Skip to main content

फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६
.

१) एबीपीमाझावर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मिळणा-या मिसळीचे प्रकार दाखवत होते. नाशिकच्या एका ठिकाणच्या मिसळीमध्ये चिवडा, पोहे वगैरे काहीच नसते. मोड आलेली वेगवेगळी कडधान्ये, वेगवेगळ्या प्रकारची शेव, तर्री. मोड आलेल्या कडधान्यांवर एक निखारा ठेवलेली पणती, त्यापासून येणारा धूर आत कोंडावा म्हणून वरून झाकण. त्याचा वेगळाच स्वाद येतो. अशा प्रकारे आपल्याला हवे तसे कमी-अधिक तिखट करून घेता येते

मग ते झाल्यावर ठाणे, पुणे वगैरे टिकाणच्या.

इंग्रजी किंवा इतर कोणत्याही चॅनलवर अशा कार्यक्रमांमध्ये दाखवले जाणारे टीव्हीवाल्यांचे चवीचे रसिक सहसा सडपातळ नसतात; किंबहुना सडपातळ म्हणता येईल याच्या जवळपासही नसतात, यामागचे रहस्य काय असावे?

दुसरी गोष्ट म्हणजे हे खवैय्ये विविध पदार्थ चाखताना उऽऽऽम, वगैरे प्रशंसादर्शक, मादक आवाज काढत असतात, त्यावेळी त्यांच्या कॅमेरामनच्या तोंडाला किती पाणी सुटत असेल. की आधी कॅमेरामनचा पोटोबा शांत करून हे शुटिंग केले जाते? मला विमानतल्या हवाईसुंद-या, रेस्टॉरंटमधले वेटर्स यांच्याबाबतही नेहमी हाच प्रश्न पडतो. त्यांच्यापैकी कोणी पदार्थ वाढताना सारखे आवंढे गिळताना दिसत नाही.

यातला सर्वात मोठा व क्रूर विरोधाभास म्हणजे इकडे हे लोक मिटक्या मारत मिसळ खाण्याचे आधीच रेकॉर्ड केलेले चित्रीकरण दाखवले जात असताना खालच्या पट्टीत काश्मीरमधील कुपवाडात झालेल्ता चकमकीत एक चांदवडचा तर दुसरा विजापूरचा असे दोन जवान मृत झाल्याची व एक मेजर पदाचा अधिकारी गंभीर जखमी झाल्याची बातमी दाखवली जात होती.

यावेळी मात्र सांगलीकडचे कुपवाड आणि काश्मिरातले कुपवाडा यांच्यात गल्लत न करण्याइतके टीव्हीवाले शहाणे झालेले दिसत होते.

२) देशद्रोह म्हणजे नक्की काय ते एकदा ठरवण्याची वेळ आली आहे. देशद्रोह म्हणजे देशाबाहेरच्या शक्तींशी संधान साधून त्यांना संवेदनशील माहिती पुरवणे एवढाच आहे का?

‘कोणी पादले तरी तो देशद्रोह समजला जाईल’ अशी पोस्टही या निमित्ताने पाहण्यात आली. त्यांना हा प्रश्न खडसावून विचारला पाहिजे. केवळ इतरांचा द्वेष करायचा या एकमेव भुमिकेतून विविध पक्षात विभागलेले दलित एकत्र येऊन इतरांचा द्वेष पसरवण्याच्या स्वत:च्या अजेंड्यात साथ देत नाहीत म्हणून थयथयाट करणारे हे महाभाग कळतनकळत या देशद्रोह्यांनाच साथ देत आहेत. त्यामुळे ख-या देशद्रोह्यांवर टीका केली तरी यांच्या पोटात दुखताना दिसते. त्यातूनच कोणी पादले तरी त्याला हे सरकार देशद्रोह समजेल काय अशा हास्यास्पद फुसकुल्या हे महाशय फोडताना दिसतात.

