Skip to main content

ही बातमी समजली का? - ७४

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
=======================
“I think the photo went viral in a world with so much inhumanity — ISIS, corruption, Ferguson, and so on — and people are looking for symbols of decency, humanity, caring, integrity,” he says.
अजून असे शिक्षक होतील का?

गब्बर सिंग Fri, 15/05/2015 - 07:20

मेडिकल असोशियेशन च्या कैच्याकै मागण्या ..... इथे

“The film shows doctors intentionally providing medical treatment to a person who was already ‘dead’ before being brought to a hospital. The scene in the movie has not only lowered the dignity of the medical profession, but has also provoked the public at large against the noble profession of the doctors,” IMA said in a statement issued today.

आणखी

“With Violence against doctors on the rise, such type of unjustified message through the movie will only add fuel to the fire,”the letter adds.The doctors have also said that if no action is taken, they will be forced to protest against the censor board.

नितिन थत्ते Fri, 15/05/2015 - 07:53

In reply to by गब्बर सिंग

बहुतेक केसेसमध्ये मेडिकल असोसिएशनची भूमिका "व्यवसायाचा रेग्युलेटर" अशी न राहता "डॉक्टरांची युनियन" अशी राहिली आहे.

गब्बर सिंग Fri, 15/05/2015 - 08:23

In reply to by नितिन थत्ते

अगदी. अमेरिकेत साधारण असेच (किंवा आणखी जोरदार प्रकार) घडलेला आहे. त्याबद्दल मिल्टन फ्रिडमन यांनी जिक्र केलेला आहे. इथे (साडे तीन मिनिटांचा व्हिडिओ)

आडकित्ता Fri, 15/05/2015 - 19:34

In reply to by नितिन थत्ते

बहुतेक केसेसमध्ये मेडिकल असोसिएशनची भूमिका "व्यवसायाचा रेग्युलेटर" अशी न राहता "डॉक्टरांची युनियन" अशी राहिली आहे.

आयएमए ही सध्या एनजीओ अथवा, रोटरी लायन्स इ सारख्या क्लब्स स्वरूपाची संघटना आहे, ही ट्रेड युनियन घोषित करावी असे आमचे प्रयत्न सुरू आहेत.

व्यवसायाचे रेग्युलेशन करण्यासाठी 'काउन्सिल्स' असतात. उदा. बार काउन्सिल, नर्सिंग काउन्सिल, मेडीकल काउन्सिल. एथिक्स फॉर्म्युलेशन व प्रोफेशनल्सच्या अनप्रोफेशनल वर्तणुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम या काउन्सिलचे असते. ही क्वासि-जुडिशिअल बॉडी असते.

नितिन थत्ते Sat, 16/05/2015 - 07:11

In reply to by आडकित्ता

सुधारणा

बहुतेक केसेसमध्ये मेडिकल असोसिएशनची मेडिकल काउन्सिलची भूमिका "व्यवसायाचा रेग्युलेटर" अशी न राहता "डॉक्टरांची युनियन" अशी राहिली आहे.

आडकित्ता Sat, 16/05/2015 - 11:47

In reply to by नितिन थत्ते

तुमची माहिती अपुरी वा चुकीच्या आधारावर अवलंबून आहे असे दिसते.
मेडीकल काउन्सिलने डॉक्टरांची युनियन असल्यासारखे काम केलेले नाही. इन फॅक्ट, अत्यंत जाचक एथिक्स फॉर्म्युलेट केलेले आहेत.

नंदन Fri, 15/05/2015 - 11:48

अमेरिकेवर झालेल्या ११ सप्टेंबरच्या हल्ल्यातल्या हल्लेखोरांत एकही इराकी नागरिक नसताना, सद्दामकडे 'वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन' असल्याची आवई उठवून, जॉर्ज बुशने २००३ मध्ये (९/११ नंतर जवळजवळ दोन वर्षांनी) केलेल्या आक्रमणाबद्दल; अलीकडे कनिष्ठ बंधू जेब बुश यांनी केलेल्या काही विधानांबद्दल (आणि लगेच केलेल्या घूमजावाबद्दल) सध्या गदारोळ सुरू आहे.

जॉन स्टुअर्टने, त्याच्या खास शैलीत घेतलेला समाचार:

(बाकी हा अडचणीत टाकणारा प्रश्न जेबकाकांना 'फॉक्स न्यूज'वरच विचारला गेला म्हणून बरं, नाहीतर नेहमीप्रमाणे लेमस्ट्रीम मीडिया इ. पळपुटी 'पेलिन'कुई सुरू झाली असती!)

पण मुख्य बातमी ती नाही. सामान्य जनता सोडाच, पण अलीकडे प्रसिद्ध झालेल्या कौलानुसार बहुसंख्य रिपब्लिकनांनाही इराकवर आक्रमण ही घोडचूक होती, असं वाटू लागलं आहे. त्याचंच प्रतिबिंब जेब बुशच्या प्रतिस्पर्धी रिपब्लिकन उमेदवारांच्या प्रतिक्रियांत (आणि जेब बुशला करायला लागलेल्या सारवासारवीत) दिसून येतं. 'On Iraq question, Jeb Bush stumbles and the GOP hopefuls pounce' हे या बातमीचं शीर्षकच बोलकं आहे.
[त्याच बातमीतून उद्धृत - "In addition to Christie, at least five other potential Bush rivals have said in recent days that they would not have backed the invasion if they knew in 2003 that the intelligence on Iraqi weapons was inaccurate: Sens. Ted Cruz (Tex.), Rand Paul (Ky.) and Marco Rubio (Fla.), plus Ohio Gov. John Kasich.']

व्हिएतनाम युद्धाप्रमाणेच, उन्माद - चिंतन - पश्चात्ताप हेही एका तपाचे चक्रनेमिक्रमेण.

टिपीके Fri, 15/05/2015 - 20:35

In reply to by नंदन

व्हिडिओ बघितला नाही पण यातील काहिहि सिद्ध होऊ शकत असेल तर एका (किंवा ४-६) देशाला देशोधडीला लावल्याबद्दल बुश आणि कंपनीवर युद्ध गुन्हेगार म्हणून खटला चालवला जाऊ शकतो का? अमेरिकन आहेत आणि त्यातही माजी अध्यक्ष त्यामुळे शक्यता नाहीच तरीही …… एक शंका

चिंतातुर जंतू Fri, 15/05/2015 - 12:00

आपल्या पंप्रंचा चीन दौरा माध्यमांत चांगलाच गाजतो आहे. गॉगल घालून टेराकोटा वॉरियर्स पाहायला गेलेल्या मोदींनी ट्वीट केलेले अनेक फोटो नेटवर विविध शीर्षकांसह झळकत आहेत. अनेक ठिकाणी त्याविषयी बातम्या आल्या आहेत -
Dark Shades And #ModiSwag Inside China's Terracotta Warriors Museum Has Twitter In Splits
#ModiInChina: Modi visits Chinese museum, becomes a butt of jokes on Twitter
'You Talking to Me?' Twitter Hearts This Photo of PM in China
Arey zara Feviqwik dena: Twitter reacts to PM Modi poking terracotta warrior figure
आणखी काही फोटो

गब्बर सिंग Fri, 15/05/2015 - 12:20

In reply to by चिंतातुर जंतू

चिंजं, मोदींना उद्देशून सर्वात चांगले विशेषण कोणते वापराल ?

सर्वात चांगले म्हंजे "हिरो", "चलाख", "मार्केटिंग ची गेम जाणणारा", "भ्रष्ट नसलेला", "अनुभवी", "हिंदूंचा तथाकथित तारणहार" अशी विशेषणे नकोत. ती सगळ्यांनाच माहीती आहेत. (ही विशेषणे सत्याधारीत आहेत असे मी म्हणत नाहिये. पण बहुतेकांना ही विशेषणे माहीती आहेत.)

चांगली विशेषणे म्हंजे - competent, result oriented, efficient, go-getter, consensus-builder, problem-solver, strong leadership qualities, orator, visionary वगैरे. किंवा तत्सम. जे लोकांना माहीती नाही पण पंप्र मधे इष्ट असलेले गुण वर्णन करणारे विशेषण.

बॅटमॅन Fri, 15/05/2015 - 12:26

In reply to by गब्बर सिंग

विशेषणांची जबाबदारी चिंज घेतील याबद्दल साशंक आहे. :) जमेल तितके आडून बाण मारायची आयती संधी असताना आणि तिचा मस्तपैकी लाभ उठवल्यावरही कोण उगीच इतकं डिरेक्ट होईल?

