ही बातमी समजली का? - ८१
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
==
सनी देओल इन वाराणसी कायद्याच्या कचाट्यात
--
आणखी एक फिल्म कायद्याच्या कचाट्यात -
Restraint on release of Sunny Deol’s ‘Mohalla Assi’ extended till Aug 25
दिग्दर्शक : 'चाणक्य' फेम चंद्रप्रकाश द्विवेदी
ट्रेलर :
गुरु शिष्य परंपरा के नाम पर
"आज पे लू या कल पे लू" चा विश्वविख्यात शेर आठवलां. फिराख गोरखपुरींच्या नावाने खपवला गेला होता.
सॅड. बातमीत कोर्टाने बॅन
सॅड. बातमीत कोर्टाने बॅन केलाय अस लिहिलय. हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाने पारित केला हे आश्चर्यच आहे कंसिडरिंग द स्फोटक कंटेंट..
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
इंग्रज येण्यापूर्वी
अच्छे दिन यायला २५ वर्षे लागतील! असे आता भाजपा अध्यक्षच म्हणताहेत. पण ते असो. प्रत्येकाच्या अॅझप्शन्स नुसार त्याची/तिची एस्टिमेट्स असतात.
मला यात एक वाक्य विलक्षण लक्षणीय वाटलं:
१. ब्रिटीश भारतात यायच्या आधी जगात देशाला किती मान मिळत होता हे कसे ठरवावे? तो सध्या मिळतोय त्याहून कमी होता? कसा काय?
२. त्या सर्वोच्च स्थानी - म्हणजे ब्रिटीश भारतात यायच्या आधी भारत जगात 'सर्वोच्च' स्थानी होता? हे कसे ठरवले असेल?
त्यांचे हे वक्तव्य केवळ राजकीय अस्मितेच्या पोकळ कोषात गुरफटवणारे निराधार व खोटे वक्तव्य समजून दुर्लक्ष करण्यायोग्य आहे की त्यात काही तथ्यांश आहे?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ब्रिटीश राजवटीच्या आधी जागतिक
ह्या वाक्यांनी भीती निर्माण झाली आहे. नशिब लोह किंवा ब्राँझ युगात नेण्याचे स्वप्न नाहीये.
लोह किंवा ब्राँझ युगात नै
लोह किंवा ब्राँझ युगात नै हो.... सुवर्णयुगात न्यायचं असावं. घरोघरी सोन्याचा धूर वगैरे....
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
त्यांचे हे वक्तव्य केवळ
ह प्रश्न तुम्हाला पडला हे रोचक आहे? तुमच्या मते काय असेल याचं उत्तर?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
राजकीय अस्मितेच्या पोकळ कोषात
दुर्लक्षाची साथ पसरली आहे कि काय पुरोगामी लोकांत?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बाकी अजेंडे जरी बाजूस ठेवले
बाकी अजेंडे जरी बाजूस ठेवले तरी ब्रिटिशपूर्व काळातल्या जागतिक जीडीपीच्या २०-२५% हिस्सा भारताचा होता असे एक एस्टिमेट आहे. तत्कालीन समाज कृषिप्रधान होता आणि जास्त लोकसंख्या, सुपीक जमीन, इ. मुळे कृषिजन्य उत्पादने भारतात जास्त होती त्यामुळे जीडीपीचा हिस्सा जास्त वगैरे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
माहितीबद्दल आभार!
माहितीबद्दल आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१ /-१ तत्कालीन भारत
+१ /-१
तत्कालीन भारत कृषीप्रधान नव्हता बहुधा. उलट मॅन्युफॅक्चर्ड गुड्सच्या व्यापारात मध्ये अग्रेसर होता. मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे अर्थातच हाताने बनवलेले पण नैसर्गिक स्वरूपातले नाही असे जिन्नस. (सुती/रेशमी कापड, परफ्यूम्स वगैरे).
ब्रिटीशकालीन धोरणांमुळे हे सर्व उद्योग बंद पडू लागल्याने शहरातील कारागीर खेड्यांत परत जाऊन परंपरागत शेतीवर गुजराण करू लागले. आणि भारत शेतीप्रधान देश झाला. [कदाचित अशा लोकांनी शेतीचे पारंपरिक स्किल गमावले असेल त्यामुळे शेतीही नीट जमत नसेल].
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
१ लाख वर्षापूर्वी आफ्रीकेचा
१ लाख वर्षापूर्वी आफ्रीकेचा जीडीपी जगाच्या जीडीपीच्या ९०% होता.
???????????????
???????????????
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उपहास होता तो अजो. कीती वर्षे
उपहास होता तो अजो. कीती वर्षे भूतकाळात जगणार आहेत ही संघाची लोक? आणि ती बेसलाईन प़कडुन बसणार आहेत? म्हणुन मी अजुन एक भारी बेसलाईन दिली. कदाचित ५ लाख वर्षापूर्वी जगाचा १००% जीडीपी आफ्रीकेचा होता.
जग कीती बदलले आहे ह्याचे १० टक्के तरी भान ठेवावे अशी अपेक्षा आहे राज्यकर्त्यांनी.
१ लाख वर्षापूर्वी आफ्रीकेचा जीडीपी जगाच्या जीडीपीच्या ९०% होता.
मग तेवढा विकास साधण्यासाठी भाजपा ने किती काळासाठी सत्ता मागावी असे तुम्हाला वाटते ?
