विकल्पतरू

विकल्पतरू

लेखक - धनंजय

---

एक वहिवाटीचे प्रेमप्रकरण

--------------------------------------

--------------------------------------

चौकोनातील शब्दावर निर्देशक नेऊन पर्याय निवडा.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

कथेतल्या वेगवेगळ्या शाखा काय आहेत त्या शोधणं आणि समजून घेणं हा एक चाळा वाटतोय, का बटणांवर माऊस नेऊन नवीन अक्षरं येताना पाहणं हा हे ठरवणं कठीण आहे.

संकल्पना आणि तंत्रज्ञानाचं नातं असं लावणं, रंजक झालं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सॉलिडे हे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असेच म्हणते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोबाइलातून केलं पण पोकल बांबूचे फटके बसताहेत.डेटा उडतो भरभर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मजा आहे. पण अता हे धनंजयकडून अपेक्षित!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अदिती,

इथे थबकूया, दोघेही. थकलो आहोत, विसावू. पण चित्त शांत होत नाही.
आनंद मावता मावेना,

"यानंतर "दु:ख अनावर होते आहे" ला जाता येत नाहीये.
मला वाटतं तो थ्रेड "विलगले" ठिकाणी नेणारा असेल - असा कयास.
__
प्लीज बघशील का की का जाता येत नाहीये ते?
________________________________
नात्यांच्या कितीतरी छटा (परिणीती) कळल्या. या अभिनव कल्पनेबद्दल, धनंजय यांचे कौतुक.
____
सुलगले/सलगले/बिलगले पेक्षा मला "विलगले" मध्ये त्यांच्या वेदनमध्ये जास्त रुचि आहे. कारण वेदना सर्वाधिक सच्ची असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अदिति बघेलच.

परंतु या ठिकाणहून तात्पुरते विकल्प :

इथे थबकूया, दोघेही. थकलो आहोत, विसावू. पण चित्त शांत होत नाही.दु:ख अनावर होते आहे,
पर्याय :
हे योग्यच आहे.
हे काही ठीक नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद धनंजय. मला "सलगले" नीट कळले नाही. मीलन झाल्यानंतर "सलगले" स्टेज येते का? आय मीन -

इथे थबकूया, दोघेही. थकलो आहोत, विसावू. पण चित्त शांत होत नाही. दु:ख अनावर होते आहे, हे योग्यच आहे. संबंध तोडण्यासाठी तू कारणावर कारणांचा डोंगर रचलास, मला पुरते चिरडलेस.

आणि

इथे थबकूया, दोघेही. थकलो आहोत, विसावू. पण चित्त शांत होत नाही. दु:ख अनावर होते आहे, हे काही ठीक नाही. आपण खूप प्रयत्न केला, पण तोही तोकडा पडला, हे समजून उमजले पाहिजे.

.
हे दोन "विलगले" नको का? Sad
का ते आत्ता या क्षणी "सलगले = संलग्न" आहेत म्हणुन "सलगले?"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय -- सलगले/विलगले सीमारेषेवरती असल्यामुळे "कुठे वर्गीकरण करायचे" असा फासा टाकला, त्याचे दान "सलगले" असे पडले.

थोडे उलगडून :

वहिवाटीच्या (stereotypical) प्रेमप्रकरणात
१. Here are A and B
२. A meets B
३. A loses B
४. A gets B again
अशा पायर्‍यांची कथा असते.

कथेच्या प्रवाहाकरिता "२. A meets B" मध्ये "३. A loses B"ची बीजे रोवावी लागतात असा वहिवाटीचा format आहे. त्यामुळे पहिल्या मीलनातसुद्धा असलेली पुढील विसंवदाची बीजे ज्या कथासूत्रांमध्ये वर्णिलेली आहेत, ती त्या "सलगले" टप्प्यावरतीच घातलेली आहेत. मात्र A loses B या ठिकाणची मनःस्थिती (म्हणजे पूर्वीची बीजे नव्हे) अधोरेखित केलेली कथासूत्रे "विलगले" वर्गीकरणात टाकलेली आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Great! स्पष्टीकरणाबद्दल, अनेक धन्यवाद. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक दुरुस्ती केलेली आहे; तो बदल योग्य असावा अशी अपेक्षा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होय बदल बरोबर आहे. बग टेस्टेड & क्लोझड!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरचे प्रतिसाद वाचून-१)गणितातली set /matrix theory?
२)पटाइत काकांच्या मराठी-हिंदी श्टैलने सलगले - जळले/धुमसत राहिले का इस्त्रिचा चटका बसला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१)गणितातली set /matrix theory?

