पुरोगामीत्वाचा शोध

काळ
उत्क्रांतीचा सिद्धांत मानला तर पुरोगामीत्व माणसाचा नैसर्गिक गुणधर्म असायला हवा. जसा जसा काळ पुढे लोटेल तसे तसे उत्क्रांतीच्या वरदानांनी मानवाचे जीवन एका आदर्श स्थितीकडे आपोआप लोटले जाईल. परंतु उत्क्रांतीच्या परिणामांनी होणारा एखादा छोटासाही बदल दॄश्य स्वरुपात प्रगट होण्यासाठी लागणारा काळ हा मोजक्या पिढ्यांच्या माळेच्या जीवनकाळाच्या तुलनेत हजारो पट असतो. त्याकरिता काय पुरोगामी आहे आणि काय प्रतिगामी आहे हे ठरवताना उत्क्रांतीजन्य बाबींना बाजूला ठेवले पाहिजे अन्यथा ते निसर्गावर केलेले भाष्य असेल. उदाहरणार्थ, आपले पूर्वज रानटी होते हे टीकात्मक सुराने नाही म्हटले पाहिजे. पुरोगामीत्वाच्या चर्चेचा कालखंड कसा असावा? त्यात उत्क्रांतीच्या भूतकाळातील रुपांवर मागासलेपणाचा आरोप होता कामा नये आणि उत्क्रांतीच्या भविष्यातील थेट पुढच्या टप्प्यातील वर्तनाचीच डायरेक्ट अवास्तव अपेक्षा होता कामा नये.

चर्चाविस्तार
साधारणतः सर्व मनुष्य उत्क्रांतीच्या एकाच मैलाच्या दगडावर येऊन थांबले आहेत हे एक मोठे गृहितक आहे. तरीही सर्व माणसांकडून पुरोगामीत्व दर्शक वर्तनाच्या समान अपेक्षा करणे जगात स्वीकार्य मानले जाते. पुरोगामीत्व झेपायची प्राकृतिक ऐपतच मानवसमूहांनुसार वेगळी असू शकते याची थोडीशी जाणीव मनात ठेवलेली बरी.

संदर्भ
निसर्ग आपल्याला आपसुक पुढे घेऊन जात असताना अधिकचा पुरोगामीपणा कशासाठी? दुर्दैवाने लोक स्वतःचे पुरोगामीत्व किती आहे हे इतरांचे पुरोगामीत्व मोजून सांगतात. तो मागास विचारांचा म्हणून मी पुढारलेल्या विचारांचा असा काहीसा लोकांचा पावित्रा असतो. तसे पाहता पुरोगामीत्वाचे आंतरपीढीय (inter-generational) आणि आंतरव्यक्तीय असे दोन प्रकार होतात. ते मिसळले तर चर्चेत संभ्रम निर्माण होतो.

संकल्पना
निसर्गाने उत्क्रांतीचा वेग शून्य केला तरी, मानवाची स्वतःची अशी काही भविष्यगामी, सुखी, समृद्ध किंवा आदर्श जीवनाची कल्पना आजच आणि आजच्या मर्यादांना मनात धरून आहे. ही कल्पना कोणी केली आहे? ही कल्पना समाजधुरीणांनी आणि तत्त्ववेत्यांनी केली आहे. तुम्ही आम्ही तिला केवळ हातभार लावला आहे. या कल्पनेपासून दूर जाणे ते प्रतिगामीत्व आणि तिच्याकडे सरकणे ते पुरोगामीत्व. ही संकल्पना कुठे एकत्र लिखित संकलित झालेली नाही कि तिच्यावर देशांच्या घटनांप्रमाणे शिक्कामोर्तब झालेले नाही. या आदर्श संकल्पनेचा आणि तिच्याकडे नेणार्‍या दिशेचा शोध जो तो आपल्या परीने घेत आहे. परंतु कोण कुठे जात आहे असे प्रत्येकास विचारले असता तो म्हणतो कि 'मी या संकल्पनेकडे जात आहे आणि पहा, बरेच लोक तर विपरित दिशांनी भरकटलेले आहेत.'

चालक (Drivers)
आपण कुठे चाललो आहोत, आपले वर्तन पुरोगामीत्व आहे कि प्रतिगामीत्व , हे कसे सिद्ध होते? कसे कळते? तर या गमनाचे अनेक चालक आहेत. कोणत्याही क्षणी समाजात मागे ओढणारे, मागे ओढले जाणारे, स्थिर, पुढे ओढले जाणारे, पुढे ओढणारे असे गमकांचे पाच प्रकार आढळतील. यात प्रत्येकच मी 'स्थिर वा पुढचा' असे म्हणेल. इतरत्र जाणारे अन्य या चर्चेच्या दृष्टीने महत्त्वाचे नाहीत. समाजातले जास्तीत जास्त लोक 'स्थिर' किंवा त्याच्या जवळच्या प्रकारात मोडतात आणि ते टोकाच्या ओढणारांचे युद्ध पाहतात किंवा काहीतरी बुळबुळीत पक्ष घेतात. पुढे जाणारांचेच बळ नेहमी जास्त असते हा भाबडा समज नको. निसर्ग तटस्थ असतो तेव्हा मानवसमाज सर्व दिशांना हिंदोळके खात असतो.

प्रवर्तके
इथे कोणता व्यक्ति कोणत्या प्रकृतीचा बनणार हे कसे ठरते? माणसाची विचार करायची एक पद्धत आहे. तो अगोदर सगळा विचार करून मग जीवन जगायला चालू करत नाही. जीवनाप्रारंभी मला कमी गोष्टी माहीत होत्या म्हणून मला प्रत्येक गोष्टीत 'फार' किंवा 'फार वेळ' विचार करावा लागला असे स्मरत नाही. मोठ्या ढगाच्या आडून इवलासा चंद्र हळूहळू बाहेर येतो, तसे माणसाचे स्वतःचे असे विचार उशीरा आणि कमी विषयांवर बनतात. अन्यथा सारा संदर्भ बाकी समाजाचाच असतो. भावना आणि जाणिवा यांचे अनंत प्रकार, किती लोक भेटले, त्यांनी काय काय सांगीतले, कशा सुरात सांगीतले, काय घटना घडल्या, त्यांचे काय काय परिणाम काय झाले, काय पाहिले, काय ऐकले, काय वाचले, काय ठसवले गेले, काय स्वार्थाचे होते, इ. सर्व सूक्ष्मानंतांनी कर्षणाकर्षणाची कितीतरी बले बनतात. शेवटी हा प्रकार इतका जास्त होतो कि माणूस आपण कसे आहोत इतकेच लक्षात ठेवतो, आपण तसे का आहोत याची फार सखोल उत्तरे देऊ शकत नाही. जी उत्तरे माहीत आहेत तीच सखोल आहेत या भ्रमात राहतो.