जुन्या काळापासून आत्तापर्यंत
जुन्या काळापासून आत्तापर्यंत पाहिलं तर प्रगती चक्रवाढ दराने होतेय, त्यामुळे लै नाही तरी १०० वर्षे बास व्हावीत, नै?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
येस इंडीड. तपशिलात ती एक चूक
येस इंडीड. तपशिलात ती एक चूक झाली खरी. धन्यवाद!
बेसिकली लार्ज पॉप्युलेशन, त्यामुळे मोठा वर्कफोर्स, हेन्स ग्रेटर प्रॉडक्शन ऑफ मेनी गुड्स, वगैरे...
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आभार! अश्या (आर्थिक) दृष्टीने
आभार!
अश्या (आर्थिक) दृष्टीने इतिहास लिहिलेले मराठीत एखादे पुस्तक आहे काय? मला लढाया नी राजांचा इतिहास वाचुन कंटाळा आलाय
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आत्ता या क्षणी तरी एकच
आत्ता या क्षणी तरी एकच आठवतेय. अ.रा.कुलकर्णी यांचे शिवकालीन महाराष्ट्र म्हणून पुस्तक आहे. अब चौकात मिळून जावे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/Economic_history_of_India#Declining_Share_...
=======================================================
आर्थिक इतिहास माहित नसणे, "ब्रिटिशांपूर्वीचा भारत" या शब्दाचा नेमका न्यूनगंडी अर्थ घेणे हे सिडो-पुरोगामित्वाला साजेसेच आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नेमक्या उल्लेखाबद्दल धन्यवाद!
नेमक्या उल्लेखाबद्दल धन्यवाद!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अशा nadir पासून पुढे
अशा nadir पासून पुढे कुठल्याही दिशेने पाहिल्यास प्रगती दिसणारच!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ते काही असो.... अच्छे दिन आले
ते काही असो....
अच्छे दिन आले की कळवण्यात येईल. तोवर अच्चे दिन येण्याविषयी कोणतीही चौकशी करू नये.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मूळ बातमीत चूक होती?
NDTV news
कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
सेटलवाड बैंच्या हाफिसांवर
सेटलवाड बैंच्या हाफिसांवर छापे
ते कायद्यापरमानण काय ते चालु द्या - चालेल अशी आशा करूया. मात्र त्या बातमीत म्हटलंयः
या नियमामागचं लॉजिक समजलं नाही. कायदा बनवताना असा नियम का बरे केला असावा? का हा ही ब्रिटीश वारसा आहे?
तसे असल्यास जे जे सरकारविरुद्ध जनमत निर्माण करू शकतात त्यांच्या निधीवर चाप बसवण्यासाठी ब्रिटीशांनी ठेवलेल्या तरतुदी/क्लृप्त्या अजूनही काढाव्याश्या वाटत नाहीत (याच सरकारला असे नाही - याआधीच्याही कोणत्याही सरकारला. ) हे भारतीय नागरीकांचं दुर्दैव म्हणावं काय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
या नियमामागचं लॉजिक समजलं
ह्या नियमा मधे लॉजिक आहे. परकीयाला भारतात प्रकाशन कंपनी काढुन त्याला जे पाहिजे ते छापता येते. सरकारला पटले नाही तर सरकार त्या प्रकाशन कंपनीला आणि त्याच्या प्रमोटरला ओळखते तरी आणि काही कारवाई तरी करु शकते. त्यामुळे अशी काही गळचेपी वगैरे होत नाहीये.
पण कोणी परकीयाने, त्या बाई सारख्या कोणाला गाठुन देणगीच्या नावा खाली पैसे देवून वाटेल ते छापुन घेतले तर भारत सरकार त्या देणगीदारापर्यंत कसे पोचणार?
माझा प्रतिसाद जरा
माझा प्रतिसाद जरा चुकला.
व्यंगचित्रकार त्या यादीत बघुन मी अधिकच चकीत झालो. मला विशेषतः त्याबद्दल बोलायचे होते (म्हणून ते बोल्ड केलेय)
त्यांनी आपल्या कलेसाठी परकीय मोबदला घेतला तर नक्की काय गैर आहे? का सरकारे व्यंगचित्रकारांना इतकी भितात?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
माझा प्रतिसाद जरा चुकला.मी
मी ही काहीतरीच लॉजिक लावलेले.
पण मला वाटते, मूळ आक्षेप "देणगी" ला असावा, कदाचित "मोबदल्याला" नसावा.
कारण तुम्हाला परदेशातुन मोबदला मिळणार म्हणजे ते ट्रेडींग झाले आणि त्यात बर्याच गोष्टी येतील, रजिस्ट्रेश्न, टॅक्सेशन वगैरे.
पुन्हा मोबदला म्हणजे नाव दडवता येणार नाही.
व्यंगचित्रकाराने काढुन द्यावीत ना परकीय माणसाला चित्रे पैसे घेउन, पण मग इन्वॉइस पण करायला लागेल.
माझ्या मते सध्या ही सर्व प्रकारचे कलाकार आपली कलाकृती विकुन परकीयांकडुन मोबदला घेतात. माझ्या मते मुद्दा "देणगी" शी संबंधीत आहे.
२०१०ला नवा कायदा आणला गेलेला
२०१०ला नवा कायदा आणला गेलेला ज्याने १९७६ च्या कायद्याला सुधारायला आणला गेला.
खाली १९७६च्या कायद्याचा मसुदा आहे. (होप्फुली विश्वासार्ह). त्यातही कार्टूनीस्टचा उल्लेख आहे.
http://www.aiclindia.com/Acts/Foreign%20Contribution%20%28regulation%29%...
