कोरोना विषाणू कोडं उगमाचं!
कोरोना विषाणू कोडं उगमाचं!
आरती हळबे
(आरती हळबे इंजिनियर असून गेली ५ वर्षे सोप्या भाषेत विज्ञानविषयक संशोधनाबद्दल लिखाण करत आहेत. रीसर्च मॅटर्स ह्या ऑनलाईन प्रकाशनाच्या संपादिका म्हणून त्या कार्यरत आहेत.)
सार्स-कोव्ह २, म्हणजेच कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला, तो नैसर्गिकरीत्या तयार झाला, प्रयोगशाळेतून त्याची गळती झाली की तो मुद्दाम बनवला गेला यावर जगात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही बाजूंच्या सिद्धांतांचे आधार काय आहेत आणि ही चर्चा सध्या कुठवर येऊन ठेपली आहे याचा वेध.
सूक्ष्मदर्शकाशिवाय न दिसणारा एक सूक्ष्म जीव आता वर्षभरापेक्षा अधिक काळ संपूर्ण जगात उलथापालथ घडवून आणतोय. सार्स-कोव्ह २ (SARS-CoV-2) या नावाने ओळखला जाणारा हा विषाणू सर्वप्रथम चीन येथील वुहान या शहरात आढळला. माणसाच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करणारा हा विषाणू जग हादरवून टाकणाऱ्या कोविड-१९ पॅनडेमिकला कारणीभूत आहे. प्राण्यांना संसर्ग करणाऱ्या विषाणूंमध्ये नैसर्गिक म्युटेशन होऊन मनुष्याला संसर्गित करणारा सार्स-कोव्ह-२ हा विषाणू तयार झाला असावा असा जगभरातील शास्त्रज्ञांचा प्राथमिक अंदाज होता. वुहान येथील मार्केटमध्ये मांसासाठी जिवंत वन्य प्राण्यांची खरेदी-विक्री होते त्यात वटवाघळंही असतात. तिथेच या विषाणूने वटवाघळांच्या पेशींवरून मनुष्याच्या पेशींवर उडी मारली असावी असं मानलं जातं.
सार्स-कोव्ह २ नैसर्गिकपणे तयार झालेला विषाणू असल्याचं मानलं गेलं असलं, तरी कोणताही चांगला शास्त्रज्ञ केवळ पुराव्यांच्या व निरीक्षणांच्या आधारे सिद्ध होऊ शकणाऱ्या गोष्टींचाच सत्य म्हणून स्वीकार करतो. कुठलाही सिद्धांत जोवर सिद्ध होत नाही तोवर ती केवळ एक शक्यता असते. सार्स-कोव्ह-२ नैसर्गिकपणे निर्माण झाला असल्याचे भक्कम पुरावे अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या बोलायचं तर सार्स-कोव्ह-२ नैसर्गिकरीत्या तयार झाला असेल हीदेखील एक शक्यताच आहे.
दुसरीकडे या विषाणूच्या उगमाची आणखी एक शक्यता संशोधकांनी २०२० च्या सुरुवातीला वर्तवली होती. सार्स-कोव्ह २ एखाद्या प्रयोगशाळेत निर्माण केला गेलेला असू शकतो का, अपघाताने त्याची गळती झाली असू शकते का किंवा असा भयंकर प्राणघातक विषाणू मुद्दाम मानवी शरीरात सोडला गेला असू शकतो का? काही संशोधक या शक्यतांचाही विचार करत आहेत. सार्स-कोव्ह २ विषाणू प्रयोगशाळेत निर्माण झाला की नैसर्गिकपणे याची तपासणी पारदर्शकपणे, वस्तुनिष्ठपणे आणि माहिती व पुराव्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करून केली जावी अशी काही संशोधकांची मागणी आहे.
कुठलेही ठोस पुरावे नसतानाही सार्स-कोव्ह २ चा उगम नैसर्गिकच आहे ही शक्यता वर्ष-सव्वा वर्ष रेटली गेली. यात प्रामुख्याने अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा पुढाकार होता. फेब्रुवारी २०२० मध्ये लॅन्सेट जर्नलमध्ये काही शास्त्रज्ञांनी ‘कॉन्स्पिरसी थिअरीज’ना प्रोत्साहन देऊ नये असं पत्रही प्रकाशित केलं होतं. त्याचे एक लेखक होते ब्रिटनचे पीटर डॅशॅक. डॅशॅक हे अमेरिकेतल्या ‘इकोहेल्थ अलायन्स’ या संस्थेचे अध्यक्ष आहेत. नंतर मार्च २०२० मध्ये अमेरिकेतील ख्रिश्चियन अँडरसन आणि त्यांच्या गटाने ‘नेचर मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात हा विषाणू प्रयोगशाळेत तयार झाल्याची शक्यता पूर्ण नाकारली आणि त्याची नैसर्गिक उत्पत्ती कशी झाली असेल याबद्दलच्या तीन शक्यता मांडल्या; पण त्याच वेळी हा विषाणू प्रयोगशाळेत तयार झाल्याची शक्यता नाकारणं हे अपुऱ्या माहितीवर आधारित असल्याचं मत निकोलस वेड या ज्येष्ठ ब्रिटिश विज्ञान पत्रकाराने आपल्या ५ मे २०२१च्या ‘द बुलेटिन ऑफ ॲटॉमिक सायंटिस्ट्स’मधील लेखात व्यक्त केलं होतं.
त्यानंतर वेळोवेळी अनेक शास्त्रज्ञांनी सार्स-कोव्ह-२ प्रयोगशाळेत निर्माण झाला असल्याच्या शक्यतेचा पाठपुरावा केला, त्याच्याशी संबंधित संशोधन करून त्याबद्दल लेखही प्रसिद्ध केले. ड्रास्टिक रिसर्च या नावाने ओळखला जाणारा शास्त्रज्ञांचा एक गट सार्स-कोव्ह-२ च्या उत्पत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न सातत्याने करतो आहे. यात पुण्याचे संशोधक डॉ. मोनाली रहाळकर व डॉ. राहुल बहुलीकर यांचंही योगदान आहे. मे २०२० मध्ये प्री-प्रिंट आणि ऑक्टोबर २०२० मध्ये ‘फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात त्यांनी २०१२ मध्ये काही खाणकामगारांना झालेल्या सार्ससदृश रोगाचा अभ्यास केला. या खाणीच्या जवळील गुहांमधून वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमधील संशोधकांनी वटवाघळांना संसर्ग करणाऱ्या विषाणूंचे नमुने गोळा केले होते. ते जेनेटिकली सार्स कोव्ह-२ च्या सर्वांत जवळचे विषाणू आहेत. त्यामुळे त्यातून हा विषाणू तयार झाला असू शकतो का याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी या अभ्यासात केली होती. असं असलं, तरीही बहुतांश शास्त्रज्ञ समुदाय या विषाणूची उत्पत्ती नैसर्गिकपणे झाली असावी याच मताचा पुरस्कार करत होता.