या महाशयांच्या वॉलवर त्यांचे समविचारी मित्र इतर जातीयांचा द्वेष करणा-या कमेंट्स सर्रास महात्मा फुले इत्यादींच्या नावावर नियमितपणे खपवताना दिसतात आणि त्याला यांची अजिबात हरकत नसते. मी कुठल्याही जातीच्या आधारावरील संघटनाविरूद्ध आहे, कारण ते एकूण समाजाच्या हिताचे नाहीच. पण हे महाशय ब्राह्मणांच्या एकत्र येण्याच्या आवाहनांच्या पोस्ट्स वेचून वेचून एकत्र करतात व त्यावर त्यांचे समविचारी मित्र वर उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मणविरोधी कमेंट्स करतात. याला अर्थातच यांची हरकत नसते. मात्र इतरत्र ब्राह्मणांवर जहरी टीका करणा-या पोस्ट्सही इतरत्र सर्रास दिसत असताना त्यात मात्र यांना काही वावगे दिसत नाही. यांच्या स्वत:च्या वॉलवर हा एकांगी प्रकार नेहमीच जळत असताना यांची देशद्रोहाबद्दलची किंवा देशविरोधाची संवेदनाच बधीर झालेली दिसते यात काय आश्चर्य?

जेएनयुमधील विद्यार्थ्यांचे वर्तन देशविरोधी घोषणा वा दहशतवादावरून फाशी झालेल्यांच्या समर्थनार्थ घोषणा देणे हे देशद्रोही वर्तनच समजले पाहिजे. या पार्श्वभुमीवर जेएनयुमध्ये देशविरोधी स्वरूपाच्या घोषणा देणा-यांवर कारवाई करण्याची केन्द्र सरकारच्या भुमिकेचे स्वागतच करायला हवे. त्याचबरोबर या देशद्रोह्यांच्या समर्थनासाठी वेगवेगळे मुखवटे चढवून कोण पुढे येते यावरदेखील लक्ष ठेवले पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे हैद्राबाद विद्यापीठातील त्याच्या संघटनेने याकूब मेमनच्या फाशीला मानवतेच्या आधारावर समर्थन करण्याच्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले गेले किंबहुना पाठीशी घातले गेले. असे समर्थन करण्याच्या उद्योगांमुळे तोही देशद्रोही होता का असा प्रश्न विचारला गेला. डॉ. आंबेडकरांचे नाव तुमच्या संघटनेला देता, त्यांचे कार्य जरूर पुढे न्या, मात्र त्यांच्या नावाची ढाल पुढे करून तुमचे सगळेच उद्योग पवित्र करून घेतले जातील या भ्रमात राहू नका हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे.

अभाविपचे कोठे चुकत असेल, तर ते जरूर दाखवून द्या, त्यांच्या हातून काही गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य घडत असेल, तर ते करणा-या त्यांच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर जरूर कारवाई करा. मात्र ते करतात ते सगळेच चूक आणि आम्ही राजकीय चळवळीत असूनही वेळ आली की सोयीप्रमाणे दलित, कम्युनिस्ट वगैरे चेहरे मिरवणार आणि स्वत:ला सरसकट निर्दोष, अभागी म्हणवून घेणार. हे यापुढे फार काळ चालेल असे वाटत नाही.

मुळात या मुलांना या वाटेने जाण्यास प्रोत्साहन देणारे कोण आहे हे शोधायला पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे निमित्त झाल्यामुळे हैद्राबाद विद्यापीठात दिवसभर ‘उपोषण’ करणारा नाटकी पप्पू काल जेएनयुमध्येही आला, कारण येथेही भाजपचा निषेध करण्याची संधी त्याला दवडायची नव्हती. मात्र ज्या विद्यार्थानी तेथे देशविरोधी घोषणा दिल्या त्याबद्दल तो काही बोलला नाही.

या लोकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य नेहमी देशद्रोह्यांच्या किंवा दहशतवाद्यांची भलावण करण्यातच कसे खर्ची होते, हा प्रश्न कोणालाच कसा पडत नाही?

जेएनयुसारखी विद्यापीठे ही डावे विचार असलेल्यांचा बालेकिल्ला मानली जातात, त्यामुळे डी. राजा, सीताराम येचुरी हे तेथील कारवाईवरून चिडणे साहनिकच आहे. पण कुठली कृत्ये देशहिताची नाहीत हे समजण्याइतकी समज कॉंग्रेसकडे; जो राष्ट्रीय पक्ष म्हणवतो; नसावी? पप्पूच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष म्हणून किती दिशाहीन झाला आहे याचेच हे लक्षण आहे.