( प्लीज नोट इअर्स माय लॉर्ड
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
नव्या कायद्यात कार्टुनिस्टचा
नव्या कायद्यात कार्टुनिस्टचा उल्लेख करण्याचे कारण असीम त्रिवेदी असेल की काय? की त्रिवेदीकांड २०१० नंतरचं आहे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
त्रिवेदीकांड हे अण्णा
त्रिवेदीकांड हे अण्णा आंदोलनाच्या हे-डेज मधील आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
धन्यवाद.
धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कायद्यापरमानण हे चालू आहे.
सेटलवाड बाईचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
असं पायजे. Pharma price control has stunted innovation
असं पायजे. Pharma price control has stunted innovation
हा रिपोर्ट/ही बातमी प्रकाशित करणे हे सुद्धा मोटिव्हेटेड असेलच.
हा विदा पुरेसा वाटत
हा विदा पुरेसा वाटत नाही.२००९-१०-११ सालांत जी मंदी होती त्यावेळी सर्व कंपन्यांनी रीसर्चवरचा खर्च कमी केला. तेव्हा रिकाम्या झालेल्या पाइपलायनीतून आत्ता काही बाहेर येत नाहीये.
खालील विदा पुरेसा नसेलही. पण
खालील विदा पुरेसा नसेलही. पण तो स्टेप इन द राईट डायरेकशन आहे का ???
( खालील डेटा ग्लोबल आहे. फक्त भारतातलाच हवा असेल तर शोधतो. )
http://www.statista.com/statistics/309466/global-r-and-d-expenditure-for...
--
how to take a screen shot
---
या प्रेझेंटेशन च्या स्लाईड्स ५, ६, ७ बघितल्यात तर असे दिसेल की २००९ ते २०१३ च्या दरम्यान भारतीय फार्मा कंपन्यांच्या दृष्टीने रिसेशन असे काही नव्हतेच. रेव्हेन्युज व निर्यात वाढतच होती. अर्थात स्लाईड ८ नुसार आयात पण वाढली होती. पण याचा अर्थ फार्मा हा सेक्टर प्रो सायक्लिकल नाही व नॉन-सायक्लिकल जास्त आहे हेच अधोरेखित होते नैका ???
माफ करा, पण नवीन औषधं डेव्हलप
माफ करा, पण नवीन औषधं डेव्हलप करून ती लॉन्च करणार्या कंपन्या भारतात आहेत?
मला अशी लॉन्च केली गेलेली (से १०) नवीन औषधं आणि त्यांचे मॅन्युफॅक्चरर्स यांची यादी कुठे मिळू शकेल कुणी सांगू शकेल का?
(यात खवचटपणा दाखवायचा हेतू नाहीये, खरोखरच उत्सुकता आहे)
बाकी प्राईस कंट्रोल ड्रग डेव्हलपमेंट स्टंट करतो याविषयी काही शंका नाहीये. कॅनडाचंच उदाहरण घ्या. गेल्या कित्यक दशकांत कॅनेडियन औषध इंडस्ट्रीला एकही ड्रग मार्केटला आणता आलेलं नाहिये, युएसला लागून असून...
(तुम्हाला नुसतं इफेक्टिव्ह ड्रग हवंय? कितीतरी स्वतात देतो. पण त्याचबरोबर ते ड्रग सेफही असायला हवंय? मग गुमान त्याची किंमत टाका!!!)
पण नवीन औषधं डेव्हलप करून ती
माझ्या मते भारत या क्षेत्रात पुढे आहे. अगदी नंबर वन नसेलही. पण अनेक भारतीय फार्मा कंपन्यांनी अनेक अशी ड्रग्स लाँच केलेली आहेत. उदा.
दुसरे म्हंजे Contract research organization. ह्याची व्याप्ती व स्कोप तपशीलवार माहीती केल्यानंतरच कॉमेंट करता येईल. पण हा एक सॉलिड प्रकार आहे. व भारतात अनेक Contract research organization आहेत. इथे पहा
ओह, ते?
तुम्हाला ड्रग डेव्हलपमेंट म्हणायचंय ते हे होय! मग चालू द्या...
मला वाटलं 'नवीन' (मराठीत नॉव्हेल) औषधनिर्मितीबद्दल चर्चा चालू आहे...
मनात म्हंटलं की साला, आपण सगळी हयात नवीन औषधनिर्मितीक्षेत्रात घालवली तरी आपल्याला ही माहिती कशी नाही? तेंव्हा जरा माहिती करून घेऊया. म्हणजे पुढेमागे तिथे जाऊन सेटल झालो तर एखादा रोल मिळवता येईल.
काही जास्त अपेक्षा नाही, आपल्या शराब-कबाबची सोय बाहेरच्या बाहेर झाली तरी बस्स!!
मार्मिक.
मार्मिक.
मनमोहन सिंग
मनमोहन सिंग यांच्याबाबत ही रोचक बातमी.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/nuclear-deal-with-usa-is-benefit...
हे मस्त लिहीले आहे आणि काही
हे मस्त लिहीले आहे आणि काही नविन माहीती तर फारच रोचक आहे. ह्यांचे पाय मातीचे काय शेणाचे असावेत असे दिसतय.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/appointment-of-amrtya-sen-ethica...
हा क्विड प्रो को प्रकारचा भ्रष्टाचार समजुन बाबा बंगाली वर केस करायला हवी का?
उिपदर याचा उच्चार काय आणि
याचा उच्चार काय आणि तुम्ही ते कसे टंकलेत?
याचा उच्चार काय आणि तुम्ही ते
मी नाही हो टंकले, लोकसत्ताच्या अग्रलेखातुन कॉपी केले आहे. त्यांना उपिंदर म्हणावयाचे असेल.