स्वमत आणि वास्तव
मनुष्य स्वतःकडे काही विशिष्ट चांगल्या किंवा वाईट मूल्यांची टोपली आहे असे समजतो. परंतु प्रत्येक वेळी त्यातली दोन काढून पैकी एकच निवडायला सांगीतले (elimination by option) तर शेवटी एकच मूल्य त्याच्याकडे शिल्लक राहते, तोच त्याचा सारांश. The resultant vector of all value led forces. हा सार कधी त्याला वरच्या आदर्श संकल्पनेकडे नेतो तर कधी विरुद्ध! वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे वागणे! वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे वागणे! त्यामुळे व्यक्ति पुरोगामी कि प्रतिगामी असा काळा पांढरा करता येत नाही. परंतु स्वतःच्या दिशितावस्थेबद्दल त्याचे फार अढळ मत असते. पाठी एकमेकांकडे करून 'स्थिर' लोकांना आपल्याकडे ओढण्यापेक्षा वास्तवात टोकाच्या लोकांचा डोळ्यास डोळे भिडवून युद्ध करण्याचाच पावित्रा जास्त असतो. या युद्धाचे मानसिक सुख सर्वांना आदर्श संकल्पनेकडे नेण्यापेक्षा जास्त मिळत असावे का?

आदर्श संकल्पनेची व्यवहार्यता
स्वातंत्र, समता हे आदर्श स्थितीचे पहिले निकष आहेत. आदर आणि प्रेम हे त्यानंतरचे दोन आहेत. वरची आदर्श संकल्पना मांडतानाची मूळ समस्या ही आहे कि या चार संकल्पना आणि त्यांचे सर्व उपप्रकार सर्वत्र आणि सर्वांना लावले तर ते infeasible बनतात. उदाहरणार्थ समता ही कल्पना घेऊ. वास्तविक पाहता २६ जानेवारी १९५२ पासून भारतात सर्वांना दिलेली समता, तिचा काहीच अर्थ नाही. प्रारंभीच्या क्षणालाच इतकी विषमता होती कि नंतर कितीही समता राखली तर हवी तशी स्थिती येत नाही. चला, मानून चलू कि आपल्या सगळ्या प्रयत्नांना यश येऊन समता येणार आहे. संपत्तीची समता घ्या. संपत्ती दरडोई समान असावी कि संपत्ती उत्पन्न करण्याच्या क्षमतेच्या प्रमाणात असावी? बरे, ते कसे मोजणार ? आणि समजा काही ठरलेच तर, प्रत्येकदा जेव्हा अधिकची संपत्ती निर्माण होते, जूनी नष्ट होते, depreciate होते, इ, इ , तेव्हा मोजणार कोण आणि कसे? वितरण कसे करणार? त्याची नियमावली बनवायला गेलो तर लक्षात येईल कि हे सगळे अव्यवहार्य आहे. समता सर्व गोष्टींना आणि पूर्णतः लावणे महाकठीण, अशक्य!

यापुढे जाऊन स्वातंत्र्य आणि समतेचा किस पाडायला गेलो तर त्या परस्परविरोधी संकल्पना निघतात. तसेच प्रेम आणि आदराचेही. तेही सूक्ष्मात नेले तर परपस्परविरोधीच! मी आपल्याला प्रेमाने एकेरी संबोधले तर मी आपल्याला आदर दिला नाही असे आपल्याला वाटणे हे याचे उदाहरण म्हणून सांगता येईल.

पुरोगामीत्वाच्या सीमारेषा
ही अव्यवहार्यता टाळायची असेल तर 'पुरोगत स्थितीच्या' किमान या चार मानकांना व्यवहार्य सीमा घालून देणे गरजेचे आहे. म्हणजे किती समानता पाळायची, किती स्वातंत्र्य द्यायचे हे ठरवायचे, इ. अर्थात ही सीमा प्रत्येकाने ठरवली तर वेगवेगळी निघेल आणि संघर्ष होईल. म्हणून ही सीमा अधिकृत आणि सक्षम अश्या संस्थेने बनवली पाहिजे. ती कालामानाप्रमाणे बदलली पाहिजे.

सद्यस्थिती
आज ज्ञानाच्या प्रत्येक शाखेचा वेगळा असा विस्तार आहे. प्रत्येक शाखेची प्रगती वेगळ्या प्रमाणात झाली आहे आणि वेगळया गतीने होत आहे. ज्ञानाच्या प्रत्येक शाखेचा माणसाच्या जीवनात खूप सहभाग आहे आणि माणसाला जे नवे निर्णय घ्यायचे आहेत त्यातला प्रत्येकात कितीतरी शाखांचा समावेश होतो. घर घ्यायचे असेल इंजिनिअरींग, बँकिंग, इ इ कितीतरी गोष्टींचे ज्ञान लागेल. त्यात काय काय करावे व काय काय करू नये यांची 'एकत्र' सामाजिक किंवा सरकारी पोझिशन कुठेच मिळणार नाही. पण एखाद्या माणसाने त्याच्या सामान्य ज्ञानाने सगळ्या गोष्टी केल्या तर २५ लोक तू हे का नाही केले आणि अजून २५ लोक तू हेच का केले म्हणून त्याला दोन्हीकडून धूणार. पैसे त्याचे, घर त्याचे, ० माणसांची मदत, ५० माणसांचा मार! ५००० वर्षांपासून जर civil engineering चालू आहे तर एका जन्मात एका घरासाठी मी किती तर्क चालवावा? किती विवेक लावावा? किती ज्ञान घ्यावे? किती जवळच्या नाजूक नात्यांशी भांडावे? ही सद्यस्थिती आहे. स्वार्थामुळे वाईट वागणारे बरेच लोक प्रतिगामीत्वाला बळावा देत असावेत, पण त्यांना द्यायच्या तीव्रतेचा मार सर्वांना मिळणे चूक आहे. त्यामुळे पुरोगामीत्वाबद्दल भय उत्पन्न होते. जे सहजाचरण आहे ते एक ओझे बनून जाते. काय, कसे करायचे करायचे ते सांगणार नाही पण चूकलास तर मार खाशील म्हणणारा गुरू कोणालाही नको असतो ना?

नाविन्य आणि परंपरांची भूमिका
नाविन्य आणि पुरोगामीत्वाची गल्लत हे ही आजच्या काळाचे एक लक्षण आहे. हाय फाय मोबाईल घेऊन चालणारी, जीन्स घालणारी स्त्री भयंकर प्रतिगामी व्यक्ति असू शकते. तंत्रज्ञानाची नवी उत्पादने, त्यांचे नवे उपयोग आणि पुरोगामिता यांचा संबंध नाही. पुरोगामिता म्हणजे वरील संकल्पनेला ओळखण्याची आणि तिच्याकडे स्वतःला आणि इतरांना नेण्याची पात्रता. आणि या नेण्याचा अर्थ फरफटणे असा नसणे! परंपरागत मानवी मूल्यांचा त्याग हे ही पुरोगामीत्वाचे दुसरे लक्षण मानले जाते हे अजून एक दुर्दैव. काही पारंपारिक मूल्ये, असू शकते कि, त्या पुरोगत स्थितीशी अगोदरच एकदिक्त झालेली आहेत. शिवाय परंपरा अंध पण तरीही उपद्रवरहित असेल तरीही इतर मोठ्या समस्यांपेक्षा तिच्यावर खूप जास्त फोकस केला जातो.