रचनेला काहीतरी पॅटर्न आहे, हे खरेच. शिवाय कथासूत्रांचे चार प्रकार म्हणजे वाटल्यास set आहेत, हेसुद्धा खरेच. परंतु लिहिताना माझा set /matrix theory विचार नव्हता : प्रत्येक पर्यायात द्विभाजन = २ पर्याय उद्भवतात, असा सांगाडा होता. परंतु कदाचित तसे काही set /matrix theory वर्णन मागे बघून कोणाला करता येऊ शकेल. तुम्हाला नेमके काय जाणवले ते समजावून सांगू शकाल काय?

सुलगले, सलगले

सुलगणें दाते कोशातला दुवा —अक्रि. शिलगणें; पेटणें; भडकणें; जळणें. 'टोपीवाल्यांमध्यें परस्परें कजीया किती दिवसांपासून सुरू.
सलग/सलगी दाते कोशातला दुवा सलग-गी—स्त्री. १ दाट मैत्री; संगति; विशेष परिचय. २ एकसारखी रांग; ओळ. 'घरांची सलग लागत गेली.' [सं. संलग्न]
या नामापासून मी आपल्या मराठीभाषक सवयीने केलेला नामधातू "सलगणे" = "सलग होणे" वा "सलगी करणे" असा ढोबळ अर्थ अपेक्षित आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबरदस्त. काही ओळींच्या या कथांमुळे स्वतःचाच शोध घेणं होतं. शब्द निवडताना तत्क्षणी किंचित प्रमाणात असलेल्या भावनांतून सुरुवात होते. मग आयुष्यातल्या वेगवेगळ्या भावना आठवतात, मग जसजसं पुढचं निवडत जाऊ तसतसे प्रसंग आणि व्यक्ती मनात ठसठशीत होत जातात.

नॉइजपासून सुरुवात करून त्याला आकार देत, वाढवत नेत, काहीतरी गीत तयार व्हावं तसं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या वहिवाटीकडे असं पाहणं चक्क तत्त्वचिंतनात्मक वाटतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे वाचून बोर्हेसच्या ‘The garden of the forking paths’ या कथेची आठवण न होणं अशक्य आहे. एखाद्या कादंबरीतले प्रसंग घेतले, तर ‘इथे हे होऊ शकेल किंवा ते होऊ शकेल’ अशा अनेक शक्यता पदोपदी असतात. त्यातली जी प्रत्यक्षात येते त्याप्रमाणे कथानकाचा पुढचा प्रवास ठरतो. ह्या सगळ्याच शक्यता प्रत्यक्षात येतील अशी एक महाकिचकट कादंबरी एका चिनी तत्त्वचिंतकाने लिहिलेली असते अशी कल्पना या कथेत आहे.

गणिती परिभाषेत सांगायचं तर धनंजयची कथा हे binary tree आहे. याच्या ‘पुढची’ पायरी म्हणजे काही end-nodes एकमेकांना शिवून टाकता येतील, किंवा मागे जो पर्याय निवडला होता त्यावरून नव्या पर्यायाची tendency ठरवता येईल. पण अशी गुंतागुंत किती वाढवता येईल याला काही अंत नाही, तेव्हा असे बदल वाचकाने त्याच्या मनातच करून पाहिलेले चांगले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

बोर्हेसची आठवण सुयोग्य आहे.

त्याच्या "गार्डन ऑफ फोर्किंग पाथ्स"ची आठवण प्राथमिक असली, तरी आणखी एक संदर्भ आहे त्याच्या "An Examination of the Work of Herbert Quain"मधला. यातील हर्बर्ट क्वेन पात्र "एप्रिल मार्च" नावाची कथा लिहितो - तिच्यात एका शेवटच्या प्रकरणाच्या आधीची तीन पर्यायी प्रकरणे असतात; आणि त्या तीन पर्यायी प्रकरणांच्या मागे प्रत्येकी तीन (अशी नऊ) पर्यायी प्रकरणे असतात.