आळीमिळी गुपचिळी.
आळीमिळी गुपचिळी.
लेख गमतीशीर आहे. लेखात इतका
लेख गमतीशीर आहे. लेखात इतका अंतर्विरोध आहे की नक्की संपादकांचे म्हणणे काय हेच समजत नाहीये
ऑ म्हणजे सरकार बदलले की सेनांनी राजीनामा द्यायला हवा होता असे म्हणणे आहे का?
पुन्हा ऑ! कशी काय क्षम्य ठरली असती? केवळ संपादकांना स्मृतीतै आवडत नैत म्हणून?
शिवाय इथे ते म्हणतात सूत्रे परराष्ट्र मंत्रालयाच्या हातात आहेत. तर दुसरीकडे म्हणतात श्री सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली. श्री सिंग परराष्ट्र मंत्रालय बघत होते? जर पंतप्रधानांचा यात सहभाग असतो तर मग सुत्रे परराष्ट्र मंत्रालया कडे असती काय किंवा स्मृती इराणींकडे असली काय नक्की काय फरक पडतो? या संपादकांचं (केतकरांचं कसं इंदीरा म्हटलं की लॉजिक गंडे तसं) खरमरीत वैग्रे लिहायच्या अविर्भावात लॉजिक पुरतं गंडतं असं अनेकदा दिसतं.
केतकर जसे ओढुन ताणून बाईंची स्तुती गोवायचे तसे हे ओढुन ताणून स्मृती बैंना टपलीत मारत असतात. विनाकारण!
पुन्हा तेच नक्की नियुक्तीची सुत्रे कोणाच्या हातात आहेत? परराष्ट्र मंत्रालय की पीएमओ एकदा काय ते ठरवा बॉ!
==
बाकी शेवटचे प्रश्न वाजवी आहेत, त्याची मर्त्य अमर्त्यांनी उत्तरे द्यावीत हे बरे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एका स्त्रीची ओळख
विकीपीडियावरून साभार :
आणि तरीही एका स्त्रीची ओळख केवळ तिचे पिता कोण आहेत ते सांगण्याएवढीच करून दिली जात असेल, तर ते सेक्सिझम म्हणायचं की आणखी काही ते कुबेर आणि प्रभृतींना विचारायला हवं. असो. चालू द्या.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
म्हणजे सरकार बदलले की सेनांनी
ह्याचे उत्तर कुबेरांनी वर दिले आहे. त्यांच्या मते सेन बाबांची नियुक्तीच जर राजकीय आणि दोस्तीखातर केलेली होती तर दोस्त सत्तेवरुन गेल्यावर सेनबाबांनी राजीनामा द्यायला हवा होता ना.
जर ममो कन्येची नियुक्ती खरच झाली होती तर वेगळ्या उत्तरांची काय गरज आहे. ही गोष्ट टाळायलाच हवी होती ना.
@ ऋ - कुबेरांना काय नावे ठेवायची ते ठेवा हो, पण त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्या बद्दल पण लिहा की.
@ ऋ - कुबेरांना काय नावे
त्याबद्दल काय लिहायचं
सेनसुद्धा राजकारण खेळताहेत. त्यांच्या हाती नोबेलचे आणि स्वतःच्या प्रतिमेचे पत्ते आहेत. सगळीच राजकीय शुळवड असताना केवळ सेन यांनी राजकारण करू नये अशी बाळबोध अपेक्षा कुबेर का ठेवताहेत हे तेच जाणोत!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सेनसुद्धा राजकारण खेळताहेत.
ही नुस्ती राजकीय धुळवड असती तर ठीक आहे, पण कुबेरांचा विदा खरा असेल तर हा भ्रष्टाचार आहे आणि कुबेरांचा पॉईंटर पण त्याच कडे असावा.
भ्रष्टाचार? कुठला?असेल तर
भ्रष्टाचार? कुठला?
असेल तर सद्य सरकार आहेच की समर्थ केस करायला.
अर्थात अग्रलेख अतिशय बाळबोध आहे! नुसतीच कुरकुर करणारा.. सेनांप्रमाणेच!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
भ्रष्टाचार? कुठला? ऋ, तू मला
ऋ, तू मला एका कॉलेज चा प्राचार्य म्ह्णुन नेमायचे आणि त्या बदल्यात मी तुझ्या मुलीला आणि तिच्या मैत्रीणींना विभाग प्रमुख म्हणुन नोकरी द्यायची. हा कायद्याच्या कचाट्यात सापडणारा भ्रष्टाचार नसेल पण माझ्या दृष्टीने आहे.
तुमच्या दृष्टीला काय काहीही
तुमच्या दृष्टीला काय काहीही वाटो! काय फरक पडतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अनु राव यांचा मुद्दा व्हॅलिड
अनु राव यांचा मुद्दा व्हॅलिड आहे. आपल्या फेवरमधल्या लोकांची नेमणूक करणे हा फेवरिटिझम / नेपॉटिझम नव्हे? इतरांना शिव्या घालणार्यांनी आपणही धुतल्या तांदळासारखे आहोत की नाही हे पहावे की नको? की एकाच पार्टीला झोडायचे आहे छंद म्हणून? ते तरी क्लीअर करा. एकदा का छंद/आवड लक्षात आली की कोणी काही बोलणार नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काहीही हं बॅ अरे माझ्या मुळ
काहीही हं बॅ
अरे माझ्या मुळ प्रतिसादातील शेवटची ओळ बघ.