सार्स-कोव्ह-२ प्रयोगशाळेत तयार झाला असल्याची शक्यता जवळजवळ वर्षभर का डावलली गेली? त्याबद्दल शास्त्रज्ञांच्या मताकडे का दुर्लक्ष केलं गेलं? लोकप्रिय मताच्या विरोधात मत प्रकट करणं सध्याच्या परिस्थितीत शास्त्रज्ञांना महागात पडू शकतं, हे त्यामागचं एक कारण असावं. संशोधनासाठी मिळणाऱ्या रिसर्च ग्रँटचं नियंत्रण ज्यांच्या हातात असतं त्यांच्याविरुद्ध जाणं शास्त्रज्ञांना परवडत नाही. त्यामुळे त्यांची संशोधनं ठप्प होऊ शकतात. त्यामुळे अनेकदा शास्त्रज्ञ वादग्रस्त गोष्टींबद्दल मौन बाळगतात. एक्सपर्ट म्हणून शास्त्रज्ञांच्या वक्तव्यावर अवलंबून असलेल्या विज्ञान पत्रकारांना पर्यायी मताबद्दलच्या बातम्या देणं अवघड होऊन बसतं. त्यामुळे माध्यमंदेखील सार्स-कोव्ह-२ हा विषाणू नैसर्गिकपणे उद्भवला असल्याच्या राजकर्त्यांनी ठामपणे मांडलेल्या मताला दुजोरा देण्याव्यतिरिक्त फार काही करू शकली नाहीत. या वरवर दिसणाऱ्या कारणांच्या मागे अजूनही कारणं होती. काही राज्यकर्त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी सार्स-कोव्ह-२ हा नैसर्गिकरीत्या तयार झाल्याचं पद्धतशीरपणे पुढे रेटण्यात आलं.
मग आता नेमकं काय घडलं ज्यामुळे प्रयोगशाळा सिद्धांताची तपासणी व्हावी असं मत पुढे येऊ लागलं? फेब्रुवारी २०२१ च्या सुमारास जागतिक आरोग्य संघटनेचं एक पथक चीनच्या दौऱ्यावर गेलं. तेव्हा चीनमधील संशोधकांना सार्स-कोव्ह-२ हा विषाणू नैसर्गिकपणे उद्भवला आहे, हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे देता आले नाहीत. या पथकात पीटर डॅशॅकसुद्धा सामील होते. ते ज्या ‘इकोहेल्थ अलायन्स’ संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्या संस्थेमार्फत ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ला विषाणूंवरील विशिष्ट संशोधनासाठी अर्थसाहाय्य दिलं जातं. हे अर्थ सहाय्य अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’च्या कक्षेत येणाऱ्या संस्थेकडून देण्यात येतं. ज्ञात असलेल्या विषाणूंमध्ये जेनेटिक इंजिनियरिंग करून निरनिराळे विषाणू बनवणं आणि मानवी पेशींवर त्यांचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास करणं असं या संशोधनाचं स्वरूप आहे. अशा रीतीने मिळवलेल्या माहितीचा उपयोग भविष्यात अधिक परिणामकारक लशी तयार करण्यासाठी करता येईल, असं या संशोधनाचं समर्थन करणारे सांगतात. ‘गेन ऑफ फंक्शन’ संशोधन पद्धतीत विषाणूत कोणते बदल केले तर त्याचा संसर्ग वेगाने होईल, त्यातले कुठले जीन बदलले तर तो मनुष्यासाठी जीवघेणा ठरेल, अशा प्रश्नांची उत्तरं प्रयोगांमधून शोधली जातात. असं संशोधन अत्यंत धोकादायक आहे आणि अनेकांनी वेळोवेळी अशा प्रकारच्या संशोधनाला बंदी घालावी अशी मागणी केली आहे; मात्र तरीही ते संशोधन सुरू राहिलं आहे.
विषाणूंवर ‘गेन ऑफ फंक्शन’ संशोधन करणाऱ्या वुहानमधील प्रयोगशाळेतून सार्स-कोव्ह २ विषाणूची गळती झाली अशी शंका घेणं हे अमेरिका आणि चीनच्या सरकारांना, तसंच ‘इकोहेल्थ अलायन्स’ या संस्थेलाही महागात पडणारं होतं. त्यामुळे या सर्वांनी पहिल्यापासून सार्स-कोव्ह २ विषाणूची गळती प्रयोगशाळेतून झाली असू शकते याचं खंडन केलं होतं.
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सार्स कोव्ह-२ चीनमधील प्रयोगशाळेतील गळतीमुळे पसरल्याचा आरोप एप्रिल २०२० मध्येच केला होता; मात्र, अमेरिकेच्या डयरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सने लगेचच त्यांच्या या विधानाचं खंडन केलं. शिवाय, कोरोनाला संपवण्यासाठी ब्लीच प्यायचा सल्ला देणाऱ्या ट्रम्प यांचं विधान शास्त्रज्ञ समुदाय गंभीरपणे घेणं शक्य नव्हतं.
पण आता अमेरिकी इंटेलिजन्सला मागील महिन्यात प्राप्त झालेल्या अहवालात अशी माहिती मिळाली, की नोव्हेंबर २०१९ मध्ये कोव्हिड-१९ चा पहिला रुग्ण सापडला हे अधिकृतपणे जाहीर होण्याच्या आधी वुहान येथील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचे काही शास्त्रज्ञ श्वसनसंस्थेशी संबंधित रोगाने आजारी पडले होते. या रोगाची लक्षणं कोव्हिड-१९ च्या लक्षणांशी मिळतीजुळती होती.