जेएनयुमधून पास झालेल्या आर्मीतल्या बुजुर्ग निवृत्त अधिका-यांनीही तेथे चाचलेल्या देशविरोधी उद्योगांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे व असेच प्रकार चालू राहिले तर आम्हाला या विद्यापीठाकडून मिळालेल्या पदव्या परत कराव्या लागतील असे त्यांनी सांगितले आहे.

३) द्रमुक – कॉंग्रेसची हातमिळवणी देशाला लुटणारे पुन्हा एकत्र

तामिळनाडुतल्या आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी द्रमुक व कॉंग्रेसच्या युतीची आज घोषणा झाली. याच दुकलीने मनमोहनसिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेच्या आड देशाला लुटले होते. लुटले होते हा शब्दही तोकडा ठरावा इतके लुटले होते.

२जी घोटाळे उघड झाल्यावर द्रमुकचे तोन मंत्री थोडाकाळ गजाआड गेल्यामुळे या दोन पक्षांमध्ये वितुष्ट असल्याचे चित्र होते. मात्र आता निवडणुका जवळ आल्या की हे दोन्ही लुटारू पुन्हा एकत्र आलेले आहेत.

या मैत्रीवरून पप्पूला कोणी विचारल्याचे ऐकिवात नाही. त्याच्या पक्षाने च द्रमुकने केलेल्या लुटालुटीची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे काही बोलणे योग्य नसल्याचे कारण पप्पू देईल.

इकडे अशा अभद्र युत्या, तिकडे पंजाबात भाजपही अकाली दलाशी असलेली युती सोडेल अशी चिन्हे नाहीत. अकाली दलानेही पंजाबला व पंजाबातील तरूणांना देशोधडीला लावण्यात कसलीच कसर सोडलेली नाही. महाराष्ट्रात यापूर्वी भाजप शिवसेनेच्या भ्रष्टपणाच्या व गुंडगिरीच्या दावणीला बांधलेला होता, तोच प्रकार त्यांच्याबाबतीत पंजाबमध्ये झाला आहे. पंजाबात अमरिंदरसिंग यांच्या नेतृवाखाली कॉंग्रेसचे सरकार येऊन त्यांनी तरी तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी इच्छा आहे.

४) थॅचर यांच्या ख्रिसमसचे जबरदस्तीचे पाहुणे

टिम बेल हे ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे मित्र व सल्लागारही. त्यामुळे सलग जवळजवळ १२ वर्षे त्यांना थॅचर यांच्या निवासस्थानी ख्रिसमस साजरा करावा लागला.

पहिल्या वर्षी त्यांना जेव्हा यासाठीचे निमंत्रण मिळाले तेव्हा त्यांना कोण आनंद झाला होता. पंतप्रधानांच्या घरचा ख्रिसमस. परंतु त्यानंतर सलग एवढी वर्षे त्यांच्याकडेच ख्रिसमस साजरा करावा लागल्यामुळे व त्यात अगदी तोचतोचपणा असल्यामुळे व एकूणच रडाळपणा असल्यामुळे ते इतके कंटाळले होते की आता थॅचर पंतप्रधानपदी न राहतील तर बरे असे त्यांना झाले होते.

५) व्हॅलेंटाइन डे आपल्याकडे का साजरा करावा? अगदी कोणी पती पत्नी नसले तरी एकमेकांचे वाढदिवस असतात. त्याव्यतिरिक्त साजरे करायला सतत काही ना काही निमित्त लागते हेच त्यामागचे कारण असते. पतीपत्नींना एकमेकांच्या वाढदिवसाशिवाय लग्नाचा वर्धापनदिन तरी असतो, आमचे काय ही प्रेमींची अडचण असावी.

पण एखाद्या दिवशी ठरवून आपले प्रेम व्यक्त करायचे यातच कृत्रिमपणा येत नाही का? की तो कृत्रिमपणाही आजकाल आवश्यक झाला आहे?

माणुस Sat, 05/03/2016 - 11:43

In reply to by राजेश कुलकर्णी

तुम्हि तुमच्या पोस्ट मध्ये ३/४ प्रश्न विचारले आहेत. मी त्याचे उत्त्तरे देतो.

