विपश्यना: माझा प्रत्यक्ष अनुभव: अद्ययावत
मी मिसळपाववर एका प्रश्नाचे उत्तर दिले आहे. माझ्या मते ज्यांना विपश्यनेची काहीच माहीती नाही त्यांना ती या लेखातुन होउ शकेल. तो उतारा जसाच्या तसा ईथे देत आहे. मी प्रथमच ईकडे लेख टाकतोय. जर नियमात बसत नसेल तर काय योग्य असेल ती कारवाई करावी.
लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण आहे. कारण माफ करणे म्हणजे काय ? त्या व्यक्तीशी आपण अगदी नीट वागलो, जुन्या गोष्टी पुन्हा त्याच्यासमोर उगा़ळल्या नाहीत, अगदी वागण्यातूनही काही दाखवलं नाही, तरी ते आपल्या मनातून इरेज करणं अशक्य आहे.
प्रथमतः धन्याचं या जीवनाच्या सर्वात महत्वपुर्ण अंगावरील लेखाबद्दल अभिनंदन. खुपच गहन विषय आहे हा. प्रत्येक मनुष्य आपापल्या परीने यावर उपाय शोधत असतोच हे आलेल्या प्रतिसादांवरुन दिसुन येइल. पण मला तिमांचा हा ( तरी ते आपल्या मनातून इरेज करणं अशक्य आहे)प्रश्न सर्वात मूळ आणी महत्वाचा वाटला. या विषयाबद्दल माझा अनुभव .
मनाचे साधारणपणे दोन भाग असतात. पहीला चेतन मन. यानेच आपले रोजचे व्यवहार आपण पार पाडत असतो. अनेक चांगल्या वाईट घटनांवर चिंतन मनन करुन आपण निर्णय घेत असतो. निरीक्षण केलेत तर असे दिसुन येईल की मनाच्या विचलीत अवस्थेत जे निर्णय घेतले त्यात काही ना काही त्रुटी असेल अन मन विचलीत नसताना जे काही कराल ते योग्य असेल.आपले मन काहीही करताना द्वंद्वामधे असते मग बर्याचदा चुकीच्या गोष्टी घडुन पश्चाताप करावा लागतो हेही दुक्खदच.मग करायचे काय? मन शांत ठेवुन व्यवहार करणे, ते तर आपल्याला कळते पण कसे करायचे ते वळत नाही.
मग मनाचे निरीक्षण करायचे. खरच लक्षपुर्वक पाहीले तर आपले मन हे दोन क्षेत्रात रमते. एकतर भुतकाळात ( ते त्याने असे केले, मला समजत नव्हते तेंव्हा, आता भेटेल तर मग दाखवतो. नाहीतर मी विश्वास ठेवला म्हनुन फसलो अश्या अनंत तर्हा असो.) नाहीतर लगेच भविष्यात उडी मारते ( मी दोन वर्षानी अमुक पदावर असेल, मग मला या पावर असतील, मग मी लोकांचे भले करण्याचे निर्णय घेउ शकेल, कींवा माझेच भले करु शकेल , अमुक करेल नी तमुक करेल, थोडक्यात स्वप्नरंजण). जगामधे जो अन्याय होतो तो त्या व्यक्तीच्या/ समाज्याच्या कल्याणाच्या नावावर सर्वात मोठ्या प्रमाणात होतो हे दिसुन येइल , खासकरुन धर्माच्या नावावर. अगदी कुटूंबातही अशी उदाहरणे सापडतील.मग आणखी लक्षपुर्वक पहा.
जरा उशीरच झालाय पण समजुन घ्याल अशी अपेक्षा.
बुद्धांनी ज्याला धम्म म्हटलय ती आहे जीवन जगण्याची कला.
गौतम बुद्धांनी धम्म म्हटलय तो धम्म असा.
शील+समाधी+प्रज्ञा(विसड्म, समज, बोध). एवढच .धम्म परिपुर्ण झाला. यातुन काही वजा नाही करायच , काही वाढवायच नाही. थोडक्यात मोड्तोड करायची नाही.
विपश्यनेचे शिबीरातील नियम फार कडक आहेत.
he pahaa
शिलपालन:
१)कुठल्याही प्राण्याची(जिवाची) हत्या करायची नाही.
२)चोरी करायची नाही.
३)ब्रम्हचर्य पाळणे .(व्याभीचार न करणे)गृहस्थांसाठी.
४)खोटे न बोलणे.
५)कुठलीही नशा न करणे.
शिबीरात जायच्या आधी काय असेल ते असेल. पण शिबीरात हे पाळावेत. १० दिवस काढुन विपश्यना आजमावयाला आल्यावर कटाक्षाने पाळावेत.
विपश्यना आहे आपल्यातील मनोवीकार दुर करनारी साधना. मनावर ताबा मीळ्वण्याची विद्या. जे इतके चंचल आहे मग हे काम सोपे नाहि. कठीणात कठीण आहे. मनोविकार जेवढे जेवढे कमी होतील तेवढी तेवढी मनशांती अनुभवास येइल.बरेचसे आजार जे मनामुळे शरिरावर प्रकटतात तेही यामुळे बरे होतात.पण हा उद्देश नसावा. कुठलाही फक्त शारिरीक असा आजार विपश्यनेने बरा होत नाही. त्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी. शीलपालनाने मन स्थिर व्हायला मदत होते.
आर्यमौन शीलपालनाला मदत करते.कडकपणे शीलपालन केले तर समाधीला(चित्ताची एकाग्रता) मदत होते. समाधी चांगली झाली तर प्रज्ञेला मदत होते. जितकी गहन समाधी, तितकेच गहन अंतर्मनात उतरता येते. आणि तेथील विकारांची सफाइ करता येते.कुठलेली कर्मकांड तेथे करता येत नाही.
१० दिवसात तुमचा अनुभव तुम्ही घ्यायचा.ध्यान कसं करायच एवढच तेथे शिकवतात. पुढे करायची की नाही हे सर्व तुमचे तुम्ही ठरवायचे.बंधन नाही. ज्यांना लाभ होतो ते साधनामार्गावर चालतात. नाही ते सोडुन देतात. हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न.
शील+समाधी+प्रज्ञा(विसड्म, समज, बोध). हे संपुर्न मीळुन ब्रम्हाचरण (ब्रम्हआचरण).
त्यावरुनच ब्रम्हचर्य हा शब्द आलाय. पण आजकाल ब्रम्हचर्य म्हनजे फक्त कामवासनेशी निगडीत आहे. बुद्धांच्या वेळेस ब्रम्हाचरण (ब्रम्हआचरण) म्हण्जे ब्रम्हचर्य असे होते . असो.
बुद्धाम्चा धम्म म्हण्जे निसर्गनियम, सत्य्,रीत्,स्वभाव.
चित्तवर क्रोध धारण कराल तर त्याची वाढ होउन जास्त क्रोधी व्हाल.तुम्ही दुसर्यावर क्रोध करा की स्वतःवर परीणाम तुम्हालाच भोगावे लागतात.एकदा का हा बोध झाला अनुभवाच्या पातळीवर मग एकच पर्याय. की कुठल्याही परीस्थीतीमधे चित्तवर क्रोध जागु न देणे. हेच प्रत्येक विकाराला लागु होइल. जसं बाहेर होतंय आंबा लावला तर आंबाच येतो. कडुलिंब लावले तर कडुलींब. तिच प्रक्रुती आतमधे तसेच काम करते.हे आता तुम्हाला पटणार नाही कडाचीत पण १० दिवसात तुमचा स्वतःचा अनुभव होइल. मग जर मनुष्यप्रानी सुखशांतीसाठीच झटतोय तर त्याला ती का मीळत नाही. मिळाली तर ती चिरकाल का टिकत नाही? तर आपन जमा केलेले विकार. जेवधे ते कमी तेवढी मनशांती जास्त.
पंचेंद्रिये आमी सहावे मन सतत काहीना काही विकार जागवतात. त्यामुळे शरीरावर संवेदना उमटतात. पुर्वसंस्कार त्याचे मुल्यांकन करतात. मुल्यांकन चांगले असे झाले तर शरीरावर सुखद संवेदना होतात, मुल्यांकन वाईट आहे असे झाले तर शरीरावर दुखद संवेदना उमटतात. मुल्यांकन कोण करते तर पुर्वसंस्कार.हेच आपल्याला त्रास्दायक आहेत. हिच अंतर्मनाची जी मुल्यांकन करण्याची अंध सवय झालीय.ती मोडुन प्रज्ञा(बोध) जागवायची साधना म्हणजे विपश्यना. साधना करताना तुमच्या लक्षात येते की कोणतीही संवेदना कायमची रहात नाही. सतत बदलतेय. हेच ते सत्य. एकच एक असे काहीच नाही. सतत बदल. हेच एक सत्य आहे की सतत बदल होतोय. जसं परिवर्तन संसार का नियम है. ऐकलय बर्याचदा पन हे प्रत्यक्ष ध्यानात अनुभवावर उतरते. हे चेतन मनाला( बुद्धी) समजते पण अचेतन आंधळं आहे, तेच बलवानही आहे. ते चेतन मनाचे काहीच चालु देत नाही. कळतय पण वळत नाही असं होतं.
अचेतन सतत शरिराशी जोडलेले असते. शरीरावर संवेदना उमटली रे उमटली की त्याचे मुल्यमापन करुन जर सुखद आहे असे मुल्यमापन झाले तर संपुर्ण शरीर सुखद संवेदनांनी कंपन पावायला लागते. तेच दुखदच्या बाबतीत. मग हे आंधळे अंतर्मन सुखद संवेदनांनी आसक्त होउन अजुन हवे अशी मागणी करते सवयीने. पण सतत बदलणे या निसरर्गनियमाने सुखद संवेदना जाउन दुखद येते तेंव्हा ते परत व्याकुळ होते. सुखद जाउ नये ते कायम रहावे हीच आसक्ती. दुखद लवकर जावे आनी सुकद संवेदना यावी अशी मागणि ते सतत करते. त्याला समजतच नाही की हे सतत बदलते आहे. त्यामुळे ते सतत प्रतिक्रिया देते. चेतनला समजते पण त्याचे काहीच चालत नाही. या अचेतनने जर प्रतिक्रिया न देता तटस्थपणे होणार्या संवेदनेकडे पाहीले तर जो विकार संवेदनेच्या रुपात जागलाय त्यचा नैसर्गनियमाने निचरा होतो. नवीन संस्कार बनत नाहीत आनी जुने वर येत त्यांचाही निचरा व्हायला लागतो.ही प्रक्रीया इतकी वेगवान असते की आपन सहज पकडु शकत नाही. म्हणुनच साधनाविधी.
हे समजुन घेउन जरी पटले तरी लाभ होत नाही. प्रत्यक्ष साधनेत ते तुमच्या लक्षात येइल. म्हनुन मानो मत जानो!!!!
प्रत्यक्ष साधना जरी तिथे १० दिवस असेल तर ३५५ दिवस तुम्ही ईथे समाजात वावरताना
शीलपालन कारावयाचे आहे. त्याशिवाय साधना पुढे सरकत नाही. कुणी म्हनेल मी इथे कसाही वागेल आनी मुक्त होइल हे केवळ अशक्य. त्यामुळे ज्याला साधनेत पुढे जाउन गहन अशी मनःशांती मिळवायची आहे त्यांना शीलपालनाला पर्यायच नाही.
खुप आहे लिहायला . हे फारच संक्षीप्त आहे. लिहिलं तरी अनुभव येणार नाही. म्हणुन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो.
तीन प्रकारचे सत्य असते.
१) शब्द सत्य. कोणितरी अधिकारी व्यक्तीने सांगीतले ते.
२) अनुमान सत्य. तर्कवितर्क करुन ठरवले ते.
३) प्रमान सत्य( प्रत्यक्ष तुमच्या अनुभवावर उतरलेले)
पहीले दोन्ही आपण मानतो. तिसरे आपन जाणतो. पहीले दोन्ही चुकु शकतात. तिसरा तुमचा अनुभव आहे. हाच खरा. पण बाहेरचा प्रत्येक अनुभव आपण घेउ शकत नाही. कोणि म्हनालं हे जहाल वीष आहे आनी मी म्हणेल अनुभव घेतल्याशिवाय मी माननार नाही. काय अनुभव घेणार, प्राण गेल्यावर कसला डोंबलाचा अनुभव? म्हनुन प्रत्येक गोष्टीचा आपन अनुभव घेतलाच पाहिजे असे नाही. दुसर्याच्या अनुभवाचा आपल्याला उपयोग करता येतो.
हीच नेमकी अडचण आहे अंतरजगतामधे. दुसरा केवळ मार्ग सांगू शकतो. आपल्याला स्वतःलाच त्याचा अनुभव घ्यायला लागतो. बुद्धाला बोधी प्राप्त झाली त्यातुन फक्त एकच मानुस मुक्त झाला तो मह्णजे सिद्धार्थ गौतम. बाकीच्यांना करुनेने मार्ग शिकवला जे चालतात ते मुक्त होतात.
असो: चुकभुल असेल तर माझी.
अवांतर: लोक म्हणतात सुर्य पुर्वेला उगवतो अन पश्चीमेला मावळतो. मला असे वाटते आहे की आपली पॄथ्वीच पश्चीमेला उगवते आनी पुर्वेला मावळते. हे लिहायला काहीच कारण नाही वाटले म्हणुन लिहीले.
ही इगतपुरीची माहीती Igatpuri centre
हे जगातील केंद्र World Centres
प्रतिक्रिया
विपश्यनेत पर्जींग(Purging)
विपश्यनेत पर्जींग(Purging) होते का? हा प्रश्न मला कोणाला तरी विचारायचा आहे. पर्जींग या प्रकाराची अतोनात भीती वाटते. मनातील मळमळ, दु:ख बाहेर आणण्याला धाडस हवं त्यापरीस (त्यापेक्षा) ते औषधांनी दडपणं सोप्प वाटतं.
____
ख्रिचिअॅनिटीतील, कन्फेशन हा पर्जींगचा एक प्रकार मानता याव काय?
मनातील मळमळ, दु:ख बाहेर
मनातील मळमळ, दु:ख बाहेर आणण्याला धाडस हवं त्यापरीस (त्यापेक्षा) ते औषधांनी दडपणं सोप्प वाटतं.
तेच तर मी लिहीलय दडपणं सोप्प वाटतं, पण ते उत्तर नाही समस्येच. मनातील मळमळ, दु:ख बाहेर काढावच लागेल जर तुम्हाला मनःशांती हवी असेल तर हे धाडस करावेच लागेल.
____
ख्रिचिअॅनिटीतील, कन्फेशन हा पर्जींगचा एक प्रकार मानता याव काय?
मानता यावा. पण विपश्यनेत आपण अंतर्मनाच्या( अचेतन मनाच्या) अगदी मुळाशी जाउन स्विकार करतो.त्यामुळे मूळापसुन विकार बाहेर पडतो.
ख्रिचिअॅनिटीतील, कन्फेशन हे चेतन मनाने स्विकारलेले असते त्यामूळे त्याचा लाभ तर होतो पण वरवर. म्हणजे झाड कापुन टाकल्यासारखं. मुळ तसेच असल्याने ते परत वाढणार.
