दुष्काळ निर्मुलनासाठी ग्राम स्वराज्य अभियानचा खारीचा वाटा व आवाहन

मंडळी,

सध्या दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळतोय. मराठवाड्यात तर फार विदारक परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी देखील मैलोनमैल पायपीट करावी लागतेय. यावर काही करावं म्हणून ग्राम स्वराज्य अभियान टीमचे दुष्काळावर आणि एकंदरीतच जल/मृदा संधारणावर कामे करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन गेल्या दोन ते अडीच वर्ष्यापासून लोकसहभागातून बोरवंड, परभणी येथे काम सुरु आहे.

ग्राम स्वराज्य अभियान टीमने गावकऱ्यांना ग्रामसभेचं महत्त्व पटवून देऊन सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला चांगलंच यश मिळालं. आता गावात दर महिन्याला ग्रामसभा होते आणि गावासाठीचा प्रत्येक निर्णय हा ग्रामसभेत घेतला जातो. तसेच स्वच्छता अभियान राबवून गावामध्ये स्वच्छतेच महत्व पटवून दिलं. आता दर १५,२० दिवसाला गावकरी मिळून पूर्ण गाव स्वच्छ करतात. सध्या यासाठी एक सिस्टीम असावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. जेणेकरून रोजच गाव स्वच्छ आणि सुंदर दिसावा.

दुष्काळावर मात करण्यासाठी लोकसहभागातून गावाजवळून वाहणाऱ्या नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण केले. या कामाला बऱ्याच लोकांचं सहकार्य लाभलं. जसे कि गावकर्यांनी निधी दिला . टीमच्या सदस्यांनी पुणे, मुंबई इथून निधी उभा केला.
या कामाचे फळ मागच्याच महिन्यात बोरवंडच्या गावकऱ्यांना मिळाले. जेव्हा जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले (डाव्या कालव्यातून सोडलेले हे पाणी काही दुष्काळी गावासाठी सोडले होते त्या कालव्यामध्ये सोडून उरलेले पाणी जेव्हा इरिगेशन वाल्यांनी हे कुठं का जाईना म्हणून असेच सोडून दिले. ) ते पाणी बोरवंड मध्ये खोलीकरण केलेल्या नदी मध्ये खेळले. दोन दिवस आलेले पाणी गावातल्या तरुणांनी रात्री जागून अडवलं आणि तेच पाणी विहिरी आणि बोरवेल मध्ये रिचार्ज होऊन गावाला ४० दिवस पुरलं आणि अजूनतरी गावात टयान्कर आला नाही. त्याच नदीवर सध्या एक ते दोन पक्क्या सिमेंट बंधाऱ्याची गरज आहे.

खालील लिंक वर कालच्याच एग्रो वन मध्ये आलेली बोरवंड गावाची बातमी बघू शकता.

http://www.agrowon.com/Agrowon/20160505/5544043966953978668.htm

बोरवंड सारखीच अजून काही गावे आहेत. ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे. अश्या खालील ४ गावामध्ये येत्या पावसाआधी लोकसहभागातून जल संधारणाची कामे करण्याचे प्रयत्न आहेत. ह्या कामी ओंजळ प्रतिष्टान, पुणे तसेच एनी बडी कॅन हेल्प, मुंबई ह्या संस्था मदत करत आहेत.
आपण सर्वांनी मिळून ह्या कामी हातभार लावला तर काही गावे दुष्काळाच्या वाईट फेऱ्यातून मुक्त होतील.

गावे:
ब्रम्हपुरी, तरोडा, तरोडा पाटी , बोरवंड जिल्हा परभणी आणि सोरा, जिल्हा लातूर.

करावयाची कामे गावांच्या वरील क्रमानुसार: पाझर तलाव खोदणे, नदी खोलीकरण आणि रुंदीकरण, शोष खड्डे घेणे (म्याजीक पिट), नदीवर सिमेंट बंधारा बांधणे आणि नदी खोलीकरण आणि रुंदीकरण.

वरील कामांसाठी निधीची आवश्यकता आहे यासाठी हे आवाहन करत आहोत. धन्यवाद.

आपले विश्वासू,

ग्राम स्वराज अभियान टीम.

विशाल चंदाले , पुणे 8275108399
मुकेश शर्मा , पुणे 9971607972
असलम सय्यद , परभणी 7709274313
दिगंबर रोडे , परभणी 9404074321
रामप्रसाद खवले सरपंच, बोरवंड परभणी 9922356087
अमोल कार्ले , मुंबई ९०२२४४०११६

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

महत्त्वाची कामे करत आहात.
शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!