छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग २ : राग

जॉनथन क्लार्क अँड मिस्टर नोरेल या अद्भुत कादंबरी मधे एके ठिकाणी जादू मुळे इंद्रियांचा घोळ होतो: "...by a curious twist of their senses, as if they had tasted a string quartet, or as if they had been deafened by the sight of the colour blue." संगीताची चव लागते, रंगाच्या कानठाळ्या बसतात. ह्या ओळी खूप वर्षांपूर्वी वाचल्या, पण मनात टिकून आहेत. दृश्य माध्यम अन्य इंद्रियांना कसे टिपू शकते? सहज सुचणारी उदाहरणं म्हणजे गंध = फुलाचे चित्र (अथवा कचराकुंडीचे), स्पर्श = पोत, जवळीक, चव = गरमागरम खाद्यपदार्थाचे चित्र, ध्वनी = गायक, वाद्य, खळखळणारा ओढा, वगैरे.

पैकी शेवटचा, ध्वनी, हा मला तरी सर्वात रोचक, आव्हानात्मक वाटतो. विशिष्ट स्वरांना बोलक्या चित्रात कसे पकडता येईल?

तर या आव्हानाचा विषय: राग. म्हणजे संगीतातले राग. रागांचे प्रहरांशी, ऋतुचक्राची नातं आहेच. आपल्याकडे जुन्या रागमाला चित्रांची परंपरा देखील आहे.

आधुनिक जगात, आपल्या परिसरात रागांच्या प्रतिमा दिसतात का? तर मग येऊ द्यात रागांची आधुनिक चित्रं. चित्राबरोबर रागाचे नाव अपेक्षित आहेच, पण चित्राला साजेशी एखाद्या बंदिशीचे अथवा गाण्याचे रेकॉर्डिंग जोडले तर उत्तम.

नियमः

१. केवळ स्वतः काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.

२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल.

३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)

४. आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट २५ जुलै रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. २६ जुलै रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.

५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.

६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.

७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.

८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.

९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.

१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

आव्हानच आहे म्हणायचे, अधिक(माहिती) तपशीलात जात हे राग विषयाची मुख्य यादी म्हणून चालावेत.

Six are male (parent) ragas; the thirty raginis are their wives and the remaining forty-eight are their sons. These are listed is as follows:
(1) Parent Raga: Bhairav raga
Wives: Bhairavi, Bilawali, Punyaki, Bangli, Aslekhi. Sons: Pancham, Harakh, Disakh, Bangal, Madhu, Madhava, Lalit, Bilaval.
(2) Parent Raga: Malkaus raga
Wives: Gaundkari, Devagandhari, Gandhari, Seehute, Dhanasri. Sons: Maru, Mustang, Mewara, Parbal, Chand, Khokhat, Bhora, Nad.
(3) Parent Raga: Hindol raga
Wives: Telangi, Devkari, Basanti, Sindhoori, Aheeri. Sons: Surmanand, Bhasker, Chandra-Bimb, Mangalan, Ban, Binoda, Basant, Kamoda.
(4) Parent Raga: Deepak raga
Wives: Kachheli, Patmanjari, Todi, Kamodi, Gujri. Sons: Kaalanka, Kuntal, Rama, Kamal, Kusum, Champak, Gaura, Kanra [36].
(5) Parent Raga: Sri raga
Wives: Bairavi, Karnati, Gauri, Asavari, Sindhavi. Sons: Salu, Sarag, Sagra, Gaund, Gambhir, Gund, Kumbh, Hamir.
Diablo Parent Raga: Megh raga
Wives: Sorath, Gaundi-Malari, Asa, Gunguni, Sooho. Sons: Biradhar, Gajdhar, Kedara, Jablidhar, Nut, Jaldhara, Sankar, Syama.

अवांतर - पुरूष प्रधान संस्कृती रागातही अढळते हे राग आणण्यास पुरेसे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे जुने वर्गीकरण आहे. यातले अनेक राग आजकाल प्रचलित नाहीत किंवा नावे जुनी असली तरी रागस्वरूपे पूर्ण भिन्न आहेत. नवीन वर्गीकरण कै. पं. वि. ना. भातखंड्यांच्या 'थाट पद्धती'प्रमाणे होते (साधारणपणे. त्यातही अनेक दोष आहेत. आपल्याकडचे वर्गीकरण कर्नाटकी संगीतातल्या पूर्णपणे पर्म्यूटेशन काँबिनेशनवर आधारित पद्धतीसारखे होत नाही. का ते भातखंडेच जाणोत).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदनच्या धाग्यातची चित्र पाहताना भीमसेन यांचा मिया मल्हार सारखा आठवत होता. उमड-घुमड ढगांना खेचून आणणारे त्यांचा आवाज आणि त्यांचे डोळे...

मग वाटले, उलट होऊ शकते का? म्हणून हा प्रयोग.

प्रहरांशी रागांचा संबंध असल्यामुळे काही लिंका लागाव्यात. तोडी ऐकला की पहाटेच्या वेळी गावातलं धुकं, पूर्वेकडे निघालेल्या गायींच्या पायांमधून दिसणारी सूर्यकिरणे, नागमोडी वळणाचा लाल मातीचा रस्ता.... असं काही मला सुचतं. मल्हार = पाऊस, किंवा दीपक = ग्रीष्म ही कॉमन समीकरणं आहेत, पण भूपाळीच्या वेळी तिन्हीसांजेचे धुरकट, रस्त्यावरचे दिवे टिमटिमायला लागलेले शहरी वातावरण डोळ्यासमोर येतो. या मागे काही वैयक्तिक अनुभव असतात, काही कल्पनेचा भाग. असे किती संदर्भ लागू शकतात हे पाहण्याची उत्सुकता आहे. फोटो देणार्‍यांनी दृश्य निवडण्यामागची कारणं दिलीत तर उत्तमच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यात बराच घोटाळा वाटतो. भूपाळी मध्ये भूप राग वापरलेला असतो म्हणतात.
पण भूप हा उत्तररात्रीचा वगैरे म्हणूनही गणला जातो. पण सकाळी सकाळी भूप रागातली बरीच गाणी असतात.
नक्की घोळ समजत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मुद्दा असा आहे की तुमचे छायाचित्र आणि तुमचे त्यामागचा तुम्हाला वाटणार्‍या रागासंबंधी विचार हा महत्त्वाचा, ते तांत्रिकदृष्ट्या अचुक असलेच पाहिजे असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भूपाळी मध्ये भूप राग वापरलेला असतो म्हणतात.

