Skip to main content

हत्तीखाना

(आता तिथे खरडफळा निघालेलाच आहे, म्हटल्यावर, Separate But Equal तत्त्वास अनुसरून…)

ऐसीसर्वमान्य हत्ती Wed, 30/09/2026 - 21:10

In reply to by सई केसकर

पण जिथे तंत्रज्ञान उपलब्ध आणि जगाला संपवणारे नाही तिथे हत्ती वापरायचा. 

हत्ती असा बरा कोणालाही वापरू देईल.

सई केसकर Tue, 29/09/2026 - 20:36

>>त्याच्या (म्हणजे तसल्या "उद्योजकां"च्या नि भांडवलदारांच्या) "म्हणण्या"वर जर तुमचा इतक्या सहजासहजी विश्वास बसत असेल, तर मग माझ्याकडे तुम्हाला विकण्यासाठी कित्येक पूल पडलेले आहेत.

हत्ती ऊस खातो. आणि कधीकधी त्याला ऊस चढतो असं ऐकलं आहे. आता जमिनीत रुजलेला ऊस तर काही फर्मेंट होणार नाही..पण मी असं ऐकलं आहे की ऊस खाऊन पुरुष हत्ती मदमस्त होतात (त्याला इतर कारणे आहेत हे मला माहिती आहे. पुन्हा ती सांगू नका). तर जर हत्ती ऊस खाऊन झिंगतो तर त्याला कॉफीची गरज पडत असणार ना? हँगओव्हर कसा जाणार? सोमवारी तो कामावर कसा जाणार? त्यामुळे आपणहून खात असेलही कॉफी.

मारवा Wed, 30/09/2026 - 13:54

In reply to by ऐसीसर्वमान्य हत्ती

हत्तीची माणूस म्हणून पण तर एखादी बाजू असेल ना ?
हत्ती एक मानसिकता म्हणे
अरे हत्ती ची काय लैंगिकता वगैरे नसते की काय ?
साधा उसाचा दांडा खाऊन मदमस्त होतो
आणि काय ते गौरवीकरण
काय ते दैवतीकरण
एवढा प्रचार एवढ्या बढाया तर बाबा लोकांचे भक्त सुद्धा कधी करताना पाहिले नाहीत राव.

'न'वी बाजू Wed, 30/09/2026 - 18:03

In reply to by मारवा

अरे हत्ती ची काय लैंगिकता वगैरे नसते की काय ?

तुम्हाला हत्तीच्या लैंगिकतेबद्दल जाणून घेण्यात खरोखरच इतका रस आहे काय?

(का आहे?)

(Caveat: हत्ती may oblige!)


तुम्ही हत्तीचे अतिरेकी दैवतीकरण नेहमी करतात.
हत्तीची माणूस म्हणून पण तर एखादी बाजू असेल ना ?हत्ती एक मानसिकता म्हणे
अरे हत्ती ची काय लैंगिकता वगैरे नसते की काय ?

फॉर्दॅट्मॅटर, दैवतांनासुद्धा (बिचाऱ्यांना!) मानवी बाजू (अगदी लैंगिकतेसकट!) का असू नये? त्यांचीच तेवढी का बरे दैना?

(किंवा मग लैंगिकतेचा ज़िक्र जरी केलाच, तरी त्याचे आत्यंतिक विडंबन करायचे. कोठल्यातरी वानराचा गळलेला घाम कोठल्यातरी मगरीने गिळला, नि त्यातून तिला दिवस गेले, म्हणे! (अर्थात, यात हिंदूंचीच अशी ख़ासियत नसावी, म्हणा. अनेक विभिन्न पुरातन मायथॉलॉज्यांतून बहुधा असले अनेक नमुने सापडावेत. (चूभूद्याघ्या.)))

परंतु, हिंदुत्ववादी राजकीय पक्षांनी (आणि, विशेषेकरून, पाकिस्तानातून आलेल्या त्या हिंदुत्ववादी राजकीय नेत्याने ती ‘रथयात्रा’ वगैरे काढल्यापासून) सगळ्यात वाईट गोष्ट जर काही केली असेल, तर ती म्हणजे, हिंदूंना (कदाचित मुसलमानांच्या वरताण) असहिष्णू (मराठीत: intolerant) बनविले. (कदाचित तोच अजेंडा असावा — मतांचे राजकारण! — परंतु, हे अवांतर झाले.) अन्यथा, दैवतांवरून आपापसात विनोद (अगदी लैंगिकतायुक्तसुद्धा!) करणे हे हिंदूंमध्ये एके काळी (सर्रास जरी नसले, तरी) वर्ज्य निश्चित नव्हते. (आणि, हो! हिंदूंना तेवढी सरासरी विनोदबुद्धी निश्चित होती.)

कॉलेजात असताना, आमचा एक राजस्थानी (हिंदू!) सहाध्यायी होता. त्याने (अस्खलित हिंदीतून) एक (अर्थातच अश्लील!) गद्य ‘शिवपुराण’ रचले होते. (निदान, ते आपणच रचले आहे, असे तो आम्हाला सांगत असे, परंतु, तो (त्या भागांतील) काही मौखिक परंपरेचा भाग असल्यास मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही!) वेळीअवेळी गाठून त्यातील एकएक (एक से एक!) पुष्पे आम्हांस तो ऐकवीत असे.

तर असेच एकदा या सर्व पुष्पांमधील crème de la crème म्हणून त्याने आम्हांस ‘शंकराच्या देवळासमोर नंदी का असतो’ याचे व्यवस्थित स्पष्टीकरण देणारी एक कथा ऐकविली होती. (आजमितीस ती येथे कथन करणे अर्थातच शक्य नाही, परंतु) त्या कथेत काय काय नव्हते, महाराजा! Homosexuality, bestiality (with hints at two-way, quid pro quo bestiality)… you name it! (‘नॉर्मल’ पतिपत्नीसंबंधांचा मात्र केवळ ओझरता नि अप्रत्यक्ष उल्लेख होता. (हे बहुधा ग्रीक मायथॉलॉजीच्या मार्गांवर गेले काय? (चूभूद्याघ्या.))) आणि, हे सर्व (प्राप्त परिस्थितीत) शक्य तितक्या सोज्वळ भाषेत!

(याव्यतिरिक्त, (बहुधा) तुलसीरामायणाचे एक (तथाकथित) विडंबनदेखील होते. (याचा मात्र कोणी एक रचयिता नसून, ते बहुधा अपौरुषेय असावे. कदाचित उत्तरप्रदेश, हरयाणा, राजस्थान आदि विस्तृत प्रदेशातील काही मौखिक परंपरेचादेखील तो भाग असू शकेल. कारण, (त्या काळात) आम्हाला याचे स्थानिक पाठभेददेखील वानगीदाखल ऐकविण्यात आले होते. (आता ते विस्मरणात गेले.) तर ते एक असो.) या ‘विडंबना’त रामाने लक्ष्मणाला हासडलेल्या इरसाल शिव्या होत्या, झालेच तर, राम आणि सीता यांच्यातील कामुक संवाददेखील होते. (फार कशाला, तुलसीदासाने केलेल्या काही लैंगिक प्रमादाकरिता भलताच कोठला तरी संत पकडला गेल्याबद्दल व्यक्त केलेली हळहळदेखील होती.) (आणि, हे ऐकविणारेही हिंदू, नि ऐकणारेही हिंदूच. मुस्सलमान नव्हेत! पण लक्षात कोण घेतो? चालायचेच.))

तर सांगण्याचा मतलब,

१. दैवतांनासुद्धा मानवी बाजू (अगदी लैंगिकतेसकट!) असू शकते. (नव्हे, त्यांचा तो अधिकार आहे!)

२. हिंदूंना भारतात पुन्हा जर ‘नॉर्मल’सारखे जगायचे असेल, तर सर्वप्रथम तमाम हिंदुत्ववाद्यांना पाकिस्तानात हाकलून दिले पाहिजे. (They strive to make that once somewhat great country (viz., India) into a Hindu Pakistan — and have almost succeeded at it!) (अर्थात, हिंदूंनी भारतात ‘नॉर्मल’सारखे जगलेच पाहिजे, असा काही आमचा आग्रह नाही.)


लैंगिकतेचे सोडा. अनेक मोठ्या मंदिरांत, दुपारी १२ ते ५च्या दरम्यान गेल्यास, दर्शन घेऊ दिले जात नाही, असे निरीक्षण आहे. ‘सध्या देवांची झोपायची वेळ आहे; ५नंतर या.’ असे सांगून परत पाठविले जाते. (बहुधा ती पुजाऱ्यांची झोपण्याची वेळ असावी, ही बाब अलाहिदा.)

फार कशाला, रात्री झोपी गेलेल्या देवाला पहाटे किंवा सकाळी जागे करण्याकरिता काकडआरत्या, भूपाळ्या वगैरे हा तर परंपरेचा भाग आहे.

झालेच तर, देव पुढे ठेवलेला नैवेद्य (symbolically का होईना, परंतु) खातात. (नंतर भक्त तो (प्रसाद म्हणून) प्रत्यक्षात खातात, ही गोष्ट वेगळी.)

याचाच अर्थ, हिंदू परंपरांमध्ये निद्रा तथा आहार या मानवी बाजू देवादिकांनासुद्धा afford करण्यात आलेल्या आहेत. (आणि, hold on, याच मालिकेतील ‘मैथुन’ या तिसऱ्या मानवी बाजूच्या दिशेने जाण्याचा माझा यत्किंचितही इरादा नाही; त्याबद्दल झाले तेवढे ॲनालिसिस पुरे झाले!)

