकी ...(पण तरीही सगळं लक्षं मात्र मित्रांचं काय चाललाय त्यावरच :)... )
२. 'सोमवारची' आतुरतेने वाट पाहणारेही असतात तर :- एरवी सकाळ पासून रात्री पर्यंत गजबजलेलं हे ऑफीस मधलं 'पुल टेबल' विकांताला मात्र असं एकाकी... ही जीवघेणी शांतता त्याला नक्कीच अस्वस्थ करत असेल ...
एकाकी लढाई..
एकाकी लढाई..
प्रवासी
Camera Canon EOS 1000D
Focal Length 22mm
Exposure 1/15
F Number f/5.6
ISO 400
बर्लिन च्या भुयारी रेल्वे स्टेशनवरील एकाकी प्रवासी
एकाकी - १
Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 400
Exposure: 1/160 sec
Aperture: 4.5
Focal Length: 18.6mm
Flash Used: No
योगायोगाने असलेले किंचित साम्य
शिप ऑफ थिसिअस हा घागा उघडताच त्यावर दिसणार्या चित्राचे या फोटोशी साम्य वाटले- माणसाच्या पोझमुळे.
!
अरे हो.... खरेच की !
एकाकी - २
Camera: OLYMPUS SP600UZ
ISO: 200
Exposure: 1/60 sec
Aperture: 5.1
Focal Length: 31.4mm
Flash Used: No
दोन्हींसाठी कॅमेरा - कॅनन EOS
दोन्हींसाठी कॅमेरा - कॅनन EOS REBEL T3, भिंग - ५५-२०० मिमी, फोकल लेंग्थ - १९४, २०० मिमी अनुक्रमे.
पहिल्याचं एक्सपोजर - १/५० से, f/5.6, आयएसो - १००.
दुसर्याचं एक्सपोजर - १/२००० से, f/5.6, आयएसो - २००.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पहिलं चित्रं आवडलं, एकाच
पहिलं चित्रं आवडलं, एकाच रंगाच्या अनेक छटा हे वैशिष्ट्य, बोटीचा एकाकीपणा थोडासा जाणवतो आहे पण तो नेमका जाणवण्यासाठी चित्र थोडं अधिक वाईड हवं आहे असं वाटलं.
शंका- लेन्सवर/फिल्टरवर उजविकडे खाली एक हलकासा डाग असावा असे वाटते आहे, सेन्सरवर असेल तर साफ करणं थोडं अवघड आहे, पण सेन्सरवर डाग नसावा.
सेन्सरवर डाग नाहीये, दुसर्या
सेन्सरवर डाग नाहीये, दुसर्या लेन्सने डागाळलेले फोटो आलेले नाहीत. हा फोटो मोठ्या स्क्रीनवर पाहिल्यावर लगेचच डाग दिसला, दुर्दैवाने तो फोटोवरून काढता येत नाहीये. कॉन्ट्रास्ट वाढवल्यावर डागही अधिक स्पष्ट होतोय. आता लेन्स साफ केली आहे, चाचणी करून पहाते.
हा य-अक्षावर कातरलेला फोटो. आता हा मलाही जास्त आवडला.
(आयगरची उत्तरभिंत धाग्यातले फोटो पाहून या फोटोची कल्पना आली. पांथस्थांनी विषय दिला त्याच्या आदल्याच दिवशी हा फोटो काढला आणि त्याला शीर्षक काय देता येईल असा विचार करताना 'एकाकी' असंच सुचलं होतं.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नेमका एकाकी
हा फोटो मस्त वाटतो आहे, आधीच्या फोटोतला एकदम वरचा गुलाबी रंग ह्यात नाही, पण तो ठेवून वाइड चित्र जमेलसं वाटत नाही.
डागांसाठी हे किंवा हे उपयोगी पडेल आणि कर्व्हस वापरुन ब्राईटनेस किंवा कॉन्ट्रास्ट बदला असे सुचवेन.
वरच्या प्रतिक्रियेतला पहिला
वरच्या प्रतिक्रियेतला पहिला फोटो बाद करून हा फोटो मोजता येईल काय?
मी यांचे आभार. 'गिंप'मधलं gimp-resynthesizer प्लगिन वापरून कचरा बर्यापैकी काढता आला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
'थींम' कठीण आहे पण प्रयत्न करतो
पक्षांत सोबत शोधताना...
taken with E-PL1 and Minolta 100mm F2.8 Rokkor manual focus lens S:1/160 F:100mm ISO: 320
जोडीच्या शोधात
taken with E-PL1 and Nikon 28mm F2.8 Manual focus lens S: 1/320 F:28mm ISO: 200
एकाकी...
कॅमेरा - सोनी DSC-H20, F - 4.4, ISO - 80
चित्र स्पर्धेसाठी नाही.
चित्र स्पर्धेसाठी नाही.
संपादकः कृपया width="" height="" टाळावे
छान कल्पना. विषयानुरूप
छान कल्पना.
विषयानुरूप करण्यासाठी क्रॉप केला आहे का? काँपोझिशन आणि आस्पेक्ट रेशिओ ऑड वाटत आहेत.