असेच काही नाही. भूपाळी हा गाण्याचा / रचनेचा प्रकार आहे (जशा, गझल किंवा ठुमरी) जो सकाळच्या वेळी राजा/देव वगैरेंना उठवण्यासाठी रचला गेला असावा (नक्की ठाऊक नाही). भूप रागालाही उत्तरेत काही लोक भूपाली म्हणतात (का ते माहित नाही, कदाचित भूप हा राग की रागिणी यात मतभिन्नता असावी).

पण भूप हा उत्तररात्रीचा वगैरे म्हणूनही गणला जातो

रात्रीचा पहिला प्रहर. साधारण ७-८ वाजण्याच्या सुमारास. अगदी तिन्हीसांजेलाही भूप जरा डल वाटतो. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे दिवेलागणीची वगैरे वेळ बरोबर आहे. एकदा एखादा चांगला भूप ख्याल-चीजेसहित ऐकून बघा, लक्षात येईल. भूपासारखेच स्वर असणारा 'देसकार' नावाचा राग आहे, जो सर्वसामान्य लोकांना भूपच वाटतो. तो सकाळी गातात/वाजवतात. अर्थात दोन्ही रागांच्या प्रकृतीत बराच फरक आहे. त्यात आणि भूपात बरेच लोक गल्लत करतात. साधं उदाहरण द्यायचं तर भूप = 'घन:श्याम सुंदरा' आणि देसकार = 'प्रिये पहा'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तोडी ऐकला की पहाटेच्या वेळी गावातलं धुकं, पूर्वेकडे निघालेल्या गायींच्या पायांमधून दिसणारी सूर्यकिरणे, नागमोडी वळणाचा लाल मातीचा रस्ता.... भूपाळीच्या वेळी तिन्हीसांजेचे धुरकट, रस्त्यावरचे दिवे टिमटिमायला लागलेले शहरी वातावरण डोळ्यासमोर येतो. या मागे काही वैयक्तिक अनुभव असतात, काही कल्पनेचा भाग. असे किती संदर्भ लागू शकतात हे पाहण्याची उत्सुकता आहे.
............. हाय ! कहाँ थी आप जेंव्हा आमचे हे पाक्षिक आव्हान प्रतिसादांविना ओस पडले होते ? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटलं चिडलेल्या व्यक्तींचे (उदा. बायकोचे) वगैरे फोटो टाकायचे आहेत की काय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला. आमच्यासारख्या रागनिरक्षरांची तर गोचीच झाली की ओ. पण पाश्चात्य संगीत अधनंमधनं ऐकून काही फटूंशी ते कोरिलेट होत असल्यास ते टाकले तं चालतीन का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तानसेन, कानसेन किंवा सुष्मिता सेन या "सेन" मंडळींशी माझा कसलाही संबंध नाही. तरीही, केवळ रागाशी नामसाधर्म्य असलेले छायाचित्र स्पर्धेसाठी देत आहे.

YouTube वर समर्पक व्हिडिओ शोधण्याचा प्रयत्न केला असता शाहिदा परवीन यांची "दीपक राग है चाहत अपनी" ही गझल सापडली आणि आवडली (या निमित्ताने काहीतरी नवे ऐकता आले... हेही नसे थोडके!). प्रत्यक्षात राग कुठला आहे ते माहित नाही.

तांत्रिक तपशीलः
कॅमेरा : Pentax K-x
भिंग : Pentax ५५-३०० मि. मि.
F Stop: 5.6
Exposure: 1/15 s
ISO: 200
Focal Length: 190mm
Flash mode: No Flash
स्थळः नेरुळ, नवी मुंबई

रागांसंदर्भात काही "इंटरेश्टिंग" माहिती मिळेल का हे शोधले असता, एका फारिनच्या इसमाचे संकेतस्थळ सापडले. त्यातिल उतारा येथे देत आहे -

There are many stories in India that tell of the magical influences of music. Another story concerns the raga called dipak. In Indian music, a raga is based on a set scale, or set of scales, and is a musical formula on which compositions or improvisations can be based. Dipak is one of the ragas from ancient times.
Raga dipak is not played by musicians in India because it is the fire raga. It is said that if it is played, fire will be invoked. There are many stories circulating in India that tell of fire breaking out when the raga was played. One musician performed the raga in a shoulder-length depth of water, hoping to avoid all of the possible consequences of his performance. However, the flames soon began to rage all about him, and he supposedly boiled to death.
Our story tells of one of the great kings in India who wanted to verify for himself that the stories about raga dipak were true. He was the great King Akbar. He ordered his famous court musician, Tansen, to play raga dipak for him. When Tansen began playing the raga, the palace around them began to burst into flames. A young maiden happened to be walking by and saw what was taking place. She quickly began singing raga mahlar, the raga that brings on the rains, and a great storm appeared in the skies and extinguished the flames.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला रागांचे ज्ञान नाही या निमित्ताने काही महत्त्वाचे राग रागावतात तसे कसे हे कळावे! Wink
कल्पक विषयाबद्दल आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Sight, hearing, smell, taste, touch हे वेगवेगळे senses आहेत आणि नाक, कान, डोळे, त्वचा या इंद्रियांची कामे वेगवेगळी आहेत.
हा विषय म्हणजे एखाद्या वाईनटेस्टरला वाईनच्या ग्लासाचे चित्र दाखवून आता ही वाईन कशी आहे ते ओळख, असं विचारण्यासारखं झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसं नाहिये बहुदा.
एकच भावना वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार आपापल्या पद्धतीने प्रदर्शित करत असतात. या विषयातही राग हे भावनांचे अमुर्त प्रदर्शन आहे तर छायाचित्र हे मुर्त प्रदर्शन आहे, मात्र दोन्हीत भावना तीच आहे. आणि म्हणूनच हे जास्त चॅलेंजिंग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राग ललित - मला रागाबद्दल फारसे तांत्रिक ज्ञान नाही, पण कुणीतरी सल्ला दिला रशिद खानचा राग ललित ऐक, थंडीतल्या एका पहाटे जरा लवकर जाग आली आणि त्यावेळेस तो ललित पहिल्यांदा ऐकला, आणि मग अनेक दिवस मी पहाटे ललित ऐकत असे, अजूनही पहाटे जाग आली की पहिल्यांदा ललितच ऐकतो. आता त्या पहाटेचं वर्णन करणारं एक चित्र खाली जोडत आहे, स्थळ एक तळ्याचा काठ आहे, तळ्याच्या पलिकडे दिवे दिसत आहेत ते एक मंदिर आहे, चित्र साध्या डिजिटल कॅमेराने घेतले असल्याने त्याचा दर्जा यथातथाच आहे. पण ह्याशिवाय त्या पहाटेचं यथार्थ वर्णन करणारं दुसरं चित्र निदान मी काढलेलं नाही. रागातलं नक्की काय मला चित्रात दिसलं हे मला सांगता येणं अवघड आहे, पण ती पहाट आणि राग ह्यांचा संबंध मनात घट्ट झाला आहे.