फार कशाला, काही हिंदू परंपरांमध्ये ‘अजापुत्रं बलिं दद्यात्’सुद्धा चालते; झालेच तर, (बहुधा नेपाळातील काही हिंदू (तांत्रिक? चूभूद्याघ्या.) परंपरांत) मद्याचासुद्धा नैवेद्य दाखविण्यात येतो, असे ऐकण्यात आहे. (काही हिंदू परंपरांनुसार, शंकर हा देव तर भांग आणि गांजा यांचेसुद्धा सर्रास सेवन करतो.)

म्हणजे, आहार तर झालाच, परंतु (निदान काही हिंदू परंपरांनुसार तरी) मांसाशन, मद्यपान, तथा अमली पदार्थांचे सेवन या मानवी बाजू देवादिकांना वर्ज्य नाहीत. (जे ठीकच आहे. त्याबद्दल आक्षेप नाही.)

मात्र, कधी देवाच्या दर्शनाला म्हणून मंदिरात गेला आहात, नि ‘जरा पाच मिनिटे थांबा; देवांची परसाकडे जाण्याची वेळ आहे, देव पाय धुवायला गेले आहेत’ असे काही ऐकायला मिळाले आहे, असा काही अनुभव चुकून तरी घेतला आहात काय?

नेमकी हीच मानवी बाजू तेवढी बिचाऱ्या देवादिकांना वर्ज्य काय म्हणून असावी?

म्हणजे, देवादिकांच्या बाजूने विचार करून पाहा. आहार हा (symbolically का होईना, परंतु) देवादिकांना वर्ज्य नाही. किंबहुना, नैवेद्याच्या रूपाने त्याचे नित्य सेवन ते करीत असतात. (नि खाल्ले तर खाऊद्यात बिचारे!) मग त्या परिस्थितीत, सेवन केलेल्या आहाराचा निचरा (निदान symbolically तरी) करण्यासाठी काही मार्ग त्यांना उपलब्ध असायला नको? (आणि, तूर्तास मी फक्त सरळमार्गाने निचऱ्याबद्दल बोलत आहे.)

Right to Peeवाले यात लक्ष घालून देवादिकांच्या बाजूने ठाम उभे राहतील काय?

ऐसीसर्वमान्य हत्ती Wed, 30/09/2026 - 21:08

In reply to by मारवा

हत्ती ही एक मानसिकता असू शकत नाही का? आणि हत्तीचे उदात्तीकरण हत्ती नाही करणार तर कोण करणार?

ऐसीसर्वमान्य हत्ती Wed, 30/09/2026 - 16:09

आमच्याविषयी अकारण आकसाचा अभाव असलेल्यांमध्ये अधिकाधिक ऐसीकरांचा अंतर्भाव असल्याचा आमचा अदमास आम्हाला अतीव आनंददायी आहे.

सई केसकर Wed, 30/09/2026 - 18:19

यावरून हे पुस्तक आठवले.
मला आता सगळे तपशील आठवत नाहीत. पण त्यात एक न्हावी, एक चांभार, आणि असेच इतर काही जण स्वर्गात जातात आणि आपले आपले व्यवसाय थाटतात. तर प्रत्येक वेळी त्यांच्याकडून बार्गेनिंग करून आधीच पैसे घेऊन त्यांना एकेका देवासमोर नेलं जातं. कुणाचे हजार डोळे. कुणाची अनेक डोकी वगैरे करून त्यांचा सगळ्यांचा धंदा तोट्यात जातो. त्या पुस्तकात केवळ देवांची टिंगल नव्हती तर जातींचाही व्यवस्थित उल्लेख होता. अलीकडे जातींचा उल्लेख टाळून जो जातीवाद होतो त्यापेक्षा तेव्हाचा उघड जातीवाद बरा होता असं वाटतं.
पण इंद्राच्या अप्सरा, रंभा उर्वशी वगैरे multipurpose बायका होत्याच की. कुणीही साधू देवाला द्यायचा नसलेला वर मागायला बसला की भरतनाट्यमचा ड्रेस घालून एक OSD दाखल व्हायची त्याच्यासमोर. त्यामुळे नुसतीच लैंगिकता नव्हती तर हनी ट्रॅप्सदेखील होते!

'न'वी बाजू Wed, 30/09/2026 - 19:28

In reply to by सई केसकर

पण इंद्राच्या अप्सरा, रंभा उर्वशी वगैरे multipurpose बायका होत्याच की. कुणीही साधू देवाला द्यायचा नसलेला वर मागायला बसला की भरतनाट्यमचा ड्रेस घालून एक OSD दाखल व्हायची त्याच्यासमोर. त्यामुळे नुसतीच लैंगिकता नव्हती तर हनी ट्रॅप्सदेखील होते!

'हनी ट्रॅप्स' तर झालेच. परंतु, हे प्रकरण तितकेही सरळसोट नव्हते, तर, त्यामागे त्याहूनही कित्येक पटींनी कुटिल असे राजकारण होते.

बोले तो, 'इंद्र' ही कोणी (देव असलेली) विशिष्ट व्यक्ती नव्हे. तर, ते एक पद आहे. (त्या पदावर बसलेली व्यक्ती = इंद्र, अशा अर्थाने.) देवांचे ex officio राजपद.

या पदाचे काहीसे दक्षिण अमेरिकी banana republicsमधील अध्यक्षपदांसारखे आहे. म्हणजे, त्या देशांत कसे, कोणीही अध्यक्ष बनू शकतो; फक्त, त्याने विद्यमान अध्यक्षास गोळी घालून उडवावे लागते, तद्वत.

तर इंद्रपद प्राप्त करण्याची procedure (माझ्या त्रोटक माहितीप्रमाणे) काहीशी अशी आहे: Eligibility criterion बहुधा फारसा नसावा. कोणीही या पदाकरिता तत्त्वतः बहुधा पात्र असावा. मात्र, काही एक qualifying खडतर तपश्चर्या अगोदर पूर्ण करावी लागते. ती पूर्ण केल्यास विद्यमान इंद्राची पदच्युती होऊन नवीन उमेदवार इंद्र बनतो.

तर eligibility criterion फारसा नसल्याकारणाने, आणि, qualifying तपश्चर्येचे म्हणाल, तर बहुतांश ऋषीमुनींना in the course of their profession खडतर तपश्चर्यांचा तसाही सराव असल्याकारणाने, अनेक ऋषीमुनी या पदाकरिता प्रयत्न करीत, नि त्याकरिता तपश्चर्येस बसत. (विश्वामित्राने हा प्रयत्न अनेकदा केला, म्हणतात.)

मात्र, त्याचबरोबर, विद्यमान इंद्राजवळ एक Early Warning System असते. बोले तो, कोणी उमेदवार ऋषीमुनी qualifying तपश्चर्येस बसला रे बसला, की इंद्राचे आसन गदागदा हलू लागते. म्हणजे मग इंद्रास कळते, की आपल्या खुर्चीला धोका संभवतो; कोणी प्रतिस्पर्धी उभा ठाकलेला आहे, म्हणून.

आणि, कोणी प्रतिस्पर्धी जर उभा ठाकलेला आहे, तर त्याला neutralize कसा करायचा? तर त्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचा तपोभंग करणे. आणि, कोणाचा तपोभंग करायचा, तर त्याकरिता हनी ट्रॅप्ससारखा guaranteed to work मार्ग आणखी दुसरा कोणता?

(अवांतर: 'स्वामिनारायण'वाल्यांच्या विचित्र मागणीमागील genesis बहुधा तितके जुने असावे. (चूभूद्याघ्या.))

तर थोडक्यात म्हणजे, हे हनी ट्रॅप्स तर होतेच. मात्र, त्यांचा उद्देश केवळ कोठल्यातरी साधूला देवाला द्यायचा नसलेला वर मागण्यापासून परावृत्त करणे इतका साधासोपा नसून, साक्षात इंद्राच्या खुर्चीला निर्माण झालेला धोका neutralize करणे, हा होता.

असो.