वैज्ञानिक हेरगिरी
सार्स-कोव्ह २ विषाणू प्रयोगशाळेत निर्माण झाल्याचीही शक्यता आहे असं शास्त्रज्ञांना का वाटू लागलं? त्यामागे काय तर्क आहेत हे समजून घेण्यासाठी मॉलिक्युलर बायॉलॉजी (रेण्वीय व पेशीजीवशास्त्र)मधील काही संकल्पना समजून घ्याव्या लागतील.
सार्स-कोव्ह २ हा कोरोना व्हायरस गटातील विषाणू आहे. वटवाघळांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंपासून हा तयार झाला आहे. याच गटातील विषाणूंमुळे २००२ साली सार्स व २०१२ साली मर्स हे साथीचे रोग उद्भवले होते. कोरोना व्हायरस गोलाकार असतो आणि त्याचा पृष्ठभाग स्पाइक प्रोटिन (आरी किंवा गुच्छाच्या आकारातील प्रथिनं) आच्छादित असतो. त्याचा पृष्ठभाग मुकुटासारखा (इंग्रजीमध्ये कोरोना) दिसतो म्हणून त्याचं नाव कोरोना व्हायरस आहे. मानवी पेशींशी जोडले जाऊन त्यांना संसर्गित करण्यात हे स्पाइक प्रोटिन महत्त्वाची भूमिका बजावतात. सार्स-कोव्ह २ मधील स्पाइक प्रोटिन मानवी पेशीच्या (ॲजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम) एसीई२ रिसेप्टरशी जोडला जातो. पण पेशीत प्रवेश करण्यासाठी आणखी एक गोष्ट घडावी लागते. स्पाइक प्रोटिनचे साधारण मध्यभागी दोन तुकडे व्हावे लागतात. ते घडल्यावरच अनेक जैवरासायनिक अभिक्रियांच्या मदतीने विषाणू यजमान पेशीत प्रवेश करू शकतो. स्पाइक प्रोटिनमध्ये १२००हून जास्त ॲमिनो ॲसिड्सची साखळी असते. फ्युरिन नावाचे यजमान पेशीतील विकर (एन्झाइम) ही साखळी तोडण्यास मदत करतात. ही साखळी तुटणं जितकं कार्यक्षम तितका संसर्गाचा वेग जास्त.
जेव्हा एखादा विषाणू वन्य प्राण्यांकडून मनुष्याकडे येतो तेव्हा अनेकदा आणखी एखाद्या प्रजातीमार्फत हा प्रवास होतो. उदाहरणार्थ, सार्सचा विषाणू वटवाघळांकडून पाम सिवेटमध्ये आला आणि त्यानंतरच्या म्युटेशनमुळे मनुष्यात संसर्ग निर्माण करणारा विषाणू तयार झाला. मर्ससाठी हा मध्यस्थ प्राणी उंट होता. नैसर्गिकपणे मनुष्यापर्यंत विषाणू पोचण्याची प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने होत असते. अनेक म्युटेशन्स घडून त्यातून मनुष्याला संसर्ग करणारा विषाणू तयार होतो. याच्या खाणाखुणा त्या विषाणूच्या जीनोमची आणि त्यासदृश इतर विषाणूंच्या जीनोमशी तुलना केल्यास दिसून येतात. जीनोममध्ये जशा विषाणू नैसर्गिकपणे निर्माण झाल्याच्या खुणा दिसतात तशाच मानवनिर्मित विषाणूच्या जीनोममध्येही या खुणा दिसतात. परंतु जसजसं जेनेटिक इंजिनियरिंगचं तंत्र प्रगत होत चाललं आहे तसतशा या खुणा पुसट होत चालल्या आहेत.
सार्स-कोव्ह-२ मध्ये ही साखळी तुटण्याचं ठिकाण नेमकं सर्वाधिक कार्यक्षमपणे साखळी तुटेल अशा ठिकाणी आहे. सार्स-कोव्ह-१ च्या विषाणूमध्ये ते दिसत नाही. ही बाब फारच आश्चर्य वाटण्यासारखी आहे. कारण नैसर्गिक उत्क्रांतीमधून असं होणं अशक्य नसलं तरी तशा शक्यता खूप कमी आहेत. एवढ्या माहितीवरून नक्की कुठलाच निष्कर्ष काढता येणार नाही हे खरं, पण हा विषाणू प्रयोगशाळेत बनलेला नाही, ही शक्यताही त्यामुळे सहजी खोडून काढता येणार नाही.
हा विषाणू नैसर्गिकपणे निर्माण झाला नाही याकडे बोट दाखवणारी काही निरीक्षणं
सार्स, मर्स व सार्स-कोव्ह-२ हे सर्व बीटा-कोरोना व्हायरस कुळातील आहेत. सार्स व मर्स विषाणू ज्या मध्यस्थ यजमान प्राण्याकडून (अनुक्रमे पाम सिवेट आणि उंट) आले त्यांचा शोध अनुक्रमे चार व नऊ महिन्यांत लागला. आज अनेक शास्त्रज्ञ प्रामुख्याने सार्स-कोव्ह २ संबंधी संशोधन करत असूनसुद्धा दीड वर्षाहून अधिक काळ लोटला तरी सार्स-कोव्ह-२ साठीचा मध्यस्थ यजमान सापडलेला नाही.
जर या विषाणूने वटवाघळांवरून थेट मनुष्यावर उडी घेतली असं मानलं, तरी डिसेंबरच्या २०१९ च्या आधी सार्स-कोव्ह-२ सदृश विषाणूमुळे मनुष्यात न्यूमोनियासारखे आजार झाल्याच्या नोंदी मिळायला हव्यात. नैसर्गिक उत्क्रांती सावकाश होते, त्यामुळे अचानक सार्स-कोव्ह-२ ला त्याचं सध्याचं रूप मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. परंतु अशा नोंदी चीनमध्ये मिळालेल्या नाहीत. तसे कुणी रुग्ण आढळलेच नसतील, किंवा चीनने ही माहिती नोंदवली नसेल, किंवा नोंद केली असल्यास उपलब्ध करून दिली नसेल, अशाही शक्यता आहेतच.
