सध्या काय वाचताय? - भाग १५

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
=========

सारामागू ह्या नोबेल पारितोषिक विजेत्या पोर्तुगीज लेखकाची 'ब्लाईंडनेस' ही कादंबरी वाचली. शहरातला एक माणूस गाडी चालवताना सिग्नलसाठी थांबलेला असताना अचानक आंधळा होतो. संसर्गजन्य असलेले हे आंधळेपण वेगाने शहरात पसरत जाते. सुरुवातीच्या काही आंधळ्यांना एका इमारतीत वेगळे ठेवले जाते. एका व्यक्तीचा अपवाद वगळता सर्व जण आंधळे असलेल्या ह्या इमारतीत पुढे काय काय होत जाते हे फार उत्कंठावर्धक रीतीने येत जाते. आंधळ्यांच्या गटांमधील भांडणे, सामोपचार, त्यांच्यातले काहींचे गुंडगिरी करणे, अन्नावरून होणारी मारामारी, मेलेल्या आंधळ्यांची विल्हेवाट, माणसांतील बदलते संबंध इ. गोष्टी फार रोचक आहेत. कथावस्तूबद्दल काही प्रश्न पडले. अपडेट: कथेचा काही भाग उघड होऊ शकत असल्याने पांढऱ्या ठशात लिहितो आहे. हे आंधळेपण नक्की कसे आले हे कळले नाही. एक नेत्ररोगतज्ज्ञ (स्वतः आंधळा होण्यापूर्वी) आंधळ्याचे डोळे तपासतो आणि त्याला डोळ्यांमध्ये काहीच दोष आढळत नाही. ह्या आंधळ्यांना नेहमीच्या आंधळ्यांप्रमाणे डोळ्यांसमोर काळे न दिसता धुरकट पांढरे दिसत असते असे वर्णन केले आहे. आता आंधळेपणाच्या उगमाबद्दल किंवा कारणाबद्दल इतर फार माहिती न देता इतकीच माहिती देण्याचे कारण कळले नाही. आंधळी न झालेली एकमेव व्यक्ती ही कशी काय आंधळी झाली नाही हेही कळले नाही.
पुस्तकाबद्दल त्रासदायक वाटलेली गोष्ट म्हणजे विरामचिन्हांचा अभाव. पूर्ण पुस्तकात केवळ पूर्णविराम आणि स्वल्पविराम ही दोनच विरामचिन्हे वापरली आहेत. मूळ पुस्तकात स्वल्पविरामाने वेगळ्या केलेल्या संवादाच्या वाक्यांमध्ये नवीन माणसाचे वाक्य दाखवण्यासाठी पहिले अक्षर कॅपिटल केले आहे. मी वाचलेल्या मराठी अनुवादात लेखकाने एका व्यक्तीचे बोलणे संपले की स्वल्पविरामाऐवजी पूर्णविराम दिला आहे. म्हणजे त्या माणसाचे बोलणे कुठे संपले हे कळण्यासाठी पूर्णविरामावर सतत नजर ठेवून राहायचे. दोन-तीन ठिकाणी लेखक(/अनुवादक) नवीन माणसाचे बोलणे सुरू झाले तरी पूर्णविराम द्यायला विसरला असे वाटले. ह्या आधी 'कोसला'मध्ये असा विरामचिन्हांचा कमी वापर पाहिला होता. तरी ते बरेच बरे होते. तिथे अवतरणचिन्हे वापरली नसली, तरी संवाद नवीन ओळीवर सुरू होत होते. इथे हे संवाद आगगाडीप्रमाणे एकामागे एक येत होते. 'कोसला'त विरामचिन्हांची मोडतोड ही नायकाची मानसिक अवस्था दाखवते वगैरे वाचले होते. इथे मला असे काही जाणवले नाही. लेखकाने हे असे का केले असावे ह्यावर कोणी प्रकाश टाकू शकेल का?
पुस्तकासाठी धनुष ह्यांचे आभार.

field_vote: 
0
No votes yet

एकुणात रोचक प्रकार दिसतोय. माहितीबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'वारी', 'जंगलातील दिवस' - व्यंकटेश माडगुळकर
वारी हा कथासंग्रह वाचला.ग्रामीण भागातले खडतर जीवन आणि माणसांचे स्वभाव दाखवणार्‍या कथा आहेत. यातल्या कथांवर 'पिंपळपान' सारखी सुंदर मालिका कोणी काढायला हवी.
त्या आधी 'जंगलातील दिवस' हा लेख संग्रह वाचला. लेखां व्यतिरिक्त त्यातली रेखाटनेही सुंदर आहेत.

ब्लाईंडनेस वरून एच जी वेल्सचे 'द कंट्री ऑफ द ब्लाईंड' आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शारामागोंच्या "हिस्टरी ऑफ द सीज ऑफ लिस्बन" मधे तर विरामचिन्हे इतिहास घडवतात! हे पुस्तक आवडले तर ते देखील अवश्य वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री ना पेंडसे कॄत तुंबाडचे खोत वाचतोय सध्या ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

संग्रही ठेवण्याजोगी कादंबरी आहे. मी दोन्ही खंड विकत घेऊन ठेवले आहेत. लहर लागली की अधून मधून वाचायला घेतो. विशेषतः गावी गेल्यावर निवांत बसून वाचायला खूप मजा येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माय ऑल टाईम फेवरेट!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

कालच अभिराम भडकमकर यांची 'अ‍ॅट एनी कॉस्ट' ही छोट्या पडद्याशी संबंधित कादंबरी वाचून संपविली. त्यात एका ठि़काणी टीव्हीवरील मालिकांचा निर्माता म्हणतो की खरे म्हणजे जाहिराती ह्याच मुख्य कार्यक्रम आहे पण त्या सलग दाखविल्या तर कुणी बघणार नाही म्हणून आम्ही मधेमधे मालिका दाखवितो.