तांत्रिक तपशील - कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट ए-६० ह्यापलिकडे माझ्याकडे तांत्रिक माहिती उपलब्ध नाही.

ललित राग -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच सुंदर! मी आणि मुळापासून चे आव्हान स्वीकारल्याबद्दल मनापासून आभार. असेच अजून येऊ द्या.

@उदयः प्रत्येक इंद्रियाचे काम वेगळे आहे हे मान्य. पण हा विषय दोन इंद्रियांतील संबंध आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसे लावतो हे पहायचा फक्त एक प्रयोग म्हणता येईल. तुमचेच उदाहरण घेतले तर, वाइन टेस्टरला फक्त वाइनचे चित्र दाखवून चव ओळखायला सांगण्यापेक्षा, वाइन चाखून जिभेवर उमटणार्‍या बहुपेढी चवेला ती जशी कल्पक वर्णनात शब्दबद्ध करते, तशीच ती चित्रबद्ध करायचा प्रयत्न करायला सांगण्यासारखे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शास्त्रीय संगीत आणि राग याबद्दल अगदीच काही कल्पना नाही. विशारद असलेल्या एका मैत्रिणीमुळे फक्त काही रागांची नावं माहिती झाली होती कॉलेजमधे असताना. फ्युझॉनचं खमाज जेव्हा पहिल्यांदा ऐकलं, डोक्यातून अ‍ॅबसोल्यूटली जाईचना! नंतर कॉलेजच्या एका नाटकात इतक्या करेक्ट वेळी ते वापरलं गेलं की ते अजूनच आवडलं. माझ्यासाठी या गाण्याचे संदर्भ बरेचदा बदलले, आता तर अर्थाच्या खूपच जवळ आलेत. हे गाणं खमाज रागातलं आहे या व्यतिरिक्त बाकी काहीही माहीती रागाबद्दल नाही. खमाज बद्दल अधिक या विकीपानावर वाचायला मिळेल.

तर, हे ते गाणं खमाज रागातलं -

हा फोटो समोरासमोरच्या बस मधे बसून काढताना मॉडेलला खूप त्रास दिलेला आहे. पोस्ट प्रोसेसिंग करताना मुख्यत: पावसाचे थेंब दिसावेत म्हणून इमेज शार्पन केलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__/\__
काय मस्त "राग"वलीयेस

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वा!! छानच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे गाणं माझं तुफान म्हणजे तुफान आवडतं आहे. कोणे एके काळी मी "भावनाप्रधान" (भावना प्रधान नव्हे) मनुष्य होते आणि प्रेमात पडणे या कल्पनेच्या प्रेमात होते तेव्हा तर विचारूच नये...
आता मी जरी बदलले (जसे की तो बोलत नसेल तर... "बोलणार नाहीस?..बरं झालं डोक्याला शांतता!!" किंवा "नाही बोलत?..जा उडत" वगैरे) तरी त्यावेळेचे या गाण्याचे अपील अजूनही गेले नाहीये!

या ग्रुपचे नंतर कुठलेच अल्बम आले नाहीत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

राग पूर्वीची ओळख खरतर सुरेश वाडकरांच्या 'दयाघना'मुळे झाली, सुरेश वाडकर आणि हृदयनाथांच ते एक फारच सुंदर आणि म्हणायला भयंकर अवघड गाणं आहे, त्याच रागात रशिद खानांची हि बंदिशही कमाल आहे, पूर्वी राग संध्याकाळाचा आहे त्यामुळे दयाघना हे गाणं वास्तविक आयुष्याच्या विदीर्ण संध्याकाळचा संकेत आहे, अगदी नेमकं नसलं तरी मला खालच्या चित्रात कुठेतरी घरटं तुटलेल्या एकाकी चिमण्याची व्यथा जाणवली.

सदस्यांना चित्रं पसंत पडलं नाही तरी गाणं आणि बंदिश आवडेल ह्यात शंका नाही. Smile

चित्र -

तांत्रिक माहिती - कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट ए-६०

दयाघना -

रशिद खान -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्र आवडले (पण संस्करण हवे होते). धन्यवाद.
हृदयनाथांनी 'दयाघना' हे गाणे दीनानाथ गायचे त्या 'या रसूल अल्ला' या 'पूर्वी'तल्या बंदिशीवर बेतले आहे. त्यांनी स्वतः ती बंदिश 'लेकिन' या चित्रपटात एका जागी गायली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हृदयनाथांनी 'दयाघना' हे गाणे दीनानाथ गायचे त्या 'या रसूल अल्ला' या 'पूर्वी'तल्या बंदिशीवर बेतले आहे. त्यांनी स्वतः ती बंदिश 'लेकिन' या चित्रपटात एका जागी गायली आहे.

