छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २२: यंत्र

या वेळचा विषय आहे "यंत्र". मानवनिर्मित यंत्रांची चित्रे येथे दिसावी, अशी विषय देतानाची अपेक्षा आहे.

यंत्रे म्हटली म्हणजे उपयुक्तता हा प्राथमिक हेतू असतो. परंतु यंत्र बनवणार्‍याची सौंदर्यदृष्टी म्हणा, किंवा यंत्राच्या अभियांत्रिकीसाठी काही विवक्षित संमिती (सिमेट्री) लागत असल्यामुळे म्हणा, कित्येक यंत्रे सुंदरही असतात. कधीकधी बघणार्‍याच्या परिप्रेक्ष्यामुळे, कॅमेर्‍याच्या चौकटीतल्या निवडीमुळे, किंवा यंत्राच्या परिसराशी होणार्‍या संदर्भामुळे एक कथानक निर्माण होऊ शकते.

अशी यंत्रांची चित्रे आपण येथे बघूया!

-----
अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या फोटो एडिटरमधून कॉंट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन वाढवलं, तापमान बदललं तर चित्र खुलून दिसतील. तसंच योग्य प्रमाणात कातरल्याने (क्रॉप केल्याने) मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते.
तसा प्रयत्न जरूर करावा. उत्सवी फोटो हे अनेकदा जनरल मोकळ्या पद्धतीने घेतलेले असतात .. त्यातल्या विवक्षित गोष्टि कातरून केंद्रित केल्याने वेगळा परिणाम साधता येईल..
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट ४ जुलै रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. ५ जुलै रोजी निकाल घोषित होईल व विजेता पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.

मागचा धागा: विषय काळ , आणि विजेते छायाचित्र "धीम्या उबदार गतीने".

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

यंत्र हा विषय आवडला. या थीमचे काही छान फोटो पाहिलेही आहेत.

एक शंका आहे, नळ वगैरेंना थेट यंत्र म्हणता येणार नाहीत पण असे विषय चालतील का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होय. जरूर चालेल.

माझ्या मनात म्हणावे तर मानवनिर्मित वस्तूंपैकी चरखा चालेल पण कापड चालणार नाही. कालव्याचे पाणी चालू-बंद करणारी झडप चालेल पण कालवा चालणार नाही. पण फरक काय ही नेमकी व्याख्या मला करता येत नाही. परंतु "नळ" चालेल असे जरूर वाटते.

या विषयात फायर हायड्रंट चालणार नाहीत असं वाटतं. नळांबद्दल विचारताना माझ्या डोक्यात हे असं काहीतरी होतं.

कापड-चरखा यावरून हा फोटो दिसला-सुचला

दोन्ही फोटो मी काढलेले नाहीत. viewbug.com या संस्थळावर मिळाले.

(अंतिम तारीख ४ मे च्या जागी ४ जुलै केली आहे.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दोन्ही चालतील.

विषय आवडला. खालील फोटो स्पर्धेसाठी नाही, कारण ते केवळ लॉरी सिमन्सच्या एका छायाचित्राचे घेतलेले छायाचित्र आहे. १९९१ मध्ये गाजलेल्या केनेडी कुटुंबातल्या विल्यम केनेडी स्मिथ खटला आणि न्या. क्लॅरेन्स थॉमसवर झालेले आरोप या घटनांच्या पार्श्वभूमीवर आलेले. अधिक माहिती येथे -

IMG_7042

मूळ चित्र मस्तच आहे.

थोडे अधिक प्लॅनिंग करून स्वतःचे चित्र म्हणूनही देता आले असते. चित्रावरील काचेत अनेक प्रतिबंबे पडली आहेत. त्यांची हेतुपुरस्सर काहीतरी मांडणी केली असती तर चित्राबाबत/चित्राच्या विषयाबाबत टिप्पणी करणारी नवीन कृती ठरली असती. (परंतु "यंत्र" विषयाचे म्हणून चालले असतेच, असे सांगता येत नाही.)

स्पर्धेसाठी नाही , पण विषयाच्या अनुषंगाने हे आठवले :

http://www.kirloskarpumps.com/Cactus-&-Roses/Downloads_Cactus-&-Roses_Ga...