मालिकेचा विषय म्हणून ब्रेन ट्युमर झालेल्या व्यक्तीचा रिअ‍ॅलीटी शो दाखवायचा असा एकंदरीत प्लॉट आहे. कादंबरी अगदीच ग्रेट आहे असे नाही पण एकदा वाचण्यासारखी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल "The Doodle Revolution: Unlock the Power to Think Differently" हे पुस्तक चाळलं अन १/५ वाचलं. काही गोष्टी पटल्या जसे "व्हिज्युअल लॅन्गवेज" ही वैश्विक भाषा आहे. अन doodling करताना मेंदू देखील relax होतो. मेंदूचे भिन्न भाग कार्यरत होतात ते भाग जे लेखिका म्हणते त्याप्रमाणे "Thinking festival" करता कधीही आमंत्रित नसतात Smile
अन मला हे खरच पटलं की doodling करावं. लेखिका म्हणते आपण सर्वच जण हाताच्या बोटांतून द्राक्षाच्या वेली व घोसचे घोस फुटत, तरारत असल्यासारखे doodling लहानपणी करतो अन मग हळूहळू ती कला व भाषा विसरतो. या पुस्तकात काही doodling स्वाध्याय आहेत.
.
अनेक थोर व्यक्तींच्या name dropping चा मात्र कंटाळा येतो. काही युक्ती आहेत की कशी चित्रे ( doodling ) काढाल. अन मुख्य म्हणजे प्रौढांमध्ये असलेल्या अनेक गैरसमजांचे निराकरण आहे - उदा -
(१) मी एक चित्रकार नाही. - अरे तुम्हाला सक्षम डोळे आहेत हात आहेत तरी तुम्ही म्हणता की तुम्हाला रेखाटता येत नाही? This is a creative lie.
(२) चित्रकला ही फक्त artist करु जाणे - कोण म्हणतं असं?
व अन्य काही याच पठडीतले गैरसमज दूर केले आहेत व एक आत्मविश्वास दिलेला आहे.
.
बर्‍याच पानांवर, "Welcome to doodle zone" अशा शीर्षकाखाली रिकामी जागा आहे अन लेखिका आवाहन करते "या, unwind करा. एक "Flow state" अनुभवा." काही स्वाध्याय असे आहेत की, पेन्सिल न उचलता, रेषा काढायची अन ही रेषा स्वतःला व कितीही जागी intercept करु शकते. अन असं ३-४ मिनीटे केल्यावर पहा काय कलाकृती उमटते, काय विचार डोक्यात येतात.
पुस्तक रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

सध्या काळापहाड वाचतेय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जरा विषय, लेखक, पुस्तकाबद्दल बरेवाईट मत व त्यामागची कारणे हेही सांगणेचे करावे ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे तुमको काळा पहाड पता नहीं? बाबूराव अर्नाळकरांचा डिटेक्टिव्ह.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ओहो, अच्छा, ओके. अर्नाळकर वाचलेले नाहीत तस्मात हे माहिती नाही, धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>अर्नाळकर वाचलेले नाहीत तस्मात हे माहिती नाही
अरे ये पीएसपीओ नहीं जानता...!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणि क्याप्टन दीप कोणाचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> आणि क्याप्टन दीप कोणाचा? <<

गुरुनाथ नाईक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गुरुनाथ नाईक यांचा स्वराज्याचा तारक हे पुस्तक देखील खूप छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा कदमांचा कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणा एकाची भ्रमणगाथा वाचून संपविलं. गोनिदां म्हणजे अधिक काय सांगावे !! आहाहा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोनीदा म्हंजे चुकून विसाव्या शतकात जन्माला आलेला माणूस. साला काय भाषा आहे, तशी अजून कुणाला जमणेच अशक्य! _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत ! आमच्या ठाण्याच्या आणि घाटकोपरच्या दोन्ही लायब्ररीत त्यांची बरीचशी पुस्तके मिळत नाहियेत. कुठे नवी किंवा जुनी मिळत असतील तर सांगा. कोणत्याही किंमतीला विकत घ्यायची आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांची बहुतेक पुस्तके रेडिली मिळतात. पुण्यात अ ब चौकात रसिक साहित्य इथे तर नक्कीच मिळतात. बुकगंगावरतीही मिळावीत.

कादंबरीमय शिवकाल, माचीवरला बुधा, दुर्गभ्रमणगाथा, स्मरणगाथा, शितू ही माझी सर्वांत फेवरीट पुस्तके. (कुणा एकाची भ्रमणगाथा फेमस आहे पण मला तादृश नाय आवडलं फॉर सम रीझन.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद ! बुकगंगावर जाऊन बघतो. नाहितर पुढच्या पुणे भेटीत नक्कीच चक्कर टाकतो तिकडे.
मी अगोदर जगन्नाथ कुंट्यांची नर्मदा परिक्रमेवरील पुस्तके वाचली होती व हे नंतर वाचनात आलं. त्यामुळे त्याचं उजवेपण जास्त ठळकपणे समोर आलं असं म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुंटे म्हणजे तेच का ते अश्वत्थाम्यासमवेत लपाछपी खेळलेले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय ! होय ! तेच ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि माझी फेवरीट म्हणजे,
'दास डोंगरी रहातो', 'मृण्मयी' आणि 'छंद माझे वेगळे'!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दास डोंगरी ही माझी अतिशय फेव्हरीट. मृण्मयीतले कोंकणवर्णनही अफाट, पण पुढचं कै झेपलं नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण पुढचं कै झेपलं नै.

चालायचंच! Smile
असो.
माझा प्रामाणिक सल्ला: ते पुढचं सायकियाट्रीच्या दृष्टीकोनातून पुन्हा एकदा वाचा. मग झेपेल....
"मेरे तो गिरिधर गोपाल, दूसरो ना कोई!!!!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म, मेबी....पाहू कधी प्रयत्न करून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'पडघवली' पण सुरेख आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जीएंच्या "हिरवे रावे" मधली "माणूस नावाचा बेटा" पुन्हा वाचली.
एकूणच त्यांच्या कथांमधे बरेचदा माणूसघाणे उल्लेख असतात (बुचबुच किड्यांसारखी माणसं इ.) त्यामुळे त्यात काही नवीन नाही
तरीही ह्या कथेतली वर्णनं प्रचंड माणूसघाणी आणि निराशावादी वाटली- सकाळी सकाळी वाचल्याने असेल कदाचित!

पण सांगायचा मुद्दा तो नाही. कथेत मराठी लोकांवर केलेली टिप्पणं एकदम झ्याक आहेत.
१. कळकट वेष आणि समाजसेवा ह्यांचं आपण जमवलेलं मेतकूट. जणू स्वच्छ कपड्यातल्या माणसाकडून समाजासाठी काही होतच नाही.
२. केतकर गुरूजी हे मांगल्य प्रसवणारं आणि (अमेरिकन नट्यांचे जेमतेम चड्डीतले फोटो जवळपास बाळगणार्‍या) मुलांना गोग्गोड गोष्टी सांगणारं क्यारेक्टर भलतंच जमलं आहे.
३. एकूणच कला/साहित्य किंवा उत्तम रहाणीमान इ.सोबत मराठी लोकांचा असलेला ३६चा आकडा. किंवा साधी राहणी ह्या प्रकाराचा अवास्तव उदोउदो.
उदा. "खानसाहेबांकडे अलौकिक गाण्याचं देणं होतं हे सोडून खानसाहेब अस्सल शाकाहारी होते, ह्याचंच असलेलं कवतिक".