अनेक धन्यवाद :).

(पण संस्करण हवे होते).

मला अभिप्रेत अर्थ केलेल्या संस्करणातून हरवत होता, काही सुचना करु शकाल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला अभिप्रेत अर्थ केलेल्या संस्करणातून हरवत होता, काही सुचना करु शकाल काय?
......... मी तुमचे चित्र उतरवून थोडा प्रयत्न केला पण मनासारखे संस्करण जमू शकले नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अर्थ हरवतो. माझा उद्देश, डावीकडच्या भगभगीत उन्हाची तीव्रता आणि भिंतीवरचे तपशील कमी करून काड्यांवर आणि चिमणीवर लक्ष केंद्रित करता येते का, असा होता. माझा प्रयत्न खाली देत आहे. 'पिकासा'मध्ये काम केले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुकशी सहमत. डावीकडचा सुमारे एक चतुर्थांश भाग काढून टाकला तर उजव्या कोपऱ्यातला काळोख आणि डावीकडची भगभग यात समतोल साधेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@अमुक - फोकसमधे चिमणा आणण्याचा प्रयत्न चांगला आहे पण त्या संस्करणातला कृत्रिमपणा जाणवतो म्हणून ते मला प्रथम आवडलंच नाही, तरीही तुम्ही दिलेल्या सुचनेबद्दल आभारी आहे.

@राजेश + अमुक - चित्र कातरून काही अधिक हाती लागतयं का हे मी पाहिलं पण चित्रातल्या उन्हामधल्या लाकडी बॉर्डरचा भाग आशयचा एक भाग होता, त्यानंतर उन्हाचा धगधगितपणा सावलीला कॉन्ट्रास्ट म्हणून उपयोगी आहे, तसेच कातरल्यामुळे रुल ऑफ थर्डलाही धक्का लागत होता, मुळात उन्हातला भाग ओव्हरएक्स्पोझ झालाय त्यामुळे तो नकोसा वाटतो आहे हे खरं आहे, कातरलेल्या आवृत्ती खाली देत आहे -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक उपयुक्त धागा -

http://www.maayboli.com/node/34687

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्पर्धेच्या निकालाच्या तारखा अद्ययावत केल्या आहेत, कॉपी-पेस्ट मुळे बदलायचे राहिले होते. २५ जुलै शेवटची तारीख, २६ ला निकाल. पण त्या अवधीत अजून फोटो तेतील अशी आशा आहे.

सारीका यांचे दुवा दिल्याबद्दल आभार!

अनेकांनी सुचवल्या प्रमाणे रागावर आधारित हिंदी गाण्यांच्या यादीचा दुवा देखील इथे देत आहे. परिचित गाणी ऐकल्यावर रागाच्या छायाचित्राची कल्पना सुचेल अशी इच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाट एकाकी तमाची हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे अमृताने नाहवा
हे सुरांनो चंद्र व्हा !

Camera: NIKON COOLPIX L120, ISO: 800. Exposure: 1/4 sec. Aperture: 3.6, Focal Length: 8.4mm, Flash: No
वरील चित्र स्पर्धेसाठी नाही.
-------------------------

खूप वर्षांपूर्वी मणिरत्नमच्या 'थलपती' (१९९१) चित्रपटातले इलैयाराजाचे एक गाणे 'चिन्नथायवऴ' हे गाणे मनात घट्ट रुतून बसले होते. रजनीकांतला, त्याला जन्म देऊन वार्‍यावर सोडणार्‍या आईचे प्रथमच दर्शन होते. शब्दांचा अर्थ न कळताही या प्रसंगातली दबलेली कळकळ पोहोचविण्याचे काम सुरांनी चोख पार पाडले होते. त्यानंतर अनेक वर्षांनी 'स्वदेस' (२००४) पाहताना 'आहिस्ता आहिस्ता निँदिया तू आ' हे रहमानचे (कमी गाजलेले) गाणे तशीच आर्त कळकळ व्यक्त करून गेले. त्यावेळी या दोन गाण्यांत काहीतरी समान धागा जाणवला होता पण नक्की काय ते उमगले नव्हते. एकदा असेच 'आहिस्ता आहिस्ता' डोक्यात घोळत असताना त्यातल्या 'निंदिया रेऽ निंदिया रेऽ' या ओळी गुणगुणताना वरच्या सुरात गेलेली गाडी अचानक पण आपसुखाने 'बरसता हैं जो आँखोंसे वो सावन याद करता हैं, बेदर्दी बालमा तुझको, मेरा मन याद करता हैं' वरून खाली आली आणि खालच्या सुरात 'चिन्नथायवऴ'वर स्थिरावली. तत्क्षणी डोक्यात लख्ख प्रकाश पडला ... ही सारी एकाच रागावर आधारित गाणी असली पाहिजेत ! मग शोधाशोध करता करता समजले की हा राग 'चारुकेशी'.
मग प्रथम 'चारूकेशी'तली गाणी मुद्दामहून न शोधता केवळ गुणगुणण्यातून आपल्याला किती गाणी आठवता येतात हे पाहण्याचा खेळ* सुरू झाला. म्हणजे असे, की एखादे चारुकेशीतले माहित झालेले गाणे मनात घोळवत राहायचे. कधीतरी त्यातल्या एखाद्या सुराचा सुगावा लागून आपल्याला माहीत असलेली इतर गाणी हळुहळू पुढ्यात येत जातात. अश्याप्रकारे अनेक गाणी आठवण्यात एक मौज, झिंग असते. ती एक अनुभवण्याचीच गंमत आहे. तसे करता करता अनेक ओळखीतली गाणी आठवली (कोई जब तुम्हारा हृदय तोड दे, बैयाँ ना धरो ओ बलमा, इ.). ते समाधान झाल्यावर मग या रागाचे शास्त्रीय गायन/वादन ऐकणे सुरू केले. कार्तिक अय्यरचे अप्रतिम व्हायोलिन, रशीद खान यांचे भरदार गायन, आणि इतर काही. मग एकदा सुलतान खान यांच्या सारंगीतला खिळवून टाकणारा चारुकेशी ऐकता ऐकता अचानक साक्षात्कार झाला.… गाण्यातल्या आर्जवी स्वरांमुळे माझ्या अतिशय जिव्हाळ्याची असलेली 'हे सुरांनो चंद्र व्हा' ही अभिषेकीबुवांची रचना शेकडो वेळा ऐकलेली. एकाकी, हरवलेल्या मानसिकतेतला खिन्नपणा, त्यातूनच आलेली 'चांदण्यांचे कोष प्रियकरापर्यंत पोचविण्या'ची सुरांनाच करण्यात आलेली कळकळीची विनंती, त्यातली शीलंतास भरलेली व्याकुळता चारुकेशीतच व्यक्त केली आहे…! ही जाणीव झाल्यापासून चारुकेशीचा कळसाविष्कार = हे सुरांनो चंद्र व्हा, हेच समीकरण माझ्यासाठी पक्के झाले.

