Skip to main content

हत्तीखाना

(आता तिथे खरडफळा निघालेलाच आहे, म्हटल्यावर, Separate But Equal तत्त्वास अनुसरून…)

मारवा Sat, 01/11/2025 - 09:34

तर मग प्रत्येक सभासद एक बेट बनून जाणार नाही का ?
मग परस्पर संवाद कसा होणार ?
म्हणजे वन टू वन च संवाद होईल सामाजिक संवाद एकसाथ कसा होणार ?
आणि हे थोडं अस्पृश्यते सारखं नाही का होणार ?
की बाबा आमच्या पंगतीला बसू नकोस.

anant_yaatree Sat, 01/11/2025 - 11:08

असे इथे नसेल ना?
"टवाळखाना" असे नाव धाग्याला द्यायला हवे होते असे राहून राहून वाटते.

अवडंबरशास्त्री हत्ती Sat, 01/11/2025 - 18:27

धन्यवाद न. बा

मी एक हलकल्लोळसिंग हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

अवडंबरशास्त्री हत्ती Sun, 02/11/2025 - 20:12

आज वार्ताहरांविरुद्ध गुन्हे माफ न करण्याचा दिवस आहे. त्यानिमित्त सर्व ऐसीकरांना, विशेषतः वार्ताहरांविरुद्ध गुन्हे माफ न करण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा.

या निमित्ताने वार्ताहरांविरुद्ध गुन्हे माफ न करण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ऐसीकरांनी त्यांच्या क्षेत्राविषयी माहिती करून देणारा एखादा लेख लिहिल्यास ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने तो लेख हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही.

अवडंबरशास्त्री हत्ती Mon, 03/11/2025 - 18:16

नाट्यकर्मी, 'पृथ्वी थिएटर'चे संस्थापक व अभिनेते-दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर (१९०६),  संगीतकार लक्ष्मीकांत (१९३७), अभिनेता सदाशिव अमरापूरकर (२०१४)

 

विनम्र अभिवादन

अवडंबरशास्त्री हत्ती Mon, 03/11/2025 - 18:19

स्वातंत्र्यदिन : पनामा, डॉमिनिका, मायक्रोनेशिया.

स्वातंत्र्यदिनानिमित्त पनामा, डॉमिनिका आणि मायक्रोनेशियाच्या लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी त्या देशांचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने तो लेख म्हणजे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का याचाही त्या लेखात अंतर्भाव करावा अशी आग्रहाची विनंती.

अवडंबरशास्त्री हत्ती Tue, 04/11/2025 - 19:16

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : टोंगा 

राष्ट्रीय दिन/स्वातंत्र्यदिनानिमित्त टोंगाच्या लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी त्या देशांचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने तो लेख म्हणजे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का याचाही त्या लेखात अंतर्भाव करावा अशी आग्रहाची विनंती.

 

 

अवडंबरशास्त्री हत्ती Tue, 04/11/2025 - 21:36

क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (१८४५),
संगीतकार जयकिशन (१९३२),
कोशकर्ते व इतिहासकार स. मा. गर्गे (२००५)

विनम्र अभिवादन

अवडंबरशास्त्री हत्ती Wed, 05/11/2025 - 21:52

मी एक हलकल्लोळसिंग हत्ती. प्रचंड मोठा, महाकाय, कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

अवडंबरशास्त्री हत्ती Mon, 10/11/2025 - 09:20

ख्रिस्ती धर्मसुधारक मार्टिन ल्यूथर (१४८३),स्वातंत्र्यचळवळीतील नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी (१८४८), 

 

विनम्र अभिवादन

 

अवडंबरशास्त्री हत्ती Mon, 10/11/2025 - 09:22

शांततेसाठी आणि प्रगतीसाठी विज्ञान दिन. 

आज शांततेसाठी आणि प्रगतीसाठी विज्ञान दिन आहे. त्यानिमित्त सर्व ऐसीकरांना, विशेषतः शांततेसाठी आणि प्रगतीसाठी विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा.

या निमित्ताने शांततेसाठी आणि प्रगतीसाठी विज्ञानक्षेत्रात काम करणाऱ्या ऐसीकरांनी त्यांच्या क्षेत्राविषयी माहिती करून देणारा एखादा लेख लिहिल्यास ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने तो लेख हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही.

अवडंबरशास्त्री हत्ती Mon, 10/11/2025 - 09:24

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : तुर्कस्तान. 
 

राष्ट्रीय दिन/स्वातंत्र्यदिनानिमित्त तुर्कस्तानच्या लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी त्या देशांचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने तो लेख म्हणजे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का याचाही त्या लेखात अंतर्भाव करावा अशी आग्रहाची विनंती.

अवडंबरशास्त्री हत्ती Tue, 11/11/2025 - 15:23

मी एक हलकल्लोळसिंग हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

अवडंबरशास्त्री हत्ती Tue, 11/11/2025 - 16:00

हरियाणातील हिस्सारच्या हरचरणसिंग हुडाच्या हलकल्लोळसिंग हत्तीने हेक्टरभर हिरवे हरभरे हादडल्याने हसतमुख हरचरणसिंग हुडाही हादरला.

अवडंबरशास्त्री हत्ती Wed, 17/12/2025 - 09:40

In reply to by अवडंबरशास्त्री हत्ती

हरियाणातील हिस्सारचा हरचरणसिंग हुडा त्याच्या हलकल्लोळसिंग हत्तीबरोबर

 

अवडंबरशास्त्री हत्ती Wed, 12/11/2025 - 09:41

क्रांतिकारी सेनापती बापट (१८८०), 
पक्षीतज्ज्ञ सलीम अली (१८९६),
लेखक, सामाजिक कार्यकर्ते व समाजवादी नेते एस्. एम्. जोशी (१९०४),
बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक शिक्षणतज्ज्ञ पं. मदन मोहन मालवीय (१९४६),
सत्यशोधक पत्रकार व कार्यकर्ते केशवराव जेधे (१९५९),
समाजवादी नेते व संसदपटू मधू दंडवते (२००५)

विनम्र अभिवादन

 

अवडंबरशास्त्री हत्ती Wed, 12/11/2025 - 09:44

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : अझरबैजान

राष्ट्रीय दिन/स्वातंत्र्यदिनानिमित्त अझरबैजानच्या लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी त्या देशांचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने तो लेख म्हणजे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का याचाही त्या लेखात अंतर्भाव करावा अशी आग्रहाची विनंती.

 

अवडंबरशास्त्री हत्ती Wed, 12/11/2025 - 11:13

आज कोणताही विशेष दिन नसल्याने कोणत्याही क्षेत्रात, विशेषतः त्या क्षेत्रात कामाला असलेल्या ऐसीकरांना शुभेच्छा नाहीत. कोणत्याही क्षेत्रात कामाला असलेल्या ऐसीकरांना त्यांच्या क्षेत्राची ओळख करून देण्यासाठी लेख लिहायची विनंती नाही. मुळात लेखच लिहिला नाही तर मग तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करायचा प्रश्नच नाही.

अवडंबरशास्त्री हत्ती Wed, 12/11/2025 - 11:14

मी एक सच्चिदानंद हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

अवडंबरशास्त्री हत्ती Wed, 12/11/2025 - 11:24

मुंबईच्या मनोज मधुकर मिराशी, मलकापूरच्या माजोरड्या मारकुट्या मिशिवाल्या मनोहर मधुसुदन मोरे मधील मतभेदांमुळे मारामारी मिरजच्या महापौरांच्या मध्यस्थीमुळे मिटल्यानंतर महिन्याभराने मित्रमंडळींनी मिठाई मांडून मंगल मिलनाचा महोत्सव मानला.

अवडंबरशास्त्री हत्ती Wed, 12/11/2025 - 20:52

In reply to by अवडंबरशास्त्री हत्ती

मुंबईच्या मनोज मधुकर मिराशी, मलकापूरच्या माजोरड्या मिशिवाल्या मनोहर मधुसुदन मोरे मधील मारकुट्या मोराची मुंडी मुरागळण्यावरूनच्या मतभेदांवरील मारामारी मिरजच्या महापौरांच्या मध्यस्थीमुळे मिटल्यानंतर महिन्याभराने मिरजेच्या महापौरांच्या मोहनमामाने मागविलेली मणभर मिठाई मित्रमंडळींनी मटा मटा मटकावून मंगल मिलनाचा महोत्सव मानला.

अवडंबरशास्त्री हत्ती Wed, 12/11/2025 - 21:49

In reply to by अवडंबरशास्त्री हत्ती

मुंबईच्या मनोज मधुकर मिराशी, मलकापूरच्या माजोरड्या मिशिवाल्या मनोहर मधुसुदन मोरे मधील मारकुट्या मानभावी मोराच्या मिसळपावरील मोठ्या मनाच्या मालकाचे मनगट मुरागळण्यावरूनच्या मतभेदांवरील मारामारी मिरजच्या महापौरांच्या मध्यस्थीमुळे मिटल्यानंतर महिन्याभराने मिरजेच्या महापौरांच्या मोहन मामाने, मृणाली मामीने मुसळे मिष्टानमधून मागविलेली मणभर मिठाई मित्रमंडळींनी मटा मटा मटकावून मंगल मिलनाचा महोत्सव मानला.

अवडंबरशास्त्री हत्ती Fri, 14/11/2025 - 13:53

In reply to by अवडंबरशास्त्री हत्ती

मादागास्करच्या मारकुट्या मानभावी मोराच्या मिसळपावरील मोठ्या मनाच्या मालकाचे मनगट मुरागळण्यावरूनच्या मुंबईच्या मनोज मधुकर मिराशी, मलकापूरच्या माजोरड्या मिशिवाल्या मनोहर मधुसुदन मोरे मधील मतभेदांवरील मारामारी मिरजचे महापौर मनोज माधव मराठेंच्या मोहनमामाच्या मध्यस्थीमुळे मिटल्यानंतर महिन्याभराने मधल्या मंगळवारी मध्यान्हीनंतर मृणाली मामीने मुसळे मिष्टानमधून मागविलेली मणभर मिठाई मित्रमंडळींनी मटा मटा मटकावून मंगल मिलनाचा महोत्सव मानला.

अवडंबरशास्त्री हत्ती Sun, 16/11/2025 - 13:15

In reply to by अवडंबरशास्त्री हत्ती

मादागास्करच्या मारकुट्या मानभावी मठ्ठ मोराच्या मिसळपावरील मोठ्या मनाच्या मालकाचे मनगट मुरागळण्यावरूनच्या मुंबईच्या मनोज मधुकर मिराशी, मलकापूरच्या माजोरड्या मिशिवाल्या मनोहर मधुसुदन मोरे मधील मतभेदांवरील मारामारी मिरजचे महापौर मनोज माधव मराठेंच्या मोहनमामाच्या मध्यस्थीमुळे मिटल्यानंतर महिन्याभराने मे महिन्यातील मधल्या मंगळवारी मध्यान्हीनंतर मृणाली मामीने मदुराईतील मुसळे मिष्टानमधून मागविलेली मणभर मिठाई मित्रमंडळींनी मटा मटा मटकावून मंगल मिलनाचा महोत्सव मानला.

अवडंबरशास्त्री हत्ती Thu, 27/11/2025 - 18:50

In reply to by अवडंबरशास्त्री हत्ती

मादागास्करच्या मारकुट्या मानभावी मठ्ठ मोराच्या मिसळपावरील मोठ्या मनाच्या मालकाच्या मामेभावाच्या मावसभावाचे मनगट मुरागळण्यावरूनच्या मुंबईच्या मनोज मधुकर मिराशी, मलकापूरच्या माजोरड्या मिशिवाल्या मनोहर मधुसुदन मोरे मधील मतभेदांवरील मारामारी मुळचे महाबळेश्वरचे, मिरजचे महापौर मनोज माधव मराठेंच्या मोहनमामाच्या मध्यस्थीमुळे मिटल्यानंतर महिन्याभराने मे महिन्यातील मधल्या मंगळवारी मध्यान्हीनंतर मुळच्या मनमाडच्या मृणाली मामीने, मुळच्या महाडच्या मधुरा मावशीने मालवण मधील मुसळे मिष्टानमधून मागविलेली मणभर मिठाई मित्रमंडळींनी मटा मटा मटकावून मोकाशी मंगलकार्यालयात मंगल मिलनाचा महोत्सव मानला.

अवडंबरशास्त्री हत्ती Fri, 05/12/2025 - 21:54

In reply to by अवडंबरशास्त्री हत्ती

मादागास्करच्या मारकुट्या मानभावी मठ्ठ मोराच्या मिसळपावरील मोठ्या मनाच्या मालकाच्या मामेभावाच्या मावसभावाच्या मांजरीचे मनगट मुरागळण्यावरूनच्या मुंबईच्या मितभाषी मनोज मधुकर मिराशी, मलकापूरच्या माजोरड्या मिशिवाल्या मनोहर मधुसुदन मोरे मधील मतभेदांवरील मारामारी मुळचे महाबळेश्वरचे, मिरजचे महापौर मनोज माधव मराठेंच्या मोहनमामाच्या मित्राच्या मध्यस्थीमुळे मिटल्यानंतर महिन्याभराने मे महिन्यातील मधल्या मंगळवारी मध्यान्हीनंतर मुळच्या मनमाडच्या मृणाली मामीने, मुळच्या महाडच्या मधुरा मावशीने मालवण मधील मुसळे मिष्टानमधून मागविलेली मणभर मिठाई मित्रमंडळींनी मटा मटा मटकावून मोकाशी मंगलकार्यालयात मंगल मिलनाचा महोत्सव मानला.

अवडंबरशास्त्री हत्ती Mon, 08/12/2025 - 08:22

In reply to by अवडंबरशास्त्री हत्ती

मादागास्करच्या मारकुट्या मानभावी मठ्ठ मोराच्या मिसळपावरील मोठ्या मनाच्या मालकाच्या मामेभावाच्या मानवतावादी मावसभावाच्या मांजरीचे मनगट मुगळण्यावरूनच्या मुंबईच्या मितभाषी मनोज मधुकर मिराशी, मलकापूरच्या मारकुट्या माजोरड्या मिशिवाल्या मनोहर मधुसुदन मोरे मधील मतभेदांवरील मैदानातील मारामारी मुळचे महाबळेश्वरचे, मिरजचे मांजरप्रेमी महापौर मनोज माधव मराठेंच्या मोहनमामाच्या मित्राच्या मध्यस्थीमुळे मिटल्यानंतर महिन्याभराने मे महिन्यातील मधल्या मंगळवारी मध्यान्हीनंतर मुळच्या मनमाडच्या मृणाली मामीने, मुळच्या महाडच्या मधुरा मावशीने मालवण मधील मुसळे मिष्टानमधून मागविलेली मणभर मिठाई मित्रमंडळींनी मटा मटा मटकावून मोकाशी मंगलकार्यालयात मंगल मिलनाचा महोत्सव मानला.

अवडंबरशास्त्री हत्ती Mon, 15/12/2025 - 08:44

In reply to by अवडंबरशास्त्री हत्ती

मादागास्करच्या मारकुट्या मानभावी मठ्ठ मोराच्या मिसळपावरील मोठ्या मनाच्या मालकाच्या मामेभावाच्या मानवतावादी मावसभावाच्या मांजरीचे मनगट मुगळण्यावरूनच्या मुंबईच्या मितभाषी मनोज मधुकर मिराशी, मलकापूरच्या मारकुट्या माजोरड्या मिशिवाल्या मनोहर मधुसुदन मोरे मधील मतभेदांवरील मैदानातील मारामारी मुळचे महाबळेश्वरचे, मिरजचे मांजरप्रेमी महापौर मनोज माधव मराठेंच्या मोहनमामाच्या मित्राच्या मध्यस्थीमुळे मिटल्यानंतर महिन्याभराने मे महिन्यातील मधल्या मंगळवारी मध्यान्हीनंतर मुळच्या मनमाडच्या मृणाली मामीने, मुळच्या महाडच्या मधुरा मावशीने मालवण मधील मुसळे मिष्टानमधून मागविलेली मणभर मिठाई मित्रमंडळींनी मटा मटा मटकावून मोकाशी मंगलकार्यालयात मुळच्या मिशिगनच्या माधुरी मंगेश मांजरेकरच्या मुळच्या मॅसॅच्युसेट्सच्या मराठमोळ्या मनीष मयुरेश मेहेंदळेबरोबरच्या मंगल मिलनाचा महोत्सव मानला.

अवडंबरशास्त्री हत्ती Mon, 15/12/2025 - 19:06

In reply to by अवडंबरशास्त्री हत्ती

मादागास्करच्या मारकुट्या मानभावी मठ्ठ मोराच्या मिसळपावरील मोठ्या मनाच्या मालकाच्या मामेभावाच्या मानवतावादी मावसभावाच्या मांजरीचे मनगट मुगळण्यावरूनच्या मुंबईच्या मितभाषी मनोज मधुकर मिराशी, मलकापूरच्या मारकुट्या माजोरड्या मिशिवाल्या मनोहर मधुसुदन मोरे मधील मतभेदांवरील मैदानातील मारामारी मुळचे महाबळेश्वरचे, मिरजचे मांजरप्रेमी महापौर मनोज माधव मराठेंच्या मोहनमामाच्या मित्राच्या मध्यस्थीमुळे मिटल्यानंतर महिन्याभराने मे महिन्यातील मधल्या मंगळवारी मध्यान्हीनंतर मुळच्या मनमाडच्या मृणाली मामीने, मुळच्या महाडच्या मधुरा मावशीने मालवण मधील मुसळे मिष्टानमधून मागविलेली मणभर मिठाई मित्रमंडळींनी मटा मटा मटकावून मोकाशी मंगलकार्यालयात मुळची मिशिगनमधील मस्किजिऑनची मॉड मुलगी माधुरी मंगेश मांजरेकरच्या मुळचा मॅसॅच्युसेट्समधील मार्ल्बोरोच्या मराठमोळ्या मनीष मयुरेश मेहेंदळेबरोबरच्या मधुचंद्राच्या मंगल मिलनाचा महोत्सव मानला.

अवडंबरशास्त्री हत्ती Wed, 12/11/2025 - 13:47

हा हत्तीखान्यावरील २३ वा मेसेज आणि हत्ती परिवारातील सदस्यांचा २० वा. पूर्वी खरडफळा असताना आम्हाला उगीच बदनाम केले होते की हत्ती उगीच जास्त खरडी करतात. इथे हत्तीखान्यावर २३ पोस्ट होत असताना खरडफळ्यावर ९३ पोस्ट झाल्या आहेत. त्यातूनच लक्षात येईल की हत्तींनी इतरांना त्रास व्हावा असे काहीही केले नव्हते.

देशात गांधी परिवाराने आणि ऐसीवर हत्ती परिवाराने खूप काही केले आहे. गांधी परिवाराचे दोन सदस्य देशासाठी धारातीर्थी पडले तसे हत्ती परिवाराच्या दोन सदस्यांनी ऐसीसाठी आपल्या खात्याचे बलिदान केले - माझा मामा आणि मामेभाऊ.

अवडंबरशास्त्री हत्ती Thu, 13/11/2025 - 16:35

जागतिक कनवाळूपणा दिवस.

आज जागतिक कनवाळूपणा दिवस आहे. त्यानिमित्त सर्व ऐसीकरांना, विशेषतः कनवाळू ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा.

या निमित्ताने कनवाळू ऐसीकरांनी कनवाळूपणाची माहिती करून देणारा एखादा लेख लिहिल्यास ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने तो लेख हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही.

सई केसकर Thu, 13/11/2025 - 19:27

In reply to by अवडंबरशास्त्री हत्ती

जगात चांगुलपणाला काही किंमत नसते हत्ती. तुम्ही चांगले आणि कनवाळू आहात म्हणजे तुम्ही बावळट आहात असं गृहीत धरलं जातं.

'न'वी बाजू Thu, 13/11/2025 - 19:49

In reply to by सई केसकर

हत्ती (१) चांगले आणि/किंवा (२) कनवाळू आहेत, या गृहीतकास आधार काय?

(हत्तींबद्दल ठाऊक नाही, परंतु, त्यांच्यावर हा असला बिनबुडाचा आरोप निदान मी तरी सहन करणार नाही.)