(गांधीजींना) चालणारा चरखा (न-यंत्र)

(अर्थातच गांधीजींना) न चालणारा चरखा (यंत्र)

दोन्ही चित्रे जालावरून. पण दुसरे माझ्याकडे छापील स्वरूपात आहे. (पुस्तक : यांत्रिकाची यात्रा / कॅक्टस अ‍ॅण्ड रोजेस)

दोन यंत्रे: मानवी आणि नैसर्गिक

एक्जिफ
५५०ड ५५-२५० लेन्स
आएसो २००
शटर १/२५०
अ‍ॅपरचर ५.६

लाईटरूम ४.२ वापरुन उत्तर-संस्करण
------------------------------------------------------------------------------------

कॅमेरा

Canon SX200 IS

एक्जिफ - शोधावा लागेल.

संपादकः धाग्यात म्हटल्याप्रमाणे चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा.

स्वतः स्वतःच्याच कार्बन फोनवरुन काढलेले आणि कार्बनच्याच एडिटरमधे संस्कारित केलेले चित्र. फोनच्या भिंगातून काढलेले फोटो या स्पर्धेत पात्र आहेत का?

असतील तर उत्तमच.

होय जरूर.

पण कार्बन फोन म्हणजे काय समजलं नाही. ही उत्पादक कंपनी आहे का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होय हो, http://www.karbonnmobiles.com/ कारबोन्न फोनच!

गवि, तुमची का 'हाडे'?

नाय हो नाय.. आमची कुठली..

प्रदर्शनात घेतलेला फोटो हाय. त्यातला इंजिनचा भाग, आणि त्यातही नुसते यंत्राच्या सौंदर्याचे आकार दिसावेत म्हणून वास्तव रंगीत प्रतिमा क्रॉप केली आणि मोनोक्रोम इ इ केली...यंत्राची ताकद थरथरल्यासारख्या दृश्यात जाणवते म्हणून तसा नॉईज केला. नेमकं किती पॉवरचं आणि कशा जातीचं इंजिन आहे ते तपशीलवार दिसू नये पण आकर्षण वाटावं इतपत लुक ठेवला.

मुळात हाडे काळीपांढरीच आहे, तरीही क्लासिक लुक देणं आवश्यक वाटलं.

विसुनाना, हाडे काय म्हणावं हो?? जरा बरा शबुद वापर्ला अस्ता..?त्या फोटोमध्ये मी अ‍ॅक्च्युली कोणाचा पाय अन हाडे दिसत्यात का ते दोनदा निरखून पाहिले अन मग लक्शामध्ये आले कसली हाडे आहेत ते

गवि, तुमची का 'हाडे'?

बाकी हा प्रश्न गविंना विचारणारे विसुनाना पहिलेच असावेत! (कृपया हलकेच घेणे.) Smile

गवि चुकलात तुम्ही. कार्बन उत्सर्जन करणार्‍या धुराड्याचाच किंवा त्याही पुढे (किंवा धुराड्याच्या मागचा कार्बनचा) फोटो हवा होता. अजूनही वेळ गेलेली नाही. काढा धुर.


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

फोटो क्रमांक १ : Gear train

तांत्रिक माहिती:
Camera : Canon T1i
Lens : Canon EF 100mm f/2.8L Macro IS USM
Exposure mode : Manual
Aperture : f/13
Shutter speed : 1/200 S
ISO : 200
Flash use : 2 fill flashes (bounced from the ceiling) + 1 directional flash (from right side of the image), manual settings
White balance : Manual, 5300K
Post processing details : Shot in RAW, exposure and contrast modified in Photoshop
.
मोठ्या आकारातील फोटो इथे बघता येइल.
.
.
फोटो कमांक २ : मनगटी घड्याळ

तांत्रिक माहिती:
Camera : Canon T1i
Lens : Canon EF 100mm f/2.8L Macro IS USM
Exposure mode : Manual
Aperture : f/8
Shutter speed : 1/200 S
ISO : 100
Flash use : 1 fill flashes (bounced from the ceiling), manual settings
White balance : Manual, 5300K
Post processing details : Shot in RAW, exposure and contrast modified in Photoshop
.
मोठ्या आकारातील फोटो इथे बघता येइल.

यंत्रांनी बदललेले क्षितिज

(फ्लिकरवर एव्हिअरी आजच पाहिलं आणि संस्करण म्हणून मूळ चित्रात कंटाळा येई पर्यंत बदल केले.)

