कार्तवीर्य सहस्त्रार्जुन

कार्तवीर्य सहस्रार्जुन - कृतयुगामध्ये कृतवीर्य या नावाचा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचे नाव शीलधारा असे होते. कृतवीर्य हा अतिशय पराक्रमी राजाहोता त्याला शंभर पुत्र झाले होते. परंतु एकदा काहीतरी गैरसमजुतीमधून च्यवनऋषींनी शाप दिला आणि सर्व पुत्र भस्मसात झाले. महाराणी शीलधारा ही याज्ञवल्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिला शरण गेली, मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी आणि ज्ञानी होती. मैत्रेयीने तिला श्रीदत्तात्रेयांची उपासना करायला सांगितली आणि
पुत्रप्राप्तीचे व्रत करायला सांगितले. कृतवीर्य आणि महाराणी शीलधारा यांनी निष्ठेने ते व्रत केले. तेव्हा भगवान श्रीदत्तात्रेय संतुष्ट झाले. त्यांनी पराक्रमी आणि तेजस्वी पुत्र होईल असा आशिर्वाद दिला. हा मुलगा म्हणजे सम्राट कार्तवीर्य सहस्रार्जुन. कृतवीर्याने आपले राज्य त्याला दिले आणि तो अरण्यात निघून गेला. कालांतराने राज्यकारभार करताना धर्मयुक्त राज्य कशा पद्धतीने करावे, राज्याचा विस्तार कसा करावा, राजधर्म आणि प्रजाधर्म यांचे संतुलन कसे राखावे, याबाबत कार्तवीर्य अर्जुन शंकित झाला. तेव्हा त्याने गर्गमुनींना सल्ला विचारला. तेव्हा गर्गमुनींनी त्याला श्रीदत्तात्रेयांना शरण जाण्यास सांगितले. दत्तप्रभूच्या
आशीर्वादाने तुला राज्यधर्माचे तर यथार्थ ज्ञान
मिळेतच त्याचबरोबर अनेक सिद्धी, सामर्थ्य आणि शक्ती प्राप्त होतील, कारण श्रीदत्तात्रेय म्हणजे विष्णूचाच अवतार आहेत असेही गर्नमुनींनी सुचवले. हे ऐकून कार्तवीर्य अर्जुन श्रीदत्तात्रेयांच्या आश्रमामध्ये गेला. कार्तवीर्य अर्जुन अतिशय निश्चयी आणि महत्त्वाकांक्षी होता. संपूर्ण पृथ्वीचे अधिपती व्हायची त्याची इच्छा होती. त्यासाठी वाटेल तेव्हढे परिश्रम करायची त्याची तयारी होती. तो श्रीदत्तात्रेयांचे आश्रमी पोहोचला तेव्हा श्रीदत्तात्रेयांनी त्याला निरुत्साही केले. मीच पतित आणि वाममार्गाचे आचरण करणारा आहे. मी तुझी इच्छा पूर्ण करू शकणार नाही. तू त्वरित निघून जा असे श्रीदत्तात्रेयांनी त्याला सुनविले. पण तरीही दृढ निश्चयाने तो तेथेच सेवा करीत राहिला.
काही काळाने दत्तप्रभूनी त्याचे दोन्ही हात क्रोधाग्नीने जाळून नष्ट केले. तरीही कार्तवीर्य अर्जुन त्यांची सेवा करीत तेथेच राहिला. त्याची श्रद्धा तसूभरही ढळली नाही. त्याचा हा दृढ
सेवाभाव पाहून श्रीदत्तात्रेय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला यथार्थ "संपूर्ण" ज्ञान दिले. धर्माचा उपदेश केला व त्याचबरोबर सर्व प्रकारचे ऐश्वर्य बहाल केले. योगज्ञान आणि ब्रह्मज्ञानही त्याला दिले. एक हजार हात प्रदान केले. म्हणूनच पुढे कार्तवीर्य अर्जुन हा सहस्रार्जुन म्हणून विख्यात झाला. याचबरोबर त्याला अनेक सिद्धी, शस्त्रे, अस्त्र प्राप्त झाली. याद्वारे त्याने मोठा पराक्रम गाजविला आणि महासम्राट होऊन सप्तद्वीप पृथ्वीचा अधिपती झाला. कार्तवीर्यसहस्रार्जुन हा श्रीदत्तात्रेयांचा अतिशय लाडका शिष्य होता. त्याने श्रीदत्तात्रेयांची कृपा संपादून अदभुत ऐश्वर्य प्राप्त केले आणि शेकडो वर्षे पृथ्वीवर निरंकुश राज्य उपभोगिले.

....