विज्ञानाची दडपशाही
विज्ञान पुराव्याने सगळे बोलते म्हणून वै़ज्ञानिक दृष्टीकोन असावा, ते मानावे असा एक आजकालचा युक्तिवाद आहे. विज्ञानाने मानवी मूल्यांशी निगडीत एकही विधान केलेले नाही, एकही शोध लावलेला नाही तरीही विज्ञानाचे नियम जबरदस्तीने मूल्यांना लावून वागण्याची वि़ज्ञानांधता बळावली आहे. काय नैसर्गिक आहे आणि काय 'विज्ञानाने शक्य असणार आहे' याचा विचार करायला लावून वि़ज्ञानाने माणसाला जास्त भ्रमित केले आहे. विज्ञान कळायला क्लिष्ट असूनही आणि माणसाची सगळ्या ज्ञानशाखांना समान विश्वासार्ह मानण्याची मूलभूत प्रवृत्ती असूनही विज्ञानाला जास्त मानावे अशी अपेक्षा केली जाते. शिवाय केवळ वि़ज्ञानाला १००% मानून जो रसभंग होतो तो एक महान मेगाक्लायमॅक्स असतो.

कायदा
सध्याला महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला आहे. ज्या ठार अंधश्रद्धा आहेत त्याच तिथे लिहिल्या आहेत. (तत्सम गुन्ह्यांना, जे निव्वळ अंधश्रद्धा नाहीत, सवते कायदे आहेत म्हणून या कायद्यातील गुन्ह्यांत अंध भाग नक्की काय आहे ते नीट कळते.) पण या कायद्याचा मसूदा केवळ ताटातलं मीठ आहे. इतर पक्वान्ने कधी मिळणार? ती कोण देणार? कधी देणार?

पुरोगामीत्वाचे मार्गदर्शक नियम, प्राधान्यानुसार
माणसाच्या वर्तनाचे सगळेच कायदे, नियम, इ पक्के तर जीवन रटाळ होईल अशी भिती साहजिक आहे. पण हा युक्तिवाद एकाच नियमाने हरभर्‍याच्या पीठाचे मिश्रण बनवले तर सारे भजे नेहमी 'त्याच' आकाराचे बनतील असा आहे. मानवी मूल्यांचे, वर्तनांचे वैविध्य अफाट आहे, छोट्याश्या दिशादर्शनाने ते कमी होणार नाही. वैविध्याच्या नावाखाली प्रतिगामीतेला पाठबळ दिले जाते.

१. तत्त्व म्हणून स्वतःला पुरोगामी बनवणे थांबवावे.
२. पुरोगाम्यांचे अगोदरच मार्गदर्शन घ्यावे. नंतर त्यांना टीकेस मज्जाव करावा.
३. स्वतःची वैचारिक, प्रापंचिक मर्यादा स्वीकारावी.
४. आपले पुरोगामी असणे हे तज्ञांकडून तपासून घ्यावे.
५. विज्ञानाने पुराव्याने दिलेल्या कोणत्याही सत्यास खोटे मानू नये.
६. परंपरा निष्कारण सोडू नयेत.
७. सामाजिक नावीन्य , झेपले तर, पूर्णत: अंगिकारावे
८. स्वतःच्या आणि इतरांच्या प्रेम, आदर, स्वातंत्र्य आणि समता यांना बाधा आणतील असली सगळी मूल्ये त्यागावी.
९. स्वतःचे, पटलेले वेगळे विचार मांडावेत.
१०. व्यवहार्य असेल तर अशा विचारांनी काम करावे.
११. आर्थिक, मानसिक, शारीरिक, इ , इ स्पष्ट नुकसान करणार्‍या सगळया परंपरा पर्यायी नाविन्य उपलब्ध असेल तर त्यागाव्यात.

अर्थात ही यादी आणि प्राधान्य अचूक देण्याची माझी पात्रता नाही हे वेगळे सांगायची गरज नसावी.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
1.333335
Your rating: None Average: 1.3 (3 votes)

प्रतिक्रिया

माझाच बराच जुना लेख आठवला.

त्यावरचे वाचकांचे प्रतिसादही वाचनीय आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेखाचा दुवा दिल्याबद्द्ल आभार. लेख आणि प्रतिक्रिया खरेच रोचक आहेत. गेल्या काही दिवसातल्या चर्चांमध्ये मोडकांची उणीव भासत होती, त्यांच्या जुन्या प्रतिक्रिया वाचून ती काही अंशी पूर्ण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वप्रथम डिस्क्लेमरः पुढिल प्रतिसादात मी जे "अभिजन" आणि "बहुजन" हे शब्द वापरणार आहे त्यांचा संबंध कोणत्याही विवक्षीत जाती/धर्मांशी नाही.
=====

उत्क्रांतीचा सिद्धांत मानला तर पुरोगामीत्व माणसाचा नैसर्गिक गुणधर्म असायला हवा.

सहमत आहे. आणि तसा तो आहे.

साधारणतः सर्व मनुष्य उत्क्रांतीच्या एकाच मैलाच्या दगडावर येऊन थांबले आहेत हे एक मोठे गृहितक आहे.

असे अजिबात नाही. हे गृहितक असते तर पुरोगामी आणि प्रतिगामी असे तट पडले नसते.

माझ्यामते पुरोगामीत्त्व म्हणजे काय तर माणसाने स्वतःवर घालून घेतलेल्या मर्यादांपैकी ज्या मर्यादा काळाच्या कसोटीवर निरूपयोगी ठरत चालल्या आहेत किंवा अन्यायकारक ठरत चालल्या आहेत त्यात बदल घडवण्याच्यादृष्टीने स्वतःमध्ये घडवलेला बदल. ज्या व्यक्ती असे बदल स्वतःमध्ये घडवू शकतात त्यांना पुरोगामी म्हटले जाते. अर्थातच पुरोगामीत्त्व ही तुलनात्मक गोष्ट आहे. कारण यात सद्य परिस्थितीत घडवू पाहिलेला बदल अपेक्षित आहे.

पुरोगामी व्यक्तींना अभिजनवर्गही अनेकदा म्हटले जाते. आणि समाजाच्या प्रगतीसाठी पुरोगामी म्हणा अभिजन म्हणा अश्या वर्गाची गरज असते. पुरोगामी वर्ग नव्या वाटांना शोधतो, जुनी कुंपणे/मर्यादा बदलतो व नव्या वाटांवरून चालून दाखवतो. (कारण पुरोगामी म्हणजे इतरांत बदल घडवण्यापेक्षा स्वतःत बदल घडवू पाहणारा) अर्थातच इतरांना त्या बदलाचे सकारात्मक परिणाम जाणवले किंवा आधिच्या मर्यादांच्या फोलपणाची जाणीव झाली की उर्वरीत समाज ज्याला बहुजन वर्ग म्हटले जाते पुरोगामीत्वाचे अनुकरण करतो. मात्र तोपर्यंत काळही पुढे सरकला असतो, परिस्थितीत पुन्हा चांगले/वाईट बदल झाले असतात. नव्या बदलेल्या वाटांवरची नवी आव्हाने समोर आली असतात आणि त्यामुळे पुरोगामी मंडळी पुन्हा आधी स्वतःच बदलेली कुंपणे पुन्हा बदलु पाहतात. हे चक्र चालूच राहते आणि त्यातूनच अख्खा समाज बदलत राहतो.