२-३ प्यारेग्राफांत जीएंनी प्रचंड मार्मिक निरीक्षणं मांडलीत.
एकूण कथाच जबरदस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपूर्ण "माणूस नावाचा बेटा" ही कथा : दुवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

केतकर गुरूजी हे खरंच भन्नाट क्यारेक्टर आहे. "दवणीय अंडे" या वाक्प्रयोगाच्या जन्माआधीच त्यांना हे पात्र दिसलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

या दुव्याबद्दल धन्यवाद मुक्तसुनीत.
माणूस..मला का आवडते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

संजोपराव , दुवा हुकला का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

दोन पुस्तकं वाचली :
राहीच्या स्वप्नांचा उलगडा (भारत सासणे) : भारत सासण्यांचे माझ्या मते सर्वोत्कृष्ट लेखन. सासण्यांची अद्भुताची अदृष्टाची आवड असलेली चित्रमय मांडणी/शैली व सावकाश सशक्त भरत जाणार्‍या व्यक्तिरेखा यांनी ही कादंबरिका खूप वाचनीय केली आहे. कथाबीजही चांगलं आहे. मराठीतली अनोखी अशी कादंबरी. सासण्यांच्या इतर कथा मला तीव्र आवडल्या नाहीत मात्र ही कथा खूप आवडली.
अंधारवारी (हृषिकेश गुप्ते) : हा मुखपृष्ठावरून रत्नाकर मतकरी प्रसुत अजुन एक भयकथासंग्रह वाटण्याची शक्यता आहे.(पण घाबरू नका) पण कथा भलत्याच विनोदी आहेत. खूप दिवसांनी अशी निखळ करमणूक झाली. पहिली कथा जमत येते इतक्यात कविता घाला घालते! लेखक वातावरण निर्मिती करण्याचा साहित्यिक खटाटोप करतो मात्र भूतांच्या (किंवा अदभुतांच्या) तोंडी र-ला-र-छाप कविता घालून हागतो. याच लेखकाची कुठल्याश्या दिवाळी अंकात एक कथा वाचली ज्यात एक जखीण आणि तिची मंतरलेली बाहुली मिळून काव्यमय डायरी लिहीतात. कमॉन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

आशिष नंदीच्या लेखावर कडाडून टीका करणारा संजय सुब्रह्मण्यमचा हा जुनाच लेख अलीकडेच वाचनात आला.

http://www.outlookindia.com/article/our-only-colonial-thinker/224377

काय सालं काढलीयेत, वाह! याला म्हणतात ज्ञान. कैक विचारवंत असे पुड्या सोडण्यात माहीर असतात, पण सगळ्यांचेच कान कुणी उपटत नाही ते केले पाहिजे. एक नंबर लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'बटर चिकन इन लुधियाना' ( पंकज मिश्रा) हे वाचत आहे. भारतातल्या छोट्या आणि मोठ्या शहरांअमध्ये फिरताना आलेल्या अनुभवांचं संकलन आहे. त्यातून भारतिय लोकांच्या सवयींवर मार्मिक टिप्पणी आहे. नायपॉलांच्या 'अ‍ॅन एरिया ऑफ डार्कनेस' या पुस्तकाची आठवण होते वाचताना.'अ‍ॅन एरिया ऑफ डार्कनेस' पेक्षा या पुस्तकाचा कालखंड बराच अलिकडचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोरी-बाभळी(रा रं बोराडे) : बरेच दिवस या कथासंग्रहाची वाट पाहत होतो. तारा भवाळ करांची विद्यापीठी प्रस्तावना (अर्थातच अनावश्यक) कथासंग्रहाला आहे. बाई खूप फिरून येतात मुदद्याचे सांगण्यासाठी. धुणं ही जुनीच कथा परत वाचावी म्हणून घेतला हा संग्रह. काही कथा काळाच्या दिठीने मोठ्या आहेत पण लिहिल्या लघु आहेत. त्यामुळे एका प्रसंगापुरती असणारी धुणं ही कथा आवडते. तिचा व्यास साजेसा आहे. बाकी काही फार उल्लेखनीय नाही.
वाचताना-पाहताना-जगताना(नंदा खरे): हा माणूस उमर खय्याम वर इत़कं विस्ताराने लिहील असं वाटलं नव्हतं. थोर लेखन आहे. चित्रपटांवर, पुस्तकांवर लिहिलेले खर्‍यांचे गोळीबंद आणि मुद्देसूद लेख निव्वळ संग्राह्य आहेत. मस्ट रीड.
सांजशकुन : कितव्यांदा वाचलं ते ठाऊक नाही. "पाणमाय"(काय जबरा शब्दकल्पना आहे) सारख्या कथा म्हणजे कहर आहेत. असा संग्रह ना होणे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

विलास सारंग यांचा "The Women in Cages" कथासंग्रह. काल अचानक इथल्या एका दुकानात सापडला. काही कथा अगदी नेमक्या जमल्या आहेत (Love in Mumbai I & II, The Women in Cages, Musk Deer) आणि काही थोड्या विस्कळित. म्हणजे कथेचा शेवट लघुकथेत सर्वात कठीण असतो, तो काही कथांमधे नेमका समेवर जमलाय, पण काहीत थोडा बेताल वाटतो.
मराठीतून लेखकानेच इंग्रजी अनुवाद केला असं प्रस्तावनेत आहे, पण या कुठेही मराठीत प्रसिद्ध झाल्या नसावा, तसा काही तपशील नाहीये. काही अनुवाद खूप खटकतात - गणेशोत्सवाच्या गोष्टीत civic figure चा अर्थ मी बर्‍याच वेळानंतर सार्वजनिक मूर्ती म्हणून लावला. पण अशे अपवाद सोडले तर भाषेवरची पकड आणि लेखनाची लय चांगली आहे.

याच्या अगदी उलटः
उद्धव शेळक्यांची धग.
मी मागे शहाण्यांच्या नपेक्षा बद्दल विचारून कामाच्या गडबडीत विसरून गेले होते, पण (वरील एकावर किंवा दोन्ही पुस्तकावर) सहवाचन करून वेगळ्या धागेत चर्चा करायला कोण तयार आहे का? धग इथे अनेकांनी वाचली असेलच. वर्‍हाडी भाषेचा क्रॅश कोर्स आहे ही कादंबरी!! पण उगाच फाल्तू अर्थ सांगण्यात वेळ न घालवता संदर्भातून स्थानिक शब्दांचा अर्थ वाचकापर्यंत कसा पोचवावा हे शेळक्यांकडून कोणी शिकावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धग ही कादंबरी रेडिली मिळते का? प्रकाशन कोणते?

बाकी वर्‍हाडी भाषा बघायची तर गोनीदांनी लिहिलेल्या गाडगेबाबांच्या चरित्रातही सुंदररीत्या सापडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सध्या हे वाचतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Unless You Are Spock

