सामाजिक

दवा, दुवा आणि देवा... - आशिष चांदोरकर

रविवार दिनांक १९ जुलै रोजी करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येऊन बरोबर एक महिना एक दिवस झाला. एका महिन्यानंतर आता मी पूर्णपणे ठणठणीत असून, महिनाभरानंतर प्रथमच बाहेरही पडलो. १९ जून ते १९ जुलै हा महिना बरंच काही शिकवून गेला. त्याविषयी थोडंसं...

करोनाव्हायरस : इन्फेक्शन नक्की कसे होत असावे?

कोविड १९ महासाथ येऊन सहाएक महिने झालेत. आता लोकांना इन्फेक्शन नक्की कसे होत असावे याबद्दल साधारणपणे एकमत होऊ लागले आहे. या विषयातील तज्ज्ञ लोकांच्या संशोधनाच्या आधारे जनहितार्थ घेतलेला हा एक आढावा.

मार्क्ड सेफ फ्रॉम कोव्हिड

पुणे येथील डॉ. जयदीप व डॉ. सुषमा दाते यांना नुकताच कोव्हिड होऊन गेला. जनमानसातील भीती कमी करण्यासाठी लिहिण्याची अनेक परिचितांनी विनंती केल्याने त्यांच्या या अनुभवाविषयी डॉ सुषमा यांनी लिहिले आहे.

बखर....कोरोनाची (भाग ६)

इतिहास घडतोय, आपल्यासमोर... वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत. म्हणून आज घडणारा इतिहास, आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का? हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच, या धाग्यावर? बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना? चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात.

ICMR, लस, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, वगैरे

ICMR उर्फ Indian Council of Medical Research ही नामांकित भारतीय संस्था कोव्हिडसाठी पूर्णपणे भारतीय बनावटीची लस दि. १५ ऑगस्ट रोजी उपलब्ध करून देणार अशी बातमी नुकतीच प्रसिध्द होताच अनेक भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. म्हणजे एक तर व्हायरसपासून मुक्ती मिळणार, तीही पूर्णपणे भारतीय बनावटीच्या लशीने आणि तेदेखील स्वातंत्र्यदिनी! मात्र काही लोकांनी या जलदगतीविषयी शंका उपस्थित केल्या खऱ्या, पण त्याकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं.

पण लवकरच या आनंदाला तडा जाऊ लागला.

लस विकसित करण्याच्या प्रकल्पात सहभागी असलेल्यांना दि. २ जुलै रोजी ICMRने पाठवलेलं एक पत्र लवकरच लीक झालं -

टांझानियाच्या डायरीतून .......

टांझानिया हा दोन भूभांगाचा देश आहे.त्याची लोकसंख्या ६ करोड म्हणजे महाराष्ट्राच्या निम्मी तर क्षेत्रफळ मात्र महाराष्ट्राच्या तिप्पट आहे. हा एक शेती प्रधान देश आहे. टोमॅटो,अननस,फणस,आणि काजू ही इथली प्रमुख पिके .शेतीवर आधारित उद्योगांना इथे खूप वाव आहे.विशेष म्हणजे फक्त ३०% जमिनीवरच शेती होते.७०% जमिनीला अजूनही फाळ लागलेला नाही.जुलै २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी टांझानियाला भेट दिली ,त्यानंतर पहिली मोठी गुंतवणूक श्री.सतीश पुरंदरे या मराठी माणसानी केली.ते साखर कारखाना उभारत आहेत."मराठी पाऊल पडते पुढे......"

कोकणची करोना कैफियत

मुंबईहून येणारे माणसांचे लोंढे, वाढत्या स्थलांतराबरोबर कोकणातल्या कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा आणि या सगळ्याला हाताळण्यात सपशेल अपयशी ठरलेली सरकारी यंत्रणा यांचा एक दुर्दैवी ग्रहयोग कोकणच्या पत्रिकेत डोकावतोय. त्यामुळे कोकणाचं भविष्य वर्तमानापेक्षा जास्त भयानक होईल की काय अशी शंका मनात डोकावत्ये.

डीकोडिंग स्पॅनिश फ्लू (भाग ३)

‘स्पॅनिश फ्लू’. १९१८ साली उद्भवलेल्या या विषाणूने जगात ५ कोटी लोकांचा, तर भारतात १.८० कोटी लोकांचा बळी घेतला. १९५१ नंतर हा विषाणू ‘डीकोड’ करण्याचे प्रयत्न झाले. गाडलेले मृतदेह उकरून त्यातून काही नमुने घेण्यात आले आणि या विषाणूच्या जनुकांचा क्रम शोधता आला. त्यासाठी ८० वर्षं जावी लागली. आता त्याच्याही पुढचा थरारक आणि अतिशय धोकादायक प्रयत्न होणार होता. काय होता हा प्रयोग? लिहिताहेत, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेतील (NCCS) वरिष्ठ संशोधक डॉ. योगेश शौचे

बखर....कोरोनाची (भाग ५)

इतिहास घडतोय, आपल्यासमोर... वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत. म्हणून या आज घडणारा इतिहास, आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का? बखर वगैरे म्हणजे काय असतं? हेच ना? चला, लिहुयात बखर कोरोनाची!

१०० वर्षांपूर्वीच्या 'स्पॅनिश फ्लू'च्या आठवणी

कोरोनाच्या साथीमुळे आपण हतबल आहोत, मग शंभर वर्षांपूर्वीच्या त्या साथीमध्ये आपण काय केलं असतं? कारण त्या साथीमध्ये जगभर ५ कोटी लोक मरण पावले. एकट्या भारतात १ कोटी ८० लाख. ना औषध, ना लस, ना कम्युनिकेशन, ना आरोग्याच्या सुविधा. वर्ष होतं, १९१८ आणि साथ होती, 'स्पॅनिश फ्लू'ची. ही साथ बरंच काही शिकवून जाते. लिहिताहेत, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेचे (NCCS) वरिष्ठ संशोधक डॉ. योगेश शौचे.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक