फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६
फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६
.
१) एबीपीमाझावर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मिळणा-या मिसळीचे प्रकार दाखवत होते. नाशिकच्या एका ठिकाणच्या मिसळीमध्ये चिवडा, पोहे वगैरे काहीच नसते. मोड आलेली वेगवेगळी कडधान्ये, वेगवेगळ्या प्रकारची शेव, तर्री. मोड आलेल्या कडधान्यांवर एक निखारा ठेवलेली पणती, त्यापासून येणारा धूर आत कोंडावा म्हणून वरून झाकण. त्याचा वेगळाच स्वाद येतो. अशा प्रकारे आपल्याला हवे तसे कमी-अधिक तिखट करून घेता येते
मग ते झाल्यावर ठाणे, पुणे वगैरे टिकाणच्या.
इंग्रजी किंवा इतर कोणत्याही चॅनलवर अशा कार्यक्रमांमध्ये दाखवले जाणारे टीव्हीवाल्यांचे चवीचे रसिक सहसा सडपातळ नसतात; किंबहुना सडपातळ म्हणता येईल याच्या जवळपासही नसतात, यामागचे रहस्य काय असावे?
दुसरी गोष्ट म्हणजे हे खवैय्ये विविध पदार्थ चाखताना उऽऽऽम, वगैरे प्रशंसादर्शक, मादक आवाज काढत असतात, त्यावेळी त्यांच्या कॅमेरामनच्या तोंडाला किती पाणी सुटत असेल. की आधी कॅमेरामनचा पोटोबा शांत करून हे शुटिंग केले जाते? मला विमानतल्या हवाईसुंद-या, रेस्टॉरंटमधले वेटर्स यांच्याबाबतही नेहमी हाच प्रश्न पडतो. त्यांच्यापैकी कोणी पदार्थ वाढताना सारखे आवंढे गिळताना दिसत नाही.
यातला सर्वात मोठा व क्रूर विरोधाभास म्हणजे इकडे हे लोक मिटक्या मारत मिसळ खाण्याचे आधीच रेकॉर्ड केलेले चित्रीकरण दाखवले जात असताना खालच्या पट्टीत काश्मीरमधील कुपवाडात झालेल्ता चकमकीत एक चांदवडचा तर दुसरा विजापूरचा असे दोन जवान मृत झाल्याची व एक मेजर पदाचा अधिकारी गंभीर जखमी झाल्याची बातमी दाखवली जात होती.
यावेळी मात्र सांगलीकडचे कुपवाड आणि काश्मिरातले कुपवाडा यांच्यात गल्लत न करण्याइतके टीव्हीवाले शहाणे झालेले दिसत होते.
२) देशद्रोह म्हणजे नक्की काय ते एकदा ठरवण्याची वेळ आली आहे. देशद्रोह म्हणजे देशाबाहेरच्या शक्तींशी संधान साधून त्यांना संवेदनशील माहिती पुरवणे एवढाच आहे का?
‘कोणी पादले तरी तो देशद्रोह समजला जाईल’ अशी पोस्टही या निमित्ताने पाहण्यात आली. त्यांना हा प्रश्न खडसावून विचारला पाहिजे. केवळ इतरांचा द्वेष करायचा या एकमेव भुमिकेतून विविध पक्षात विभागलेले दलित एकत्र येऊन इतरांचा द्वेष पसरवण्याच्या स्वत:च्या अजेंड्यात साथ देत नाहीत म्हणून थयथयाट करणारे हे महाभाग कळतनकळत या देशद्रोह्यांनाच साथ देत आहेत. त्यामुळे ख-या देशद्रोह्यांवर टीका केली तरी यांच्या पोटात दुखताना दिसते. त्यातूनच कोणी पादले तरी त्याला हे सरकार देशद्रोह समजेल काय अशा हास्यास्पद फुसकुल्या हे महाशय फोडताना दिसतात.
या महाशयांच्या वॉलवर त्यांचे समविचारी मित्र इतर जातीयांचा द्वेष करणा-या कमेंट्स सर्रास महात्मा फुले इत्यादींच्या नावावर नियमितपणे खपवताना दिसतात आणि त्याला यांची अजिबात हरकत नसते. मी कुठल्याही जातीच्या आधारावरील संघटनाविरूद्ध आहे, कारण ते एकूण समाजाच्या हिताचे नाहीच. पण हे महाशय ब्राह्मणांच्या एकत्र येण्याच्या आवाहनांच्या पोस्ट्स वेचून वेचून एकत्र करतात व त्यावर त्यांचे समविचारी मित्र वर उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मणविरोधी कमेंट्स करतात. याला अर्थातच यांची हरकत नसते. मात्र इतरत्र ब्राह्मणांवर जहरी टीका करणा-या पोस्ट्सही इतरत्र सर्रास दिसत असताना त्यात मात्र यांना काही वावगे दिसत नाही. यांच्या स्वत:च्या वॉलवर हा एकांगी प्रकार नेहमीच जळत असताना यांची देशद्रोहाबद्दलची किंवा देशविरोधाची संवेदनाच बधीर झालेली दिसते यात काय आश्चर्य?
जेएनयुमधील विद्यार्थ्यांचे वर्तन देशविरोधी घोषणा वा दहशतवादावरून फाशी झालेल्यांच्या समर्थनार्थ घोषणा देणे हे देशद्रोही वर्तनच समजले पाहिजे. या पार्श्वभुमीवर जेएनयुमध्ये देशविरोधी स्वरूपाच्या घोषणा देणा-यांवर कारवाई करण्याची केन्द्र सरकारच्या भुमिकेचे स्वागतच करायला हवे. त्याचबरोबर या देशद्रोह्यांच्या समर्थनासाठी वेगवेगळे मुखवटे चढवून कोण पुढे येते यावरदेखील लक्ष ठेवले पाहिजे.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे हैद्राबाद विद्यापीठातील त्याच्या संघटनेने याकूब मेमनच्या फाशीला मानवतेच्या आधारावर समर्थन करण्याच्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले गेले किंबहुना पाठीशी घातले गेले. असे समर्थन करण्याच्या उद्योगांमुळे तोही देशद्रोही होता का असा प्रश्न विचारला गेला. डॉ. आंबेडकरांचे नाव तुमच्या संघटनेला देता, त्यांचे कार्य जरूर पुढे न्या, मात्र त्यांच्या नावाची ढाल पुढे करून तुमचे सगळेच उद्योग पवित्र करून घेतले जातील या भ्रमात राहू नका हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे.
अभाविपचे कोठे चुकत असेल, तर ते जरूर दाखवून द्या, त्यांच्या हातून काही गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य घडत असेल, तर ते करणा-या त्यांच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर जरूर कारवाई करा. मात्र ते करतात ते सगळेच चूक आणि आम्ही राजकीय चळवळीत असूनही वेळ आली की सोयीप्रमाणे दलित, कम्युनिस्ट वगैरे चेहरे मिरवणार आणि स्वत:ला सरसकट निर्दोष, अभागी म्हणवून घेणार. हे यापुढे फार काळ चालेल असे वाटत नाही.
मुळात या मुलांना या वाटेने जाण्यास प्रोत्साहन देणारे कोण आहे हे शोधायला पाहिजे.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे निमित्त झाल्यामुळे हैद्राबाद विद्यापीठात दिवसभर ‘उपोषण’ करणारा नाटकी पप्पू काल जेएनयुमध्येही आला, कारण येथेही भाजपचा निषेध करण्याची संधी त्याला दवडायची नव्हती. मात्र ज्या विद्यार्थानी तेथे देशविरोधी घोषणा दिल्या त्याबद्दल तो काही बोलला नाही.
या लोकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य नेहमी देशद्रोह्यांच्या किंवा दहशतवाद्यांची भलावण करण्यातच कसे खर्ची होते, हा प्रश्न कोणालाच कसा पडत नाही?
