Skip to main content

.

0

.

Node read time
0

ललित लेखनाचा प्रकार

अनु राव Fri, 19/02/2016 - 10:17

In reply to by अ

कारण हा स्वातंत्र्याचा समतेचा मुद्दा आहे.

मला सोईस्कर वाटणारी गोष्ट वापरायला मिळणे हे स्वातंत्र्य आहे.

तसेच हा स्वातंत्र्याचा सोस फक्त ओएस वगैरे गोष्टीं मधेच का? सर्व तंत्रज्ञानाची / औषधांची पेटंट ही गुलामगीरीच नाही का तुमच्या लॉजिक ने. आता स्वताची कार किंवा औषध मुक्त स्त्रोत नसेल तर अस्मिता दुखवली जाते का? ( कदाचित असली फॅडं फक्त अश्या गोष्टीतच जमतात ).

तंत्रज्ञाचे पारतंत्र्य कालांतराने राजकीय आणि सामाजीक पारतंत्र्यात व गुलामगीरीत परिवर्तीत होईल.

हे एक नविन प्रकारचे फियर माँगरींग आहे. असले काही होत नसते, इतकी काळजी करु नका. १०० वर्षापर्यंत खुटखुटीत जगायचे असेल तर निरर्थक गोष्टींकडे लक्ष देऊ नका असे गविं नी आत्ताच सांगितले आहे. आणि गवि सांगतात ते बरोबरच असते.

गवि Fri, 19/02/2016 - 14:10

In reply to by अनु राव

आणि गवि सांगतात ते बरोबरच असते.

"भडकाऊ" अशी श्रेणी देण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी एकदोघांनीही द्या रे.

गवि Fri, 19/02/2016 - 18:56

In reply to by गवि

ये जरुर उन नवी बाजुअोंका काम होंगा. उपरवाल्या अनुरावोंको भडकाऊ श्रेणी देनेको विनंती किया तो खुद्द हमारेंही विनंतीवजा प्रतिसादको भडकाऊ श्रेणी देके मोकले.

'न'वी बाजू Fri, 19/02/2016 - 20:20

In reply to by गवि

नवी बाजुअोंका

आदरार्थी बहुवचन काय? ;-)

उपरवाल्या अनुरावोंको भडकाऊ श्रेणी देनेको विनंती किया तो खुद्द हमारेंही विनंतीवजा प्रतिसादको भडकाऊ श्रेणी देके मोकले.

इदं मात्र न मम|

बोले तो, तुमच्या विनंतीस मान देऊन 'उपरवाल्या अनुरावोंक्या' प्रतिसादास मी भडकाऊ दिली, हे खरे आहे. परंतु तुमच्या प्रतिसादास मी भडकाऊ दिली नसल्याकारणाने ते श्रेय मी लाटू इच्छीत नाही. (उगाच खोटे का बोलू?)

अवांतर, तुमच्या स्वाक्षरीबद्दल:

सदासर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा |

हे१ 'अकेले अकेले कहॉं जा रहे हो'च्या चालीवर गाता येते, ही बातमी आतापावेतो बहुधा शिळी झाली असावी. परंतु कधी हे१अ 'ये दुनिया अगर मिल भी जाए, तो क्या है'२ किंवा 'जिन्हें नाज़ है हिंद पर, वो कहॉं है' यांच्या चालींवर गाऊन पाहिले आहेत काय?

..........

१, १अ किंवा समग्र मनाचे श्लोक.

२ विशेषत: त्यातील ते 'जला दो इसे, फूक डालो ये दुनिया'वाले कडवे.

अनु राव Fri, 19/02/2016 - 10:31

In reply to by अ

इथला क्राऊड कसा आहे त्याबद्दल माझे मत बळकट करुण शिक्कमोर्तब केल्याबद्दल धन्यावाद.

अहो काळजी करु नका. तुम्ही माझ्या वरुन इथल्या क्राऊड च्या बद्दल मत बनवू नका.
माझ्या मतांशी पटणारे इथे फारच थोडे आहेत. चुकुन कोणाला कधी माझे मत पटले तर ते इतकी रेअरेस्ट ऑफ रेअर गोष्ट असते की तसे ती व्यक्ती मुद्दाम मेंशन करते.