मार्च २०२० मध्ये अँडरसन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘नेचर मेडिसिन’मध्ये लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे, की सार्स-कोव्ह २ च्या जीनोममध्ये तो मानवनिर्मित असल्याच्या कुठल्याही खुणा आढळल्या नाहीत. शास्त्रज्ञांच्या या विधानाला असलेला वैज्ञानिक आधार अपूर्ण आहे. जीन कापून जोडायच्या पूर्वीच्या पद्धती प्रगत नव्हत्या. त्याच्या खूप सहज ओळखता येतील अशा खुणा दिसत असत. मात्र, जीन संपादनाचं तंत्र प्रगत झाल्यामुळे सहज ओळखता येण्यासारख्या खुणा आढळत नाहीत. संशोधकांनी केलेला अभ्यास या सहज न दिसणाऱ्या खुणा शोधण्यासाठी पुरेसा नाही. अँडरसन आणि सहकारी त्यांच्या संशोधनात असंही म्हणतात, की स्पाइक प्रोटिन एसीई २ रिसेप्टरला जोडले जाण्यासाठी सर्वोत्तम नाही. कुणी प्रयोगशाळेत विषाणू तयार केला असता तर त्यांनी स्पाइक प्रोटिन एसीई २ रिसेप्टरला जोडले जाण्यासाठी जी सर्वोत्तम संरचना असू शकते तिची रचना केली असती. पण निकोलस वेड यांचं म्हणणं असं आहे, की मुळात शास्त्रज्ञ कॅल्क्युलेशन करून स्पाइक प्रोटिनची रचना करतात हे गृहीतकच चुकीचं आहे. विषाणूने ज्या पेशींना संसर्गित करणं अपेक्षित आहे त्यांना लक्ष्य पेशी म्हणतात. विषाणू लक्ष्य पेशींना कसे कसे जोडले जात आहेत याचं निरीक्षण करून विषाणूंच्या पुढच्या पिढीतील सर्वाधिक कार्यक्षमपणे लक्ष्य पेशींशी जोडले जाणारे व्हेरियंट निवडून ते लक्ष्य पेशींच्या पुढच्या नमुन्याला संसर्गित करण्यासाठी वापरले जातात. ही क्रिया अनेक वेळा करून शेवटी सर्वाधिक संसर्ग करणारा व्हेरियंट निवडला जातो. या व्हेरियंटच्या स्पाइक प्रोटिनची संरचना कॅल्क्युलेशन केलेल्या सर्वाधिक इष्टतम संरचनेपेक्षा कमी कार्यक्षम असू शकते. त्यामुळे अँडरसन आणि सहकाऱ्यांचा हा तर्क अपुरा आहे असं म्हटलं जात आहे.
आणखी एका निरीक्षणातून महत्त्वाचा संकेत मिळतो. स्पाइक प्रोटिनची साखळी ज्या ठिकाणी फ्युरिन विकराच्या मदतीने तुटते, ते ठिकाण मनुष्याच्या पेशीला संसर्गित करण्यास सर्वोत्तम आहे. वटवाघळांना संसर्गित करणाऱ्या सार्स-कोव्ह २ ला सर्वांत जवळच्या असणाऱ्या विषाणूमध्ये ही संरचना आढळत नाही, पण स्पाइक प्रोटिनच्या संरचेनेतील केवळ एवढाच भाग मनुष्याला संसर्गित करणाऱ्या इतर कोरोना व्हयरससदृश आहे. म्हणजे जणू काही वटवाघळात दिसणाऱ्या विषाणूच्या स्पाइक प्रोटिनमध्ये केवळ मनुष्याला संसर्गित करण्यासाठी तेवढाच बदल केल्यासारखा. असा बदल नैसर्गिकपणे होण्याची शक्यता खूप कमी असल्याचं मानलं जातं. निकोलस वेड यांच्या लेखात त्यांनी नोबेल पुरस्कारप्राप्त विषाणुतज्ज्ञ डेव्हिड बाल्टिमोर यांचं मत नमूद केलं आहे. बाल्टिमोर म्हणतात, ‘फ्युरिनमुळे स्पाइक प्रोटिन ज्या ठिकाणी तुटतं, ते पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की या संरचनेतच सार्स-कोव्ह-२ च्या उगमाचा निश्चित पुरावा मिळू शकेल.’ एका नोबेल पुरस्कार प्राप्त विषाणुतज्ज्ञाकडून आलेलं हे विधान फार महत्त्वाचं आहे.
करंट सायन्स या मासिकात भारतीय विज्ञान संस्थेचे पूर्वीचे संचालक आणि जैवरसायनशास्त्रज्ञ पद्मभूषण पी. बलराम यांनी सार्स-कोव्ह-२ च्या उगमाविषयी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे, ‘विषाणू लक्ष्य पेशीशी जोडला जाणं (स्पाइक प्रोटिन एसीई २ रिसेप्टरशी जोडलं जाणं) भौतिकशास्त्रीय घडामोडींवर अवलंबून असतं, पण विषाणूचा पेशीत प्रवेश रासायनिक प्रक्रियांवर (फ्युरिनमुळे स्पाइक प्रोटिनची साखळी तुटणं) अवलंबून असतो. ढोबळपणे सांगायचं, तर या संदर्भात भौतिकशास्त्रीय घडामोडी रासायनिक अभिक्रियांपेक्षा जलद असतात. विषाणूचा पेशीत प्रवेश जलद करण्यासाठी या दोन्हींतली मंद प्रक्रिया जलद करण्याचा विचार कुणी नक्कीच करू शकतो.
हे व असे अनेक तर्क पुढे आल्याने आता सार्स-कोव्ह-२ च्या उगमाच्या सर्व शक्यता लक्षात घेणं आवश्यक बनलं आहे. भविष्यात कुठल्या रोगाचा उद्रेक होऊ नये आणि झाल्यास त्याच्याशी सामना करण्यास आपण सक्षम असायला हवं यासाठी हा शोध घेणं अत्यावश्यक आहे. मे २०२१ मध्ये काही शास्त्रज्ञांचं ‘सायन्स’ या नियतकालिकात एक पत्र प्रकाशित झालं. त्याचा आशय असा होता, की सार्स-कोव्ह-२ विषाणू प्रयोगशाळेत निर्माण झाला की नैसर्गिकपणे निर्माण झाला या दोन्ही शक्यता ध्यानात ठेवून आपण माहिती व पुराव्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करायला हवा. याबाबतची तपासणी पारदर्शक, वस्तुनिष्ठ व माहितीच्या आधारे करावी.