अवडंबरशास्त्री हत्ती Thu, 13/11/2025 - 20:29

In reply to by 'न'वी बाजू

तुम्ही चांगले असे सईताईंनी आम्हा हत्तींना उद्देशून नव्हे तर सर्वच चांगल्या लोकांना उद्देशून म्हटले असावे.

तसेही आम्ही चांगले नाही असे अजिबात नाही. हा मधून मधून कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडवत असलो म्हणून काय झालं? (आमचे बाबा आहेत ना ते खूप शक्तिमान आहेत - पोट पुढे असलं म्हणून काय झालं या धर्तीवर वाचावे).

अवडंबरशास्त्री हत्ती Thu, 13/11/2025 - 20:31

In reply to by सई केसकर

जगात चांगुलपणाला काही किंमत नसते हत्ती

पटले. म्हणूनच आम्हा हत्तींना अशी वर्तणूक सगळीकडे दिली जाते.

अवडंबरशास्त्री हत्ती Sat, 15/11/2025 - 10:55

काल बिहारमध्ये नितीश कुमारांनी मोठे यश मिळवले त्याबद्दल समस्त हत्ती परिवाराकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन. नितीश कुमार हे नाव जरी उच्चारले तरी बहुतेक लोकांच्या डोळ्यासमोर नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते.

नितीश कुमार यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाची तुलना हत्तीशी करणे अनेक अर्थांनी योग्य वाटते. हत्ती हा स्थिर, संयमी आणि दीर्घकालीन विचार करणारा प्राणी मानला जातो. त्याचे पाऊल जरी जड असले तरी ते विचारपूर्वक टाकले जाते — हा गुण नितीश कुमार यांच्या राजकारणात नेहमीच दिसतो. ते कोणताही निर्णय घाईघाईत घेत नाहीत; परिस्थितीचे सर्व बाजूंनी परीक्षण करूनच पुढचे पाऊल टाकतात.

हत्तीप्रमाणेच त्यांच्यात मोठा सहनशीलपणा आहे. बिहारच्या गुंतागुंतीच्या सामाजिक-राजकीय वातावरणात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले, परंतु स्वतःची शांतता आणि संतुलन जपले. हत्तीची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्याची स्मरणशक्ती आणि दीर्घ अनुभवावर आधारित वागण्याची पद्धत. नितीश कुमार यांचे तीन दशके ओलांडणारे सार्वजनिक जीवन हे याच गुणांचे प्रतीक आहे.

हत्तीच्या नेतृत्वात एक दिमाख असतो; तो गर्जना करत नाही, पण त्याची उपस्थिती पुरेशी प्रभावशाली असते. नितीश कुमार यांची राजकीय शैलीही तशीच—निखळ, अलंकाररहित, पण परिणामकारक. त्यामुळे “हत्ती” ही उपमा त्यांच्या नेतृत्वातील स्थैर्य, संयम आणि प्रगल्भतेचे उत्तम रूपक ठरते.

अवडंबरशास्त्री हत्ती Sun, 16/11/2025 - 11:59

अभिनेता डॉ. श्रीराम लागू (१९२७),
संगीतकार रोशन लाल (१९६७),

विनम्र अभिवादन

अवडंबरशास्त्री हत्ती Sun, 16/11/2025 - 13:12

जागतिक सहिष्णुता दिन

जागतिक सहिष्णुता दिनाच्या सर्वांना, विशेषतः सहिष्णु ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने सहिष्णु ऐसीकरांनी सहिष्णुतेवर एखादा लेख लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही.

राष्ट्रीय प्रसारमाध्यम दिन

राष्ट्रीय प्रसारमाध्यम दिनाच्या सर्वांना, विशेषतः राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी कोणत्याही प्रकारे संबंधित असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी कोणत्याही प्रकारे संबंधित असलेल्या ऐसीकरांनी राष्ट्रीय प्रसारमाध्यमांवर एखादा लेख लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही.

अवडंबरशास्त्री हत्ती Sun, 16/11/2025 - 21:23

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन – इस्टोनिआ

राष्ट्रीय दिन/स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्टोनिआच्या लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी त्या देशांचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने तो लेख म्हणजे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का याचाही त्या लेखात अंतर्भाव करावा अशी आग्रहाची विनंती.

अवडंबरशास्त्री हत्ती Sun, 16/11/2025 - 21:32

वर्धापनदिन : युनेस्को (१९४५)

वर्धापनदिनानिमित्त युनेस्कोशी संबंधित सगळ्यांना, विशेषतः युनेस्कोत नोकरीला असलेल्या ऐसीकरांना शुभेच्छा. या निमित्ताने युनेस्कोत नोकरीला असलेल्या ऐसीकरांनी त्या संस्थेविषयी आणि त्या संस्थेच्या कामकाजाविषयी एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एकदम महत्वाचे पाऊल ठरेल याविषयी अजिबात शंका नाही.

 

अवडंबरशास्त्री हत्ती Sun, 16/11/2025 - 22:58

मी एक सच्चिदानंद हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

अवडंबरशास्त्री हत्ती Mon, 17/11/2025 - 13:21

अभिनेत्री शोभना समर्थ (१९१६),
लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८),
'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८)

विनम्र अभिवादन

अवडंबरशास्त्री हत्ती Mon, 17/11/2025 - 22:43

आज शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरेंचा १३ वा स्मृतीदिन. बाळ ठाकरे हे नाव उच्चारले तरी सगळ्यांच्या मनात नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते.

बाळ ठाकरे आणि हत्ती यांची तुलना करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही वैशिष्ट्ये लक्षात येतात. हत्ती हा सामर्थ्य, स्थिरता आणि शांत ताकदीचे प्रतीक मानला जातो. बाळ ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्वही काही अंशी असेच होते—दृढ भूमिका, ठाम विचार आणि नेतृत्वाची भक्कम शैली. हत्ती जसा आपल्या कळपाचे रक्षण करतो, तसा ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांबद्दल दृढ निष्ठा आणि संरक्षणाची भावना ठेवत. हत्तीचे अस्तित्व जंगलात कणखर आणि प्रभावी असते; त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ठाकरे यांची उपस्थिती प्रभावी आणि ठळक होती. हत्तीचा स्वभाव शांत असला तरी गरज पडल्यास तो धीराने पण ठामपणे उभा राहतो—हे गुण ठाकरे यांच्या वक्तृत्वात आणि निर्णयक्षमतेत दिसत. दोघांच्या प्रतिमेत सामर्थ्य आणि नेतृत्वाची एकसमान छटा आढळते, जी लोकांच्या मनात खोलवर रुजलेली आहे.

अवडंबरशास्त्री हत्ती Sun, 23/11/2025 - 14:01

मी एक सच्चिदानंद हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

अवडंबरशास्त्री हत्ती Sun, 23/11/2025 - 14:02

यापुढे आयुष्यभर कधीही कोणालाही पायदळी तुडविणारा हा उल्लेख वाचायला मिळाला तर हत्ती परीवाराची आठवण होणार ही खात्री आहे.