चारुकेशीबद्दल थोडी माहिती : हा राग मूळचा कर्नाटिक संगीतातला. तिथून अनेकांच्या प्रयत्नांनी तो हिंदुस्थानी संगीतात आणला गेला. हा विलंबित आणि द्रुत गतीत प्रचंड वेगळा भासतो. उदा. विलंबितमध्ये तळमळ, पॅथॉस, मेलङ्कली, कळकळ इ. भावना तर दृत गतीत 'ऋतू हिरवा, ऋतू बरवा' सारखे उत्फुल्ल गाणे बांधले जाऊ शकते. हा सकाळी वा संध्याकाळच्या कुठल्याही प्रहरी गायला जाऊ शकतो. गंमत म्हणजे पाश्चिमात्य अभिजात संगीतात श्यूबर्टच्या ओपस ९० मधल्या इम्प्रॉम्प्तूमध्ये आणि मिखाईल इपॉलितॉव-इवानोवच्या 'प्रोसेशन ऑफ् दि सरदार' या रचनेतही चारुकेशीची झलक ऐकायला मिळते.

* असा खेळ पूर्वी 'यमन' रागात खेळलो होतो. हिंदी-मराठीत काय खच्चून गाणी भरली आहेत 'यमन'मध्ये ! एकातून दुसर्‍यात - दुसर्‍यातून तिसर्‍यात करत करत गुणगुणायला जाम धमाल येते. उदा.
वो शाम कुछ अजीब थी ये शाम भी अजीब हैं, वो कल भी आसपास थी, वो आज भी क़्ररीब हैं (हेमंतकुमार) --> ये शामें सब की सब शामें, इन शामोंका होई अंत नहीं (वनराज भाटिया)--> माझी न मी राहिले, तुजला नाथा सर्व वाहिले (बाळ पार्टे)--->मैं पिया तेरी तू माने या ना माने (एस्.डी) ---> गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया (हृदयनाथ) ---> प्रथम तुला वंदितो कृपाळा (अनिल-अरुण)---> सुन सुन सुन बरसात की धुन सुन (अन्नु मलिक) --->केणु संग खेलू होली पिया कज गये हैं अकेली (हृदयनाथ) ---> मन रे तू काहे न धीर धरे (रोशन)---> तोच चंद्रमा नभात (सुधीर फडके) ---> जब दीप जले आना जब शाम ढले आना (रवींद्र जैन) ---> का रे दुरावा , का रे अबोला (फडके)---> रँजिश ही सही, दिलही दुखाने के लिये आ (ग़ुलाम अली)---> आप के अनुरोध पे मैं ये गीत सुनाता हूँ (आर.डी)....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाहवा! चित्रापेक्षा स्वगत भारी! Blum 3

बाकी, चित्र खालून थोडे (सुरवातीच्या खड्ड्यापर्यंत) कातरून अधिक परिणामकारक ठरेलसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चित्रापेक्षा स्वगत भारी!
.................होय. भारी = 'लोडेड्' म्हणता बरोबरच आहे. Smile

चित्र खालून थोडे (सुरवातीच्या खड्ड्यापर्यंत) कातरून अधिक परिणामकारक ठरेलसे वाटते.
.................होय. बरोबर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्र छान आहे, निकॉन कुलपिक्स मधे ह्यापेक्षा अधिक अपेक्षा नाहीत, पण चित्रामधे तुम्ही ओव्हरकोट घालून एक सिगारेट मारत(जेम्स डिन स्टाईल) धुराचे वलय सोडत चालत गेला असता तर चित्र अधिक परिणामकारक झालं असतं ;)-

वाट एकाकी तमाची हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे अमृताने नाहवा
हे सुरांनो चंद्र व्हा !

हे देवकी पंडितच्या आवाजात(नक्षत्रांचे देणे) जास्त आवडलं होतं, विलक्षण चाल/राग/आवाज. चारुकेशीच्या माहितीबद्दल आभार.

* असा खेळ पूर्वी 'यमन' रागात खेळलो होतो. हिंदी-मराठीत काय खच्चून गाणी भरली आहेत 'यमन'मध्ये ! एकातून दुसर्‍यात - दुसर्‍यातून तिसर्‍यात करत करत गुणगुणायला जाम धमाल येते. उदा.
वो शाम कुछ अजीब थी ये शाम भी अजीब हैं, वो कल भी आसपास थी, वो आज भी क़्ररीब हैं (हेमंतकुमार) --> ये शामें सब की सब शामें, इन शामोंका होई अंत नहीं (वनराज भाटिया)--> माझी न मी राहिले, तुजला नाथा सर्व वाहिले (बाळ पार्टे)--->मैं पिया तेरी तू माने या ना माने (एस्.डी) ---> गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया (हृदयनाथ) ---> प्रथम तुला वंदितो कृपाळा (अनिल-अरुण)---> सुन सुन सुन बरसात की धुन सुन (अन्नु मलिक) --->केणु संग खेलू होली पिया कज गये हैं अकेली (हृदयनाथ) ---> मन रे तू काहे न धीर धरे (रोशन)---> तोच चंद्रमा नभात (सुधीर फडके) ---> जब दीप जले आना जब शाम ढले आना (रवींद्र जैन) ---> का रे दुरावा , का रे अबोला (फडके)---> रँजिश ही सही, दिलही दुखाने के लिये आ (ग़ुलाम अली)---> आप के अनुरोध पे मैं ये गीत सुनाता हूँ (आर.डी)..