मस्त विषय आहे.कधी कधी निर्जीव यंत्रेदेखील सजीव असल्याचा भास होतो! जळगावच्या एरंडोल तालुक्यामधे पद्मालय म्हणुन गणपतीचे पीठ आहे, त्या मंदिराच्या बाहेर एका टपरित काढलेला फोटो आहे.

Press

तांत्रीक माहिती:
कॅमेरा: Canon EOS 450D / Digital Rebel XSi
लेन्स: Canon EF 85mm f/1.8 USM Medium Telephoto Lens

कधी कधी निर्जीव यंत्रेदेखील सजीव असल्याचा भास होतो!

सहमत!!!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

निर्जीव यंत्रे सजीव असल्याचा भास होतो यावरून मिलिंद बोकीलांच्या झेन गार्डन कथासंग्रहातली ’यंत्र’ ही कथा आठवली.

अधिक माहितीसाठी मूळ कथा वाचा अथवा : http://muktasreading.blogspot.in/2012/03/zen-garden-milind-bokil.html हे पहा.

मलाही हीच कथा आठवली.

माहितीबद्दल धन्यवाद! पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करुन मिळाले सुद्धा आहे, विकांताला वाचण्यात येईल Smile

रचाक - मिलिंद बोकिल हे माझे अत्यंत आवडते लेखक आहेत. त्यांचे "गोष्ट मेंढा गावाची" हे पुस्तक वाचले आहे का? नसल्यास जरुर वाचा!


Camera: Nikon D3000
Lens: 50mm 1.4D
Focal Length: 50mm
Focus Mode: Manual
Aparture: f/1.4
Shutter: 1/250s
ISO: 100
Post processing: Exposure Adjustment + Watermark
 

Camera: Nikon D3000
Lens: 50mm 1.4D
Focal Length: 50mm
Focus Mode: Manual
Aparture: f/1.4
Shutter: 1/2500s
ISO: 200
Post processing: Exposure Adjustment + Watermark
 

Camera: Nikon D3000
Lens: 50mm 1.4D
Focal Length: 50mm
Focus Mode: Manual
Aparture: f/1.4
Shutter: 1/30s
ISO: 100
Post processing: Exposure Adjustment + Watermark

पहिला फोटो छान आहे. हाच फोटो जर १/१० -१/३० सेकंद shutterspeed ने काढला असता तर कदाचित पडणार्‍या पाण्याचा परिणाम जास्त चांगला दिसला असता. मूळ फोटो raw मध्ये आहे का? असेल तर ~१/२ ते १ stop underexpose करुन काही overexpose झालेले details बहुतेक परत मिळवता येतील (डावीकडचा खालचा कोपरा आणी पाणचक्कीच्या उजवीकडे).

हा चांगली टिप. थोडं १/१० - १/३० shutterspeed केला असता तर पाणी अजुन चांगलं आलं असतं. फोटो RAW मधेच आहे.

पंख्याचा फोटो काढायचं माझ्याही डोक्यात आलं होतं. (पण पंख्यावरची धूळ साफ करायचा कंटाळा आला.)

रॉ फोटो नसेल तरीही JPG फाईल्स वापरून जिंपमधे बर्‍यापैकी तपशील मिळवता येतील. खालच्या फोटोत जेपीजीवरच काम करून गेट आणि डोमच्या काही भागाचे तपशील मिळवले. हा फोटो स्पर्धेसाठी नाही.

(मूळ फोटो शोधून दाखवते म्हणजे फरक चटकन समजेल.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमचाही पंखा फोटो काढण्यापुरताच. मी पण पंखा मागच्या आठवड्याला बाहेर काढला. इकडे ९-१० महीने पाउस पडतो. त्यामुळे गरज लागत नाही.
डोळ्यासमोरच होता click केला. Smile

>> रॉ फोटो नसेल तरीही JPG फाईल्स वापरून जिंपमधे बर्‍यापैकी तपशील मिळवता येतील.