सई केसकर Thu, 27/11/2025 - 21:35

हत्तीखाना वाचलं की मला
(ट्रिगर वॉर्निंग: चांगल्या घरच्या हत्तींने बघू नये. त्यांच्या मनावर वाईट परिणाम.होऊ शकतात)
https://youtu.be/FzQCWPRlWqs?si=3B2m5As3O76-ycfj
हे गाणं आठवतं. आमच्या तरुणपणी आलं होतं. यातला हिरो विनोद खन्नाचा नॉनअक्षय मुलगा. आणि हिरविण लिसा रे.

अवडंबरशास्त्री हत्ती Fri, 28/11/2025 - 09:35

In reply to by सई केसकर

धन्यवाद. ऐसीवर जसा हत्ती परिवार आहे तसा कबुतर परिवारही आला तर मग कबुतरखाना असा एखादा धागा काढता येईल. पण आज ऐसीवर हत्ती परिवाराने इतके आपले नाव कमावले आहे त्यामागे ७-८ वर्षांचे कष्ट आहेत. तितके कष्ट उपसायची कबुतर परिवाराची तयारी असली पाहिजे.

अवडंबरशास्त्री हत्ती Fri, 28/11/2025 - 09:36

In reply to by सई केसकर

खरडफळ्याचा हत्तीखाना होणे या शब्दप्रयोगाचे श्रेय आमचे स्नेही अबापट यांचे.

अवडंबरशास्त्री हत्ती Sat, 29/11/2025 - 16:07

मी एक क्षुब्धोन्मत्त हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

सई केसकर Sun, 30/11/2025 - 07:42

In reply to by अवडंबरशास्त्री हत्ती

अरे वाह!
एका हत्तीचे बारसे करण्याचा बहुमान मिळाला याबद्दल मी हत्ती परिवाराचे आभार मानते!

अवडंबरशास्त्री हत्ती Sun, 30/11/2025 - 20:05

In reply to by सई केसकर

नाही. एक चांगले नाव सुचविल्याबद्दल हत्ती परीवार आपला आभारी आहे.

अवडंबरशास्त्री हत्ती Sun, 30/11/2025 - 20:11

मराठी मंच “ऐसीअक्षरे”ची तुलना हत्तीशी करणे पहिले दृष्ट्या अनपेक्षित वाटू शकते, पण प्रतिमा उलगडली की अनेक सुंदर साम्ये दिसू लागतात. जसा हत्ती भव्य, शांत, संयमी आणि सामर्थ्यशाली असतो, तसाच ‘ऐसीअक्षरे’ हा मंचही व्यापक, सखोल आणि विचारशील संवादाला सामावून घेणारा आहे. हत्तीची हालचाल धीमी पण खात्रीशीर असते; त्याचप्रमाणे या मंचावर होणाऱ्या चर्चा मोजक्या, सखोल आणि विचारपूर्वक पुढे सरकतात.

हत्ती आपल्या कळपातील प्रत्येक सदस्याचे जपून रक्षण करतो. ‘ऐसीअक्षरे’ही आपल्या लेखकांना, वाचकांना आणि नवख्या सदस्यांना प्रोत्साहन देणारे, सुरक्षित आणि सन्मानपूर्ण व्यासपीठ देते. इथे मतभेदांना जागा दिली जाते, परंतु परस्पर आदराचे भान कायम राखले जाते.

हत्तीची स्मरणशक्ती अपूर्व असते; तसेच ‘ऐसीअक्षरे’वर वर्षानुवर्षे साठत गेलेले लेख, प्रतिक्रिया, समीक्षा आणि चर्चा एक समृद्ध मराठी विचारसंग्रह तयार करतात. काळ जसा पुढे जातो, तसा हा संग्रह अधिक मौल्यवान होत जातो.

म्हणूनच, हत्तीप्रमाणे “ऐसीअक्षरे” ही भव्य, संयमी, सर्वसमावेशक आणि मराठी साहित्यप्रेमींसाठी आधार देणारी अशी अद्वितीय दुनिया आहे.

अवडंबरशास्त्री हत्ती Mon, 01/12/2025 - 12:20

कवी बा.सी. मर्ढेकर (१९०९),
गणितज्ञ जी. एच. हार्डी (१९४७), 
गांधीवादी विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी (१९८५), 
संतसाहित्याचे अभ्यासक, विचारवंत गंगाधर बाळकृष्ण सरदार (१९८८), 
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष विजयालक्ष्मी पंडित (१९९०)

विनम्र अभिवादन

 

अवडंबरशास्त्री हत्ती Wed, 03/12/2025 - 16:53

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४), 
क्रांतिकारक खुदिराम बोस (१८८९), 
कवयित्री बहिणाबाई चौधरी (१९५१),
हॉकीपटू ध्यानचंद (१९७९), 
अभिनेता देव आनंद (२०११)

विनम्र अभिवादन

अवडंबरशास्त्री हत्ती Wed, 03/12/2025 - 22:19

मी एक क्षुब्धोन्मत्त हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

अवडंबरशास्त्री हत्ती Fri, 05/12/2025 - 20:53

मी एक व्लादिमीर हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

अवडंबरशास्त्री हत्ती Sat, 06/12/2025 - 09:12

भारत भेटीवरून कालच व्लादिमीर पुतीन रशियाला परत गेले म्हणून माझे नाव काही दिवस- व्लादिमीर हत्ती.

व्लादिमीर पुतीन हे नाव उच्चारले तरी मनात नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी न राहणारा माणूस शोधूनही सापडायचा नाही. व्लादिमीर पुतिन आणि हत्ती यांची तुलना ही रूपकात्मक आहे, परंतु ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही पैलू स्पष्ट करते. हत्ती हा प्राणी शांत, संयमी आणि आपल्या कळपाचा रक्षक म्हणून ओळखला जातो. पुतिन यांची राजकीय शैलीही अनेकदा धीराने, दीर्घकालीन रणनीती आखून पुढे जाणारी दिसते. जसा हत्ती आपल्या क्षेत्रावर ठामपणे पाय रोवून उभा राहतो, तसाच पुतिनही आंतरराष्ट्रीय राजकारणात आपली भूमिका ठामपणे मांडताना दिसतात. तथापि, हत्ती स्वभावतः आक्रमक नसतो; तो फक्त आवश्यक तेव्हा शक्ती दाखवतो. पुतिनही अनेकदा शांतपणे निर्णय घेतात, पण कधी कधी कठोर भूमिका घेतात. हत्तीची स्मरणशक्ती तीव्र असते—आणि पुतिनही दीर्घकाळ लक्षात ठेवून राजकीय हालचाली आखतात असे मानले जाते. या रूपकातून, दोघांत स्थैर्य, सावधपणा आणि स्वतःच्या क्षेत्राचे संरक्षण करण्याची प्रवृत्ती यांचा साम्य दिसते.