धाडस केलं अन न घरका (औषधे) न
धाडस केलं अन न घरका (औषधे) न घाटका (विपश्यना) होऊन बसलं तर?
आपल्याला असं वाटतं की आपण
आपल्याला असं वाटतं की आपण त्याला दडपु शकतो किंवा मला पाहीजे तर मी त्याला वर काढु शकतो. हे अर्धसत्य आहे. त्या मळमळी संबंधीत घटणा जेव्हा-जेव्हा घडतील तेंव्हा आपली ईच्छा असो व नसो ते मळभ वरती येईल आनी आपल्याला पुन्हा प्रभावीत करेलच.
अगदी ध्याना॒त सुद्धा आपण अशी आपणास हवी ती घटणा काढुन टाकु शकत नाही. ध्यान म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसुन मनाचे तटस्थपणे फक्त निरीक्षण करणे. पण एक होते ध्यानाचा सराव झाल्यावर तुम्ही रोजच्या जीवनात जेजे विकार उद्भवतात , ते वर आलेले विकार तुम्ही सहजतेने काढुन टाकु शकता. करायचय काय तर प्रतिक्रिया न देता फक्त निरीक्षण. ध्यानात बसता तेंव्हा निसर्गनियमाने साधारणपणे स्थुल अगोदर ,त्यानंतर सुक्ष्म , आणखी सुक्ष्म असे शेवटी सुक्ष्मतम या क्रमाने विकार वर येतात. अनुभवाने तुम्हाला या गोष्टी पट्तील.
केवळ आनी केवळ निरीक्षण असल्याने याचे कोणतेही साईडइफेक्ट होत नाहीत.फक्त एकच अडचण आहे समजा तुमचे क्रोधाचे संपुर्ण संस्कार ज्या दिवशी निघुन जातील त्यानंतर कुठल्याही परीस्थीतीत तुम्ही क्रोध करुच शकणार नाहीत. हेच कुठल्याही संतांच्या जीवनात आपल्याला आढळून येईल.
मी ऐकलय विपश्यनेचा मौनाचा काळ
मी ऐकलय विपश्यनेचा मौनाचा काळ काही लोकांना तीव्र कठीण जातो. लोक रडतात. हे फार भीतीदायक वाटते. इन फॅक्ट "लुझिंग कंट्रोल" ही एक गोष्टच फार फार भीतीदायक वाटते. .....
मी ऐकलय विपश्यनेचा मौनाचा काळ
मी ऐकलय विपश्यनेचा मौनाचा काळ काही लोकांना तीव्र कठीण जातो. लोक रडतात. हे फार भीतीदायक वाटते.
हे अगदी खरय,पण काही लोकांनाच खासकरुन प्रसंगी रडु येत असतानाही ज्यांनी ज्यांनी न रडता त्याच दमन केलं त्यांना. मलाही पहिल्या शिबीराच्या ९ व्या दिवशी असेच रडायला आले होते. ज्यांच्या ज्यांच्याशी कुठल्याही कारणाने कटुता आली होती, ज्यांना ज्यांना माझ्यामुळे कूठल्याही प्रकारे त्रास झाला होता त्यांच्याबद्द्ल करुणा उत्पन्न झाली. असे वाटले की आधी हा मार्ग माहीत असता तर असे चुकीचे वागलोच नसतो. मी घरी आल्यावर बहुतेकांची माफी मागीतली. बरेच लोक तरआकश विसरुनच गेले होते परंतु मी फोन केल्यावर भेटल्यावर त्यांना आनंदच झाला. काहींनी तर आमच्या मनात काही आकस राहीलेला नाही पण आपणच का पुढाकार घ्यायचा म्हणुन ते अडुन बसले होते. मी तो घेतला तर त्याचा त्यांना आनंदच झाला. कोणीही विपश्यना न करताही हा अनुभव घेउ शकतो.
इन फॅक्ट "लुझिंग कंट्रोल" ही एक गोष्टच फार फार भीतीदायक वाटते. .....
लेखातील हा भाग पहा.
मग ज्यांनी अंतर्मनाचा अभ्यास केला त्यांच्या हे लक्षात आले की चेतन मन सुद्धा स्वतंत्र नाही आहे. अंतर्मन जास्त बलवान आहे. चेतन मनाने कुठलेही संकल्प करा ते संपुर्णपणे सिद्द्दीस नेता येत नाहीत कारण अंतरमन त्याचे काहीही ऐकत नाही, त्याची अंतरमनावर काहिही हुकुमत नाही. विपश्यनेचा अभ्यास कराल तेंव्हा हे तुम्हाला कळुन येईल की मूळात कंट्रोल आपल्याकडे नाहीच आहे. म्हणुनच तर आपल्याला फक्त घडतय त्याच फक्त निरीक्षण करायचय. सुखद/ दुखद संवेदना चालुच असतात, सतत बदलतच असतात, मी त्यांना थांबवु शकत नाही, आनी मी माझ्या प्रतिक्रियाही थांबवु शकत नाही.म्हणुनच केवळ निरीक्षण हीच आपल्यासाठी साधना होउन जाते. कारण अंतर्मनाचा दृढ झालेला स्वभाव. भीतीही विकारच आहे तीही अभ्यासाने निघुन जाईल.
आपलं मन कीती दुर्बल आहे याचा कोणीही हा प्रयोग करुन पहा.
शांत डोळे मिटुन आरामात बसा. नाकाच्या खाली वरच्या ओठांपासुन तर नाकपुड्यांच्या अंतर्भागात येणार्या जाणार्या श्वासावर लक्ष ठेवा तेही फक्त १ मीनीट.
अटी अशा आहेत ठरलेला भाग सोडुन श्वास आतबाहेर कुठे जातो हे आपले काम नाही.
सहज स्वाभावीक जसा येतो तसा आत आला तर आत, बाहेर गेला तर बाहेर फक्त जाणायचं. म्हणायचं नाही आत आला गेला बाहेर गेला. प्रतीक्रीया न देता फक्त जानायच. म्हणजे आपण फक्त वॉचमन आला तर आला गेला तर गेला. एकदाही चुक होता कामा नये. मनाला भटकु द्यायचं नाही. फक्त १ मिनीट.
मनाला बुद्धीने द्रुढ करा पाहीजे तेवढं केवळ १ मिनीट.
जर कोणीही हे करु शकला एकही श्वास न चुकता , एकदाही मन न भरकटु न देता केवळ १ मिनीट हे करु शकला तर त्याला विपश्यना करण्याची गरज नाही असं मी म्हणेन. हा काही फॉर्मुला नाही पण यातही काही दोष असेल तर माझाच. पहा बर करुन श्वास थांबवायचा नाही ना प्राणायाम करायचा. नैसर्गीकपणे जसा येतो तसा आणी जसा जातो तसा.
आपण जे ठळक अक्षरात लिहीलं आहे
आपण जे ठळक अक्षरात लिहीलं आहे तेच विचारायचं होतं की पूर्वतयारी म्हणून काही क्रिया आहेत का. आपण उत्तर देऊन टाकलत.
________
भयंकर रडकी होते. औषधांनी पहीलं थांबलं ते माझं रडू येणं. अन आता रडता येतच नाही. फक्त एक अतिशय टोकदार हुंदका जो कधीच बाहेर पडत नाही असा जाणवतो. मला माहीत आहे हे दमन आहे, दडपणं आहे. पण त्याविषयी काय करायचं तेच कळत नाही. क्वचित जर रडले तर इतकं मोकळं वाटतं. उकाड्याच्या दिवशी, पाऊस पडून गेल्यासारखं वाटतं.
________
क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे उक्तीनुसार हे मनातले मांडे थांबवते अन जर अन जो अनुभव येईल तो ऐसीवर टाकेन याची खात्री देते.
ऐसी अक्षरे संस्थळावर लेखन
ऐसी अक्षरे संस्थळावर लेखन कधीही संपादित करता येते. कृपया लेखनातील चूका सुधारा ही विनंती.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
प्रयत्न केलाय. आपा पॅरेग्राफ
प्रयत्न केलाय. आता पॅरेग्राफ मधे अंतर नाही राहिले. ते काही दुरुस्त झाले नाही.
चुका
ऐसी अक्षरे संस्थळावर लेखन कधीही संपादित करता येते. कृपया लेखनातील चूका सुधारा ही विनंती.
ऐसी अक्षरे संस्थळावर लेखन कधीही संपादित करता येते. कृपया लेखनातील चुका सुधारा ही विनंती.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
प्रयत्न केलाय. आता पॅरेग्राफ
प्रयत्न केलाय. आता पॅरेग्राफ मधे अंतर नाही राहिले. ते काही दुरुस्त झाले नाही.
मला मुळातच व्याकरणाची समज कमी आहे, जोडशब्दही बर्याचदा लिहीता येत नाहीत. त्यामुळे माफी असावी.
लेखाबद्दल काय म्हणताय ? हे जाणुन घ्यायला आवडेल.
विलासराव,
रावसाहेबांचा रोख तुमच्याकडे नसून अरुण जोशी यांच्याकडे आहे.
बरोबर आहे तुम्ही म्हणताय
बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते.
धन्यवाद.
!
आयला! आता मिटलेल्या प्रतिसादाविनाच?
माझ्या वाक्यातल्या चूका
माझ्या वाक्यातल्या चूका काढायच्या तर किमान सार्याच तर काढायच्या!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ऐसीवर स्वागत. बाकी, या
ऐसीवर स्वागत.
बाकी, या विषयाचा गंधही नसल्याने पास!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
धन्यवाद. बाकी, या विषयाचा
धन्यवाद.
बाकी, या विषयाचा गंधही नसल्याने पास!
अहो याचसाठी तर लिहीलय. ज्यांना अजीबात माहीती नाही त्यांच्यासाठी.
एका ओळीत सांगतो ध्यान म्हणजे स्वतःच्या मनाचे तटस्थपणे ( कुठलीही प्रतिक्रिया न देता केलेले) निरीक्षण.
व्याख्या खूप आवडली!
जमलंय.
आध्यात्म, वैराग्य आणि कंपनीला वगळून स्वतःच्या दृष्टीने ध्यान म्हणजे काय ते नेमकं सांगितल्याबद्दल +१ !
==================
भूतकाळातील आस्वल्य.
लेखनाबद्दल धन्यवाद. मग अनेक
लेखनाबद्दल धन्यवाद.
मग अनेक संशोधनानंतर गौतम बुद्धांनी अंतर्मन पुर्ण शुद्ध करण्याची विद्या विपश्यना शोधुन काढली.
थोडीशी दुरुस्ती,
माझ्या माहीतीप्रमाणे विपश्यनेचा उल्लेख ऋग्वेद आणि गीतेत पण आढळतो, त्यामुळे गौतम जो पुढे बुद्ध झाला त्याने ही लुप्त होवू पाहणारी विद्या परत एकदा शोघून काढली. गीतेतील विपश्यने वरील श्लोक आठवत नाहीत पण विपश्यनेच्या सिडीत असावते.
विपश्यनाचार्य गोयंकांजीच पण हेच मत आहे.
माझ्या माहीतीप्रमाणे
माझ्या माहीतीप्रमाणे विपश्यनेचा उल्लेख ऋग्वेद आणि गीतेत पण आढळतो, त्यामुळे गौतम जो पुढे बुद्ध झाला त्याने ही लुप्त होवू पाहणारी विद्या परत एकदा शोघून काढली. गीतेतील विपश्यने वरील श्लोक आठवत नाहीत पण विपश्यनेच्या सिडीत असावते.
विपश्यनाचार्य गोयंकांजीच पण हेच मत आहे.
अगदी बरोबर. फक्त लुफ्त होउ पहाणारी नाही तर त्यांच्या कालात संपुर्णपणे लुप्त झालेली. शोधली म्हणजे तयार नाही केली, ती होतीच पण कोणालाही येत नव्हती, तीचं विस्मरण झालेलं होतं.
जेंव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे म्हणलय याआधी कधी ऐकलच नाही असे माझे ज्ञानचक्षु उघडलेत. ते राजपुत्र होते, त्यांनी गीता वेद वगैरेंचा अभ्यासही केला होता. होतं काय तर तोच श्लोक वाचुन सांगणार्याला अभीप्रेत असलेला अर्थ विस्म्रुतीत जातो. कारण विद्या लुफ्त होउन बराच काळ लोटतो.
गुरुजी गीता, कुराण, कबीर, महावीर, गुरुनानक, येशु ख्रिस्त यांच्या सर्वांच्या वचनात जो विपश्यनेचा उल्लेख आहे ते सर्व १० दिवसांच्या शिबीरात सांगतात.
गीतेमध्ये विपश्यना
गीता आणि वेद ह्यांमध्ये विपश्यनेचा उल्लेख नेमका कोठे आहे ते माहीत नाही पण गीता, जी महाभारताचा भाग आहे आणि जिचे स्वतन्त्र ओळखले जाणे ७व्या-८व्या शतकानंतरचे आहे, निश्वितपणे बुद्धोत्तर आहे. साहजिकच बुद्धाने विपश्यनेचे ज्ञान गीतेमधून मिळविले असे म्हणणे सयुक्तिक वाटत नाही.
गीता आणि वेद ह्यांमध्ये
गीता आणि वेद ह्यांमध्ये विपश्यनेचा उल्लेख नेमका कोठे आहे ते माहीत नाही
माझ्याकडे ती सीडी आहे ज्यात ॠग्वेदातील ॠचा (रुचा जे काय असेल ते) आहे. गितेतील श्लोकही आहे.
पण मला तो ऐकुन टाईप करता येइल का नाही ही शंका आहे. जर कूठे गीतेतील श्लोक सापडतील ऑनलाइन तर मी ते ऐकुन तो नेमका श्लोक इथे डकवु शकतो. तेच ॠग्वेदाच.
शरिरावर जे वेदन( वेदना ज्याला आज आपण संवेदना म्हणतो) होतं त्याच्या अनुभुतीतुन जे ज्ञान झालं ते वेद.
विपश्यना म्हणजे नक्की काय
विपश्यना म्हणजे नक्की काय करतात? जरा तांत्रिक बाबींबद्दल सविस्तर लिहाल काय?
प्रयत्न करतो. एका ओळीत सांगतो
प्रयत्न करतो.
एका ओळीत सांगतो ध्यान म्हणजे स्वतःच्या मनाचे तटस्थपणे ( कुठलीही प्रतिक्रिया न देता केलेले) निरीक्षण.
जेंव्हा कोणताही विकार जागतो समजाकी क्रोध. आता याचं तटस्थपणे निरीक्षण कसे करणार. आपल्याला मुळातच राग आलाय हे तो कमी झाल्यावर कळते किंवा गेल्यावर कळते. तोपर्यंत आपण संस्कारीत प्रतिक्रिया देउन बसलेलो असतो आणी त्याचा जो व्हायचा तो परिणाम झालेला असतो. आपण ठरवतो की पुढे अशी चुक करायची नाही. पुन्हा ठरवुनही आपल्याकडुन असेच होते आणी पश्चाताप होतो. कारण ही प्रक्रीया फार वेगाने होते.पण क्रोध दुसर्यावर काय केला आणी स्वतःवर काय केला परीणाम तर एकच होतो. दु:ख/ व्याकुळता वाट्याला येते.