'ऋता'शी सहमत
मला देखील आवडले हे चित्र. नि़ळ्या रंगाच्या सलग बदलत्या छटा एकाकीपणा अधोरेखीत करतात.
मात्र चित्राच्या आकारामुळे, एकाकी पक्ष्याच्या उजव्या बाजूस अधिक पक्षी असतील असे वाटत राहते. तसे नसेल, तर चित्र विषयास अगदी अनुसरून आहे !
आणि चित्राचे तपशील ?
या चित्रामुळे रवींद्रनाथांच्या काही ओळी आठवल्या...
मेघेर ओपोरे मेघ जोमेछे
आँधार कोरे आशे
आमाय कॅनो बोशिये राखो
अॅका द्वारेर पाशे
बराच स्वैर अनुवाद -
घनांच्या पल्याड घनगर्दी
दाटे काळोख कासाविशी
सोयरे मागे विरून जाती
मी एकाकी उंबर्यापाशी.
धन्यवाद ऋता आणि अमुक >>एकाकी
धन्यवाद ऋता आणि अमुक
बरोबर, म्हणूनच हे चित्र स्पर्धेसाठी नाही, ती कबुतरांची जोडी होती, तसेही पक्षी निदान कबुतरे एकटे सहसा बसत नाहीत असा अनुभव आहे(ऋता अधिक सांगू शकतील), कावळे एकटे बरेचदा आढळतात. :). अनुवादित कविता उत्तम आहे, एकाकीपणा नेमका सुचवणारी आहे, आवडला. चित्राचे तपशील निवांत देतो, ते कंटाळवाणे काम आहे
बॉस्टन बॉम्बस्फोटातील प्रमुख
बॉस्टन बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी जोखार... (स्रोत)
-Nile
सुलतानपुरचा कावळा
संपादक : दिलेला दुवा चुकीचा आहे. जी प्रतिमा टाकायची आहे तिच्या जेपेग किंवा तत्सम फॉर्मॅटमधल्या फाइलचा दुवा देणं गरजेचं आहे. तसंच ती प्रतिमा आंतरजालावर कुणालाही उपलब्ध असणं गरजेचं आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कावळा
उडून गेला वाटतं!
-Nile
दिलेल्या माहितीनुसार आम्ही
दिलेल्या माहितीनुसार आम्ही त्याला इथे बंदिस्त केलं होतं. काय झालय कुणास ठाऊक, मलाही दिसत नाहीय.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
१. एक एक फूल गळावया...
१. एक एक फूल गळावया...
२.
२.
१ आणि २ हे दोन्ही फोटो निकॉन डी ४० एक्सने काढलेले आहेत. फ्लिकरवरून बाकीची माहिती मिळवता येत नाहीये.
फोटो तसे जुने आहेत. पण दोन्ही अंदाजाप्रमाणे ७०-३०० एमएम लेन्स ने काढले आहेत.
३. एकाकी
निकॉन डी ४०एक्स, ७०-३०० एमएम लेन्स्
फोटो स्पर्धेसाठी नाही.
जालावरून साभार.
स्पर्धेसाठी नाही
Camera Nikon D90
Exposure 0.008 sec (1/125)
Aperture f/11.0
Focal Length 90 mm
ISO Speed 1600
Exposure Bias 0 EV
शांत.. निवांत.. एकाकी..
१)
----------------------------------------------------------
बवेरिअन स्टेट (साऊथ जर्मनी)- फ्युसेन.(near Neuschwanstein castle)
----------------------------------------------------------
Sony -DSC W530
ISO speed- 400
exposer time - 1/80 sec.
F No. F/5.7
----------------------------------------------------------
पिकासा मधील 'I am feeling lucky' वापरलंय.
----------------------------------------------------------
२)
----------------------------------------------------------
The Alps- Salzburg- ऑस्ट्रिया.
----------------------------------------------------------
अवांतर आहे पण सगळे
अवांतर आहे पण सगळे साहित्यप्रेमी असल्याने स्वातंत्र्य घेते - अनेक कवींना जेव्हा त्यांचा प्रत्येकाचा आवडता शब्द सांगण्यास सांगीतले होते तेव्हा एका कवीने पुढील शब्द निवडला - KANKEDORT
हा शब्द इतका एकाकी आहे की त्याचा संपूर्ण इंग्रजी भाषेत माहीत वापर फक्त एकदाच झालेला आहे. A lonely word whose definition can only be inferred from its single, immediate context in Chaucer's poem:
या एकाकी शब्दावरच या कवयित्रीने तिचा आवडता शब्द म्हणून लेख लिहीला आहे तो लेख येथे
अवांतर नाही तर अॅप्टांतर
अवांतर नाही तर अॅप्टांतर म्हणावयास हवे याला. शब्द नव्यानेच कळाला, लेख आत्ताच वाचतो, बहुत धन्यवाद शेअर केल्याबद्दल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एकाकी - ३
स्थळ : राजमाची
Camera: NIKON COOLPIX S9100
ISO: 160
Exposure: 1/1000 sec
Aperture: 3.5
Focal Length: 4.5mm
Flash Used: No
समुद्रपक्षी
समुद्रपक्षी
छिद्र : एफ/४.५
उघडीप : १/३२० सेकंद
आय एस ओ : १००
कॅमेरा : ऑलिम्पस ई-५००
सुंदर!