Rationally, no one should be happier about a score of 96 out of 137 (70 percent) than 72 out of 100, but my students were. And by realizing this, I was able to set the kind of exam I wanted but still keep the students from grumbling.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामदास भटकळांचे 'जिगसॉ' मिळवण्यासाठी आकांत केला (विशेषेकरुन त्यातल्या एका लेखासाठी. तो लेख कोणता हे सूज्ञांस सांगणे नलगे!) . शेवटी एका मित्राच्या घरी त्याची (सुमारे अडीच तीन हजार!) पुस्तके आवरताना ते गावले. दमदाटी करुन वाचायला आणले. चांगले पुस्तक आहे. भटकळांची भाषा प्रामाणिक आणि अनालंकृत आहे. भटकळांचे आईवडील, मोटे, गोडसे, सुहासिनी मुळगांवकर, स्नेहलता प्रधान, सदानंद रेगे (आणि इतर काही) या विस्मृतीत गेलेल्या वल्लींबद्दल वाचायला फार आवडले.यातून उलगडत जाणारे भटकळांचे जीवन तर फार मोहक वाटले. उत्तम लेखक, समीक्षक, कलाकार यांच्याशी सतत संपर्क, त्यांच्याबरोबर गप्पा, प्रवास, मुंबईतील हॉटेलांत खाल्लेले पदार्थ, शास्त्रीय संगीताचे शिक्षण, मित्रांबरोबरच्या मैफिली (बहुदा नुसते जेवण, क्वचित थोडी बीअर किंवा व्हिस्की, बिर्यानी वगैरे खाल्ल्यानंतर एखादी सिगारेट) असला त्या काळातल्या आयुष्याचा एक संपन्न तुकडा जिवाला पिसे लावून गेला. 'उत्तमोत्तम पुस्तके वाचायला मिळाली तर मी माळ्यावरचा कोळीदेखील होईन' हे वाक्य ठाऊक होते. मित्राच्या घरी पुस्तके आवरताना ते आठवले. 'जिगसॉ' वाचताना पुन्हा आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

जिगसॉ खूप आवडले होते. भटकळांविषयी आणि भटकळांना अनेकदा ऐकलं. अफाट माणूस आहे. अंगकाठीने नव्हे. खराखुरा. लोकसंग्रहही तसाच अफाट. बोलताना कुठला संदर्भ कुठे नेऊन जोडतील, पत्ता लागत नाही. असं संदर्भसमृद्ध बोलणं मी आणखी कुणाचं ऐकलं असेल तर ते कुमार केतकर आणि अरुण टिकेकर यांचं. एखादा रंगीबेरंगी जपानी पंखा उलगडावा तसे या लोकांच्या बोलण्यातून संदर्भ उलगडतात. पण भटकळ अधिक चतुरस्र. लिखाण, प्रकाशन, व्यवस्थापन, संस्थापन, (संस्थास्थापन), नाटक, संगीत सगळ्यात उत्तम गती. म्हणजे जॅक ऑव्ह ऑल नव्हे .मास्टर ऑव्ह ऑल. आत्ता, वयाच्या पंच्याहत्तरीला,ते शास्त्रीय संगीताच्या मैफलीत दीड तास गातात. बाकी हृदयव्याधी वगैरे असूनही. इंग्लिश, मराठी, कोंकणीमध्ये उत्तम वक्तृत्व. हे सगळं बहुरंगी जगणं त्यांच्या जिगसॉत उतरलं आहे. गेली कित्येक वर्षे ते गांधीमय झाले आहेत. मोहनमायासुद्धा असेच वाचनीय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ख्रिस्टीन पायपरची ही कादंबरी वाचत आहे.
लेखिका स्वतः बहुविध आयडेंटिटीज वागवत जगली आहे. आणि ( जीए म्हणत त्याप्रमाणे लेखक पहिल्या पंचवीस वर्षांच्या पाण्यावर वाढतो) तिच्या लेखनात ही बाब स्पष्ट उमटलेली दिसते.
दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ऑस्ट्रेलियात अडकलेल्या एका जपानी डॉक्टरची गोष्ट आहे. माणसांचे कप्पे होणे तीव्र झालेल्या वेळेला सहसंबंधांचे न विसरता येण्याजोगे चित्रण, प्रतिमांचा हेतुपूर्वक अभ्यासू (कॅलिब्रेटेड) वापर यांनी हे पुस्तक स्मरणीय झाले आहे. लेखिकेच्या पुढच्या लेखनाच्या प्रतिक्षेत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

लोकसत्ता लोकरंगमध्ये दर रविवारी सतीश आळेकरांच्या आठवणींचं सदर येतं आहे. छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हे आळेकर कोण?

(अज्ञानी) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाटक लेखक आणि दिग्दर्शक. बेगम बर्वे नावाचं नाटक बघितलं होतं एकदा त्यांचं. डोक्याला शॉट. गाणी भारी होती पण. (जी जुनी नाट्यगीतचं होती.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे अज्ञान जर खरे असेल तर काहीतरी डीप डाईव्ह करायची गरज आहे. बॅट्या सारख्या अनेक गोष्टींबद्दल माहीती असलेल्या माणसाला आळेकर हे ऐकुन सुद्धा माहीती नसावेत ह्यानी आश्चर्यचकीत झाले आहे. बॅट्यासारखा माणुस इतका वॉटर टाईट कंपार्टमेंटलायझेशन करु शकतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॅट्या ओव्हररेटेड आहे. मी पण खुप कै लिहितो. पण हवा बॅट्याचीच होते सगळीकडे. आमचं सगळं लिखाण मातीमोल.
कधीही कट्ट्याला वगैरे गेलो एकटाच की लोक "आलास का, ये ये." असं औपचारिक स्वागत करण्यापूर्वीही उत्स्फूर्तपणं विचारतात
"अरे? बॅट्या नै आला ?". म्हंजे धडाधाकट मनोबा इथवर तुम्हाला भेटायला आलाय, त्याच कैच नै. बॅट्या तुम्हाला भाव न देता घरी तंगड्या पसरुन आराम करत बसलाय, तरी कवतिक त्याचच.
कधी ह्या टोणग्यासोबत कट्ट्याला गेलो की लोकं तिथेच "अरे वा. बॅट्या आला आज." असं सहजपणं म्हणून जातात.
मनोबांचे अस्तित्व दुर्लक्ष नावाच्या खात्यात जमा होते. अगदि कट्ट्याला आलेल्या छान छान मैत्रिणीही बॅट्यालाच भाव देतात.
:/
.
.
इथे जालावरही काही विषय निघाला की 'ह्याला लै येतं. हा लै डॉन आहे' वगैरे म्हणतं पब्लिक.
ओव्हररेटेड कारटं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा मनोबा तू व्यनिला उत्तर तरी देतोस का रे? कळकळीने लिहीलेल्या, व्यनि, खरडींना उत्तरं देत नाहीस. धूमकेतूप्रमाणे क्वचित खरड टाकतोस. मग जर सातत्य नसेल तर भरवसा कसा ठेवायचा?
"सा-त-त्या ची कास धरा रे!!!
तरुन जाशील सागर तू रे"
असे कोणीतरी म्हटले आहेच ना Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसंच बॅट्यासारखी थेट उत्तरही देत नाहीस!
स्प्ष्ट बोलायची वेळ आलीस की पळून जातोस किंवा विषय टाळतोस Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋ तुम्हीही गर्दीत हात धुवुन घेतला का Wink ऐताच सापडलाय मनोबा, हाणा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदि कट्ट्याला आलेल्या छान छान मैत्रिणीही बॅट्यालाच भाव देतात.

