छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २०: उत्सव

या वेळचा स्पर्धेचा विषय आहे "उत्सव". रोजच्या जगण्यात धर्म, प्रांत, परंपरा किंवा इतिहास याप्रमाणे अनेक उत्सव माणूस साजरा करतो.. बरेचदा मला वाटतं उत्सव आपल्याला जगण्याचं बळ आणि आनंद देतात. उत्सव भारतीयच असावा असं काही बंधन नाही. उत्सव तुमच्या दृष्टिकोनातून कसा दिसला हे महत्त्वाचं. त्यातला उल्हास, वेगळेपण, रचना, रंग, उत्फुल्ल आनंद चौकटीत पकडण्याचा प्रयत्न करणारी छायाचित्रं आवडतील..
अनेक प्रांतातले / देशातले उत्सव बघायला आवडतील आणि ते धार्मिकच असावे असं काही नाही..थोडा अधिक पर्याय देऊ शकणारा विषय मांडावा असं वाटलं..
स्पर्धेत भाग तर घ्याच पण स्पर्धेपलिकडे सहज म्हणून दिलेली इतर छायाचित्रे, कल्पना, रचना आणि तांत्रिकतेचा विचार जास्त पुढे नेऊ शकतात..
उत्सव म्हणून नेहमीच्या कल्पनेपलिकडे विचार करून काही स्वतः संवाद साधू शकणारे छायाचित्रही उत्तमच असेल.

अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या फोटो एडिटरमधून कॉंट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन वाढवलं, तापमान बदललं तर चित्र खुलून दिसतील. तसंच योग्य प्रमाणात कातरल्याने (क्रॉप केल्याने) मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते.
तसा प्रयत्न जरूर करावा. उत्सवी फोटो हे अनेकदा जनरल मोकळ्या पद्धतीने घेतलेले असतात .. त्यातल्या विवक्षित गोष्टि कातरून केंद्रित केल्याने वेगळा परिणाम साधता येईल..

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:

१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.

२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.

३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)

४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट २२ एप्रिल रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. २३ एप्रिलला निकाल घोषित होईल व विजेता पुढील विषय देईल.

५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.

६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.

७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.

८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.

९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.

१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.

सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.

चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.

मागचा धागा: विषय स्वयंपाकघर, आणि विजेते छायाचित्र

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कॅमेरा: कॅनन T3, एक्सपोजर: 1/500, छिद्रः f/5.6, Focal Length: 53 mm, ISO400
गिंप वापरून फोटो कातरला आणि कृष्णधवल केला आहे.

(आमच्या शहरात म्हणे उत्तर अमेरिकेतली, वटवाघळांची सर्वात मोठी शहरी वस्ती आहे. झालं; आणखी एक निमित्त दंगा करायला. हा फोटो बॅटफेस्टच्या वेळेस काढला आहे.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सहीये!! आमच्या माणसांना भेटायला आलं पाहिजे तिथं एकदा.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.


ऑक्टोबरफेस्टमधे सॉसेजोत्सवाची जाहिरात

कॅमेरा: कॅनन T3, एक्सपोजर: 1/100, छिद्रः f/5.6, Focal Length: 53 mm, ISO: 200
गिंप वापरून फोटो कातरला आणि कॉण्ट्रास्ट बदलला आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Camera SONY
Model DSC-W70
ISO 125
Exposure 1/8 sec
Aperture 4.0
Focal Length 11mm

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धुळवडीचे फोटो बघायला मिळतील अशी अपेक्षा होती. अजून एक आठवडा आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खालील चित्रे स्पर्धेसाठी नाहीत.

वॉशिङ्टन् डी.सी. मध्ये दरवर्षी मार्च अखेर-एप्रिल सुरुवातीस 'नॅशनल् चेरी ब्लॉसम् फेस्टिवल्' असतो. हा महोत्सव म्हणजे शिशिर ऋतू सम्पून वसन्तऋतूची सुरुवात होण्याचे एक द्योतक आहे. साधारण १०० वर्षाम्पूर्वी जपानने डी.सी. ला हजारेक चेरीची झाडे भेट म्हणून दिली. त्यातली बहुतेक सर्व 'टाय्डल् बेसिन्' या भागात तलावाभोवताली लावण्यात आली. 'तेरड्याचा रङ्ग तीन दिवस' म्हणीप्रमाणे अक्षरशः तीन ते चार दिवसात सगळी निष्पर्ण झाडे केवळ फुलान्नी बहरून जातात. तो भर ओसरला की फुले गळून जाऊन हिरवी पाने दिसू लागतात आणि मग फळे येण्यास सुरूवात होते. या फुलाञ्च्या बहराचा समन्वय साधून 'जपानी चेरी ब्लॉसम् महोत्सव' साजरा केला जातो. देशभरातील लोक हा फुलोत्सव साजरा करायला येतात.
१.

२.

३.