मग करायच काय? तर मग ज्यांनी यावर संशोधन केलं त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की क्रोध आल्याक्षणी तो आलाय ही स्विक्रुती करा. पण तो आलाय हे तो आला असताना कसे कळणार? मग त्यांच्या लक्षात आले की कुठलाही विकार जेंव्हा वरती येतो तेंव्हा दोन घटणा प्रामुख्याने घडतात.
पहीली म्हणजे तुमचा श्वास कमीतरी होतो किंवा वाढतो तरी, त्याची लय बिघडते. तुम्ही पहा तुमच्या रोजच्या घडामोडीत ही गोष्ट लगेच पकडता येईल.दुसरी गोष्ट म्हणजे शरीरावर त्याची संवेदना उमटते. पहा राग आला की शरीर थरथर कापते. विकाराकडे पहाणे अशक्य आहे पण श्वासाची बिघडलेली लय किंवा शरीरावर उमटलेली संवेदना पहाणे हे त्यामानाने सोपे आहे. हेच विपश्यनेच्या तंत्रात शिकवले जाते. पहीला अभ्यास श्वासावर लक्ष ठेवण्याचा आणी त्यानंतर शरिरावरील उमटलेली संवेदना पहाण्याचा. त्यापुढे आपण त्या सुखद्/दुखद संवेदनेला दिलेली प्रतीक्रिया आणी त्यामुळे त्यात्या विकारात होणारी वाढ. जर आपण प्रतिक्रीया न देता तटस्थपणे पाहु शकलो तर तत्काळ तो विकार विलीन होतो हा प्रत्यक्ष अनुभव. एवढच ते तंत्र आहे. वाचुन समजले तरी स्वानुभवाशिवाय पकडता येत नाही त्यामूळेच लाभ होत नाही हे आपल्या लक्षात येते.
एका ओळीत सांगतो ध्यान म्हणजे
माझा प्रश्न खोडसाळ वाटू शकतो, पण तसे नाही. शुद्ध तांत्रिक प्रश्न आहे.
------------------
स्वतःचे स्वतः निरीक्षण करायला 'दोन स्वतः' लागतील नं? पण स्वतः तर एकच असतो. मग ते कसं करायचं?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
माझा प्रश्न खोडसाळ वाटू शकतो,
माझा प्रश्न खोडसाळ वाटू शकतो, पण तसे नाही. शुद्ध तांत्रिक प्रश्न आहे.
तुमचा प्रश्न रास्त आहे.
स्वतःचे स्वतः निरीक्षण करायला 'दोन स्वतः' लागतील नं? पण स्वतः तर एकच असतो. मग ते कसं करायचं?
खरतर मी आजवर फक्त साधना केलीय आनी त्याचे मला झालेले लाभ अनुभवलेत. पण मी कधीही अशा प्रश्नांना उत्तरे दिलेली नाहीत. मित्रपरिवारात थोड्याफार चर्चा झाल्यात नाही असं नाही.पण मी तसा प्रशिक्षीत वगैरे नाही. ही जी सर्व उत्तरे मी दिलीत ती मी माझ्या समजेने दिलेली आहेत. त्यामुळे माझा असा कुठलाही दावा नाही की ती १०० % बरोबरच आहेत. पटली तर ठीक. त्यातील कमतरता दाखवली तर मला आनंदच होइल. म्हणुन मी जे खरोखर माहीती मिळवु इच्छीतात असे ज्या प्रश्नातुन प्रतीत होते अशाच प्रश्नांना उत्तर देतोय. काही लोकांनी म्हटलय ही तुमची विपश्यना वगैरे. विपश्यना माझी नाही तर ते एक तंत्र आहे मला त्याचा लाभ झालाय म्हणुन मी अभ्यास करतोय इतकच. कोणी जावंच असा माझा आग्रह नाही. कूणाला वाटलच तर त्याने जावे न पटले तर सोडुन द्यावे. मला फायदा झाला म्हणुन मी सद्भावनेने लिहीलेय ईतकेच.बराचसा भाग हा जनरल आहे म्हणजे तुम्हाला उद्देशुन नाही. आता तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.
अनेक क्रिया आपण एकाच वेळेस करतो. जसे की गाडी चालवताना आपण बाजुच्या व्यक्तीशी बोलतो. गाणीही ऐकत असतो आणी तरीही आपण समोर लक्ष ठेवुन असतो. आपण गाडी चालवतोय याची पुर्ण सजगता असते तसच काहीसं.
कोणताही महत्वाचा निर्णय घेताना आपण म्हणतोच ना की एक मन म्हणते असे कर आणी दुसरे म्हणते तसे कर.पण मन तर एकच असते ना? कींवा फारतर असे म्हणु की चेतन आणी अचेतन मन. अर्थातच मन तर एकच आहे आपल्याला.
तर विपश्यनेत आपण मनाच्या एका भागाला ट्रेन करतो. कारण मनापर्यंत पोहोचण्याचे आपल्याकडे दुसरे काही अवजार नाही मग त्याची दुर्बलता कशी दुरुस्त करणार. जसे आपण काट्याने काटा काढतो तसेच काहीसे.
ओके
ओके
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
धन्यवाद, तुमच्या
धन्यवाद, तुमच्या अनुभुतींबद्दल लिहु शकाल काय? म्हणजे विपश्यनेपूर्व आणि विपश्यनापश्चात परिस्थिती आणि झालेला फायदा.
अर्थातच होय. आता उदाहरणच
अर्थातच होय.
आता उदाहरणच द्यायचे झाले तर माझं पिणं बंद झाले (१६-१७ वर्ष प्यायचो मी, त्यातील शेवटची ७ जवळपास रोज), नॉनव्हेज खाणे बंद झाले, माझा क्रोध पुर्ण गेला तर नाही पण आता तो आलाच तर बर्याचदा मी त्रागा करुन घेत नाही, माझे माझ्याशी ज्या लोकांचे सबंध दुरावले होते ते जवळपास ९०% तरी पुर्ववत झालेत. मी स्वतः माझी चुक होती की नव्हती याचा विचार न करता माफी मागीतली आणी समोरच्या व्यक्तिंनीही मला माफ केले, माझ्या व्यवसायात मी जी थोडीफार लबाडी करायचो ती मी पुर्णपणे बंद केली अशा अनेक गोष्टीत जो बदल झालाय तेवढी तेवढी मुक्ती( त्या त्या गोष्टींपासुन)मीळाली की नाही?.जे वर मला झालेले लाभ सांगीतले आहेत तीच एका चांगल्या जीवनाची सुरवात नाही का? हे फक्त मी पहील्या शिबीरानंतर झालेले परीणाम सांगीतलेत ते आज साडेतीन वर्षांपर्यंत कायमच नाहीत तर त्यात वाढच झालीय.
म्हणुन मी म्हणतो की प्रत्यक्ष अनुभव घ्या. मुळात जे माझ्या अनुभवावर उतरले नाही त्यावर मी बोलुच नये.पण जसजशी साधना उन्नत होते तसतसे बरेचसे प्रश्न आपोआप विलीन होउन जातात. त्यातुनही काही राहिलेच तर गुरुजी त्यांचे निवारण (बुध्दांचे सुत्र स्पष्ट करुन) करतात या मोठ्या शिबीरामधे.
हे फक्त मी पहील्या शिबीरानंतर
वाचून खरच खूप आनंद झाला.
पण ....
एखादं बीज कितीही निरोगी असलं तरी ते सुपिक भूमीत रुजल्याशिवाय फळ मिळत नाही. तद्वत विपश्यना चांगला मार्ग असेलही पण माझी त्या मार्गाकरता तयारी आहे का - हे कसे कळणार?
वाचून खरच खूप आनंद
वाचून खरच खूप आनंद झाला.
मलाही.
पण ....
एखादं बीज कितीही निरोगी असलं तरी ते सुपिक भूमीत रुजल्याशिवाय फळ मिळत नाही.
तद्वत विपश्यना चांगला मार्ग असेलही पण माझी त्या मार्गाकरता तयारी आहे का - हे कसे कळणार?
स्वानुभव. दुसरा मार्ग मला तरी माहीत नाही.
स्वानुभव. दुसरा मार्ग मला तरी
याच उत्तराची अपेक्षा होती. आपले अनेक आभार.
...
हा फायदा??????
हा तुमच्याकरिता फायदा असू शकेलही कदाचित. किंवा नसेलही. मला कल्पना नाही.
पण...
कधी त्या लोकांच्या बुटांत क्षणभर उभे राहून विचार केला आहे?
...........................................
(अवांतर कुतूहल:) असा (दुसर्यांच्या बुटांत उभे राहून) विचार करायला शिकवते काय हो तुमची विपश्यना (की काय ती)?
(अवांतर कुतूहल:) असा
(अवांतर कुतूहल:) असा (दुसर्यांच्या बुटांत उभे राहून) विचार करायला शिकवते काय हो तुमची विपश्यना (की काय ती)?
होय.
विपश्यना
कृपया www.dhamma.org हे संस्थळ पहावे, असे सुचवतो.
- स्वधर्म
उपयुक्त दुवा. आमच्याजवळ
उपयुक्त दुवा. आमच्याजवळ विपश्यना केंद्र दिसतय. अनेक आभार!!!
________
प्रयत्न (पहील्यांदा घरच्यांचे मन वळविण्याचा अन मग खरच हे धाडस करण्याचा) १००% केला जाईल.
जेंव्हा चांगला/ वाईट अगदी
आनंद हा आपल्या आतच असतो असे मान्य करुनही दु:खमुक्तीसाठी संस्कार इरेज करणे आदि मार्गांचे प्रयत्न करणारा, शिकवणारा १०/२०/३०/६० दिवस वेगळा कोर्स अटेंड करणे किंवा इतर दीर्घकालीन प्रयत्न करणे आणि असे आयुष्यभर वर्षातून किमान एकदा (कोर्सरुपात) करणे म्हणजे मुक्ती मिळवण्याचा "आज रोख उद्या उधार" अशातला प्रकार वाटतो.
पण आपल्याला "काहीतरी" वेगळे केल्याचे समाधान हवे असते आणि ते देणारी कोणतीही साधना करुन आनंद मिळत असला म्हणजे झाले. त्या दृष्टीने एक आणखी कोर्स म्हणून विपश्यना उपयुक्त असावी.
दु:खमुक्तीसाठी संस्कार इरेज
दु:खमुक्तीसाठी संस्कार इरेज करणे आदि मार्गांचे प्रयत्न करणारा, शिकवणारा १०/२०/३०/६० दिवस वेगळा कोर्स अटेंड करणे किंवा इतर दीर्घकालीन प्रयत्न करणे आणि असे आयुष्यभर वर्षातून किमान एकदा (कोर्सरुपात) करणे म्हणजे मुक्ती मिळवण्याचा "आज रोख उद्या उधार" अशातला प्रकार वाटतो.
एका ओळीत सांगतो ध्यान म्हणजे स्वतःच्या मनाचे तटस्थपणे ( कुठलीही प्रतिक्रिया न देता केलेले) निरीक्षण.जेजे सुक्ष्म आहे तेते पहायला तुम्ही रोजच्या जीवनात सुद्धा ध्यानाचा उपयोग करता. अगदी सुईत धागा ओवताना. खुपच किमती वस्तु हाताळताना कीती सजग होतो आपण तेही ध्यानच. कुणाला काही समजाउन सांगताना तुझे लक्ष नाही इकडे, जरा ध्यान देतोस का? हेही ध्यानच.
पण मन ज्यावेगाने काम करते ते आपण सहजपणे पकडु शकत नाही. म्हनुन हे कोर्सेस. काय शिकवतात ते मी खाली मीच्या उत्तरात दिलेच आहे. ते वाचुनही जर फायदा होत नसेल तर स्वतः एक १० दिवसाचा कोर्स करुन अनुभवा. ते न करताच समजावयाचे असेल तर माझ्याकडे काहीही उपाय नाही त्याबद्दल मला माफ मरा,क्षमस्व. जे लिहीलय ती मी माझ्या अनुभवाची गोष्ट लिहीलीय.क्षमस्व.
...
................................................
हम्म्म्म्म्म्म्म्म्म्...
पोकळ आश्वासन! एव्हाना पुष्कळ ओळी झाल्या.
आणि जेव्हा कोणी 'आहाहा! काय ध्यान आहे!' म्हणते, तेव्हा तेही ध्यानच!
मरा??????
फ्रॉयडियन स्लिप, किंवा कसे?
लयच बोर होतंय बघा, जरा जास्त
लयच बोर होतंय बघा, जरा जास्त ट्रोलिंग झालंय तुमचं या धाग्यावर!
आम्ही तुमच्या तिरकस प्रतिसादांचे फॅन आहोत. न'वी बाजू कॉमेंटतात तर काहीतरी तिरकस पण तरी खुमासदार आणि मार्मिक प्रतिक्रिया असणार या गृहितकाला छेद देऊ नका!
बोले तो तुम्ही जे ग्राहकांचे समाधान हाच इ.इ. तुम्ही जे आधी म्हटलात त्याच चालीवर सांगतेय.
आता हा (कळवळीचा) सल्ला मनावर न घेता तुम्ही जर असेच करत राहणार असाल तर तुमची मर्जी म्हणा!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
लयच बोर होतंय बघा, जरा जास्त
लयच बोर होतंय बघा, जरा जास्त ट्रोलिंग झालंय तुमचं या धाग्यावर!
सहमत. पण आलेल्या रास्त शंकांना उत्तर देणे ही माझी जबाबदारी नाही काय? पण कूठे रिपीटेशन झाले असल्यास माफ करा. कुठल्याही टीआरपी साठी हा धागा काढलेला नाही.
इथे गवी, ईस्पीकचा एक्का, सोकाजीराव हे मला प्रत्यक्ष भेटलेले सभासद आहेत. काही शंका असल्यास खात्री करावी.
ईस्पीकचा एक्का, आदिती, राजेश घासाकडवी आनी अजुनही जे विज्ञान शाखेचे अधिकारी लोक मला माहीती आहेत आणी जे माहीत नाहीत अशीही जी मंडळी आहेत यांनी त्यांचा जो काही प्रतीसाद असेल तो लिहावा ही त्यांना विनंती. मला सर्वज्ञान झाले आहे असा काही सुर माझ्या लेखातुन ,प्रतिसादातुन येत असेल तर तो दोष माझा. पण प्रतीसाद द्या कारण तुमच्या प्रतिसादातुन मला एक वेगळी बाजु समजणार आहे. जो माझा लाभच असेल. मी काय पुन्हा-पुन्हा धागे काढून तुम्हाला त्रासही देणार नाहीय.
आम्ही तुमच्या तिरकस प्रतिसादांचे फॅन आहोत.
मीतरी कूठलाही प्रतिसाद तिरकसपणाने लिहिलेला नाही.
न'वी बाजू कॉमेंटतात तर काहीतरी तिरकस पण तरी खुमासदार आणि मार्मिक प्रतिक्रिया असणार या गृहितकाला छेद देऊ नका!