थोडक्यात, गेलं वर्षभर हा विषाणू प्रयोगशाळेत तयार झाला असणं शक्य नाही असं जगाला छातीठोकपणे वाटत होतं, ती खात्री आता डळमळीत झाली आहे. कुठल्याही बाजूचे ठोस पुरावे मिळाल्याशिवाय कोणताही दावा करता येणार नाही हे स्पष्ट आहे. शिवाय हा विषाणू प्रयोगशाळेत तयार झाला असेल असं सिद्ध झालं तर पुढे काय, हा वेगळाच मुद्दा.
---
आरती हळबे
साभार पुनर्प्रकाशन.
पूर्व-प्रकाशन : 'महा-अनुभव' जुलै २०२१
"मानवी कारस्थान आहे" म्हणणारे लेखातील काही युक्तिवाद तकलादू आहेत
(पुढील प्रतिसादात अनेक ठिकाणी "लेखकांनी असे म्हटले" वगैरे व्यक्तिगत वाटू शकणारी वाक्ये आहेत. जमेल त्या ठिकाणी ती बदलून मी"लेखात असे म्हटले" अशी अधिक वस्तुनिष्ठ करायचा प्रयत्न केला आहे. पण काही ठिकाणी तसे जमले नाही, किंवा अनवधानाने "लेखक" असा उल्लेख राहिलेला असेल. क्षमस्व. )
लेखातील "मानवी कारस्थान आहे" म्हणणारे काही युक्तिवाद तकलादू आहेत.
लेखातील बरेच मुद्दे मोघम आहेत, त्यांच्याबद्दल ठोस खंडन करणे शक्य नाही. तरी काही मुद्दे किंवा ध्वनिते मोघम नाहीत, त्याविषयी इथे लिहितो आहे.
इतिवाक्यातील
असा आभास करवते की दोन्ही बाजू समसमान हलक्या वजनाचे (ठोस नसलेले) पुरावे प्रस्तुत करत आहे. पण असे स्पष्ट म्हटलेले नाही, त्यामुळे प्रत्युत्तर "आम्ही 'समसमान' असे म्हटलेच नाही" अशी पळवाट काढायला पुरेशी जागा ठेवलेली आहे.
परंतु "नैसर्गिक उत्क्रांती" बद्दल स्पष्टपणे "खूप कमी शक्यता" असा शब्दप्रयोग आहे. पण "मानवनिर्मित" बात कमी-की-अधिक शक्यता असा काहीच स्पष्ट उल्लेख नाही.
लेखाने एका बाजूची शक्तता 'कमी' म्हटली आणि दुसऱ्या बाजूच्या शक्ततेबाबत काहीच म्हटले नाही, तिथे तर समान शक्यतेपेक्षा अनुल्लेखाने "मानवनिर्मित"चेच पारडे जड केलेले दिसते.१
एक ठिकाणी तर कारस्थानातील एक मुद्दा दुसऱ्या मुद्द्याशी परस्परविरोधी आहे. पण ते युक्तिवादात अशा प्रकारे मांडले आहे, की परस्परविरोध कळून येत नाही.
(अ) मुद्दा की विषाणू वटवाघुळातून थेट मनुष्याला संसर्ग करण्याची शक्यता इतकी कमी आहे, की याबाबत साशंक असावे.
(ब) डिसेंबरच्या आधीचे असे उदाहरण लेखातच आहे:
पण इथे 'अ' मुद्द्याचे खंडन होते असे दाखवून न घेता, युक्तिवाद वेगळ्याच कारस्थानी दिशेला जातो.
लेखाची जबाबदारी आहे की अ/ब कुठला विरोधी मुद्दा सबळ हे जाणावे. एक तर 'अ' युक्तिवादाने 'ब' मुद्दा खोडला जातो आहे = 'ब' युक्तिवाद देऊ नये ; नाहीतर 'ब' युक्तिवादाने 'अ' मुद्दा खोडला जात आहे= 'अ' युक्तिवाद देऊ नये. (त्याहून वरचढ म्हणजे, "मीडियावर अ/ब दोन्ही युक्तिवाद देतात, त्यांपैकी ब/अ युक्तिवाद चुकीचा आहे" अशी स्पष्ट माहिती द्यावी.)
वाचकांना "तुम्हीच काय ते ठरवा" अशी जबाबदारी द्यायची असेल, म्हणा. तर विरोधी अ/ब मुद्दे एकाजवळ एक मांडून वाचकांना काही साधकबाधक निर्देश दिले पाहिजेत.
परस्पर-संगती/विसंगती न लावता दोन्ही मुद्दे स्वतंत्रपणे देणे योग्य नाही. वाचकांना "दोन मुद्दे = दुप्पट पुरावा" असा गैरसमज होतो करून देते.
एक ठिकाणी चुकीची (की अपूर्ण) माहिती खात्रीने देऊन काहीतरी युक्तिवाद साधला आहे.
"केवळ मनुष्याला संसर्गित" खंड मी या प्रतिसादापुरता ठळक केला आहे. तो भाग नसता, तर युक्तिवादाचा जोर जातो. परंतु कोव्हिडचा संसर्ग मांजरा-वाघा-सिंहात, कुत्र्यांतत, मिंक या खूप भिन्न जनावरांत होऊ शक्तो, फक्त मानवांत नाही. ( https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/daily-life-coping/animals.html ) लेखातील युक्तिवादात "केवळ मनुष्याला संसर्गित = असा बदल नैसर्गिकपणे...शक्यता खूप कमी " शब्दांनी हा पुरावा सबळ असल्याचे ध्वनित होते; पण जर मनुष्य व अनेक अन्य जनावारांना संसर्ग होऊ शकेल तर तोच युक्तिवाद डळमळीत होतो. कारण विषाणू अनेक जनावरांत संसर्गित होत असेल, तर बहुधा नैसर्गिक बदलाची शक्यता "खूप कमी" नसावी.