सई केसकर Thu, 01/10/2026 - 07:51

In reply to by 'न'वी बाजू

१. तुम्हाला बोचासणवादी स्वामीनारायण लोकांबद्दल इतका सॉफ्ट कॉर्नर का आहे? म्हणजे एरवीच्या तुमच्या stance पेक्षा तुमची याबद्दलची भूमिका उगाचच अनुकंपा असलेली आहे. तिथे प्रसाद चांगला मिळतो का? मग प्रसाद खाऊन शिव्याही घालायच्या. माझ्या सासरी इस्कॉनमंदिर आहे जवळ. अतिशय सुंदर. मी आणि नवरा तिथे चालत चालत जातो अनेकदा. आतमध्ये असंच काही चालू असतं. नवरा कधीतरी जाऊन नमस्कार वगैरे करून येतो. पण मला तिथली बेकरी आवडते. त्यांच्या तत्वांना धरून ते व्हेजिटेरिअन गोष्टी विकतात. पण ते केक फार छान असतात. शेजारीच गोविंदाज आहे. तिथे आम्ही कधी कधी जेवायला जातो. कांदा लसूण नसूनही जेवण उत्तम असतं. ऑस्ट्रेलियात असताना एक व्हेजिटेरिअन फ्लॅटमेट होती बिहारी. ती मला इस्कॉनमध्ये घेऊन जायची. कारण दहा डॉलरमध्ये भरपूर जेवायला मिळायचं. पण सगळं घासफूस. अक्कलकोटला म्हणे आमटी भात फार छान मिळतो. पण एकदा गेलो असता तिथे इतकी लाइन होती की हॉटेलमध्ये लाइनमध्ये उभं राहिल्यावर आपण जसं मुलाला "घरी चल मी तुला यापेक्षा चांगला पास्ता करून देते" असं म्हणतो तसं मी घरी जाऊन आपणच आमटी भात करू असं म्हणून निघून आले.
२. इंद्र हा जर खुर्चीबद्दल इतका असुरक्षित आहे तर तो देव कसला? म्हणजे कुणीही खुर्चीबद्दल असं असुरक्षित असणे हे खरंतर दानवी लक्षण नव्हे काय? आणि खुर्चीसाठी तपश्चर्या करणारा विश्वामित्र तरी काय? It is merely a lust for power. कदाचित ज्यांना सत्तेची इतकी लालसा असते त्यांची वासनही तीव्र असावी या तत्वानुसार हनी ट्रॅप रचणे हे manipulation आहे. मग तपस्वीला manipulate करणारा तो देव कसला?
३. बायकांच्या आहारी न जाण्याचा उपाय बायकांशी चांगली मैत्री करणे आणि त्यांना समानतेचा दर्जा देणे नव्हे काय? पुरुष बायकांचे वास्तुकरण करता म्हणून त्यांना ब्रह्मचर्याची काळजी वाटते. तुम्ही जर असे वास्तुकरण केले नाही, एखादी बाई आपल्याच योग्यतेची आणि बुद्धिमत्तेची विचार करणारी आणि भावना असणारी मानव आहे असा विचार केल्यास तिच्या शरीराकडे इतकं लक्ष जाणार नाही. किंवा तिच्यापासून पळून जायची वेळ येणार नाही. ती जर रस्त्यात भेटली तर "हाय अप्सरा! कशी आहेस? आज वर्कआऊटला गेली होतीस का? गणपती आले होते का? की आजही दांडी?" असं विचारता येईल. किंवा "रंभा, तू ऐसीवर भारतीय फुलपाखरांच्या प्रजातींवर लिहिलेला लेख वाचला. उत्तम आहे" असं सांगता येईल.
यावर ओशो यांनी सुचविलेला उपायही मला पटतो. Get the sex out of your system. माझा एक मित्र म्हणायचा की तुम्ही कितीही हुशार, बहुश्रुत वगैरे असा, जोपर्यंत तुम्ही लैंगिक संबंध ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला पूर्ण ओळखत नाही. कारण त्यात आपल्या सुखाबरोबर दुसऱ्याच्या सुखाचाही अतिशय intimate स्थितीत विचार करावा लागतो.
पण काहीच पुरुषांना इतकी अक्कल असते. बाकी सगळे नुसते विरजण लावण्यापुरते.

शांतादुर्गा Fri, 02/10/2026 - 00:25

In reply to by सई केसकर

>>>तुम्हाला बोचासणवादी स्वामीनारायण लोकांबद्दल इतका सॉफ्ट कॉर्नर का आहे?
- I am keeping my popcorn ready 😆

'न'वी बाजू Fri, 02/10/2026 - 02:09

In reply to by शांतादुर्गा

So, that was indeed a trap, huh? I should have known.

(बरे झाले, लक्षात आणून दिलेत ते. नाहीतर मी गंभीरपणे उत्तर टंकायला बसलेलोच होतो... Thanks for forewarning me.)

बाकी,

- I am keeping my popcorn ready 😆

नवीन नाही काही त्यात. काहीबाही धागे काढायचे, नि लोक त्यावर कशी प्रतिक्रिया देतात, त्याची मजा पाहात, पॉपकॉर्न खात बसायचे. नेहमीचा उद्योग आहे तुमचा. (असे निरीक्षण आहे.१)

तो बिचारा विद्यानंद बापट (किंवा राहुल गांधी, किंवा अगदी ते झुरळपक्षीसुद्धा२) तिकडे पोटतिडिकीने काही बोलत असेल. आपल्याला काय त्याचे! आपल्याकरिता ती फक्त पॉपकॉर्नफॅक्टरी. असलाच एखादा चालू विषय निवडायचा, त्यावर धागा काढायचा, लोकांना चावी मारायची, नि पॉपकॉर्न खात बसायचे. विषय काहीही असो, नि मुद्दे काहीही असोत; आपल्याला काय, फक्त हुल्लडबाजीत रस, नि हुल्लडबाजीशी मतलब.३ चांगला उद्योग आहे.

(तुम्ही, आणि दुसरे ते विवेकपटाईत. Same difference. पण निदान ते विवेकपटाईत शहाजोगपणाचा आव तरी आणत नाहीत. (त्या बाबतीत प्रामाणिक आहेत ते.) चालायचेच.)

चालू द्यात. Keep it up. मआंजा चालू राहण्यासाठी अत्यावश्यक आहे हे.

.


१ हे एक ठेवून दिले, की जालावर मग कोणावरही काय वाटेल ते आरोप ठोकता येतात. (असेही निरीक्षण आहे.)

२ झुरळ हा पक्षी नाहीये, ठाऊक आहे मला.

३ हे शेवटचे विधान आमच्याबद्दलही करता येईल, याची कल्पना आहे. किंबहुना, आम्हीच ते करून मोकळे होतो.३अ

३अ It takes one to know one अशीही एक पुस्ती इथे जोडता येईल, परंतु त्याची गरज नाही.

मारवा Fri, 02/10/2026 - 08:01

In reply to by 'न'वी बाजू

आता सध्या सर्व काही unpredictable होत चाललेलं आहे. नुकताच दिल्लीत माझ्या माहितीप्रमाणे 17 वर्षीय मुलीवरील सामूहिक बलात्काराचा आणि एकूण महिला सुरक्षेच्या प्रश्नावर एक मोर्चा निघालेला होता.
त्यात आजपर्यंत सहसा न ऐकलेल्या घोषणा देण्यात आल्या उदा.

एक कचोरी दो समोसा इन मर्दो का क्या भरोसा.

एक सुट्टा दो चाय मर्द जात हाय हाय.

मेरे सीर मे दर्द है इसका कारण मर्द है.

आणि अनेक नाविन्यपूर्ण घोषणा या मोर्चावेळी देण्यात आल्या.

मूळ समस्या इतकी गंभीर आहे ज्यावर मोर्चा काढलेला होता.

घोषणा पोटतिडकीने सात्विक संतापातून देण्यात आल्या.

मात्र पुढे या सर्व घोषणांची social media वर जी काय
Reaction येत आहे त्याचं जे काय trivialization होत आहे ते सगळं चक्रावून टाकणार आहे.
म्हणजे मला असं वाटतंय की आता सर्व काही जेव्हा निरर्थक होऊन जात तेव्हा काहीही कितीही भयावह का घडत असे ना आपण त्याविषयी एका विशिष्ट अंतरावर स्वतः ला ठेवून व्यक्त होत आहोत म्हणजे आपण आपले आपले celebration च्या गंगेत हात धुतोय. हे मी धुण्याचा विरोध म्हणून किंवा असे करणारे काही निन्म आहेत या दृष्टिकोनातून म्हणत नाही.
हे असे वास्तव झालेले आहे अनुभवयास येत आहे इतकेच म्हणतोय.

सई केसकर Fri, 02/10/2026 - 08:21

In reply to by मारवा

मीम तयार करणे, गाणी तयार करणे ही त्या प्रश्नातून तयार केलेली करमणूक आहे की त्यावर विनोदबुद्धीने केलेली टीका आहे? उदाहरणार्थ छप्पन इंच का छोटा बंदर हे गाणं भयंकर प्रसिद्ध झालं. पण त्यामध्ये मला तरी मूळ मुद्द्याच्या trivialisation पेक्षा अधिक काहीतरी सापडलं. विनोदबुद्धीनं एखाद्याचा विरोध करता येतो. आणि तो जास्त लागतो. मागच्या काही वर्षांत मोदींवर कार्टून वगैरे येणं बंद झालं. कॉमेडियन्सना तुरुंगात टाकण्यात आलं. यामुळे हे विनोद खूपच हसवून गेले हे मान्य करायला हवं. पण उदाहरणार्थ इंग्लंड किंवा फ्रान्समध्ये असे विनोद करायची परंपरा आहे. आणि सत्ताधारी लोकांना त्याबद्दल काही करता येत नाही. किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हेच योग्य हे ते समजून आहेत. भारतात मात्र पदोपदी लोकांच्या भावना दुखावतात.
तुम्ही वर दिलेल्या घोषणामुळे मला एक पूर्वी बघितलेलं मीम आठवलं

जिने के लिये सोचा ही नाही
मर्द संभालने होंगे

'न'वी बाजू Fri, 02/10/2026 - 17:41

In reply to by सई केसकर

ही त्या प्रश्नातून तयार केलेली करमणूक आहे की त्यावर विनोदबुद्धीने केलेली टीका आहे? … पण त्यामध्ये मला तरी मूळ मुद्द्याच्या trivialisation पेक्षा अधिक काहीतरी सापडलं. विनोदबुद्धीनं एखाद्याचा विरोध करता येतो. आणि तो जास्त लागतो.

Absolutely! आणि, तुम्ही ज्या specific विनोदांचा ज़िक्र करता, त्यांच्या बाबतीत तर हा मुद्दा निश्चितच लागू आहे.

परंतु, काही प्रश्न: प्रस्तुत विनोदकर्त्यांनी प्रस्तुत विनोद करते वेळी ‘चलो पॉपकॉर्न खाने को बैठते हैं’ अशी काही (जाहीर किंवा खाजगी) attitude व्यक्त केली होती काय? अशी काही attitude (कदाचित अप्रत्यक्षपणे) त्यांच्या देहबोलीतून म्हणा, त्यांच्या अभिव्यक्तीतून म्हणा, त्यांच्या विनोद deliver करण्याच्या पद्धतीतून म्हणा, जाणवली होती काय? (प्रस्तुत विनोद सादर केले गेलेले मी स्वतः पाहिलेले नाहीत, परंतु) I daresay या प्रश्नांचे (सामायिक) उत्तर बहुधा ‘नाही’ असेच असेल.