हे कधी झाल्याचे आठवत नाही. आमचे ग्रह इतके उच्चीचे कधीपासून झाले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गेले कैक वर्षे मराठी साहित्य, नाटक, आणि एकूणच ललितकला या विषयांत नक्की काय चालले आहे याच्याशी खूप कमी संपर्क आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हणजे पुर्वपुण्याईवरच दिवस ढकलायचे काम चाललंय की काय ? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता बास हां. काँप्लेक्स देण्याला मर्यादा असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

स्टीफन किंग हा आवडता लेखक आहे.
त्याच्या भयकादंबर्‍या जास्त प्रसिद्ध असल्या, तरी मला स्वतः त्याच्या कथा जास्त आवडतात.
उमेदवारीच्या काळात त्याने लिहिलेल्या कथांचा एक संग्रह 'Night shift' पुन्हा एकदा वाचला.
भय- हे केवळ भुतं, प्रेतं, किंचाळ्या किंवा आत्मे अशा घाऊक रूपांनीच दिसत नसतं. आणि आपल्या मनात कुठे कसली भीती कशामुळे घर करून बसेल- त्याला काही नियम नसतोय.
एखाद्या घटनेमुळे एरवी अतिशय सामान्य असलेल्या माणसांकडून मग अचानक भयानक कृत्य घडू शकतं, तेही भीतीदायक.
किंगसाहेबांच्या कथांमधून हे पुरेपूर जाणवतं.

(एका कथेत जगातले अमेरिकेतले ट्रक्स जिवंत होतात आणि माणसांच्या जिवावर उठतात. आणखी एका कथेत एक धुलाई करणारं अजस्र यंत्र जिवंत होतं.
आणखी एका कथेत creepiness ह्या प्रकारचा अतिरेक होतो.
पण खूप आवडलेल्या गोष्टीत "quitters Inc" ही नंबर एक. सिगारेटचं व्यसन सोडवून देण्यात १००% यशस्वी ठरलेली एक कंपनी कशा पद्धतीने व्यसनं सोडवते, ते वाचण्यासारखं आहे.
अनुराग कश्यपने नो स्मोकींगमधे ह्या गोष्टीचा वापर केला असावा.
)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरुंधती रॉय. ॲन ऑर्डिनरी पर्सन्स गाईड टू एम्पायर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या Harry Potter वाचतेय. त्यात क्विडीच, हाऊस कप वगैरे नायक, त्याचे मित्रमंडळ, हाउसच नेहमी जिंकत असते. असलाच तर एखाद दुसरा सेटब्याक असतो.
यावरुन विचार करायला लागले की पुस्तक, चित्रपट शक्यतो जेत्याची किंवा कमीतकमी पॉझिटीव नोटवर संपणारी असतात. हरणार्याची कथा सांगणारी त्यामानाने कमी सापडतात.
तुम्हाला पटकन आठवणारी, आवडणारी, पल्प फिक्शन नसलेली हरणार्यांची पुस्तक कोणती? हारकेभी जितनेवाल्या बाझीगरांची शक्यतो नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्न आवडला. पुस्तकात हरणारे म्हणजे नेमके कोण व काय यावर खडाजंगी होऊ दे!
इस रेस मे मेरे घोडे:
१) विक्रम सेठचे "An Equal Music." गुणी, पण प्रेमात असफल संगीतकाराची गाथा. माझे अत्यंत आवडते पुस्तक, पण खूप वाचल्यावर डिप्रेशन आलं!
२) काफ्काचे सर्व लिखाण, खासकरून ड ट्रायल.
३) नेमाडेंची कोसला?
४) मिर्झा हदी रुस्वा, उम्राओ जान अदा?
५) एरिक मारिया रमार्क, "The black obelisk" (पहिल्या महायुद्धानंअर जर्मनीत कब्रांसाठी वापरले जाणारे दगडविक्याची गोष्ट. भयानक मस्त कादंबरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. A scandal in Bohemia - आर्थर कॉनन डॉयल
२. Salmon fishing in Yemen
३. शाळा (विवादास्पद)
४. मॅक्बेथ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अच्छा म्हणजे तो दिव्य शिनोमा पुस्तकावरून बेतलावता होय? हम्म!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला त्यांची कुठलीच कथा आठवत नाही ज्याचा शेवट सुखद, जिंकणार्‍या माणसांचा आहे.
(त्यातल्या त्यात "पारधी" आठवते आहे.कदाचित.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेड?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>>मला त्यांची कुठलीच कथा आठवत नाही ज्याचा शेवट सुखद, जिंकणार्‍या माणसांचा आहे<<
कथांमध्ये शेवट सुखांत ('कवठे' फार फार तर टोक दाखवत नाही.) नाहीच जनरली, पण हा शेवट नॅचरली इम्पोज्ड आहे. आत्महत्या सोडल्यास तो शेवट स्वनिर्णित नाहीच. पण मला एक भारी वाटतं की, तश्या अंतिम क्षणाला त्यांचे काही कथानायक त्वेषाने, उधळट झगडतात. (ती गारुड्याची कथा, किंवा धबधबा अडवणार्‍याची कथा) कुठेतरी संघर्षाचा स्पार्क जिवंत असतो. अगदी स्वामी सारख्या कथेतही "दडपण" चो बाजूंनी गळ्यापर्यंत विळखा घालत असता नायक वेल फुलवायचा टोकाचा ध्यास बाळगतो. त्यामुळे इतरांना वाटतात तश्या मला या कथा अजिबात शोकांत वाटत नाहीत, आणि निराशतर अजिबातच वाटत नाहीत. त्यांच्यात लाईफ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

रोचना, आदूबाळ, अस्वल सुचवण्यांसाठी धन्यवाद :-). खरंतर मला 'ट्रेजीक हिरो'ऐवजी 'ट्रेजीक सर्वसामान्य' हवे होते. पण हे तुमचे प्रतिसाद वाचल्यावर लक्षात आलं.

पुस्तकात हरणारे म्हणजे नेमके कोण व काय यावर खडाजंगी होऊ दे! >> पॉटरच्या पुस्तकातला माझ्या मते हरणारा व्यक्ती म्हणजे ड्रेको मालफॉय. तो काही फारसा गुणी नाहीय, स्वतःला प्रुव्ह करायचे प्रयत्नदेखील चूकीच्या दिशेनेच करतोय. मला अशांच्या दृष्टीकोनातून कथा हवी आहे. तेच टॉम रिडल किंवा स्नेप जरी हरणारे असले तरी एवढे एक्स्ट्राऑर्डीनरी आहेत की जर ते न्यारेट करणारी कथा लिहीली तर तेदेखील 'हिरोच' असतील.

आता माझ्या या वरील दृष्टीकोनातून पाहीलं तर
An Equal Music बाद होइल बहुतेक.
काफ्का: येस! द ट्रायल वाचून झाल्यावर इतकी कंफ्युज झालेली की पुढचे ७-८ महिने काहीही धड वाचन केलं नाही ;-).
कोसला: मे बी! क्याचर इन द रायसारखी आहे ना? पण मला ती आवडली नव्हती.
बाकी दोन्ही पुस्तकांबद्दल माहीत नाही. वाचली पाहिजेत.

A scandal in Bohemia: हा हा हा रोचक सुचवणी!
मॅक्बेथ: गुणी माणसाचा डाऊनफॉल म्हणजे मी म्हणतेय त्यात येणार नाही बहुतेक.
बाकी दोन्ही पुस्तकांबद्दल माहीत नाही. वाचली पाहिजेत.

