छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २१: काळ

बदल - नवीन विषय आहे 'काळ'. काळाची प्रचिती देणारं जे काही दिसेल/भासेल त्याचे छायाचित्र हेच नवीन आव्हान आहे. तर आपल्याला काळाशी सुसंगत वाटणारे फोटो इथे जरुर नोंदवा.


ह्या काळावर शेक्सपिअरने लिहिलेलं एक सॉनेट इथे देत आहे, सॉनेटबद्धल अधिक माहिती इथे मिळेल.


When I do count the clock that tells the time,
And see the brave day sunk in hideous night;
When I behold the violet past prime,
And sable curls all silver'd o'er with white;
When lofty trees I see barren of leaves
Which erst from heat did canopy the herd,
And summer's green all girded up in sheaves
Borne on the bier with white and bristly beard,
Then of thy beauty do I question make,
That thou among the wastes of time must go,
Since sweets and beauties do themselves forsake
And die as fast as they see others grow;
And nothing 'gainst Time's scythe can make defence
Save breed, to brave him when he takes thee hence.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


जानेवारी २०१३ पासून लोकसत्तामधे (संपादकीय/विशेष) सुरु असलेल्या अभिजीत ताम्हणेंच्या कलाभान मालिकेत गेल्या ३-४ अंकांमधे हेतुपूर्ण/हेतुबद्ध/क्रियात्मक फोटोग्राफीबद्दल लिहिले आहे. रुढ रंग/सौंदर्य/तांत्रिकतेच्या पलीकडे जाऊन हेतुपूर्ण, ठराविक आशय ठेवून फोटोग्राफीच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर केलेलं विवेचन विलक्षण आहे. इथून पुढे ह्या लेखामध्ये मांडलेले विचार कलाभान लेखमालेच्या विचारांना धरून आहेत.

आपण गेल्या अनेक अंकांमध्ये मूलतः सौंदर्यहेतू असलेल्या फोटोग्राफीचे अनेक प्रकार पहिले, अनेक चांगल्या प्रयत्नांचे अनुभव त्यामुळे आपण घेऊ शकलो, ह्यावेळेस मुळ रंग/रूप बाबींसह/शिवाय ठराविक उद्देश मांडणारी रचना फोटोग्राफीच्या माध्यमातून सदर करावी असा प्रस्ताव आहे.

ठरविक उद्देश/हेतू - ठरविक उद्देशाची काही परिभाषा नाही, भवतालच्या जगासंबंधी तुम्हाला पडणारे प्रश्न, तुम्हाला वाटणाऱ्या सामाजिक समस्या, वैयक्तिक हेतू, मांडावासा वाटणारा विचार असा काही. तुमचा फोटोग्राफीमागचा उद्देश तुमचा अनुभव असू शकेल, उपहास असू शकेल, वाचलेला आणि प्रकर्षाने जाणवलेला विचार असू शकेल, तुमच्या कामाचा एक भाग असू शकेल, अवतीभवती पाहिलेली विसंगती असू शकेल. मुद्दा तुम्हाला त्रास देणारा किंवा विचार करायला भाग पडणारा असेल, तुम्ही लेख लिहिणार असाल किंवा कविता लिहिणार असाल तर तेच तुम्हाला फोटोग्राफीच्या माध्यमातून व्यक्त करता येईल. ह्यासंदर्भात कलाभान मालिकेतील "कोण म्हणजे मी?", "ठरवाठरवी", "मानसीचा प्लास्टिकभार तो..", "समाजाचा चेहरा" हे लेख वाचावेत, पण त्यामुळे तुमची विचार-प्रक्रिया वाचलेल्या लेखांच्या दिशेनेच फक्त जाउ नये ह्याची काळजी घ्या.

मांडणी - हेतू मांडण्यासाठी भवतालामधलीच परिस्थिती वापरली पाहिजे असं नाही, मुद्दाम काही साधनांची मांडामांड करून रचना करण्यास हरकत नाही.

तांत्रिक बाबी सांभाळता आल्या तर रचना अधिक प्रभावी ठरते पण त्याचा आग्रह नाही, फोटोंवर किमान संस्करण करणे मात्र वांच्छित आहे.