लेखाच्या शैलीबाबत एक मुद्दा :
सध्या लोकांत तज्ज्ञांबाबत अनादर आहे, तो अन्याय्य आहे, हे मला मान्य आहे. तरी सर्वांसाठी लिहिलेल्या विज्ञान लेखांत जमल्यास तज्ज्ञांचे मत लेखापेक्षा वेगळ्या शैलीत द्यावे. तज्ज्ञांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे मुद्दा सबळ असल्याचे दाखवावे. तज्ज्ञांना (वेगळ्या कामासाठी) मिळालेल्या पुरस्कारांचा दाखला देऊन मुद्दा सबळ असल्याचे सांगू नये. उदा :
आणि मग डॉ बॉल्टिमोर यांनी ते विधान काही प्रमाणात दुरुस्त केले (निश्चित पुरावा "smoking gun" पेक्षा अनिश्चित शब्दप्रयोग करायला हवा, असे म्हणाले.) तो मुद्दा आपण या शैलीच्या चर्चेत सोडून देऊ या.२
त्यापेक्षा हे सौम्य आहे, पण त्या नोबेल वाक्यानंतर मला जरा त्याच धाटणीचे वाटले
---
१शक्यतांचा नीट हिशोब केला नाही, तर भ्रामक युक्तिवाद निघतात : आमच्या सोसायटीत ५० पाळीव कुत्री आहेत. त्यामुळे समोरच्या चौकात केलेल्या घाणीची शक्यता दर-कुत्र्यामागे केवळ दोन टक्के आहे. त्यामुळे घाण पलीकडच्या बंगल्यातल्या कुत्र्याने केली आहे. (सोसायटी कुत्रे २%, पण बंगल्यातील कुत्राबाबत शक्यतेचे गणितच केले नाही, आणि गणित कसे करायचे त्याबद्दल निर्देशही नाही. सोसायटीत ५० म्हणजे शक्यता १/५० = २% असे असले, तर बंगल्यात १ कुत्रा त्याने चौकात घाण करायची शक्यता १/१ = १००% की काय? )
२ मग डॉ बॉल्टिमोर यांनी ते विधान काही प्रमाणात दुरुस्त केले (निश्चित पुरावा "smoking gun" पेक्षा अनिश्चित शब्दप्रयोग करायला हवा, असे म्हणाले.) तो मुद्दा आपण या शैलीच्या चर्चेतमुद्द्याबाबत सोडून देऊ या
https://www.latimes.com/business/story/2021-06-08/nobel-laureate-baltimo...)
चीन सरकारला तरीही जबाबदार धरले पाहिजे
वरील प्रतिसाद वाचून माझे असे मत जाणवेल, की "विषाणू मानवनिर्मित आहे" याबाबत सोशल मीडियामध्ये होणारी चर्चा भरकटत चालली आहे.
परंतु त्याचा असा अर्थ नाही की चीन सरकारची प्रचंड चूक नाही.
चीनच्या केंद्र सरकारने आणि वूहान प्रादेशिक सरकारने सुरुवातीला अव्यवस्थित कारभार केला. त्यात वूहान सरकारचा अथवा पुढाऱ्यांचा वैयक्तिक स्वार्थ होता. एक डॉक्टर ली वन्लियाङ् यांनी धोक्याची सूचना दिली, त्यांची मुस्कटदाबी करण्यात आली -- त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला. (डॉक्टर ली पुढे कोव्हिडने मृत्यू पावले, तेव्हा चीनच्या सोशल मीडियात मोठाच संताप उसळला होता.). डॉ. ली यांच्यावरील आरोप सरकारने उशिराने रद्द केला, पण तो सगळा प्रकार लाजिरवाणा होता (https://www.bbc.com/news/world-asia-55963896)
त्या सुरुवातीच्या काळातले वूहान राज्य सरकारचे दोन उच्चपदस्थ होते, त्यांच्यापैकी एकाची पदच्युती झाली (https://en.wikipedia.org/wiki/Ma_Guoqiang), पण दुसऱ्याला बढती मिळालेली आहे (https://en.wikipedia.org/wiki/Zhou_Xianwang). त्यामुळे चीन सरकार अंतर्गत व्यवस्थापनात बदल करते आहे की सारवासारव, हे स्पष्ट नाही.
असे संसर्गाचे उत्पात पुन्हा होऊ नये, राज्यातील पुढाऱ्यांच्या स्वार्थासाठी राष्ट्राचे/जगाचे नुकसान होऊ नये अशी स्वयंचलित यंत्रणा चीनने (आणि अर्थातच अन्य देशांनीही) निर्माण केली पाहिजे; आणि या बाबतीत चीनवर जागतिक दबाव येणे आवश्यक आहे. पण असा काही बोलबाला मी सोशल मीडियावर वाचलेला नाही. (माझा सोशल मीडियावरील वावर तसा कमीच आहे -- मला माहीत नसून अशी चर्चा होत असेल तर उत्तम!)
---
Hanlon's razor is a principle or rule of thumb that states "never attribute to malice that which is adequately explained by stupidity".
https://en.wikipedia.org/wiki/Hanlon%27s_razor
It is disappointing &
It is disappointing & dampening to see an article setting out to fact find the origins of the SARS-CO-2 , indulging in sinister conspiracy theories like bio weapons & genetic engineering. Accidental lab leak at least masquerades as a rival theory ; but bio war fare being mentioned in the same breath, in a science article?
Well, to each, their own.
Having said that, lab leak itself, for all its worth, is a conspiracy theory & here is why.
For starters lab leak was never totally ruled out; just that it stood on a very shaky ground.
The Terms Of Reference document of WHO clearly mentions the purpose as to investigate the origin of the virus & DOES NOT rule out Lab Leak at all.
Admittedly , SARS-CO lab leak did occur at multiple places like Taipei, Singapore & China in late 2003-04.But they weren’t concealed from the gaze of the scientific community by & large ( China was obstructive as always) & importantly occurred well after the pandemic kicked off.
The scientific consensus continues to be in favour of natural origin; it is only the chattering class that talks of a juicy, attractive,espionage novel kinda story with brave characters fighting a good fight against the mighty(!) WHO & governments- a David & a Goliath narrative.