जेएनयुसारखी विद्यापीठे ही डावे विचार असलेल्यांचा बालेकिल्ला मानली जातात, त्यामुळे डी. राजा, सीताराम येचुरी हे तेथील कारवाईवरून चिडणे साहनिकच आहे. पण कुठली कृत्ये देशहिताची नाहीत हे समजण्याइतकी समज कॉंग्रेसकडे; जो राष्ट्रीय पक्ष म्हणवतो; नसावी? पप्पूच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष म्हणून किती दिशाहीन झाला आहे याचेच हे लक्षण आहे.
जेएनयुमधून पास झालेल्या आर्मीतल्या बुजुर्ग निवृत्त अधिका-यांनीही तेथे चाचलेल्या देशविरोधी उद्योगांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे व असेच प्रकार चालू राहिले तर आम्हाला या विद्यापीठाकडून मिळालेल्या पदव्या परत कराव्या लागतील असे त्यांनी सांगितले आहे.
३) द्रमुक – कॉंग्रेसची हातमिळवणी देशाला लुटणारे पुन्हा एकत्र
तामिळनाडुतल्या आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी द्रमुक व कॉंग्रेसच्या युतीची आज घोषणा झाली. याच दुकलीने मनमोहनसिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेच्या आड देशाला लुटले होते. लुटले होते हा शब्दही तोकडा ठरावा इतके लुटले होते.
२जी घोटाळे उघड झाल्यावर द्रमुकचे तोन मंत्री थोडाकाळ गजाआड गेल्यामुळे या दोन पक्षांमध्ये वितुष्ट असल्याचे चित्र होते. मात्र आता निवडणुका जवळ आल्या की हे दोन्ही लुटारू पुन्हा एकत्र आलेले आहेत.
या मैत्रीवरून पप्पूला कोणी विचारल्याचे ऐकिवात नाही. त्याच्या पक्षाने च द्रमुकने केलेल्या लुटालुटीची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे काही बोलणे योग्य नसल्याचे कारण पप्पू देईल.
इकडे अशा अभद्र युत्या, तिकडे पंजाबात भाजपही अकाली दलाशी असलेली युती सोडेल अशी चिन्हे नाहीत. अकाली दलानेही पंजाबला व पंजाबातील तरूणांना देशोधडीला लावण्यात कसलीच कसर सोडलेली नाही. महाराष्ट्रात यापूर्वी भाजप शिवसेनेच्या भ्रष्टपणाच्या व गुंडगिरीच्या दावणीला बांधलेला होता, तोच प्रकार त्यांच्याबाबतीत पंजाबमध्ये झाला आहे. पंजाबात अमरिंदरसिंग यांच्या नेतृवाखाली कॉंग्रेसचे सरकार येऊन त्यांनी तरी तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी इच्छा आहे.
४) थॅचर यांच्या ख्रिसमसचे जबरदस्तीचे पाहुणे
टिम बेल हे ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे मित्र व सल्लागारही. त्यामुळे सलग जवळजवळ १२ वर्षे त्यांना थॅचर यांच्या निवासस्थानी ख्रिसमस साजरा करावा लागला.
पहिल्या वर्षी त्यांना जेव्हा यासाठीचे निमंत्रण मिळाले तेव्हा त्यांना कोण आनंद झाला होता. पंतप्रधानांच्या घरचा ख्रिसमस. परंतु त्यानंतर सलग एवढी वर्षे त्यांच्याकडेच ख्रिसमस साजरा करावा लागल्यामुळे व त्यात अगदी तोचतोचपणा असल्यामुळे व एकूणच रडाळपणा असल्यामुळे ते इतके कंटाळले होते की आता थॅचर पंतप्रधानपदी न राहतील तर बरे असे त्यांना झाले होते.