अशी मांडामांड मिळण्यास / करण्यास वेळ लागू शकतो, त्यामुळे येथील संपादक मंडळाच्या परवानगी-नुसार स्पर्धेचा कालावधी वाढवता येईल. विषयाबद्दल काही चर्चा करणे सदस्यांना गरजेचे वाटल्यास तसे इथे किंवा दुसरा धागा काढून करता येऊ शकते.

तर हेतू व त्याची मांडणी हाच या वेळचा विषय आहे, प्रत्येक रचनेबाबत रचनाकाराने त्याचा विचार मोजक्या शब्दात मांडावा हि विनंती.

वरील प्रस्तावास कुणाचा आक्षेप असल्यास कृपया तो मांडावा, आक्षेपावर बहुमत झाल्यास विषय बदलण्याची विनंती संपादक मंडळाला करता येइल.

अभिजीत ताम्हणे ह्या संस्थळाचे सदस्य असल्यास त्यांनी ह्या प्रस्तावासंदर्भात आपले विचार मांडावेत, काही सुधारणा सुचवाव्यात ही विनंती.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सुचना -

अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या फोटो एडिटरमधून कॉंट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन वाढवलं, तापमान बदललं तर चित्र खुलून दिसतील. तसंच योग्य प्रमाणात कातरल्याने (क्रॉप केल्याने) मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते.
तसा प्रयत्न जरूर करावा. उत्सवी फोटो हे अनेकदा जनरल मोकळ्या पद्धतीने घेतलेले असतात .. त्यातल्या विवक्षित गोष्टि कातरून केंद्रित केल्याने वेगळा परिणाम साधता येईल..
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट ४ मे रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. ५ मे रोजी निकाल घोषित होईल व विजेता पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.

मागचा धागा: विषय उत्सव , आणि विजेते छायाचित्र(३. गणपती २०१२).

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

नवीन विषय : यंत्र

नवीन विषय आहे "यंत्र". यंत्र मानवनिर्मित असावे अशी विषय देतानाची अपेक्षा आहे.

भूत'काळ'

धनंजय यांनी नवा विषय न देण्यामागे काही व्यक्तिगत/तांत्रिक अडचण असल्यास, हा धागा धावता राहवा या उद्देशाने त्यांनी योग्य तो निर्देश करावा ही विनंती.
पाक्षिक आव्हानाबाबत, 'रोलिंग् स्टोन् गॅदर्स् नो मॉस्' ची आठवण व्यवस्थापकांना करून द्यावीशी वाटते आहे.

स्पर्धेचे स्वरूप बदलण्याविषयी

स्पर्धेचे स्वरूप बदलण्याविषयी चर्चा चालु आहे .. त्यात अजून एक सुचना -
१ . स्पर्धा कालावधी एक महिन्याचा असावा
२. प्रत्येक महिन्यासाठी दोन विषय असावेत
३. प्रत्येक विषयाच्या विजेत्याने एक विषय पुढील महिन्यासाठी सुचवावा. (विजेता १ - विषय - अ / विजेता २ - विषय - ब)
४. पुढील महिन्यात विजेता १ ला विषय ब मधे आणि विजेता २ ला विषय अ मध्ये भाग घेण्यास अनुमती असावी.

अशाप्रकारे विजेत्यालादेखील प्रत्येक वेळी स्पर्धेत भाग घेता येईल आणि एक महिन्याच्या कालावधीमुळे अजून वैविध्यपूर्ण छायाचित्रे बघावयास मिळू शकतील ..

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

धनंजचाच फोटो मलाही आवडला

धनंजचाच फोटो मलाही आवडला होता; अमुक आणि धनंजय यांची चर्चा आवडली.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

निकाल

स्पर्धेचा निकाल लागण्यास विलंब झाला, त्याबद्दल दिलगीर आहे. निकाल पुढीलप्रमाणे आहे -

मुळ 'हेतू व मांडणी' व नविन 'काळ' ह्या दोन्ही विषयाला समर्पक असे छायाचित्र धनंजय ह्यांचे आहे, त्यांनी दिलेले छायाचित्राचे विवेचन 'धीम्या उन्हात लिंबे वाळवतात आणि वसंताच्या मंद उन्हात झाडांना पालवी फुटते' काळाबद्दलचा एक परिप्रेक्ष्यच समजावते. तरीदेखिल चित्र थोडे प्रकाशमान असते किंवा मागिल सुरावटी थोड्या ब्लर असत्या तर चित्र अधिक परिणामकारक ठरले असते असे मला वाटते. धनंजय ह्याचे चित्र प्रथम क्रमांकचे ठरते.

