Skip to main content

चित्राला नावं ठेवा

संकीर्ण

चित्राला नावं ठेवा

- अमुक

दोघे

विशेषांक प्रकार

मारवा Thu, 19/10/2017 - 22:20

लोनली प्लॅनेट
किंवा
वेटींग फॉर गोदो
किंवा
तनहाई
किंवा
ऑदर इज हेल
किंवा
कितने दुर कितने पास
किंवा
वुइ आर लीजंड्स

पिऱ्या मांग Fri, 20/10/2017 - 01:25

पॉर्नोकियो
१ (तिरक्या डोळ्यांनी पॉर्न पाहताना नाकाचे स्तंभन होणारे काका)
२(काय की...अपघातात नाक तुटलं असेल आणि डॉक्टरने वापरात नसलेल्या जागेवरची त्वचा वापरून रिपेअर केलं असेल)
३(ते सुश्रुतबिश्रुत असंच करायचे म्हणे)

बॅटमॅन Fri, 20/10/2017 - 13:07

पिढी नवी, खडूसपणा वही
जनरेशन ग्याप
पेठेतून कोथरुडात, पण नेहमी त्याच मुडात
नाकखुपसू विचारवंत आणि फेबुवरील त्यांची टवाळी

सध्या इतकेच, बाकी आठवेल तसे ॲडवतो.

भांबड Fri, 20/10/2017 - 16:07

ठेवा की द्या???
असो
books near to our eyes are difficult to read

'न'वी बाजू Sat, 21/10/2017 - 05:47

पण नावे ठेवायला यात मुदलातली चित्रा कोठे आहे? आणि तिचे पुन्हा बारसे कशासाठी करायचे?

अमुक Tue, 24/10/2017 - 18:20

In reply to by 'न'वी बाजू

पण नावे ठेवायला यात मुदलातली चित्रा कोठे आहे?
............पण चित्रा दाखवायला यात मुद्दल कोठे आहे? :-)

सामो Mon, 23/10/2017 - 21:47

मेरे पास सेल फोन है, इन्टर्नेट है, फेसबुक, वॉस्सॅप, ट्वीटर् है| तुम्हारे पास क्या है?
हुडुत! मेरे पास टाईम है टाईम!

धनंजय Fri, 27/10/2017 - 21:43

इतक्या कोट्या झाल्या तर आता शीर्षक बदला की! चित्राला शीर्षक द्या, चित्रातील संवाद लिहा, चित्राला मथळा द्या, असा काही हेतू जाणवतो आहे.

("चित्र छान आहे, पण धाग्याचे शीर्षक कैच्या कै आहे!" असे मी म्हटले, तरी शीर्षकाला नावं ठेवतो आहे, चित्राला नावं ठेवत नाही.)