ज्या ज्या समाजात पुरोगामी वर्ग नाहिसा झाला त्या समाजाची बदल घडवण्याची क्षमता संपली आणि तो समाज कालांतराने नाहिसा झाला किंवा अत्यल्प प्रमाणात राहिला.

केवळ उदाहरण द्यायचे तर पारशी समाजाचे देता येईल किंवा आदिवासी समाजाचेही देता येईल. स्वतःत बदल घडवता न येणार्‍या समाजाचे टिकणे कठिण होत जाते. उलट हिंदु समाजाकडे बघितले तर त्यात सतत बदल होत आहेत, अनेक कालबाह्य प्रथा त्या समाजातील पुरोगामी व्यक्तींनी स्वतःपुरते बदलले मग समाजाने बदलले. हे चालतच राहणार आणि चालतच राहिले पाहिजे.

बाकी विज्ञान, धर्म वगैरे गोष्टी आणि पुरोगामित्त्व यांचा थेट संबंध नाही. अत्यंत धार्मिक व्यक्तीसुद्धा पुरोगामी असु शकते आणि विज्ञानाशी दररोज संबंध येणार्‍याव्यक्ती प्रतिगामी असूच शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

साधारणतः सर्व मनुष्य उत्क्रांतीच्या एकाच मैलाच्या दगडावर येऊन थांबले आहेत हे एक मोठे गृहितक आहे.

असे अजिबात नाही. हे गृहितक असते तर पुरोगामी आणि प्रतिगामी असे तट पडले नसते.

अधोरेखित विधान हे जीवशास्त्रीय विधान आहे. चिंपाझी आणि माणूस यांत ०.०४% गुणसूत्रीय फरक असतो जो त्यांच्या पृथ्वीवरील जीवनातील फरकास जबाबदार आहे.

मानव माकडापासून झाला. आज मानवांचे वेगवेगळे वंश आहेत तसे त्या काळी, ज्या माकडांपासूनपासून माणसे तयार झाली त्या माकडांचे वेगवेगळे वंश असण्याची शक्यता आहे. मागे जाऊन असेही म्हणता येईल की प्रत्येक मानवसमूहाचा (वंशाचा शब्द अपर्याप्त आहे) मूळ अमिबाच वेगळा असेल आणि असे अमिबे बर्‍यापैकी वेगवेगळ्या उत्क्रांतीच्या सायकल्समधून आले आहेत.

त्यावरही जाऊन प्रत्येक माणसाचा जेनेटीक मेक-अप वेगवेगळा असणे हे त्यांच्याकडून समान वर्तनाची अपेक्षा न करण्यास पर्याप्त असू शकते. (The difference in the genetic setup may be sufficient reason not to expect the same/similar level of cognitive advancement even in the same set of people.)

ही सर्व जर तारी भाषा आहे म्हणून गृहितक म्हटले आहे.

(व्यक्तिशः उत्क्रांतीवर माझा विश्वास नाही. निसर्गा(?)कडे (जर काळ आहे तर) प्रारंभीच भौतिक विश्व असावे का नसावे याची हो, नाही आणि अन्य शक्य अशी ऑप्शन्स होती. पैकी नाही सोडून कोणतेही ऑप्शन स्वीकारायला (कुणी?) इतर अनंत प्रश्न उद्भवतात. उदाहरणार्थ हो तर का असावे, कसे असावे, कशाचे कसावे, इ, इ. मग ते सगळे प्रश्न सोडवूनच (bottom-up approach) 'हो' म्हणावे लागेल. शेवटी इथे भयंकर subjectiveness येतो. What (who शब्द टाळला आहे.) wields this subjectiveness? याचे उत्तर काहीच नाही असे आहे. म्हणजे effectively नाही हेच ऑप्शन. उत्क्रांतीच्या शक्यतांच्या गुणाकारात पहिलाच value शून्य आहे. नमनालाच घडाभर तेल. पुढील चर्चेला अर्थ उरत नाही. तरीही करायचा प्रयत्न केला तरी या सिद्धांताची 'महाहास्यस्फोटात्मक' विधाने पाहून मन विरून जाते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अधोरेखित विधान हे जीवशास्त्रीय विधान आहे

ओके. या विधानाशी असहमती बर्‍यापैकी मागे घेतो. Smile

तरी उर्वरित प्रतिवाद अजूनही लागु आहेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उर्वरित भागात कुठे प्रतिवादच नाही. We are on the same platform.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरेच्या! मग मला तुमचे लेखन कळलेच नाही बहुदा Sad
असो, माझ्या आकलनशक्तीची मर्यादा असावी - आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शालजोडीतले द्यायला सकाळपासून मीच भेटलो का हो आपल्याला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लेख नीटसा कळला नाही. अधूनमधून सहमत झालो, अधूनमधून अचंब्यात पडलो. बहुधा 'पुरोगामी म्हणजे काय?' या प्रश्नाचं लेखकाच्या मनात नक्की काय उत्तर आहे हे न कळल्यामुळे सगळा लेख कुठच्या पायावर उभा करायचा ते कळलं नाही.

४. आपले पुरोगामी असणे हे तज्ञांकडून तपासून घ्यावे. - हे आवडलं.
१. तत्त्व म्हणून स्वतःला पुरोगामी बनवणे थांबवावे. - हे का ते कळलं नाही.

काही वाक्यं स्वीपिंग स्टेटमेंट्स म्हणून, काहींचा रोख कळला नाही म्हणून तर काही निखालस चूक आहेत म्हणून खटकली.

उत्क्रांतीचा सिद्धांत मानला तर पुरोगामीत्व माणसाचा नैसर्गिक गुणधर्म असायला हवा. जसा जसा काळ पुढे लोटेल तसे तसे उत्क्रांतीच्या वरदानांनी मानवाचे जीवन एका आदर्श स्थितीकडे आपोआप लोटले जाईल.

उत्क्रांतीमुळे 'आदर्श मानव' किंवा 'सुधारित मानव' तयार होईल याची तीळमात्र खात्री नाही. पुन्हा, पुरोगामित्वाची व्याख्या स्पष्ट नाहीत, तरी तुम्ही निर्देश केलेल्या समता, बंधुता या आधुनिक पुरोगामित्वाच्या कल्पना या उत्क्रांतीच्या सर्वसाधारण बळी तो कान पिळी या धारणेशी सुसंगत नाहीत. याचा अर्थ निःस्वार्थीपणा उत्क्रांतीतून निर्माण होतच नाही असं नाही, पण गेल्या काही शतकांत पुरोगामित्वातून जे बदल झाले आहेत ते जनुकीय नसून सामाजिक बदल आहेत.