---
उलट सेन राजकारण करताहेत असे मी म्हणतोय. आणि त्यातही काही गैर नाही असे मी म्हणतोय. कुठली बाजु मी घेतली ते सांग पाहु? मला तरी कळत नैये.
वादापुरते, सेन यांची नियुक्ती, तसेच श्रीसिंग यांच्या मुलीची नियुक्ती राजकीय होती हे गृहितक तुर्तास योग्य आहे असे समजु (जरी ते तसे आहे हा अनु रावांचा नी कुबेरांचा अंदाज आहे ज्याला ते आरोपाचे रुप देऊ पाहताहेत. कोणत्याही ठोस पुराव्याविना. प्रत्यक्षात त्या त्या पदांवर बसायला त्या दोन्ही (श्री सेन व श्रीमती सिंग) व्यक्ती लायक आहेत असे म्हणणे अतिशयोक्त होऊ नये)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
Iran's nuclear deal : The
Iran's nuclear deal : The generals demur - Israel's military hawks like the deal more than their prime minister does
अधोरेखित वाक्याचा अर्थ मला काही समजला नाही.
मंजे मोसाद लै भारी आहे आणि रॉ
मंजे मोसाद लै भारी आहे आणि रॉ लै फालतू आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
इस्राइलः
इस्राइलः इराण=भारतःपाकिस्तान(*)
सो भारत जसा टरकला असेल पाकच्या बाँबने तसा इस्राएल आत्ता टरकला आहे.
*- कोणी ऑफेंड झाले असेल तर ऑर्डर बदलू शकता.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
*- कोणी ऑफेंड झाले असेल तर
खी खी खी, ऑफेंडास्त्रावर नामी तोडगा सापडलाय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अक्षरांचा श्रम करून...
ऑर्डर बदलली तर ऑफेंडचेही फेंड ऑफ होऊ शकतंच की (उच्चारी, अन्यथा एक फकार लागेल)
नशीब, क ला काना देताना विसरले
नशीब, क ला काना देताना विसरले नाहीत.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
लिंगनिरपेक्ष कायद्यांची गरज
लिंगनिरपेक्ष कायद्यांची गरज याआधीही अनेदा सिद्ध झाली आहे. हा ताजा नमुना
इथे तर पोलिस सरळच सांगताहेतः
A senior police officer told The Hindu that they had little choice in the absence of laws pertaining to sexual harassment of men by women.
अर्थात तरीही काही लोकांना हे पटणार नाही ते नाहीच! झोपलेल्याचं सोंग घेतलेल्याला ...
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१११११११११११११
अगदी अगदी!!!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
“As the vehicle neared PVR
दिल्लीचे ब्रह्मे!
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
ठ्ठो
ठ्ठो
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
चीन : दाबाल तर उफाळून येईल
China’s young people have spoken. And what they want is sex
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हाहाहा! fandom मधे याची चाहूल
हाहाहा! fandom मधे याची चाहूल दिसते आहे गेली काही वर्षं.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
बॉलिवूड, बोले तो...
आणि 'शुद्ध देसी रोमान्स' किंवा 'देव डी'सारख्या फिल्म्समध्येसुद्धा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
त्यासाठी चायनाच्या 'यंग
त्यासाठी चायनाच्या 'यंग पीपल'चं मत कशासाठी पाहिजे?
त्यांचे दादे-परदादे (आणि दाद्या) तेच करत आलेत!
उगीच का सव्वा-दीड बिल्यन झाले?
उगीच का सव्वा-दीड बिल्यन
नाय हो काका, सव्वा बिलियन होण्यासाठी खुल्लम खुल्ला काहीही करण्याची गरज नसते. भारतात नाही का करून दाखवलंय लोकांनी - इतके पडदे असतानासुद्धा!
इतके पडदे
म्हणून तर आपल्याकडे म्हणतात की, "पडदेमें रेहेने दो, पडदा ना उठावो!"
कारण पडदा जो उठ गया तो (सब उठ जायेगा!)
अल्ला, मेरी तोबा, अल्ला मेरी तोबा!!!!!
अवांतर
पडदा-नशीन अशी फोड असताना आम्ही पडदान-शीन असा उच्चार करीत असू. गुड ओल्ड जाहिलियत डेज़...
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आरेसेस मधे शर्यत लागलिये. कोण सगळ्यात जास्त चक्रमासारखे बोलणार त
आरेसेस मधे शर्यत लागलिये. कोण सगळ्यात जास्त चक्रमासारखे बोलणार त्याची.
बरं झालं
चला बुवा एकदाचं मोतीबागेतून सर्टफिकेट मिळालं. नाही तर अंमळ चुकल्याचुकल्यासारखं वाटत असेल नै सगळ्या विचारजन्तान्ला?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सिंघल सायबांनी जे काही
सिंघल सायबांनी जे काही "भाकित" केलेय ते ऐकले असेलच. "कुर्यात सदा टिंगलम" मधे अतुल देशपांडे (आनंद अभ्यंकर) च्या भवितव्याबद्दलचे भाकित करणारे भास्करशास्त्री ... ते त्या मोदीगणपतीच्या मागच्या बाजूला राहतात ते ... आठवले.
सर्टफकिट
आणखी एक सर्टफकिट जारी...
आयआयटीमध्ये देश, हिंदूंविरोधी कारवाया
विशेष रोचक आहे काकोडकरांचा किस्सा -
आयआयटीतला सेक्स रेशो पाहता मनुष्यबळ खात्याला ३७७ कलमाचीसुद्धा आठवण झाली असेल का?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सेल्फ फुलफिलींग प्रोफसी
It also said that “only a mentally challenged will challenge Chauhan’s credentials”.