------

त्या झाडाम्पैकीच काही झाडे फारश्या प्रसिद्ध नसलेल्या 'केनवूड्' या 'बेथेस्डा' भागात लावली गेलीत. इथले सौन्दर्य वेगळे आहे. छोटी घरे आणि छोटे रस्ते असलेल्या या भागात रस्त्याच्या दुतर्फा ही झाडे लावली आहेत. बहर आला की सारे रस्ते या चेरीफुलाञ्च्या घुमटाकार आच्छादनाखाली जातात.
एकदा तरी याचि डोळां पाहण्याजोगा असा हा पुष्पसोहळा.

१.

२.

३.

४.

हे एकदम 'बहारों फूल बरसाओ' झालंय. एवढ्या प्रमाणात चेरी ब्लॉसम बघितला नव्हता.

पुण्यात रहाणार्‍या लोकांना असं दृष्य ब्रेमन सर्कलपासून परिहार चौकात जाणार्‍या रस्त्यावर अशा प्रकारचा उत्सव दिसू शकतो. साधारण याच दिवसात. ही झाडं चेरीची निश्चितच नाहीत, पण कसली ते मला माहित नाही. या फुलांना मंदसा, गोडुस वास असतो. हा बहर चेरीपेक्षा जास्त दिवसा टिकतो.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ब्रेमन चौकात जाणं होत नाही पण पण एकूणच सध्या बहावा, जॅकरान्डा (दोन्ही प्रकारचे जॅकरान्डा: पिवळे आणि लव्हेंडर कलरचे) यांना बहर सर्वत्र दिसतो. (विकी वरची चित्र परदेशी आहेत फक्त रंगांचा अंदाज यावा म्हणून दुवे. .बारतीय फुले बर्‍यापैकी वेगळी दिसतात)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तो नीलमोहर फार सुंदर दिसतो. ब्रेमन चौक मधे आणि तिथुन विद्यापीठ कडे तसेच खडकीकडे जाणार्या रस्त्यावर २ ३ झाडं आहेत. इतर कुठे पाहीला नाही.

===
Amazing Amy (◣_◢)

198836_1728386884112_3565283_n

स्वगतः फोटो थोडा कातरायला हवा होता पण सध्या शक्य नाही..

काल-परवाच्या विकेण्डला झालेला कला-उत्सव

संपादकः height="" टाळावे ही विनंती

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अजून वैविध्यपूर्ण प्रतिसाद यावेत म्हणून अंतिम तारीख वाढवत आहोत..
स्पर्धेचा शेवट २२ एप्रिल रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. २३ एप्रिलला निकाल घोषित होईल व विजेता पुढील विषय देईल.

१. गणपती २०१२ - Nikon d50, 10-20mm

२. हॉलंडच्या राणीचा उत्सव - Nikon d50, 28-80mm

३. गणपती २०१२ - Nikon d50, 55-200mm

४. स्केटींग उत्सव - Nikon d50, 28-80mm

५. रस्त्यावरचे संगीत -Nikon d50, 28-80mm

६.आकाशातील उत्सव -Nikon d50, 28-80mm

७. रंगोत्सव Nikon d50, 28-80mm

अपेक्षेपेक्षा बरेच कमी आले. खूप व्यापक खुला असा विषय ठेवण्याचा प्रयत्न होता. उत्सव ही संकल्पना म्हणून काय वाटते हे फोटोतून मांडावं अशी अपेक्षा होती.. नेहमीच्याच सण उत्सवात तो विचार पकडता येऊ शकतोच.. त्याही पलिकडे जाता आलं तर अजून उत्तम.. आलेले बहुतेक फोटो आवडले.
सुरुवातीला अदितीचा बॅट फेस्टिवल सारखा एकदम मस्त विषय आला.. अमुक यांनी फोटो स्पर्धेसाठी नाहीत असे मांडल्याने त्या अप्रतिम फुलांना वाव देता आला नाही पण 'केनवूड' च्या फोटोंमधला क्र. २ चा फोटो त्या पूर्ण संचात अधिक आवडला..
आकाशातील उत्सव ही संकल्पना सर्वाधिक वेगळी वाटली.. आणि रस्त्यावरच्या संगीतातला उत्सव हा विचार.. पण यात थोडा विस्कळीतपणा होता.. संगीत हा फोटो थोडा कातरून जास्त नेमका करता आला असता आणि आकाशातील उत्सव यात थोडा भाग कापला गेला आहे आणि फोटो किंचित अस्पष्ट आहे.
अदितीचा कला उत्सव ही संकल्पना छान वाटली पण ती तितकीशी त्या फोटोत उतरली (रिफ्लेक्ट झाली) नाही..

रुचीचा फोटो मला चांगला वाटला आहे. त्याला नक्कीच तिसरा क्रमांक मिळावा.. फेस्टिवलचा फील आणि त्या चर्चचा भाग छान पकडला आहे.
त्याच जोडीला तिसरा क्रमांक बॅट फेस्टिवलला मिळाला आहे. वटवाघळांचा उत्सव मुद्दाम काळ्या पांढर्‍या रंगात पकडण्याची कल्पना छान आहे .. बोके नीट आहे.

रस्त्यावरचे संगीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. काळ्या पांढर्‍या छटा आणि तो उत्फुल्ल पणे गातानाचा क्षण मस्तच आहे.
पण तो नक्कीच कातरायला हवा होता. त्यातला डावीकडचा भाग बराच डिस्ट्रॅक्ट करणारा आहे.