परंपरागत मानवी मूल्यांचा त्याग हे ही पुरोगामीत्वाचे दुसरे लक्षण मानले जाते हे अजून एक दुर्दैव.

हे लक्षण तुम्ही मानता, की तथाकथित पुरोगामी मानतात, की एकंदरीत समाज मानतो हे स्पष्ट नाही,

विज्ञानाने मानवी मूल्यांशी निगडीत एकही विधान केलेले नाही, एकही शोध लावलेला नाही तरीही विज्ञानाचे नियम जबरदस्तीने मूल्यांना लावून वागण्याची वि़ज्ञानांधता बळावली आहे.

एकही विधान न करणं, जबरदस्ती, विज्ञानांधता हे अजिबात पटलं नाही. खालील लेख वाचावा ही विनंती.
www.newrepublic.com/article/114127/science-not-enemy-humanities

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख नीटसा कळला नाही. अधूनमधून सहमत झालो, अधूनमधून अचंब्यात पडलो. बहुधा 'पुरोगामी म्हणजे काय?' या प्रश्नाचं लेखकाच्या मनात नक्की काय उत्तर आहे हे न कळल्यामुळे सगळा लेख कुठच्या पायावर उभा करायचा ते कळलं नाही.

मी काही गोष्टी पुन्हा लिहितो.

१. दोन पिढ्यांमधील पुरोगामीत्वाची तुलना करताना उत्क्रांतीचा वेगवेगळ्या ट्प्प्यावरील पिढ्या निवडू नयेत.

२. दोन व्यक्तिंमधील पुरोगामीत्वाची तुलना करताना आतापर्यंत सर्व मानवांचा समान 'नैसर्गिक' विकास झाला आहे हे थोडे बोल्ड गृहितक असू शकते.

३. नैसर्गिक विकासाच्या एका विशिष्ट टप्प्यावर मानवजातीची आपल्या सर्वात सुखी किंवा आदर्श स्थितीची, क्षमतेची एक कल्पना असते. ही पुरोगत स्थिती.

४. वै़ज्ञानिक, मानवतावादी, तत्त्वज्ञानी, सामाजिक नेते ही स्थिती नक्की कशी असते ते एकमताने सांगतात. सामान्य लोकांचा यात सहभाग कमी असतो कारण मुद्दे भयंकर किचकट असतात.

५. या स्थितीची, तिथे कसे जायचे याची साधारण कल्पना असणे म्हणजे पुरोगामिता, आणि *प्रत्यक्ष जाण्याची धमक/कृती म्हणजे पुरोगामीत्व.

६. सर्व प्रकारचे आणि सर्वांना लावलेले स्वातंत्र्य, समता, प्रेम, सन्मान यांचे समाजात स्वरुप कसे आहे हे पुरोगत स्थिती ओळखण्याचे निकष आहेत. Hoever, absolute freedom, equity, love and respect for everyone everywhere are inherently contradictory to each other. म्हणून ते अव्यवहार्य आहेत. त्याकरिता त्यांना राबवायचे असेल तर सीमा घालून देणे गरजेचे आहे. या सीमा पून्हा प्रत्येक व्यक्तिने ठरवल्या तर त्या फारच भिन्न निघतील. म्हणून सक्षम अश्या संस्थेनेच त्या ठरवाव्यात आणि 'व्यवहार्य पुरोगत स्थिती' वर्णन करावे.

याचे उदाहरण - नागरीकाने शिकावे अशी सरकारची अपेक्षा असते. त्यात सरकारचे प्रेम (कर्तव्य म्हणा), आदर (सेवक म्हणून) आणि नागरीकाचे स्वातंत्र्य (मला नाही शिकायचं, तुम्ही कोण?) यांचे द्वंद्व असते. सरकार आणि नागरिक नक्की कोणत्या स्वभावाचे आहेत, काय करताहेत यावरून इतरही संघर्ष उद्भवतात. इथे नागरीक कोठपर्यंत नाही म्हणू शकतो आणि सरकार कोठपर्यंत शिक्षण लादू शकते याची 'मार्गदर्शक तत्त्वे' या संस्थेने बनवावी. उगाच अशा प्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या प्रमुखांना मूल निवास्यांची माफी मागायला लागली तिथपर्यंत प्रकार जाऊ नये.

समाज सुधारणे हा वार्‍यावर सोडलेला प्रकार नसावा. It should an organized, deliberate, conscious, objectively oriented, centrally coordinated and institutional effort.

७. अशी मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे कायदा नव्हे. कायदा वेगळा.

८. समाजाने अशी तत्त्वे स्वीकरली तर जीवन बोर होणार नाही. आजही हजारो इतर स्रोतांकडून आलेली तत्त्वे आहेत आणि जीवनात प्रचंड वैविध्य आहे.

९. अशी तत्वे वाचणे, शिकणे, रेफर करणे म्हणजे पोथी वाचणे असे काही लोकांना वाटेल. या पेक्षा स्वतःचे डोके लावणे बरे असा प्रतिवाद होईल. मानवी जीवनाच्या सर्व अंगाविषयी आज पावेतो मानव समाजाने प्राप्त केलेल्या सर्व उपयुक्त ज्ञानाची प्राप्ती, तिच्यावर विचार करणे, त्याच्यातून योग्य निष्कर्ष काढणे याची अपेक्षा प्रत्येकाकडून करणे अव्यवहार्य आहे, अशक्य आहे. आपले उद्दिष्ट 'सगळया' लोकांचे 'सर्व प्रकारे' पुरोगामी वर्तन हे आहे.

१०. सद्य स्थिती आणि पुरोगत स्थिती या खूप भिन्न आहेतच, नेते कोण आहेत आणि त्यांची काय मते आहेत याचीही धड कल्पना येत नाही. सगळा सावळा गोंधळ आहे. लोक स्वतःच्या मर्यादित क्षमतेत पुरोगामी बनू पाहत आहेत, तसे इतरांना बनवू पाहत आहेत, इतर तसे नाहीत म्हणून टीकाही करत आहेत.

११. इथे मांडलेली एका संस्थेची संकल्पना खूपच प्रिमिटीव आहे. निकषांचे चयनही तसेच असू शकते. हे एकूण मॉडेलच अत्यंत प्राथमिक रुपात आहे आणि म्हणून किंवा अन्यथा त्याची काही उपयुक्तता नाही.

१२. Outside the context of this write-up, for all practical purposes, ऋषिकेशजी म्हणतात त्याप्रमाणे आजमितीला तरी 'स्वतः' पुरोगामीत्व ठरवल्याशिवाय गत्यंतर नाही.

हे सगळे एका वाक्यात बसवले तर कंटेंट लॉस होतो, म्हणून टाळले आहे. शिवाय तसाही मी 'इति गुह्यतमम् शास्त्रम्' म्हणून माझ्या मांडणीचा कुख्यातपणा खपवण्यात आतापावेतो ऐसीवर प्रसिद्ध झालो आहे.