आता ऑर्गनाजर वाचलाच पाहिजे.
(अवांतर - विरोधाचे मुद्दे खोडून काढण्याजागी विरोधकांनाच नावं ठेवण्याची खोड फक्त आंजावर नाही याबद्दल समाधान वाटलं.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लोकसत्तातला अग्रलेख
लोकसत्तातला अग्रलेख
आता अग्रलेखाचे शीर्षकच बघा ना - ऐसे मूर्ख अज्ञान जन..
--
एका पत्रकाराने दुसर्या पत्रकाराला उद्देशून "मूर्ख" असे संबोधणे व तिसर्या पत्रकारास (सामना) बालिश असे संबोधणे हे अॅड होमिनेम कसे नैय्ये ?
( गब्बर फडतूसांना फडतूस म्हणतो हे जसे अॅड होमिनेम आहे तसेच. )
बिच्चारी राष्ट्रीय सुरक्षा
तीस्ता सेतलवड हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. - सीबीआय
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक केल्याने होणारे फायदे.
रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक केल्याने होणारे फायदे. मेक्सिको मधे नेमके काय घडले. मेक्सिको हे विकसनशील राष्ट्र आहे.
----------------
Why privatizing marriage would be a disaster
मनोबा, तू जे मुद्दे उपस्थित केलेले होतेस (साधारण) तसेच मुद्दे शिखा डालमिया ने उपस्थित केलेले आहेत.
----------------
Silicon Valley plans Madison Square Garden-like reception for PM Narendra Modi
अॅशली मॅडिसन हॅक झाली
अॅशली मॅडिसन ही डेटींग साईट हॅक झाली. हॅकर्सनी त्या साईटवरच्या सभासदांची माहीती प्रकाशित करायची धमकी दिली आहे.
आता कुणी म्हणेल की त्यात काय मोठं विशेष?
पण अॅशली मॅडीसन ही तशीच विशेष साईट आहे....
लग्नबाह्य संबंध ठेऊ इच्छिणार्या (थोडक्यात लफडेबाज!!) स्त्री व पुरुषांना एकत्र आणण्यासाठी मदत करणारी ही साईट आहे!!!!
यामुळे आता काही जणांचीतरी पाचावर धारण बसली असणार!!!
http://money.cnn.com/2015/07/20/technology/ashley-madison-hack/
अशा साईटवरती नवरा-बायको चुकून
अशा साईटवरती नवरा-बायको चुकून एकमेकांबरोबर हूक अप झाले तर मजा येत असेल
So I waited with high hopes and she walked in the place
I knew her smile in an instant, I knew the curve of her face
It was my own lovely lady and she said, "Aw, it's you."
Then we laughed for a moment and I said, "I never knew......
.........."
व्हॉट इज द चान्स?
नवरा बायको एकमेकांशी हूकअप होण्याची प्रोबॅबिलिटी तशी कमी आहे.
कोण आपल्या नवर्या/ बायकोचे ट्रेट्स फेव्हर्ड म्हणून सांगायला जाईल?
जर त्याला/तिला ते फेव्हर्ड वाटत असले तर मुळात कोण अशी साईट शोधायला जाईल?
तेंव्हा नवरा-बायकोंचे एकमेकाशी हूकअप होणे ही एक पॉप्युलर फीमेल फॅन्टसी आहे!!!
त्या अर्धनग्न चित्रांचे कव्हर असलेल्या पण आत स्टोरीमध्ये काहीही दम नसलेल्या बायकांना आवडणार्या कादंबर्या असतात ना, त्याप्रमाणेच!!
There are plans to legally
There are plans to legally restrict the export of some paintings from Germany, and so far the proposed policy is not working out well. Collectors are rushing to take their loans off museum walls and get them out of the country, or hold them incognito.
The law would apply to works of historical importance more than fifty years old, worth more than 150,000 euros, and judged by regional boards to be of historic importance. It is interesting which works may fall under this designation:
Apparently Gerhardt Richter is a hard-core libertarian, like most other painters, because he asserted: “No one has the right to tell me what I do with my images.”
---------------------
मला या पेंटिंग्स मधलं फारसं काही कळत नाही. (पण या प्रकरणावर कॉमेंट मात्र करायला आवडते.) . उद्या संघप्रणित "स्वदेशी जागरण मंच" ने अशीच मागणी केली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. एतद्देशीय कला व आपली दैदिप्यमान परंपरा अशी परदेशात विकली जाणे लांछनास्पद आहे वगैरे वगैरे डायलॉगबाजी सुरु होईल.
सागरिका घोष आणि उजवे विचारवंत
सागरिका घोषांनी 'उजव्यांकडे विचारवंत का नाहीत' ह्यावर लिहिलेला एक लेख. खास गब्बरसाठी त्यातलं एक उद्धृत -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
When Modi himself is neither
When Modi himself is neither Reagan nor Thatcher then how can India produce economists like Milton Friedman and Friedrich Hayek, regarded as architects of right wing economics?
बाईंच्या लेखाच्या गाभ्याशी मी सहमत आहे.
राईट विंग मधे काँझर्व्हेटिव्ह व फ्रीमार्केट असे दोन्ही येतात. हे अत्यंत मजेशीर आहे कारण दोन्ही चांगल्यापैकी परस्परविरोधी आहेत. ( जसे लेफ्ट विंग मधे लिबरल व स्टेटिस्ट्/वेल्फेअरिस्ट हे दोन्ही मजेशीर भाग येतात. चांगल्यापैकी परस्परविरोधी.)