जी ए: वाचले नाहीत. ही ब्लास्फेमी होइल का? Blum 3 पण त्यांचे नायक हरणारे असले तरी गुणी आहेत का? असले तर माझ्या क्रायटेरीआत बसणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिंकणार्‍याची गोष्ट ही एसेंशियली हारणार्‍याची असतेच. हारणार्‍यांचं जेवढं जास्त महत्त्व तेवढी जिंकणार्‍याची गोष्ट भारी.
अर्थात गोष्ट ही बहुधा जिंकणार्‍याच्याच दृष्टीकोनातून असते हे खरंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हृषिकेश गुप्तेची 'दैत्यालय' ही कादंबरी वाचत आहे. त्याची 'अंधारवारी' वाचून मी प्रभावित झाले होते. पण आता जाम पुनरावृत्ती जाणवते आहे. कथानकाच्या साच्यात आणि लिहिण्याच्या शैलीतही. ही कादंबरी पुरी करायची म्हणून करीन. नाहीतर फार उत्सुकता उरली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ऑल दि बेस्ट! वाचून झाल्यावर साने गुरुजींच्या "श्यामच्या आई" चे एक स्पूफ लिहा ज्यात श्यामची सर्वांगभयंकर आई सोज्वळ श्याम वर भयसंस्कार करते. ४२ रात्री.
"विहिरीतल्या हडळीकडे जा श्याम, नाहीतर सडकून काढीन"..
"आज चिखलभातात मीठ कमी पडलं म्हणून काय झालं, रात्रभर किती दमते तुझी आई श्याम.."
"माझ्या जीवाची घालमेल होतेय, अक्षयतृतीयेच्या दिवशी सकाळी आन्हिकं उरकून हे(श्यामचे वडील) बाहेर पडले, काही शुभ घडलं तर?"..
"रात्रीच्या जारणासाठी असली म्हणून काय झाली, दुसर्‍याच्या गटारातली बेडकं का चोरायची श्याम?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

लोल! कहर ऐड्या आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

त्याच पुस्तकातली 'नशकाप्रमराश्री' ही दुसरी कादंबरिका त्या मानानं वेगळी आहे. अजय फणसेकरचा 'रात्रआरंभ' हा सिनेमा आठवलाच. पण निदान भयकथेचे तपशील तरी नेहमीपेक्षा थोऽडे(च) वेगळे आहेत.

बादवे, हे या दोन कादंबरिकांच्या निमित्तानं अवांतर: पावसाळी रात्र-लुसलुशीत गोरीघारी तरुणी-अनावर मोह-मोहाचं बीभत्स प्रायश्चित्त / चिंध्या पांघरलेली म्हातारी-डोळ्यांतली हावरी भूक-श्वापदाची गुरगुर्/घरघर / अज्ञात प्रदेशाचं आकर्षण-आसंमतात पाखराचाही आवाज नसणं-'कसलंसं आदिम' आकर्षण.... या गोष्टी भयकथेत असायलाच हव्यात का? कंटाळवाणं होतं जाम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पावसाळी रात्र-लुसलुशीत गोरीघारी तरुणी-अनावर मोह-मोहाचं बीभत्स प्रायश्चित्त / चिंध्या पांघरलेली म्हातारी-डोळ्यांतली हावरी भूक-श्वापदाची गुरगुर्/घरघर / अज्ञात प्रदेशाचं आकर्षण-आसंमतात पाखराचाही आवाज नसणं-'कसलंसं आदिम' आकर्षण.... या गोष्टी भयकथेत असायलाच हव्यात का? कंटाळवाणं होतं जाम.

मग भीती वाटणार कशी गं! भलतीच प्रश्न विचारतेस तू पण. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin

गुप्तेंच्या ’अंधारवारी’मधली शेवटची कथा ट्राय कर. ती सगळ्यांत आवडलेली गोष्ट आहे, त्यात हे ठरीव साचे नाहीत, खुला सोडून दिलेला शेवट आहे, तर्काचा आधार सोडलेला नाही, गोष्ट बरीच आधुनिक सामाजिक संदर्भ असलेली आहे आणि तरीही रीतसर भीती वाटते. त्यातलीच ती गानू आजींची गोष्टही भारी आहे. वरच्या साच्यांमधल्या एखाददुसर्‍या गोष्टी येतात त्यात, पण तरी ती बरीच अनपेक्षित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अंधारवारी यादीत टाकले आहे.
पण मला एकूण भयकथा हा प्रकार फारसा आवडत नाही - त्यात सुपरनॅचरल वगैरे काही असलं तर अजिबात नाही. सायन्स फिक्शन/फँटसी च्या जवळ जाणार्‍या काही आवडतात (धारपांची "साठे फायकस") पण रिकामे बंगले, भुताटकी, डोळ्यातून पाण्याऐवजी एचानक रक्त वाहणे, लांब केस आणि पाय नसलेली चेटकीण, आकाशवाणी, विजेशी मंत्र म्हणून झुंज वगैरे फार बोर करतं. मला स्टीफन किंगचे लेखन म्हणूनच कधीच रुचले नाही.
दैनंदिन वातावरणातल्या सरळसरळ गूढकथा त्या मानाने जास्त आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@भयकथांमधले क्लिशे -खरंय, बोअर होतं जाम.
पण काही लोक भलतंच ओरिजिनल लिहितात.
उ.दा Richard matheson ची एक गोष्ट आहे - Born of man and woman म्हणून. आता ही भयकथा आहे का? तर नक्कीच. पण मांडणी? जब्राट वेगळी आहे.
किंगच्या कथाही अशाच अचाट असतात- उदा. Graveyard shift. त्यातली भीती ही industrial element मु़ळे निर्माण झालीये. आणि जिकडे ही गोष्ट घडते ती जागासुद्धा अस्सल २०व्या शतकाची जगाला भेट आहे.
किंवा Dolan's Cadillac - हायवे, रस्ते, गाड्या, यांत्रिक तपशीलांनी भरलेली ही गोष्ट कुठल्याच क्लिशेत मोडत नाही.

त्या मानाने किंगच्या कादंबर्‍या खूपच साच्यातल्या वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा? यादीत अ‍ॅडवण्यात आल्या गेले आहे.
मला मराठी भयकथांमधलं 'कसलंसं आदिम आकर्षण' वाचल्या वाचल्या पुस्तक फाटकन मिटावं असं वाटतं हल्ली. कसलं ते एकदाच ठरवून घ्या बाबा. य वर्षांपासून कसलं ते कळेना...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'मृद्गंध' - विंदा करंदीकर
कवितासंग्रह वाचत आहे. म्हणजे एका बैठकीत नाही. पुस्तक टेबलावर पडलं आहे. वेळ मिळाला तसा कुठलंही पान उघडून एक एक कविता अशा प्रकारे वाचन चाललंय. चिंतन-मनन वगैरे करत नाहीये. वाचता वाचता लगेच अर्थ उमगला, मजा वाटली, ठीकाय. नाहीच कळलं काही, तर पुढच्या पानावर. मज्जा येतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री राजा शिवछत्रपती- गजानन मेहेंदळे.