नितिन थत्ते Fri, 15/05/2015 - 12:43

In reply to by गब्बर सिंग

>>problem-solver

या शब्दाचे अधिक स्पष्टीकरण हवे.
१. झोपडपट्ट्या गलिच्छ असतात. या प्रॉब्लेमचे एक पर्सीव्हड सोल्युशन सर्व झोपडपट्ट्या रातोरात उध्वस्त करणे हे असू शकते. (किंवा वेश्यावस्तीतल्या सर्व वेश्यांना अटक करून तुरुंगात डांबणे). पण याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणता येईल असे वाटत नाही.

ठाण्याला एक कमिशनर होते. टी चंद्रशेखर. त्यांनी पदपथावरची आणि रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व अतिक्रमणे नाहीशी केली. ज्यांनी अतिक्रमण केले होते त्या सर्वांना पर्यायी जागा देऊन. त्याने काही काळासाठी पदपथ आणि स्टेशन परिसर अतिक्रमणापासून मुक्त राहिला. पण हळू हळू नवे फेरीवाले आता पुन्हा अतिक्रमण करत आहेत.

मुळात अतिक्रमण का होते? (राहण्याच्या झोपड्या तूर्तास बाजूला ठेवल्या तरी) अधिकृत बाजाराच्या जागांमध्ये छोट्या व्यापार्‍यांसाठी जागाच नसते. पान-सिगरेटचे दुकान, चहाचे दुकान, वडापावचे दुकान मोबाइलच्या स्वस्त अ‍ॅक्सेसरीज विकणारे, भाजीवाला, झेरॉक्सवाला अशा छोट्या (सहा बाय चार फूट आकाराच्या) दुकानांची गरज असते. पण अशी दुकाने कुठल्याही प्लॅनिंगमध्ये नसतात. या व्यापार्‍यांना महापालिकेच्या मंडईतील १५ बाय २० फुटाचे गाळे परवडत नाहीत.

आता या प्रॉब्लेमचे सोल्युशन जागोजागी अशा छोट्या दुकानांना जागा देणे. (म्हणजे महापालिकेने जागा देणे नाही. एखाद्या आर्किटेक्टने अश्या दुकानांना आपल्या प्लॅनमध्ये समाविष्ट केले तर दुकानांच्या आकाराविषयी असलेल्या पालिकेच्या स्टॅण्डर्डकडे बोट दाखवून असा प्लॅन नामंजूर करू नये).

चिंतातुर जंतू Fri, 15/05/2015 - 13:21

In reply to by गब्बर सिंग

>> चिंजं, मोदींना उद्देशून सर्वात चांगले विशेषण कोणते वापराल ?

विविध समस्यांनी गांजलेल्या भारतीयांचं ते काही काळापासून चांगलं मनोरंजन करत आहेत. त्यामुळे 'मनोरंजक' किंवा राज कपूरसारखं 'शो मॅन' हे विशेषण यथायोग्य ठरेल. (माझ्या मते राहुल गांधीसुद्धा मनोरंजक आहेत; पण त्यांना ह्यांची सर नाही.)

चिंतातुर जंतू Fri, 15/05/2015 - 13:26

In reply to by गब्बर सिंग

>> competent, result oriented, efficient, go-getter, consensus-builder, problem-solver, strong leadership qualities, orator, visionary वगैरे. किंवा तत्सम. जे लोकांना माहीती नाही पण पंप्र मधे इष्ट असलेले गुण वर्णन करणारे

माझी कल्पनाशक्ती इथे थिटी पडली ह्याची कबुली देतो.

अजो१२३ Fri, 15/05/2015 - 18:31

In reply to by गब्बर सिंग

चिंज शुद्ध मोदीद्वेष्टे आहेत. वरचा प्रतिसाद त्याची साक्ष आहे.
--------------------------------------------------
http://www.aisiakshare.com/node/3667#comment-87373
इथे गब्बर, तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे असा माझा गैरसमज झालेला. कुत्ते कि दूम तेढी की तेढी.

अनु राव Fri, 15/05/2015 - 19:03

In reply to by अजो१२३

चिंज शुद्ध मोदीद्वेष्टे आहेत.

पूर्ण शुद्ध असते तर चालले असते, पण द्वेष्टे पणात पण भेसळ आहे. मोदींचा ड्रेसिंगसेंस चांगला वाटतो म्हणजे काय?
आत्ता ड्रेसिंगसेंन्स चांगला वाटला, उद्या चिजंना आख्खे मोदी च चांगले वाटायला लागले तर काय?

चिंतातुर जंतू Fri, 15/05/2015 - 19:29

In reply to by अनु राव

>> उद्या चिजंना आख्खे मोदी च चांगले वाटायला लागले तर काय?

गॉगल घातलेले मोदी तसे सेक्सी दिसतात. त्यांचं अनुकरण करत आजकाल मीदेखील गॉगल घालतो. हवं तर विक्षिप्त अदितीला विचारा. ;-)

काव्या Fri, 15/05/2015 - 19:50

In reply to by चिंतातुर जंतू

आपल्याला तर ब्वॉ फक्त फक्त रिचर्ड जेरे आत्तापर्यंत सेक्सी वाटला अन तो ही "प्रेटी वूमन" मध्ये अन त्याचं कारण होतं - the way his character treated a prostitute. अर्थात त्याचे डोळे वेडं करतात. अन he having a Scorpio ascendent & now is following Buddhism only adds to his charm.
"Graceful aging" चं अन वय वाढल्यानंतर अधिकच देखणं दिसण्याचं दुसरं तोडीस तोड उदाहरण मला आठवत नाही.

____
मोदी डायनॅमिक दिसतात पण ....well, sexy is too far-fetched ;)

नंदन Sat, 16/05/2015 - 14:24

In reply to by रोचना

पण गाढवाशेजारी फोटो काढून घेतला की नाही?

तरी मोदी हे छुपे डेमोक्रॅट आहेत, असा गब्बरला पूर्वीपासूनच संशय होता! ;)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 18/05/2015 - 01:52

In reply to by चिंतातुर जंतू

गॉगल घातलेले मोदी तसे सेक्सी दिसतात. त्यांचं अनुकरण करत आजकाल मीदेखील गॉगल घालतो. हवं तर विक्षिप्त अदितीला विचारा. (डोळा मारत)

चेहेरा बघण्यालायक असलेले लोक गॉगल घातल्यावर जास्त सुंदर दिसत नाहीत. पण गॉगल घातलेले मोदी दृश्यकलाभ्यासकांना 'तसे सेक्सी' दिसत असतील तर मग वेगळा विचार करावा लागेल.

कोणाचं अनुकरण करत चिंतातुर जंतू गॉगल घालतात ते मला माहीत नाही, पण ते गॉगल घालतात आणि गॉगल घालून "मोठे डॉन हुआन दिसतात नै" असं मी त्यांना आणि अन्य एका मित्राला म्हटल्याचं मला आठवतं.

चिंतातुर जंतू Fri, 15/05/2015 - 19:05

In reply to by अजो१२३

>> चिंज शुद्ध मोदीद्वेष्टे आहेत. वरचा प्रतिसाद त्याची साक्ष आहे

मी आशा अद्यापही सोडलेली नाही, पण 'आय अ‍ॅम नॉट इझिली इम्प्रेस्ड' म्हटल्यामुळे मी जर तुमच्या मते 'द्वेष्टा' म्हणवून घ्यायला पात्र होत असेन तर तो माझा प्रश्न नाही. माझ्या मते 'समीक्षकी' असण्याचा 'आय अ‍ॅम नॉट इझिली इम्प्रेस्ड' हा एक अंगभूत भाग असतो. त्यात व्यक्तिद्वेष शोधायला जाल तर तुमच्या वक्तव्यांची जबाबदारी मी घेऊ शकत नाही. धन्यवाद आणि शुभेच्छा.

अजो१२३ Fri, 15/05/2015 - 19:22

In reply to by चिंतातुर जंतू

मी आशा अद्यापही सोडलेली नाही.

मी आशेबद्दल नाही बोलत चिंज. आशा तुम्हाला त्या दिवशी होती, आज गेली असं होऊ शकतं. शिवाय तुम्हाला आशा असणं हा मोदींचा सद्गुण नव्हे.

पण तुम्ही

भारताचं खरं आणि दीर्घकालीन भलं करावं (जे सध्याच्या काँग्रेसला, समाजवाद्यांना, 'आप'ला किंवा डाव्यांनाही जमणार नाही) अशीच माझीही आशा आहे.

असं म्हणाला आहात. तर गब्बरच्या पर्यायांत वा अजून एखादा शब्द लिहून, थोडं बरं उत्तर म्हणून, "मोदींत काँग्रेसला जे जमणार नाही ते करू शकण्याचा" जो गुण क्षणःकाल दिसला तो (क्षणःकाल तरी दिसला होता म्हणून) सांगीतला असतात तर ते उत्तर आपला आदर दुणावून गेलं असतं.