आणि, हे विनोद इतके प्रभावी का होतात? कारण, त्यात त्या विनोद करणाऱ्यांचे (आणि, त्या विनोदाला दाद देणाऱ्यांपैकी कदाचित सगळ्यांचेच नाही, परंतु अनेकांचे) काहीतरी जळत असते, त्याला चपखलपणे अभिव्यक्ती मिळत असते, व्यक्त होण्यास वाट मिळत असते, म्हणून. ते पॉपकॉर्नचा पुडा उघडून खाणे वा पॉपकॉर्नची फेकाफेक नसते, निव्वळ टाइमपास नसतो, तर त्यातून काही संदेश जात असतो (आणि, तो संदेश बहुधा to the point असतो). (अगदी ‘छप्पन्न इंच की ब्रा’-छाप विनोदांबद्दलसुद्धा मी हेच म्हणेन. हे विनोद, वाटतात तितकेही trivial नाहीत. वरकरणी कितीही sexist भासले, तरीही. मुळात sexist असलेल्या काही premiseला त्याच (आणि मूळ premise-कर्त्याला व्यवस्थित समजेल अशा) भाषेत सुनावलेले चपखल प्रत्युत्तर आहे ते. आणि म्हणूनच, एखादी मुलगीसुद्धा न लाजता, बिनदिक्कतपणे ते सुनावू शकते. तेसुद्धा, (तिचे) काही जळत असते, म्हणूनच.)

परंतु, हे झाले त्या विनोदकर्त्यांबद्दल. त्या विनोदांच्या बँडवॅगनवर उडी मारणाऱ्या सगळ्यांबद्दलच हे म्हणता येईल काय? त्यात काही पॉपकॉर्नखाऊ बघ्ये, या सगळ्या प्रकाराकडे निव्वळ स्वतःच्या करमणुकीचे साधन म्हणून पाहून एकंदर प्रकाराला (कदाचित अनवधानाने, किंवा कदाचित जाणूनबुजून) trivialize करणारे असू शकत नाहीत काय? (हा आरोप कदाचित माझ्यावरही होऊ शकतो, याची पूर्ण कल्पना आहे; आणि, I do not necessarily have any qualms about that.)

आता त्या ‘बोचासणवासी’ प्रकरणाचेच घ्या. त्या प्रकरणात वस्तुतः आक्षेप घेण्यालायक, खटकण्यासारखे (‘बोचण्यासारखे’ असे लिहिण्याचा मोह खरे तर अनावर झाला होता, परंतु तूर्तास सोडून देऊ.), अन्यायकारक असे पुष्कळ आहे. (Although, त्या विरोधात मांडल्या गेलेल्या कायदेशीर आक्षेपांच्या मुद्द्यांमध्ये कायद्याच्या दृष्टीने फारसा दम नाही — माझ्या कायद्याबद्दलच्या मर्यादित समजुतीस अनुसरून, ते बहुधा फारसे legally tenable नसावेत — हे माझे आजदेखील मत आहे. Perhaps — who knows — those ladies need a better legal team. One cannot fight injustice in court based on the wrong legal premises — even if you succeed, what you got then is not justice, but merely a random something that just momentarily happens to be in your favor. परंतु, ते एक असो.) ज्वलनशील माल पुष्कळ आहे, नि त्यावर चपखल, मर्मभेदक मीम्स नि विनोद खरे तर हवे तेवढे करता येतील. (कसे, नि कोणते, ते मला विचारू नका. मी काही त्यातला expert नाही. परंतु, होतकरूंना पुष्कळ वाव आहे, एवढे निश्चित.)

परंतु, ‘बोचासण’वरून शाब्दिक कोटी? नाही, निव्वळ विनोद म्हणून त्याला आक्षेप नाही; विनोद म्हणून तो ठीकच (ठीकठीक) आहे. (किंबहुना, विनोद म्हणून तो इतका trivial आहे, की कधीकाळी (तुम्हां सर्वांच्या पुष्कळ वर्षे अगोदर) तो मलाच सुचला नसेल — नि त्यावर मी (स्वतःशीच) खुदकन हसलो नसेन — असे तुम्हाला प्रामाणिकपणे वाटते काय? It is as obviously easy as falling off a log!)

परंतु, (निव्वळ विनोद म्हणून आक्षेपार्ह नसला, तरीही) what point does it prove? What message does it carry — or convey? ठीक आहे, या कल्टशी निव्वळ योगायोगाने निगडित असलेल्या ‘बोचासण’ नावाच्या गुजरातेतील कोण्या रँडम गावाच्या नावात तिसऱ्याच कोठल्यातरी भाषेत शाब्दिक कोट्या करण्याकरिता potential आहे, याव्यतिरिक्त? मूळ मुद्द्याबद्दल — या कल्टबद्दल, त्याच्या चमत्कारिक (आणि कालविसंगत) attitudesमधील अन्याय्यतेबद्दल, त्यातून इतरांवर झालेल्या किंवा होणाऱ्या अन्यायाबद्दल — एका चकार शब्दानेदेखील त्यात कोठे टीका अथवा टिप्पणी प्रतीत होते काय? ‘निव्वळ टाइमपास’ यापलीकडे त्या कोटीला प्रामाणिकपणे नक्की काय मूल्य आहे? समजा, मी जर त्या कल्टच्या बुटांत उभा असेन, तर असल्या कोट्यांमुळे माझ्या अंगाला (सकारण नि सार्थ) भोके पडण्याची अपेक्षा कोठल्याही तार्किक व्यक्तीने नक्की कोठल्या आधारावर करावी?

आणि, जेन-झी असल्या trivial नि pointless कोट्या करण्यात आपला वेळ, कष्ट, नि क्षमता वाया घालवेल, या कल्पनेत revel करणे, म्हणजे… मूळ (आक्षेपार्ह) मुद्द्याला trivialize करणे तर झालेच, परंतु… जेन-झीच्या बौद्धिक पातळीचा नि क्षमतेचा अपमान नव्हे काय? (I am pretty sure that Gen-Z is capable of far superior, way more pertinent, (and biting!) jokes than that!)

परंतु अर्थात, निव्वळ करमणुकीच्या शोधात पॉपकॉर्नचे पाकीट खोलून बसलेल्यांना त्याचे काय (नि काय म्हणून) असावे? चालायचेच!

 

मारवा Fri, 02/10/2026 - 19:27

In reply to by 'न'वी बाजू

उदा.
देश का युवा रोता है
मोदी का लं× छोटा है.
ही घोषणा बघा.
आता राज्यकर्त्यांना विनोद सहन होत नाही त्यांना चपराक लावली हे अगदी खरे. हुकूमशहा चे एक दैवतीकरण केले जाते त्याला जोरदार तडा या घोषणांनी लागला. एक आवश्यक असे मूर्ती भंजन सुद्धा साधले गेले यातही काही दुमत नाही.
पण वरील घोषणा किंवा
बीबी नहीं है तो देश की मारोगे क्या ?
यामध्ये ज्या मुलींनी या घोषणा दिल्या त्यांनी जे गृहीत धरलेलं आहे ते तर त्यांच्या विरोधकांना हवे आहे तेच तर आहे असे दिसते. म्हणजे खुब लडी मर्दानी वो मध्ये जसं गृहितक आहे हे तसेच तर आहे. यात काही यांनी फार विचार करून या घोषणा दिल्या असतील असे वाटत नाही. आणि त्यात काही त्यांच्याकडून फार अपेक्षा पण नाही. पण वरती नबा sexist घोषणांची सुद्धा किती वैचारिक कसरती करून समर्थन करता ते वाचून मौज वाटली.
मग मी म्हणतो त्यांच्याच भाषेत जवाब द्यायचा तर मग अजून खूप scope राहून गेला की. समस्या इतकीच आहे की मग धार बोथट होते.
तरी पुन्हा एवढी अपेक्षा त्या इतक्या कमी वयाच्या मंडळीकडून काय करणार त्यांनी जो सुरुंग लावला व्यवस्थेला तो देखील बहोत काबिल ए तारीफ आहेच की.
पण म्हणून जे चुकीचे वाटले तिथे अंगुलीनिर्देश केलाच पाहिजे.

'न'वी बाजू Fri, 02/10/2026 - 20:39

In reply to by मारवा

...जेन-झींना एक monolith म्हणून पाहण्याची चूक इथे होते आहे काय?

म्हणजे, जेन-झीतली मंडळी ही एकंदरीत (on the whole) मार्मिक, भेदक, biting विनोद करण्यात (आणि, न्याय्य वाटेल तेथे प्रस्थापितांविरुद्ध लढा देण्यात) तुमच्याआमच्या पिढीला हार जाणारी नसली (किंबहुना, तुमच्याआमच्या पिढीला वरताण असली), तरीही, तमाम जेन-झीला एकाच मापाने तोलून कसे चालेल? (Gen-Z is, after all, merely a generation, an age group; not a philosophy.) त्यांच्यातसुद्धा काही पॉपकॉर्न खोलून बसणारे, थिल्लर, हुल्लडबाज असतीलच की! (It stands to reason.)

पण म्हणून जे चुकीचे वाटले तिथे अंगुलीनिर्देश केलाच पाहिजे.

अर्थात!

उदा.
देश का युवा रोता है
मोदी का लं× छोटा है.

यात मर्मभेदी असे नक्की काय आहे? यात नक्की कोठला (काही जळत असल्याचा) संदेश जातो आहे?

याला निव्वळ थिल्लरपणा, हुल्लडबाजी म्हणून categorize करायला निदान मला तरी काही अडचण दिसत नाही. (जेन-झीचा झाला, म्हणून काय झाले?)

And that's precisely the point! मर्मभेदी विनोद (भले वरकरणी sexist वाटले, तरीही, त्यामागील मर्म समजून घेतल्यावर१) appreciate करता येतात; परंतु त्या नावाखाली निव्वळ थिल्लरपणा, निव्वळ हुल्लडबाजी डोक्यावर घेता येत नाही. That defeats the purpose entirely.