इंग्रजी किंवा इतर कोणत्याही चॅनलवर अशा कार्यक्रमांमध्ये दाखवले जाणारे टीव्हीवाल्यांचे चवीचे रसिक सहसा सडपातळ नसतात; किंबहुना सडपातळ म्हणता येईल याच्या जवळपासही नसतात, यामागचे रहस्य काय असावे?>>>>
याचे रहस्य हे आहे कि त्यांची एनर्जी फुसके बार लिह्ण्यात जात नाहि. म्हणुन खाल्लेले त्यांना पचते आणी ते अंगावर दिसते.

कॅमेरामनचा पोटोबा शांत करून हे शुटिंग केले जाते? >> हो. त्यांना खाउपिउ घातले जाते. ते पण पेड शुटिंग करतात. जसे काहिजण पेड (फुसके) लेखक असतात

देशद्रोह म्हणजे देशाबाहेरच्या शक्तींशी संधान साधून त्यांना संवेदनशील माहिती पुरवणे एवढाच आहे का? >> नाहि. देशात दंगे घडवुन आणणे आणी दंगे घडत असताना पोलिसांना बघ्याची भुमिका घ्यायला सांगणे हे देखील देशद्रोह आहे.

यांच्या स्वत:च्या वॉलवर हा एकांगी प्रकार नेहमीच जळत असताना यांची देशद्रोहाबद्दलची किंवा देशविरोधाची संवेदनाच बधीर झालेली दिसते यात काय आश्चर्य? >> हो. स्वतःच्या वॉलवर सोड्न द्या, छ्परावर तिरंगा लावालया ५२ वर्षे लागली त्याची देशद्रोहाबद्दलची किंवा देशविरोधाची संवेदनाच बधीर झालेली दिसते यात काय आश्चर्य.

या लोकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य नेहमी देशद्रोह्यांच्या किंवा दहशतवाद्यांची भलावण करण्यातच कसे खर्ची होते, हा प्रश्न कोणालाच कसा पडत नाही? >>> कारण ते अंधभक्त असतात

पण कुठली कृत्ये देशहिताची नाहीत हे समजण्याइतकी समज कॉंग्रेसकडे; जो राष्ट्रीय पक्ष म्हणवतो; नसावी? >>> देशद्रोह म्हणजे काय यावर तुमचे जर विचारमंथन चालु आहे तर हा सगळा फार............ दुरचा प्रश्न आहेत तुम्हाला समजण्यासाठी

व्हॅलेंटाइन डे आपल्याकडे का साजरा करावा? पण एखाद्या दिवशी ठरवून आपले प्रेम व्यक्त करायचे यातच कृत्रिमपणा येत नाही का? की तो कृत्रिमपणाही आजकाल आवश्यक झाला आहे? >>>>> भाउबीजे, पाडवा याबद्दल तुम्हि उत्तर द्या .मग बोलु.

अजुन काहि शंका असतेल तर जरुर विचारा.

राजेश कुलकर्णी Sun, 06/03/2016 - 02:34

In reply to by माणुस

संपादक,
मला टार्गेट करण्यासाठी तयार केलेला हा आयडी आहे दिसते. आपले लक्ष याकडे वेधत आहे. अर्थात याच्या बेअकलीपणावर व मूर्खपणाच्या कमेंट्सवर मी काही वेळ खर्च करणार नाही.

राजेश घासकडवी Sun, 06/03/2016 - 03:21

In reply to by राजेश कुलकर्णी

एकंदरीत तुमच्या लिखाणावरून खुद्द कन्हैय्यासुद्धा तुम्हाला टारगेट करत आहेत असं तुम्ही म्हणालात तर मला आश्चर्य वाटणार नाही.

जरा शांत व्हा, आणि या टार्गेट मेंटॅलिटीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करा. संयत लिखाण करा, सरळ विचारलेल्या प्रश्नांना सरळ उत्तर द्या, उगाच प्रश्न विचारणारांनाच वेड्यात काढणं, त्यांच्या हेतूंवर संशय घेणं कमी करा. भुक्त या शब्दाचा खरोखर मनापासून मी अर्थ विचारला होता, इतरांनीही विचारला होता. त्याला सरळ उत्तर देण्याऐवजी जर तिरक्यातच जायचं म्हटलं तर दुसरं काय होणार?