अंतराआनंद Fri, 19/02/2016 - 13:30

लिनक्सबद्दल थोडा धाक आहे. ऑफिसमध्ये युनिक्सवर काम करुनही घरच्या पीसीवर विंडोजच आहे. आळशीपणा आणि उबंटू वैगेरे सगळं फार टेक्नोक्रॅट्सचं काम आहे असं वाटत असल्यानं विंडोजला नावं ठेवतही त्यावर विसंबून होते. आता परत लिनक्स वापरून बघावं असं वाटत आहे.
इथे चर्चेत लिनक्सबद्द्ल सविस्तर,माहितीपूर्ण प्रतिसाद आहेत, माझ्यासारखेच "वापरुन बघूया" असे प्रतिसाद आहेत ते न बघता चार दोन प्रामाणिक शंका विचारणार्^यांवर का चिडताय? तुमचा उद्देश लिनक्सबद्द्ल जागृती करावी असा आहे ना? मग त्यांच्या शंकांना प्रामाणिक उत्तरे द्या, त्या खवचट वाटत असतील तर दुर्लक्ष करा उगाच सरसकट सगळ्यांविरुद्ध त्रागा का करताय? त्यामुळे तुम्ही मांडलेल्या विषयापासून तुम्हीच दूर नाही का जात?

मिसळपाव Fri, 19/02/2016 - 22:41

In reply to by अंतराआनंद

+१. एकंदरीत अभिनव येउन तलवार फिरवून जातो नी नंतर अदिति येउन जखमींची विचारपूस करून, मलमपट्टी करून जाते - "हे औषध कुठल्याही केमिस्टकडे मिळेल ते घ्या हवंतर चार दिवस" वगैरे :-)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 20/02/2016 - 00:58

In reply to by अ

बोलावं का न बोलावं याचा बराच विचार केला. आता (शिंक येते तसं बोलणं) आलं म्हणून बोलते.

समजा कोणी त्रास देण्याच्या हेतूने बोलतही असेल, तर त्यांच्या आवाजावर आणखी टिपेचा आवाज चढवून काय साध्य होणार? ऋषिकेश आणि तुमची जी बोलाचाली झाली त्यावरून "लिनक्स वापरायला कठीण असतंच, वर मदत मिळणंही कठीणच दिसतंय" असं त्यातून दिसायला लागतं. तुम्हाला लिनक्स विकायचंय, लिनक्समागचं तत्त्वज्ञान विकायचंय तर गोडबोलेपणा करावा लागणार. त्या बाबतीत गुजराथी दुकानदार किंवा ख्रिश्चन मिशनऱ्यांचा आदर्श बाळगायला काय हरकत आहे?

किंवा चिलॅक्स! आपल्याला त्रास देणं वगळता इतरांना बरीच जास्त कामं असू शकतात.

(काय दिवस आल्येत! मी असं काही लिहित्ये! हेच का ते म्हातारपण?)

.शुचि. Sat, 20/02/2016 - 01:07

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

काय दिवस आल्येत! मी असं काही लिहित्ये! हेच का ते म्हातारपण?

=)) नको गं असं म्हणूस. तू म्हातारी तर माझं काय? एक पाय स्मशानात? ;)

मिसळपाव Sat, 20/02/2016 - 01:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

... पण 'मावशी'पण नक्की :-P म्हणजे बघा, जिच्याबद्दल एकदा गविने "...अवांतर पुरे अन्यथा ती येईल..." असं लिहिलं होतं, म्हणजे हॅरी पॉटरमधे कसा नुसता नाव न घेता 'तो', 'त्याचा' असे उल्लेख असतात ना? तसं, त्या 'ती'ने हे लिहावं म्हंणजे 'मावशीपणा' नाहितर दुसरं काय म्हणणार मग?? !! असो. फार बोलत नाही कारण मला अजून उबंटू बसवायचंय :-)

गंम्बा Sun, 21/02/2016 - 14:16

In reply to by अ

लेख जागृतीकरण्यासाठी/प्रचारासाठी लिहिला आहे. माझ्या वयक्तीक फायद्यासाठी नाही.

अभिनव साहेब, हा तर एक मोठ्ठा दोष आहे ना. वैयक्तीक फायदा नसेल तर एकुणच उत्पादन आणि सेवेच्या दर्जा बद्दत शंका निर्माण होते.
जागृती वगैरे उगाचच मोठे शब्द आहेत. मला वाटते इथे सर्वांना बेसिक माहीती असतीलच.
एखाद्या हजार रुपयात लॅपटॉप बरोबर विंडो येतच असेल तर मी तरी उगाचचा व्याप स्वताला लाऊन घेणार नाही.

बाकी तुमचा तांत्रीक ऑर्गॅझम चालू राहु दे.

गंम्बा Sun, 21/02/2016 - 14:40

In reply to by अ

कोणी स्वताहुन आवडीने व्हिस्की पित असेल तर त्याला "व्हिस्कीचे तोटे आणि रम कशी चांगली आहे" हे का सांगावे?
खरे तर इथे इतकाही फरक नाहीये, ब्लु लेबल पेक्षा मी पितो ती डबल ब्लॅक कशी चांगली आहे हे पटवण्याचा उगाचच प्रयत्न चालू आहे.