(Although, I must point out one thing... 'xyz का लंx छोटा है' काय, किंवा, (इतरत्र उल्लेख केल्याप्रमाणे) 'देश की मारोगे क्या' काय, यात नवीन, जेन-झी-स्पेसिफिक असे काहीही नाही. असल्या प्रकारचे नारे नि विनोद आमच्या पिढीतसुद्धा सर्रास ऐकण्यात आलेले आहेत. (तुम्ही जर कधी ते ऐकले नसतील, तर बहुधा तुमचा कधी दिल्लीच्या बाजूकडील विशेषेकरून पंजाबी तरुणाईशी — किंवा, फॉर्दॅट्मॅटर, प्रौढांशीसुद्धा — फारसा संबंध आला नसावा, असे अत्यंत नम्रपणे सुचवू इच्छितो. सांगण्याचा मतलब, Been there, done that.) फरक इतकाच, की आमच्या पिढीत ते बहुतकरून वैयक्तिक संभाषणांमधून — आपसांतील खुसुरपुसुरीतून — व्यक्त (नि पास ऑन) होत; आजकाल (कालमानपरत्वे) ते खुल्या मंचांवरून बोंबलले जातात, इतकेच.

Which, of course, is not to justify anything whatsoever; merely to point out that the genre is not new.)

असो.


१ 'छप्पन्न इंच की ब्रा'मागे मुळातल्या 'छप्पन इंच की (मर्दानी) छाती'मधील sexismला चोख प्रत्युत्तर आहे, हे समजून तो विनोद appreciate करता येतो. 'देश की मारोगे क्या' किंवा 'मोदी का लंx छोटा है'ला असल्या कोठल्याच स्पष्टीकरणाचा लाभ मिळू शकत नाही.

सई केसकर Fri, 02/10/2026 - 19:57

In reply to by 'न'वी बाजू

खरं सांगा. तुम्ही कधी सुखदीप किंवा हार्दिक या नावांवर अमेरिकेत जोक ऐकले नाहीत का? I know that after a while, they become trite and useless. पण सुरुवातीला आपण कितीही वोक असलो तरी हसू येतंच. बारावीनंतर आम्ही शाळेतल्या मैत्रिणी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये गेलो. एका मैत्रिणीच्या कॉलेजमध्ये विशाल बंब नावाचा मुलगा होता. त्याच्या आडनातलं ब न उच्चारता ते म असं उच्चारायचे बरेच लोक. आता आम्ही कितीही टवाळ आणि वाया गेलेल्या मुली असलो तरी आम्ही काही असं कधी कुणाला तोंडावर चिडवलं नाही. पण पहिल्यांदा हा किस्सा ऐकला तेव्हा आम्ही खूप हसलो. आणि आजही त्या मुलाचं नाव लक्षात आहे.
एकदा विनोद करायचा म्हणाल्यावर मग त्याला फुटपट्टी कशी लावणार? आणि कोण लावणार? कुणाला sexist आणि racist जोक आवडत नाहीत. पण म्हणून काय जगातून त्या विनोदांचं उच्चाटन होतं का? आपण ठरवू की अमुक अमुक प्रकारचे विनोद करणारे अमुक अमुक असतात. मठ्ठ असतात. हीन बुद्धीचे असतात. पण त्यानं काय होणार आहे? एकदा हसू आलं की झाला विनोद! It is like a reflex action. आणि सगळ्यांची अशी वर्तुळं असतात जिथे sexist, racist, ageist, casteist, सगळ्या प्रकारच्या इष्ट अनिष्ट गोष्टींचे विनोद होतात. त्यामुळे आपण कुणीच कुणाकडे बोट दाखवू शकत नाही.
तर मुद्दा असा आहे की यातून काहीच सांगायचं नसतं. विनोद झाला आणि हसू आलं की विनोद संपला.

'न'वी बाजू Fri, 02/10/2026 - 21:05

In reply to by सई केसकर

खरं सांगा. तुम्ही कधी सुखदीप किंवा हार्दिक या नावांवर अमेरिकेत जोक ऐकले नाहीत का?

हे मी नक्की कधी नाकारले?

किंबहुना, तो 'बोचासण'वाला विनोद मला स्वतःला (वयोमानपरत्वे) तुम्हां सर्वांच्या कित्येक वर्षे अगोदर सुचून त्यावर मी (स्वतःशीच) खुदकन हसलोदेखील होतो, हे मीच तुम्हाला सांगितले नाही काय?

तर मुद्दा असा आहे की यातून काहीच सांगायचं नसतं. विनोद झाला आणि हसू आलं की विनोद संपला.

विनोद जेव्हा या नि एवढ्या एकमेव कारणासाठी नि उद्देशाने सांगितले जात असतात, तेव्हा त्यांबद्दल काहीच म्हणणे नाही. परंतु, एखाद्या जळणार्‍या गोष्टीवर टीका म्हणून जेव्हा विनोद केले जातात, तेव्हा त्यांत काही दम असलेला बरा; अन्यथा, निव्वळ पॉपकॉर्नबाज थिल्लरपणातून the narrator risks losing standing and trivializing the issue at hand, एवढाच मुद्दा आहे.

असो.

शांतादुर्गा Fri, 02/10/2026 - 23:13

In reply to by सई केसकर

हे सर्व पुराण पॅरीसच्या बातमीवरील धाग्यात left of center sensibility अशा काहीतरी खवचट कमेंट वरुन चालू झालं होतं. हसू अल्याचं मान्य करून किंवा तुमचा विनोद खालच्या दर्जाचा होता म्हणून सोडून दिलं असतं तर ठीक. पण यांना बोचासणावर नावामुळे झालेला विनोद का विलाप करण्यायोग्य वाटला, आणि त्या प्रकरणात इतक्या defensive वर जायची काय गरज होती हे आजवर कोडंच आहे. फ्रेंच आणि बोचासणावासीय यांच्या भांडणात तिसऱ्याच्याच भावना दुखावल्यात बहुतेक! पॉपकॉर्न प्रतिसाद फक्त याच मुद्द्याला उद्देशून होता. या सुतावरून मी संस्थळावर आधी मांडलेले विषय आणि मुद्दे कसे नेहेमीच पॉपकॉर्न खाऊन मजा बघण्यासाठी अथवा शहाजोगपणा म्हणून मुद्दाम लिहिलेले असतात अशा हास्यास्पद निष्कर्षाप्रत आलं आहे. धन्य!

शांतादुर्गा Fri, 02/10/2026 - 10:16

In reply to by 'न'वी बाजू

3 आणि 3अ वगैरे तळटिपा लिहून नक्की काय साधलं?
हा प्रतिसाद म्हणजे शीशे के घर में रहने वाले लोग... पण ठीक आहे.
माझंही 'निरीक्षण' असं की- दुसऱ्यावर टीका करताना हात मोकळा सोडायचा आणि त्याचा रोख स्वतःकडे वळला की इथे ते तांडवनृत्य वगैरे काय की ते करून टाकायचं हा पॅटर्न आहे. असो.
>>काहीबाही धागे काढायचे
- त्यासाठी तर हे संस्थळ आहे! पोटतिडिकीने बोलणार्‍या लोकांनी मांडलेले विषय इथे आले तर त्यात वाईट काय आहे? तुम्हाला जे काहीबाही वाटतं ते भारतात राहणार्‍या स्त्रियांसाठी मत प्रदर्शन करावं इतकं महत्वाचं असूच शकतं. त्यावर राग राग करण्यात काय हशील आहे? इतका, की त्या केसकरांना पण trap वगैरे सारख्या बालिश पातळीवर न्यायची गरज पडली??
भारतात misogynist attitude ची काहीच कमी नाही. त्यावर विनोदाचा आधार घेऊन थोडा रिलीफ मिळत असेल तर नेमकी हरकत काय आहे? यात काय शहाजोगपणा?
असो, पटाईत काकांना compliment मिळाला ही एक नाविन्यपूर्ण घटना घडली 🙂

ऐसीसर्वमान्य हत्ती Thu, 01/10/2026 - 21:29

आंतरराष्ट्रीय संगीत दिन.

सगळ्या संगीतप्रेमींना, विशेषत: त्यापैकी असलेल्या ऐसीकरांना आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा आंतरराष्ट्रीय संगीत दिन सुखसमाधानाचा आणि समृध्दीचा जाऊ दे ही सदिच्छा. या निमित्ताने ऐसीवरील संगीतप्रेमींनी संगीतावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. वेगवेगळ्या प्रकारचे संगीत, वेगवेगळे राग, काही रागांची ओळख, ताल, सप्तक, ठुमरी, तसेच प्रसिध्द गायक आणि संगीतकार, त्यांच्या गाण्यामध्ये कोणता फरक होता, कोणाचा आवाज खोल, कोणाचा आवाज दर्दभरा, कोणाचा आवाज कसा याचाही त्यात अंतर्भाव असला तर ते खूप चांगले होईल. तसेच संगीताचा हत्तींवर परिणाम होतो का- होत असल्यास त्याचे कारण आणि होत नसल्यास त्याचेही कारण, हत्तींना संगीत आवडते का तसेच कुठे हत्तीकेंद्री संगीत असते का याचाही अंतर्भाव त्या लेखात करावा ही आग्रहाची विनंती.

 

 

'न'वी बाजू Fri, 02/10/2026 - 14:50

In reply to by सई केसकर

Good for you.

आदर वाढला.

(माझ्या आदरावर तुमचा उदरनिर्वाह, चरितार्थ, वा अस्तित्वसुद्धा अवलंबून नाही, हे आगाऊ मान्य करूनसुद्धा.)

(Please take that as a compliment — if you can, and for whatever it is worth.)