"फाटे फुटणार्‍या वाटांचा बगीचा"मध्ये कधीकधी पायवाटांचे फाटे पुढे एकमेकांना मिळतात. हे असे करावे का? असा विचार मी (खरे तर थोडा आळसावून) केला होता. तांदुळाचे १-२-४-८... कण मागून बुद्धिबळाच्या निर्मात्याने एका दानघमंडी राजाची फजिती केली होती, तशी माझी फजिती होऊ लागली होती. जर काही कथासूत्रे पुन्हा एकत्र करता आलीत, तर सूत्रांच्या संख्येची एक्स्पोनेन्शिअल ऐवजी पॉलिनॉमियल वाढ करता येईल, अशी कल्पना मनात आली.

कथासूत्रांची संख्या ५०-१०० असली पाहिजे असे मी आधीच ठरवलेले होते. याबाबत जयदीप चिपकट्टींची माझा संवाद दिवाळी २०१२ मध्ये झाला होता :
"सामसूम एक वाट" या तिनोळी रचनेत केवळ नऊ पर्याय होते.

जयदीप चिपलकट्टींची इच्छा आहे, की सर्व पर्याय एकत्र दिसण्याची, सर्वांचा एकत्र अस्वादानुभव घेण्याची काही सोय असावी. याकरिता पर्याय कमी असावेत, असे त्यांना वाटते. त्यांचा विचार त्या दृष्टीने पटण्यासारखा आहे. परंतु या प्रकारात वाचकाच्या निवडीमुळे तयार होणार्‍या तीनोळ्या भावनेच्या दृष्टीने, थिल्लरपणा/गूढपणा/शांतरस वगैरे प्रकारात अतिशय विसंवादी आहेत. त्या एकत्र बघून रसभंग होण्याची शक्यता अधिक. आणि वेगवेगळ्या निवडींमुळे विसंवाद होणे हे या कृतीकरिता अपेक्षित आहे. आयुष्यात प्रत्येक फाट्यावर हे किंवा ते निवडले, तर होणार्‍या परिणामशृंखला विसंवादी असू शकतात. तीनोळींकरिता मी दिलेल्यापुरते फाटे आणि पर्याय ठीक आहेत. परंतु पर्याय कमी न करता साधारण ५०-१०० पर्याय उपलब्ध असते, तर ते "फंक्शनली" अगण्य झाले असते. कोणीच वाचक सर्व पर्याय अनुभवायच्या भानगडीत पडणार नाही. आणि आपल्या निवडींमुळे आपण बघितलेल्या थोड्याफार रचना त्याच बघितल्या हे स्पष्ट जाणवेल. आतिवास यांना वाचकाचे कर्तृत्व तितकेसे जाणवले नाही, ते ५०-१०० पर्याय असते, तर जाणवले असते.

पण रचना करता-करता सर्वसमावेशक कथेबाबत मी वेगळ्या मार्गाने गेलो. हे इथले २ पर्याय एकमेकांना प्रतिषेध करणारे नाहीत. दोन पात्रे असल्यामुळे त्याच घटनेबाबत वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात, शिवाय प्रत्येक पात्राच्या दृष्टीने प्रेमप्रकरणाला सुसंदर्भ असे वेगवेगळे वैयक्तिक अनुभव असू शकतात. त्यामुळे ही सर्व २ सूत्रे या दोघांमधल्या वहिवाटीच्या प्रेमप्रकरणाची उप-प्रकरणे आहेत. म्हणजे मागे जयदीप चिपलकट्टींनी म्हटले तसे "सर्व पर्याय एकत्र दिसण्याची, सर्वांचा एकत्र अस्वादानुभव घेण्याची काही सोय असावी" असे पुन्हा झाले का? तर माझ्या मते, नव्हे. कुठल्याही वास्तवात कोणालाही काही थोडेच पैलू अनुभवायची वेळ येते. त्यामुळे काही थोडेच पैलू, एका पात्राचाच बालपणीचा इतिहास, दुसर्‍या पात्राचीच कुठल्या घटनेविषयी तक्रार, वगैरे अनुभवता येते. आणि ते प्रेमप्रकरण प्रत्येक वाचकाला थोड्या-थोड्याच पैलूंनी, आणि वेगवेगळे, कळते.

रचनेत काव्य-रचनेची प्रतिबिंबित आठवण यावी असाही काही सांगाडा घातलेला आहे. तो म्हणजे अंत्ययमक आणि त्याचा विस्तार केलेला गझलेतल "रदिफ". कवीने एकदा गझलेचा रदिफ ठरवला की नेमका तोच श्बद किंवा तेच उपवाक्य द्विपदीच्या शेवटी येते. कवी वेगवेगळ्या कथासूत्रांना नेमक्या त्याच शेवटापाशी कसा नेणार? हे श्रोते-वाचक यांचे कुतूहल असते. इतकेच काय, कवितावाचनात कित्येकदा श्रोते रदिफ उच्चारण्यापूर्वीच वाहवाह करू लागतात.