अर्थातच. तिरकस पण तरी खुमासदार आणि मार्मिक प्रतिक्रिया असणार आनी त्यांचं स्वागतच आहे.
बोले तो तुम्ही जे ग्राहकांचे समाधान हाच इ.इ. तुम्ही जे आधी म्हटलात त्याच चालीवर सांगतेय.
खास करुन ग्राहकाचे समाधान हा माझा न उद्देश न प्रांत. म्हणुनच मी मला प्रत्यक्ष ओळखणार्या सभासदांची नावे दिलीत.
आता हा (कळवळीचा) सल्ला मनावर न घेता तुम्ही जर असेच करत राहणार असाल तर तुमची मर्जी म्हणा!
काय बोलु ते आत्ता सुचत नाही. पण मी वाचलय का नाही ही शंका राहु नये म्हणुन ही पोहोच.
आत्ता जो गोंधळ चालला आहे तो
आत्ता जो गोंधळ चालला आहे तो पहाता एवढेच म्हणेन - जय हो
Law of unintended consequences
जय हो!
त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे, त्यांचा मूळ प्रतिसाद आणि सवितातैंचा (माझी कानउघाडणी करणारा) प्रतिसाद यांना जोडणारा मधला माझा 'निरर्थक' (बोले तो, 'निरर्थक' श्रेणी मिळालेला) प्रतिसाद मिटल्यामुळे, सवितातैंचा प्रतिसाद हा त्यांच्या प्रतिसादाला आहे, असा त्यांचा गैरसमज होऊन त्यांचा गोंधळ झाला. बोले तो, ते Law of unintended consequencesचे बळी आहेत.
म्हणजे पाहा ना, मुळात ऋण श्रेणीवाले प्रतिसाद मिटण्याची "सोय" कशासाठी? तर लोकांना ते वाचावे लागू नयेत म्हणून. पण असे प्रतिसाद मिटल्यामुळे त्यांच्या पुढच्या प्रतिसादात होणारी त्यांच्यावरील टीका जर डकब्याकच्या रेनकोटावरील पावसाच्या पाण्यासारखी१ घरंगळत जर अगोदरच्या दुसर्याच कोणाच्या प्रतिसादाकडे (सर्वदेवनमस्कारांसारखी) जाणार असेल, आणि मधल्यामधे मी जर नामानिराळा राहणार असेन, तर मग मी तर म्हणतो की येऊ द्यात यापुढे माझ्या प्रत्येक प्रतिसादाला पाचपाच ऋण श्रेण्या!
यात माझे फायदातोट्याचे गणित कसे राहते?
संभाव्य फायदा:
- माझ्या प्रतिसादावर होणारी टीका ही परस्पर दुसर्याच कोणाच्यातरी प्रतिसादाकडे फॉर्वर्ड होते.
संभाव्य तोटे:
- माझा प्रतिसाद मिटला गेल्यामुळे तो वाचला जाणार नाही कदाचित. पण पाचपाच ऋण श्रेण्या जर यायच्या असतील, तर त्या काय श्रेणीदात्यांनी अगोदर प्रतिसाद वाचल्याखेरीज येतील? बोले तो, पाच ऋण श्रेण्या देण्याकरिता किमान पाच जण तरी माझा प्रतिसाद वाचतील, याची ग्यारण्टी तर झालीच ना? So, what exactly do I have to lose again?
- बरे, समजा, माझा प्रतिसाद न वाचताच कोणी जर मला ऋण श्रेण्या देणार असतील, तर अशा ऋण श्रेण्यांची पर्वा करण्याचे मला काहीच कारण राहात नाही. Again, I have nothing to lose.
- यात तिसरी एक शक्यता मी तूर्तास डिस्काउंट केलेली आहे, ती म्हणजे, 'इतक्या ऋण श्रेण्या मिळण्यासारखे या प्रतिसादात शिंचे आहे तरी काय?' म्हणून कुतूहलापोटी तरी काही जण माझा प्रतिसाद उघडून वाचतील. हे होईल का किंवा कितीसे होईल, मला कल्पना नाही, परंतु याही शक्यतेत माझा किमानपक्षी तोटा तरी काहीच नाही, झाला तर फायदाच आहे.
थोडक्यात, यात माझे नुकसान तर काहीच होत नाही. उलट, कदाचित माझा प्रतिसाद लोकांच्या नजरेआड राहायचा सोडून उलट मला काही ग्यारण्टीड हिट्स मिळण्याची शक्यता वाढते, आणि त्याकरिता मला काहीच करावे लागत नाही. Not that I care about hits, but, does that not kind of turn the purpose of negative श्रेणीs upside down altogether?
आणि... आणि... आणि मग या सगळ्या श्रेणीव्यवस्थेला अर्थ काय राहातो?
----------------------------------------------------------------------------------------------------------
१ ही प्रतिमा ठीक आहे. "बदकाच्या पाठीवरील पावसाच्या पाण्यासारखी" म्हटले असते, तर फारच कॉमनप्लेस, क्लीशेवजा (आणि म्हणूनच प्रेडिक्टेबल अत एव लय(च) बोर इ.इ.) झाले असते. म्हणून ही त्यातल्या त्यात थोडी व्हरायटी!
अहो विलासराव.. सविताताईंनी ते
अहो विलासराव.. सविताताईंनी ते नवी बाजूरावांना उद्देशून लिहिलंय हो. तुम्हाला नव्हे..
तुम्ही नर्व्हस होऊ नका. हे नवी बाजू सर्वांनाच पिडतात. तुम्ही एकटे नाहीत. हम तुम्हारे साथ है.. थांबा नवी बाजूंना एक खोडसाळ आणि एक निरर्थक श्रेणी देऊन येतो.
किंवा...
...कदाचित विपश्यना केल्याने ते माझ्याशी एकरूप अथवा तादात्म्य किंवा तुम्ही जे काही म्हणत असाल ते पावले असल्यास कल्पना नाही.
त्यांच्या विपश्यनेचा तेवढाच आम्हाला एक फायदा!
चुक झाली माझी. तो निरर्थक
चुक झाली माझी. तो निरर्थक प्रतिसाद मधे बंद अवस्थेत दिसल्याने तसे झाले.
सविताताईंनी वाईट वाटुन घेउ नये. सविताताई तुम्ही वरती गवींना अगदी रास्त प्रश्न विचारलात त्याबद्दल धन्यवाद. मला सुचलेच नसते असे. धागा भरकटु नये म्हणुन मी प्रयत्न करतोय.
तुम्ही नर्व्हस होऊ नका. हे नवी बाजू सर्वांनाच पिडतात. तुम्ही एकटे नाहीत. हम तुम्हारे साथ है.. थांबा नवी बाजूंना एक खोडसाळ आणि एक निरर्थक श्रेणी देऊन येतो
हा हा हा. जरुर.
?
सवितातैंचा प्रतिसाद हा अन्योक्तिस्वरूपाचा असावा, अशी पुसटशी शंकासुद्धा मला आली नव्हती. ती अन्योक्ती आपल्या नजरेने टिपली, हा (१) आपला चाणाक्षपणा, की ती मला दिसली नाही (किंबहुना, अजूनही दिसत नाही), ही (२) सवितातैंच्या अभिव्यक्तीतील कमतरता की (३) माझ्या आकलनातील दोष, हे कळत नाही.
इन एनी केस, ती अन्योक्ती आपल्याला जाणवली, म्हणजे योग्य ठिकाणी पोहोचली असावी, अत एव सार्थकी लागली असावी, असे समजतो. (चूभूद्याघ्या.)
(स्वगत: श्या:! उगाच मनाला लावून घेतले!)
- (करूनसवरून नामानिराळा सदासुखी निर्लज्ज) 'न'वी बाजू.
विषयावरील काही चर्चा
पॅकेज डील ऑफ विपश्यना! (भाग - १)
पॅकेज डील ऑफ विपश्यना (भाग - ३)
विपश्यना- समज आणि गैरसमज.
डॉ राजेंद्र बर्वे यांनी विपश्यनेचा अनुभव घेतल्याचा वृत्तांत कुठेतरी वाचला होता. त्यांच्यासाठी तो एक वेगळाच अनुभव होता असे वाचल्याचे स्मरते.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
ह्म्म! वाचतेय. मुळे या दहा
ह्म्म! वाचतेय.
डॉ राजेंद्र बर्वे यांचा एक जड
डॉ राजेंद्र बर्वे यांचा एक जड लेख
विपश्यना एक आर्त अनुभूती
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
एका हुषार मानसोपचारतज्ञाने
एका हुषार मानसोपचारतज्ञाने अप्रतिम लेख आहे. धन्यवाद प्रघा!!!
माय टेक -
व्यावसायिक पातळीवरून विचार केला तर धम्मगिरीवरील मौनव्रत, बाह्यजगताशी तुटणारा संपर्क आणि केवळ ध्यानधारणा यांचा विपरित परिणाम झालेले रुग्ण मी पाहिले होते. स्वत:च्या विकाराविषयी सातत्याने बोलत राहाणारे न्युरॉटिक्स, ‘चिंतातुरतेमुळे’ विविध मानसिक व शारीरिक लक्षणांनी व्याकुळ होणारे रुग्ण धम्मगिरीवरील विपश्यना सेंटरवर स्थिरावू शकत नाहीत. आपल्याला कसा, कुठे आणि किती तीव्र त्रास होतो आहे, याविषयी वाच्यता केली नाही तर त्यांचा विलक्षण कोंडमारा होतो आणि उदासीनतेच्या कृष्णमेघांनी त्यांचं मन काळवंडून जातं. त्याचप्रमाणे, स्कि‘झोफ्रेनियासारख्या विकारानं मनाचा दुभंग झालेली माणसं मौनव्रत आणि विनासंपर्क वातावरणात अधिक अस्थिर होतात. असा अनुभव मी घेतला होता; एकप्रकारे विपश्यनेच्या मर्यादा लक्षात आल्या होत्या.
डॉ राजेंद्र बर्वे यांचा लेख
डॉ राजेंद्र बर्वे यांचा लेख आवडला.
खुपच सवीस्तर लिहीला आहे. मी तर अनुभवतोच आहे हे सगळे पण माझे उत्तर टंकण्याचे कष्ट वाचतील.
-
सगळी चर्चा वाचली. बर्याच शंका रास्तच आहेत. पण एक नक्की सांगता येइल, की एक्दा का गुरुंजीचे बोलणं मनापासून ऐकायला आणि आचरायला सुरुवात केली की या मौनाचा आणि 'एकटेपणाचा' त्रास होत नाही.
रडू आलं तरी ते सहज स्विकारता येतं. मी स्वतः अनेक वर्षे रडायचेच नाही. निदान कधीही दुसर्या कुणासमोर डोळ्यातून पाणी येउ द्यायचे नाही. पण मी दुसर्या वेळेस विपश्यनेला गेले होते तेंव्हा तिसर्याच दिवशी जे काही रडायला लागले ते ९व्या दिवशी थांबले. १०व्या दिवशी आता इथून परत जायचे, या विचारानी पुन्हा रडले!
पण हसणं जितकं नैसर्गिक आहे, तितकंच रडणंही नैसर्गिक आहे, हे अचानक लक्षात आल्यानी खूपसा ताण निवळला. अर्थात हे मी सांगणं म्हणजे नुसती थिअरी झाली. ते प्रत्येकाच्या स्वतःच्या अनुभवात उतरेल, तेंव्हाचा त्याला अर्थ आहे.
विपश्यनेची पूर्वतयारी म्हणून आपली आपण 'आनापानसती' (केवळ श्वासोच्छ्वासाकडे लक्ष देणं) घरी करता येइलच. अतिशय सोपी पद्धत आहे. शिवाय त्याचे फायदेही आहेतच. एकाग्रता वाढेल, विचारांची गर्दी कमी होइल. आपोआपच स्वतःच्या श्वासाबरोबर, त्यायोगे फक्त स्वतःबरोबर रहाण्याची थोडी तरी सवय होईल. पुढे विपश्यना करा, न करा. थोडी तरी अंतर्मुखता निर्माण करण्याचे फायदेही आहेतच.
एक अॅम्बीशियसली एक्सेसिवली बेसिक प्रश्न
का गेलात?
.................................................................................................
(बाकी - दिवस तीन ते दिवस नऊ - अरे बापरे! सात दिवस सतत विनाकारण रडणे म्हणजे... कठीण आहे!)
डिटॉक्स
बाकी - दिवस तीन ते दिवस नऊ - अरे बापरे! सात दिवस सतत विनाकारण रडणे म्हणजे... कठीण आहे!
डिटॉक्स, बस्ती, विरेचन अशा उपचारांदरम्यान शरिराला त्रास झाला तरी अंतिमत: ते दूरगामी हिताचे असते;
असे म्हणता यावे का ?
बाकी, मी काही गेलेलो नाही; त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव नाही; पण उगी आपला एक तर्क.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मनशेठ..उगाच डिटॉक्स, बस्ती,
मनशेठ..
उगाच डिटॉक्स, बस्ती, विरेचन हे सुद्धा कधीही करायला जाऊ नका अशी सदिच्छा व्यक्त करतो.
एकाजागी बसून ध्यान किंवा मनाच्या लेव्हलचं तत्सम काहीतरी केलेत तर एकवेळ निरुपद्रवी आणि ठीक पण असले विरेचक अत्याचार देहावर करु नका.
देह स्वतःचे विरेचन, डीटॉक्स इ इ काही असेलच तर ते करण्यास खुद्द समर्थ आहे. त्याला हलते चालते ठेवले म्हणजे झाले. प्लीज स्पेअर इट.
अर्थात आखिर फैसला आपका क्योंकी आखिर आतडी आपकी..!!
=))
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
एकाजागी बसून ध्यान किंवा
एकाजागी बसून ध्यान किंवा मनाच्या लेव्हलचं तत्सम काहीतरी केलेत तर एकवेळ निरुपद्रवी आणि ठीक पण असले विरेचक अत्याचार देहावर करु नका.
गवींशी सहमत.
बाकीच्या विरेचन, डीटॉक्स या पद्धती मला माहीत नाहीत.
बरेचसे लोक शारिरीक आजार बरे होतील या आशेने चुकीच्या माहीतीने येतात. आनी मग त्यांना काहीच लाभ होत नाही. जरी विपश्यना मन निर्मळ करण्याचे तंत्र असले तरी गंभीर मनाचे आजार असलेल्या लोकांनी केंद्राशी बोलुनच प्रवेश घ्यावा.
देह स्वतःचे विरेचन, डीटॉक्स इ
हे ओव्हर सिम्प्लिफिकेशन आहे असे जाता जाता नमूद करते.
शरीर असे आत तयार झालेला प्रत्येक दोष दूर करण्यास समर्थ असते तर केमोथेरपी करावी लागली नसती कॅन्सरला!
अगदी त्या टोकाला जरी नाही गेले तरी गेला बाजार अॅसिडिटी दूर करायला अॅन्टासिड घेतले नाही काय तुम्ही कधी? शरिराला का बरे ते एक्स्ट्रा अॅसिड बाहेर टाकता नाही येत दर वेळी?