बाकी मुद्दे पून्हा वेळ मिळाल्यावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१. दोन पिढ्यांमधील पुरोगामीत्वाची तुलना करताना उत्क्रांतीचा वेगवेगळ्या ट्प्प्यावरील पिढ्या निवडू नयेत.

उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावरच्या म्हणजे काय? उत्क्रांतीच्या बदलांचा वेग सामाजिक बदलांच्या वेगाच्या तुलनेने इतका कमी असतो की जैविकदृष्ट्या गेल्या पाचशे वर्षांत काहीही बदल झालेला नाही असं म्हणता येईल. वेगवेगळ्या उत्क्रांतीच्या टप्प्यांवर असलेल्या व्यक्ती अगर समाजाची उदाहरणं दिल्यास अधिक स्पष्ट होऊ शकेल.

२. दोन व्यक्तिंमधील पुरोगामीत्वाची तुलना करताना आतापर्यंत सर्व मानवांचा समान 'नैसर्गिक' विकास झाला आहे हे थोडे बोल्ड गृहितक असू शकते.

'नैसर्गिक विकास' म्हणजे काय? वर नोंदलेल्या उत्क्रांतीच्या टप्प्यांशी त्याचा काही संबंध आहे का? वेगवेगळा नैसर्गिक विकास झालेल्यांची उदाहरणं दिलीत तर समजायला मदत होईल.

पहिल्या दोन वाक्यांतच अडखळल्यामुळे पुढच्या परिच्छेदांबाबत चर्चा करणं उचित समजत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्क्रांतीच्या बदलांचा वेग सामाजिक बदलांच्या वेगाच्या तुलनेने इतका कमी असतो की जैविकदृष्ट्या गेल्या पाचशे वर्षांत काहीही बदल झालेला नाही असं म्हणता येईल.
आणि
परंतु उत्क्रांतीच्या परिणामांनी होणारा एखादा छोटासाही बदल दॄश्य स्वरुपात प्रगट होण्यासाठी लागणारा काळ हा मोजक्या पिढ्यांच्या माळेच्या जीवनकाळाच्या तुलनेत हजारो पट असतो. (मूळ लेखातील तिसरे वाक्य)
एकच आहे.

वेगवेगळ्या उत्क्रांतीच्या टप्प्यांवर असलेल्या व्यक्ती अगर समाजाची उदाहरणं दिल्यास अधिक स्पष्ट होऊ शकेल.

आपण सहसा पहिल्यांदा माझा शेजारी कसा प्रतिगामी आहे हे ठासून सांगतो. मग बाप आणि आजोबा. मग मागे मागे जात स्वातंत्र्यकालची पिढी, टिळकांची पिढी, पेशवे, मुघल, गझनी, इस ० ते १००० (हिंदू?), बुद्ध, जैन, वैदिक काल, वेद पूर्व काल या सर्वांमधले लोक कसे कसे मागासलेले होते ते सांगतो. हे सर्व ठीक आहे. काही लोक काळात खूप मागे जाऊन http://en.wikipedia.org/wiki/Human_evolution वर दिलेल्या ट्प्प्यांना हिणकसपणे मागास/रानटी म्हणताना पाहिले आहेत. असू शकते कि त्यांना असलेल्या बुद्धीच्या मानाने ते फार प्रगत असतील. कदाचित असू शकते कि ते आपल्या बुद्धीच्या लिमिटला आले म्हणून आजचा अधिक बुद्धी असलेला मानव उत्पन्न झाला*. त्यांना 'लौकिकार्थाने(?)' मागास म्हणणे चूक वाटते.

वेगवेगळा नैसर्गिक विकास झालेल्यांची उदाहरणं दिलीत तर समजायला मदत होईल.

समजा मी पुरोगामी आहे. तर माझा भाऊ, बहिण, शाळेतला मित्र, कामाच्या गावाचा मित्र, इंग्लंडमधला गोरा मित्र, नॅशनल जिओग्राफिकवर दिसणारा झाडावर राहणारा पापूआ न्यू गिनिआ मधला माणूस हे सारे पुरोगामीच असावे का? मी, भाऊ, बहिण ठीक आहे. पण बाकी डाउट आहे. 'माणूस अमूक वर्षांपूर्वी आफ्रिकेतून आला' हे सांगतानाच विज्ञान बाजूला एक तळटीप ठोकून देते. ती अशी - Newer evidence does not preclude multi-geographical, multi-original (अनेक स्रोतांचा), separate origins of humanity. इथून घोळ चालू होतो. पूर्णतः सारखी दिसणारी माणसे (जुळी नाही म्हणायचं मला) सूक्ष्मात बरीच भिन्न असू शकतात. वर दिलेल्या दुव्यात पापुआ न्यू गिनिआ मधल्या लोकांत कुरु सारख्या जीवघेण्या रोगाशी लढायची नैसर्गिक प्रतिकारक्षमता आहे असे लिहिले आहे. इतरत्र तो रोग नाही आणि तशी प्रतिकारक्षमता पण नाही. गेल्या १०००० वर्षात माणूस इतर प्राण्यांचे दूध पिऊ लागला म्हणून बालपणातच संपणारे लॅक्टेज हे एन्झाइम आता खूप काळ टिकू लागले आहे असे पण लिहिले आहे. असेच बुद्धीचे झालेले असू शकते.

जगात वेगवेगळ्या त्वचेच्या रंगाचे, केसांचे, उंचीचे मानवसमूह आहेत. इतरही काही गोष्टी असतील. यांचा वेगवेगळा (कमी जास्त नाही म्हणायचे)नैसर्गिक विकास झाला आहे. पण चेतासंस्थेच्या दृष्टीने, खोलात गेले तर, मानवांचा तिथेही वेगवेगळा विकास झालेला असू शकतो.

अगदी त्याच मानवसमूहात काही जनुकीय बदल/फरक काही लोक विशिष्ट 'मानसिक' रोगाचे रोगी असल्याचे कारण असतात असे वि़ज्ञान सांगते. या पुढे जाऊन काही विशिष्ट 'मानसिकते'साठीच जनुके जबाबदार असल्याचे सांगण्यात येते. http://news.bbc.co.uk/2/hi/science/nature/1390375.stm

म्हणून 'पुरोगामी' बनण्यास प्रत्येक जण समान प्रमाणात तयार आहे हे एक गृहितक असू शकते असे मला वाटले आहे.

हुश्श्श!

* अशी घासून बुद्धीमत्ता निर्माण करता येते, उंच झाडाची पाने खावावीशी वाटून मान लांब करता येते, असे उत्क्रांती सांगते.
१ लेखाच्या सुरवातीचे हे दोन पॅरा म्हणजे चंदनवाडीचा पत्ता सांगताना दुधगंगेच्या वर्णनापासून चालू केल्यासारखे आहे. पण लोक चर्चेच्या मधेच कुठेतरी या गोष्टी आणतात म्हणून त्यांना सीमेवर ठेउन 'शोध' योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे.
२. ऋषिकेशना दिलेला प्रतिसादही यात जोडता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

* अशी घासून बुद्धीमत्ता निर्माण करता येते, उंच झाडाची पाने खावावीशी वाटून मान लांब करता येते, असे उत्क्रांती सांगते.