एकाच ध्वनीने संपणार्‍या ओळी असतात, तशा एकाच ध्वनीने सुरू होणार्‍या ओळींच्या कविताही साहित्याच्या इतिहासात आहेत. म्हणजे ओळ सुरू एकसारखी होते, आणि तिथून कथासूत्र कवी कुठेकुठे नेऊ शकतो, हे श्रोते-वाचकांचे कुतूहल. ओल्ड इंग्लिश मधील काव्य, उदाहरणार्थ बेओवुल्फ - यात काही ओळी एकसारख्या ध्वनीने सुरू झाल्या तरी त्या ओळी एकमेकांचे खंडन करत नाहीत -- कथेतले वेगवेगळे पैलू सांगतात.

{किंवा कन्नडातील "प्रास" काव्यप्रकार आठवता येतो. (माझ्या प्रास-धाटणीच्या बीभत्स रचनेची उगाच जाहिरात)}

या इथल्या रचनेतील प्रत्येक कथासूत्र एका ठिकाणून सुरू होते, अर्धी कथानके त्यानंतरच्या शब्दातून, वगैरे. सर्व २ सूत्रे मिळून एकच कथा/वास्तव आहे, पर्यायी परस्परखंडक वास्तवे नाहीत. प्रत्येक सूत्र हे "प्रास" पद्धतीच्या कवितांनी स्फुरलेले कडवे आहे. रदिफ एकच असूनही गैरमुसल्सल गझलमधले जसे प्रत्येक कडवे स्वतंत्र वाचले जाऊ शकते किंवा अन्य कडव्यांसह वाचले जाऊ शकते, तसेच या रचनेतील प्रत्येक सूत्राचे होते.

(आता पुरे झाले माझे.) सारांश : बोर्हेसचे मोठे ऋण आहे, निश्चित. पण बनता-बनता या रचनेने बरेच वेगळे रूप धारण केले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जवळजवळ प्रत्येक जुळे पर्याय हे म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह आहेत
.
एक्सेप्ट -
.
(१) थकलो आहोत विसावु
(२) हे चैतन्य अनुभवु

हे दोन पर्याय मात्र म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह नाहीत. कारण "थकलो आहोत विसावु व चैतन्य अनुभवु" असे होऊ शकते Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूच तुझ्या कथेचा शिल्पकार!!!

इथे थबकूया, दोघेही. हे चैतन्य अनुभवू. मोकळे-मोकळे वाटते आहे. चूक आपली नव्हती, समाजाचीही चूक नव्हती. आपले आदले कच्चे भाळणे विरले, त्याचे समाजाला सुतक नव्हते. आणि आज सोयर नाही, की आपले प्रेम पक्के आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त. विस्तारित प्रयोग आवडला.

मेघना पेठेंच्या 'आंधळ्याच्या गायी' या संग्रहातली ही वाक्यं आठवून गेली:

(घटना घडतात. पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात. घडायचं ते घडून जातं... ) पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले... तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे... क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्वाचे... त्यातला एकच निवडता येणार असतो, आणि निवडावा तर लागणारच असतो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! तूफान कोट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रयोग फारच आवडला आणि त्या संदर्भात वरचा नंदनचा प्रतिसाद अतिशय समर्पक आहे. अनेक पर्याय निवडूनही 'विलगले' स्टेशनला जाता येईना म्हणजे आमचा आशावाद दुर्दम्य असावा :-). एकाच प्रकारचे पर्याय निवडूनही एखाद्या फरकाने सर्वस्वी वेगळ्या प्रदेशात पोहोचू शकतो ही जाणीव चटका लावणारी आहे.

या प्रयोगाच्या निमित्ताने व्हल्दिमीर प्रॉपच्या परिकथांच्या रचनांवरच्या सिद्धांतावर आधारीत वाचकाच्या निवडीनुसार कथा निर्माण करणारे हे संस्थळ आठवले.