raw मध्ये खूप जास्त dynamic range असते, त्यामुळे खूप जास्त तपशील परत मिळवता येतात. jpeg मध्ये बरेच tonal details जातात. या ठिकाणी छान उदाहरणे आहेत raw vs jpeg साठी. example 7 आणी example 8 आपल्या चर्चेसंदर्भात उपयुक्त आहे.
अजून एक वैयक्तिक उदाहरण द्यायचे झाले तर मी एकदा आकाशात उडणार्‍या पक्ष्यांचे फोटो काढत असताना अचानक माझ्या समोर एक रॅटलस्नेक सळसळत आला. मी कॅमेराची सेटिंग्स बदलायला विसरलो आणी फोटो खूप काळे आले. मी नेहमीच raw + jpeg फोटो काढत असल्यामुळे मी raw वापरून जवळपास 3.75 stop overexpose केले आणी थोडातरी बरा फोटो मिळवला. खाली दोन्ही फोटो दिले आहेत. त्यातील jpeg फोटो post process करण्याचा प्रयत्न केला तर tonal details कसे जातात हे स्प्ष्ट होइल.
१) कॅमेरातून आलेला jpeg फोटो

२) raw वापरून post process केलेला फोटो

जीवनावश्यक यंत्रं

कॅनन टी३, १८-५५ मिमी, छिद्रमान - f/11, एक्सपोजर - १/३ से, आयएसओ - ८००, फ्लॅश वापरला नाही.
फोटो काढल्यावर थोडा फिरवला, कातरला, कॉन्ट्रास्ट आणि रंग ठीकठाक केले.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तपकिरी नक्षीदार वस्तू काय आहे?

जीवन-अनावश्यक आहे ते!

(केसांची क्लिप.)

ऐला, मला पेपरवेट वाटला होता.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

क्लिपच्या अँगलने छान परीणाम साधला गेला आहे.

यंत्रांनी किंवा उपकरणांनी बनलेला चेहेरा (आत माणूसच नाही) ही कल्पना आवडली.

यंत्रीणबाईच! बाकी काही नाही.

मोबाईल वरून घेतलेले छायाचित्र असल्याने एग्झिफ विदा उपलब्ध नाही.

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

ऐसीच्या मुखपृष्ठावरील "यंत्र आणि मानव" हे छायाचित्र अतिशय अर्थपूर्ण , इन्स्पायरींग अन रोचक आहे. अनेक कल्पना मनात येऊन गेल्या.
__________

कधीतरी "ऊब" हा विषय घेता येईल का? सूर्याची , मानवी नातेसंबंधांची, फक्त डोळ्याला जाणवणारी अशी काही ऊबेची उदाहरणे घेता येतील असे वाटते.

१. कॅमेराचं आत्मपरीक्षण

२. पैशाने सगळी दारं उघडतात

३. पैसा

पहिल्या फोटोतल्या कॅमेर्‍याला polarizing filter आहे का? प्रतिबिंब काळपट आहे म्हणून तसे वाटले.


ऑडिओ मिक्सर Exposure:1/60 Aperture:f/5.0 Focal Length:77 mm ISO Speed:1600


क्रेन Exposure:1/200 Aperture:f/8.0 Focal Length: 40mm ISO: 100


हुक्का Exposure: 1/250 Aperture:f/4.5 Focal Length: 32 mm ISO Speed: 100

हे चित्र स्पर्धेसाठी नाही.


कॅमेरा Exposure:1/60 Aperture:f/8.0 Focal Length: 35mm ISO: 100

ही काही चित्रे मी वॉशिंगटनजवळील विमानसंग्रहालयात काढली :
१. नळ्या

केंद्रमान - १४१ मिमि, छिद्र - एफ/४.४, उघडीक - १/५ सेकंद

२. किटली?

केंद्रमान - १०८ मिमि, छिद्र - एफ/४.२, उघडीक - १/८ सेकंद

३. ब्लॅकबर्ड विमान

केंद्रमान - ११८ मिमि, छिद्र - एफ/४.२, उघडीक - ०.४ सेकंद

४. स्पेश शटलवरील चेहरा

केंद्रमान - ४० मिमि, छिद्र - एफ/४, उघडीक - १/६ सेकंद

सर्व चित्रे ऑलिंपस ई-५०० कॅमेर्‍याने काढली.

यंत्रमानव

यंत्रकेसरी

स्पर्धेसाठी नाही.