लोकांनी जर 'लिखाण आवडलं नाही' 'विचार चुकीचे आहेत किंवा पटले नाहीत किंवा आवडले नाहीत' 'भाषा आणि किंवा मांडणी खटकली' असे फीडबॅक दिले तर गंभीरपणे घ्या. वाचकाचीच अक्कल काढण्याने काहीच साध्य होत नाही.

राजेश कुलकर्णी Sun, 06/03/2016 - 03:29

In reply to by राजेश घासकडवी

प्रथम मला उपदेश करणे बंद करा. हे मी मागेही सांगितले आहे. काहीही संबंध नसताना मागच्या विविध पोस्टमधील मुद्दे एकत्र करून भलतीच उत्तरे लिहिणा-या सदस्याचे म्हणणे पटणे वा न पटणे या कॅटॅगिरीतले नाही, म्हणूनच मी या प्रकाराला मला टारगेट करण्याबद्दल लिहिले होते. ते तर तुम्ही पाहिलेले दिसत नाहीच, वर मलाच उपदेश करत आहात. धन्य तुमची. तुम्ही कधी काय खरेच विचारता आणि कधी कशाप्रकारे हेदेखील मला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे भुक्त हा शब्दकितीवेळा वापरला हे तर तुम्ही मोजलेत, पण त्याचा अर्थ तुम्हाला कळला नाही का असे विचारले होते. आता तुमच्या कमेंटवर मी काही लिहिले की मला असा उपदेश करता. मग तेच तुम्ही माझी कमेंटही 'त्याच स्पिरिट'मध्ये घेऊ शकत नाही हे तरी तुमच्या लक्षात येते का? असो. तुम्हाला होणारा त्रास हलका करत आहे. दोन मिनिटे वाट पहा.

राजेश घासकडवी Sun, 06/03/2016 - 03:45

In reply to by राजेश कुलकर्णी

प्रथम मला उपदेश करणे बंद करा.

तुम्ही जर पब्लिक फोरमवर लिखाण करत असाल तर असं म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आणि जर ती पोस्ट अत्यंत विखारी शब्दांत लोकांना मूर्खात काढून त्यांनाच अनेक उपदेश करणारी असेल तर नाहीच नाही.

असो. तुम्हाला होणारा त्रास हलका करत आहे. दोन मिनिटे वाट पहा.

हे मला कळलं नाही. दोन मिनिटांनी काय घडणार आहे नक्की?

राजेश कुलकर्णी Sun, 06/03/2016 - 03:44

In reply to by राजेश घासकडवी

मी आक्षेप घेतलेल्या कमेंटमधला 'पेड (फुसके) लेखक' हा मला उद्देशून असलेला उल्लेखही मला उपदेश करताना तुम्हाला खटकला नाही ना? आता मी 'माणुस' हे फ्रॉड नाव घेतलेल्या सदस्याला उद्देशून माझ्या भाषेत काही लिहिले तर मात्र तुमची फार तडफड होईल की नाही? की काय ही भाषा, वगैरे.

राजेश कुलकर्णी Sun, 06/03/2016 - 03:53

In reply to by राजेश घासकडवी

'एकंदरीत तुमच्या लिखाणावरून खुद्द कन्हैय्यासुद्धा तुम्हाला टारगेट करत आहेत असं तुम्ही म्हणालात तर मला आश्चर्य वाटणार नाही.' हा तुमचा प्रतिसाद तर अतिउच्च दर्जाचा आहे.
कोणाला माझे लिखाण आवडले नाही किंवा माझे विचार चुकीचे आहेत असे म्हटले तर मी ते मनावर घ्यायचे कारण काय? दुस-याच्या कमेंटवरून मी माझे विचार बदलावेत अशी तुमची अपेक्षा आहे की काय? तसे असते तर तुम्ही का बरे माझ्या अनेक कमेंटप्रमाणे तुमचे विचार बदलले नाहीत. का बरे वर उल्लेख केलेले महान व अर्थशून्य वाक्य लिहिलेत? 'फीडबॅक दिले तर गंभीरपणे घ्या. वाचकाचीच अक्कल काढण्याने काहीच साध्य होत नाही.' हा तुमचाच उपदेश आहे ना? मग तो तुम्ही अंमलात आणण्याचे का बरे दिसत नाही? ते तर तुम्ही करत नाही आणि मग मी तुम्हाला कशाने आश्चर्य वाटते न कशाने नाही असे लिहिले तर मात्र तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल की नाही? असे होत होत तुम्ही आश्चर्याच्या एव्हरेस्टवरून कधी खाली पडाल हे तुमचे तुम्हालाच कळायचे नाही की नाही?