५) व्हॅलेंटाइन डे आपल्याकडे का साजरा करावा? अगदी कोणी पती पत्नी नसले तरी एकमेकांचे वाढदिवस असतात. त्याव्यतिरिक्त साजरे करायला सतत काही ना काही निमित्त लागते हेच त्यामागचे कारण असते. पतीपत्नींना एकमेकांच्या वाढदिवसाशिवाय लग्नाचा वर्धापनदिन तरी असतो, आमचे काय ही प्रेमींची अडचण असावी.
पण एखाद्या दिवशी ठरवून आपले प्रेम व्यक्त करायचे यातच कृत्रिमपणा येत नाही का? की तो कृत्रिमपणाही आजकाल आवश्यक झाला आहे?
नक्की कुठचं
नक्की कुठचं देशद्रोही/देशविरोधी विधान केलं कन्हैय्याने? तुम्हाला त्याचं भाषण विशेष आवडलं नाही, तुम्हाला त्यांचं भाषण आवडणारे लोक तिरस्करणीय वाटतात हे जितक्या जहालपणे आणि आक्रमकपणे तुम्ही सांगितलेलं आहे, त्यापेक्षा बऱ्याच सौम्यपणे आणि शांतपणे लोकांनी तुमचं लिखाण आवडलेलं नाही असं सांगितलेलं आहे. जो अधिकार तुम्ही स्वतःसाठी घेत आहात तो लोकांनी वापरला की त्याविरुद्ध बोंबा मारायच्या हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे.
फुसके बार –०६मार्च२०१६ शुभेच्छा! (या मात्र ख-या शुभेच्छा आहेत)
फुसके बार – ०६ मार्च २०१६
.
१) आधुनिक संस्कार
पालकांकडून मुलांवर चांगले संस्कार होणे अपेक्षित आहे असे नेहमी म्हटले जाते. हे झाले त्यांच्या सवयींबद्दल, वर्तनाबद्दल. मात्र आता आणखी एक संस्कार गरजेचा झाला आहे. तो म्हणजे चांगल्या आरोग्याचा. याची गरज निर्माण झाली आहे ती आजकालच्या आधुनिक जीवनशैलीमुळे.
आज काय दिसते?
बाळ अगदी लहान असले तरी त्याचा ‘त्रास’ होऊ नये म्हणून त्याच्या हातात मोबाईल देऊन त्यावर कुठला तरी व्हिडियो लावून देणे अगदी सोपे. मग ते बाळ ते पाहण्यात चांगले रमते. मग आई किंवा बाबाही खुश व आपापली कामे करण्यास मोकळे. मात्र यामुळे त्या मुलांचे डोळे लवकर बिघडून वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षीच त्यंना जाड चष्मा लागतो असे सांगितले जात आहे.
दुसरे म्हणजे अनेक पालकांच्याच खाण्या-पिण्याच्या सवयी अशा की त्यांच्याकडे वाढणा-या त्यांच्या मुलांना डायबेटिस वगैरे अगदी कमी वयात जडावा.
अशा वातावरणात वाढलेल्या मुलांना या गोष्टींची इतकी सवय झालेली असते की त्यांना त्यात काही वावगे वाटणे कठीणच. त्यांना मोठेपणीही आत्मभान आलेच नाही, तर ते सांगू शकतील की आईवडलांनी आम्हाला बाकी काही नाही तरी डायबेटीस तरी दिला. डोळ्याचा मोठा दोष तरी दिला. दोघांकडेही तो आनुवंशिकपणे आलेला असला-नसला तरीही.
२) लटकलेली पिढी
याचाच दुसरा भाग म्हणून उद्याची तरूणांची एक मोठी संख्या त्यांच्या आईवडलांना आणखी एका गोष्टीबद्दल जबाबदार धरणार आहे. की घरात इंग्रजी बोलण्याचे वातावरण नसताना व तुमचे इंग्रजी चांगले नसतानाही आम्हाला जबरदस्तीने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा आग्रह धरलात.
