श्री कोरोनाविजय कथामृत (५) - मे २०२१
(एप्रिल महिन्याचे निरुपण इथे)
गेल्या महिन्याअखेरीला जे वाटत होते, तेच झाले.
पहिल्याच आठवडयात, ६ मे रोजी दैनिक नवीन बाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला ४,१४,४३३ !!!!
अधिकृत पातळीवर शांतता होती एखादा आठवडा.
चिंतन सुरू असावे बहुधा. (अर्थात हेही सकारात्मकच म्हणावे)
मग सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न जोरात झाला.
जगातील इतर देशांच्या तुलनेत पर मिलियन बाधितांचा आकडा कसा "चांगला" आहे वगैरे.
लसीकरण नियोजनाचा फार्स जगापुढे आला. (आणि चक्क लोकांच्यापुढेही आला.)
लसीकरण कसे सर्वात जोरात चालू आहे हेही सांगितले गेले.
पण लसीच्याकरताच्या लांबच लांब रांगा आणि न मिळणाऱ्या अपॉईंटमेंट्स हे लोकांना दिसत होते.
एप्रिल महिन्यात ८.३२ कोटी लोकांना लस मिळाली होती. (संदर्भ)
मे महिन्यात आकडा ५.६२ कोटी असा खाली घसरला. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लसीकरणाची परवानगी मिळूनही.
कधी पर मिलियन किंवा टक्केवारीत बोलायचे कधी नेट आकड्यात बोलायचे.
जे सोयीचे असेल ते.
सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने तर म्हणे ऑक्सिजन उपलब्ध नाही , हॉस्पिटलमध्ये बेड्स नाहीत वगैरे सोशल मीडिया किंवा इतर कुठल्याही माध्यमात लिहिणाऱ्यावर म्हणे थेट खटलेच टाकायला सुरुवात केली.
कर्नाटक राज्यातील एका तरुण तडफदार समजल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधीने यातही धार्मिक रंग देऊन तेढ पसरवायचा प्रयत्न केला.
ऑक्सिजन, औषधे, आणि इतर मेडिकल सामुग्रीचा ओघ जगभरातून देशात आला. पण यावर जीएसटी लावायचा किंवा कसे हे करण्यात आठ दहा दिवस विमानतळावरच राहिला. (चारपाच महिन्यांपूर्वी दावोस मध्ये "आम्ही जगाची फार्मसी आहोत" वगैरे वल्गना झाल्या होत्या.)
किमान काही राज्ये तरी कोरोना संबंधित मृत्युसंख्या अंडररिपोर्ट करत आहेत असं बोललं गेलं.
तरीही अगदी अधिकृत आकडेवारीनुसारही एक लाख वीस हजार लोकांचा या महिन्यात कोरोना आजाराने मृत्यू झाला. (सर्वात जास्त १८ मे रोजी ४,५२९)
एप्रिल महिन्यात महाराष्ट्राने आणि दिल्लीने मर्यादित लॉकडाऊन सुरु केला होता. मे महिन्यात इतरही अनेक राज्यांनी तो कित्ता गिरविला.
साथ जशी वर गेली तशीच हळूहळू खाली यायला सुरुवात झाली. अजून परिस्थिती पूर्ण कंट्रोल मध्ये नाहीच्चे, पण किमान जूनमध्ये तरी परिस्थिती निवळेल की काय असे वाटू लागले आहे. भारतात ...
अनेक सोशल मीडिया सेलिब्रिटीज सोशल मिडीयममधून तात्पुरती का होईना रजा घेऊ लागले आहेत.
पण लक्ष विचलित करण्यासाठी की काय माहीत नाही पण रामदेव यांनी कोरोनाविषयक ॲलोपॅथी विरुद्ध त्याची ट्रीटमेंट असला तोंडाळपणा करून निरर्थक वाद सुरू केले आहेत. (आयुर्वेद असे मुद्दाम लिहिले नाहीये. कारण रामदेव म्हणजे आयुर्वेद नाही.) लसीचे दोन डोस घेऊनही हजार डॉक्टर्स मेले वगैरे इत्यादी धादांत खोटी विधाने करण्याचा सपाटा लावून. अर्थात त्याला भीती नाही कारण दुसऱ्याच दिवशी "मला अटक ते काय त्यांचा बापही करू शकत नाही" हेही त्याने जाहीर सांगितले. काय ते ओळखून घेणे.
आणि तिकडे बोरीसकुमारांच्या देशात मात्र तिसऱ्या लाटेची सुरुवात होते की काय अशी शंका येऊ लागली आहे (नवीन बाधितांचे आकडे २,००० वरून ३,०००च्या घरात गेले आहेत म्हणून..)
तेव्हा वाट बघूयात.
बेक्कार गेला महिना,
पुढचा तरी बरा जाऊदेत.
तेवढीच सकारात्मकता.
मग परत कोरोनावर विजय जाहीर करायला आपण मोकळे.
लसीकरण
आमच्या सोसायटीचे काम करणार्या गड्याला (18-44) लस टोचून घ्यायची आहे. त्याचे नांवही मी नोंदवून दिले आहे. पण अजूनही त्यासाठी अपॉइंटमेंट मिळत नाही. लोकांनी बॉटस लावून ठेवले आहेत. सगळीकडे कायम लाल अक्षरांत booked असेच दिसते.
कटू असेल तरी
उपचार डॉक्टर काय करत होते?.
त्याचा corono मुक्त होण्यासाठी फायदा होत होता का?
खासगी हॉस्पिटल चे कमीत कमी बिल किती वसूल केले जात होते?
औषधांची टंचाई उत्पादन कमी असल्या मुळे होती की काळाबाजार वाढल्या मुळे.
उपचार चुकीचे झाले म्हणून बाधित मेले ह्यांची आकडेवारी का जाहीर केली जात नाही.
प्रतेक बाधित व्यक्ती वर डॉक्टर मंडळी काय उपचार करत होती ह्याची माहिती सामान्य लोकांस सहज माहीत झाली पाहिजे का दिली जात नाही?
उपचार मुळेच जास्त लोक मेली आहेत हे नाकारायचे झाले तर प्रतेक व्यक्ती वर काय उपचार केले हे सांगणे गरजेचे आहे.
हेच प्रश्न corona पेक्षा जास्त महत्वाचे आहेत.
सर्वोच्च न्यायालय म्हणते
https://epaper.loksatta.com/c/60876186