छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २४: प्रकाश

फोटोग्राफीला "छायाचित्रण" म्हणावे का "प्रकाशचित्रण" याबद्दल अनेकदा संवाद वाचतो. खरंतर, माणसाचे डोळे विविध आकार त्यावर पडणार्‍या प्रकाशापेक्षा, सावल्यांमुळे अधिक ओळखतो. वेगळा पोत, वेगळे रंग, वेगळी दृश्यमानता हे सारे प्रकाशाचेच खेळ!
छायाचित्रण करताना मला सर्वात आव्हानात्मक काय वाटते ते आपल्या चित्रात प्रकाशाला नियंत्रित करणे. त्यातही प्रकाशालाच चित्रीत करायचे असेल - तो प्रकाश हाच चित्राचा विषय करायचा असेल - तर अधिक सृजनात्मक विचार करावा लागेल असे वाटते.

याच विचारातून या वेळच्या आव्हानाचा विषय आहे "प्रकाश".

चला तर मग! ऐसीवर थोडा अधिक "प्रकाश" पाडुयात! Wink

-----

अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या फोटो एडिटरमधून कॉंट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन वाढवलं, तापमान बदललं तर चित्र खुलून दिसतील. तसंच योग्य प्रमाणात कातरल्याने (क्रॉप केल्याने) मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते.
तसा प्रयत्न जरूर करावा. काही चित्रे अनेकदा जनरल मोकळ्या पद्धतीने घेतलेली असतात .. त्यातल्या विवक्षित गोष्टि कातरून केंद्रित केल्याने वेगळा परिणाम साधता येईल..

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:

१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही. कृपया छायाचित्रे देताना Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत.

२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.

३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)

४. आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट २३ ऑगस्ट रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. २४ ऑगस्ट रोजी निकाल घोषित होईल व विजेता पुढील विषय देईल.

५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.

६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे (म्हणजे या धाग्याच्या लेखकाचे) असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.

७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.

८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.

९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.

१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.

सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत.यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.

मागचा धागा: विषय "एकाकी", आणि विजेते छायाचित्र "एकाकी-१"

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

>>>४. आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट २२ ऑगस्ट रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. २३ जुलै रोजी निकाल घोषित होईल व विजेता पुढील विषय देईल.

दिनांका मधे काही घोळ आहे का?

होय. ते सुधारून २३ ऑगस्ट केलंय.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चांगला विषय आहे .. थोडा विचार करुन प्रकाश पाडतो ..

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

१. Hagia Sophia (ग्रीकमधला अर्थ - पवित्र ज्ञान)

Day2_Istanbul 107


संपादकांकडून टीप : तुमचा दुवा फ्लिकरचा आहे. फ्लिकरमध्ये फोटो उघडा आणि शेअर करण्याच्या इतर पर्यायात एम्बेडेड कोड (HTML/BBCode) कॉपी करून इथे पेस्ट करा. जमत नसेल तर इथे फ्लिकरच्या फोटोचा http://www.flickr.com/photos/तुमचेखाते/फोटोक्रमांक/ पद्धतीचा दुवा द्या. संपादक त्याची योग्य पडताळणी करतील.

सुहास

झाले गेले गंगेला मिळाले,
आता उदय नव्या रामाचा.
नमो नमो

सदर चित्र दिसत नाहिये. चित्राचा दुवा वैयक्तिक डेस्कटॉपवर घेऊन जातो असे दिसते. त्याऐवजी सदर चित्र एखाद्या संकेतस्थआळवर चढवून त्याचा पत्ता द्यावा. अधिक मदत या धाग्यावर मिळेल

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला दिस्तंय की! शिवाजीमहाराजांचे चित्र आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

श्री सुहासवदन यांनी आता दुव्यात बदल केला आहे. आता मलाही चित्र दिसत आहे.
आभार!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला नै दिसतय अजुनही...

===
Amazing Amy (◣_◢)

'एक्स् पी' मध्ये फायरफॉक्स् आणि गूगल् क्रोम् या दोनही संस्थळवाहकांत वरील चित्र दिसत नाही आहे, याची नोंद घेणे.