तुम्हांस असा दिसलेला गुण (आणि तुमची आशा) मागे मला अपिल करून गेले. I thought it made sense to entertain your observations on Mr. Modi.

चिंतातुर जंतू Fri, 15/05/2015 - 19:27

In reply to by अजो१२३

>> "मोदींत काँग्रेसला जे जमणार नाही ते करू शकण्याचा" जो गुण क्षणःकाल दिसला तो (क्षणःकाल तरी दिसला होता म्हणून) सांगीतला असतात तर ते उत्तर आपला आदर दुणावून गेलं असतं.

तो गुण मला दिसलेला नव्हता; त्यांनी गुजरातेत कसा कायापालट घडवून आणला वगैरे गोष्टींमध्ये तो गोष्टी सांगणार्‍यांना अभिप्रेत होता. मला दिसलेला नसला तरीही तो प्रत्यक्षात असेल असा संशयाचा फायदा मी अजूनही देतो; आणि म्हणूनच अद्याप मला आशा आहे.

अजो१२३ Fri, 15/05/2015 - 19:45

In reply to by चिंतातुर जंतू

आशावादी तर मीही आहे. त्यांनी जनतेचा कौल मानून भारताचं खरं आणि दीर्घकालीन भलं करावं (जे सध्याच्या काँग्रेसला, समाजवाद्यांना, 'आप'ला किंवा डाव्यांनाही जमणार नाही) अशीच माझीही आशा आहे.

आणि

तो गुण मला दिसलेला नव्हता; त्यांनी गुजरातेत कसा कायापालट घडवून आणला वगैरे गोष्टींमध्ये तो गोष्टी सांगणार्‍यांना अभिप्रेत होता. मला दिसलेला नसला तरीही तो प्रत्यक्षात असेल असा संशयाचा फायदा मी अजूनही देतो; आणि म्हणूनच अद्याप मला आशा आहे.

पहिल्या विधानात दुसरं विधान अभिप्रेत आहे असं जाणवतं का?

चला, तुम्हाला दिसत नसलेल्या गोष्टी प्रत्यक्षात असू शकतात हे ही नसे थोडके.

नितिन थत्ते Sat, 16/05/2015 - 07:10

In reply to by चिंतातुर जंतू

>>तो गुण मला दिसलेला नव्हता; त्यांनी गुजरातेत कसा कायापालट घडवून आणला वगैरे गोष्टींमध्ये तो गोष्टी सांगणार्‍यांना अभिप्रेत होता.

+१. "गोष्टी सांगणार्‍यांना" आणि तो फोटोशॉप करून दाखवला गेला होता.

अजो१२३ Mon, 18/05/2015 - 12:46

In reply to by नितिन थत्ते

अशा लोकांना पुण्याच्या शिवाजीनगर, स्वारगेट बसस्थानकांवरचा मुताचा भयंकर दर्प येत नाही पण ते बडोद्याचे हाय-फाय बसस्थानक मात्र पक्के विराण, उदास, भकास, गंडलेले इ इ वाटते.
=====================================================================================================
आणि कधी प्रत्यक्ष गुजरात सरकार सोबत काम केलं आहे का?
गुजरातच्या मनपांची टेंडर्स आणि पुणे मनपांची टेंडर्स कधी तुलना केली?
टेंडर्स किती प्रमाणात चूक असल्याने दोन्हीकडे कँसल होतात ते पाहिलंत?*
Why Ahmedabad is an outstanding example of successful BRT and Delhi BRT is a world famous failure?
भू-अधिग्रहण, यूटीलिटिज गुजरातेत किती वेगाने मिळतात ते पाहिलंत?
मनपा किती फास्ट रिस्पाँड करतात ते पाहिलंत?
आणि हे मी केवळ मनपांबद्दल बोलतोय. राज्य सरकारबद्दल नाही.

===================================================================================
पुणे महानगरपालिकेची टेंडर्स पाहून मला पुणेकर असल्याची लाज वाटते. They are so frustratingly unprofessional. आणि स्टाफचे काम फक्त चांगले सल्लगार नेमून योग्य टेंडर्स नबवून घेणे इतकेच आहे!!!!
====================================================================================

फोटॉशॉप वैगेरे म्हणण्याआधी अगोदर interact with the government. तुम्हाला गुजरातमधे फिरताना न्यूयॉर्क सारखी फिलिंग यायची अपेक्षा असेल तर सोडा.
पण साधा विचार करा ना... बाँबे हाय वरून महाराष्ट्र आणि गुजरात दोहोंना तेल नि वायू मिळे. दोहोंच्या हिंटरलँडमधे खूप मोठे मार्केट आहे. (१९९२ ला चालू झालेले दाभोळचा "खासगी" कॅप्टीव पावर साठीचा रिगॅस टर्मिनल देखिल २०१० पर्यंत बोंबललेला.)
गुजरातमधे "नॉन्-कॅप्टीव" टर्मिनल्स विकसित झाले. केंद्र सरकारचे झाले. खासगी टर्मिनल्स झाले. "राज्य सरकारचे देखिल" होत आहेत? महाराष्ट्रात काय होतंय? घंटा?

फोटोशॉप म्हणण्याआधी खरोखरच गुगल इमेजेस मधे जाऊन गुजरातच्या विकासाची चित्रे पहा.
तीच महाराष्ट्राची पहा.
आणि हो, फक्त कंप्लीटेड टू कंप्लीटेड.

नितिन थत्ते Mon, 18/05/2015 - 14:03

In reply to by अजो१२३

गुजरात मध्ये फेब्रु २०१० ते डिसेंबर २०११ राहिलेलो आहे. तेव्हा प्रत्यक्ष पाहण्याचा मुद्दा माझ्या बाबतीत उद्भवतच नाही.

>>अशा लोकांना पुण्याच्या शिवाजीनगर, स्वारगेट बसस्थानकांवरचा मुताचा भयंकर दर्प येत नाही पण ते बडोद्याचे हाय-फाय बसस्थानक मात्र पक्के विराण, उदास, भकास, गंडलेले इ इ वाटते.

बडोद्याच्या नव्या हाय फाय स्थानकाविषयी मी कधी काही लिहिलेले नाही. मी गुजरातमध्ये होतो तेव्हा बडोद्याचे स्थानक जुनेच होते.

बाकी असो.... मी बातमीवरून दिसणारे परसेप्शन दाखवले. महाराष्ट्रातील "सरकार बदलल्यानंतर" व्यापार्‍यांना महाराष्ट्र सोडून जावेसे वाटते आहे एवढीच फॅक्ट आहे.

अजो१२३ Mon, 18/05/2015 - 21:13

In reply to by नितिन थत्ते

मग नव्या महाराष्ट्र सरकारला शिव्या घाला.
एकिकडे नव्या महाराष्ट्र सरकारला शिव्या घालायच्या, दुसरीकडे गुजरात सरकारला फोटोशॉप म्हणायचे तिसरीकडे (फोटोशॉपला बळी पडून वा अन्यथा अर्थात् नव्या महाराष्ट्र सरकारचा काही दोष नसताना) व्यापारी सोडून चालले म्हणायचे. तिघेही च्युत्ये कसे असतील?

नितिन थत्ते Mon, 18/05/2015 - 21:35

In reply to by अजो१२३

का? मी अधिक व्यापक निष्कर्ष का काढू नयेत?

धातुव्यापार्‍यांच्या म्हणण्याप्रमाणे चांगली सरकारे क्रमाने अशी आहेत.

१. महाराष्ट्राचे आधीचे सरकार २. गुजरातचे सध्याचे (मोदीविरहित) सरकार ३. महाराष्ट्रातले भाजप सरकार ४. (आधीचे) मोदीसहित गुजरात सरकार

>>गुजरात सरकारला फोटोशॉप म्हणायचे
सुधारणा - आधीच्या मोदीसहित गुजरात सरकारला फोटोशॉप म्हणायचे.