माणुस Sun, 06/03/2016 - 11:35

In reply to by राजेश कुलकर्णी

कोणाला माझे लिखाण आवडले नाही किंवा माझे विचार चुकीचे आहेत असे म्हटले तर मी ते मनावर घ्यायचे कारण काय? दुस-याच्या कमेंटवरून मी माझे विचार बदलावेत अशी तुमची अपेक्षा आहे की काय? तसे असते तर तुम्ही का बरे माझ्या अनेक कमेंटप्रमाणे तुमचे विचार बदलले नाहीत. का बरे वर उल्लेख केलेले महान व अर्थशून्य वाक्य लिहिलेत? 'फीडबॅक दिले तर गंभीरपणे घ्या. वाचकाचीच अक्कल काढण्याने काहीच साध्य होत नाही.' हा तुमचाच उपदेश आहे ना? मग तो तुम्ही अंमलात आणण्याचे का बरे दिसत नाही? ते तर तुम्ही करत नाही आणि मग मी तुम्हाला कशाने आश्चर्य वाटते न कशाने नाही असे लिहिले तर मात्र तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल की नाही? असे होत होत तुम्ही आश्चर्याच्या एव्हरेस्टवरून कधी खाली पडाल हे तुमचे तुम्हालाच कळायचे नाही की नाही?

तुमचाच खालचा प्रतिसाद राजेश घासकडवी यांना दिलेला पेस्ट केला आहे तुमच्या वरिल वाक्याला प्रतिसाद म्हणुन

साती Sat, 05/03/2016 - 16:09

In reply to by राजेश कुलकर्णी

अहो , तुमची ही काय अपेक्षा आहे?
तुम्ही त्याच नको त्या पोष्टी पाडणार.
त्यातल्या तुम्हाल्या अपेक्षित असलेल्या मुद्द्यांचर तुम्हाला अपेक्षित अशीच उत्तरे दिली गेली पाहिजेत हा ह्ट्ट का?

एकदा पोस्ट लिहिलीत की तुम्ही काही वेळ त्रयस्थ व्हा.
त्या पोस्टवर कशी मते येणार याबद्दल तुम्ही अपेक्षा बाळगू शकता पण नियम करू शकत नाही.
म्हणजे फेबुवर करू शकता पण ऐसीसारख्या फोरमवर नाही.
इथे ज्यांना वेळ आहे ते लोक, त्यांना आवडेल त्या मुद्द्यावर लिहीतील किंवा त्याचा प्रतिवाद करतील किंवा त्या अनुशंगाने नविन मते /मुद्दे लिहीतील.
त्यावर तुम्ही बंधने ठेवू शकत नाही.
मी माझा वेळ खर्च करून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यास बांधिल नाही. तरीही मी ते पहिल्या काही परिच्छेदात पूर्ण दिलंय अशी माझी खात्री आहे.

(तिकडे तुम्ही हा प्रतिसाद वाचलात की नाही हे कळत नसल्याने तिकडचाच प्रतिसाद माबो च्या जागी ऐ अ घालून कॉपीपेस्ट केलाय.)

राजेश कुलकर्णी Sun, 06/03/2016 - 03:32

In reply to by साती

"एकदा पोस्ट लिहिलीत की तुम्ही काही वेळ त्रयस्थ व्हा.
त्या पोस्टवर कशी मते येणार याबद्दल तुम्ही अपेक्षा बाळगू शकता पण नियम करू शकत नाही."
मग हाच न्याय तुम्ही माझ्या पोस्टला लावता का हो तुम्ही?