श्री कोरोना विजय कथामृत (३) - मार्च २०२१
(फेब्रुवारी महिन्याचे निरुपण इथे)
एक-दोन तारखेला ६०+ लोकांचं (आणि कोमॉर्बीडीटी असलेल्या ४५+ लोकांचं पण) लसीकरण सुरू झालं. अतिशय उत्साहाचं वातावरण.
मी पहिला डोस घेतला तीन तारखेला महानगरपालिकेच्या दवाखान्यात.
अतिशय उत्तम व्यवस्था होती.
इतरांनाही बऱ्यापैकी तसाच अनुभव येत होता (बघा : लसीकरण अनुभव हा धागा)
सगळं कसं छान छान होतं.
दुसरी लाट वगैरे फक्त यूएस युके आणि युरोपमध्ये होती. तिथेही त्यांनी आटोक्यात आणायला सुरुवात केली होती.
आम्ही हळूच बोरिसकुमारांच्या देशाला गेल्या महिन्यातच मागे टाकलं होतं. एवढंच नाही तर आम्ही या महिन्यात बायडेनमामांना टफ द्यायला लागलो. एकदोनदा त्यांच्या पुढेही गेलो.
आमचे आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी ७ तारखेला दिल्लीत सांगितलंही की " We are in the endgame of Covid pandemic". डॉक्टरसाहेबानी तिथेच असंही सांगितलं की आपल्याकडे लसीचा सुरळीत पुरवठा असणारे. मग काय प्रश्नच मिटला!!
हा माणूस चांगला शिकलेला आहे हो, डॉक्टर आहे!!! आता तोच असं म्हणतो म्हणल्यावर आम्ही अजून निवांत झालो.
हरिद्वारला बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीला कार्यकर्ते जोरात लागले. एप्रिल महिन्यात लाखांच्या संख्येत भाविक व साधुसंत येणार गंगामैयामध्ये पवित्र स्नानसोहळा करायला, तयारी नको त्याला?
अर्थात तशीही काही चिंता नव्हती. झालाच कुणाला कोरोना, तर हरिद्वारलाच गुरुदेव रामदेवबाबा यांचे पतंजली आहे. पतंजलीचे (पतंजलीच्या मते) कोरोनावरचे रामबाण आणि WHO सर्टिफाईड (WHOचं मत वेगळं असलं म्हणून काय झालं!) औषध कोरोनील तिथे भरपूर प्रमाणात असणार. देऊन टाकायचं, हाय काय अन नाय काय.
बाकीचे कार्यकर्ते निवडणुकीच्या कामाला लागले. पाच राज्यांच्या.
बाकी सगळीकडे सगळं नेहमीप्रमाणे सुरू होतं!!!
साथ आणि लस तुटवडा याबाबत पुढे काय वाढून ठेवलंय अशी शंकाही आली नाही आम्हाला महिन्याअखेर.
आम्ही सगळे निवांत होतो.
नवीन कोरोनाबाधितांच्या रोज वाढणाऱ्या संख्येकडे दुर्लक्ष करत होतो.
खालचा ग्राफ बघा, म्हणजे घोळ लक्षात येईल.
(एप्रिल महिन्याची कहाणी इथे)
मार्च महिन्याच्या पहिल्या
मार्च महिन्याच्या पहिल्या अर्ध्यात केव्हातरी आपण "सरकार अजून निवांत कसं काय आहे?" असं नवल व्यक्त करत होतं. तेव्हा महाराष्ट्रात आग पसरते आहे हे दिसत होतं.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
करोनिल
पतंजलीच्या आवारातच करोना उद्रेक झाला याची नाही म्हटले तरी राष्ट्रद्रोही, औपहासिक मौज वाटली असणार फुरोगाम्यांना!
खरी मौज
खुद्द रामदेवबाबांना (होऊ नये ही सदभावना) कोरोना झाला तरच सर्व राष्ट्रद्रोह्यांना आनंद होईल !
आधीच्या भागांत केलेल्या
आधीच्या भागांत केलेल्या पार्श्वभूमीनिर्मितीनंतर कथा आता वेग घ्यायला लागली आहे.
असे पण आपल्याला खूप मर्यादा आहेत.
मजुरांची प्रचंड संख्या आज कमावणार तेव्हा आज खाणार अशी लोक खूप आहेत.
Lockdown मध्ये घरा बाहेर पडू नका हे बोलणे सोप आहे पण मजूर ज्यांच्या कडे एक दिवस अन्न खरेदी करू शकतील एवढे पण पैसे नसतात त्यांना घरात बसून कसे चालेल.
आपल्या शहरात असलेली प्रचंड लोक संख्या.
७० ते ८० वर्ग फूट असलेल्या घरा मध्ये आठ आठ लोक राहतात भारतातील शहरात ते काय आणि कसे सुरक्षित अंतर ठेवणार.
एक करोड च जनतेला आरोग्याच्या सुविधेची गरज लागली तर पूर्ण यंत्रणा कोलमडून पडली.
खूप म्हणजे खूप मागास आहोत आपण.
आरोग्य यंत्रणा आपली अतिशय कमकुवत आहे.
भारतात फक्त महिन्याला सहा कोटी लस निर्मिती करण्याची क्षमता आहे पूर्ण लोकसंख्येला पुरेल एवढी लस निर्माण होण्यासाठी दोन वर्ष लागतील एकच डोस देण्यासाठी .
तोपर्यंत किती तरी वेळा व्हायरस मध्ये mutation होतील ..
भारताला अजुन खुप पल्ला गाठायचा आहे अजुन आपण शून्यात च आहोत.
Corona मुळे हे तरी समजल आणि सिद्ध झाले आपण अजुन खुप मागास आहोत.
भ्रमात होतो तो भ्रम दूर झाला.
लसेबद्दल जनतेला खूप तांत्रिक
लसेबद्दल जनतेला खूप तांत्रिक माहिती झाली ह्या भोंगळ सरकारमुळे. त्यामुळे लस नसेल तर निदान प्लासीबो तरी द्या अशी कोणी मागणी केली तरी आश्चर्य वाटणार नाही.