पहिला क्रमांक आहे गणपती २०१२ या ताशाला. तांत्रिकदृष्ट्या चांगला जमला आहे. योग्य कातरला आहे. फक्त ताशावर असलेला फोकस, रंग, वाद्य, कपडे .. उत्सवाच्या उधाणाची थेट जाणीव करून देणारा असा वाटला..
पुढचा विषय मी यांनी द्यावा..

'मी' यान्ना एक विनन्ती. (स्पर्धेचे नियम तुम्ही वाचले आहेत असे गृहित धरून.)
यापूर्वी 'सन्ध्याकाळ' या विषयासाठी तुम्ही १० चित्रे दिली होतीत. सर्वच उल्लेखनीय आणि तान्त्रिक चर्चा घडवून आणणारी होती. त्यावेळी स्पर्धा निकोप व्हावी म्हणून त्यातली तुमची ३ चित्रे कोणती हे स्पष्ट करावे अशी विनन्ती मी तुम्हांला केली होती. त्या वेळी उत्तर मिळाले नव्हते. तुम्ही व्यक्तिगत निरोपात तसे परीक्षक व्यक्तीस कळविले असेल तर माहीत नाही. या खेपेसही तुम्ही त्याचप्रकारे ७ चित्रे दिलीत. तुमचे छायाचित्रण कसब वाखाणण्याजोगे आहेच आणि त्यामुळेच एक छायाचित्रकार म्हणून तुमच्या चित्राम्पैकी तुम्हांला कुठली चाङ्गली वाटतात हे कळले तर त्यामागची वैयक्तिक/तान्त्रिक कारणे बरेचदा नवे काही दाखवून जातात, विचार करायला भाग पाडतात, असा अनुभव आहे.
माझ्यापुरते म्हणायचे तर हा धागा एक स्पर्धा नसून काही नवे पाहायला, शिकायला मिळणे, किमान नेत्रसौख्य लाभणे, आपल्याकडे असलेल्या चित्राञ्चा इतरान्ना लाभ करून द्यावासा वाटणे, छायाचित्रण कौशल्य वाढविणे या गोष्टीञ्ची जोपासना करणारा आहे. या धाग्याचे नियम बनविण्यामागे अनेक व्यक्तीन्नी आपला वेळ देऊन ती अधिकाधिक रोचक आणि निकोप कशी करावी याकरिता वेळ दिलेला आहे. त्याला अनुसरून, तुमच्या अनेक चित्रान्तली कुठली तुम्हाला द्यावीशी वाटतात हे कळले तर तुमच्या लौकिकास अधिक साजेसे होईल. धन्यवाद.

(ता. क. मलाही तुमचे विजेते चित्र अतिशय आवडले. मी तेच निवडले असते.)

अमुकशी संपूर्ण सहमत आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चित्रांच्या कौतुकाबद्दल अनेक धन्यवाद अमुक.

तुम्ही मागे देखील मला विनंती केली होती त्याप्रमाणे व नियमांप्रमाणे मी माझ्या चित्रांपैकी ३ चित्रे न निवडल्याबद्दल दिलगीर आहे. खरं सांगायचं तर मला माझं कोणतचं चित्र आवडलेलं नाही*, पण निदान स्पर्धेचे नियम किंवा संकेत पाळण्यादाखल मी चित्रांची निवड करणे गरजेचे होते, ह्यापुढे मी नक्कीच त्याबाबत खबरदारी बाळगेन.

ह्या वेळेस दिलेल्या चित्रांपैकी पहिली ३ चित्रे स्पर्धेसाठी होती असे निदान आत्ता मी सांगतो.

* चित्रे आवडली नाहीत, कारण त्या चित्रांमधे मला सर्जनशीलतेचा अभाव जाणवतो.

इथे नास्तिक लोक फार आहेत, ते मुळात उत्सवच साजरे करत नाहीत, केले तर फक्त ऑक्टोबरफेस्ट वगैरे, ते कसले फोटो टाकणारेत उत्सवाचे! जाऊंद्या, वाईट नका वाटून घेऊ. Wink

+१ नका वैट वाटून घिउ
त्यापेक्षा तुम्हाला अपेक्षित अशी चित्रे टाका.. आम्हाला बघाया मिळातील

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिसादातला विनोद आणि उपहास बाजूला ठेवून -
उत्सव म्हणजे काही तरी देवाधर्माचंच असलं पाहिजे असं मुळीच बंधन नाही. म्हणूनच ते रस्त्यावरचं संगीत किंवा आकाशातला उत्सव आवडलं होतं आणि बॅटफेस्टही.. असेच वेगवेगळे फोटो येतील असं वाटलं होतं..

वाईट वाटून घेण्याचं काही नाही.. निकाल जाहीर केल्यावर जेवढे प्रतिसाद आले तेवढे प्रत्यक्ष स्पर्धेला किंवा चर्चा म्हणूनही नाही आले..
मी फक्त एक निरीक्षण नोंदवलं .. बाकी चालू द्या Wink