अवडंबरशास्त्री हत्ती Sun, 07/12/2025 - 10:19

मी एक व्लादिमीर हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

अवडंबरशास्त्री हत्ती Sun, 07/12/2025 - 13:24

जागतिक नागरी विमान उड्डयन दिन. 

नागरी विमान उड्डयन क्षेत्रातील सर्वांना, विशेषतः त्या क्षेत्रात कामाला असलेल्या ऐसीकरांना जागतिक नागरी विमान उड्डयन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा जागतिक नागरी विमान उड्डयन दिन सगळ्यांना सुख-समाधानाचा आणि समृध्दीचा जाऊ दे ही सदिच्छा. या निमित्ताने नागरी विमान उड्डयन क्षेत्रात कामाला असलेल्या ऐसीकरांनी त्यांच्या क्षेत्राची ओळख करून देणारा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. विशेषतः त्या क्षेत्रातील आव्हाने, चांगले-वाईट अनुभव याचा अंतर्भाव त्यात असल्यास त्या क्षेत्रात नव्याने नोकरी करायला जायची इच्छा असलेल्या ऐसीकरांना बहुमूल्य मार्गदर्शन त्या निमित्ताने होईल. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही.  

अवडंबरशास्त्री हत्ती Tue, 09/12/2025 - 16:10

मी एक व्लादिमीर हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

अवडंबरशास्त्री हत्ती Wed, 10/12/2025 - 19:10

मी एक व्लादिमीर हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

अवडंबरशास्त्री हत्ती Fri, 12/12/2025 - 09:49

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : केनिया 

राष्ट्रीय दिन/स्वातंत्र्यदिनानिमित्त केनियाच्या लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी त्या देशांचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने तो लेख म्हणजे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का याचाही त्या लेखात अंतर्भाव करावा अशी आग्रहाची विनंती.

अवडंबरशास्त्री हत्ती Fri, 12/12/2025 - 20:03

मी एक गोपाळकृष्णन हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

अवडंबरशास्त्री हत्ती Mon, 15/12/2025 - 10:13

हत्ती परिवाराने उत्तमोत्तम अनुप्रास केले नसते तर ऐसीकरांना केवढ्या मोठ्या आनंदाला मुकावे लागले असते.

अवडंबरशास्त्री हत्ती Tue, 16/12/2025 - 17:39

मी एक गोपाळकृष्णन हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

अवडंबरशास्त्री हत्ती Thu, 18/12/2025 - 16:40

माझ्या माहितीतील कोणाचीही जयंती/पुण्यतिथी नसल्याने आज कोणालाही विनम्र अभिवादन नाही.

अवडंबरशास्त्री हत्ती Fri, 19/12/2025 - 07:51

मी एक गोपाळकृष्णन हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

अवडंबरशास्त्री हत्ती Fri, 02/01/2026 - 11:23

सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवीन वर्ष हा शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते. नववर्षातील एकेक महिना म्हणजे कळपातील १२ हत्तीच जणू.

अवडंबरशास्त्री हत्ती Sat, 03/01/2026 - 12:05

मी एक गोपाळकृष्णन हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

नवीन वर्षातील हे पहिलेच पायदळी तुडविणे.

अवडंबरशास्त्री हत्ती Sat, 03/01/2026 - 16:26

आज कोणत्याही देशाचा स्वातंत्र्यदिन, राष्ट्रीयदिन किंवा प्रजासत्ताकदिन नसल्याने आज कोणत्याही देशातील लोकांना त्या दिनाच्या शुभेच्छा नाहीत. असा कोणताही दिन नसल्याने कोणत्याही देशातील लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना त्या देशाचा इतिहास, भूगोल आणि त्या देशातील लोकांचे राहणीमान यावर लेख लिहायची विनंती नाही, कोणत्याही देशातील लोकांना त्यांच्या देशात हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये किती यांचा त्या लेखात अंतर्भाव करायची विनंती नाही. मुळात लेख लिहायचीच विनंती केली नसेल तर मग तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल याची शक्यताच नाही.

अवडंबरशास्त्री हत्ती Sun, 04/01/2026 - 12:08

मी आहे एक गजराज हत्ती.
मी विचार करत नाही, म्हणून शांत आहे.
माणसं विचार करतात, म्हणून अस्वस्थ.
माझं वजन मला ओझं वाटत नाही.
तेच माझं तत्त्वज्ञान.
पण काही झाले तरी कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणे काही सोडत नाही.

'न'वी बाजू Mon, 05/01/2026 - 22:54

एकदा एक छोटी मुलगी, कोठेतरी घाईघाईने जाताना एका तिर्‍हाइतास दिसते. तो तिला हटकतो, आणि दोन प्रश्न विचारतो.

"काय ग, ए मुली, तुझे नाव काय?" आणि "(इतक्या घाईघाईने) कोठे चाललीस?"

ती छोटी मुलगी, दोन्हीं प्रश्नांचे उत्तर एकाच शब्दात देते, आणि धूम ठोकते.

तर त्या छोट्या मुलीचे नाव काय?

सई केसकर Tue, 06/01/2026 - 07:46

एका वर्गशिक्षकाचे नाव "इश्क की छाव" असं असतं.
तर त्याच्या वर्गातली पोरं एकदा वडापाव खायला जातात. आणि पाव उघडून बघतात तर त्यात वडा नसून स्वर्ग असतो. असं का?

'न'वी बाजू Tue, 06/01/2026 - 08:22

In reply to by सई केसकर

नक्की उत्तर ठाऊक नाही, परंतु, "चल छैया४" गाण्याशी संबंधित आहे, नव्हे काय?

("चल छैया४" गाण्याची संपूर्ण शब्दावली ठाऊक नसल्यामुळे, अधिक खोलात शिरण्यास वा अचूक उत्तर देण्यास अंमळ असमर्थ आहे. क्षमस्व.)

'न'वी बाजू Tue, 06/01/2026 - 16:08

In reply to by सई केसकर

त्या सरांच्या आईने आपल्या मुलाचे नाव ‘इश्क की छाव’ असे नक्की कोठल्या तारेत ठेवले असावे, हा संशोधनाचा विषय आहे.

(परंतु, मुलाचे नाव ‘निरोध’ ठेवलेले माझ्या पाहण्यात आहे. (माझा एक भारतीय वंशाचा दक्षिण आफ्रिकी भूतपूर्व सहकर्मी होता.) त्यापुढे हे म्हणजे काहीच नसावे.)

'न'वी बाजू Tue, 06/01/2026 - 15:19

In reply to by सई केसकर

एका वर्गाच्या A Divisionमध्ये एक मुलगी असते. तिचे वर्गातल्या एका मुलावर प्रेम असते. मुलगा चांगला हुशार, स्कॉलर वगैरे असतो, वगैरे वगैरे.