बाकी - दोष आहे हे कन्फर्म झाल्यावरच त्यावर उपचार (योग्य तज्ञांच्या सल्ल्याने) करावा आणि उगाच श्री.श्री. तांबे व तत्सम इत्यादींच्या नादाला लागून सो कॉल्ड आयुर्वेदिय करू नयेत याच्याशी सहमत!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
तुमचा शब्द न शब्द एकदम योग्य
तुमचा शब्द न शब्द एकदम योग्य आहे.
समस्येचे आकलन झाल्यावर अगदी बोन मॅरो खरडून नवी भरायलाही हरकत नाही. पण एकूण आयुष्यात आणि देहात काहीतरी कमी आहे, पीडा आहे, विष साठत आहे, विकार बळावत आहे, अशुद्धता येत आहे आणि त्याचे विरेचन वमन, बस्ती, कसल्याशा यंत्रात पावले बुडवून बसणे, जळवांनी दूषित रक्ताचा "निचरा", अॅक्युपंक्चरने बिघडलेली सर्किट पूर्ण करणे इत्यादि हजारो मार्गांनी करत जाणे हे भ्रामक समजुतीवर आधारलेलं आहे.
माझं काहीतरी इचकलंय म्हणून मी विपश्यना, पंचकर्म, अॅक्युपंक्चर किंवा काहीतरी करायला जाणे हे अत्यंत निरर्थक आणि पोटेन्शियली घातक आहे. काही मनोविकारांमधे असे गप्प बसून राहिल्याने मनुष्य आणखी गर्तेत जाईल. काही आजारांमधे वात पित्त कफ करत राहून मागे कर्करोग शरीरा॑त पसरुन खलास करेल.
आधी रोगाची लक्षणं वाढतील, आधी त्रास वाढेल आणि मग कमी होईल.. तरच रोगावर समूळ इलाज होत आहे असे समजावे अशी एक समजूत मॉडर्न मेडिसिनखेरीज अन्य बर्याश थिअरीजमधे पसरवली गेली आहे.
त्रास , दुष्परिणाम हे मूळ उपायाचे साईड इफेक्ट असणं हा मॉडर्न मेडिसिनचा भाग.. आणि मुळात शरीराला त्रास देणे हाच मूळ उपाय करुन त्या त्रासाचा इफेक्ट म्हणून रोग बाहेर जाईल अशी श्रद्धा हा इतर अनेक मेडिसिन्सचा भाग.
तस्मात्..तुमच्या शेवटच्या ओळीत तुम्ही जे म्हटले आहे ते त्रिकालाबाधित सत्य की काय म्हणतात ते आहे.
...
काय योग्य आहे?
अॅसिडिटी वाढल्यावर अॅण्टासिड घेतले नाही, तर शरीराला ते अॅसिड बाहेर फेकता येत नाही???
अॅण्टासिड घ्यावे लागण्याइतकी जर पाळी आली असेल, तर अॅण्टासिड (किंवा सोडा, किंवा तत्सम काहीतरी, गेला बाजार दूध किंवा तत्सम बफर पदार्थ) घेतले नाही, तर शरीर बर्याच वेळाने का होईना, पण ते अॅसिड आपोआप बाहेर फेकेल. (एके काळचा नित्याचा स्वानुभव!) फक्त, ते ज्या पद्धतीने बाहेर फेकेल, ते आपल्याला सुखकर नसेल, इतकेच.
म्हणून अॅण्टासिड घ्यायचे. शरीराला अॅसिड बाहेर फेकता येत नाही, म्हणून नव्हे.
आधी रोगाची लक्षणं वाढतील, आधी
आधी रोगाची लक्षणं वाढतील, आधी त्रास वाढेल आणि मग कमी होईल.. तरच रोगावर समूळ इलाज होत आहे असे समजावे अशी एक समजूत मॉडर्न मेडिसिनखेरीज अन्य बर्याश थिअरीजमधे पसरवली गेली आहे.
त्रास , दुष्परिणाम हे मूळ उपायाचे साईड इफेक्ट असणं हा मॉडर्न मेडिसिनचा भाग.. आणि मुळात शरीराला त्रास देणे हाच मूळ उपाय करुन त्या त्रासाचा इफेक्ट म्हणून रोग बाहेर जाईल अशी श्रद्धा हा इतर अनेक मेडिसिन्सचा भाग.
सहज लक्षात आले म्हणुन. विपश्यनेशी याचा काहीही संबंध नाही. नवींच्या प्रतीसादातील हे वाक्य अॅण्टासिड घ्यावे लागण्याइतकी जर पाळी आली असेल, तर अॅण्टासिड (किंवा सोडा, किंवा तत्सम काहीतरी, गेला बाजार दूध किंवा तत्सम बफर पदार्थ) घेतले नाही, तर शरीर बर्याच वेळाने का होईना, पण ते अॅसिड आपोआप बाहेर फेकेल. (एके काळचा नित्याचा स्वानुभव!) फक्त, ते ज्या पद्धतीने बाहेर फेकेल, ते आपल्याला सुखकर नसेल, इतकेच.
देह स्वतःचे विरेचन, डीटॉक्स इ
पण राजीव साने तर म्हणतात निसर्ग सम्यक नाही म्हणून.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
=))
अजोंचा आय डी थत्तेंनी ढापला काय ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
साशंक आहे
शरीरावर (मांत्रिकाकडून वगैरे) चाबकाचे फटके सतत मारवून घेतले, तर पिशाच्चबाधा (झाली असल्यास) दूर पळते (म्हणे).
फार कशाला, मृत्यूने तर आयुष्यातील सर्व त्रास (कायमचे) दूर होतात (पुन्हा, म्हणे).
अशा उपचारांदरम्यान शरीराला त्रास जरी झाला, तरी अंतिमतः ते दूरगामी हिताचे असते, असे म्हणता यावे का?
बाकी, हे (बोले तो, मी वर मांडलेले) उपचार मी स्वतः करून पाहिलेले नाहीत. कोणी करून पाहायला सांगितले, तरी करून घेणार नाही. (करून पाहायला सांगणारा कोणी अनुभवी महाभाग - खास करून दुसर्या उपचाराच्या बाबतीत - आजतागायत भेटायला आलेला नाहीये म्हणा, पण तो भाग वेगळा.) त्यामुळे, प्रत्यक्ष अनुभव नाही. पण उगी आपला (माझाही) एक तर्क.
...............................................................
(कोणीतरी चालू फ्याशनप्रमाणे 'निरर्थक' श्रेणी द्या रे या प्रतिसादाला! तेवढीच तबियत खूष होईल, नि मूठभर मांस (अश्लील!!!) चढेल!)
सतत विनाकारण
सतत विनाकारण रडणे>
विनाकारण??.... असं मी कुठेच म्हणाले नाही.
कारणे खूप होती, वेगवेगळी होती. सगळी रडकथा इथे कुठे सांगत बसू? पण निदान मी स्वतःसमोर त्या सगळ्या रडकथा स्पष्टपणे आणू शकले हे मात्र खूप मोठं काम झालं. त्यातलं खुपसे रडणं स्वतःच्याच कृतघ्नपणाबद्दलचं होतं.
विलासराव विपश्यना हा
विलासराव विपश्यना हा अनुभूतीचा प्रांत असल्याने त्याची प्रचीती देता येत नाही हे खरेच आहे.आपला प्रामाणिक प्रयत्न आवडला.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
विलासराव, चेन्नैतली आपली भेट
विलासराव,
चेन्नैतली आपली भेट आणि झालेल्या चर्चेला ह्या लेखामुळे उजाळा मिळाला!
मन१ करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण! ह्यासाठीचा एक उपाय म्हणून विपश्यनेकडे बघता येऊ शकेल ते माझे वैयक्तिक मत.
- (मन१ ताळ्यावर ठेवण्याचे वेगवेगळे उद्योग करून पाहणारा) सोकाजी
-------------------------------------------------------------
१ इथे मन ह्या आयडीचा काहीही संबंध नाही.
ब्लॉग हा माझा...
मन१ करा रे प्रसन्न सर्व
मन१ करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण! ह्यासाठीचा एक उपाय म्हणून विपश्यनेकडे बघता येऊ शकेल ते माझे वैयक्तिक मत.
सहमत. हे तुमचं मत आहे विपश्यना न करताही. माझा करुनही हाच अनुभव आहे हेच होतं विपश्यनेच्या अभ्यासाने.
विपश्यना
श्री. विलासराव,
मनापासून धन्यवाद. लेख खूप संयतपणे विपश्यनेविषयी माहिती देऊन जातो. आपण बराच काळ साधना करत आहात असे वाटते, माझ्या दृष्टीने ही फार मोठी गोष्ट आहे. बुध्द कुणालाच 'मी' तुझे कल्याण करतो, असे म्हणाला नाही - अत्त दीप भवः म्हणजे तूच तुझा उध्दारकर्ता. हा मला अत्यंत भावलेला भाग.
मी चार वर्षांपूर्वी विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स केला. विपश्यनेच्या कोर्सबाबत आपण लिहीलेच आहे. मला असं वाटलं, की जे मला व्यवहारीक दृष्टीने दिसलं (आणि मला ते महत्त्वाचं आणि दुर्लभ वाटलं) ते मांडावं, म्हणून हा प्रतिसाद!
- ते दहा आणि शेवटचा अकरावा दिवसही, तुमचा 'पैसा' या गोष्टीशी कसलाच संबंध येत नाही. संपूर्ण कोर्समध्ये कधीच ही संस्था पैशाचे डायमेंन्शन मधे आणत नाही. शेवटी जाताना देखील दान स्विकारण्यासाठीचे जे टेबल होते, ते एका बाजूला होते. म्हणजे तुंम्ही तुमच्या वस्तू घेता, खोलीच्या किल्ल्या परत करता इ. असे सर्व रांगेने करता. पण दानाचे काऊंटर मात्र बाजूला! मी होतो त्या शिबिरात अनेक आर्थिक स्तरातले लोक होते. एखाद्याला कदाचित दान देणं जमलंही नसेल, पण कुणालाच अवघड्ल्यासारखं वाटलं नसावं. अध्यात्माचं व्यवस्थित (प्रोफेशनल) मार्केटींग करण्याचा आजच्या काळात हे दुर्मिळ वाटलं.
- संस्था ज्यांनी विपश्यनेचा कोर्स केलेला नाही, त्यांच्याकडून दानही घेत नाही.
- सर्व धम्मसेवक अत्यंत निष्ठेने आणि नम्रपणे आपल्याला दिलेले काम अखंड दहा दिवस करत होते. शब्दांचा क्वचितच वापर करत १००-१५० लोकांच्या समूहाचं नियंत्रण, तेही दहा दिवस, ही अद्भुत गोष्ट वाटली.
- शिबिरात कुठेही गुरूजींचे फोटो, बुध्दाचा पुतळा, हार, उदबत्त्या, कसली प्रतिके... अगदी काहीही नाही. ना कसले कर्मकांड. कुठेही बौध्द धर्माचेही काही चिन्ह नाही. कसला प्र्चार नाही. केवळ साधनेचे काम. शेवटी साधनेत मुरलेले लोक कसे वागतात हीच साधनेच्या सामर्थ्याची मोजपट्टी.
- मनात बुध्दीजन्य प्रश्न अनेक येतात, त्यांची उत्तरे संध्याकाळच्या प्रवचनात बव्हंशी मिळतात. पण यात बुध्दीविलासाला (गोयंका गुरूजींचा शब्द) स्थान नाही. करणं, करत राहणंच महत्त्वाचं. इतका रोकडा मार्ग विरळा.
माझ्या सांगलीत राहणार्या एका मित्राने माझ्या बरीच वर्षे आधी विपश्यना केली होती. आणि हा माझा मित्र म्हणजे जबरदस्त आचरणवीर! त्याचा प्रवास मी अगदी जवळून पाहिला. शेवटी सगळं महत्व जे शिकलो ते निष्ठेने करत राहण्याला. तो ते अजूनही करतो. जेव्हा भेटतो, तेव्हा प्रेरणा मिळते. या मित्रामुळे मी विपश्यनेकडे वळलो. माझी साधना म्हणाल, तर अजून खूप काम केलं पाहिजे. त्या बाबतीत मी (स्वत:बद्दल) असमाधानी आहे, मात्र आत्तापर्यंत वाचलेल्या, चाललेल्या मार्गात हाच माझ्या जीवनात काही परिवर्तन करू शकेल अशी भावना आहे.
विपश्यनेचा सुंदर परिचय करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
- स्वधर्म
क्रॅश कोर्स?
या विपश्यनेचा ३-४ दिवसांचा क्रॅश कोर्स असतो का हो? एक गंमत म्हणून अनुभव घेण्यायोग्य आहे काय? मला वाटत नाही की मी असे काही दिवस मौनात राहिलो तर फार काही फरक पडेल. पण तरी गंमत करून बघायला काय हर्कते.
सलग १० दिवस सुट्टी मिळणं कठीण नसलं तरी या कारणासाठी ती काढायची मला गरज वाटत नाहिये. कारण काल तुम्ही म्हणता तो श्वासावर लक्ष केंद्रीत करायचा प्रयोग करायला बसलो. मनातून सारे विचार काढून टाकले (बहुदा), एक मिनिट झाल्याचे डोळे मिटून समजेना, डोळे उघडले तेव्हा चांगला अर्धा तास झाला होता नी दरम्यान झोप लागली होती बसल्या बसल्या! हा मात्र मनात कोणतेही विचार आले नाहीत. (आता बसल्या बसल्याच काय आम्ही आकंठ गर्दीने लडबडलेल्या लोकल ट्रेनमध्ये उभ्या उभ्या झोपु शकतो. इतकेच काय एकदा तर स्विमिंग टँकमध्ये हातपाय न हलवता आकाशाकडे बघत आडवा फ्लोट करत असताना डुलकी येत होती उत्तम, गाढ आणि कधीही घेता येणारी किंवा भरपूर टाळता येणारी हुकमी झोप हा आमचा युएसपी)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
...
हम्म्म्म्म्... मौन बोले तो, लेखनमौन इन्क्लूडेड, किंवा कसे?
मलाही नाही वाटत त्याने फार काही फरक पडेल असे. पण सातसात दिवस लेखां-प्रतिसादांतून हुंदके देऊ लागलात, तर मात्र कदाचित... नाही, त्यानेही फरक नाही पडणार. लोक थोडे चमत्कारिक नजरेने बघतील तुमच्या प्रतिसादांकडे, नि चारदोन उलट्यासुलट्या श्रेणी येतील, बास इतकेच. त्याने काय फरक पडतो?
हम्म्म्म्म्... मौन बोले तो,
हम्म्म्म्म्... मौन बोले तो, लेखनमौन इन्क्लूडेड, किंवा कसे?
मौन बोले तो आर्यमौन. बोलना नही, लिखना नही, पढणा नही, किसीकी तरफ जानबुझके देखना नहि, यहातक की इशारोंसे भी बात नही करनी है. सिर्फ साधनासंबंधी कुछ शंका है तो टीचरसे जो उनको मिलने का समय है तब कमसे कम शब्दोमे सवाल करके अपनी समस्या का समाधान करकर फिर काम मे लग जाना है.