अवांतर - कर्ट वॉनगटची ही मजेशीत चित्रफीतही आठवली, या चित्रफीतीचा या धाग्याशी अर्थाअर्थी काही संबंध नाही पण गोष्टींच्या रचनेकडे आणि वाचकावरच्या त्याच्या परिणामांकडे असे आलेखाच्या दृष्टीकोनातून पाहाणे मजेशीर वाटलेले आठवले इतकेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक विकल्पांत गाठल्यानंतर पुन्हा पहावेसे वाटले नाही.

कदाचित दिवसभरच्या कामानंतरच्या थकव्यामुळे असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हे इंटरेस्टिंग वाटतंय, दोन तीनदा वेगवेगळे विकल्प निवडून पहिले पण - " सुलगले , सलगले, विलगले , बिलगले " हे डोक्यावरून गेले !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

वहिवाटीच्या (stereotypical) प्रेमप्रकरणात
१. Here are A and B = सुलगले = ठिणगी/ओळख
२. A meets B = सलगले = सलग झाले = जवळ आले
३. A loses B = विलगले = विलग झाले
४. A gets B again = बिलगले = खूप जवळ आले.
अशा पायर्‍यांची कथा असते.

तुम्ही ज्या काही शाखा निवडल्या त्यातून एका छोट्या परिच्छेदाचे पान तुम्हाला मिळाले. तो कवडसा म्हणजे त्या पूर्ण प्रेमप्रकरणातला एक छोटासा तुकडा. तो तुकडा त्या चार टप्प्यांच्या stereotypical प्रेमप्रकरणात कुठे आहे, ते त्या खालच्या ओळीत दिलेले आहे.

-------- यापुढे ऑप्शनला टाकण्यालायक तपशील) ---------

कोणत्याही प्रकरणाचे सर्व तपशील आपल्याला कधीच मिळत नाहीत - म्हणजे कोणी अगदी प्रयत्न करून या इथले सर्व कथा-कवडसे वाचेल असे मला वाटत नाही. जे काही कवडसे तुम्हाला मिळतील, त्यावरून तुम्हाला वैयक्तिक-स्पेशल कथा मिळेल. उदाहरणार्थ, तुम्ही ३ परिच्छेद बघितले, ते सर्व टप्पा-क्रमांक १ (सलगले) वरचेच असले, तर "पैला-पैला प्यार" प्रकारची कथा समजू येईल. त्यात काही संघर्ष असला, तर ते पैले-पैले प्यार फुलण्यात काही अडचणी आल्या असतील, तसा संघर्श असेल.

मात्र दोन-तीन वेगवेगळ्या टप्यांवरचे परिच्छेद तुम्ही वाचले, तर ते तितके कवडसे जुळवून तुम्हाला वेगळी काहीतरी कथा समजू येईल. उदाहरणार्थ तीन परिच्छेद असे काही आले (क) "सलगले" एका प्रियकराच्या दृष्टीने स्व-ओळख होण्यातला संघर्ष, (ख) "विलगले" दुसर्‍या प्रियकराच्या दृष्टीतून अलग होण्यासाठी काय कारणीभूत झाले, तो तपशील, आणि मग (ग) "बिलगले" कोण्या एकाच्या तोंडून पुन्हा मीलन झाल्यानंतरची मनःस्थिती.
यावरून तुम्ही असे काही चित्र बनवाल प्रियकर-क च्या बाल-पौगंड जडणघडणीत असे काय होते, जेणेकरून प्रियकर-ख चे पुढे त्याच्याशी जमेना? त्या अडथळ्यावर (ग) मात केली ती कशी, किंवा खरेच करता आली का? अशी काहीतरी वेगळीच वैयक्तिक-स्पेशल कथा तुमच्या हाती येऊ शकेल.

----

मात्र हे वेगवेगळे फाटे वाचून अर्थ लावायची ही एकमेव पद्धत नाही. कदाचित तुम्ही वाचलेला प्रत्येक परिच्छेद स्वतंत्र लघुतमकथा आहे, असे तुम्ही समजू शकता. तोसुद्धा एक वेगळा अनुभव ठरेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुटकता आणि अल्पाक्षरी असल्याने
मनावर कुठलाही इम्पॅक्ट सोडत नाही.
म्हणजे ठळक अनुभुती येत नाही.
काहीतरी चाळवाचाळव झाल्यासारखे किंचीत खाज आल्यासारखे वाटते.
आपल्या प्रोग्रॅमने काय रीझल्ट दिला इतपतच उत्सुकता वाटते मग संपते.
प्रयोग मात्र फारच अनोखा आहे.
तुमच्या क्रिएटीव्हीटीला सलाम !!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love