ऐसीसर्वमान्य हत्ती Fri, 02/10/2026 - 13:54

हत्तीखान्यावर अनेक वेगवेगळे सदस्य आता लिहिते झाले आहेत. हत्तीखाना हा ऐसीवरील सर्वात लोकप्रिय धागा बनवायला तुम्हा सगळ्यांची अमूल्य मदत होत आहे.

मारवा Fri, 02/10/2026 - 16:21

तुम्ही नेमके एखादा id पॉवरफूल आहे हे कशावर ठरवितात ते तुमचे नेमके निकष अगोदर सांगा.
1
2
3
मग तुमच्या प्रश्नाचे उत्तर देता येईल.
उदाहरणार्थ माझा एक निकष सांगतो पॉवरफूल असा नाही कारण हा शब्दच मला खटकतो. पण मी रोचक id असा शब्द वापरतो म्हणजे मला असा रोचक id असेल तर त्याचे लिखाण वाचावेसे वाटते. तर माझा एक निकष असा की प्रवाहाच्या किती विरोधात id लिहितो (मुद्दाम विरोधासाठी विरोध म्हणून नाही ) म्हणजे इथल्या प्रचलित प्रवाहाच्या आणि एकूणही अखिल प्रवाहाच्या जितक्या विरोधात तितका मला आकर्षक वाटतो. कारण शेवटी आपण आपल्याला हवेहवेसे रुचकर पचनीय असेच उपहारगृह शोधत असतो आणि तीच व्यंजने त्याच डिशेस आणि तेच ते नकळत prefer करत असतो. तर असे thought provoking करणारे मला रोचक वाटतात.

तर्कतीर्थ Fri, 02/10/2026 - 16:43

In reply to by मारवा

संख्यात्मक निकष लावले तर वाचनसंख्या आणि प्रतिसादसंख्या यावर पॉवर ठरू शकते.

निव्वळ म्हणजे अब्सोल्युट पॉवर ज्यांच्याकडे व्यवस्थापनात्मक पॉवर आहे ते.

काही पॉवर गटबाजीतून निर्माण होते. ते सहसा स्वयंघोषित पॉवरबाज असतात.

'न'वी बाजू Sat, 03/10/2026 - 16:03

In reply to by ऐसीसर्वमान्य हत्ती

खरे तर 'न'वी बाजू ही हत्तीहूनही मोठी मानसिकता आहे. परंतु, 'न'वी बाजू या गोष्टीचा वारंवार ज़िक्र करीत नाहीत.

असो चालायचेच.

ऐसीसर्वमान्य हत्ती Sat, 03/10/2026 - 16:58

In reply to by 'न'वी बाजू

तरी हत्तीप्रमाणे इतर कोणीही कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडवत नसावे.

'न'वी बाजू Sat, 03/10/2026 - 17:07

In reply to by ऐसीसर्वमान्य हत्ती

हम्म्म्म्म्… ते खरेच. परंतु, Not for want of trying.

फक्त, हत्तीएवढी लेव्हल गाठायला वेळ लागेल, इतकेच.

ऐसीसर्वमान्य हत्ती Sun, 04/10/2026 - 10:25

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : मेक्सिको, बेल्जियम, लेसोथो (१९६६)

राष्ट्रीयदिन/स्वातंत्र्यदिनानिमित्ताने मेक्सिको, बेल्जिअम आणि लेसोथोच्या लोकांना, विशेषत: तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. तिकडे राष्ट्रीयदिन/स्वातंत्र्यदिन कसा साजरा केला याविषयी लिहावे ही विनंती. या निमित्ताने त्या देशांचा स्वातंत्र्यलढा, इतिहास, भूगोल, हवामान, ऋतु, समुद्रकिनारे, पर्वतरांगा, वाळवंटे, महत्त्वाची शहरे, उद्योगधंदे, वन्य प्राणी, वनस्पती, तिथल्या लोकांचा आहार, शिक्षणसंस्था, त्या देशांनी जगावर कोणत्या प्रकारे आपला ठसा उमटवला आहे या सगळ्यांचा परामर्श करणारा एखादा लेख लिहावा अशी तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना विनंती. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती, हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का आणि त्या देशात हत्तींना कशी वर्तणूक मिळते याचाही अंतर्भाव त्या लेखात जरूर करावा ही आग्रहाची विनंती. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही. 

मिसळपाव Thu, 08/10/2026 - 00:13

In reply to by ऐसीसर्वमान्य हत्ती

हात्तिच्या, म्हणजे हत्तीसुद्धा माणसासारखाच निष्काळजी, सत्तालोलुप, बेपर्वा, बेजबाबदार आहे म्हणायचा. माणूस पण कोणाचीही पर्वा न करता बाकिच्यानाच काय, सगळ्या निसर्गालाच (हत्ती ईन्क्लुडेड) पायदळी तुडवत असतो :-(

ऐसीसर्वमान्य हत्ती Wed, 07/10/2026 - 15:32

केरळमध्ये पलाट्टू ब्रह्मदाथन नावाच्या हत्तीचे वीज पडून दु:खद निधन झाले आहे. गजकौस्तुभम या टोपणनावाने ओळखला जाणारा पलाट्टू ब्रह्मदाथन ४५ वर्षांचा होता.

शोकाकूल हत्ती परिवार

सई केसकर Thu, 08/10/2026 - 10:57

In reply to by ऐसीसर्वमान्य हत्ती

मांजर मासा खाते
वाघ हरीण खातो
म्हणजे यांना मासा तथा हरीण खाण्याची गरज असते.
पण दिसेल त्याला पायदळी तुडवणाऱ्या व्हेजिटेरियन हत्तीवर वज्राघात होतो, हादेखील निसर्गच.
कदाचित विजेला हत्ती कॉफी आवडत नसेल.

'न'वी बाजू Thu, 08/10/2026 - 20:23

In reply to by सई केसकर

सर्वप्रथम, वज्राघात नव्हे, तडिताघात. (आणि, निसर्ग नव्हे, दैवदुर्विलास.)

बाकी,

कदाचित विजेला हत्ती कॉफी आवडत नसेल.

आणि, 'कोपी लुवाक' तेवढी आवडते, होय? कारण, ऊदमांजरावर वीज पडल्याचे कधी ऐकले नाही ते?

असली काव्यात्मक, काऊचिऊचीष्टोरीछाप, निखालस अवैज्ञानिक, थातुरमातुर एक्स्प्लनेशने ठोकून देण्यापेक्षा, या फेनॉमेननची (कदाचित एकाहून अधिक, एक से बढ़ कर एक) शास्त्रीय (भासणारी) स्पष्टीकरणे ठोकून देता येणे सहज शक्य आहे, त्या दृष्टीने प्रयत्न का नाही करून पाहात?

  • (थियरी ऑफ प्रॉबॅबिलिटी.) हत्ती केवढा, नि ऊदमांजर केवढे! झालेच तर, दोघांच्या सर्फेस एरियाची तुलना काय! त्यामुळे, वीज जर यदृच्छया (मराठीत: रँडमली.) कोठेतरी पडायचीच असेल, तर ती या दोघांपैकी कोणावर पडण्याची शक्यता अधिक?
  • 'वीज पडते, ती शक्यतो परिसरातील सर्वात उंच वस्तूवर पडते' (Lightning chases the tallest object in the vicinity) असे आमच्यावर (बहुधा कोठल्यातरी एमर्जन्सी प्रिपेअर्डनेस ट्रेनिंगात) बिंबविण्यात आले होते.१, २ हत्ती आणि ऊदमांजर यांची तौलनिक उंची लक्षात घेता, या तत्त्वास अनुसरून, वीज या दोघांपैकी को. प. श. अ.?३

तळटीपा:

१ आणि म्हणूनच, उंच इमारतींवरील lightning conductors हे त्या-त्या इमारतींच्या सर्वोच्च बिंदूंवर, त्या-त्या इमारतींहून अधिक उंचीवर राहातील, अशा बेताने बसवितात.

२ याच कारणास्तव, रस्त्याने चालत असताना एखाद्या थंडरस्टॉर्ममध्ये अडकल्यास, अंगावरील चांगल्या कपड्यांचा सत्यानाश झाला, तरी बेहत्तर, परंतु, ताबडतोब रस्त्यात मुटकुळे करून पडा, जेणेकरून, वीज जर पडायचीच असेल, तर ती तुमच्यावर पडण्याऐवजी एखाद्या झाडाबिडावर पडेल, असेही आम्हांस बजावण्यात आले होते.२अ

२अ 'आणि समजा, झाडावर वीज कोसळून ते झाड त्यानंतर आमच्यावर कोसळले तर?' हा प्रश्न प्रस्तुत ट्रेनरास आम्ही विचारलाही नाही, नि ट्रेनराने त्याबद्दल आम्हांस काही सांगितलेही नाही. परंतु, त्या परिस्थितीत, कपड्यांचाही सत्यानाश झाला, नि अंगावर झाड कोसळून जीवही गमावला, असा दुहेरी तोटा होणार नाही काय? त्यापेक्षा, थेट अंगावर वीज कोसळून जीव गमावलेला काय वाईट? निदान कपडे तरी वाचतील!२अ१ (शिवाय, अनायासे वृक्षसंवर्धन होईल, ते वेगळेच!)

२अ१ तुमच्या स्थानिक संस्कृतीस अनुसरून, तुमच्या पश्चात तुमचा/ची significant other ते कपडे, (१) एखाद्या बोहारणीस, नपक्षी, (२) एखाद्या थ्रिफ्टशॉपास (उदा.: गुडविल.२अ१अ) देऊन टाकू शकेल. भले त्यातून तुमच्या significant otherला त्या बदल्यात एखाद्या भांड्याचा (किंवा वाटीचा, किंवा अशाच कशाचा तरी) लाभ होवो वा न होवो, निदान त्या कपड्यांचा कोणाला तरी उपयोग तरी होईल!