मौन बोले तो आर्यमौन. बोलना
मजसारख्या अनेक व्यक्तींना तिथून दोनतीन दिवसांत थेट मनोरुग्णालयात नेण्याची वेळ येईल असं वाटतं. अर्थात हा विपश्यनेचा दोष नव्हे.. दोष आमचाच.
एक गोष्ट मात्र मान्य केलीच पाहिजे की सात किंवा दहा दिवस फार दूरची गोष्ट, केवळ एक सलग दिवससुद्धा कोणाशीही कोणत्याही मार्गाने अजिबात न बोलणे हा प्रकार जन्मल्यास आजतागायत घडल्याचे आठवत नाही.. आणि मुद्दाम आवर्जून ठरवून केल्याखेरीज उर्वरित आयुष्यातही होईलसे वाटत नाही. ही एक दुर्मिळ घटना आहे आणि ती अशी विपश्यना आदि निमित्तानेच जमून येऊ शकते. पण त्याची आवश्यकता वाटली पाहिजे इतकंच.
मुळात प्रॉब्लेम स्टेटमेंट नीटसे तयार होईपर्यंत रँडम उपाय करण्याविषयी माझे मत प्रतिकूल आहे. ज्यांना गरज वाटते त्यांना हे खूप उपयोगी असू शकेल.
विपश्यनेला जाण्यामागे सर्वसाधारणपणे "आयुष्यातल्या दु:खापासून मुक्ती" हाच उद्देश असतो का शिबिरार्थींचा ?
मजसारख्या अनेक व्यक्तींना
मजसारख्या अनेक व्यक्तींना तिथून दोनतीन दिवसांत थेट मनोरुग्णालयात नेण्याची वेळ येईल असं वाटतं. अर्थात हा विपश्यनेचा दोष नव्हे.. दोष आमचाच.
असं वाटणं अगदी स्वाभावीक आहे. जास्तीत जास्त लोक तर केवळ याच भीतीने विपश्यनेला येत नाहीत.
एक गोष्ट मात्र मान्य केलीच पाहिजे की सात किंवा दहा दिवस फार दूरची गोष्ट, केवळ एक सलग दिवससुद्धा कोणाशीही कोणत्याही मार्गाने अजिबात न बोलणे हा प्रकार जन्मल्यास आजतागायत घडल्याचे आठवत नाही.. आणि मुद्दाम आवर्जून ठरवून केल्याखेरीज उर्वरित आयुष्यातही होईलसे वाटत नाही. ही एक दुर्मिळ घटना आहे आणि ती अशी विपश्यना आदि निमित्तानेच जमून येऊ शकते. पण त्याची आवश्यकता वाटली पाहिजे इतकंच.
विपश्यनेला अनेक साधु/संन्यासी, फादर्/नन्स, मौलाना,मंक येउन गेलेत, आजही येताहेत. त्यातल्या काहींचा कदाचीत मौनाचा अभ्यास असु शकेल कदाचीत. आनी त्यांची संख्या माझ्यामते १% च्या आतच आहे. बाकीचे ९९ % लोक हे पहिल्यांदाच मौन अनुभवतात. मी जेवढी शिबीर केलीत त्यातील एकही व्यक्ती तिथुन दवाखान्यात गेलेली नाही. पण काही लोक शारीरीक/मानसीक गंभीर आजार असताना चुकीच्या माहीतीने किंवा माहीती असुनही बघु काही फायदा झालाच तर असा विचार करुन येतात, त्याकेसमधे असे होउ शकते. विपश्यनेच्या वेबसाईटवरही याचा स्पष्ट उल्लेख आहे. जो फॉर्म भरता त्यातही या गोष्टींची माहिती भरावी लागते. पण तिथे भरती होताना केंद्र काही संपुर्ण मेडीकल चेकींग करु शकत नाही. तुम्ही फॉर्म भरताना खरी माहिती भरणे अपेक्षीत असते तरच अपेक्षीत परिणाम येतील. पण अश्या गंभीर समस्या बर्याचदा टीचरच्या १-२ दिवसात लक्षात येतात. आनी त्यांना घरी पाठवण्यात येते. अशा समस्या नसतानाही कोणी आजारी पडले तर मात्र ते डॉक्टरांना पाचारण करतात, गंभीर समस्या असेल तर आपल्या घरच्यांना बोलावुन घरीही पाठवतात.
मुळात प्रॉब्लेम स्टेटमेंट नीटसे तयार होईपर्यंत रँडम उपाय करण्याविषयी माझे मत प्रतिकूल आहे.ज्यांना गरज वाटते त्यांना हे खूप उपयोगी असू शकेल.विपश्यनेला जाण्यामागे सर्वसाधारणपणे "आयुष्यातल्या दु:खापासून मुक्ती" हाच उद्देश असतो का शिबिरार्थींचा ?
अर्थातच मनाची तयारी होत नाही तोवर जाउही नका . त्यामुळे लाभ न होण्याचीच शक्यता आहे.कारण विपश्यना साधना मनाच्या आरोग्यासाठीच आहे. सिद्धार्थ गौतम जे पुढे बुद्ध झाले ती व्यक्ती राजा होती. तरीही मीही दु:खी आनी जगातही सर्वत्र दु:क्ख का आहे याचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळेस अनेक आचार्य विविध ध्यानपद्धती शिकवत. जे त्यावेळेस सर्वोच्च स्थानी होते ते सात ध्यानावस्था अनुभवावर उतरवलेले होते. बुद्धांनी त्या आत्मसात केल्या. तरीही मुक्त नव्हते झाले. ते म्हणाले पुढे काय? मग त्या आचार्यांनी त्यांना जी आठव्या ध्यानाची थिअरी त्यांच्या गुरुकडुन ऐकलेली होती ती सांगीतली. पन त्याच बरोबर मला त्याचा अनुभव नाही हेही सांगीतले. बुद्धांनी आठवे ध्यान आत्मसात केले आनी तरीही मुक्ती अनुभवावर नाही उतरली. पुढे काय?
मग त्यांनी दुसरी जी महत्वपुर्ण मान्यता होती की या शरिराचे लाड करु नका. त्याला अनुसरायला सुरवात केली ६ वर्षे अतिशय कष्ट्प्रद साधना केल्या तरीही मुक्त नाही झाले. मग त्यांनी परत शरीराला कष्ट द्यायचे सोडुन दिले. आनी मध्यम मार्ग शोधुन काढला, अन मुक्त झाले.
आतमध्ये सत्यशोधनासाठी डोकावल्यावर सुक्ष्म तटस्थ निरीक्षनाने ते अशा अनुभुतीवर पोहोचले की या शरिरात ठोस असे काहीच नाही. फक्त कलाप(परमाणु) उत्पन्न होतात आनी नष्ट होतात. आनी हे सतत चाल्लय. ते या शब्दात त्यांनी सांगीतलय. सब्बो पज्जलीतो लोको सब्बो लोको पकंपितो पकंपितो.
हा अनुभव मी स्वतः घेतलाय. प्रत्येक साधक घेउ शकतो. हे मुक्तीच्या मार्गावरील पहीले स्टेशन आहे.हा अनुभव आला नाही तर लगेच साधनेतील चुक सुधारावी. असं नाही की १२ वर्षे तप केल्या वर कळते की कुठेच नाही पोहोचलो. असा संपुर्ण मार्ग त्यातील स्टेशनांसहीत बुद्धांनी आखुन दिलाय. कारण ते स्वतः तो मार्ग चालले म्हणुनच त्यांना तथागत म्हणतात .
अध्यात्माचं इतकं पीक आलय की मनुश्य भांबावुन जातो की नेमका मार्ग कोणता. प्रत्येक धर्मग्रंथात मार्ग सांगीतलेला आहे. मनावर ताबा मीळवा, स्थितप्रज्ञ बना , अमुक करा नी तमुक करा पण कसं करा? मग जप तप अनेक साधना करा. लोक करतातही पण लाभ होत नाही किंवा थोडासा लाभ होतो. पहिली गोष्ट ते म्हणतात तुम्ही विश्वास ठेवा. प्रश्न विचारायला बंदी कारण ठरलेले उत्तर मिळणार तुमची श्रद्धाच नाही. अनेकांनी असे अनेक अनुभव घेतले / ऐकले असतील.
बुद्ध म्हणतात हे कारण आहे आनी हा परीणाम आहे. परिणाम आहे तेच परत कारण बनतय. कारण परत परिणाम घेउन येते आणी ही साखळी निरंतर चालुच रहाते. मी सांगतो म्हणुन नाही तर तुम्ही त्याचा अनुभव घ्या. हा रस्ता आहे. यथाभुत ( जे नैसर्गीकपणे घडतय ते जसे आहे तसे फक्त तटस्थ( प्रतीक्रीया न देता)) निरीक्षण करा आणी स्वतः जानुन घ्या. आज विज्ञानाला हे माहीत आहे की कुठलाही भौतीक पदार्थ केवळ तरंग आहे. हे बुद्धाने २५०० वषापुर्वी सांगीतले. आज तुम्ही स्वतः अनुभवु शकता. हे केवळ पहीले स्टेशन आहे, सगळा मार्ग आज उपलब्ध आहे. पण कष्ट करावे लागतील जाणुन घेण्यासाठी तीच साधना. अनेक लोक येतात , जगभरातुन लाखोंच्या संखेने त्यातील अनेक लोक तुम्हाला सांगतील की मस्त अनुभव येतो, बरं वाटते आनी तरीही ते सोडुन देतात. त्याचे त्यांना त्या त्या प्रमानात लाभही होतात. महाराष्ट्रात अनेक केंद्रे आहेत. कोर्सचे वेळापत्रक वेबसाईटवरही उपलब्ध आहे. ११ व्या दिवशी सकाली ७ वाजता कोर्स संपतो.कोणीही तिथे जाउन त्या सुटलेल्या लोकांशी बोलु शकतो. महाराष्ट्र शासनात अनेक उच्चाधिकार्यांनी हा कोर्स घेतलाय. त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन कुठल्याही शासकीय कर्मचार्याला या शिबीरासाठी पगारी रजा देण्याची मंजुरी मिळवलीय. लहान मुलांसाठी त्यांना झेपतील असे शिबीर आयोजीत होतात. आपल्या शासनाने आता प्रत्येक शाळेत आनापान सतीसाठी जीआर काढलाय. १० मिनीट शाळा भरताना आनी तेवढाच वेळ शाळा सुटताना.
यासाठी शाळेतील किमान एका शिक्षकाला हा कोर्स घेणे बंधनकारक आहे. मग ते विद्यार्थ्यांकडे लक्ष पुरवु शकतील. मी सुद्धा या योजनेत सहभागी आहे. ती राबवायला अनेक अडचणी आहेत त्यामुळे खुप संथगतीने ते चाल्लय. खुप मनुष्यबळाची गरज आहे ही एक अडचण. दुसरी मी शिक्षकांच्या एका शिबीराला सेवा देत होतो.
ते शिक्षक गुरुजींचे प्रवचण लिहुन घ्यायला पेन वही मागायचे. अनेक शिक्षक आपापसात बोलायचे. विनंती केल्यावर ते म्हणायचे आमचं कामच बोलायचं आहे आम्ही त्याशिवाय राहुच शकत नाही. काही सिरियसली करायचेही. जे दोघे वारंवार सांगुनही ऐकत नव्हते त्यांना मी सांगीतले की बाबांनो तुम्हाला शासनाला इथले कोर्स केलेले प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. तुम्ही नियम तोदल्यामुळे ते तुम्हाला देता येणार नाही.तर त्यातले एक शिक्षक मला म्हनाले असं काही करु नका तुमचे काय असतील ते पैसे मी देउन टाकेन मला प्रमाणपत्र द्या. शेवटच्या दिवशी मी त्यांना सहज विचारले की वारंवार सांगुनही तुम्ही मौन का तोडले तर त्या शिक्षकाने
दुसर्याकडे बोट दाखवले आनी म्हणाला मी नाही पण हाच माझ्याशी बोलायचा आता बोला. असो.
अनेकांना वाटते की काय फक्त डोळे मीटुन बसायचे आणि मग आनंदच आनंद हा केवळ भ्रम आहे. अस काही नाही, खुप कष्टदायी मार्ग आहे. साधनेत प्रगतीनंतर २-३ तास न हलता सहज बसता येतं, त्यावेळी खुपच सुखद संवेदनांचा अनुभव येतो. असे वाटते पोहोचलो. बुद्ध म्हणतात हा फक्त थांबा आहे पूढचा थांबा असा असा आहे. संपुर्ण मुक्ती मिळेपर्यंत थांबु नका.
शेवटच्या अवस्थेला बुद्धांनी शुन्य(निर्वाण) म्हनलय त्याचा अनुभव घ्या. जिथे काहीच उत्पन्न होत नाही काहीही नष्ट होत नाही. जे नेहमीच होते आनी राहील. ते अनंत आहे.माझ्या अल्पमतीप्रमाणे विज्ञानही म्हणतेय की मॅटर अस्तित्वात आहे तर अँटीमॅटरही असले पाहीजे. मला असे वातते ती हीच अवस्था असावी. अर्थातच या बद्दल चुकभुल असु शकते. अनेक संतांनी हे अनुभव घेतलेत उदा: कबीराच या अर्थाच दोहा आहे मुक्या माणसाने गुळ खाल्ला (लिहीता वाचता येत नाही तर तो काय सांगेल) आनी समोरचा काय समजणार.हाच वादाचा मुद्दा होतो.
माझ्या समजेप्रमाणे मी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय. बाकी आपली मर्जी.
विस्तृत प्रतिसाद आवडला.
विस्तृत प्रतिसाद आवडला. धन्यवाद.
अध्यात्मासाठी विज्ञानाचा संदर्भ
या दोन्ही सत्यांचे संदर्भ मिळतील काय? विज्ञानाच्या बाबतीत, किमान पदार्थाच्या मूलभूत स्वरुपाबाबत, 'हे माहित आहे कि' अशी वाक्यरचना न करता 'it is a scientific theory that...'अशी वाक्यरचना करावी. याउपरही (कोणताही?) पदार्थ केवळ तरंग आहे असे कोण शास्त्रज्ञाने कोठे म्हटले आहे? नि बुद्धाने या संबंधात केलेला पूर्ण उल्लेख काय आहे? पूर्ण पॅरा काय आहे? त्याचाही अर्थ नेमका तोच होतो का?
-----------------------------------------------------
विज्ञान नि अध्यात्म (इथे विपश्यना) यांचा उद्देश एक असेल, नसेल; त्यांचा मार्ग एक असेल, नसेल, त्यांची सत्यार्हता समान असेल, नसेल; विज्ञानाचा अध्यात्मामधे कारणहिन उल्लेख करणे गैर आहे. विपश्यनेसाठी स्टीफन हॉकिंगच्या तुलनेत बुद्धाची क्रेडेंशियल्स देणे अनावश्यक आहे. मानवी जीवनाची मूल्ये, कार्ये, कृती, विचार, इ इ कसे असावेत हे सांगण्यासाठी धर्म नि अध्यात्म स्टँडालोन पुरेसे आहेत. त्यांना विज्ञानाच्या कवड्यांची गरज नाही.