शिवचरित्र असावं तर असं. १६५८ पर्यंतच लिहिलंय, पण जे लिहिलंय त्याला तोड नाही. पुढचे भागही होपफुली लवकरच येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एका रेघेवरची 'गांधी मला भेटला होता' या कवितेवर सर्वोच्च न्यायालयानं घातलेल्या बंदीबद्दलची पोस्ट. या विषयावर ऐसीवर काही चर्चा झाली होती का? माझ्या नजरेतून ती निसटलेली असणं सहजशक्य आहे म्हणून विचारणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बातम्यांच्या धाग्यात एक-दोन पोस्टांपलिकडे काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज रविवार मटाच्या बातमीनुसार ही कविता आता गांधींवर साहित्य अकादमीतर्फे निघणार्‍या एका बहुभाषिक लेखसंग्रहात छापली जाणार आहे. यातल्या मराठी विभागाचे श्री. नेमाडे हे संपादक असून त्यांनी या कवितेची निवड या ग्रंथासाठी केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा, म्हणजे पुन्हा वादाला काहीतरी निमित्त आहे. छान. (उपरोध नाही.)

मला या कवितेत काही आक्षेपार्ह वाटलं नव्हतं. इथे लोकांची काय मतं आहेत (काही मतं आहेत का?) (चर्चा वाढली(च), तर संपादकांना धागा वेगळा काढायची विनंती करता येईल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ही ती कविता:
गांधी मला
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या १० X १२ च्या खोलीत
६ X २ १/२ च्या बाजल्यावर
भारतीय जनतेच्या प्रतीकांत भेटला
तेव्हा तो म्हणाला—
सत्यापासून सौंदर्य वेगळे असूं शकत नाही
सत्य हेच सौंदर्य आहे, त्या सत्याच्या द्वारां मी सौंदर्य पाहतो
सत्याचा आग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात
असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येते
सत्य हे वज्राहूनि कठोर आणि कुसूमाहूनहि कोमल आहे

गांधी मला आकाशवाणी मुंबई ब केंद्राच्या
५३७.६किलोसायकल्सवर
गांधीवंदना या कार्यक्रमांत भेटला
तेव्हा तो बोलला---
महात्म्याचे वचनदेखील बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या
आणि ते कसास न उतरल्यास त्याचा त्याग करा
आकाशवाणीच्या निवेदिकेनं सांगितलं—
गांधीवंदना हा कार्यक्रम आपण
६ वाजून ५५ मिनिटं ते ६ वाजून २ मिनिटंपर्यंत
तांत्रिक बिघाडामुळे ऐकूं शकला नाहीत
त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोंत

गांधी मला चार्तुवर्ण्याच्या देवळांत भेटला
तेव्हा तो बनियाच्या धर्माला अनुसरून
पैशाची मोजदाद करत होता
(कुणाचं लक्ष नाही असं पाहून त्यानं कनवटीला निळी पत्ती लावली)
गांधी मला
बौद्ध मठांत भेटला
तेव्हा तो बीफचिली ओरपत होता
गांधी मला
चर्चमध्ये भेटला
दर आठवड्याला क्षमा करणार्‍या येशूपुढे
तो गुडघे टेकून उभा होता
गांधी
चुकला(नंगा) फकीर
मला मशिदींत भेटला
तेव्हातो धर्मांतर करत होता
गांधी मला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबुद्ध भारतांत भेटला
तेव्हा तो म्हणाला—
हरिजनांची सेवा माझ्या जीवनाचा प्राणवायू आहे
मला पुनर्जन्म नको आहे
पण येणारच असेल तर अस्पृश्याचा यावा
म्हणजे येणारी दुःखं, यातना, अपमान यांचा मला अनुभव येईल
अस्पृश्यता जिवंत राहण्यापेक्षां
अस्पृश्यता असलेला हिंदुधर्म मेलेला मला चालेल
असं बोलून तो तडक भारतमातेच्या मंदिरात आंघोळ करून
गंगेच्यापात्रात उतरला

गांधी मला
सानेगुरुजींच्या आंतरभारती शाळेंत
आयला झवून बापाला सलाम करणार्‍या
धडपडणार्‍या मुलांना
श्यामच्या गोड गोष्टी सांगताना भेटला
तेव्हा श्यामची आई त्याला म्हणाली—
निरोध वापरा बिनविरोध

गांधी मला
भर रस्त्यावर हेमामालिनीच्या
नावानं हस्तमैथुन करतांना दिसला
देशांतला हा पहिलाच स्ट्रीट प्ले
अहिंसेचा हाहि एक प्रयोग

गांधी मला
टागोरांच्या गीतांजलीत भेटला
तेव्हा तो गोलपिठ्यावर
कविता लिहीत होता

गांधी मला
बाबा आमट्यांच्या एकात्म भारतांत
अपंगांच्या महोत्सवात भेटला
तेव्हा तो म्हणाला---
हात हे याचनेसाठी दुसर्‍यापुढे पसरण्यासाठी नसतात
आणि दान हे माणसाला नादान बनवते
असं म्हणून
त्यानं अमेरिकन डॉलरचा चेक अॅक्सेप्ट केला

गांधी मला आचार्य भगवान रजनीशांकडे
ध्यानधारणेत
संभोगातूनसमाधीकडे म्हणत
शेळीकडे वळताना दिसला

गांधी मला
मार्क्सच्या टोअॅटोमधून ड्रायव्ह इन थिएटरमध्ये
जगातील कामगारांनो एक व्हा
हा पिक्चर पहात टाइम किल करताना भेटला

गांधी मला
माओच्या लाँगमार्चमध्ये भेटला
तेव्हा तो शेतकर्‍याच्या वेषांत
खेड्यातून शहरांत स्थायिक व्हायला निघाला होता

गांधी मला
डांग्यांच्या गिरणीची भिंत चढून जाताना दिसला
तेव्हा तो ओरडला---
बिर्लाबावटे की जय

गांधी मला
काळागांधीच्या दवाखान्यांत
सावरकरांना सँपलची बाटली विकताना भेटला

गांधी मला
अटलबिहारी वाजपेयींच्या पेशवाईंत भेटला
तेव्हा तो गांधीवादी समाजवादाची जपमाळ ओढत होता

गांधी मला
चारु मजुमदारच्या नक्षलबाडीत भेटला
तेव्हा तो घोषणा देत होता—
आमरबाडी तोमार बाडी
सकलबाडी नक्षलबाडी
लालकिलेपे लाल निशान
माँग रहा हैं हिंदुस्तान

गांधी मला
क्रेमलिनमध्ये ब्रेझनेवच्या हस्ते
शांततेचं नोबेल पारितोषिक घेतांना भेटला

गांधी मला
व्हाइटहाऊसमध्ये
रेगनच्या न्यूट्रॉनची कळ दाबताना भेटला
माणसं मेलेल्या जगांतली
स्थावरजंगम मालमत्ता दाखवून
गांधी रेगनचं सांत्वन करत होता

गांधी मला
छत्रपतीशिवाजी विडीचे झुरके घेत
फोरासरोडला ५८० नंबरच्या कमर्‍यांत
रंगरंगोटीकेलेल्या लोकशाही नांवाच्या रांडेकडे भेटला
तेव्हांती म्हणाली—
तूं कुठली चिकित्सा करणार आहेस?
तूं कुठला प्रयोग करणार आहेस?
तूं कुठला प्रकाश दाखवणार आहेस?