त्याच वर्गात आणखीही एक मुलगा असतो. मवाली असतो. त्याचा या मुलीवर डोळा असतो, परंतु तिला तो अजिबात आवडत नसतो.

एकदा मवाली मुलगा स्कॉलर मुलाबद्दल jealous होतो, आणि त्याला शाळेच्या अंगणात गाठून बदडतो. स्कॉलर मुलगा, स्कॉलर असला म्हणून काय झाले, तोही काही कच्चा नसतो. याच्या एका गुद्द्याला तोही दोन गुद्दे लगावायला कमी करत नाही.

तर अशा रीतीने दोघांची चांगलीच जुंपते, आणि प्रकरण प्रिन्सिपलपर्यंत जाते. प्रिन्सिपल शिक्षा म्हणून दोघांनाही demote करायचे ठरवितो.

मात्र, कितीही झाले, तरी त्यातला एक जण स्कॉलर. शाळेची नाही म्हटले तरी त्याच्यावर मदार असते. काय, उद्या बोर्डातबिर्डात येईल, शाळेचे नावबिव काढेल, वगैरे वगैरे. त्यामुळे, नाही म्हटले तरी त्याच्याबद्दल थोडा सॉफ्ट कॉर्नर असतोच. त्यामुळे, प्रिन्सिपल त्याला थोडी सौम्य शिक्षा द्यायचे ठरवितो.

दुसरा मुलगा मात्र मवाली. अभ्यासात शून्य; मात्र, कोणाच्या खोड्याच काढ, कोणाशी मारामाऱ्या कर, असल्या उद्योगांत सदा आघाडीवर. खरे तर शाळेतून हाकलून देण्याच्याच लायकीचा, परंतु, अगदी तितक्या टोकापर्यंत जायला नको, म्हणून, त्याला शाळेत ठेवून जास्तीत जास्त शिक्षा द्यायची, असे प्रिन्सिपल ठरवितो.

आणि म्हणून, स्कॉलर मुलाची रवानगी होते B Divisionमध्ये, तर मवाली मुलाची उचलबांगडी होते थेट G Divisionमध्ये. आणि, या सगळ्या भानगडीत त्या बिचाऱ्या मुलीचा काहीच दोष नसल्याकारणाने, ती मात्र A Divisionमध्येच राहते.

झाले. त्या मुलीचा लगेच प्रेमभंग होतो, आणि, अतिशय दुःखी होऊन ती गाणे म्हणते. कोठले म्हणेल?

सई केसकर Tue, 06/01/2026 - 16:44

In reply to by 'न'वी बाजू

ती अशी नर्गिससारखा आंबील प्यायलेला चेहरा करून "मेरा सुंदर सपना 'बी'त गया" असं म्हणेल.

'न'वी बाजू Tue, 06/01/2026 - 20:58

In reply to by सई केसकर

मेरा सुंदर सपना 'बी'त गया
मैं प्रेम में सब कुछ हार गयी
बेदर्द ज़माना 'जी'त गया

सई केसकर Tue, 06/01/2026 - 14:07

पूर्वीच्या काळी गाण्यांमधून नट्या प्रत्येक कडव्याला वेगळ्या कपड्यांत दिसायच्या. पण गाता रहे मेरा दिल या गाण्यात वहिदा पूर्ण गाणं एकाच साडीत दिसते. असं का?

'न'वी बाजू Tue, 06/01/2026 - 15:30

In reply to by सई केसकर

भले आख्खे जग जरी आजूबाजूस साड्या बदलत असेल, तरीसुद्धा, म्हणून तिनेसुद्धा बदललीच पाहिजे काय? कोणीतरी non-conformist व्हायला नको?

शिवाय, देव आनंदने तिला तशी आज्ञा केलेली असते. ‘बदले दुनिया सारी, तुम ना बदलना।’ (आणि म्हणूनच, काट्यांनी ओढून आचळ फाटेपर्यंत तीच साडी घालते.)

सई केसकर Tue, 06/01/2026 - 19:21

फार्फार पूर्वीची गोष्ट आहे. ज्याकाळी गोरी लोकं कुणालाही जहाजात भरून आपापल्या देशी घेऊन जात असत. अशा एका गोऱ्या, इंग्रज आणि तिथल्या चहा सम्राटाला चहाचं तंत्रज्ञान आत्मसात करून घ्यायचं होतं. त्यासाठी त्यानं एक जहाज भारताकडे पाठवलं आणि कप्तानाला सांगितलं की "जा! माझ्यासाठी पन्नास इंडियन, पन्नास श्रीलंकन आणि पन्नास चायनीज घेऊन ये (इतर लूट असणारच होती. हे उरलेल्या जागेत कोंबले जाणार होते).
त्याप्रमाणे कप्तान सुरतेत जहाज पार्क करून कामाला लागला. चायनीज आणि श्रीलंकन गोळा करायला बरीच यातायात करावी लागली. पण भारतीय त्याला लगेच मिळाले. जायच्या दिवशी पुन्हा एकदा (एखाद्या चोख काम करणाऱ्या इंग्रजाप्रमाणे) त्यानं जहाजात असलेला सर्व ऐवज मोजला.
तर भारतीय आणि श्रीलंकन प्रत्येकी पन्नास पन्नास गावले होते पण खरे चाय तज्ञ अडतीसच जमले.
मग त्यानं जहाजासमोर उभं राहून कोणतं गाणं गायलं असेल?

'न'वी बाजू Tue, 06/01/2026 - 20:29

In reply to by सई केसकर

'चीनी Come, Hey, चीनी Come'?

(पण, अडतीसचा significance समजला नाही. म्हणजे, पन्नासपेक्षा कमी (आणि म्हणून कमी पडतात), हे ठीकच आहे. पण, अडतीसच का? अडतीस / पन्नासपेक्षा specifically बारा कमी याला काही महत्त्व आहे काय? की, उगाच?)

सई केसकर Tue, 06/01/2026 - 21:19

In reply to by 'न'वी बाजू

आज एकाच नमुन्याच्या दोन उत्तरांमध्ये १२ ppm चा फरक आला होता आणि त्यातली एकाचं उत्तर ३८ आलं होतं. सबकॉनशसमधून असे आकडेही बाहेर येतात. शेवटी फ्रॉइडच खरा, यू नो?

अवडंबरशास्त्री हत्ती Wed, 07/01/2026 - 00:04

तुझ्यासारखे छप्पन्न बघितले आहेत असे म्हणतात त्यात ५६ या आकड्याचा नक्की काय सिग्निफिकन्स असतो?

तो सिग्निफिकन्स मला कळला किंवा कळला नाही तरी मी आहे एक गजराज हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

'न'वी बाजू Wed, 07/01/2026 - 05:56

In reply to by अवडंबरशास्त्री हत्ती

तुझ्यासारखे छप्पन्न बघितले आहेत असे म्हणतात त्यात ५६ या आकड्याचा नक्की काय सिग्निफिकन्स असतो?

“छप्पन्न इंची छाती”मध्ये जो असतो, तोच (किंवा तितपतच).

सई केसकर Wed, 07/01/2026 - 06:58

In reply to by 'न'वी बाजू

'तुझ्यासारखे छप्पन पाहिले' हे वाक्य एखाद्या व्यक्तीच्या ढोंगीपणावर किंवा लबाडीवर उपहासाने बोलले जाते. या वाक्यातील 'छप्पन' हा आकडा निश्चितपणे कशावरून आला याबद्दल ठोस माहिती नाही, तरीही काही संभाव्य कारणे दिली आहेत:

छप्पन भोग (प्रकार): पूर्वी, 'छप्पन भोग' असा एक शब्दप्रयोग होता, ज्यात विविध प्रकारचे पदार्थ असत. त्यामुळे 'छप्पन' म्हणजे 'अनेक' किंवा 'विविध' असे गृहीत धरले जाते. ह्यावरून, 'छप्पन पाहिले' म्हणजे 'अनेक रूपं पाहिली आहेत' असा अर्थ निघतो.
लोकसंख्या आणि विविधता: 'छप्पन' हा आकडा मोठा असल्याने, तो समाजातील विविधतेचे प्रतीक म्हणून वापरला जातो. त्यामुळे, 'मी तुझ्यासारखे छप्पन पाहिले' म्हणजे 'मी तुझ्यासारखे अनेक लोक पाहिले आहेत' असा अर्थ होतो.
फसवणूक: 'छप्पन' हा आकडा फसवणूक किंवा लबाडी दर्शवण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे, 'मी तुझ्यासारखे छप्पन पाहिले' म्हणजे 'मी तुझ्यासारखे अनेक धोकेबाज लोक पाहिले आहेत' असा अर्थ होतो.
या वाक्याचा अर्थ situational awareness नुसार बदलू शकतो, पण याचा रोख ढोंगीपणा किंवा लबाडी दर्शवण्याकडे असतो.

-------

इंदूरच्या छप्पन भोगमध्ये गेलं की खाण्यावरची वासना उडते. असं वाटतं की हे सगळं खाण्यापेक्षा ते जैन लोक म्हातारपणी अन्नपाणी सोडून देतात तसं आत्ताच करावं.

पण छप्पनका एक नाद आहे. त्यामुळे असेल.

अवडंबरशास्त्री हत्ती Wed, 07/01/2026 - 10:40

In reply to by सई केसकर

इंदूरच्या छप्पन भोगमध्ये गेलं की खाण्यावरची वासना उडते.

आमचे नाही तसे झाले. सराफा आणि छप्पन या दोन्ही ठिकाणी अगदी भरपूर चापले होते. घरी परत आल्यानंतरही काही दिवस नेहमीपेक्षा जास्त खात होतो. तिथे गेल्यानंतर अन्नावरील वासना वगैरे उडत नाही तर अधिक चाळवली जाते. आम्ही हत्ती आहोत असे उगीच म्हणतात का?

 

अवडंबरशास्त्री हत्ती Wed, 07/01/2026 - 09:21

सेंच्युरी झळकावायचा मान माझाच.

मी अशा कितीही सेंच्युरी झळकावल्या तरी मी आहे एक हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

'न'वी बाजू Fri, 09/01/2026 - 06:04

In reply to by अवडंबरशास्त्री हत्ती

पायदळी तुडविण्यावरून एक विनोद आठवला.

हत्ती आणि सहा आंधळ्यांची गोष्ट, मला वाटते, सर्वपरिचित असावी. त्यात, गावात सहा आंधळे राहात असतात. एकदा गावात हत्ती येतो, त्याला ‘पाहायला’ ते सहा आंधळे जातात. प्रत्येक आंधळा हत्तीच्या वेगळ्या भागाला हात लावतो, आणि आपल्याला जे ‘दिसले’, त्यावरून हत्तीचे वर्णन करू लागतो. एक म्हणतो, हत्ती खांबासारखा. दुसरा म्हणतो, हत्ती सुपासारखा. तिसरा म्हणतो, हत्ती भिंतीसारखा. वगैरे वगैरे. (सहाच्या सहा भिन्न वर्णने वाचण्यासाठी गरजूंनी मूळ गोष्ट स्वतः वाचावी. ते तपशील पुरवीत बसण्याची हमाली मी करणार नाही. गोष्टीचा मुद्दा लक्षात येण्यासाठी इतकी वर्णने पुरेशी आहेत. असो.)

तर सांगण्याचा मतलब, ‘हत्ती कसा’, यावर काही त्या सहा आंधळ्यांचे एकमत होऊ शकत नाही. आणि, दुसऱ्याने केलेले भिन्न वर्णन ऐकून प्रत्येकजण दुसऱ्यावर शंका घेऊ लागतो. शेवटी त्यांच्यातील मतभेद इतके विकोपाला जातात, की त्यांच्यात प्रचंड हाणामारी होते. वगैरे वगैरे.

मूळ गोष्ट येथे संपते. ते ठीकच आहे. त्यातून जे काही तात्पर्य दर्शवायचे आहे, त्याकरिता एवढी गोष्ट पुरेशी आहे.

परंतु, या गोष्टीचा व्यत्यास कधी ऐकण्यात किंवा वाचण्यात आला आहे काय? (माझ्या नुकताच वाचनात आला, आणि (माझ्या मते) तो मूळ गोष्टीपेक्षा कित्येक पटींनी सोपा-सुटसुटीत तथा एकसमयावच्छेदेकरून कित्येक पटींनी रोचक तथा मार्मिक आहे.)

एका जंगलात सहा आंधळे हत्ती राहात असतात. एकदा त्या जंगलात एक माणूस वाट चुकून येतो. जंगलातल्या पशुपक्ष्यांच्या कुजबुजीतून ती बातमी त्या सहा आंधळ्या हत्तींच्या कानांवर पडते. नि मग, ‘हा माणूस, माणूस म्हणतात, तो शिंचा असतो तरी कसा?’, या कुतूहलापोटी, ते सहा आंधळे हत्ती माणूस ‘पाहायला’ जातात.

माणूस ‘पाहून’ झाल्यावर, सहाच्या सहा आंधळ्या हत्तींचे एकमत होते: ‘माणूस सपाट असतो.’

सांगण्याचा मतलब, माणूस आणि हत्ती यांच्यातील हा (‘दृष्टिकोना’चा) फरक चिंत्य आहे.

असो चालायचेच.

anant_yaatree Fri, 09/01/2026 - 11:46

In reply to by 'न'वी बाजू

तेच सहा हत्ती असे म्हटल्याचे ऐकिवात आहे की "माणूस बोलत वगैरे काही नाही, त्याला फक्त किंचाळता येते"