२अ१अ धिस पार्ट ऑफ द तळटीप हॅज़ नॉट बीन स्पॉन्सर्ड बाय गुडविल.

३ या तत्त्वास लक्षात घेऊन, हत्तींनी जिराफांस भरीस पाडून त्यांच्याबरोबर सहकळप करून एकत्र राहिल्यास हत्तींच्या दृष्टीने ते अत्यंत फायद्याचे ठरेल, असे सुचवू इच्छितो. (हत्तींनो, पाहा विचार करून!)

सई केसकर Thu, 08/10/2026 - 20:52

>>आणि समजा, झाडावर वीज कोसळून ते झाड त्यानंतर आमच्यावर कोसळले तर?'
गडकऱ्यांची प्रेम आणि मरण कविता यावरच आहे. त्यात झाड विजेच्या प्रेमात पडतं. So you can put 2 and 2 together considering your training.

हत्तीच्या सोंडेत आणि जिराफाच्या मानेत काहीतरी साम्य आहेच तसेही. मग cohabit करत असताना समजा जिराफ चरत असला आणि हत्ती सोंड वर करून बढाया मारत असला तर वीज कुणावर पडणार? अर्थात त्यांच्या धडांची उंची मी मोजली नाही कधी.

किंवा जिराफिणी उंच आहेत म्हणून हत्तीणीनी हिल्स घालायला सुरुवात केली तर? किंवा काहीच दिवसांपूर्वी चर्चेत आलेला डबलडेकर हत्ती कळपात असेल तर?
हे सगळं उंच वगैरे केवळ आपले तर्क. प्रत्यक्षात काहीही होऊ शकतं.

'न'वी बाजू Thu, 08/10/2026 - 21:21

In reply to by सई केसकर

गडकऱ्यांची प्रेम आणि मरण कविता यावरच आहे. त्यात झाड विजेच्या प्रेमात पडतं.

झाडाने कोणाबरोबर शेण खावे, हा सर्वस्वी झाडाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबद्दल आम्हांस काहीही भाष्य करायचे नाही.

मात्र, वन नाइट स्टँड१ झाडाने करावा, नि त्याचा भुर्दंड२ मात्र झाडाखाली सापडलेल्याने (झालेच तर, त्याच्या उत्तराधिकार्‍यांनी३) भरावा, हा काय न्याय झाला काय, ते तुम्हीच सांगा!

(बाकी, चपलेच्या मागे लागलेल्याला चपला कशा काय मिळत नाहीत, हे एक गूढच आहे.४ चालायचेच.)


१ तेच ते. 'क्षण एक पुरे प्रेमाचा', वगैरे वगैरे.

२ 'वर्षाव पडो मरणांचा' काय, किंवा कपड्यांचा सत्यानाश होणे काय.

३ कपडे बोहारणीला देण्यालायक स्थितीत न राहणे.

४ थोडक्यात, कवितेत काय वाटेल ते होऊ शकते!

'न'वी बाजू Thu, 08/10/2026 - 21:47

In reply to by सई केसकर

मग cohabit करत असताना समजा जिराफ चरत असला आणि हत्ती सोंड वर करून बढाया मारत असला…

अयाई ग! काय पण कल्पना आहे! (डोळ्यांसमोर चित्र उभे राहिले.)

(नाही म्हणजे, फँटश्याच जर करायच्या, तर ठीकच आहे, परंतु त्यातसुद्धा homoeroticism आणलेच पाहिजे काय? ‘हत्ती आणि जिराफीण’ म्हटले असतेत, तर काय बिघडले असते?)

सई केसकर Thu, 08/10/2026 - 22:15

In reply to by 'न'वी बाजू

इथे होमो इरॉटीसिझमच बरा नव्हे काय?
हत्ती आणि जिराफीण समजा प्रजनन करते झाले तर त्यातून जी काही sinusoidal wave तयार होईल, त्याची कोण जबाबदारी घेणार? AC DC बँड निषिद्ध पदार्थांचा नशेत अशाच काही विचारांतून तयार झाला असेल.

यावरून लहानपणीची एक गोष्ट आठवली. आधी सांगितली असेल तर अगाऊ माफी.
तर आई मला एक गोष्ट सांगत होती. की ते लहानपणी कोकणात गेले असता बाहेर सतरंजीवर झोपायचे. आणि एकदा सकाळी उठल्यावर अंथरुण आवरताना मोठ्या सतरंजीखाली मेलेला साप सापडला. म्हणजे त्याला यांनीच त्यावर झोपून मारले असावे.
ही गोष्ट मला वर आवडायची. खूप वेळा ऐकून झाल्यावर त्या सतरंजी खाली वेगवेगळे प्राणी सापडले अशा गोष्टी मी तिला तयार करायला लावू लागले. ससा, बदक, खार, माकड आणि मग एकदा मी तिला म्हणाले आता मला अशी गोष्ट सांग की सकाळी सतरंजीखाली मेलेला उंट होता. तेव्हापासून तिनं ती गोष्ट सांगायचं बंद केलं.

ऐसीसर्वमान्य हत्ती Fri, 09/10/2026 - 17:04

In reply to by सई केसकर

हत्ती आणि जिराफीण समजा प्रजनन करते झाले

पुरूष हत्ती आणि स्त्री जिराफ यांच्या प्रजननातून उत्पन्न झालेल्या संततीस जित्ती असे म्हणतात. जित्ती अशाप्रकारे दिसतो

Jitti

'न'वी बाजू Fri, 09/10/2026 - 18:32

In reply to by ऐसीसर्वमान्य हत्ती

पुरूष हत्ती आणि स्त्री जिराफ यांच्या प्रजननातून उत्पन्न झालेल्या संततीस जित्ती असे म्हणतात. जित्ती अशाप्रकारे दिसतो

हत्ती (आणि जिराफिणीसुद्धा) हे प्रस्तुत विषयातील अनुभवी तज्ज्ञ असल्याकारणाने, वरील विधान हे जसेच्या तसे स्वीकारण्यास आम्हांस कोठलीही अडचण भासत नाही. प्रश्न तो नाही.

आमचा प्रश्न किंचित वेगळा आहे.

म्हणजे, जेवताना सगळे लक्ष मोबाईलकडे असल्यास जेवण अंगी लागत नाही, असे लहान मुलांना हल्ली सांगितले गेलेले आपण पाहतो. या तत्त्वास अनुसरून, प्रजनन करतेवेळी प्रस्तुत जिराफिणीचे पूर्ण लक्ष जर खाली मान घालून शांतपणे चरण्यात नि प्रस्तुत हत्तीचे पूर्ण लक्ष जर सोंड वर करून बढाया मारण्यात असेल, तर अशा प्रजननातून (जित्ती तर सोडाच, परंतु) कोठलीही फलप्राप्ती कशी काय व्हावी, अशी आम्हांस मनापासून चिंता वाटते.

(अर्थात, कदाचित आमचे हे समांतर उदाहरण पूर्णपणे चुकीचे असून आमची चिंता ही पूर्णपणे अनाठायी असू शकेलही. कोणास ठाऊक, कदाचित, बहिर्दिशेस जातेसमयी वर्तमानपत्राचे मनोभावे वाचन केल्यास ईप्सित फलप्राप्ती सुकर होते (असा सार्वत्रिक अनुभव आहे), तो दाखला येथे लागू पडावा. (तसे असल्यास, चूभूद्याघ्या.))


(अतिअवांतर: जित्तीकरिता इंग्रजी प्रतिशब्द कोणता? Giraphant?)

सई केसकर Fri, 09/10/2026 - 20:14

In reply to by 'न'वी बाजू

गर्भसंस्कार वाचल्यामुळे चांगलं मूल जन्माला येईल यावर विश्वास ठेवण्यासारखं आहे. मी ते पुस्तक सुजलेल्या पायांना elevation म्हणून वापरलं होतं. काहीही म्हणजे काहीही लिहिलं आहे त्यात.

शिवाय जित्तीच का? हराफ का नाही?
आणि एआयने अतिशय कमी कष्टात हा किती सामान्य प्राणी तयार केला आहे. हत्तीच्या करड्या रंगाचा आणि जिराफाच्या जाडीचा. किंवा जिराफाच्या त्वचेचा आणि हत्तीच्या जाडीचा. अशा अनेक probability येतील. किंवा कदाचित हत्तीच जन्माला येईल कारण जिराफचे सगळे जीन्स रिसेसिव असतील.
असो. एआय आळशी आहे.

'न'वी बाजू Fri, 09/10/2026 - 22:15

In reply to by सई केसकर

हे म्हणजे गर्भसंस्कार वाचल्यामुळे चांगलं मूल जन्माला येईल यावर विश्वास ठेवण्यासारखं आहे.

हे म्हणजे नक्की कोणते? मी दोन वेगवेगळी प्रतिपादने केलेली आहेत त्या प्रतिसादात.

मी ते पुस्तक सुजलेल्या पायांना elevation म्हणून वापरलं होतं. काहीही म्हणजे काहीही लिहिलं आहे त्यात.

मुळात तुम्ही ते पुस्तक विकत घेतलेत, याचेच आश्चर्य वाटते.

(पण, नसावे. बहुधा ते पुस्तक तुमच्यावर (परिस्थिती पाहून) लादण्यात आले असावे, अशी शंका आहे.

(मुंजीत सानेगुरुजींची पुस्तके लादतात, तसे. किंवा, आमच्या श्वशुरांनी, contemporary Indian literatureमध्ये लेटेष्ट काय चालू आहे, याच्याशी आम्हांस वाक़िफ़ करून देण्याच्या सद्हेतूने, वेगवेगळ्या वेळी आमच्यावर अनुक्रमे चेतन भगत आणि अच्युत गोडबोले यांची पुस्तके लादली होती, तद्वत.)