आमच्या वैयक्तिक मर्यादांमुळे आम्ही काही या इंग्रजी माध्यमातून शिकल्यामुळे परदेशी जाणार नव्हतो, ना आमच्या सभोवतालच्या वातावरणामुळे आम्ही इंग्रजीतही पारंगत झालो. कामापुरते इंग्रजीतर आम्ही मराठी माध्यमातूनच शिकू शकलो असतो. पण तसे न केल्यामुळे, म्हणजे इंग्रजी माध्यमातूनच शिकण्याच्या केवळ तुमच्या अट्टाहासामुळे आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या कुठलेच राहिलेलो नाहीत. शिवाजीचा स्फूर्तीदायक इतिहासही इंग्रजीतून शिकल्यामुळे आमची नाळ त्यांच्याशी कधी जोडली गेलीच नाही. शिवाय ना आम्हाला मराठीतील काही चांगले वाङ्मय माहित झाले. मग मराठीतले काही अस्खलितपणे वाचता येते, समजणे वगैरे तर दूरच.
३) कन्हैयाची जीभ कापून आणण्यासाठी इनाम जाहिर करणा-या युवा शाखेच्या पदाधिका-याला भाजपने पक्षातून तातडीने काढून योग्यच केले. आता यापुढे साक्षी माहाराज, आदित्यनाथ, ही साध्वी, ती साध्वी किंवा इतर नेते मग ते आमदार, खासदार, मंत्री असोत, त्यांच्यावरही अशीच कडक कारवाई केली जावी व तेही वेळ न दवडता.
४) दिल्ली - सॅनफ्रान्सिस्को या लांब पल्ल्याच्या फ्लाइटमध्ये पायलट्ससह सर्व महिला कर्मचारी नेमण्याचा उपक्रम एअर इंडियाने नुकताच केला. एअर इंडियाने महिला दिन थोडा आधीच साजरा केलेला दिसतो. अभिनंदन.
५) नद्यांचा संगम या कल्पनेवर कोणी काही शृंगारिक काही लिहिल्याचे पाहण्यात आहे काय?
६) मनोज कुमार यांना चित्रपटसृष्टीतला सर्वात मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्या पुरस्काराची रया पार घालवण्यात आली आहे. डोळ्यात अश्रू येण्याच्या गंभीर प्रसंगाच्यावेळी चेह-यावरचे भाव दाखवायलाच नकोत, म्हणून चक्क हाताने चेहरा झाकण्याची अद्भुत शैली असणारा हा धन्य अभिनेता. जे चित्रपट गाजले ते त्यांच्या संगीतामुळे. बटबटीतपणे का होईना पण देशप्रेमाचा संदेश देणारे चित्रपट काढण्यामुळे त्यांना भारतकुमार असे नामाभिमान मिळाले हीच काय ती त्यांची जमेची बाजू.
संपादक असलेल्या इथल्या काही सदस्यांना माझ्या कन्हैयाकुमारच्या भाषणाशी संबंधित एका पोस्टमध्ये जेएनयुच्या एका वरिष्ठ प्राध्यापकाच्या उघडउघड देशविरोधी भुमिकेचा जो उल्लेख केला त्यात तरी तो वरीष्ठ प्राध्यापक आहे म्हणून यांना त्याच्या भुमिकेत काहीही वावगे वाटत नाही असे दिसते आहे. संपादकांनी मागेही एका गुंड राजकारण्याला गुंड म्हटले म्हणून माझी पोस्ट परस्पर एडिट केली होती. गुंडाला गुंड म्हणण्याचे पुरावे मागितले तर तेही दिले. तरीही तो उल्लेख परस्पर काढून टाकला. त्याबद्दल लिहिलेली कमेंटही डिलिट केली होती. इथे हे सहन करू शकत नाहीत, तेही स्वत:च्याच मनातल्या बागुलबुवामुळे आणि निघालेत कन्हैयाच्या हिरोगिरीचे कौतुक करायला आणि जेएनयुच्या त्या देशविरोधी प्राध्यापकाची भलावण करायला. ही यांच्या धाडसाची परिसीमा.