अजो१२३ Tue, 19/05/2015 - 00:04

In reply to by नितिन थत्ते

इतक्या व्यापक अर्थाला काही अर्थ असता तर धातुव्यापारी १६ मे २०१४ ला भारताबाहेरच गेले नसते का? (बहुतेक विसरला असाल तर - मोदींना गुजरात भाजपने पायौतार करून घरी पाठवलेले नाही.)
आणि हो, धातुव्यापार्‍यांचा इंस्टिंक्ट इतका शार्प असता असता तर ज्या दिवशी टाटाचा प्लांट गुजरातमधे सानंदला आला तेव्हा ते लग्गचे चंबुगबाळे आवरून बंगालमधे सिंगूरला नसते का गेले?
---------------------------------------------------
काँग्रेसींनी असे चित्रविचित्र* क्रमोपक्रम लावल्यामुळेच क्रमात लावायच्या चारपैकी तीन गोष्टी गैरकाँग्रेसी झाल्यात. अजून असेच क्रम लावले चालले तर सगळेच क्रम भाजप भाजप लावत बसतील काँगी.
============================================================================

गेली दहा वर्षे गुजरातमध्ये मोदींचे सरकार होते आणि महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीचे @#$%^&!* सरकार होते. एवढ्या काळात इन्स्पेक्टर राज चा त्रास होऊन त्यांना स्थलांतर करावे लागले नाही. आता महाराष्ट्रात नवे व्यापाराभिमुख सरकार आल्यावर इन्स्पेक्टर राजचा त्रास होऊ लागला आहे का?
आणखी रोचक बाब म्हणजे जोवर मोदी तिकडे होते तोवर गुजरात स्थलांतरयोग्य नव्हते. (महाराष्ट्रापेक्षा चांगले नव्हते?) आता मोदी तिथे नाहीत आणि महाराष्ट्रात भाजप सरकार आहे तरीही गुजरात (मोदींच्या अनुपस्थितीत अधिक) स्थलांतरयोग्य आहे?
खरे तर अशा गोष्टींवरून सरकारविषयी काही निष्कर्ष काढणे तितकेसे बरोबर नाही. पण २०१४ पूर्वी असेच निष्कर्ष काढले जात होते म्हणून आतासुद्धा असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही.

बातमी.

हा धातूबाजार अहमदाबादजवळील अडालज येथे अदानी समूहाकडून उभारल्या जात असलेल्या औद्योगिक विभागात स्थलांतरित होणार आहे.

अदानी मोदीच्या खिशात आहेत. धातुव्यापारी पुन्हा च्युते ठरत आहेत. चौथ्याच काय, मला वाटतं ते पाचव्या क्रमांकाचा चॉइस निवडत आहेत.
=================================================================================================================

महाराष्ट्रात काँग्रेस + गुजरातेत मोदी = महाराष्ट्रातच राहिलेलं बरं
महाराष्ट्रात भाजप + गुजरातेत मोदी नाहीत = गुजरात महाराष्ट्रापेक्षा बरा.

मोदी परदेशातून येण्यापूर्वी धातू व्यापार्‍यांना भारताचे इंतरनॅशनल वॉटर्स किती नॉटीकल माईल्सवर संपतात ते कळवून टाकू.
==============================================================================================================
http://www.dnaindia.com/mumbai/report-maharashtra-to-cancel-cases-again…
तुम्ही ज्यांना चॉईस नं १ म्हणतात ते सरकार काही काळापूर्वी या धातुव्यापार्‍यांना चक्क जेलमधे घालणार होते.

नितिन थत्ते Tue, 19/05/2015 - 08:37

In reply to by अजो१२३

माझ्या मूळ प्रतिसादातच असल्या गोष्टींवरून सरकारविषयी काही ठरवणे बरोबर नाही असे म्हटलेले आहे.

It was only to point out that similar analyses splurged on social media was used to create a perception about the previous government being unfriendly to the business. उद्योग स्थलांतरित होणे हा सरकारच्या नाकर्तेपणाचा पुरावा म्हणून दाखवला जात होता.

प्रत्यक्षात जुन्या सरकारच्या काळात सुखेनैव चालू असलेले काळे धंदे नव्या राज्यसरकारच्या काळात गोत्यात आले असतील म्हणूनही हे स्थलांतर होत असेल (एक शक्यता). युनियन कार्बाईड (अर्जुनसिंगांचे) मध्यप्रदेश सरकार बिझिनेस फ्रेण्डली आहे आणि अमेरिकन सरकार (प्रदूषण करू देत नाही म्हणून) बिझिनेस फ्रेण्डली नाही असे १९८०-८५ मध्ये म्हणत असेल.

अजो१२३ Tue, 19/05/2015 - 12:09

In reply to by नितिन थत्ते

माझ्या मूळ प्रतिसादातच असल्या गोष्टींवरून सरकारविषयी काही ठरवणे बरोबर नाही असे म्हटलेले आहे.

२०१४ पूर्वी गुजरातच्या सरकारबद्दल, तिथे धंदे स्थलांतरित होत आहेत यात, त्याचे काही योगदान नाही अशी थेरी तुम्हाला विकायची होती. आणि ते मला मान्य नाही. धंदे का शिफ्ट होतात याची सरकारशी संबंधित व असंबंधित अशी अनेक कारणे असतात. उगाच दरवेळी सरकारला गोवणे गरजेचे नाही.
सोशल मिडियावर पूर्वाश्रमीचे महाराष्ट्र सरकार बिझनेस फ्रेंडली नव्हते असा अपप्रचार होत असेल तर त्याचा गुणात्मक प्रतिवाद केस बाय केस (आणि तिकडेच) करा.
पण तुम्हाला त्या सरकारचं कौतुक आहे म्हणून उलटीसुलटी समीकरणे मांडून गुजरातच्या मोदी सरकारला मधे खेचू नका. I will not let that happen.
==========================================================================================================

प्रत्यक्षात जुन्या सरकारच्या काळात सुखेनैव चालू असलेले काळे धंदे नव्या राज्यसरकारच्या काळात गोत्यात आले असतील म्हणूनही हे स्थलांतर होत असेल .

संभव आहे. शिवाय ते शेडूल्स वैगेरे पाहायला लागतील पण २०१२ मधेच (मोदी असताना) स्टेनलेस स्टील वरचा जीव्हॅट १% केलेला. आणि मोदी आणि आनंदी ही पराकोटीची भिन्न सरकारे असतील, जसे तुम्ही म्हणताय, तर आनंदी सरकार हा निर्णय उलटावायची शक्यता प्रचंड आहे. कारण राज्य सरकारला हा जबर्‍या रेव्हेन्यू लॉस आहे. हा रेट फारच कमी आहे.
============================================================================================================
फायनली तुमच्या प्रतिसादात अजूनही बरीच संदिग्धता आहे. मंजे मोदींनी, इ इ नी १०१४ पूर्वी फोटोशॉप केले का नाही बद्दल फायनल मत कळत नाही.
पण हे लक्षात घ्या -
एल एन जी च्या क्षेत्रात जी एस पी सी ही गुजरात सरकारची विशाल कंपनी आहे. आपल्या भिक्कार देशात "राज्य सरकारकडे" ऑयल आणि गॅस मधे इतका कंपिटन्स असणं प्रचंड कौतुकाचं आहे. आता उत्तर भारतात जाणारा गॅस हा गुजरातेतून अधिक सोयीस्कर पडतो असे म्हणता येते, पण ऑस्ट्रेलियन आणि तिकडचा गॅस न्यायला बंगालला देखिल तितकाच चान्स होता. त्यांना एल एन जी चा लाँग फॉर्म देखिल माहित नसावा अशी हालत आहे. ते असोच, आता तर आंध्राचा गॅस दिल्लीला येतो...म्हणजे कोणाला किती चान्स होता ते कळतं.
==========================================================================================================
२०१४ च्या निवडणूकीत भाजपनी ही ही वचने दिली आणि ती पूर्ण झाली नाहीत, सरकारने त्याबद्दल काहीही केलेले नाही, इ इ नाव घेऊन म्हणा, तिथे माझा आपल्याला फुल सपोर्ट असेल.

अजो१२३ Tue, 19/05/2015 - 13:23

In reply to by गब्बर सिंग

बद्धकोष्ठ झाल्यावर जगाचं काय चाललंय आपलं काय चाललंय यामधे काही लिंक राहत नाही असा फिडबॅक आहे.

आडकित्ता Fri, 15/05/2015 - 19:46

In reply to by गब्बर सिंग

चिंजं, मोदींना उद्देशून सर्वात चांगले विशेषण कोणते वापराल ?

मायबोलीवर एक जागो मोहन प्यारे आहेत.
त्यांनी 'फिरेंद्र' वा टुरेंद्र(Tourendra) मोदी असे नामकरण केलेले आहे.
हे टुरेंद्र मला खास आवडलेले विशेषण ;)

चिंतातुर जंतू Fri, 15/05/2015 - 13:23

In reply to by गब्बर सिंग

>> मोदींची शाल अत्यंत आवडली. मोदींची आहे म्हणून नाही. तिची रंगसंगती मस्त आहे म्हणून.