कुबुंटूमधे फाफॉ, क्रोम आणि अँड्रॉईड ४.२ च्या डीफॉल्ट ब्राऊजरवरही चित्र दिसत नाहीये.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विन्डोज ७ - क्रोम/फाफॉ/आय.ई.९. सारे ब्लॅन्क.

सफारी-आयओएस६ .

-उजेड माझा वेगळा

' एक सूर्य सर्वां
प्रकाशास देतो
उद्योगा लावितो
प्राणिमात्रां '
हे ज्योतिबांचे शब्द अशा तर्‍हेने खरे होतील असे वाटले नव्हते Smile

तळपते ढग.
(सुन् यात् सेन् उपवनामध्ये, व्हॅनकूव्हर,मध्ये,)

कॅमेरा : Olympus
उघडीप : १/१६००
छिद्र : f/४.६
केंद्रण : ६.३ मिमि
ISO Speed ६४

चित्र २ : वाहाते कवडसे

कॅमेरा : Olympus
उघडीप : १/४००
छिद्र : f/३.५
केंद्रण : ४.४ मिमि
ISO Speed ६४

चित्र ३ : पर्णराईतून डोकावता सूर्य

कॅमेरा : Olympus
उघडीप : १/८०
छिद्र : f/३.५
केंद्रण : ७.४ मिमि
ISO Speed ६४

संधिप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी..

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 400
Exposure: 1/40 sec
Aperture: 3.2
Focal Length: 5.1mm
Flash Used: No

Camera: NIKON COOLPIX L120
Flash Used: No
बाकी तपशील उपलब्ध नाही.

Camera: Canon PowerShot S2 IS
ISO: उपलब्ध नाही
Exposure: 1/8 sec
Aperture: 3.2
Focal Length: 8.3mm
Flash Used: No

चित्र स्पर्धेसाठी नाही.

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 80
Exposure: 1/800 sec
Aperture: 3.3
Focal Length: 6.2mm
Flash Used: No

चित्र स्पर्धेसाठी नाही.

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 320
Exposure: 1/30 sec
Aperture: 3.8
Focal Length: 10.2mm
Flash Used: No

चित्र स्पर्धेसाठी नाही.

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 80
Exposure: 1/400 sec
Aperture: 8.7
Focal Length: 4.5mm
Flash Used: No

सर्व फोटो स्पर्धेसाठीच आहेत
सर्व फोटोंसाठी = कॅमेरा निकॉन डी९० आणि लेन्स निकॉन १८-५५
१)

२)

३)

तिसरा फटू विशेष आवडला.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

भेदिले सूर्यमंडळा

Camera- Canon Powershot SX120 IS

१) सूर्योदय

२)पारिजात

छायाचित्रे स्पर्धेसाठी नाहीत.
१.प्रकाश२. ब्याकार्डी?३.नाम४.स्ट्रीट लाईट

एग्झिफ विदा -
Camera – SONY DSC-HX1
Exposure – 1/2000s
Aperture – F4.5
ISO – 200

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

कार्यबाहुल्यामुळे या स्पर्धेच्या अंतिम तारखेचा विसर पडला.

Sad

राधिका

काळजी नको. अजून एक दिवस अ‍ॅडवतो आहे Smile
आज (शुक्रवार) रात्रीपर्यंत छायाचित्रे देऊ शकता. उद्या / परवा (शनि / रवि) जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निकाल देतो.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कॅमेरा - Sony – DSC-HX1

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

मुदत वाढवल्याबद्दल धन्यवाद.
माझी छायाचित्रे-

१.

Camera Canon PowerShot SD850 IS
ISO 200
Exposure 1/320 sec
Aperture 2.8
Focal Length 6mm
Flash Used false

२.

Camera Canon PowerShot SD850 IS
ISO 200
Exposure 1/1600 sec
Aperture 8.0
Focal Length 6mm
Flash Used false

३.