आताही मी जे लिहिले त्याला 'गरळ' ठरवण्याच्या व ते येथे ऐसीवर नको असे पुन्हापुन्हा म्हणण्याच्या त्यांच्या हेतुमध्ये मला असेच काळेबेरे दिसत आहे. असा देशविरोधी लोकांना उद्देशून मूर्ख, बेअक्कल असे शब्द वापरले तरीही त्यांना त्यात आक्षेपवाटतो. अशा देशविरोधी कम्युनिस्ट लोकांबद्दल मी येथे यापेक्षा आणखी कोणते तीव्र भावना दर्शवणारे शब्द वापरू इच्छित नाही हिच माझी मजबुरी आहे. तरीही एका संपादकांना तर ती पोस्ट इतकी क्षक्षक्ष वाटली (त्यांनी वापरलेली विशेषणांची लांबलचक यादी पाहण्यातच मजा आहे तरीही तेयेथे देतो - 'संपूर्ण लेख म्हणजे गरळ, जळफळाट, विखार, मळमळ, तडफड, लोकांना अनाठायी मूर्ख म्हणणं यामुळे अत्यंत बेताल आणि कुरुप भाषेचा झालेला आहे. संपूर्ण वाचवतही नाही. भुक्त हा शब्द चाळीसेक वेळा तरी आलेला आहे. पण त्याचा अर्थ काही कळत नाही. मला त्याचा अर्थ 'जेवलेला' असा वाटतो. पण राकुंनी तो काहीतरी शिवी थुंकल्यासारखा वापरलेला दिसतो.') की ती त्यांना पूर्ण वाचावीशीही वाटली नाही. याचे मुख्य कारण हे मी त्या पोस्टमध्ये स्वत:चे डोके गहाण टाकून स्वत:च्या काही ठराविक समजुतींपायी दुस-याला लेबले लावण्यात व दुस-याला विरोध करण्यात तत्पर असणा-यांना उद्देशून भुक्त हा शब्द वापरला आहे. तो शब्द त्या पोस्टमध्ये कितीवेळा आला हे मी नाहीतरी या संपादक सदस्यांपैकी एकांनी मोजले.
येथे आजवर या व इतर सदस्यांनी मला अनेकदा लेबले लावली. त्यात या पोर्टलचा दर्जा चांगलाच राखला गेला. पोस्टमध्ये काय लिहिले आहे त्यावर भाष्य करण्याऐवजी माझ्यावर, माझ्या हेतुवर कमेंट्स करण्यामध्येही हा दर्जा चांगलाच राखला गेला. आता मी या मंडळींना उद्देशून भुक्त हा शब्द प्रथमच वापरला तरी हे लोक बिथरलेले दिसतात. हा सगळा प्रकारच निषेधार्ह आहे.
'सदर' हा प्रकार या पोर्टलवर चालू करण्यासाठीचे कोडिंग वगैरे चालू असल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये मी फुसके बारच्या पोस्ट येथे म्हणजे एकाखाली एक अशा पद्धतीने टाकत आहे. तेव्हा वरील प्रकार पाहता कमीत कमी 'सदर' हा प्रकार चालू होईपर्यंत तरी या पोर्टलवर काहीही न लिहिण्याचे ठरवले आहे. यामागे वर उल्लेख केलेली संपादक-सदस्यांची भुमिका मला मान्य नाही हे प्रमुख कारण आहे.
पुन्हा लिहीपर्यंत भुक्त लोक दर्जा-दर्जा खेळत बसतीलच. देशविरोधी विधानांना विरोध केल्यावर व वर उल्लेख केलेल्या मानसिकतेला भुक्त म्हणल्याबद्दल बिथरल्याने त्यालाच गरळ ठरवून तर हा दर्जा निश्चितच राखला गेला आहे.
शुभेच्छा! (या मात्र ख-या शुभेच्छा आहेत).