रेगनाईट राईट विंग च्या इकॉनॉमिक्स (रेगनॉमिक्स) चे खरे अर्थशास्त्री हे रॉबर्ट मंडेल, आर्थर लेफर हे आहेत्/होते. सप्लाय साईड इकॉनॉमिक्स. रॉबर्ट मंडेल हे तेच ते - युरोपियन युनियन चे अर्थशास्त्रीय जनक मानले गेलेले. व मिल्टन फ्रीडमन यांनी त्या संकल्पनेच्या समस्या सुद्धा उधृत केलेल्या होत्या. लेफर हे लेफर कर्व्ह वाले.
फ्रिडमन व हायेक हे कोणत्याही अर्थाने कॉझर्व्हेटिव्ह नाहीत. खरंतर हायेक यांनी "why I am not a conservative" अशा शीर्षकाचा एक लेख सुद्धा लिहिला होता. पण या दोघांनीही राईटविंग मधल्या नेत्यांसाठी काम केलेले आहे.
फ्रिडमन व हायेक हे दोघे खरंतर लिबर्टेरियन च आहेत. Hayek continues to be most mis-understood economist ever.
------
व सागरिका बाईंनी क्रिटिकल थिंकिंग चा एक क्लास घ्यायला हवा. जर ममोसिं हे एफ्डीआर(Francis Delano Roosevelt) नसतील तर भारतात केन्स (John Maynard Keynes) सारखे अर्थशास्त्री कसे तयार होतील ? - असा प्रश्न कितपत उचित आहे ???
------
हे अर्धसत्य आहे.
संघाकडे एकात्मिक मानवतावाद आहे.
एकात्मिक मानवतावाद ही संघाची व भाजपाची खरी पॉलिटिकल फिलॉसॉफी नाही. ते दाखवायचे दात आहेत. पण संघाकडे फिलॉसॉफी नाहीच असे म्हणणे अर्धसत्य आहे. फिलॉसॉफी आहे पण पाळत नाही अशी परिस्थिती आहे. ती फिलॉसॉफी अव्यवहार्य, कालबाह्य, बाष्कळ आहे, समाजवादाची धुवुन काढलेली पातळ आवृती आहे असे म्हणणे ठीक आहे. पण फिलॉसॉफी नाहीच असे म्हणणे अर्धसत्यच.
----
बाईंच्या - भाजपाकडे विचारवंत नाहीत - या मुद्द्याशी मी सहमत आहे. म्हणून तर अरविंद सुब्रमण्यम, अरविंद पनगारिया हे दोन लोक आयात करावे लागले. दोन्ही कमळं. बिबेक देब्रॉय हे सुद्धा "क्लासिकल लिबरल" या वर्गात मोडतात. ते माँट पेलेरिन सोसायटीचे अध्यक्ष होते काही काल.
----
हे म्हंजे एकदम शॉल्लेट मारलेला आहे. षटकार. मस्त.
माझ्या मते मोदींची खेळी लक्षणीय आहे. यशस्वी होईलच असे नाही पण..... त्यांनी स्वदेशी जागरण मंचाला चेक असावा म्हणून जगदीश भगवतींना व त्यांचे शागिर्द पनगारिया यांचे काऊंटरवेट ठेवलेले आहे.
-----
खरंतर सागरिकाबाईंनी मोदींची प्रशंसा करायला हवी पण ..... एकदा पोझिशन घेतली की ती त्यागता येत नाही.
बरं
तुम्ही म्हणता तो एकात्मिक मानवतावाद हवा म्हणून संघाकडे जाणारे किती लोक आहेत?
ओह म्हणजे स्टॅलिन लोकांना परस्परांविरोधात खेळवत ठेवायचा आणि मजा बघत स्वतःचं स्थान अबाधित ठेवू पाहायचा तसं?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तुम्ही म्हणता तो एकात्मिक
अगदी.
म्हणूनच मी म्हंटलं की "पॉलिटिकल फिलॉसॉफी नाही" असे म्हणणे अर्धसत्य आहे. म्हंजे डॉक्युमेंट आहे, तत्वज्ञान आहे, प्रावधान आहे. पण ....
----
हा एक दृष्टीकोन झाला.
किंवा असं म्हणू शकता की एतद्देशीय विचारवंत होते (उदा. अरुण शौरी) ते सुद्धा बाजूला ठेवून "ज्यांच्या इंटरनॅशनल क्रेडिबिलिटीच्या व रुतब्याच्या मागे" लपता येईल असे लोक पुढे आणणे. जगदीश भगवती हे खरोखर जबरदस्त रेप्युटेशन असलेले आहेत. अरविंद सुब्रमण्यम यांना नेमणे ही सुद्धा राजकीय खेळी आहे. ते रघुराम राजन यांचे खास दोस्त आहेत. फिस्कल पॉलिसी व मॉनेटरी पॉलीसी हँडल करणारे एकमेकांचे दोस्त असतील तर ती मोदींसाठी फायदेशीर अरेंजमेंट होते.
Surrounding oneself with credible people is a great strategy.
पण...
पण तसे पुरेसे लोकच त्यांच्यापाशी नाहीत हा सागरिका घोषांचा मुद्दा आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मी ही त्यांच्याशी सहमत
मी ही त्यांच्याशी सहमत आहे.
सध्यातरी ममोसिं व अमर्त्य सेन यांना काटण्यासाठी मोदींनी अरविंद सुब्रमण्यम, पनगारिया व भगवती हे तिन पुढे केलेले आहेत. व राजन हे काही मोदींचे विरोधक नाहीत. Risks have been hedged to a great extent (if not completely).