------------------------------------------------------
आपण आहोत हे सत्य आहे. मग आपण कोण आहोत, काय आहोत, का आहोत, असेच का आहोत, कसे असायला पाहिजे, इ इ प्रश्न अध्यात्मात टॉप डाउन पद्धतीने उत्तरायचा प्रयत्न होतो. शेवटी हे जग आणि आपले जीवन का अस्तित्वात आहे, कशासाठी आहे नि आपण करायला पाहिजे नि काय नाही याचे मोघम प्रिस्किप्शन म्हणजे अध्यात्म. प्रत्येक अध्यात्माच्या प्रत्येक अभ्यासकाचं यावर वेगळं मत आहेत नि ते मानणाराचं प्रत्येकाचं त्याचं वेगळं इंटप्रिटेशन आहे. मंजे यातलं कोणतंही एक मत वा एक प्रिस्क्रिप्शन पाहिलं तर ते बरोबर असू शकतं, चूक असू शकतं, बिनकामाचं असू शकतं, खोटं पण खरं वाटणारं समाधान देणारं असू शकतं, इ इ. तो प्रांत लांघावा का, कितीवेळ, इ इ प्रत्येकाच्या मर्जीचा प्रश्न. अध्यात्माच्या दूर, जवळ राहण्याचे लाभ, अलाभ त्या त्या प्रमाणे प्रत्येकाला होतील. पण या 'कल्याणकारी विचारांच्या प्रचारार्थ' वा 'अध्यात्माच्या मार्केटींगमधे', जे काय ते, विज्ञानाला आणायची गरज नसावी. विज्ञानाचा अप्रोच बॉटम अप आहे. त्याला निसर्गातली तुटक तुटक सत्ये माहित आहे. पण फार मोठा क्लेम करावा असं त्याकडे काही नाही. किमान आजतरी नाही. वैज्ञानिक थेरीचे क्रेडेंशियल्स देऊन अध्यात्मिक बाबीची पुष्टी करणे इथे केविलवाणे वाटले.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
...
गुड क्याच.
या दोन्ही सत्यांचे संदर्भ
या दोन्ही सत्यांचे संदर्भ मिळतील काय? विज्ञानाच्या बाबतीत, किमान पदार्थाच्या मूलभूत स्वरुपाबाबत, 'हे माहित आहे कि' अशी वाक्यरचना न करता 'it is a scientific theory that...'अशी वाक्यरचना करावी. याउपरही (कोणताही?) पदार्थ केवळ तरंग आहे असे कोण शास्त्रज्ञाने कोठे म्हटले आहे? नि बुद्धाने या संबंधात केलेला पूर्ण उल्लेख काय आहे? पूर्ण पॅरा काय आहे? त्याचाही अर्थ नेमका तोच होतो का?
प्रयत्न करतो. वाक्यरचनेबद्द्ल सहमत तो माझा दोष. सब्बो पज्जलीतो लोको सब्बो लोको पकंपितो पकंपितो. हे गोयंकाजी १० दिवसाच्या शिबीरात स्वतः सांगतात. विपश्यना रिसर्च इंस्टीट्युट आणी मुंबई युनिव्हर्सीटी मीळुन पाली भाषेचा कोर्स चालवतात २ वर्षांचा. विपश्यना रिसर्च इंस्टीट्युट ,एस्सेलवल्डशेजारी मुंबई येथे पाली भाषेतील मूळ ग्रंथ उपलब्ध आहेत. मला पाली येत नसल्याने मी काही त्यांचा अभ्यास करु शकत नाही. त्यांचा अनुवाद विपश्यना रिसर्च इंस्टीट्युट करते ती पुस्तके मी वाचलेली आहेत त्यात याचा उल्लेख आहे.आता तुम्ही म्हणाल विपश्यनेवरच शंका? आणी तुम्ही विपश्यना रिसर्च इंस्टीट्युट ने केलेले अनुवाद सांगताय. विपश्यना रिसर्च इंस्टीट्युटमधे बुद्ध याविषयावरची मुळ पालीतील ग्रंथ उपलब्ध आहेत. ती मिळवण्यात जर कुणाला काही अड्चण असेल तर ती जबाबदारी माझी. मी स्वतः हा अनुभव घेतलाय हे मी स्प्ष्टपणे लिहीलय तसच विपश्यना करनार्या अनेकांनी हेही.पण त्याचा पुरावा देण्याची सोय नाही.
आणखी एक गोयंकांना आयआयटी मूंबईमधे बोलावले होते तीथे त्यांनी हे सांगीतले. त्याची सिडी माझ्याकडे आत्ता ईथे आहे.
विज्ञान नि अध्यात्म (इथे विपश्यना) यांचा उद्देश एक असेल, नसेल; त्यांचा मार्ग एक असेल, नसेल, त्यांची सत्यार्हता समान असेल, नसेल; विज्ञानाचा अध्यात्मामधे कारणहिन उल्लेख करणे गैर आहे. विपश्यनेसाठी स्टीफन हॉकिंगच्या तुलनेत बुद्धाची क्रेडेंशियल्स देणे अनावश्यक आहे. मानवी जीवनाची मूल्ये, कार्ये, कृती, विचार, इ इ कसे असावेत हे सांगण्यासाठी धर्म नि अध्यात्म स्टँडालोन पुरेसे आहेत. त्यांना विज्ञानाच्या कवड्यांची गरज नाही.
अगदी खरय. मग अध्यात्म हा अनुभुतीचा विषय आहे हे जागोजागी लिहीलय तरी विज्ञानाच्या बाबतीत, किमान पदार्थाच्या मूलभूत स्वरुपाबाबत, 'हे माहित आहे कि' अशी वाक्यरचना न करता 'it is a scientific theory that...'अशी वाक्यरचना करावी. याउपरही (कोणताही?) पदार्थ केवळ तरंग आहे असे कोण शास्त्रज्ञाने कोठे म्हटले आहे? नि बुद्धाने या संबंधात केलेला पूर्ण उल्लेख काय आहे? ही मागणी का? त्यालाही हरकत नाही. असायच काही कारणही नाही. विपश्यना ध्यान म्हणजे स्वतःच्या मनाचे तटस्थपणे ( कुठलीही प्रतिक्रिया न देता केलेले) निरीक्षण. विज्ञान काय करतय तर प्रयोग करुन, विश्लेशन करुन अनुमान काढते बरोबर का? आता मन तर काय काढुन प्रयोगशाळेत प्रयोग करता येत नाही. असेल तर मला माहीत नाही. सगळी ध्यान प्रक्रीया फक्त आनी फक्त मनाचे निरीक्षन आहे दुसरे काहीच नाही. मग विज्ञानाच नाव घेतल्याने बिघडलं कुठं? तरीही हरकत असेल तर तो माझा प्रतीसाद मंडळानं उडवुन टाकावा. काय फरक पडेल त्यानं. आता शब्दच्छलच करायचा असेत तर आपली माघार. मग एखाद्या शास्रज्ञानेच कुठे लिहीले असेल तर काय फरक पडतो. किंवा पडत असेलही. साखर गोड आहे हे खाल्ली की
कळते, त्यामागे ती कशापासुन, कशी , काय काय मिसळुन तयार होते हे कुठल्या शास्रज्ञाने शोधले हे माहीत नसताना गोड लागत नाही का? प्रत्येक गोष्ट तुम्ही इतकी खात्री स्वतः करुनच करणार का? करत असाल तर मग विपश्यना का करुन पाहुन खात्री का करत नाही? आता या असल्या विषयात मला पडायचे नाही.
माझा अनुभव मी लिहीलाय दुसर्यांना माहीती व्हावी हा उद्देश. असो.
तरीही मला वाटते की ईथे अनेक विज्ञानातील जाणकार आहेत त्यांनी लेखावर मत नसेल द्यायचे तर देउ नये. पण फक्त कोणताही भौतीक पदार्थ केवळ तरंग आहे फक्त या विषयावर प्रकाश पाडावा. मी त्याचा माझ्या लेखाला कुठल्याही प्रकारे समर्थन म्हणुन समजणार नाही. मलाही विज्ञान या विषयावर काय म्हणतेय ते कळेल.
पण या 'कल्याणकारी विचारांच्या प्रचारार्थ' वा 'अध्यात्माच्या मार्केटींगमधे', जे काय ते, विज्ञानाला आणायची गरज नसावी. विज्ञानाचा अप्रोच बॉटम अप आहे. त्याला निसर्गातली तुटक तुटक सत्ये माहित आहे. पण फार मोठा क्लेम करावा असं त्याकडे काही नाही. किमान आजतरी नाही. वैज्ञानिक थेरीचे क्रेडेंशियल्स देऊन अध्यात्मिक बाबीची पुष्टी करणे इथे केविलवाणे वाटले
हेच मी म्हणतोय की मी स्वतः हा अनुभव घेतलाय हे मी स्प्ष्टपणे लिहीलय तसच विपश्यना करनार्या अनेकांनी हेही.पण त्याचा पुरावा देण्याची सोय नाही. मग? तुम्ही किंवा कुणीही प्रयोग करावा.
आपण आहोत हे सत्य आहे. मग आपण कोण आहोत, काय आहोत, का आहोत, असेच का आहोत, कसे असायला पाहिजे, इ इ प्रश्न अध्यात्मात टॉप डाउन पद्धतीने उत्तरायचा प्रयत्न होतो. शेवटी हे जग आणि आपले जीवन का अस्तित्वात आहे, कशासाठी आहे नि आपण करायला पाहिजे नि काय नाही याचे मोघम प्रिस्किप्शन म्हणजे अध्यात्म. प्रत्येक अध्यात्माच्या प्रत्येक अभ्यासकाचं यावर वेगळं मत आहेत नि ते मानणाराचं प्रत्येकाचं त्याचं वेगळं इंटप्रिटेशन आहे. मंजे यातलं कोणतंही एक मत वा एक प्रिस्क्रिप्शन पाहिलं तर ते बरोबर असू शकतं, चूक असू शकतं, बिनकामाचं असू शकतं, खोटं पण खरं वाटणारं समाधान देणारं असू शकतं, इ इ. तो प्रांत लांघावा का, कितीवेळ, इ इ प्रत्येकाच्या मर्जीचा प्रश्न. अध्यात्माच्या दूर, जवळ राहण्याचे लाभ, अलाभ त्या त्या प्रमाणे प्रत्येकाला होतील.
तिथे आपण जे शिकतो ते आपल्या रोजच्या व्यवहारात कामाला येत नसेल तर काय करायचे आहे ते ध्यान. लोणचे घालायचे काय ध्यानाचे? विपश्यना नेमकी या रोजच्या व्यवहारात काय काम करते हे मी सवीस्तर लिहीतो . ईथेच त्यासाठी मला वेळ द्यावा ही विनंती. आणी जवळपास सर्व बेसीक प्रश्नांची मी माझ्या समजेप्रमाणे (अनुभुतीप्रमाणे) उत्तरे दिली आहेत याबद्दल तरी प्रत्यवाय नसावा. समजेप्रमाणे यासाठी लिहीलय की मला खुप आनंद झालाय , किंवा मनाला खुप प्रसन्न वाटतय, किंवा मी जन्मात प्रथमच इतकं दु:ख्ख अनुभवतोय. आता समोरच्याला नेमके किती हे कसे समजणार? आपना सर्वांना त्याचा अनुभव असतो आनी आपण ते समजुन घ्रेतो, पण नेमका कीती हे सांगणार्याचे आनी आपले समजणे यात अंतर असेलच की नाही?या गोष्टींना अजुनतरी प्रमाणबद्ध एकक नाही. असेल तर मला तरी माहिती नाही.कीती किलो. लीटर कींवा किती मेगॅबाइट आनंद झाला असे काही आहे का? म्हनुन मला आलेली अनुभुती मी तुम्हाला सांगीतली ती माझ्या समजेप्रमाणे. वादासाठी वाद मला घालायचा नाही. त्यातुन काय निश्पन्न होनार. माझा अनुभव माझ्याकडे. तुम्ही पाहु शकणार नाही. करुन पाहण्याशिवाय पर्याय नाही. असल्यास सुचवावे . न पटल्यास सोडुन द्यावे.
स्तुत्य शंकासमाधान
विलासराव,
१. अनुभूत गोष्टीचे वर्णन न करता येणे सामान्य आहे.
२. अनुभूत गोष्टीच्या प्रत्ययाचे स्पष्टीकरण न देता येणे देखिल सामान्य असावे. किंवा प्रचंड जिकरीचे असावे. किंवा अगदी (विपश्यनेच्या) तज्ञ लोकांनी केले तरी इतके फाटे फोडणारे, फुटणारे असावे कि शेवटी ते बर्याच लोकांसाठी समाधानकारक न ठरेल.
३. या पार्श्वभूमीवर स्वतःचे अनुभव व विचार इतरांना सांगणे वा स्वतःस मनस्वी वाटते म्हणून स्वानुभवाचा आग्रह करणे यात काहीही गैर नाही.
-----------------------
या धाग्यात आपण हेच केले आहे म्हणून आपण धाग्यात मांडलेल्या मुख्य भूमिकेबद्दल माझे काहीही म्हणणे नाही. उलट आपण आपल्या परीने शांतपणे, संयमाने विविध विचारधारांच्या लोकांच्या शंकांचे निराकरण करत आहात ते देखिल मला स्तुत्य वाटते.
----------------------
सामान्यतः मूल्ये, समाज, जीवन, धर्म, अध्यात्म, संस्कृती, मानवता, इ इ च्या चर्चांमधे अवैज्ञानिक मतविचारांचे लोक विज्ञान आणतात तेव्हा वैज्ञानिक लोकांच्या डोक्यात एक तिडिक उत्पन्न होते. त्यात मूळ मुद्दा बाजूला राहतो. सगळंच खोटं वाटू शकतं. खासकरून वैज्ञानिक विधाने प्रचंडच काळजीपूर्वक वापरावीत. एकूण विश्वासार्हतेसाठी वाक्यावाक्याची विश्वासार्हता गरजेची आहे. खासकरून जी विधाने आपण शेवटपर्यंत डीफेंड करू शकत नाहीत ती न केलेली बरी. लोकांनी विपश्यना का करावी (वा का करू नये) यामधे ते नि तत्सम वाक्ये अनावश्यक आहेत. स्वतःस ज्ञानी, पुढारलेले,अनंध्,शास्त्रीय, इ इ मानणारा बराच समाज आहे. असली वाक्ये त्यांना टर्न ऑफ करतात. नि ते ज्यांना प्रभावित करू शकतात ते देखिल दूर राहतात.
----------------------
व्यक्तिगत सहभाग-
व्यक्तिशः मला सज्जन लोकांची संगत आवडते. विपश्यनेस येणार्या लोकांची मूल्ये उत्तम आहेत असे मला जाणवले वा त्यांचेमुळे माझी मूल्ये अजून वृद्धिंगत झाली तर केवळ त्याच कारणाने मी तिथे असायची शक्यता आहे. बाकी कोणत्या थेरीत काही दम आहे का यात सहसा मला रस नसतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
धन्यावाद. मी आपल्याशी सहमत
धन्यावाद. मी आपल्याशी सहमत आहे.