लोक आपापले चॉईस फार विचारपूर्वक करतात हो. मूर्ख नसतात ते. अशी माहीती नाही वाचली तरी आजुबाजुने डोक्यात माहीती शिरत असतेच. विंडो वापरणार्‍याला दुसरे काही बरे वाटले तर तो ते वापरेल.

आणि त्याही पेक्षा बर्‍याच लोकांना कोणती ओएस वापरतो आहोत हा प्रश्न फारच ट्रीव्हिअल वाटत असेल.
विंडोज वापरणारे आमच्या सारखे अँड्राइड फोन नाही का वापरत? आमचा काही विंडो वापरणार्‍यांचा कल्ट नाहीये.
आम्ही मुक्त स्त्रोत वापरत नसलो तरी मुक्त आहोत.

उदय. Sat, 20/02/2016 - 02:57

In reply to by मिसळपाव

अदिती येउन जखमींची विचारपूस करून, मलमपट्टी करून जाते

अदितीला 'जागतिक वीलौयू फेडरेशन'कडून ऐसीची नाईटिंगेल पुरस्कार देण्यात येत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 19/02/2016 - 19:52

आधीच्या प्रतिसादांमध्ये लिनक्स इनस्टॉल करण्याचं सोपं गाईड दिलेलं होतं, त्यात एक मुख्य भर -
कंप्यूटरवर कोणतीही नवीन ओएस चढवण्याआधी सगळ्या डेटाचा बॅकप घेऊन ठेवा. विशेषतः फोटो, व्हिडीओ यांसारख्या व्यक्तिगत गोष्टींची. पैसे देऊनही या स्मृती पुन्हा मिळत नाहीत.

कदाचित असली फॅडं फक्त अश्या गोष्टीतच जमतात

अशी फुकटची फॅडं डिजिटल तंत्रज्ञानात असणं सोपं आणि सहज शक्य असतं. टोरंटवरून शिणेमे डाऊनलोड करता येतात, अनधिकृत प्रती का असेनात. तशी जीएम पिकांची वाणं किंवा कृत्रिम धाग्यांची बनवलेली कापडं डाऊनलोड करता येत नाहीत.

आबा, लिनक्सवरून काही गोष्टी विंडोजमध्येही गेल्या आहेत; अशा गप्पा मी मित्रांकडून ऐकते. त्यातले तपशील अर्थातच 'संस्कृत' असतात, म्हणून सोडून देते. पण मुद्दा असा की सॉफ्टवेर विकणारे लोकही लिनक्ससाठी पाठबळ पुरवतात. (रॉकफेलर तेल विकून सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्त्या पुरवतात तसंही काही.)

अंतराआनंद, लिनक्सचा धाकबिक बाळगायची गरज नाही. थोडं चुकलं-माकलं तर तपासून बघून दुरुस्त करू, असं म्हणता येत असेल तर अजिबातच नाही.

नवीन भाषा शिकताना माझं असं होतं. शब्द चुकला, व्याकरण चुकलं तर काय अशी भीती वाटत राहते. मराठी, इंग्लिश बोलताना, लिहिताना असं वाटत नाही. चुका होतच नाहीत असंही नाही, पण आत्मविश्वास असतो. सवयीची गोष्ट वापरतानाही तसाच आत्मविश्वास आलेला असतो. तसा विश्वास वाटण्यासाठी मी बरेचदा लोकांना म्हणते, "फारतर काय, लिनक्स पुन्हा इनस्टॉल करावं लागेल. थोडा वेळ जाईल. जगबुडी वगैरे येणार नाहीये." याचा फायदा झाला तर पहा.

अनु राव Mon, 22/02/2016 - 11:10

In reply to by अ

पण आंतरजाल आहे म्हणून जशी इजिप्त वगैरे ठिकाणी क्रांती झाली

जर क्रांतीचे पितृत्व जाला ला देत असात तर त्या क्रांती नंतर इजिप्त ची जी पूर्वी पेक्षा वाईट स्थिती झाली त्याची जबाबदारी पण जालावर ढकलणार का?
आणि सध्या इजिप्त मधे नॉर्मल्सी आणण्यासाठी जालकरी काय करतायत?

चिमणराव Mon, 17/07/2017 - 20:42

लाइनक्सवाल्यांनी ते पेन्ग्विनचे चित्र का ठेवलं आहे? बागेतल्या कचरापेटींनाही तसाच आकार दिला आहे. हा पक्षी उडू शकत नाही. बदक हवे. हवा,जमिन,पाणी तिन्हीकडे संचार करते. किंवा काळा कारमोरंट.