चार्ली चॅप्लिनच्या म्युचुअल्स (१९१६-१७)

लेखमालेचा पहिला भाग इथे पहा.
मे १९१६ व ऑक्टोबर १९१७ दरम्यान चार्लीने 'म्युचुअल फिल्म कॉर्पोरेशन' बरोबर काही विनोदी मूक-लघुपटांची निर्मिती केली. एकूण १२ लघुपट आहेत व तीन मालिकांमधे (एकीत चार याप्रमाणे) विभागलेले आहेत.

ही म्युचुअल्स म्हणजे निखळ विनोदाची गम्मतजत्राच. बघताना चार्लीच्या विनोदातील अस्सलपणा सतत जाणवत रहातो. काही विनोदी जागांची पुनरावृत्तीही होते पण त्यामुळे एकूण दृष्यअनुभव कंटाळवाणा होत नाही. विनोदी सिनेमावर चार्लीचा जबरदस्त पगडा निर्माण झाला, अद्यापही आहे; इतका की मोजकेच विनोदवीर लेखक-दिग्दर्शक वगळता बहुतांश विनोदी चित्रपटांनी नुसती त्याची नक्कल, कल्पनाचौर्य करण्यात, नसता भंपकपणा करण्यात स्वतःची रिळे, पैसा (आणि दर्शकांचा वेळ, पैसा) वाया घालवला आहे असं वाटून जातं.

तीनही म्युचुअल मालिकांची यादी इथे देत आहे:

'चार्ली चॅप्लिन कार्निवल'
द काउंट
द फायरमन
द वॅगाबाँड
बिहाइंड द स्क्रीन

'द चार्ली चॅप्लिन कॅव्हल्केड'
वन ए. एम.
द पोन शॉप
द फ्लोरवॉकर
द रिंक

'द चार्ली चॅप्लिन फेस्टिवल'
द अॅडव्हेंचरर
द क्युअर
ईझी स्ट्रीट
द इमिग्रंट

यांपैकी मला भावलेल्या कृतींबद्दल थोडक्यात सांगते:

'द वॅगाबाँड' (जुलै १९१६)
आपला ट्रँप एका बारमधे शिरतो, व्हायलिन वाजवून पैसे मिळवू पहातो पण प्रतिस्पर्धी वादकांशी झालेलं भांडण चांगलंच अंगाशी आल्याने तिथून धूम ठोकतो. असंच भटकत असताना त्याला दरिद्री जिप्सीजची मोडकळीला आलेली कॅराव्हॅन दिसते. त्यात रहाणाऱ्या आणि इतर जिप्सीजच्या मारहाणीला, छळाला कंटाळलेल्या एका मुलीला चार्ली वाचवतो. कॅराव्हॅनमधे प्रेमळ चार्लीबरोबर थोडया आनंदात दिवस काढत असताना योगायोगाने तिची एका चित्रकाराशी भेट होते आणि 'स्टोरीमें ट्विस्ट' येतो…तुफान गाजलेल्या चार्लीच्या भविष्यातील एका चित्रपटाची बीजं ह्या कथेत सापडतात…

अवधी: २४ मिनिटे
मुख्य भूमिका: चार्ली चॅप्लिन, एडना परव्हिअन्स, एरिक कॅँपबेल
लेखन: चार्ली चॅप्लिन, विन्सेंट ब्रायन व मव्हेरिक टेरेल
संगीत: मीशेल मॉर्टीला व याटी डयुरांट

'बिहाइंड द स्क्रीन' (नोव्हेंबर १९१६)
डेव्हिड (चार्ली चॅप्लिन) फिल्म स्टुडिओतला प्रचंड अजागळ कारभार करणारा मदतनीस आहे. तो आणि त्याचा गॉलिआथ नावाचा मॅनेजर सोडल्यास अन्य मदतनीस शुल्लक कारणावरून संपावर जातात. सिनेमात काम मागायला गेल्यावर डिरेक्टरने हुसकावून लावलेली एक तरुणी मदतनिसाचा पोशाख करते आणि तिला आनंदाने कामावर घेतलं जातं. हा 'नवा मदतनीस' पुरुष नसून स्त्री आहे हे चार्लीच्या लवकरच लक्षात येतं व हे गुपित राखायचं असं ठरतं. आपला चार्ली लगेच तिच्याबरोबर फ्लर्ट करू लागतो आणि तीदेखील त्याच्या प्रेमात पडते. गॉलिआथ त्या दोघांना गे (समलिंगी) समजतो व 'कसं पकडलं' म्हणून त्यांची थट्टा उडवतो. परंतु डेव्हिड सेटवर जिकडे-तिकडे भयंकर घोळ घालत रहातो आणि संपावर गेलेले मदतनीस स्फोट करून स्टुडिओ उडवून टाकायचा असं ठरवतात…आता काय करायचं?