सर्वसाधारण भारतीय पुरुषांपेक्षा मोदींचा ड्रेस सेन्स चांगला आहे (किंवा त्यांचं बाह्यरूप मॅनेज करणार्‍या कंपनीचा; अर्थात, 'तो' सूट वगळता). मात्र, मोदींनी थोडं शरीर आटोक्यात आणायला हवं. पोट आणि कंबर चालताना अंमळ बेढब दिसते.

नंदन Fri, 15/05/2015 - 13:46

In reply to by गब्बर सिंग

उगीचच हे सॉनेट आठवलं. मे महिना वगैरे असल्याने कदाचित समयोचित इत्यादी ;)

Shall I compare thee to a summer’s day?
Thou art more lovely and more temperate.
Rough winds do shake the darling buds of May,
And summer’s lease hath all too short a date.

नगरीनिरंजन Fri, 15/05/2015 - 14:02

In reply to by चिंतातुर जंतू

चिनी अध्यक्ष भारतात आले तेव्हा ट्विटरवर टिवटिव झाली होती का? की चिनी अध्यक्ष प्रातःवंदनीय झालेत जगासाठी?

चिंतातुर जंतू Fri, 15/05/2015 - 19:08

In reply to by चिंतातुर जंतू

ह्या गॉगलधारी फोटोंच्या पार्श्वभूमीवर नेमकी ही बातमी देणारी आपली माध्यमं कित्ती कित्ती मोदीद्वेष्टी आहेत नाही! देव त्यांना क्षमा करो, कारण ती काय करताहेत ते त्यांना कळत नाही.

गॉगलमुळे जिल्हाधिका-यांना नोटीस!

ऋषिकेश Mon, 18/05/2015 - 13:32

In reply to by चिंतातुर जंतू

मराठी वृत्तपत्रांनी तरी या भेटीवर टिकाच केलेली दिसतेय.

म.टा.चा अग्रलेख:

त्याचवेळी अलीकडे भारतीय भूमीत तिबेटकडून चिनी सैन्यांची झालेली आगळीक ताजी आहे. चीनच्या ज्या सीसीटीव्ही या दूरचित्रवाणीशी भारतीय दूरदर्शनचा करार झाला ते सरकारचे चॅनल अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग नसल्याचा प्रसार करते.

भारताची चीनशी १५ वर्षांपूर्वी असलेली एक अब्ज डॉलर्सची व्यापारतूट आता ३८ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. ही खूप मोठी तफावत आहे. भारतीय उद्योगांना, विशेषतः औषधे आणि सेवाक्षेत्रांना चीनमध्ये विरोध आहे. असा असमतोल असताना केवळ दोन्ही देशांतील प्रमुख नेत्यांनी एकत्र झोपाळ्यावर बसल्याने अथवा सेल्फी फोटो काढल्याने ते देश परस्परांचे मित्र होत नाहीत.

मटा.मधील काही टिका अनाठायी वाटली:

गेल्या वर्षी शी जिनपिंग भारतात आले तेव्हा उभय देशांत २० अब्ज डॉलर्सचे व्यावसायिक करार झाले होते. त्यापैकी दोन चीनकडून उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक पार्कविषयक होते. मोदी यांना त्यासाठीची जमीन उपलब्ध करून देण्यात अजून यश आलेले नाही. त्यापैकी एक पार्क मोदी यांच्या गुजरातमध्ये वडोदरात होणार असले तरी त्यासाठी आतापर्यंत केवळ २८ टक्के जमीन संपादित झाली आहे

मुळात देशात जमिन अधिग्रहण कायदा आहे, मोदी सरकारच्या अध्यादेश सध्या लागू आहे. अशावेळी अधिग्रहण धीमे होत असेल तर त्याचा दोष पूर्णपणे सरकारला देता येणार नाही. देशात यावर चर्चा चालु आहे, थोडा उशीर झाला तरी चालेल अधिग्रहणात नागरीकांवर अन्याय न होणे अधिक अगत्याचे ठरावे

======

लोकसत्ताचा अग्रलेख अधिक टोकदार आणि तीक्ष्ण टिका करणारा - टोमणे मारणारा - आहे.

पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यात असताना यावेळी असे काही घडले नाही, असे ज्यांना वाटत असेल त्यांना याहूनही अधिक गंभीर काही घडले त्याची जाणीव करून द्यावयास हवी. ते म्हणजे मोदी चीनमध्ये असताना त्या देशाच्या सरकारने अधिकृतपणे प्रसृत केलेला भारताचा नकाशा. या नकाशात जम्मू-काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश भारतापासून विलग करून दाखवण्यात आले असून मोदी यांनी या दौऱ्यात या संदर्भात एक शब्दही काढल्याचे ऐकिवात नाही.

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चीनकडे डोळे वटारून पाहण्याची िहमत दाखवावी, पण ती त्यांच्याकडे नाही असे मोदी यांचे म्हणणे होते, याची आठवण या प्रसंगी करून देणे आवश्यक ठरते. याचे कारण असे की आपल्या या यशस्वी दौऱ्यात मोदी यांनी कोणत्या प्रश्नावर चीनवर डोळे वटारले? अरुणाचली नागरिकांना व्हिसा देण्याचा वादग्रस्त मुद्दा मोदी यांनी या दौऱ्यात उपस्थितदेखील केला नाही. हा मुद्दा डोळे वटारण्याच्या धोरणाचाच भाग होता काय?

माझे ते माझे आणि तुझे तेही माझेच या चीनच्या धोरणास मोदी यांनी आपल्या दौऱ्यात आक्षेप घेतल्याचे वा किमान तसा प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. उलट चिनी प्रवाशांना इलेक्ट्रॉनिक व्हिसाची सवलत मोदी यांनी या दौऱ्यात जाहीर केली. तेव्हा हे जे काही झाले त्यालाच भव्य यश म्हणावे अशी मोदी यांची इच्छा दिसते. ती पूर्ण करावी असे ज्यांना वाटते त्यांच्या समजशक्तीस दंडवत.

कम्युनिस्ट चीनला प्रसिद्धीपरायण सरकारने नीटसे जोखलेच नाही काय?

अजो१२३ Mon, 18/05/2015 - 13:44

In reply to by ऋषिकेश

पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यात असताना यावेळी असे काही घडले नाही, असे ज्यांना वाटत असेल त्यांना याहूनही अधिक गंभीर काही घडले त्याची जाणीव करून द्यावयास हवी. ते म्हणजे मोदी चीनमध्ये असताना त्या देशाच्या सरकारने अधिकृतपणे प्रसृत केलेला भारताचा नकाशा. या नकाशात जम्मू-काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश भारतापासून विलग करून दाखवण्यात आले असून मोदी यांनी या दौऱ्यात या संदर्भात एक शब्दही काढल्याचे ऐकिवात नाही.

=====================================
बिंगो!!!
-----------------------------------------
चीन सरकार एरवी कसा नकाशा काढते? बॉर्डर डिस्प्यूट तोच आहे ना? कि सामान्य डिस्प्य्यूटपेक्षा जास्त भाग विवादित दाखवलाय?
-------------------------------------------
सगळेच बीजेपीवाले मूग गिळून गप्प कसे? कैतरी रिअ‍ॅक्शन द्यायची.

नगरीनिरंजन Sat, 16/05/2015 - 13:52

In reply to by गब्बर सिंग

भारतीय संस्कृती स्त्रीच्या योनीत एकवटलेली आहे गोळी सारखी. लग्नाआधी योनीत "फॉरिन ऑब्जेक्ट" आल्याचं कोणाला कळलं तर संस्कृतीची गोळी फुटते. लग्नात ही गोळी काढायचा एक विधी असतो. लाजा होम का कायसंसं म्हणतात त्याला.

अस्वल Sat, 16/05/2015 - 22:43

In reply to by गब्बर सिंग

कोणीतरी शेवटी योग्य काम करतंय. हिंदू जनजाग्रण समितीचं अभिनंदन!
सज्जन संस्कृतीसंपूर्ण भारतीय लोक इंटरनेटवर गेले की सनीताई त्यांना आपल्या जाळयात ओढतात, हे अतिशय चूक आहे.
इच्छा नसतानाही आपोआप गायब होणार्‍या बर्म्युडा ट्रँगल्मधल्या जहाजांना काय वाटत असेल तशीच परिस्थिती आहे. सनीताईंवर अंकुश ठेवायलाच पाहिजे.

चिंतातुर जंतू Sun, 17/05/2015 - 15:09

In reply to by गब्बर सिंग

>> ही अचिव्हमेंट कशीकाय ? त्यात एवढं ढोल बडवण्यासारखं काय आहे ??

"Adani, Bharti get bulk of deals worth $22bn with China Inc" इथून उद्धृत -

Twenty six pacts worth $22 billion! That was the sum and substance of the pacts signed between the businesses of India and China on Saturday, the major ones accounted for by the Adani and Bharti groups, coinciding with Prime Minister Narendra Modi's visit to Shanghai.