हे मुळात करड्या रंगात नको होते...भारी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे देवकी पंडितच्या आवाजात(नक्षत्रांचे देणे) जास्त आवडलं होतं, विलक्षण चाल/राग/आवाज.
.................हे वाचून मला फार म्हणजे फार म्हणजे फारच आनंद झाला आहे.
देवकी पंडीत यांचे गायन/आवाज मला फारसे आवडत नाही परंतु त्यांचा 'नक्षत्रांचे देणे' मधला तो एक गायनाविष्कार काही वेगळ्याच दुनियेत नेणारा होता ! मला आठवते, मी ते गायन संपल्यावर किती तरी काळ नि:शब्द होतो. काही सुचत नव्हते. काहितरी विलक्षण गारूड करणारे गायन होते ते. देवकी पंडितांची बुवांसाठीची (त्या अभिषेकींकडे शिकल्या) ती खरी श्रद्धांजली ! खरे तर मी त्याच गायनाचा दुवा इथे देणार होतो पण शोधून सापडला नाही (यापूर्वीही शोधून मिळाले नव्हते). थोडे आणखी शोधायला हवे. तुम्हांला सापडल्यास मला जरूर पाठवा ही विनंती. खूप वर्षे झाली ते ऐकून.

चित्रामधे तुम्ही ओव्हरकोट घालून एक सिगारेट मारत(जेम्स डिन स्टाईल) धुराचे वलय सोडत चालत गेला असता तर चित्र अधिक परिणामकारक झालं असतं ;)-
.............हा ह्हा ह्हा. आता तुम्ही ओव्हरकोट/धुराचे वलय वगैरे म्हटल्यावर चित्रातल्या एकूण रंगसंगतीमुळे 'पुणे ५२' आठवला !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळी गाणी एकानंतर एक गुणगुणताना मजा आली. "मैं पिया तेरी" तून "गजानना" तले ट्रान्सिशन अगदी सहज, सीमलेस होते. तसेच "मन रे" तून "तोच चंद्रमा" त. पण त्याच्या नंतर माझ्या डोक्यात "राज की बात है..... निगाहें मिलाने को जी चाहता है" आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीसुद्धा अशाच एका बर्फाळ गल्लीत राहायचो. रात्री बर्फावरून दिव्यांचा प्रकाश परावर्तित होत असे आणि एरवी जेमतेम पिवळ्या प्रकाशात मान खाली घालून जाणारे रस्ते उजळून निघत असत. रस्त्याच्या कडेला कुडकुडत झोपलेल्या गाड्या आणि पांढऱ्या शुभ्र बर्फात उजळलेली; झोपायची वेळ मुद्दाम टाळून, नंतर गरम चहा च्या वाफा दिसतीलच असा स्वत:ला सांगत बर्फ अंगाखांद्यावर झेलणारी ती गल्ली टिपण्याचा मी पण एकदा प्रयत्न केला होता -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काव्यमय उत्तर!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुरे-वासरे घराकडे लाल धूळ उडवत परतत आहेत, नदीत एखादा साधू सूर्याकडे पाहत अर्घ्य देत हात जोडून प्रार्थना करीत आहे, इ. सूर्यास्तापूर्वीच्या काळाचे वर्णन करणारा राग म्हणजे मारवा. राग मावळतो आणि दिवेलागण होते. 'मावळत्या दिनकरा' हे गाणे मारव्यातले. विलंबित लयीत हा अधिक भावतो. पं. वसंतराव देशपांडे यांचे मारवा-गायन इतके सिद्ध होते, की त्यांच्या निधनानंतर 'महाराष्ट्रातला मारवा अस्तंगत झाला आहे', असे पं. भीमसेन जोशी उद्गारले होते. मला व्यक्तिशः पं. कुमार गंधर्व आणि पं. हरिप्रसाद चौरासिया यांचा मारवा आवडतो.

मारवा ऐकताना 'आनंद सहगल'ची आठवण बरेचदा होते -
कहीं दूर जब दिन ढल जाए
साँझ की दुल्हन बदन चुराए
चुपकेसे आए
मेरे ख़यालों के आँगन में
कोई सपनों के दीप जलाए
दीप जलाए..

Camera: NIKON COOLPIX L120, ISO: 80, Exposure: 1/160 sec, Aperture: 5.7, Focal Length: 71.2mm, Flash: No

वरील चित्र स्पर्धेसाठी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एवढं सुंदर चित्र स्पर्धेसाठी का नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणते. अप्रतिम चित्र, आणि माझ्यामते तरी रागा साठी अगदी नेमके; स्वगत वाचले नसते तरी माझ्या मनात मारवाच आला असता. मारवा खूप वेळ आलापात किंवा विलंबितात ऐकला की खूप अस्वस्थ व्हायला होतं. मल्लिकार्जुनांचा मारवा ऐकला आहे का? तो माझा आवडता आहे. आणि हिराबाईंचा तराना - अत तनं देरेना दीम तनं देरेना...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मुळापासून' आणि 'रोचना' यांना :
स्पर्धेसाठी नसण्याची काही कारणे खाली ऋषिकेशला दिलेल्या प्रतिसादात आहेत. पण मुख्य कारण हे की मी दिलेली चित्रे मला बरेचदा 'शुभेच्छापत्र-छाप' वाटतात. उदा. हे मारव्यासाठी दिलेले चित्र. ते दिसायला छान आहे, तुमच्या मनातल्या मारव्याशी साधर्म्य राखून आहे, इ. गोष्टी आहेत ते ठीकच आहे पण यापेक्षा कितीतरी वेगळ्या पद्धतीने आव्हानातला विषय मांडता येईल असे वाटत राहिले. निसर्गात न जाता घरातल्या वस्तूंतून, छायाप्रकाशातून विषय मांडणे जमले नाही, नेहमीच्या प्रतिमांऐवजी काही वेगळे टिपून गोष्ट सांगता येते का ह्याचा प्रयत्न केला नाही हे असमाधान राहिले. यावेळचे आव्हान फार आवडले त्यामुळे यासाठी विशेष कष्ट घ्यायला हवे होते. ते जमले नाही. म्हणून 'स्पर्धेसाठी नाही'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला व्यक्तिशः पं. कुमार गंधर्व आणि पं. हरिप्रसाद चौरासिया यांचा मारवा आवडतो.