नाही हो. तो जुना लामार्कीयन विचार होता. पानं खावीशी वाटल्यामुळे मान लांब होत नाही.

पुरोगामित्वाचा विचार करताना लाखभर वर्षांपूर्वीच्या मानवाला हिशोबात घेऊ नये हे मान्य. पण पुरोगामित्व म्हणजे काय, किंवा अमुक व्यक्ती, तमुक रूढी पुरोगामी आहे की नाही हे ठरवताना गेल्या काहीशे वर्षांमधलेच निकष लावले जातात. कुठच्यातरी बौद्धिक क्षमतेच्या बाबतीत, सध्या असणाऱ्या मानवांमध्ये तुलनाही करता येऊ नये इतका फरक आहे हे काही पटत नाही. जगभर शिक्षण स्टॅंडर्डाइझ्ड होत चाललेलं आहे, बुध्यांक गेलं शतकभर मोजला जातो. त्यांत काही प्रचंड फरक दिसत नाहीत.

अजूनही पुरोगामी म्हणजे काय याची तुमची व्याख्या माहित नसल्याने अधिक लिहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बुध्यांक गेलं शतकभर मोजला जातो. त्यांत काही प्रचंड फरक दिसत नाहीत.

बहुतेक तुम्हीच मागे कधीतरी लिहिलं होतं असं वाटतंय..आयक्यू वाढतोय म्हणून. माझ्या स्मरणात गडबड असूही शकेल. पण तसे कुठेशी वाचल्याचे पक्के आठवतेय. अर्थात अ‍ॅब्स्ट्रॅक्ट कौशल्यांवर वाढत चाललेली भिस्त याला कारणीभूत आहे असे कारण नक्कीच देता येईल त्यामागे. बुद्ध्यांक वाढला याचा अर्थ बौद्धिक क्षमता वाढली असा नव्हे-इतक्या कमी टाईम फ्रेमबद्दल तर नव्हेच नव्हे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला वाटलंच होतं, कोणीतरी हा मुद्दा काढणार. Smile कालानुरुप फरक आणि एकाच काळात लोकसंख्यांमधला फरक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. माझा मुद्दा असा होता की 'जन्मजात' किंवा 'जनुकीय' फरक फारसे नाहीत. निदान तुलनाच करता येऊ नये इतके तर निश्चितच नाहीत. म्हणजे समजा भारतीयांची सरासरी उंची ५ फूट ६ इंच आहे आणि अमेरिकनांची सरासरी उंची ५ फूट ८ इंच आहे (आकडे साधारण बरोबर आहेत) - तर त्यात मोजण्याइतका फरक आहे, पण जे साम्य आहे त्याद्वारे तुलना निश्चितच करता येते - या प्रकारचा युक्तिवाद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आह तसं होय! मग ठीके, पटेश. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय राव तुमी आयक्यूचं निउन बसलाव? लोकं मनलालेत कि मानसाचं डोस्कं टर्बुजाउन मोट्टं होनाराय!
http://news.nationalgeographic.co.in/news/2012/06/120606-americans-heads...

--बातमीमथळेवाच्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हाहाहा, त्यात गिन्यान किती मावणारे हे अलाहिदा म्हणा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विवेककाकांसाठी माझा हा लेख वर काढत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ओके अरुणकाका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ठीक आहे मनकाका. तुमच्यासाठी काय पण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेघना ताईंचे प्रतिसादाखाली सिग्नेचर

स्वतःला निष्पक्षपातीपणाचे निकष लावण्याची तसदीही न घेता, पुरोगामी लोकांनी मात्र सदासर्वकाळ खुल्या मनाचे, तटस्थ, भावनाविरहित, निष्पक्षपाती असलेच पाहिजे अशा अपेक्षा धरणार्‍या छुप्या ट्रोलांचा मी जाहीर निषेध करत आहे

वाचून गम्मत म्हणून मी लेख लिहिला. आता घरात रिकामाच बसलो आहे. अजून काही सिग्नेचर वाक्यांवर लेख लिहायचा विचार करतो आहे.

भारतीयांसाठी पुरोगामी शब्दाची सौपी व्याख्या.

बहुसंख्याकांच्या आस्थेला ठेस पोहचली पाहिजे अशी विधाने (मला स्वत:पटली नसली तरीही) मी करतो. म्हणजे लोक मला पुरोगामी म्हणतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला पूर्वी वाटत असे बरं का, आपण काय लिहितो-वाचतो-बोलतो म्हणजे काय करतो? काहीसुद्धा करत नाही. नुसती फुकाची चर्चा साली. कृती घडत नाही. वगैरे वगैरे.

पण मग मी पद्मजा फाटकांचा एक अनुभव वाचला. त्यांना त्यांच्या मूत्रपिंडविकारात लोकांनी बरीच आर्थिक मदत केली. तेव्हा पद्मजाच्या 'पुरोगामी', 'स्त्रीवादी', 'आधुनिक', व्यक्तिवादी' विचारांनी पूर्वी कधीतरी बोचकारल्या गेलेल्या कुणीसं विधान केलं, "आता कशाला हवीय म्हणावं मदत? मरून जा की आता गपचूप." ते विधान ऐकल्यावर चिडायच्या वा दुखवलं जाण्याच्या ऐवजी पद्मजाबाईंना एकदम साक्षात्कारच झाला. 'अरेच्चा! म्हणजे आपल्या केवळ 'असण्यानं' बरीच विधायक तोडमोड होतेय म्हणायची!'

तिच्याइतका साक्षात्कारी नाही, तरी त्याच जातीचा अनुभव मला तुमचा प्रतिसाद वाचून आला. 'स्साला! आपल्या क्षुद्र सहीनंही कुणालातरी काहीतरी म्हणावंसं वाटतंय, अं?'

तर, आभारबिभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बापरे असे आभार मानायचे ठरवले तर मला हल्ली इथे हेच एक काम उरेल Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

किती तो आपल्या महत्कार्याचा गायचा सोस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हॅहॅहॅ! आहे खरा. पण काय गायचा सोस म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आपल्या महत्कार्याची महती गायचा हो. अखंड निरर्थक बडबड करून नंतर त्यातूनही काहीतरी साधले आहे असे समाधान, इ इ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