[...]

The Adani Group, signed pacts in the areas of power, ports, special economic zones, industrial parks and gas power generation. Specific pacts were for sister relationship with a Chinese port, and possible financing of Mundra Power Project, and for a special zone in the same port city.

थोडक्यात, अडाणीसाठी ही अचीव्हमेंटच आहे की नाही?

गब्बर सिंग Sun, 17/05/2015 - 15:57

In reply to by चिंतातुर जंतू

प्रश्नच नाही. अडाणीची अचिव्हमेंट आहेच. व तेच सुयोग्य आहे. गेली दहा वर्षे जे काही economics of the worthless and for the worthless चालले होते त्याला हे छोटेसेच पण चोख प्रत्युत्तर आहे. मी अडाणींची तारीफच करतो. दुसरे म्हंजे - wealth does not stay with the profligates and prodigals. ती उद्योगपतींच्या कडेच टिकते. त्यामुळे उद्योगपतींना मदत करून (मोदी) सरकार सुयोग्य कामच करीत आहे.

परंतु त्यापलिकडे काही अस्तित्वात नाही असे गृहित धरून तुम्ही चालत नाही आहात असा विचार करायला मला आवडेल.

चिंतातुर जंतू Sun, 17/05/2015 - 16:29

In reply to by गब्बर सिंग

>> परंतु त्यापलिकडे काही अस्तित्वात नाही असे गृहित धरून तुम्ही चालत नाही आहात असा विचार करायला मला आवडेल.

वर्षपूर्तीचे प्रगतीपुस्तक - अशा लेखांमधून वेगळी अचीव्हमेंट सांगितली जाते आहे - प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, पिकांचे ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्याचा तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्याचा निर्णय वगैरे गोष्टी अचीव्हमेंट म्हणून सांगितल्या जात आहेत.

जाता जाता - सरकार अधिक पारदर्शक असेल, आणि रॉबर्ट वड्रांसारख्या विशिष्ट व्यक्तींबाबत पक्षपाती नसेल अशी अपेक्षा मोदींना मत देताना काही लोकांची होती. त्यांची प्रतिक्रिया काय असेल?

गब्बर सिंग Sun, 17/05/2015 - 16:56

In reply to by चिंतातुर जंतू

म्हणून तर मी "गेली दहा वर्षे" हा शब्दप्रयोग केला.

( रम चे चार शॉट लावूनही मला चढलेली नाही ??? आश्चर्य आहे. )

-----

जाता जाता - सरकार अधिक पारदर्शक असेल, आणि रॉबर्ट वड्रांसारख्या विशिष्ट व्यक्तींबाबत पक्षपाती नसेल अशी अपेक्षा मोदींना मत देताना काही लोकांची होती. त्यांची प्रतिक्रिया काय असेल?

"पक्षपाती" हा शब्द ओव्हरयुज्ड व ओव्हररेटेड आहे. सरकारने त्या ज्या योजना जाहीर केल्यात उदा. "अटल पेन्शन योजना" व "पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्याचा तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्याच्या" योजना ह्या पक्षपातीच आहेत. नसल्यास कशा नाहीत ते सांगा. नुकसान झालेल्या प्रत्येकास नुकसान भरपाई देण्याची योजना आहे ??? फक्त शेतकर्‍यांसाठीच ही योजना का असावी ???

काँग्रेस सरकारने सुद्धा (वड्रा बाजूला ठेवले तरी) प्रचंड पक्षपाती योजना राबवल्या होत्या. अन्न सुरक्षा योजना ही पक्षपाती नाही ??? आता तुम्ही असं म्हणाल की - व्यक्ती व व्यक्तीसमूह यात फरक आहे व या योजना व्यक्तीसमूहासाठी असून विशिष्ठ व्यक्तीसाठी नाहीत - तर आर्ग्युमेंट थोडे ठीकठाक होऊ शकते पण "पक्षपाती नाहीच" असे म्हणता येत नाही. पक्षपाती नसणे म्हंजे कोणत्याही दोन नागरिकांमधे कोणत्याही आधारावर भाव न करणे. प्रत्येक नागरिक हा व्यक्ती म्हणूनच बघणे.

चिंतातुर जंतू Sun, 17/05/2015 - 17:11

In reply to by गब्बर सिंग

>> सरकारने त्या ज्या योजना जाहीर केल्यात उदा. "अटल पेन्शन योजना" व "पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्याचा तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्याच्या" योजना ह्या पक्षपातीच आहेत.

>> काँग्रेस सरकारने सुद्धा (वड्रा बाजूला ठेवले तरी) प्रचंड पक्षपाती योजना राबवल्या होत्या.

मी असंच म्हणतो आहे की कॉन्ग्रेसच्या अशा योजनांना पक्षपाती म्हणणारे जे लोक मोदींचे मतदार होते त्यांची ह्या नव्या योजनांविषयीची प्रतिक्रिया काय असेल? कारण, ह्या योजना म्हणजे सरकारची मोठी अचीव्हमेंट आहे असं उच्चरवानं सांगितलं जातंय.

गब्बर सिंग Sun, 17/05/2015 - 17:28

In reply to by चिंतातुर जंतू

ह्या योजना म्हणजे सरकारची मोठी अचीव्हमेंट आहे असं उच्चरवानं सांगितलं जातंय.

ओके.

माझ्या मते ह्या योजना म्हंजे सरकारची अचिव्हमेंट अजिबात नाही. जनतेतील काही गटांसमोर तुकडे टाकणे म्हंजे योजना असू शकेल पण अचिव्हमेंट नाही. या योजना म्हंजे - थोडक्यात - a way to transfer the costs and/or risks faced by those "groups" (beneficiaries) to taxpayors or investors into Govt treasury bonds.

रोचना Sun, 17/05/2015 - 16:25

In reply to by चिंतातुर जंतू

छ्या. नीट वाचायला हवं.

Twenty six pacts worth $22 billion!

मी चुकून घाईघाईत Twenty six packs वाचलं. ५६" माहित होतं, पण हे म्हणजे फारच झालं असं वाटलं.

नितिन थत्ते Mon, 18/05/2015 - 10:44

धातूबाजार गुजरातला जाणार

विक्रीकर आणि 'इन्स्पेक्टर राज' ला कंटाळून मुंबईतील धातूबाजार (मेटल मार्केट) व्यापाऱ्यांनी गुजरातला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे.

इथे एक अतिशय रोचक "योगायोग" दिसतो.

गेली दहा वर्षे गुजरातमध्ये मोदींचे सरकार होते आणि महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीचे @#$%^&!* सरकार होते. एवढ्या काळात इन्स्पेक्टर राज चा त्रास होऊन त्यांना स्थलांतर करावे लागले नाही. आता महाराष्ट्रात नवे व्यापाराभिमुख सरकार आल्यावर इन्स्पेक्टर राजचा त्रास होऊ लागला आहे का?

आणखी रोचक बाब म्हणजे जोवर मोदी तिकडे होते तोवर गुजरात स्थलांतरयोग्य नव्हते. (महाराष्ट्रापेक्षा चांगले नव्हते?) आता मोदी तिथे नाहीत आणि महाराष्ट्रात भाजप सरकार आहे तरीही गुजरात (मोदींच्या अनुपस्थितीत अधिक) स्थलांतरयोग्य आहे?

खरे तर अशा गोष्टींवरून सरकारविषयी काही निष्कर्ष काढणे तितकेसे बरोबर नाही. पण २०१४ पूर्वी असेच निष्कर्ष काढले जात होते म्हणून आतासुद्धा असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही.

गब्बर सिंग Mon, 18/05/2015 - 11:21

In reply to by नितिन थत्ते

गेले दोन दिवस मी बॅरी वैनगास्ट यानी लिहिलेला - The economic role of political institutions : Market Preserving Federalism and Economic Development हा लेख वाचत आहे. लेख वाचनीय आहे. व या सगळ्याच्या मुळाशी असलेल्या मूलभूत द्वंद्वाबाबत आहे - The fundamental political dilemma of an economic system is this : A Government strong enough to protect property rights and enforce contracts is also strong enough to confiscate wealth of its citizens.

१) कल्पना करा की एक धातूव्यापारी मुंबई सोडून गुजरात मधे स्थलांतरित होत आहे. कारण तेच आहे असे समजा - इन्स्पेक्टर राज + विक्रीकर. हे चूक आहे, गुन्हा आहे की पाप आहे ?
२) कल्पना करा की एक धातूव्यापारी कंपनी मुंबई सोडून गुजरात मधे स्थलांतरित होत आहे. कारण तेच आहे असे समजा - इन्स्पेक्टर राज + विक्रीकर. हे चूक आहे, गुन्हा आहे की पाप आहे ?

