यदुराजा

काळाचा प्रवाह अखंड वाहतो. नवनवीन घटना व व्यक्तिमत्त्वे जन्म घेत असतात व भूतकाळात गडप होत असतात. प्रत्येकाचे रूप, रंग, दैव, पराक्रम, कर्म वगैरे वेगवेगळे. पण काळाच्या या ओघात काहींचा ठसा दीर्घकाळ टिकून राहतो तर कित्येक विस्मृतीत जातात. वस्तुतः जगाच्या रंगमंचावरील या नाट्यात भूमिका कितीही छोटी वा मोठी असो पण आपल्या गुणांना कलाटणी देण्याची संधी सर्वांनाच असते. पौराणिक काळापासून अर्वाचीन काळापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण घटनांमधे छोटी व्यक्तिमत्वे मोठा प्रभाव टाकून गेली तर मोठी व्यक्तिमत्त्वे झाकोळली गेली. अनेक जण लक्षात राहिले पण अपुरी ओळख ठेवून! तथापि या सर्वात एक समान गोष्ट आढळते ती म्हणजे ही सारी पात्रे विस्मृतीत गेली. रामायण म्हटले की राम, लक्ष्मण, सीता, रावण, हनुमान अशी ठळक नावे समोर येतात. महाभारत म्हटले की कृष्ण, अर्जुन, भीम, दुर्योधन, कर्ण ही पात्रे चटकन लक्षात राहतात. बारकाईने लक्ष देत भूतकाळाकडे वळून पाहिले तर अशी विस्मृतीतील पात्रे दिसून येऊ लागतात व त्यांची भूमिका पाहून आश्चर्य वाटते. चला तर पुराणांतल्या अशा काहीं निवडक पात्रांना आपण भेटू या.

यदुराजा - ययाती राजाची कथा प्रसिद्ध आहे. त्याला दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांची कन्या देवयानी आणि दैत्यांचा राजा वृषपर्वा याची कन्या शर्मिष्ठा अशा दोन पत्नी होत्या. ययाती हा अतिशय पराक्रमी आणि वैभवसंपन्न असा राजा होता. त्याने संपूर्ण पृथ्वीचे राज्य जिंकून घेतले होते. आपल्या राज्याचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेत अनेक वर्षे राज्य करताना कालांतराने तो वृद्ध झाला. मात्र तरीही त्याची भोगलालसा काही कमी होईना. त्याला शुक्राचार्यांनी आशीर्वाद दिला की जर तुला तुझ्या कोणत्याही मुलाने तारुण्य दिले आणि तुझे वार्धक्य स्वीकारले तर तुला पुन्हा सर्व भोग घेता येतील. त्याला देवयानीपासून यदू व तुर्वस्तु असे दोन आणि शमिष्ठेपासून अनू,
द्रघु आणि पुरु असे तीन मिळून एकुण पाच पुत्र झाले होते. त्याने पाचही पुत्रांना आपले वार्धक्य स्वीकारण्याबद्दल विचारणा केली. तेव्हा पुरूने त्याचे वार्धक्य स्वीकारून आपले तारुण्य त्याला दिले. त्याचा सर्वात ज्येष्ठ पुत्र यदू याने वार्धक्य स्वीकारायला नकार देताना जर मी माझे तारुण्य तुम्हाला दिले आणि तुम्ही देवयानीबरोबर भोग भोगलेत तर तुमच्या रूपाने मीँच माझ्या आईबरोबर भोग भोगल्याचे पाप मला लागेल असे सांगितले. तेव्हा संतापून ययातीने त्याला हाकलून दिले. आणि त्याला राज्याचा भागही दिला नाही. भविष्यात राजा बनल्यावर पुरूराजाने आपल्या ज्येष्ठ भावाला, यदूला राज्याचा वाटा दिला. हा यदू राजा अत्यंत नीतिमान आणि श्री दत्तात्रेयांचा असीम भक्त होता. वडिलानी हाकलून दिल्यानंतर तो श्रीदतात्रेयांच्या शोधात भटकत होता. एकदा दक्षिण भारतामध्ये कावेरी नदीच्या परिसरात फिरत असताना त्याला श्रीदत्तात्रेयांनी
अवधूत रूपामध्ये दर्शन दिले. तो त्यांच्या चरणी नतमस्तक झाला आणि , त्याने श्रीतात्रेयांच्या चरणी परमज्ञान देण्याची विनंती केली. त्यावेळी श्रीदतात्रेयांनी त्याला संपूर्ण ज्ञानाचा बोध केला आणि त्याच्यावर पूर्ण कृपा केली. यदुराजाने श्रीदत्तात्रेय यांची शेवटपर्यंत उत्कट भक्ती केली. त्याने धर्माच्या अधीन राहून प्रजेचा पुत्राप्रमाणे सांभाळ करत राज्य केले. त्याचाच वंश पुढे यदु वंश म्हणून प्रख्यात झाला. याच वंशामध्ये पुढे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी जन्म घेतला. यदू हा श्रीदत्तात्रेय यांचा लाडका शिष्य होता आणि त्यांनी त्याला सर्व प्रकारचे ज्ञान आणि ऐश्वर्य प्रदान
केले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

परवाच ययाती परत एकदा वाचून पूर्ण केले.
यदु ची पुढील कथा माहीत नव्हती.
'बोध्या यदुने परशुराम,
साध्यदेव प्रह्लाद अकाम' अशा काहीशा ओळी दत्त बावनीत आहेत खऱ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दत्तावतार हा महाभारतपूर्व आहे ? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खेळ आपला पण बॅट माझी म्हणून नियम माझे... अन्यथा चपला विसरू नका.

होय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही, मित्रमंडळीतल्या सर्व अवधूतांचे दर्शन घ्यावेसे वाटू लागले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यावेळी श्रीदतात्रेयांनी त्याला संपूर्ण ज्ञानाचा बोध केला आणि त्याच्यावर पूर्ण कृपा केली.

अशी ही संपूर्ण ज्ञानं ( अनेकवचन) ओपनसोर्स नव्हती. Sad Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0