Camera: OLYMPUS SP600UZ
ISO: 100
Exposure: 1/30 sec
Aperture: 3.5
Focal Length: 5mm
Flash : Yes

स्पर्धेसाठी नाही.

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 800
Exposure: 1/6 sec
Aperture: 4.5
Focal Length: 18.6mm
Flash : No

स्पर्धेसाठी नाही.

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 800
Exposure: 1/6 sec
Aperture: 4.5
Focal Length: 18.6mm
Flash : No

स्पर्धेसाठी नाही.

Camera: OLYMPUS SP600UZ
ISO: 400
Exposure: 1/5 sec
Aperture: 3.5
Focal Length: 5mm
Flash : No

ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट ४ जुलै रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल.

आज ७ जुलै आहे. अमुक ने अजून बोर मारायच्या आत स्पर्धेचा निकाल जाहिर करावा.

(निकाल सोयीनुसार शनिवार रविवरपर्यंत पुढे ढकलला. क्षमस्व.)

मला अपेक्षा होती की यंत्रांचे मॅक्रो छायाचित्रण भरपूर येईल. पण अनेक वेगळ्या कल्पना दिसल्या. उदाहरणार्थ ऋता यांचे "बदललेले क्षितिज". वेगवेगळ्या लोकांची कल्पकता मला खूप आवडली. कुठली चित्रे आवडली त्यांचा क्रम गेले काही दिवस सारखा बदलतो आहे. पण आता जो वाततो तो क्रम अंतिम मानून देतो आहे.

(सविस्तर नंतर लिहीन, आता नुसते निकाल देतो.)

तिसरा क्रमांक :
"मी" यांचा "यंत्रमानव" - कल्पना भन्नाट आहे.

दुसरा क्रमांक :
(दोन चित्रांचा "tie")
अपरिमेय यांची "गियर ट्रेन"
वाचक यांची Crane

पहिला क्रमांक :
पांथस्थ यांचे "निर्जीव यंत्रेदेखील सजीव"

मला chintu यांचे तिन्ही फोटो आवडले. क्लासिक, नॉस्टाल्जिक वाटतायत. आणि Gear Train, हुक्का, 'हाडे' हे फोटोपण आवडले. यंत्रमानव ची कल्पना भन्नाट आहे.

===
Amazing Amy (◣_◢)

chintu यांचा दुसरा फोटो अधिक शक्यतांचा वाटला.

पहिले चित्र सुंदर आहे, पण ग्रीटिंगकार्डवजा चित्रांबाबत माझा पूर्वदूषितग्रह आहे. (म्हणजे ग्रीटिंग कार्डांवर आवडतात. पण त्यांच्या गुळगुळीतपणात अर्थपूर्णतेचे कंगोरे तासले जातात. जलचक्कीचे चाक "क्यूट" आहे, त्याचा यंत्रपणा माझ्याकरिता कमी होतो.)

chintu यांच्या दुसर्‍या चित्रात कथानक आहे, मिष्किलपणा यंत्रांच्या "यंत्र" असण्यात आहे. काहीतरी क्रमवारी लावायची म्हणून अधिक तांत्रिक सफाई असलेली चित्रे निकालात वरच्या क्रमांकात दिली. खरेच, या वेळी चित्रांची निवड मला कठिण गेली.

हम्म ते फोटो ग्रिटिँगकार्डवरचे वाटतायत खरं :-). तो क्लासिक फिल येण्यासाठी क्यामेरात काही सेटीँग असतं का?
यंत्र म्हणल्यावर मला स्वयंपाकघरातील यंत्र च आठवलेली. फ्रिज, डिशवॉशर, मिक्सर वगैरे. इथे बाईक, कार, मेकेनिकल फ्याक्टरी किँवा असेंब्लर वगैरेचे फोटो जास्त येतील असं वाटलेलं. पण इतर वेगळेच फोटो रोचक वाटले.
तुमचे विषय आणि फोटोदेखील हटके असतात.

===
Amazing Amy (◣_◢)

ऐसी वर काही दिवसांपूर्वी लावलेला - यंत्र आणि मानव नावाचा प्रसिद्ध फोटो कुठे मिळेल? तो अतिशय आवडला होता. फोटोग्राफर "सोशल रिफॉर्मिस्ट" होता व छायाचित्राच्या माध्यमातून क्रांती केली असे काहीसे तेव्हा वाचले होते.