दुसरा क्रमांक अदितीच्या 'उशीरा' लक्षात आलेल्या संत्र्याला जातो आहे, बराच काळ गेल्याने संत्र्याला लागलेली बुरशी हीच संत्र्याच काळ ठरली हे काळाचे यथार्थ चित्रणच आहे. त्याबरोबरच चित्रातील रंग व पार्श्वभुमिवर लाकडी(निदान तसा भास निर्माण करणारे) ते भांडे आकर्षकपणा वाढवत आहेत.

तिसरा क्रमांक बाबा बर्वेंच्या विश्वस्त कालमहिमेच्या छायाचित्राला जातो, अनेक उन-पावसाळ्यांचा काळ बघितलेल्या पाटिचा फोटो उत्तमच आहे.

ह्याशिवाय, अमुक, नाईल व विसुनाना ह्यांची छायाचित्रे छान आहेत, मिळालेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. पुढील पाक्षिकाचा विषय धनंजयने सुचवावा अशी मी त्यांना विनंती करतो.

.

मागे एकदा चर्चा झालेली 'पंधरा दिवसांनी नवीन आव्हान द्यावं, पण छायचित्र देण्याचा, निकालाचा कालावधी एक महीना असावा'.
अशाच अजुन काही सुचना मागवुन स्पर्धापद्धतीत बदल करावा असं वाटतय.
माझी सुचना: फक्त एका लेटेस्ट विजेत्याऐवजी सर्वाँनी (स्पर्धक/सभासद) विषय सुचवावेत. त्यातुन जास्त मागणी असलेले विषय निवडावे.
पुढच्या ७ ८ धाग्यांचे विषय एकदाच ठरवले तर चालेल का? त्यामुळे विजेतादेखील पुढच्या आव्हानात स्पर्धक होउ शकेल.

Amazing Amy

स्पर्धेचा निकाल आणि नविन विषय ..

स्पर्धेच्या निकालाची आणि नविन विषयाची वाट बघतोय ...

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

काळ येउन गेला, घोडदौड मात्र सुरूच आहे...

संपादकः छायाचित्र देतेवेळी width="" height="" या हे टॅग टाळावेत ही विनंती

नंबर विरहीत गाडी, मेलेल्या

नंबर विरहीत गाडी, मेलेल्या सांबराची कवटी.. हे सगळं मिळवलंस कुठून? (डोळा मारत)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाईल्ड वाईल्ड वेस्ट!

अमेरिकेच्या वाईल्ड वेस्टातला फोटो आहे तो. ती कवटी टेक्सन लाँगहॉर्नची आहे. (इथे पहा: http://en.wikipedia.org/wiki/Texas_Longhorn) इथे उगाच गाडीच्या पुढे आणि मागे नंबरप्लेट्स लावत नाहीत, फक्त मागे.

लाँगहॉर्न?

लाँगहॉर्न? ध्वनि मुद्रण असते तर ऐकू आला असता लांबलचक भोंगा. दर्शनी म्हणावे, तर (तुटल्यामुळे) अखूडशिंगी कवटी दिसते आहे...

टोटल फिदा!!

छानच आहे तो फोटो.

कालमहिमा ...

Camera – Nikon COOLPIX P510
f/5.9
Exposure – 1/320sec
ISO - 400

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

लेखनकाळ?

बुडालेल्या द्वारकेत सापडलेल्या खापरावरचे लेखन (लेखनकाळ ?? लिपी??)

( संग्रहालयाच्या रक्षकाच्या नकळत काढलेला फोटो. परवानगी नव्हती.) Sad

बरंय, तुमच्याबरोबर अमुक

बरंय, तुमच्याबरोबर अमुक नव्हता. नाहीतर तुमचीही शिकार झाली असती.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'खापर' फोडणे

हा वाक्प्रचार असाच प्रचलित झाला असावा (डोळा मारत)

४. अंतकाळ

जैं काळानळाचे तोंडी
घातली लोणियाची उंडी
की माशी पाख पाखडीं
तव हे सरे...

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 400
Exposure: 1/25 sec
Aperture: 4.5
Focal Length: 18.6mm
Flash Used: No
---------
टीप : चित्रे १, २ व ४ ही स्पर्धेसाठी आहेत.