Camera Canon PowerShot SD850 IS
ISO 200
Exposure 1/250 sec
Aperture 8.0
Focal Length 6mm
Flash Used false

राधिका

राधिका

अल्प मतीप्रमाणे प्रयत्न करतो आहे.

fighting alone
प्रकाश
taken with Sony NEX-5N with manual focus Nikon 105mm F2.5 Lens (this is 50 years old lens still working fine)
F:5.6, S:1/125 ISO: 100

Shadows
सावल्या
taken with Sony NEX-5N with manual focus Nikon 105mm F2.5 Lens
F:5.6, S:1/125 ISO: 1000

हे छायाचित्र पट्ट्दकल (Pattadakal) येथील एका मंदिरात काढलेले आहे. मंदिराच्या एका अंधार्‍या कोपर्‍यात मौनेश बडिगर हा एक कला विद्यार्थी शांतपणे मंदिरातील शिल्पांचे रेखाटन करत होता. साधा कागद, साधा जेल-पेन वापरुन हा गडि मस्त चित्रे काढत होता. त्या अंधार्‍या कोपर्‍यात जणु त्याच्या प्रतिभेचा प्रकाश पडला होता!Camera Body: Canon EOS 5D Mark II
Lens: Canon EF 70-200mm f/4L IS USM

प्रतिभेचा प्रकाश!

साळगाव, गोवा येथील रस्त्यावर चालणारी वाहने आणी त्यांचा वाहता प्रकाश!


Camera Body: Canon EOS 5D Mark II
Lens: Canon EF 24-105mm f/4L ISNight Traffic @ Saligaon Main Road

abu simbel6 lr

निकॉन डी ६०/ निकॉर १८-५५

उल्लेखनीयः धनंजय यांचे "पर्णराईतून डोकावता सूर्य" आणि राधिका यांनी काढलेला दुसरा फोटो. विषयाला अगदी धरून आणि तांत्रिकदृष्ट्या सफाईदार!

तृतीय क्रमांकः नंदन यांचे 'लाईट इन ऑगस्ट' आणि जयपाल यांनी दिलेला तिसरा फोटो.
अमुक यांचा दुसरा फोटो नंदच्या फोटोच्याच वळणाचा (जॉनरचा), किंबहुना तांत्रिक दृष्ट्या अधिक सरस, पण का ते नक्की सांगता येणार नाही पण नंदनने टाकलेला फोटो अधिक आवडला. जयपाल यांनी दिलेला तिसरा फोटो अतिशय क्ल्पक वाटला. मात्री 'भेदिले शुन्य मंडळा' या धर्तीचा तो फोटो मला अपेक्षित असलेल्या 'प्रकाश' या विषयापासून किंचित दुरावलेला वाटला.

द्वितीय क्रमांकः केतकी आकडे यांचा पारिजातकाचा (दुसरा फोटो)
इतकं प्रकाशात न्हाऊन निघालेलं टवटवीत पारिजातक बघूनच दिन बन गया. सकाळी उठून, छान कोवळं उन खात बसलेलं ते फूल. केवळ प्रकाश नाही तर प्रकाशाची उष्णताही जाणवून देणारं ते छायाचित्र आवडून गेलं.