न मागता दिलेला सल्ला... तुम्ही वर अभिषेकी बुवांचा उल्लेख केलाय. एकदा त्यांचाही मारवा ऐकून पहा.

अवांतरः पं. हरिप्रसाद चौरसियांचा मारवा काही ठिकाणी वरिजिनल मारव्याच्या लक्षणांशी फारकत घेतो. अर्थात तो लैच भारी आहे याबद्दल काहीच दुमत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही सूचनांबद्दल धन्यवाद. बुवांचा मारवा ऐकलेला नाही. अवश्य ऐकेन.

मला शास्त्रीय संगीत कळत नाही. म्हणजे, कुठला स्वर वर्ज्य, वादी-संवादी, स्वर कोमल/तीव्र लावणे इ. गोष्टी ऐकून माहीत आहेत पण एखाद्या रागात त्या कश्या आल्या आहेत याबाबत जदेखील कळत नाही. पण हे कळत नसल्यानेच चौरासियांचा मारवा कसा फारकत घेतो ते मुद्दामहून ऐकून पाहायला आवडेल. पाहतो प्रयत्न करून. पुन्हा एकदा आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसर्‍या पर्वात

स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल

या नियमाची आठवण करून देतो.

जर अमुक यांनी कोणते चित्र स्पर्धेसाठी खुले आहे हे कळवले नाही तर आव्हानदात्याला कोणतेही एक चित्र स्पर्धेसाठी पकडायची मुभा आहे Smile Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वा! हा अगदी बेश्ट नियम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल.
...............अर्रर्रर्र ! हे असं आहे होय ! वाचकाचे (म्हणजे माझे) भाषिक दौर्बल्य आड आले हो... Smile
मला वाटले होते की 'स्पर्धाबाह्य' चित्रे म्हणजे आंतरजालावर असलेली इतरांची आवडणारी आणि विषयाला सुसंगत असणारी चित्रे. कारण हा नियम स्वतःला चित्रे टिपण्यास प्रोत्साहन देणारा असावा असे वाटले. आता इथे मी दिलेली दोन्ही चित्रे माझीच आहेत व विषयाला सुसंगत आहेत. त्यामुळे हा नियम लागू होईल असे वाटले नव्हते. असो.

जर अमुक यांनी कोणते चित्र स्पर्धेसाठी खुले आहे हे कळवले नाही तर आव्हानदात्याला कोणतेही एक चित्र स्पर्धेसाठी पकडायची मुभा आहे.
............... मुळात वेळेच्या कमतरतेमुळे यावेळी स्पर्धेत चित्र देणार नव्हतो. पण विषयच इतका छान आणि जिव्हाळ्याचा आहे की राहवले नाही.
तसेच, ज्या स्पर्धेत आपण परीक्षक असणार होतो नि वेळेअभावी ते नाकारले त्याच स्पर्धेसाठी स्वतःची चित्रे देणे प्रशस्त / नैतिकदृष्ट्या योग्य वाटले नाही कारण रोचना यांची स्पर्धेत सहभागी होण्याची संधी त्यामुळे गेली. त्याचवेळी चित्रांचा आस्वाद लोकांनी घ्यावा, टीका-टिप्पण्या कराव्यात, चर्चा करावी हा हेतू होताच. म्हणून चित्रे देऊनही 'स्पर्धेसाठी नाही' असे दिले.

हं. पण नियम तो नियम. मुदत अजून संपलेली नाही. पाहतो काय करायचे ते. अन्यथा रोचना सर्वाधिकारी आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरचं चित्र पाहून ग्रेस ह्यांची खालची कविता पण मला इथे जमल्यासारखी वाटते, पण हे छायाचित्र फारच सुंदर आहे पण त्यात पोस्टरचा फाईननेस आहे त्यामुळे ते आपलं किंवा देशी वाटत नाही Tongue पण त्यात तुमचं कसब कमी नाहीच, पण ते एक असोच.

कविता -
शब्दांनी हरवुनी जावे , क्षितिजांची मिट्ता ओळ,
मी सांज फुलांची वेळ, व्रुक्षांच्या कलत्या छाया
पाण्यावर चन्द्र फुलांची, मी निळीसावळी वेल.
गात्रांचे शिल्प निराळे, स्पर्शाचा तुट्ला गजरा,
मी गतजन्मीची भुल, तु बावरलेला वारा,
पायात धुळिचे लोळ, मी भातुकलिचा खेळ
त्या वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती ॥२॥
देऊळ पलिकडे तरिही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरलासुरला थेंब ॥४॥
संध्येतिल कमळासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत पाने ॥५॥
ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई ॥७॥

@रोचना - मी वसंतराव देशपांडे आणि मल्लिकार्जून मन्सूर ह्या दोघांचा मारवा ऐकला, मन्सुरांचा मारव्यामधे फारच चढ-उतार(ह्याला काही शास्त्रीय नाव असावे) आहे, त्यामानाने वसंतरावांचा मारवा थोडा अपील होतो, कदाचीत संगीतातला नवखा असल्याने चांगल्या-वाईटाची जाण फारशी नाही. किशोरी अमोणकरांचा(ध्वनीमुद्रण थोडं खराब वाटतं आहे) पण ऐकला पण मला वसंतरावांचाच मारवा आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा ऐका मारवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

काय विलक्षण सुंदर चित्र आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निकाल द्यायला थोडा उशीर झाला, सॉरी! मी शनिवारी पार विसरून गेले.