होय, होय. प्रतिसादागणिक माझी खातरी पक्की होत चाललीय. निरर्थक बडबड वाटते तितकी निरर्थक नसते तर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दुसर्‍या वाक्यातलं व्याकरण चुकलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्हांला भाषेकडे इतकं लक्ष द्यायची बुद्धी होऊ लागली हाही माझ्याच बडबडीचा परिणाम (आणि बापड्या भाषेचं उघडलेलं नशीब) असणार बहुतेक! जियो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे मात्र खरं आहे. बहुतेक भाषेच्या बाबतीत आमच्या नेत्रांत अंजन आपणच घातले आहे. नाहीतर आम्ही कुठले लक्ष द्यायला भाषा बिशा विषयाकडे?
--------------
माझं ऐसीवर पदार्पण भाषेची दोर्बल्ये या धाग्याने झालं. त्यात मांडलेल्या मुद्द्यांचं स्वरुप नुसतं अप्रिशिएट करायचा प्रयत्न केला असतात हे वचन मुखी आले नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अहो, मुद्द्यांचं स्वरूप अ‍ॅप्रिशिएट केलं नसतं, तर मुळात तुमच्या नेत्रांत अंजन घालायला हवं आहे, हे तरी मला मेलीला कुठून कळायला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आता मात्र त्या आत्मश्रेष्ठत्वाच्या भावनेची नुसती कीव कीव आणि कीव. (दुर्दैवानं ती करायला माझ्याकडेही आत्मश्रेष्ठत्वाची भावना लागते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कीव कीव कीव आणि टिव टिव टिव यांचे यमक मस्त जुळतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चला, आत्मपरीक्षणालाही मी कारणीभूत झाले म्हणायचे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वर्‍हाड निघालंय लंडनला यातील 'माझ्यामुळं' वाले पात्र आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ए गपा आता!!
पुरोगामित्वाचा शोध --> १ नवीन
असं वाचुन आशेने आता तरी (१ नवीन) शोध लागला असेल म्हणून धागा उघडतो.. पण छ्या इथे नेहमीचीच पकडापकडी चालुये! Wink Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बरं ब्वॉ. पकडापकडीतनं आमी ढीस होतो. बाकीच्यांचं चालूद्या. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दे टाळी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

स्मायली नाय तशी. नायतर दिली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझ्या कंपनीच्या लेटरहेडवर "मला घडवणारी स्त्री" असे प्रमाणपत्र वैगेरे लिहून देऊ का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

होऽऽऽ.. चालेल की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मसुदा पाहा ठिक वाटतो का -

प्रमाणित करण्यात येते कि कुमारी मेघना भुस्कुटे (सुधारिका) यांनी श्रीमान् अरुण भास्करराव जोशी (सुधृत) यांना सर्वार्थाने घडवले आहे. मुख्यतः सुधारिकेने सुधृताची वैचारिक जडणघडण व्यवस्थित करण्यात मोलाचा हातभार लावला आहे. सबब सुधृत सुधारणापूर्ण अवस्थेत होते तेव्हा त्यांचा वैचारिक मागासलेपणा तीव्र स्वरुपाचा होता. त्यांस इसवीसनपूर्व ५००० नंतरचे काही स्मरतही नसे. आता सुधृत क्लिष्टातिक्लिष्ट विषयांबाबत जागरुक बनला असून त्याच्या सामाजिक जाणिवा त्याच्या पुढच्या पिढ्यांनादेखिल २२व्या शतकात जगण्यास पात्र करतील इतपत सुदृढ झाल्या आहेत. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, इ बाबतीत सुधृताचे प्रबोधन अनन्यसाधारण स्तराचे झाले आहे. विश्वातल्या कोणत्याही 'पुरोगामी पिपल्स क्लब' चा अर्ज भरताच श्री. जोशी यांस त्याचे सदस्यत्व ताबडतोब मिळत आहे हा या घडवणूकीचा महद् सर्वात् पुरावा आहे.

मेघनाजींचे कार्य इथेच समाप्त होत नाही. त्यांनी सुधृतास भाषाविषयक जाणिवा उत्पन्न करून दिल्या आहेत. सुधृताच्या सुधारित भाषेचे सर्व श्रेय सुधारिकेस जाते. सुधारिकेच्या भाषेतील कौशल्याकडे पाहून आमच्या कंपनीतील मानव संसाधन विभागाला प्रकर्षाने असे वाटले आहे कि अगदी जगात भाषाच नसती तरी कु. मेघना यांनी एक भाषा उत्पन्न करून श्री. जोशी यांस अ‍ॅडमिनिस्टर केली असती आणि त्यांची भाषा सुधारुनच दाखवली असती.

सबब कु. मेघना यांस सर्वोत्तम सुधारिकेचे व सुभाषिकेचे प्रमाणपत्र बहाल करण्यात येत आहे.

बदल सुचित करावेत ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मसुदा पाहता असं दिसतं की, सुधारणेला अजून खूपच जागा आहे. त्यामुळे मी हे प्रमाणपत्र स्वीकारू इच्छित नाही. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मंजे आत्ताच स्वीकारू इच्छित नाही. राईट?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रत्येक अजोंच्या मागे एक मेघना (हात धुवून लागलेली) असते
ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असं काय मंतो मनोबा? अरे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हणतात. तसा शॉट कमी आहे, पण चुकून माकून मी यशस्वी झालो तर ती स्त्री मेघना! याला तू हात धुवून मागे लागणे म्हणतोस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझ्या कंपनीच्या लेटरहेडवर "मला घडवणारी स्त्री" असे प्रमाणपत्र वैगेरे लिहून देऊ का?

ह्याला प्रतिसाद म्हणून मी ते लिहिलय.
तुम्ही यशस्वी झालात,तर तुम्हाला घडवण्याचं श्रेय नि:संशय मेघुतैंकडेच जाइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पण कधी कधी मला (ऋषिकेश आणि) मेघनाबद्दल सहानुभूती वाटते. म्हणजे त्यांच्या इतक्या प्रदीर्घ संपर्कात राहूनही कोणी पुन्हा माझ्याइतका प्रतिगामी उरलाच तर मग त्या अस्तित्वाचा अर्थ काय? आणि माझं म्हणाल तर पुरोगामी बनणं ही एक इर्रिवेर्सिबल प्रोसेस आहे याची मला कल्पना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही यशस्वी झालात,तर तुम्हाला घडवण्याचं श्रेय नि:संशय मेघुतैंकडेच जाइल.

पन ह्ये सगळं घडलं ते 'सायबांच्या' म्हैला धोर्नामुळंच, बरं का!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जाउ द्या अजो.
आज मेघनाला
"तुम्ही(मेघना) महामूर्ख आहात" असा शेरा देउन टाकुया.
आणि विचारांचा विरोध विचारांनी वगैरे वगैरे लगेच पुढच्याच प्रतिसादापासून ऐकवूया.
मंजूर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कोणाच्या बुद्धिवर शेरा देण्यास मी अपात्र आहे. मलाच काही येत नाही तर लोकांना काय सांगा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मेघना ताई, हलक्या फुलक्या लेखाला आपण फारच गंभीरपणे घेतल आहे.

२०-२५ दिवसांनतर कार्यालयात जायला सुरुवात केल्यावर पुन्हा लिहायला आणि वाचायला वेळ मिळेल कि नाही सांगता येणार नाही. (अच्छे दिन आलेले आहे) तो पर्यंत किती वेळ बिछान्यावर झोपून काढणार, शिवाय ३-४ दिवसांपासून पाउस सुरु असल्या मुळे बाहेर ही फिरायला जाणे होत नाही. पण चिंता नका करू आणखीन काही सिग्नेचर वाक्य शोधून ठेवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0