३. कालबद्ध


Camera: OLYMPUS IMAGING CORP.
Model: SP600UZ
ISO: 320
Exposure: 1/8 sec
Aperture: 4.5
Focal Length: 16mm
चित्र वरून-खालून किंचित कातरले आहे.

-----------------------------------------------------------------------
<मौजमजा>
कालबद्ध - २
खालील चित्र स्पर्धेसाठी नाही.

अरेस्टेड् इन् टाईम्... कालक्षण कॅमेर्‍यात बंदिस्त करताना (..वगैरे).... शिकारी खुद शिकार हो गया (...वगैरे वगैरे (डोळा मारत) ),

<मौजमजा>

शिकारी खुद शिकार हो गया

शिकारी खुद शिकार हो गया (...वगैरे वगैरे ),

(स्माईल)

धीम्या औष्ण गतीने


छिद्रमान : एफ/४.३
अनावरण : १/३ सेकंद
आय एस ओ : २००
(ऑलिंपस ई-५०० कॅमेरा)
Gimp २.८ प्रणालीने प्रकाशछाया बदललेल्या आहेत.

जून फळाच्या आणि निबर

जून फळाच्या आणि निबर पानांच्या साक्षीने किंवा हातात हात घालून फुटलेली कोवळी पालवी .... हे जीवन-मृत्यूचे संगीत यथार्थ उतरले आहे. मला खात्री आहे की खाली दिलेल्या संगीताच्या नोटस नाही काही एक विशिष्ठ अर्थ असणार.

Adagio con calore

संगीताच्या विवक्षित धुनेपेक्षाही 'Adagio con calore' = 'Slowly with warmh' = 'उबदार मंद गतीने' याला 'काळ' विषयाच्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे. चित्राचे तेच शीर्षक असल्याने ही बाब अधोरेखित झाली आहे, असे माझे मत.

ते फळ कोणते, हा माझा प्रश्न अश्याकरिता होता, की ते फळ पिकून वाळून गेल्यासारखे दिसत असले तरी एखाद्या फळाचा नैसर्गिक पोतही तसा असू शकतो. त्यामुळे जून-वाळलेल्यातून तुम्हांला जो अर्थ कोवळ्या पालवीसोबत दिसला (जो मलाही वाटत होता/आहे), तो बदलू शकतो. कुठल्या घटकांची सांगड घालावी, यावरच कलाकृतीचा बहुतांशी अर्थ अवलंबून असतो.

बरोबर

धीम्या उन्हात लिंबे वाळवतात आणि वसंताच्या मंद उन्हात झाडांना पालवी फुटते.

प्लेयेलची ही रचना "मेडिटेशन" बहुधा फारशी प्रसिद्ध नाही.

(उबदार शब्द योग्य आहे, धन्यवाद. सुचता सुचेना म्हणून आळस करून संस्कृत शब्द ठेऊन दिला... संस्कृताशी फारकत नाही, तरी जमल्यास मराठमोळे शब्द वापरायचा प्रयत्न मी करत आहे.)

कोमट आणि उनऊन

'warm' तापमानासाठी कोमट आणि उनऊन* असेही दोन जवळचे शब्द आहेत. इथे 'उबदार' अधिक चपखल वाटतो.
--
* 'उनऊन खिचडी; त्यावर साजुक तूप, वेग्गळं व्हायचं भारीच सूख' अशी एक विसुभाऊ बापट यांची 'जगप्रसिद्ध' कविता आठवली. (स्माईल)

कुठले फळ

कुठले फळ आहे हे ?

लिंबू

वाळलेला लिंबू दिसतोय. (?)

नदी

आमच्या गावची (आता नेहमीच केंदाळ मातलेली :: मृत?) नदी.

Camera LG-P970
Focal Length 3.67 mm
Exposure 1/118
F Number -
ISO 100
Camera make LG Electronics

२. झगमगता काळ

Camera : Canon PowerShot SD1400 IS
ISO : 800
Exposure : 1/8 sec
Aperture : 5.9
Focal Length : 20mm
Flash Used : No

१. वृक्षवयाचे घड्याळ

Camera : NIKON COOLPIX L120
ISO : 400
Exposure : 1/10 sec
Aperture : 3.1
Focal Length : 5mm
Flash Used : No

खूप छान फोटो अदिती.अमुक,

खूप छान फोटो अदिती.
अमुक, रोचना यांचे प्रतिसाद (लोळून हसत)