@राजेश कुलकर्णी - तुमचं
@राजेश कुलकर्णी - तुमचं लिखाण सार्वजनिक डोमेन मध्ये आहे म्हणून प्रतिक्रिया देतो . मी तुमच लिखाण बरयाच दिवसांपासून वाचतो . तुमच्या लिखाणात अगोदर (मत कितीही टोकाची असली तरी ) एक सौम्यपणा होता . हल्ली त्यात प्रचंड कडवटपणा , नकारात्मकपणा , दिसतो . तुमचे लिखाण संस्थळावर पोस्ट करून मग त्यावर येणाऱ्या प्रतीसादाना ठोकण्याचा अट्टाहास तुमच्या मानसिकतेवर परिणाम करत आहे . Its taking toll on your peace of mind . आता तुम्हीच विचार करा (इगो मध्ये न येऊ देता ) की is it worth . मला वाटत उत्तर नकारात्मक येईल . तुमच लिखाण फेबु साठी योग्य आहे संस्थळासाठी नाही हे वैयक्तिक मत आहे . तुम्हाला तुमची मानसिक शांती लवकर मिळो . त्यासाठी उचलायचे पहिले पाऊल काय आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीच .
अगदी खरं!
अगदी खरं!
शेवटी शेवटी राकुंचा हटवादीपणा वाढत गेला होता.
तसेच ते एकच एक विचारसरणीचा प्रसार करतायत हे स्पष्ट दिसतही होते.
फेसबुकवर मी कुणाच्या वॉलवर जात नाही, माझ्या वॉलवर कोण लिहीणार ते मीच ठरवणार वगैरे हट्ट चालू शकतात.
सो कॉल्ड स्वाभिमानी बाणा जोपासता येतो.
पण ऐसी किंवा तत्सम 'चावडी' स्वरूपाच्या संस्थळावर नाही. गावातल्या चावडीवर कुणी एकटंच सतत बडबड करू लागला तर बाकीचे वैतागून जातात.
माझ्याकडे दुर्लक्ष करा असे तुम्ही भर चावडीत सांगू शकत नाही. अशी स्वांतसुखाय बडबड मग आपापल्या घरात करावी.
त्याचप्रमाणे माझ्या पोस्टवर येऊ नका असे तुम्ही ऐसी किंवा तत्सम संकेतस्थळावर सांगू शकत नाही.
त्याचप्रमाणे सतत वैचारिक किंवा नकारात्मक पोस्ट्स लिहित असाल तर बाकीचे वैतागणारच. सगळ्यांसोबत रहायचंय तर अधूनमधून इतरांच्या लेखनावर पण प्रतिक्रीया दिल्या पाहिजेत. तुम्ही इतरांच्या मिसळत असाल, त्यांच्या पोस्टवर बर्यावाईट प्रतिक्रीया देत असाल, कुठल्या विनोदावर खरेच हसू आले तर हसत असाल (शिष्ट प्रतिमा जपण्यासाठी मुद्दाम विनोदाकडे दुर्लक्ष करत नसाल) कधी स्वतःवरची माफक आणि योग्य टीकाही खेळीमेळीने घेत असाल तर मध्येमध्ये खडूस पोस्टस टाकल्या तरी लोक आकस ठेवत नाहीत. (असा स्वानुभव आहे :) )
ना ना ना. निहलानींच समर्थन मी
In reply to अभिव्यक्ती स्वातंत्र्याची by विषारी वडापाव
ना ना ना. निहलानींच समर्थन मी करणार नाही. पण सेंसर बोर्ड आणि इतर हा वाद जुना आहे. सिगारेटची/दारूची दृश्य, प्राण्यांचे सीन्स हे वाद बरेच जुने आहेत. मला शिवराळ भाषेबद्द्ल फार आक्षेप नाही. उलट रांगडी भाषा वाटते. एनीवे ते कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्मचं फीचर आहे. अदगी उमेरिकेतपण ट्विटरवर अर्वाच्च भाषेत प्रतिक्रिया येतात. ही अभिव्यक्तिस्वांतंत्र्याची गळचेपी नाही.