इथे कम्युनिटी ऑफ ट्रेडर्स इज मायग्रेटिंग.

(अर्थात तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा वेगळा आहे हे माहीती आहेच.)

----------

आणखी रोचक बाब म्हणजे जोवर मोदी तिकडे होते तोवर गुजरात स्थलांतरयोग्य नव्हते. (महाराष्ट्रापेक्षा चांगले नव्हते?) आता मोदी तिथे नाहीत आणि महाराष्ट्रात भाजप सरकार आहे तरीही गुजरात (मोदींच्या अनुपस्थितीत अधिक) स्थलांतरयोग्य आहे?

मोदी तिथे नसूनही गुजरात स्थलांतरयोग्य असेल तर हे मोदींचे यश मानावे असा विचार करायला मला आवडेल.
याचे कारण त्यांनी दिलेले आहे. पण मुख्य म्हंजे ही regulatory fervor च्या अखेरीची सुरुवात आहे का ?? की मी नुसतीच खुशीची गाजरे खात आहे ?

----------

ह्या च्या जोडीला खालील क्रिएटिव्ह उदाहरणे आहेतच ....

मागे काही वर्षांपूर्वी शिवसेनेने एफएम रेडिओ वाल्यांना शिवसेना स्टाईल दम दिला होता की - "मराठी गाणी लावा नाहीतर ....."

मागे काही वर्षांपूर्वी मनसेनेने मल्टीप्लेक्स वाल्यांना मनसेना स्टाईल दम दिला होता की - "मराठी चित्रपटांना वेळ द्या नाहीतर ....." ... खळ्ळ्ळ खट्याक.... करू, मराठी पाट्या लावा नाहीतर .....

अजो१२३ Mon, 18/05/2015 - 11:41

In reply to by गब्बर सिंग

मागे काही वर्षांपूर्वी शिवसेनेने एफएम रेडिओ वाल्यांना शिवसेना स्टाईल दम दिला होता की - "मराठी गाणी लावा नाहीतर ....."

मागे काही वर्षांपूर्वी मनसेनेने मल्टीप्लेक्स वाल्यांना मनसेना स्टाईल दम दिला होता की - "मराठी चित्रपटांना वेळ द्या नाहीतर ....."

... खळ्ळ्ळ खट्याक.... करू, मराठी पाट्या लावा नाहीतर .....

मेलो...
मला वाटायचं महाराष्ट्र प्रखर राष्ट्रवादी आहे.

नितिन थत्ते Mon, 18/05/2015 - 11:48

In reply to by गब्बर सिंग

>>मोदी तिथे नसूनही गुजरात स्थलांतरयोग्य असेल तर हे मोदींचे यश मानावे असा विचार करायला मला आवडेल.

ते ठीक आहे. पण जोवर मोदी तिथे होते आणि महाराष्ट्रात भाजप सरकार नव्हते तेव्हा इथून सोडून तिथे जायला काही इन्सेन्टिव्ह वाटला नव्हता. (इथे तितका कै जाच नव्हता किंवा तिथे जाऊनही जाच कमी होणार नव्हता असं कैतरी. आता मोदी तिथे नाहीत आणि इकडे भाजप सरकार आहे तरी गुजरातमध्ये जाणं डेफिनेटली फायद्याचं आहे.)

महाराष्ट्रात काँग्रेस + गुजरातेत मोदी = महाराष्ट्रातच राहिलेलं बरं
महाराष्ट्रात भाजप + गुजरातेत मोदी नाहीत = गुजरात महाराष्ट्रापेक्षा बरा.

अजो१२३ Mon, 18/05/2015 - 11:54

In reply to by नितिन थत्ते

मला वाटतं, हे स्थलांतर मोदीकालीन आणि मोद्योत्तर गुजरातमधील फरकाबद्दल काहीच बोलत नाही.
--------------------------------------------------------------------------------
काँग्रेसकालीन महाराष्ट्र आणि भाजपकालीन महाराष्ट्र यामधे एकतर दोघे समान आहेत* किंवा भाजपकालीन महाराष्ट्र जास्त वाईट आहे.
==========================================================================================================================
व्यापारी अन्याय भाजपकाळात वाढले आहेत असे दाखले देत नाहीत तोपर्यंत असे म्हणता येईल.
गुजरातचे वातावरण चांगले तर भारतातले सगळेच व्यापारी तिथे गेलेले का दिसत नाहीत इ इ विचित्र विधानांना अर्थ नाही.

राही Mon, 18/05/2015 - 12:07

In reply to by गवि

सुटल्या बिचार्‍या. खूप सोसले. जाणता, अजाणता.
के ई एम च्या स्टाफला सलाम. त्यांनी जिवापाड जपले त्यांना. अगदी यूथेनेशियाचा प्रस्तावही हाणून पाडला.
आता तरी अश्या केसेस पुन्हा घडू नयेत. पण अशी आशा कोणाच्या भरवश्यावर बाळगावी?
त्यांच्या आत्म्यास शांती मिळो.

गवि Mon, 18/05/2015 - 12:27

In reply to by राही

अधिक विचार केला असता जाणवलं की स्टाफच्या माणुसकीचं आणि जबाबदारी घेण्याचं प्रचंड महत्व मान्य करुनही असं वाटतं की केवळ हॉस्पिटलच्या विशिष्ट व्यावसायिक सेटिंगमधली घटना असल्याने हे असं शक्य झालं. अन्य क्षेत्रात (फॅक्टरी, शेती, सॉफ्टवेअर, सरकारी, बँक) असं झालं असतं तर अशा व्यक्तीला कलीग्जनी सांभाळून इतकी वर्ष जगवणं कठीणच होतं.

रोचना Mon, 18/05/2015 - 15:31

In reply to by राही

तिच्यावर बलात्कार करणार्‍या सोहनलाल वालमीकीला बलात्काराची शिक्षा झालीच नाही. केईएमच्या तत्कालीन डीनने तिच्यावर झालेल्या एनल रेपची बातमी पोलीसांपासून लपवली. त्याची बातमी सर्वत्र पसरून पुढे अरुणा शानबागलाच त्याचा त्रास होऊ नाही म्हणून असे केले, म्हणतात. म्हणून तिचे घड्याळ चोरल्यामुळे, आणि कुत्र्याच्या चेनने गळा चेपल्यामुळे ७ वर्षाचा तुरुंगवास भोगल्यावर तो मुक्त झाला. बाहेर आल्यावर तिच्यावर हॉस्पिटलमधे त्याने पुन्हा हल्ला केला होता म्हणे. कुठे आहे, काय करतोय कोण जाणे - एड्स ने काही वर्षांपूर्वी मेला असं वाचलं होतं, पण ही खरी बातमी होती की आशावाद माहित नाही. डीन इतके वर्षं काय करतायत, कोणाकोणाच्या भविष्याची चिंता करतायत कोण जाणे.

राही Mon, 18/05/2015 - 19:24

In reply to by रोचना

वाल्मीकि पुढे दिल्लीला एका खासगी हॉस्पिटलात वॉर्ड्बॉय म्हणून काही वर्षे काम करीत होता. पिंकी विरानीने जेव्हा ह्या प्रकरणाला पुन्हा वाचा फोडली तेव्हा ही माहिती वर्तमानपत्रात आली होती. हे नक्की आठवतेय. त्याने पुन्हा हल्ला केल्याची बातमी अंधुक आठवतेय. खात्री नाही. शिवाय ही घटना पुन्हा उघडताना आणखी काही बाबी समोर आणल्या गेल्या होत्या. त्या काळात हा खटला फारच खळबळजनक ठरला होता. हॉस्पिटलच्या नर्सेसविषयी चविष्ट बातम्या चघळल्या जाऊ नयेत म्हणून आणि अशा तर्‍हेचे काही घडणे व त्यावर बोलणे या प्रकारचे ऑडॅशिअस वर्तन करायला त्या वेळच्या मेट्रन तयार नव्हत्या, किंबहुना अन्य महिला साक्षीदारांनाही तसेच वाटले होते म्हणून सत्य सांगितले गेले नाही असे लिहिले गेले होते. जरी हा खटला पडद्याआड चालवला गेला तरी. पिंकी विरानीच्या आधीही हे प्रकरण काही वेळा वर्तमानपत्रांतून छेडले गेले तेव्हा असाच संशयाचा सूर निघाला होता. शिवाय अरुणाच कशी बिनधास्त होती आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांशी असे कडक शब्दांत बोलणे अंगावर उलटू शकते हे लक्षात घेऊन स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी जी तिने घ्यायला हवी होती ती घेतली नाही आणि स्टाफला डिवचून संकट ओढवून घेतले असाही मतप्रवाह तेव्हा काही ठिकाणी दिसला होता.
[अर्थात या लिखाणासाठीच्या लिंक्स किंवा पुरावे (आता उपलब्ध असतील असे नाही,) मजजवळ नाहीत.]