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सोमवंशीय आर्य क्षत्रिय म्हनजेच आमच्या इकडे ज्यांना सावजी म्हणले जाते त्यांचा हा मूळ पुरुष. ते स्वत:ला सहस्रार्हजुनाचे वंशज समजतात.
सोलापुरात हा समाज उद्योग धंद्यात (विशेष म्हण्जे कापड, रंगणी, बाईंडिंग आणि खाणावळ) विषेष आघाडीवर आहे.
देखणेपणा आणि लक्ख गोरा रंग, काबाडकष्ट करायची तयारी आणि व्यावहारिक चतुरपणा हे सहस्रार्जुन आर्य क्षत्रिय समाजाची वैषिष्ट्ये आहेत.
सोलापुरातिल सहस्रार्जुन मंगल कार्यालयात प्रसिध्द चित्रकार सपार यांनी काढलेले सहस्रार्जुनाचे व महाराणी चंद्ररेखा (?) ह्यांची अप्रतिम चित्रे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सावजी मटणवाले हेच काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच. हेच ते सावजी.
भूषश्याच्या शेगडीवर स्पेशल सावजी मसाले वापरून मंदपणे शिजवले जाते सावजी मटण.
सावजी लोकात नावापुढे सा हा प्रत्यय लावला जातो. भिकुसा, यमासा, विष्णुसा असा. त्यामुळे ह्या लोकांना सावजी म्हणाले जाते. भावजी तसे सावजी. अजुन काही थिअरी असेल तर माहीत नाही पण सावजी मटण आणि खिमा उंडे ह्याची चव आयुष्यात विसरली जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सावजी लोकात नावापुढे सा हा प्रत्यय लावला जातो. भिकुसा, यमासा, विष्णुसा असा.

यावरून आठवले. पूर्वी 'भिकुसा यमासा क्षत्रिय' असा एक विडीचा ब्राण्ड असण्याबद्दल ऐकलेले आहे. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस, वैच.
सोलापूरचे प्रोडक्शन ते. अजुन आहे फॅक्तरी. भिकूसा बिडी.
सोलापूर बीदर आणि येवला इथे हा समाज जास्त आहे. येवल्याच्या पैठणीचा व्यवसाय ही यांचाच
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>भिकुसा यमासा क्षत्रिय

या नावाचे एक महाविद्यालय नाशिकमध्ये आहे. 'बीवायके' कॉलेज....
त्याचंच एक जुळं भावंडं आहे ते 'आरवायके' - रामासा यामासा क्षत्रिय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान माहिती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या चित्राचा फोटो असेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

देव नसलेला आणि दोनापेक्षा अधिक हात असलेला हा एकमेव मनुष्य असावा.
( विणकरांना जेवढे हात अधिक तेवढे चांगलेच यावर एक गमतीदार गोष्टही ऐकली आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याच राजाने जमदग्नी ऋषींची कामधेनु पळवली अन मग तुंबळ युद्ध वगैरे होउन, पुढे परशुरामाने पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केली. बरोबर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय. तुम्ही बहुतेक दत्ताचे किंवा समर्थांचे भक्त आहात असे वाटते. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भक्त नाही. पण वाचन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण हल्ली कृष्णाला सुटीवर पाठवले आहे का सामो'ने?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या पौराणिक कथा ऐकताना माझं लॉजिक नेहमीच गंडतं! म्हणजे त्या राजाला शंभर पुत्र एकाच राणीपासून होणे शक्य वाटत नाही. म्हणजे त्याला अनेक राण्या असणार. मग त्यातील फक्त, महाराणीलाच पुत्र मागावासा वाटला ?
दत्तात्रेय हे स्वत: देव होते तर त्यांना आपण पापी आहोत असं का वाटलं? ज्या भक्ताची सत्ता, ऐहिक सुखं वगैरे अशी मागणी वा इच्छा असते त्याला देव प्रसन्न का होतो? संपूर्ण पृथ्वीचे अधिपत्य मिळावे असे चीनलाही वाटते. ते योग्य आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>संपूर्ण पृथ्वीचे अधिपत्य मिळावे असे चीनलाही वाटते.

माझ्यामते असे जिनपिंग साहेबांना वाटते. मग तत्वत: कार्तवीर्यसदृश कोणताही वर मागणारा राजा/राक्षस किंवा इतर कोणीही आणि जिनपिंग यांच्यात फारसा फरक नाही. हो की नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लॉजिक नेहमीच गंडतं!

होच. डोळे मिटून वाचतो मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा कार्तवीर्य अर्जुन म्हणजे सुदर्शन चक्राचा अवतार म्हणे. सुदर्शनचक्राने मानव रुपात अवतार घेतला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.transliteral.org/pages/z80328212346/view - रेणुकादेवी महात्म्य - इथे कार्तवीर्य अर्जुन व त्याचे अपराध याचे वर्णन आढळते. हा राजा म्हणजे श्रीविष्णुंच्या सुदर्शन चक्राचा अवतार होता असे या आख्यायनातच सापडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0