या आव्हानाला नेहमी पेक्षा कमी चित्रं येतील असा अंदाज होता, पण आली त्याहून अधिक येतील असं वाटलं होतं Sad असो. विषय सगळ्यांनाच आवडला अथवा पटला नाही, पण जी चित्रं आली ती सगळीच फार आवडली, विषयाला समर्पक आणि विचारपूर्वक होती. या निमित्ताने किशोरीताईंचा मारवा ऐकायला मिळाला, आणि यमनमधल्या गाण्यांची साखळी गुणगुणायला मजा आली. शाहिदा परवीनचे गाणे, आणि फ्यूजॉन बद्दलही प्रथमच ऐकले.

३. मुळापासून - "बर्फाळ, खट्याळ गल्ली". त्यांनी रागाचा स्पष्ट उल्लेख केला नसला, तरी अमुक यांच्या "चारुकेशी" चित्राच्या चर्चेला प्रतिसाद म्हणून समर्पक वाटले आणि आवडले. बर्फाचा वेग आणि प्रकाश यातील ठळक बाबी असल्यामुळे, ते विलंबित, तर हे द्रुत चीज दर्शवणारे असे म्हणूया. फांद्यांच्या काळ्याकुरळ्या आणि बर्फाच्या पिकलेल्या केशभूषेसारखा काँट्रास्ट छान जाणवला.

२. केतकी आकडे - "खमाज": खमाजमधील ठुमरी म्हटली की विरहाच्या, पावसाळ्यात पुरबिया मायदेशास परतण्याच्या चिजा आठवतात - मला चित्र पाहिलं की "पिया तोरी तिरछी नजर लागे प्यारी रे" आठवलं! एकूण चित्र, पावसांच्या ठळक थेंबांमागे तो चिडचिडलेला चेहरा फार आवडले.

१. मी - "पूर्वी" - दयाघना हे माझं अत्यंत आवडतं गाणं. ते आणि पूर्वी रागाचे इतके सुंदर, अस्वस्थ करणारे चित्र टिप्ल्याबद्दल मी यांचे अभिनंदन! सुकलेल्या फांद्यांचा, बुट्टीचा पोत लगेच डोळ्यात भरतो, पण डावीकडे दगडावर प्रखर उन्हाने प्रेतावर पांढरं कापड घातल्याचा भास होतो. आता गाणं पुन्हा ऐकलं की त्याच्याकडे तोंड फिरवून काळोखाकडे पाहत बसलेली चिमणी आठवणारच.

पुन्हा सगळ्यांचे अभिनंदन!

मी यांनी लवकरात लवकर पुढच्या आव्हानाचा विषय द्यावी ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या गल्ली वाल्या फोटोला पारितोषिक दिल्याबद्दल धन्यवाद! मला 'अमुक' चं छायाचित्र पाहून माझं हे चित्र आठवलं आणि केवळ गंमत म्हणून मी पोस्ट केलं. ते तुम्हाला स्पर्धेसाठी समर्पक वाटलं हे छान झालं!

फोटो काढणे यामागे कधी काळी "आठवणी जतन करणे" इतकाच उद्देश होता. मी त्या काळातला नसलो तरी हा एक फोटो असा आहे कि ज्यामुळे माझ्या त्यावेळच्या आठवणी लगेच ताज्या होतात. तेव्हा सोबत असणारे मित्र आठवतात (या फोटोत नसले तरी!).

मी जेव्हा काही नवं लिहायचो, किंवा नवे फोटो काढायचो, ते त्या क्षणी मला भारी वाटायचं आणि काही दिवसानंतर तेच बालिश वाटायला लागायचं. हा एक फोटो मात्र भारी / बालिश असं काहीही वाटू न देत फक्त मला त्या क्षणात घेऊन जातो. असो.

या धाग्यावर बरेच जाणकार लोक आहेत. "डोकं दुखण्यावर काही गोळी आहे का हो?" असं डॉक्टर ला विचारतो त्याच चालीत तुम्हाला विचारू इच्छितो - "Nostalgia वर एखादा राग आहे का हो?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"Nostalgia वर एखादा राग आहे का हो?"

प्रश्न रोचक आहे आणि मलाही उत्तर जाणून घ्यायला आवडेल. पण मला असं वाटतं की Nostalgic होणं म्हणजे शेवटी कुठल्या तरी "भावना" जाग्या होणं असंच असतं ना? मग त्या भावना मूळ भावनांपैकीच एक असतात (आनंद, उत्साह, प्रेम, करुणा, दु:ख ई.). आणि ह्या भावनांवर राग आहेतच बाकी चु.भु.दे.घे. कारण रागांबद्दल मलाही फार ज्ञान नाही, पण "Nostalgia " बद्दल जे वाटलं ते व्यक्त करावं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंमळ असहमत. नॉस्टॅल्जिया म्हणजे जुन्या आठवणी जागवल्यामुळे जागृत होणार्‍या कैक भावना. इथे कैक भावना हे महत्त्वाचे नसून जुन्या आठवणींमुळे जागृत होणार्‍या भावना हे जास्ती महत्त्वाचं आहे. नॉस्टॅल्जियामुळे आनंद झाला तरी पुनःप्रत्यय होणे नाही याचे अंगभूत दु:खही असतेच, त्यामुळे नुस्ते दु:ख आणि नॉस्टॅल्जिक दु:ख, नुस्ता आनंद आणि नॉस्टॅल्जिक आनंद यांत फरक आहे असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद रोचना, मलाही ह्यावेळेला फोटोशिवाय गाण्यांच्या पायात पाय अडकवायला डोकं चालवावं लागलं आणि ते आवडलं, इतर दिग्गजांनी आपल्या एन्ट्रया न दिल्याने अव्हान सुकर झाले, अर्थात मुळापासून आणि केतकीचे फोटो मस्त होतेच. अमुक ह्यांचाही फोटो सुरेख आहे, आणि ती यमन रागातली आगगाडीपण मस्त.

नंदनच्या आणि तुमच्या पाक्षिकापुढे आव्हान द्यायचं म्हणजे अवघड आहे, विचार करुन विषय देतो, इतरांनी काही सल्ले दिले तरी चालतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0