सामान्यतः मूल्ये, समाज, जीवन, धर्म, अध्यात्म, संस्कृती, मानवता, इ इ च्या चर्चांमधे अवैज्ञानिक मतविचारांचे लोक विज्ञान आणतात तेव्हा वैज्ञानिक लोकांच्या डोक्यात एक तिडिक उत्पन्न होते. त्यात मूळ मुद्दा बाजूला राहतो. सगळंच खोटं वाटू शकतं. खासकरून वैज्ञानिक विधाने प्रचंडच काळजीपूर्वक वापरावीत. एकूण विश्वासार्हतेसाठी वाक्यावाक्याची विश्वासार्हता गरजेची आहे. खासकरून जी विधाने आपण शेवटपर्यंत डीफेंड करू शकत नाहीत ती न केलेली बरी. लोकांनी विपश्यना का करावी (वा का करू नये) यामधे ते नि तत्सम वाक्ये अनावश्यक आहेत. स्वतःस ज्ञानी, पुढारलेले,अनंध्,शास्त्रीय, इ इ मानणारा बराच समाज आहे. असली वाक्ये त्यांना टर्न ऑफ करतात. नि ते ज्यांना प्रभावित करू शकतात ते देखिल दूर राहतात.
हे सगळे गोयंकाजी जे विपश्यनेतील आचार्य आहेत यांनी दिलेली उदाहरणे आहेत. मी माझ्या अल्पमतीने काही उत्तरे दिलेली आहेत. गोयंकानी मी लिहीलय त्यापेक्षा जास्त विपश्यना हे विज्ञान आहे असे दाखले दिलेले आहेत.
त्यांच्याबरोबर अनेक उद्योगपती, इंजीनिअर्स, डॉक्टर्स, प्रोफेसर लोक, अधिकारी लोक, अडाणी लोक, गरीब आनी श्रीमंत लोक, जवळपास सर्वच मेजर धम्रांतील धार्मीक गुरु लोक यांनी विपश्यनेचे कोर्स केलेत. त्या सर्वांसमोर गोयंकाजी हेच सर्व सांगत आलेले आहेत.
माहीती असावी म्हणुन सांगतो गोयंकाजी आचार्य विनोबाजींना भेटले तेंव्हा विनोबांनी ही विद्या एवढी प्रभावी आहे यावर संशय व्यक्त केला. तेही संतच होते. ते गोयंकांना म्हनाले जर असे असेल तर हा प्रयोग तुम्ही लहान मुलांवर आनी जेलमधील कैद्यांवर का करत नाहीत?
गोयंकांना त्यातुन ही प्रेरणा मिळाली. तिथुन पुढे लहान मुलांचे कोर्सेस सुरु झाले. राजस्थान आनी दिल्ली येथे
तिहार जेलमधे विपश्यना सुरु झाली.जो काही बदल किरण बेदींनी घडवला तो विपश्यनेच्या बळावर. माझ्याकडे ती सिडी आहे. मला स्मरते त्यानुसार त्यांच्या आत्मचरीत्रातही त्याचा उल्लेख आहे. आजही तिहाद जेलमध्ये विपश्यना सेंटर चालु आहे आनी तिथे रेग्युलर कोर्सेस होतात.
बुद्धांनी धम्म ज्याला म्हटले ते म्हणजे सनातन निसर्गनियम. म्हणुनच बुद्ध झाल्यावर ते म्हणाले एस धम्मो सनंतनो!! . माझ्या आधी किती बुद्ध झाले आनी नंतरही अनेक होतील. चित्तावर जे धारण कराल ते बीज आनी त्याचे फळ तुम्हाला त्याचेच गुणोत्तर होउन मिळेल. जसे एक आंब्याची कोय लावली तर शेकडो आंबे मिळतात. ईथेच गोष्ट थांबत नाही. त्या आलेल्या प्रत्येक आंब्यात तशाच झाडाला जन्म देउ शकेल असे बीज आहे. बघा कसे गुणोत्तर वाढत जाते. जे पिंडी ते ब्रम्हांडी या प्रमाणे चित्तावर लोभाचे/क्रोधाचे कींवा कुठल्याही विकाराचे बीज टाकले तर तेही याच पद्धतीने वाढत जाते. आता तुम्हाला हे ऐकुन अतिशयोक्ती वाटेल पण हेच तर विपश्यना केल्यावर तुमच्या अनुभवावर उतरते. आनी हाच सनातन नियम आहे यालाच बुद्धांनी धम्म म्हटलय. कुठलही कर्मकांड तिथे नाही. पण लोक( जनता) फार्फार हुशार आहे. त्यांनी बुद्धांच्या नावावर त्यांच्यानंतर बुद्ध धर्म स्थापन केला. विपश्यना रिसर्च इंस्टीट्युट कडे बुद्धांचे जे काही साहित्य उपलब्ध आहे. त्यानी ते डीजीटायईज केले आनी शोध घेतल्यावर लक्षात आले बौद्ध शब्द बुद्धांच्या नंतर ५०० वर्षांनी त्या साहित्यात दिसायला लागला. बरेचसे लोक तर विपश्यनेला विरोध करतात किंवा करुन पहात नाहीत ते केवळ हे बौद्धांचे वगैरे आहे म्हणुन. असो.
आता रहाता राहीला जे लोक विज्ञानाचे नाव ऐकुन येत नाहीत त्यांचा कींवा ते विपश्यनेपासुन दुर जातील त्यांचा. विपश्यना केंद्र कसेही करुन लोकांना पकडुन आनुन चालत नाहीत. ती काही कमर्शीयल संस्था नाही की आता १ कोटीची यावर्षीची उलाढाल पुढिल २ वर्षात २ कोटी करायचीय . सगळि केंद्र ज्यांना ज्यांना लाभ झाला अशाच शुद्धचित्ताने दान देणार्या साधकांच्या देणगीवर चालते. आजही कोर्स न केलेल्या कुणाचही दान ही संस्था स्विकारत नाही. गोयंकाजी स्वतः याच कारण सांगतात तर ईतकी अनमोल विद्या मला फुकट मीळाली. बरं घ्यायचं म्हटलं तर फीही अनमोल घ्यावी लागेल. जनकल्ल्याण हाच उद्देश असल्याने फिज आकारली जात नाही.पण त्यातही लोकंना वाटते हीच गोम आहे लोक स्वतःच भरपुर दान करतात मग फिची गरजच काय. कुणीही तुम्हाला तेथे तुमचं दान कुठाय असे विचारणार नाही. दिलात तर ठीक नाही दिलात तरी ठीक.असो. गोयंका ही विद्या कशी परत लुप्त होते तेही सांगतात. हळुहळु जे नंतरचे आचार्य कींवा केंद्राचे ट्रस्टी आहेत ते जे विपश्यनेत पुर्णपणे पारंगत नाहीत असे लोक विपश्यनेच्या भल्यासाठी म्हणुन त्यात काही सुधारना करु जातील . आनी ही बदललेली विद्यातंत्र अगोदरचे परिणाम देणार नाही. मग हळुहलू विपश्यनेची चर्चा चालु राहील . परिणाम येत नसल्याने लोक करनार नाहीत . मग अशेच होता होता ती परत लुप्त होउन जाइल. हेसुधा निसर्गनियमानेच होते. असो. बुद्धांनी स्वतः सांगीतलय की १००% लोक विपश्यना करुच शकत नाहीत. आज सुद्धा जेवढे लोक येतात तेते ठेपेल तेवढीच शिबीरे करतात. त्यामुळे जे जातील ते जातील. न जातील ते न जातील.
या विपश्यनेचा ३-४ दिवसांचा
या विपश्यनेचा ३-४ दिवसांचा क्रॅश कोर्स असतो का हो? एक गंमत म्हणून अनुभव घेण्यायोग्य आहे काय? मला वाटत नाही की मी असे काही दिवस मौनात राहिलो तर फार काही फरक पडेल. पण तरी गंमत करून बघायला काय हर्कते.
१-२-३ दिवसांचे कोर्स आहेत पण ते एक १० दिवसाचा कोर्स झाल्यानंतर. अगोदर हे १० दिवसाचे कोर्स ७ आठवड्यांचे होते . काळानुसार कमी करत करत ७ दिवसांचे केले पण त्यांच्या असे लक्षात आले अॅव्हरेज लोक बेसीक तंत्र ७ दिवसात आत्मसात करु शकत नाहीत. मग कमीतकमी १० दिवसांचे शिबीर ठरवण्यात आले.
गंमत म्हणुन /कुतुहल म्हणुन किंवा चिकीत्सा म्हणुन कुठल्याही कारणाने करा पण एकदा गेलात तर नियम कसोशीने पाळा. मौन केवळ ९ दिवसाचे असते. १० व्या दिवशी सकाळी १० वाजता मौन समाप्त होते. त्याची दोन कारणे असतात.
एक आपण अंतरमनात बर्यापैकी खोलवर पोहोचलेले असतो, मौनातही असतो. आपण अंतर्मुख झालेलो असतो ते परत बहीर्मुख होण्यासाठी वेळ मिळावा. दुसरे जे काही साधक आलेत त्यांचे अनुभव तुम्ही शेअर करु शकता. आनी आपापसात ओळखीही व्हाव्यात.
सलग १० दिवस सुट्टी मिळणं कठीण नसलं तरी या कारणासाठी ती काढायची मला गरज वाटत नाहिये. कारण काल तुम्ही म्हणता तो श्वासावर लक्ष केंद्रीत करायचा प्रयोग करायला बसलो. मनातून सारे विचार काढून टाकले (बहुदा), एक मिनिट झाल्याचे डोळे मिटून समजेना, डोळे उघडले तेव्हा चांगला अर्धा तास झाला होता नी दरम्यान झोप लागली होती बसल्या बसल्या! हा मात्र मनात कोणतेही विचार आले नाहीत. (आता बसल्या बसल्याच काय आम्ही आकंठ गर्दीने लडबडलेल्या लोकल ट्रेनमध्ये उभ्या उभ्या झोपु शकतो. इतकेच काय एकदा तर स्विमिंग टँकमध्ये हातपाय न हलवता आकाशाकडे बघत आडवा फ्लोट करत असताना डुलकी येत होती (डोळा मारत) उत्तम, गाढ आणि कधीही घेता येणारी किंवा भरपूर टाळता येणारी हुकमी झोप हा आमचा युएसपी)
हाहाहा मस्तच.
प्रयत्न करुन पाहील्याबद्द्ल अभिनंदन. आपल्याला प्रत्येक श्वासावर न चुकता लक्ष ठेवायचे होते ते झाले का हे समजले नाही. हरकत नाही.
मी स्वतः पहील्या शिबीरातला पाचवा दिवस संपल्यावर टीचरांना भेट्लो आनी नि:संदिग्धपणे सांगीतले की ही विपश्यना माझ्या उपयोगाची नाही. मी तुम्ही सांगीतलेले सर्व नियम पाळलेले आहेत. त्यांनी माझा फॉर्म तपासला तर मी रोज दारु पीत होतो असे त्यांच्या लक्षात आले. तर त्यांनी मला विचारले त्याचा काही त्रास होतोय का? मी उस्फुर्तपणे (जाणुनबुजुन नाही) म्हणालो की जर मी हो म्हणालो तर तुम्ही मला देणार आहात का? वाटले की हे लोक एवढी व्यवस्था चांगली ठेवतात, जेवणही सात्वीक, मग मला त्रास होतोय तर कदाचीत देतीलही. ते हसले आणी मला काही गोष्टी समजावुन सांगीतल्या मला त्या पटल्या म्हणुन मी उरलेले दिवस मनापासुन काम केले आणि मी आजपर्यंतच नाही तर जिवनभरासाठी हा मार्ग अनुसरलाय. नाहीतर जर मी परत आलो असतो किंवा मन लावुन काम न करता बसुन दिवस काढले असते तर आज कोणीही माझ्याऐवजी लेख लिहीला असता तर मी त्याविरोधात भरपुर लिहीले असते कारण मी प्रयोग करुन पाहिलाय अशी माझी समजुत झाली असती. कुणीही जा कींवा नका जाउ पण जर का गेलातच तर सर्व नियम पाळा. फक्त मौन ही काही विपश्यना नाही तर मौनामुळे अंतर्मुख व्हायला मदत होते.
(आता बसल्या बसल्याच काय आम्ही
तुम्ही नेहमी शेवटच्या स्टेशनवर उतरता का? मंजे तुमचं स्टेशन आलं हे तुम्हाला कसं कळतं?
---------------------
घरीदेखिल तुम्ही, ठरवले तर, उभ्याने झोपू शकता का? टेकून झोपता कि न टेकता? न टेकता झोपत असाल तर (इतरांनी घेतलेला) या अवस्थेतला एक फोटो व्यनि करा. अशा क्षमतेचे आपण जगातले एकमेव व्यक्ति असाल असा माझा कयास आहे.
---------------------
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नविबाजू
आता अजोंचा आय डी नविबाजूंनी चोरला काय ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
लोकलच्या गर्दीत उभ्याने झोपणे
लोकलच्या गर्दीत उभ्याने झोपणे आणि घरी मोकळ्या जागी उभ्याने झोपणे यात बेसिक कल्पनांची गल्लत होते आहे.
लोकलच्या गर्दीत सर्वबाजूंनी लोकांनी आपल्याला तोलून धरलेले असल्याने बेसिकली वजनरहित अवस्था असते. त्यामुळे नुसते डोळे मिटले की झाले.
आपले स्टेशन आले हे कळण्यासाठी बरेच सबकॉन्शस मनाचे आडाखे असतात आणि ते साखरझोपेतही ऑपॉप आपल्याला जागे करतात. मुख्य म्हणजे प्रत्येक स्टेशनला एकदा आपल्या आजूबाजूचे आधार खळबळले जाऊन बदलतात तेव्हा एकदा किंचित जाग येतेच. वर्षानुवर्षे प्रवास करणारे वासानेही आपले स्टेशन ओळखतात. इ इ.
(अवांतर)
झीरो-जीचे ट्रेनिंग देण्यासाठी अंतराळवीरांना मुंबईला लोकलमध्ये धाडायला पाहिजे. स्वस्तात पडेल.
हम्म्म्म्म्... उपमा रोचक आहे!
रोचक उपम्याचा वास फक्त
रोचक उपम्याचा वास फक्त माटुंगा स्थानकाच्या आसपास येत असावा.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
...
किंग्ज़ सर्कल.
तुम्ही नेहमी शेवटच्या
नाही शेवटचं स्टेशन नाही. जेव्हा मुंबईत होतो तेव्हा दादरला चढलो की त्या बाजुला नंतर येणारे थेट माझेच स्टेशन असे (बाकी मधली स्टेशने दुसर्या बाजुच्या दरवाज्यात येत) त्यामुळे स्टेशन आलं की आजुबाजुच्यापैकी कोणीतरी "यहा उतरेगा क्या?" म्हणून विचारतोच - तेव्हा जागं व्हायचं सो शिंपल!
घरी गादी असल्याने असा कधी प्रयोग नै केला. पण तिथे जमु नये,पडेन बहुदा. वर गविंचे स्पष्टीकरण +१
बाकी ट्रेनमध्ये गर्दीत उभ्या उभ्या झोपणार्यांपैकी मी एकटा नाही, ही कॉमन सवय आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
(अवांतर शंका)
हात सटकला की काय होते?
पाने