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 18/05/2015 - 20:42

In reply to by राही

अरुणाच कशी बिनधास्त होती आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांशी असे कडक शब्दांत बोलणे अंगावर उलटू शकते हे लक्षात घेऊन स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी जी तिने घ्यायला हवी होती ती घेतली नाही आणि स्टाफला डिवचून संकट ओढवून घेतले

तुमच्यावर बलात्कार होतो तर तुम्ही सातच्या आत घरात का येत नाही, (बुरखा का घालत नाही, पुरुषांशी नम्रपणे का वागत नाही,) इत्यादी इत्यादी.

पिंकी विराणींच्या 'अरुणाज स्टोरी' पुस्तकातला काही भाग आज स्क्रोलमध्ये आला आहे. हा दुवा.

अरुणा शानबाग सुटल्या. पण हा दयामरणाचा विषय, ऑफिसमधल्या बलात्काराची, लैंगिक अत्याचाराची प्रकरणं याबद्दल (बायकांना फक्त बोलायलाच आवडतं, असल्या निरर्थक आरोपांकडे दुर्लक्ष होऊन) अधिक चर्चा घडावी जेणेकरून हे महत्त्वाचे विषय आणि लोकांवर होणारे अन्याय, सहन करावा लागणारा त्रास याबद्दल समाजात अधिक संवेदनशीलता निर्माण होईल.

रोचना Tue, 19/05/2015 - 10:45

In reply to by राही

हे एकूण प्रकरण केवढे भयंकर आहे. पिंकी विरानीचे पुस्तक बर्‍यापैकी सनसनाटी भाषेत आहे - त्यांच्यावरही अरुणा शानभागचा स्वतःच्या पब्लिसिटी साठी वापर केल्याचा आरोप आहेच. मला व्यक्तिगत पातळीवर केईएम च्या नर्सेस चा आदर वाटतो, इतके वर्ष त्यांनी शानबागांना सांभाळलं, पण केईएम व्यवस्थापनाची त्यांच्याबरोबर पाठ थोपटलेली पाहून आश्चर्य वाटतं. प्रथम शानबागांना न्याय न मिळण्यात व्यवस्थापनाचाच हात होता. खटला अनेक दिवस चालू राहिला असावा - तोवर शानबागांच्या मेंदूवर झालेल्या परिणामांची कल्पना हॉस्पिटलला नक्कीच आली होती. तेव्हा बलात्काराचा आरोप का जोडला गेला नाही हे कळलं नाही.

वर तुम्ही म्हणता तो "ब्लेम द विक्टिम" मतप्रवाह आजही सर्वत्र आहेच. यूथनेशिया संबंधित न्यायालयीन चर्चा शानबागांमुळे पुढे गेली हे ठीक आहे, पण त्या ऐवजी कामाच्या ठिकाणी होणार्‍या लैंगिक शोषणाच्या केसेस मधे पीडितांना कायद्याकडून व व्यवस्थापनाकडून मिळणार्‍या प्रतिसादाची चर्चा देखील पुढे गेली असती तर बरे झाले असते.

गवि Tue, 19/05/2015 - 10:52

In reply to by रोचना

प्रथम शानबागांना न्याय न मिळण्यात व्यवस्थापनाचाच हात होता. खटला अनेक दिवस चालू राहिला असावा

शिवाय आजच वाचलेल्या बातमीनुसार त्यांच्या देखभालीचा खर्च सेवाभावी संस्था आणि देणग्यांतूनच केला जात होता. हॉस्पिटल व्यवस्थापनाला खर्च नव्हता (कदाचित खोली उपलब्ध करुन देण्यापलीकडे - किंवा तिचे चार्जेसही सेवाभावी लोक भरत असल्यास कल्पना नाही)..

अनुप ढेरे Mon, 18/05/2015 - 18:26

http://indianexpress.com/article/cities/delhi/jung-kejriwal-turf-war-tu…
आप आणि नायब राज्यपाल यांच्यातला वाद पोरकटपणावर पोचला आहे.
माझ्या मते राज्याच्या मुख्यमंत्र्याला सचिव नेमण्याचा पूर्ण अधिकार असावा. ना.रा.नी ( दिल्लीच्या बाबतीत अधिकार असूनसुद्धा) यात ढवळाढवळ करू नये.

अनुप ढेरे Mon, 18/05/2015 - 21:45

In reply to by अजो१२३

तुमच्यावर जबाबदारी असेल तर अधिकारही असावा. मुख्यमंत्री ज्यांनी निवडून दिलय त्यांना अकाउंतेबल आहे. ना.रा निवडून दिलेला नाही.

अजो१२३ Tue, 19/05/2015 - 00:12

In reply to by अनुप ढेरे

मस्तंय कि मग. पूर्वीचे सगळे अधिकारी सॅक करायचे. आपले गणगोत भरायचे.
=====================================================================================
अकांटेबल मंजे काय? समजा मुख्यमंत्र्याने काही काम नाही केलं तर त्याला काय शिक्षा आहे म्हणे?
====================================================================================
प्रशासनात जे कार्यरत लोक आहेत, त्यांपैकी जे क्रायटेरिया पूर्ण करतात, पैकी हा हवा नि हा नको म्हणण्याचे कारण काय? अधिकार्‍यात काय म्हणे दोष असतो?
=================================================================
बाय द वे, आय ए एस ऑफिसर हे (टेक्निकली) केंद्र सरकारचे काम करतात कि राज्य सरकारचे? मग त्यांना नियमाप्रमाणे कोण नेमावं?

अनुप ढेरे Tue, 19/05/2015 - 09:42

In reply to by अजो१२३

समजा मुख्यमंत्र्याने काही काम नाही केलं तर त्याला काय शिक्षा आहे म्हणे?

शिक्षा पुन्हा निवडून न येणं ही. अर्थात केवळ निकम्मेपणा (ऑर पर्सेप्शन ऑफ निकम्मेपणा) कंसिडर केलेला आहे. भ्रष्टाचार नाही. प्रत्येक गवर्मेंटच्या पॉलिसी राबवायला जे लायक आहेत असं त्या सरकारला वाटतय त्यांना त्या त्या पोजिशनला ठेवता आलं पाहिजे. मोदींनी देखील गुजरातेतले खास काही हपिसर केंद्रात आणले होते. आधिचे टेलेकॉम सचिव देखील एक नियम बदलून नियुक्त केले होते.

बाय द वे, आय ए एस ऑफिसर हे (टेक्निकली) केंद्र सरकारचे काम करतात कि राज्य सरकारचे? मग त्यांना नियमाप्रमाणे कोण नेमावं?

माझ्या माहितीप्रमाने आय ए एस हपिसर केंद्र सरकार रिक्रूट करतं आणि राज्य सरकारला देतं. सो बहुदा ते केंद्राचे कर्मचारी असतात.

ऋषिकेश Tue, 19/05/2015 - 10:28

In reply to by अनुप ढेरे

बरोबर आहे. पंतप्रधानांनी उद्या एखादा आयुक्त नेमला आणि त्याची परस्पर राष्ट्रपतींनी बदली केली तर ते गैर आहे.

माझ्या माहितीप्रमाने आय ए एस हपिसर केंद्र सरकार रिक्रूट करतं आणि राज्य सरकारला देतं. सो बहुदा ते केंद्राचे कर्मचारी असतात.

बरोबर. एखाद्या राज्याला एखादा अधिकारी नको असेल तर त्या राज्याचा मुख्यमंत्री फारतर त्याला नाकारू शकतो - काढू शकत नाही. त्याने नाकारल्यावर पुन्हा तो केंद्रीय पूलमध्ये जातो व अन्य राज्यात त्याला पाठवले जाऊ शकते किंवा केंद्रातील एखादे पदही मिळू शकते

गवि Tue, 19/05/2015 - 13:03

In reply to by गब्बर सिंग

अरेरे.. ती इम्पोर्ट एक्पोर्टची चर्चा चांगली रोचक होत होती. या स्थलांतरामुळे तिथेही चाप लागला काहीसा.

ती चर्चा वेगळी काढल्यास आम्ही वाचक/चर्चक आभारी राहू. अजून बरीच उत्तरे स्पष्ट झालेली नाहीत. पण इंटरेस्ट मात्र खूपच आला आहे चर्चेत.