That any data questioning natural origin theory is censored by scientific journals is an unbelievably facepalm claim, indulged in by lab leak enthusiasts.
Also this claim in above article that grants are at stake & all other political motives attached to the dismissal of lab leak are a lot of gas & unsubstantiated victim posturing.
One can’t get away making a claim of science & then explaining it partly by political intents. And if political is the realm under microscope, with Trump lending weight, the political windmills surely tilted in favour of lab leak. To make unscientific claims, demonising an admittedly autocratic & authoritarian regime any more than it can reasonably be, & frightening your citizenry IS political. With economic & military rivalry going on, it is easier to surmise who have political stakes.
Chinese are, like all authoritarian regimes go, are secretive. But there is a YouTube interview of the scientists who went to investigate the Wuhan leak, and watching it, it is apparent, the Chinese weren’t as obscurantist as they were made out to be, in fact they were cooperative than one expected them to be.
Also the team that went to investigate comprised of ace scientists assembled from around the world, had no axe to grind, were under no Chinese obligation, had no gag orders , and all of them supported the Natural Origin theory.
The genetic data in the corona virus research unequivocally show that SARS-CO-2 isn’t derived from any previously used viral backbone as claimed by the espousers of Lab Leak theory.
Also it is patently false that no evolutionary signatures exist in SARS-CO-2 while much is made of those externally manipulated ,increasingly rendered invisible ,by gene editing techniques.
Factoring in similarity of SARS-CO-2 to bat SARS CO like coronaviruses, it is likely that bats serve as reservoir host for its progenitor . Although RaTG13 , the closest kin of SARS-CO-2 , a horseshoe bat coronavirus ( oh, btw, it was called fake by lab leak apologists & claimed to be roped in to prop up natural origin theory, can you believe?) bears 96 per cent resemblance to the former’s genome, its spike diverges in Receptor Binding domain ( RBD) , which means it may not bind to human ACE2 efficiently.
Malayan illegally imported pangolins into Guangdong contain coronaviruses similar to SARS-CO-2. Some of them exhibit a strong similarity to latter in RBD including all six key RBD residues.
All of this means SARS-CO-2 spike protein optimised for binding to human ACE2 is the result of natural selection.
Neither the bat coronaviruses nor the pangolin ones so far have polybasic cleavage sites. Although no direct progenitor has been zeroed in on, the fact too remains that the coronaviruses in bats & other animals remain heavily undersampled & underinvestigated.Mutations , insertions & deletions being a possibility at
S1-S2 cleavage site, the polybasic cleavage site too can arise by a natural selection- adaptation evolutionary process.
For a direct precursor to achieve mutations in both the processes ( cleavage site & spike protein) suitable to bind to human ACE2, the reservoir host got to exist in high numbers for the natural selection to occur without a hiccough. And bat populations fulfil this precondition satisfactorily.
Alternatively, the precursor jumped into humans acquiring the above features through adaptations during undetected human to human transmission.
All SARS-CO-2 genomes sequenced so far have the common genomic features & are thus derived from a common ancestor that had them too. Pangolin RBD is a case in point. It means it was probably also in the virus that jumped to humans. So that leaves only the polybasic cleavage site that got inserted during h to h transmission. Sufficient opportunity for it would have arisen if many prior zoonotic events had occurred that produced short chains of h to h transmission over an extended period.
This is exactly what happened during MERS-CO-2 , during which all human cases were result of jumps of the virus from camels to humans, several such short bursts.
There is every reason to believe that such an eventuality existed with SARS-CO-2 too.
Granted these are hypotheses yet, research & studies about which continue, but they derive from previous coronaviruses life cycle studies, are simple, elegant, plausible, unlike the lab leak theory, more of which below.
About the specificity & the precision of the furin cleavage site, a lot of details will need to be digged into, like pallindromes, hairpin, polymerase & how hairpins make polymerase to commit copy errors. This isn’t place to do it, that would fall in the realm of dense virology jargon , for starters.
Suffice here to say that SARS-CO-2 developed a furin cleavage site at its precise location via copy choice error mediated recombination with an ancestor of the bat coronavirus HKU9 followed by subsequent mutations.( The narrative exists very much in virology literature & was in vogue several months before Nicolas Wade made his outlandish claim).
The proverbial smoking gun evidence for furin if you may.
Gain Of Function studies ( Shi Zhegli lab ) explored whether bat Corona virus directly attaches to human ACE2, a kind of direct bat to human infection., the purpose being to examine under which conditions the virus becomes more dangerous. All of this is available in WHO report. Nothing surreptitious about it. It serves to provide early warning systems before a pandemic breaks out. More debate is surely needed for transparency & there is a risk of it being used covertly for manufacturing biological weapons.
It has to be added too that Shi Zhegli is a respected scientist, is part of a larger network ,her virologist peers the world over respect her for her acumen & abilities & have never found anything suspicious with her lab activities for decades. This too needs to be brought to the table.
The research has been legitimate as is the demand for monitoring of it by state agencies.
Having said it, Gain Of Function to bio weapons is an astronomical leap ; bio weapons moreover is a poor way of waging war & wreaking destruction . Not efficient at all . Can boomerang on you , make you look terrible globally. And creating an entirely new’ bio weapon’ in the form of SARS-CO-2 is such a cost & effort bloomer when there was SARS-CO available for tweaking to be unleashed on the world( goodness knows what purpose it would have served).
So unless a strong, much more compelling evidence is forthcoming, bio weapons theory is a non starter, a dud .
About a loose collective like DRASTIC , they lack skeptical editing , are basically a network of like minded people who gather info & try to make sense of it in a linear manner. A one track narrative without asking questions to their own research . A pot pouri of engineers, businessmen & scientists who try to meddle into serious virology posers. This isn’t ad hominem but a rightful questioning of their methods as well as the lack of knowledge of serious virology.
About six miners falling sick & three of them dead, the story doesn’t tell us any more than the fact that bats carry a random mix of dangerous, diverse coronaviruses & the miners might have got any of them. It beats me how it can be connected to the lab leak ‘ hypothesis’.
Ditto for the researchers from Wuhan Institute falling sick in 2019 fall. Come on. What is the evidence that it was COVID that they got afflicted with & not an influenza or some other Corona virus infection? Such drivel doesn’t even make one laugh.