(चलता है, हिंदुस्तान है।)

Maybe you can just call it "greatness" and forget about it.)

(बादवे,

मी ते पुस्तक सुजलेल्या पायांना elevation म्हणून वापरलं होतं.

चेतन भगतच्या संदर्भात मी असे विधान करू इच्छीत नाही. म्हणजे, He can be funny in his own, unintentional way. त्यामुळे, त्याला किमानपक्षी मनोरंजनमूल्य (albeit at his own expense) नाही, असे निदान मी तरी म्हणू शकणार नाही.

अच्युत गोडबोले, however, is a different story altogether.

असो. परंतु, हे अवांतर झाले.)

शिवाय जित्तीच का? हराफ का नाही?

वस्तुतः, गाढव आणि घोडी (किंवा, पर्यायाने, गाढवीण आणि घोडा) यांच्या संकरातून जन्मास आलेल्या प्राणिविशेषास मराठीत 'घोढव' किंवा 'गाडा' यांपैकी काहीही म्हणत नसून, 'खेचर' या नावाने संबोधले जाते, ही बाब लक्षात घेता, हत्ती आणि जिराफीण (किंवा, पर्यायाने, हत्तीण आणि जिराफ) यांच्या संकरातून जन्मास आलेल्या प्राण्यास 'जलचर' म्हणून संबोधणे अधिक उचित ठरावे. (खेचर तरी कोठे आकाशात चरते?)

पण लक्षात कोण घेतो?

आणि एआयने अतिशय कमी कष्टात हा किती सामान्य प्राणी तयार केला आहे. हत्तीच्या करड्या रंगाचा आणि जिराफाच्या जाडीचा. किंवा जिराफाच्या त्वचेचा आणि हत्तीच्या जाडीचा. अशा अनेक probability येतील. किंवा कदाचित हत्तीच जन्माला येईल कारण जिराफचे सगळे जीन्स रिसेसिव असतील.

कदाचित, अशा संकरातून काहीच जन्माला येणार नाही, ही शक्यता लक्षात घेतली आहेत काय?

म्हणजे, उपरोल्लेखित खेचराने जरी स्वजातीय संबंध ठेवले, तरीही, त्यातून काहीही पैदा होत नाही. अर्थात, हे पुढील पिढीबाबत झाले. हत्ती आणि जिराफीण यांच्या बाबतीत असे प्रस्तुत पिढीतच (जेन-झीरो) होणार नाही, हे कशावरून?

(किंवा, दुसरी शक्यता म्हणजे, जन्माला येणार्‍या प्राण्यास पंख किंवा गिल्स असू शकतील. आफ्टर ऑल, प्रस्तुत जिराफीण ही प्रस्तुत हत्तीशी एकनिष्ठ होती, या गृहीतकास आधार काय?)

एआय आळशी आहे.

हे मूलभूत गृहीतक आहे, नाही?

QED.

सई केसकर Sat, 10/10/2026 - 05:25

In reply to by 'न'वी बाजू

,>>कदाचित, अशा संकरातून काहीच जन्माला येणार नाही, ही शक्यता लक्षात घेतली आहेत काय?
जिराफाकडे २८ क्रोमोझोम असतात आणि हत्तीकडे ५५. ते दोघे वेगळ्या स्पीशिजचे आहेत. त्यामुळे वरील विधान खरे आहे. याचे दुःख झाले. त्याहीपेक्षा मोठे दुःख म्हणजे मी अधूनमधून विक्रमचे प्रश्न chatgpt ला विचारत असते ते लक्षात ठेवून त्यानं
A fun fact for Vikram:
असं म्हणून हत्ती आणि जिराफाचा कॉमन पूर्वज किती वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर बागडत होता तेही सांगितले.
म्हणजे त्याला वाटलं ही जिराफ आणि हत्तीचा संकर होऊ शकेल का हा प्रश्न माझा नसून तो एक ११ वर्षीय मुलाचा आहे! हा अपमान आहे की कॉम्प्लिमेंट?

>>पण, नसावे. बहुधा ते पुस्तक तुमच्यावर (परिस्थिती पाहून)
अर्थात. आणि ते नुसतंच भेट दिलेलं नव्हतं. घरच्या प्रतीची फोटोकॉपी काढून स्पायरल बाइंड करून दिलं होतं. हा आशावाद वाखाणण्याजोगा आहे. पण जिने मला दिलं होतं तिला पुढे दुसरं मूल झालं नाही.

पण जिराफ आणि हत्तीला मूल होऊ शकत नाही या माहितीमुळे वाईट वाटलं. आता मागच्या आणि पुढच्या कोणत्याच चर्चेला काही अर्थ नाही.

ऐसीसर्वमान्य हत्ती Sat, 10/10/2026 - 09:20

In reply to by सई केसकर

का? जिराफाचे २८ आणि हत्तीचे ५५ क्रोमोसोम असतील तर त्यांच्या संततीचे २८ आणि ५५ ची सरासरी म्हणजे साडे एक्केचाळीस क्रोमोसोम असू शकणार नाहीत का?

सई केसकर Sat, 10/10/2026 - 12:49

In reply to by ऐसीसर्वमान्य हत्ती

तुम्ही प्रश्न एआयलाच का विचारत नाही. थांबा. त्याआधी त्याला विचारा की तुला जर हत्ती आणि जिराफ यांचा संकर होऊ शकत नाही हे माहिती होते, तर मला त्या गुटगुटीत जित्तीचे चित्र काढून देण्यासाठी एल नीना की निनो काय ते चालू असताना पाणी का वाया घालवलेस?
त्यावेळीच सांगायचे की असा काही प्राणी होऊ शकत नाही आणि मी माझी ऊर्जा अधिक महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी वापरू इच्छितो.

'न'वी बाजू Sat, 10/10/2026 - 20:52

In reply to by सई केसकर

तुला जर हत्ती आणि जिराफ यांचा संकर होऊ शकत नाही हे माहिती होते, तर मला त्या गुटगुटीत जित्तीचे चित्र काढून देण्यासाठी एल नीना की निनो काय ते चालू असताना पाणी का वाया घालवलेस?

याचे सोपे उत्तर असे आहे, की हत्ती आणि जिराफ यांचा संकर होऊ शकत नाही, असे (तुमचा मुलगा समजून) तुम्हाला सांगणारा एआय, आणि हत्तीला जित्तीचे चित्र काढून देणारा एआय, या दोन पूर्णपणे वेगळ्या व्यक्ती (किंवा, एंटिटीज़ म्हणा, हवे तर, एआय पर्सनहूडची संकल्पना मानीत नसाल तर.) आहेत.

उद्या समजा मी जर तुम्हाला काही थाप मारली, तर त्याबद्दल (दोघेही पुरुष आहोत, म्हणून) (चूभूद्याघ्या.) तुम्ही (उदाहरणादाखल) चिंतातुर जंतू किंवा (गॉड फॉर्बिड, परंतु) विवेक पटाईत यांना जबाबदार धरून धारेवर धराल काय?

बाकी,

एल नीना की निनो

एल निन्यो. (त्याची स्त्रीलिंगी आवृत्ती ला निन्या.)

(‘निन्यो’ बोले तो ‘लहान मुलगा’.)

(अतिअवांतर: कोलंबसाच्या जहाजांची नावे निन्या, पीन्ता, आणि सान्ता मारीया अशी होती.)

'न'वी बाजू Sat, 10/10/2026 - 19:39

In reply to by सई केसकर

आणि मग एकदा मी तिला म्हणाले आता मला अशी गोष्ट सांग की सकाळी सतरंजीखाली मेलेला उंट होता. तेव्हापासून तिनं ती गोष्ट सांगायचं बंद केलं.

का बुवा? कदाचित, उंटाच्या पाठीवरली शेवटची काडी ठरण्याची भीती वाटली असावी काय?

(वास्तविक, भीतीचे खरे तर काही कारण नव्हते. (त्यांना ठाऊक नसेलही कदाचित, परंतु) उंट अगोदरच मेलेला होता!)

(छ्याः! नसत्या भीतीपायी, चौऱ्याऐशी लक्ष योनींचा फेरा (एकदाचा, आणि तोही जिवंतपणी) पूर्ण करून टाकण्याचा आयता हाती आलेला सोपा मार्ग मात्र दवडला! चालायचेच.)

मनीषा Fri, 09/10/2026 - 10:46

अरे!! जरा थांबा, दम घ्या... किती ती घनघोर चर्चा?

तुमचा टाईमपास होतो आणि वाचकांना (म्हणजे मला) हसण्याचे कष्ट करावे लागतात.

ऐसीसर्वमान्य हत्ती Fri, 09/10/2026 - 16:56

काही सन्माननीय अपवाद वगळता पूर्वी बरेचसे ऐसीकर हत्ती परिवाराशी फटकून वागायचे. पण हत्तीखान्याला भरपूर यश मिळाले, अनेक वेगवेगळे ऐसीकर हत्तीखान्यावर आले आणि त्यांनी हत्तींशी संबंधित प्रतिसाद दिले यावरून आता आम्ही ऐसीवर सर्वमान्य जाहलो आहोत. त्यामुळे यापुढे काही दिवस नवे नाव- ऐसीसर्वमान्य हत्ती.

ऐसीसर्वमान्य हत्ती Fri, 09/10/2026 - 23:10

हा पाचशेवा प्रतिसाद. या प्रतिसादाबरोबर पाचवे शतक ठोकण्याचा मान माझाच.

मी कितीही शतके ठोकली तरी मी आहे एक ऐसीसर्वमान्य हत्ती, प्रचंड मोठा, महाकाय, कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.