धनंजय यांची प्रकाशचित्रे नेहमीच त्यामागच्या विचारांच्या नाविन्याने उठून दिसतात, वरचे 'एकाकी' विषयावरचे चित्र याचे उत्तम उदाहरण आहे!
या धाग्यावर लावता येतील अशी काही प्रकाशचित्रे काढायचा मीही प्रयत्न ़केला होता पण मांडणीमागच्या सरळधोपट विचारांचा मला स्वतःलाच कंटाळा आला होता म्हणून कष्ट घेतले नाहीत.
एकाकी आणि एक
वेगळ्या पार्श्वभूमीवर एक वेगळी गोष्ट म्हणजे "एकाकी"पण नव्हे असं काही तांत्रिकदृष्ट्या सुंदर पण थोडा संदर्भ नसलेली छायाचित्रं पाहून म्हणावसं वाटलं..
+१ सहमत आहे. "एकांत", "एकटा"
+१
सहमत आहे. "एकांत", "एकटा" आणि "एकाकी" या तिन्हीत गल्लत होते आहे का असा काही चित्र पाहुन संशय आला
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
"एकांत", "एकटा" आणि "एकाकी"
"एकांत", "एकटा" आणि "एकाकी" या तिन्हीत गल्लत करत करत ...
सर्व छायाचित्रे कॅनन ११०० डी ने ऑटो मोडवर काढलेली आहेत. एक्झिफ डेटा कसा शोधायचा माहिती नाही. फ्लिकरमध्ये लगेच दिसतो म्हणे. थोडासा प्रयत्न केला पण आधी सापडला नाही. ( एसीडीसी मध्ये चित्राखालीच एक्झिफ डेटा असतो तो नंतर सापडला... प्रतिसाद संपादित करून एक्झिफ डेटा लिहिला आहे))
माउंट टिटलिस
आय एस ओ १००
२१ एम एम
एफ/९
१/२०० सेकंद
आय्फेल प्यारिस मॉमा टेकडीवरून
आय एस ओ ८००
५५ एम एम
एफ/२२
१/२०० सेकंद
युन्ग्फ्रॉ खिंडीतली वेधशाळा
आय एस ओ १००
७५ एम एम
एफ/ ११
१/८०० सेकंद
ब्रिएन्झ तलाव
आय एस ओ ८००
२५ एम एम
एफ/२२
१/२०० सेकंद
संपादकः width="" height="" टाळावे
वेधशाळेचा फोटो आवडला.
भलतंच क्लिफ आहे! शिवाय, पृथ्वीच्या हा विश्वातील एकाकीपणाबद्दल शोध घेणारी वेधशाळा म्हणूनही खपून जाईल.
-Nile
मास्तर, विण्डोज वापरत असाल तर
मास्तर, विण्डोज वापरत असाल तर विण्डोज एक्सप्लोररमधे चित्रावर राईट क्लिक, प्रॉपर्टीज (आणि एक काहीतरी क्लिक करून) एक्झिफ मिळेल. लिनक्समधे एक्झिफ अशी कमांड लाईन युटीलिटी आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
क्षमस्व आहे!
काही वैयक्तिक कारणामुळे ह्या धाग्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले त्याबद्दल क्षमस्व आहे. उद्या संध्याकाळपर्यंत (४ ऑगस्ट) निकाल जाहीर करायचा प्रयत्न आहे.
कॅमेरा निकॉन डी ९० लेन्स
कॅमेरा निकॉन डी ९०
लेन्स १८/५५
मिळतेजुळते
तुमचे वरील छायाचित्र पाहून मला माझा हा प्रयत्न आठवला ...
स्पर्धेचा निकाल!
निकाल जाहिर करायला वेळ झाला म्हणुन प्रथम आपल्या सगळ्यांची माफि मागतो.
या स्पर्धेचा विषय थोडा गोंधळ निर्माण करणारा होता हे कबुल करायला हवे. ऋषिकेश यांनी वर म्हटल्याप्रमाणे अनेक स्पर्धकांची "एकांत", "एकटा" आणि "एकाकी" या तिन्हीत गल्लत झाली आहे असे वाटते. आवाहनकर्ता म्हणुन मी ह्या बाबतीत स्पष्टीकरण दिले पाहिजे होते पण ते वेळे अभावी शक्य झाले नाहि त्यामुळे दिलगीर आहे.
असो, आता निकाला कडे वळुयात -
दखल घेण्यासारखे -
सर्व विजेत्यांचे
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
@ऋषिकेश - अभिनंदन आणि पुढील छायाचित्रण आव्हानाच्या विषयाची वाट पहात आहोत
धन्यवाद!!!
धन्यवाद पांथस्थ!!!
पुढच्या आव्हानासाठी सुद्धा नक्की प्रयत्न करेन.
आभार! पुढील विषय दिला आहे
आभार! पुढील विषय दिला आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!