…चित्रपटांमधे समलैंगिकतेचे उल्लेख त्या काळात अगदी दुर्मिळ बाब होती - ते सामाजिकदृष्टया निषिद्धच होतं. मात्र ह्या लघुपटात त्याचा विनोदनिर्मितीसाठी थोडा वेळ वापर करून घेतलेला आहे. हे पाहून क्षणभर मला भारतीय सिनेमातील समलैंगिकतेच्या उल्लेखांची आठवण झाली - समलैंगिकतेत मुळातच विनोदी वाटण्याजोगं काही आहे असं बहुतांश भारतीय चित्रपटवाले गृहीत धरतात याला काही अर्थ आहे का? असो. 'बिहाइंड द स्क्रीन' चा उद्देश समलैंगिकतेवर टीका करणं वगैरे मुळीच नाही.

अवधी: २३ मिनिटे
मुख्य भूमिका: वरील लघुपटाप्रमाणे
लेखन: वरील लघुपटाप्रमाणे
संगीत: मीशेल मॉर्टीला

'वन ए. एम.' (ऑगस्ट १९१६)
एकाच चित्रातले बारकावे आपल्याला हळूहळू उलगडत जावेत तसा अनुभव हा लघुपट देतो. दारूच्या नशेत तर्र झालेला धनाढय माणूस (चार्ली) टॅक्सी कारने घराशी पोहचतो. गाडीतून बाहेर पडण्यापासून नशेत असल्याने त्याची पंचाईत व्हायला सुरुवात होते. आपल्याच घरातल्या वस्तूंशी 'धाडसाने सामना करून' तो कसाबसा वरच्या माजल्यावरील बेडरूमपर्यंत पोहचतो. अर्धवट नशा उतरलेल्या आणि खूप दमलेल्या चार्लीला शांत झोप मिळेल का..?

अवधी: साधारण ३४ मिनिटे
मुख्य भूमिका: चार्ली चॅप्लिन
लेखन: वरील लघुपटाप्रमाणे
संगीत: वरील लघुपटाप्रमाणे

'द रिंक' (डिसेंबर १९१६)

आणखी एक गोंडस चित्रकृती. वेटर म्हणून काम करणारा गोंधळ्या-गमत्या चार्ली लंचब्रेक मधे हॉटेलला लागून असलेल्या रिंकमधे स्केटिंग करायला जात असतो. एके दिवशी तिथे त्याची भेट श्रीमंत माणसाच्या अल्लड, तरुण कन्येशी होते. चार्लीपटांतील नेहेमीच्या खोडयांबरोबरच पहाण्याजोगी विशेष गोष्ट म्हणजे चार्लीचं स्केटिंगमधील कसब - एखादया लोण्याच्या लादीवर बोट फिरवावं तितक्या सहजतेने तो स्केट करतो!

अवधी: २४ मिनिटे
मुख्य भूमिका: चार्ली चॅप्लिन, एडना परव्हिअन्स, एरिक कॅँपबेल व हेन्ऱी बर्गमन(स्त्री-भूमिकेत)
लेखन: वरील लघुपटाप्रमाणे
संगीत: वरील लघुपटाप्रमाणे

'द क्युअर' (एप्रिल १९१७)

चक्राकार प्रवास असलेलं हे एक इटुकलं कथानक. अट्टल दारूडया असलेला चार्ली व्यसनमुक्त होण्यासाठी 'हेल्थ स्पा'मधे दाखल होतो. पण दारूच्या बाटल्यांनी भरलेली एक मोठी ट्रंक त्याने सोबत आणलेली असते. गडबडगुंडया चार्लीची ओळख एका तरुणीशी होते जी त्याला दारू सोडायची प्रेमळ गळ घालते - तो थोडया नाखुशीनेच राजी होतो. स्पा मधील कर्मचारी ट्रंक गुपचूप उघडतात आणि नशेत तर्र होतात. स्पा मालक चिडून सगळी दारू फेकून दयायला लावतो आणि झिंगलेला कर्मचारी (स्वतःच्या नकळत) एक-एक करून सगळ्या बाटल्या औषधी पाण्याच्या तळ्यात फेकतो. त्यानंतर स्पामधील लोकांची काय अवस्था होईल? चार्ली व्यसन सोडायचं आपलं वचन पाळेल का?…