प्रथम क्रमांक अमुक यांचा "लाइट् अ‍ॅट् दि एन्ड ऑफ् द टनेल".
याचे कारण चित्र उत्तम वाटले, अतिशय चांगले घेतले आहे आवडले वगैरे कारणे आहेतच. पण माझ्यापुरते प्रकाश म्हटले की 'माधव आचवल' यांचा 'किमया' पुढील परिच्छेद नेहमी आठवतो:
"खंडाळ्याच्या घाटांतल्या बोगद्यांत गाडी शिरली की डब्यांत एकदम पुष्कळ गोष्टी घडू लागतात. पुस्तकांत बोटें घालून ती मिटली जातात. संभाषणे मध्येच कापली जातात. पान चोळणार्‍या मंडळींना पान तसेच हातांत धरून बसावे लागते. बराच वेळ, एखाद्या दिशेने पाहण्याकरिता टपून बसलेली तरूण पोरें चटकन् तिकडे बघून घेतात. कांही हात हातांत घेतले जातात - काही डोळे वटारले जातात. आईच्या पदराखाली दूध पिणारी मुले पदराआडून डोके काढीत बाहेर बघूं लागतात. त्या अंधार्‍या डब्यांतल्या वातावरणांतच एक तर्‍हेचा ताण निर्माण होतो. डब्याच्या दारांत तोंड बाहेर काढून उभीं असलेली माणसे माना लांबवून पुढे पाहू लागतात. थोड्यावेळा बोगद्याच्या कडा दिसूं लागतात, आणि गादीची रेषा त्यापासून निराळी पडते. मधली प्रकाशाची फट जास्त उजळत जाते, मोठी होते आणि गाडी बोगद्याबाहेर पडते. घाटांतल्या त्या खालच्या दरीवर ऊन पसरलेलें असतें. खेळांत मांडून ठेवल्यासारखीं खालचीं घरें, रस्ते आणि शेतें दिसतात आणि या सर्वांवर पसरून राहिलेला प्रकाश अगदी निराळा वाटतो. प्रकाश जणू कांही पहिल्यांदाच जाणवल्यासार्खी डब्यातली मंडळी बाहेर बघू लागतात. चार-दोन क्षण तीच जाणीव स्तब्धपणे डबा व्यापून टाकते... मग हा परिणाम हळूहळू ओसरतो. पुस्तके पुस्तके पुन्हा उघडलीं जातात, पानाची घटी होऊन तोंडांत जाते, आणि डबा पुन्हा रुळावर येतो."
आणि हे चित्रपाहिल्यावरही हेच लेखन आठवले आणि चित्र इतरांपेक्षा काकणभर अधिकच आवडले इतकेच Smile

श्री.अमुक यांचे अभिनंदन! पुढील विषय द्यावा ही विनंती Smile

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. ऋषिकेश, तुम्ही दिलेला परिच्छेद किती सुंदर आहे! 'किमया' वाचलेले नाही, वाचायलाच हवे.

चित्र इतरांपेक्षा काकणभर अधिकच आवडले.

............ अहो अहो जरा जपून ! आजकाल 'बांगड्या' शब्दांच्या वापराने काय गदारोळ माजला आहे पाहताय ना ?
मग दूरान्वयेही असे काही सुचवू नका बरे ! सन्जोपरावांच्या विशेषणांना च्यालेंज देणारा अवतार धारण करतील हो विक्षिप्तबै.. Wink

----

धन्यवाद ऋषिकेश.
परिच्छेद आवडला. आचवल असे विलक्षण क्षण शब्दांत पकडण्याचे किमयागारच होते.
नवा विषय लवकरच देतो.

धन्यवाद!!! माझा स्वतःचाच मी काढलेला सगळ्यात आवडता फोटो आहे हा Smile

माझा स्वतःचाच मी काढलेला सगळ्यात आवडता फोटो आहे हा

हे आपले(च) आपण काढलेले छायाचित्र आहे?

नाही म्हणजे, पारिजातकाची ब्याकग्राउण्ड सुंदर आहे, परंतु सेल्फ-टायमरच्या सेटिंगमध्ये काही घोळ झाला काय? म्हणजे, सेल्फ-टायमर लावला, परंतु त्यानंतर त्या 'फ्रेम'मध्ये जाऊन उभे राहण्याअगोदरच क्यामेरा क्लिक झाला, असे काही?

कारण त्या छायाचित्रात मला मनुष्याकृती कोठेच आढळत नाहीये. (म्हणजे, (१) आपण मनुष्य आहात, आणि (२) 'केवळ पुण्यवानांनाच आपली आकृती दिसू शकते' अशी कोणतीही पूर्वअट नाही, असे गृहीत धरून.)

- (पापी) 'न'वी बाजू.

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

(पापी) 'न'वी बाजू.

- सहमत आहे, कसंकाय सुचतं हो तुम्हाला! Smile

प्रतिसाद संपादित करू शकतो का?

- (पापी) 'न'वी बाजू.

पन इन्टेन्डेड? आपल्या प्रतिसादात 'न'वी बाजू असावी असे गृहीत धरून.

-तुमच्याच बाजूचा

एकच योगी
बाकी सारे भोगी