Also the claim that SARS & MERS intermediate hosts were uncovered
In 4 & 9 months respectively can hardly support the Lab leak theory.Ebola, for instance, was discovered in 1976 & after several epidemics its origin from which spillover occurred, remains undetected.It can take years & years to decades to lay bare the truth & yet the source may end up shrouded in mystery.
Even SARS progenitor virus is yet to be unearthed, as also where the first cases arose , 18-19 years down the line.
Sampling wild animals, sequencing of the viruses they carry to find the close genetic relative - all this is a humungously complicated task.
And is only a little more than a year & a half since SARS-CO-2 was identified & sequenced.
But the absence of a smoking gun for natural origin doesn't make lab leak one any more legitimate. No way.
And the phylogenetic analysis is already alluding to only one direction - bats as reservoir & pangolins or civets as intermediaries.
Btw, the Nobel laureate Baltimore has since backtracked from his comments to Nicholas Wade & doesn't rule out either of the possibilities.
However much genetic engineering & editing has progressed,virologists can't have a fine tuned, sophisticated, a priori knowledge of what they are going to bring into the real world,like SARS-CO-2, all the tweaking they do, notwithstanding.
The engineering of a virus that didn't exist yet;so essentially you aren't being aware of what you are engineering , leave alone monitoring it's tranmissibility - all this needs a gargantuan effort in technology intervention.A very very difficult task.
Are both the hypotheses possible?
Theoretically, yes.
Are they equally likely?
Hell, no.
The lab leak theory needs a massive cover up, with active conniving of a huge posse of scientists, journalists, bureaucracy,their silent , Cold Warish pledge of a complicity in a project the real fallout of which , the take aways from which are exceedingly small than the devastation it is going to wreak- all this for more than a year & half.
A feat no less stupendous than an aeroplane conjuring itself out of a
Dawkinsonian dump of rubble.. Just like that..
And the rival natural Origin theory
as mentioned above - simple, elegant, plausible, needing biology to behave only the way it has, the previous history of other coronaviruses,& their zoonotic spillover supporting it.
The two theories just don't stand on equal footing.
To borrow Richard Dawkins’s words, the Lab Leak theory is ' not even wrong'.
And mind well, lab leak theory is making rounds since the days of SARS & MERS as the source of origin of the outbreak .
SO THERE.
भाषा?
हे मराठी संस्थळ आहे. याची आठवण करून देण्यासाठी तेवढा प्रतिसाद.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मानव निर्मित की नैसर्गिक
कारोना विषाणू मानव निर्मित आहे की नैसर्गिक हे संशोधक सिद्ध करतील ह्या वर अवलंबून नाही.तर जागतिक
महासत्ता ना राजकारणात फायदा होईल असे निष्कर्ष . काढले जाणार आहेत.आणि संबंधित सर्व उद्योगपती ह्यांच्या सोयी चे.
लाभार्थी देश,संबंधित उद्योगपती हे असतील.
निरीक्षण,प्रयोग,निष्कर्ष ही विज्ञान ची व्याख्या पुस्तकात .
संशोधन जे कोणत्या तरी कंपनीच्या पैस्यावर होत असते किंवा देशांच्या सरकारी मदतीवर.
ज्याचे भांडवल त्यांचे मत च महत्वाचे असते.
विज्ञान क्षेत्रात पण सर्व आलबेल नाही.
सर्रास खोटे निष्कर्ष जाहीर केले जातात.
सर्वांना आईन्स्टाईन ( किंवा बाकी सन्माननीय संशोधक आईन्स्टाईन ह्यांच्या काळातील आणि त्यांच्या अगोदरचे काळातील ) समजू नका.
आता पर्यंत जे बेसिक सर्व शोध लागले ते हाडाचे संशोधक होते.
त्यांची स्वतःची मत होती आता.
आता मत व्यक्त करण्यासाठी पण संबंधित संस्था,सरकार ह्यांची परवानगी घ्यावी लागत असेल.
दोन्ही बाजूनी ठोस पुरावा नाही हे लक्षात घेणे महत्वाचे.
भाषा सुरेख, शुद्ध, सक्षम आहे त्याबाबद्दल अभिनंदन.
"दोन्ही" बाजू अजूनही "शक्यतांच्या" कोटीत आहेत, दोन्ही बाजूनी ठोस पुरावा नाही हे लक्षात घेणे महत्वाचे. सध्या चीनने हे जीवास्त्र बनविलेच होते हे सिद्ध झाले असल्यासारखा प्रचार चालू आहे. शिळोप्याच्या गप्पांसाठी असल्या संकल्पना मनोरंजक असतातच. असो. काही वैज्ञानिक मुद्दे:
१. "गेन ऑफ फंक्शन" संशोधन झाले नाही तर यापुढे हल्ला करू शकणारे व्हायरसेस कशा प्रकारचे असू शकतील आणि त्यांच्याविरुद्ध काय करता येईल (प्रतिबंध, व्हॅक्सीन्स, औषधे) याबाबत मानवजात अंधारातच राहील. त्यामुळे अत्यंत कडक देखरेखीखाली हे संशोधन चालू राहिलेच पाहिजे. देखरेख ही 'आण्विक" प्रयोगशाळांइतकीच कडक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची ठेवावी लागेल. चीनमध्ये जिथे "BSL-2" या कमी सुरक्षा-पातळीच्या जागी हे काम होत असल्याचे आढळले आहे (प्रत्यक्षात"BSL-3" या अधिक कडक सुरक्षेच्या पातळीची गरज असते!).
२. भारतीयांच्या प्रचंड बेशिस्त वर्तनातून व्हायरसचा धोका प्रचंड वाढविला जात आहे. याबाबत लोकांना ऐच्छिक आणि सरकारला सक्तीची प्रतिबंधक कृती करणे हे सहज शक्य असल्यामुळे, भारतीयांचे जीव वाचविण्यासाठी ते केले जावे. याला पाठिंबा मिळण्यासाठी लोकमत संघटित केले जावे. नवनव्या "व्हेरियंटस' ची निर्मिती ही मानवी शरीर "इन्क्यूबेटर " म्हणून वापरूनच होत असते.
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me