अवधी: ३१ मिनिटे
मुख्य भूमिका: चार्ली चॅप्लिन, एडना परव्हिअन्स व एरिक कॅँपबेल
लेखन: वरील लघुपटाप्रमाणे
संगीत: वरील लघुपटाप्रमाणे

'द अॅडव्हेंचरर' (जून १९१७)

रोमांचकारी पाठलागानंतर एक कैदी (चार्ली) पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पसार होतो तो थेट समुद्रातून पोहतच. तो एका किनाऱ्याला लागतो व तिथे अपघाताने समुद्रात पडलेल्या काही प्रतिष्ठित व्यक्तींना बुडण्यापासून वाचवतो. त्यातील तरुणी त्याला विश्रांती आणि पाहुणचार देण्यासाठी लागलीच आपल्या घरी नेते. (त्या तरुणीचे वडील कोण असावेत? - एक नामांकित न्यायाधीश!) तिथे चार्ली आपली ओळख सैन्यातील कमांडर म्हणून करून देतो. परंतु दुसऱ्या दिवशी फरारी गुन्हेगाराची बातमी फोटोसकट छापून येते. आणि मग चार्लीचा द्वेष करणाऱ्या एका आमंत्रिताला 'पोल-खोल' करण्याची आयतीच संधी मिळते.… पुढे काय घडतं ते प्रत्यक्षच पहावं!

अवधी: ३१ मिनिटे
मुख्य भूमिका: वरील लघुपटाप्रमाणे
लेखन: वरील लघुपटाप्रमाणे
संगीत: वरील लघुपटाप्रमाणे

या बाराही लघुपटांची निर्मिती हा आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक आनंदाचा काळ होता असं चार्ली चॅप्लिननं आत्मचरित्रात म्हणून ठेवलेलं आहे. त्यानं (बहुधा आत्मचरित्रातच) असंही म्हणलेलं आहे: "मुळात मी चित्रपटनिर्मितीच्या धंदयात पैसा कमावण्यासाठी उतरलो होतो. ते करता करता अनाहूतपणे कलानिर्मिती झाली. हे एकून कुणाचा भ्रमनिरास झाला तर त्याला माझा इलाज नाही. सत्य हेच आहे."

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

फक्त एवढंच? त्या मालिकांबद्दल निदान एकेक पेराग्राफ तरी लिहा. आणि युट्युबच्या लिँक पण द्या Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो हो. काम चालू आहे! Smile माझ्याकडून लेख चुकून आधीच प्रकाशित झाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

You have not yet discovered that you have a lot to give, and that the more you give the more riches you will find in yourself.
- Anaïs Nin

लेख पूर्ण झाल्यावर मी तशी प्रतिक्रिया पोस्ट करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

You have not yet discovered that you have a lot to give, and that the more you give the more riches you will find in yourself.
- Anaïs Nin

लेख पूर्ण झालेला आहे. धन्यवाद. तसदीबद्दल क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

You have not yet discovered that you have a lot to give, and that the more you give the more riches you will find in yourself.
- Anaïs Nin

रोचक, माहितीपूर्ण लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वाह छान झालाय हा भागदेखील. फक्त ओळख वाचुन यातले २ ३ पाहिल्यासारखे वाटतायत. तरी परत बघेन. गेल्या वर्षी गोल्ड रश, सिटी लाइट्स, मॉडर्न टाईम्स, द डिक्टेटर, द किड, द सर्कस वगैरे पाहिलेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! मस्तच. ह्या चॅप्लिन मालिकेत पुढील लेख मात्र नुसतेच रिव्ह्यू प्रकारचे न लिहिता थोडे वेगळ्या धाटणीचे लिहिण्याचा विचार आहे. म्हणजे त्यांवर खऱ्या अर्थाने चर्चा होऊ शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

You have not yet discovered that you have a lot to give, and that the more you give the more riches you will find in yourself.
- Anaïs Nin