पुस्तकांची घरं

गेल्या वर्षीची गोष्ट. दिवाळीच्या जरा नंतरची.

रविवार होता. मह्या आणि मी सद्गुरू स्टाॅलवर भेटायचं ठरवलं होतं. मी ठरल्याप्रमाणे अकरा वाजता पोचलो पण मह्याचा पत्ता नव्हता. इकडेतिकडे बघत मी दोन कटिंग आणि एक गोल्डफ्लेक संपवले तेव्हा कुठे मह्या उगवला.

"काय भेंजो, एवढा काय उशीर?"

"नाय रे, जरा कामात अडकलो," हातातली मोठ्ठी पिशवी कट्ट्यावर ठेवत मह्या म्हणाला. "सांगतो, आधी जरा सुट्टा मारू दे."

मग परत कटिंग आणि सुट्टा यांची एक राउंड झाल्यावर मह्या बोलायला लागला, "समज तुझी एखादी गोष्ट हरवली तर काय करशील?"

"पोलिसात जाऊन कंप्लेन करीन, अजून काय?"

"भेंजो तुझ्याकडचा काय कोहिनूर हरवलाय काय की पोलीस तुझी कंप्लेन लिहून घेणार? एनसीपण नाय करणार."

"मग तूच सांग, काय करणार?"

"तोच पॉईंट आहे - काय नाय करू शकत तू भेंजो. पण आता विचार कर - ती गोष्ट तुला परत मिळाली तर काय वाटेल?"

"छान वाटेल, अजून काय?"

"आणि खूप वर्षांनी परत मिळाली तर?"

"काय गोष्ट आहे त्यावर डिपेंड करतं भेंजो. आता पाच वर्षांपूर्वीचा टीशर्ट मिळाला तर आता एकतर होणार नाय नायतर आऊट ऑफ फॅशन झाला असेल." मह्याच्या डोक्यात काय चाललंय ते मला कळतच नव्हतं. एरवी तो असला कोड्यात नाय बोलत कधी.

"उलटी खोपडी चालते तुझी. थांब, मीच सांगतो. गंमत बघ," मह्याने पिशवीचा बंद सोडला आणि कुठलीकुठली जुनी पुस्तकं बाहेर काडून त्यानी कट्ट्यावर ठेवली. गुलबकावली, जादूचा राक्षस, बहुरंगी करमणूक भाग दोन, टॉम सॉयर, फास्टर फेणे आणि काय काय.

"काय भेंजो? स्कॉलर कधीपासून झाला तू? साला शाळा-कॉलेजची पुस्तकं आणि स्पोटस्टार सोडून कायतरी वाचलंयस का रे तू?" मी आश्चर्यानी विचारलं आणि मग ऍड केलं, "विकिपीडिया नाय, पुस्तकं म्हणतोय मी."

"जरा धीर धर रे. हे बघ काय," मह्यानी टॉम सॉयर उघडलं आणि पहिल्या पानावर लिहिलेलं दाखवलं - "कुमारी रेवती देशमुख हीस वाढदिवसानिमित्त सप्रेम भेट. १२ मार्च १९९५." मला काही बोलू न देता त्यानी बहुरंगी करमणूक भाग दोन उघडलं. "इयत्ता सातवीत सामाजिक अभ्यासात प्रथम क्रमांकाबद्दल चि. प्रथमेश वाघमारे यास" आणि खाली एरीयातल्या एका शाळेचा रबर स्टॅम्प.

"आता काम सुरू करूया," मह्या म्हणाला "फेसबुकवर शोध प्रथमेश वाघमारे." माझी ट्यूब थोडीशी पेटली. लगेच ओप्पो काढला आणि शोधायला लागलो. ठाण्यातले आठ प्रथमेश वाघमारे सापडले. त्यातले दोघे शाळेत पहिले यायचा चान्सच नव्हता असं प्रोफाइलवरून वाटत होतं. अजून दोघे डोरेमॉन आणि छोटा भीम बघायच्या जनरेशनचे होते. बाकी चार जणांना मह्यानी माझ्या फोनवरून मेसेज लिहिला "तुमच्या शालेय जीवनातील आठवणीचा अमूल्य ठेवा आम्हाला मिळालाय. आम्ही तो तुम्हाला परत करू इच्छितो. आम्ही केलेल्या खर्चाबद्दल आणि आम्हाला पडलेल्या तसदीबद्दल स्वेच्छेने सुयोग्य रक्कम द्याल याची आम्हाला खात्री आहे." भेंजो गरज पडेल तेव्हा स्कॉलरसारखं लिहू शकतो मह्या !

दहा मिनिटात एका प्रथमेश वाघमारेचा प्रचंड खूष होऊन रिप्लाय आला. त्यानी लगेच फोन करा अशी रिक्वेस्ट केली होती. मह्यानी फोन केला तर प्रथमेश अगदी सद्गदित झाला होता. "इतिहास-भूगोलाच्या लोंढे बाईंचा मी लाडका विद्यार्थी होतो. त्यांनी स्वहस्ते दिलेलं हे पुस्तक. शिफ्टिंगमध्ये हरवलं तेव्हा एवढं वाईट वाटलं. तुमचे उपकार कधी विसरणार नाही," वगैरे बोलू लागला. त्यानी पुस्तक पाठवायला पत्ता लगेच मेसेज केला आणि गूगलपेनी हजार रुपये पाठवले. आम्हीपण मग जण्टलमनसारखं पुस्तक लगेच कुरियर केलं.

मग कुमारी रेवती देशमुख शोधू लागलो. तीन सापडल्या फेसबुकवर पण मेसेज केले तर कोणाचाच रिप्लाय नाय आला. कुमारी रेवती देशमुखने सौ झाल्यावर नाव बदललं की काय काय माहिती.

मग आम्ही स्ट्रॅटजी ठरवली आणि रद्दीच्या दुकानांमधे जाऊन पुस्तकं शोधू लागलो. मुलग्यांची नाव बघायची. मुलींची पुस्तकं बाबांचं नावसुद्धा असेल तरच घ्यायची. चार-पाच पुस्तकांमधला एकतरी जण पैसे देऊन पुस्तक घ्यायचा. मग एकदोन दुकानांशी डील केलं की पुस्तक परत दिलं तर पन्नास टक्के पैसे परत मिळणार.

तीन महिन्यात आम्ही नेट चोवीस हजार रुपये कमावले आणि बावन्न पुस्तकं त्यांच्या जुन्या घरी पोचवली. मग मह्याची मार्च एन्डची कामं सुरू झाली आणि आम्ही बिझनेस पॉझ केला.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय पण उद्योग काढलाय ... !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मह्याचे उद्योग कधी सरळ असतात काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मह्याच्या उद्योगांना स्वप्नरंजनही म्हणता येत नाही. माझ्या स्वप्नातही असल्या कल्पना येत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आश्चर्य!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

झकास

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा क्लास!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0