Amazing Amy

उशीर

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

निषेध

अदिति, हा फोटो भयानक हिंदुत्ववादी आहे. फळाचा चांगला, खाण्याजोगा भाग तो मात्र भगवा, आणि बुरशी आलेला तो मात्र हिरवा, वा रे वा!! पांढरा रंग हा देखील शांतीचा नाही तर असाच किडलेला दिसतो. सर्वात निंद्य म्हणजे आपल्या संस्कृतीतल्या शांतिप्रिय, देवनामप्रिय, प्रियदर्शी अशोक राजाच्या चक्रालाच उडवून टाकले आहे, आणि त्यासमेत आधुनिक दलित चळवळीला ही. बोट लावून असा इतिहास का पुसता येतो? अशा बोटचेपी भूमिकेचा, राष्ट्रध्वजाच्या, उच्चभ्रू, हिंदुत्ववादाचा निषेध!
चांगल्या भगव्या रंगाचंच फ्ळ घ्यायचंच तर साधा हापुसांबा नाही मिळाला? रत्नागिरीचा? अशा मांडणीला किती शोभला असता!! हे संत्र (मोसंबी?) तर वॉनाबी आंबाच वाटतंय.

:ड

अमुक आणि रोचना यांच्या प्रतिसादांमुळे या संत्र्याचा (/मोसंबी?) वास सहन करण्याचं चीज झालं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चीजचा वास सहन झाला का?

निळ्या चीजचा वास सहन झाला का?

म्हणून तर

म्हणून तर अशोकचक्र गायब झालंय ना!

पण तुम्ही लोकं काहीतरी फोटो टाका. नुस्त्या गप्पा काय मारताय?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खल्लासच. आणि अमुकरावांचे सारे

(लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत)

खल्लासच.

आणि अमुकरावांचे सारे जहाँसे अच्छाही भारीच (दात काढत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मस्त!

छानच आला आहे, विषयाला वेगळेच परिमाण देणारा.

वह 'संतरी' हमारा

मस्त !

(अवांतर :
हे म्हणजे अगदी असे झाले की -
' वह 'संतरी' हमारा, वह पासबाँ हमारा,
सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ताँ हमारा '
(डोळा मारत)

वा!!

"काळ" ...... खरोखर!!!

राजकारण आणि मध्यमवर्ग

सध्या मध्यमवर्गाची टिंगल करण्याची फॅशन ऐसी अक्षरेवर आलेलीच आहे तर त्यात माझ्याकडूनही थोडी भर:

(इतर कोणाचे फोटो स्पर्धेसाठी आले नाहीत तर कृपया हा फोटोही स्पर्धेतून बाद करावा आणि मी यांनीच नवा विषय द्यावा.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हेतू गर्भित नसून जरा जास्त उघड असावा, असे आहे का?

बहुतेक प्रदर्शनीय फोटो सहेतुक असतात. हेतू गर्भित नसून जरा जास्त उघड असावा, असे या वेळचे आव्हान आहे का?

सवडीने लोकसत्तेतील लेख वाचतो.

मांडणी

>>बहुतेक प्रदर्शनीय फोटो सहेतुक असतात. हेतू गर्भित नसून जरा जास्त उघड असावा, असे या वेळचे आव्हान आहे का?<<

ही तुमची दोन्ही(,) चित्रे सहेतुक आहेत, पण पुलाच्या चित्रातील मांडणी हेतू/आशय अधिक परिणामकारकरीत्या पोहोचवते असे सहजपणे लक्षात येते, अर्थात करकोच्याच्या चित्रातील हेतू प्रेक्षकापर्यंत तेवढ्याच सहजपणे पोहचत नसल्यास हेतू नाहीच असे म्हणता येणार नाही पण मांडणीच्या परिणामकारकतेच्या दृष्टिने(आशय पोहचविण्यासाठी) पुलाचे चित्र अधिक सरस ठरते असे मला वाटते. मांडणी महत्त्वाची असल्यास ठरावीक हेतू/आशय पोहचवण्यास मुद्दाम(कृत्रिम) मांडणी करुन काही रचना करता येणं शक्य आहे का हा एक उद्देश ह्या आव्हानाचा आहे.

रोचक आहे. काही नवे देता येईल

रोचक आहे. काही नवे देता येईल का विचार करतो.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!