अर्थेतर...
आणि हे केवळ अर्थविषयक. इतर विषयांत तर... गजेंद्र चौहान जिंदाबाद!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
इतर विषयांत तर... गजेंद्र
यही तो रोना है.
तपशीलवार समाचार इथे पहा
आणि हे केवळ अर्थविषयक. इतर
माझ्यामते हा संघ आणि मोदी यांच्यातल्या मांडवलीचा भाग असावा. अर्थ, व्यापार, सुरक्षा आणि परराष्ट्र यात तुम्ही नाक खुपसू नका. त्याबदल्यात सांस्कृतिक, मानवी संसाधनांमध्ये तुम्हाला से असेल. सेंसर बोर्ड/ स्मृती इराणी यांवरून तरी तसं वाटतय.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मुद्दा
मुद्दा तो नाही. विचारवंत म्हणावीत अशी कोणती माणसं मोदींकडे आहेत? त्यांना ती नेमण्याची मुभा मिळेल अथवा नाही हा पुढचा प्रश्न झाला.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
विचारवंत म्हणावीत अशी कोणती
इथे सुद्धा कुबेरांनी मांडलेला परदेशी तिकिटांचा मुद्दा चपखल बसतो.
की एतद्देशीय कोणीही नाही. म्हणून आयात केलेल्यांच्या क्रेडिबिलिटीमागे दडणे.
------
Compared to what - हा प्रश्न विचारायला विसरू नका. युपीए कडे विचारवंत कोण होते त्याची लिस्ट खणणे श्रेयस्कर. म्हंजे तुलना करता येईल.
विचारवंत म्हणावीत अशी कोणती
संस्कृतिक विचारवंत असतीलच तर संघाचे लोकच आहेत. बाकी नाही कोणी दिसत. कारण भाजपाचा वैचारिक बेस हा संघाचाच आहे.
आर्थिक लोक वर म्हटल्याप्रमाणे आयात आहेत.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कारण भाजपाचा वैचारिक बेस हा
विनोद.
भाजपा चा डेमोग्राफिक बेस संघाचा आहे. भाजपा चा वैचारिक बेस हा मिसळ्+पाणीपुरी+भेळ+पराठा+डोसा+इडली आहे.
कोण ते?
उदाहरणार्थ? संघाची विचारसरणी म्हणजे काय आहे ह्याविषयीच मुळात काही नक्की सांगता येत नाही (उदा. वरचा एकात्मिक मानवतावाद पाहा). त्यापुढे जाऊन विचारवंत म्हणावं असे लोक त्यात निपजले आहेत का? असले तर कोण?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
संस्कृतिक विचारवंत असतीलच तर
राम माधवछाप लोक जे संघातून गेलेले आहेत. राम माधव विचारवंत आहेत का नक्की माहित नाही. पण ते संघाचं बॅगेज भाजपामध्ये आणतात.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हा लेख वाचनात आला. लेख जुना
हा लेख वाचनात आला. लेख जुना आहे.
http://www.outlookindia.com/article/drawing-on-the-right-brain/292589
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
+१
येस्स, नेमके हेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मौनमोहन...
मौनमोहन मोदी!
बातमी : Modi Looks Right And Then Left To Duck Questions From Journalists When Asked About Monsoon Session
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मार्मिक द्यावी, की खवचट
मार्मिक द्यावी, की खवचट द्यावी की विनोदी द्यावी ते न कळून एकदम गोड गोंधळ उडाला गडे मनाचा. शेवटी गोंधळात मार्मिकच दिली. गोड मानून घ्या.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
सुदिन
आपले पंतप्रधान किती ग्रेसफूल दिसतायत ते तुम्हाला दिसत नाही कारण तुम्ही पूर्वग्रहदूषित मानवतावादी, विवेकवादी, आधुनिक, अपरंपरावादी, नास्तिक वगैरे आहात. मोदींचा 'आत्मश्रेष्ठत्वाचा भाव इतका जबरदस्त आहे कि त्यांच्यात काही उणिव, लोचा आहे असे विधानही त्यांना सहन होत नाही' असं म्हणाला नाहीत हाच सुदिन
श्रेय अव्हेर : दुवा १
दुवा २
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
Two computer-security
Two computer-security researchers demonstrated they could take control of a moving Jeep Cherokee using the vehicle’s wireless communications system, raising new questions about the safety of Internet-connected cars.
Two computer-security researchers demonstrated they could take control of a moving Jeep Cherokee using the vehicle’s wireless communications system, raising new questions about the safety of Internet-connected cars.
Fiat Chrysler Automobiles NV, owner of the Jeep brand, on Tuesday blasted the researchers for disclosing their ability to hack into the sport-utility vehicle’s software and manipulate its air conditioning, stereo controls and control its speed by disabling the transmission from a laptop many miles away.
The hackers, one of whom works for Twitter Inc. and is a former analyst for the National Security Agency, counter they are bringing attention to an issue auto makers have for too long ignored.
Nearly all modern automobiles, not just those manufactured by Fiat Chrysler, feature computer controls that are potential targets for hackers.
The problem has caught the attention of most major car companies. General Motors Co., for example, has been working with the National Highway Traffic Safety Administration on ways to protect the loads of data that a vehicle carries, and fortify a car’s control system from outside tampering.
Auto executives generally admit the industry is behind in tackling car cybersecurity. Consulting firm Booz Allen Hamilton is pushing them to develop common security measures.