गांधी मला
परमपूजनीयसरसंघचालक
बाळासाहेब देवरसांच्या संघस्थानावर
अखंड हिंदुस्थानाच्या जयघोषांत
अर्धीचड्डी सांवरत़ ६१-६२ उठाबशा काढत घोषणा देताना दिसला
मी हिंदू आहे आणि त्याचा मला अभिमान आहे
वंदेमातरम्
कॉन्व्हेंटमध्ये शिशूंना शिकवून इंग्लड-अमेरिकेंत स्थायिक करीन

गांधी मला
जमाते इस्लामच्या घोगारी मोहोल्ल्यांत
पेट्रोडॉलरच्या थ्री-इ-वनमध्ये
पाकिस्तानविरुद्ध हिंदुस्थान क्रिकेट कॉमेंट्री ऐकताना दिसला
पाकिस्तानचा हिंदुस्थानवर २ गडी राखून विजय
हे ऐकतांच तो नमाज पढला
मोहोल्ला-मोहोल्ल्यातजाऊन त्यानं ग्रीनबोर्डाला हार घातला

गांधी मला
सदाशिवपेठेतल्या ना.ग. गोर्‍यांच्या वाड्यांत भेटला
तेव्हा तो म्हणाला
स्वातंत्र्याला इतकीं वर्षं झाली तरी आम्हाला
भारत माझा देश आहे
या देशावर माझे प्रेम आहे
इथल्या विविधतेने नटलेल्या समृद्ध परंपरांचा मला अभिमान आहे
मी माणसांचा मान ठेवीन
मी माझ्या देशाशी निष्ठा ठेवीन
असं म्हणावं लागत याची मला खंत वाटते
असं मला लंडनच्या टेम्स नदीच्या तीरावर सुचलं

गांधी मला
आयर्विनच्या व्हाइसरॉय हाउसमध्यें भेटला
तेव्हा तो स्वातंत्र्यसैनिकांच्या
पेन्शनीचा हिशेब करत होता

गांधी मला
स्वयंघोषित नेताजी राजनारायणच्या
कुटुंबकल्याणकेंद्रात भेटला
तेव्हां उघडाबंब गाद्यागिरद्यांवर लोळत
मालिश करून घेत
बदामपिस्ते मिठाई खात
भारत मे समाजवाद क्यों नही आता
ह्यावर तो पत्रकार परिषद घेत होता

गांधी मला
अखिल भारतीय हिजड्यांच्या संमेलनात
कुटुंबनियोजनावर भाषण करताना दिसला
तेव्हा आशाळभूत चव्हाण
रिकाम्या असलेल्या खुर्चीवर लक्ष ठेवून
संपूर्ण बेरजेचं राजकारण शिजवत होता

गांधी मला
आम जनताकी संपत्ति असलेल्या पृथ्वीवर
बेवारस मुलांच्यात नवरा-बायकोचा खेळ करतांना भेटला
तेव्हा तो म्हणाला
निधर्मी देश क्या पहचान
छोडो चड्डी मारो गांड

गांधी मला
हाजीमस्तानच्या साम्राज्यांत दिसला
तेव्हा त्यानं चक्क पंचा सोडला
त्याच्या पंच्यावर मी कधींच गेलो नाही
पंचा काय धोतर काय नि पटलून काय
सत्याचे प्रयोग कशांतूनहि होतात
हो
अगदीकवितेंतूनसुद्धा

गांधी मला
बाटाच्या कारखान्यांत
बुटाला शिलाई मारतांना दिसला
तेव्हा बाबूजी गांधीना म्हणला
इस देश में चमार कभी प्राइम मिनिस्टर नही हो सकता

गांधी मला
मोरारजीच्या ओशियानात भेटला
शिवाम्बूच्या तारेंत तो म्हणाला
स्त्रिया ह्या मूर्ख आणि विवेकशून्य असतात
मी हे कोणाच्या संदर्भात म्हटलं—
हे आपल्या लक्षांत आलं असेलच

गांधी मला
नियतीशीसंकेत करतांना
नेहरूंच्या तीन मूर्तीत भेटला
तुम्ही आमच्या विश्वासातले
गादीनंतर इंदिरेच्या हवाली करा

गांधी मला
चरणसिंगांच्या सूरजकुंडात भेटला
तेव्हा तो राष्ट्राला उद्देशून म्हणाला—
मेरे जिंदगीकी तमन्ना पुरू हो गयी

गांधी मला
कमलेश्वरच्यापरिक्रमांत दिसला
तेव्हातो म्हणाला—
मनोरंजनाचीए यू साधन
तळागाळातल्याजनतेपर्यंत पोंचवायचं माझं स्वप्न साकार झालं
(कॅमेरामननं कॅमेरा त्याचा आंडपंचा आणि काठी यावर केंद्रीत केला होता)

गांधी मला रतन खत्रीच्या अड्ड्यावर दिसला
तेव्हा तो मटक्यांतून
राष्ट्रीय एकात्मतेची तीन पानं काढत होता

गांधी मला
सर्वभूमि गोपलकी म्हणणार्‍या
विनोबांच्या धारावीत
टिनपाट घेऊन हायवेच्या रांगेत
क्रुश्चेव्हला गार्ड ऑफ ऑनर देतांना दिसला

गांधी मला
इंदिरा गांधींच्या १ सफदरजंग कारस्थानात भेटला
धटिंगण आय-माय कार्यकर्त्यानं
त्याच्या गांडीवर लाथ मारली
तेव्हातो ओरडला—
देश कीनेता इंदिरा गांधी
युवकोंकानेता संजय गांधी
बच्चोंकानेता वरुण गांधी
भाड में गया महात्मा गांधी

गांधी मला
अजितनाथ रेच्या न्यायालयात
आरोपीच्या पिंजर्‍यात दिसला
सत्याचे प्रयोग करून
देश धोक्यात आणल्याबद्दल
राष्ट्रद्रोहाच्याआरोपाखाली
त्याला फांशी दिला

गांधी मला
अत्र्यांच्या शिवशक्तीत
गांधींवर अग्रलेख लिहितांना दिसला
गांधीत आम्ही ईश्वराचे दर्शन घेतले
धन्य झालो
अब्जावधी वर्षांत आता ईश्वर पृथ्वीवर येणार नाही
स्वदेशीरहा-स्वदेशी बना
असं म्हणून त्यांनी देशीला जवळ केलं

गांधीबाबा राजघाटावर
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या
खांद्यावर हात ठेवून म्हणाला—
देव मेला आहे देवमाणूसही मेला आहे
आता सैतानांच्या विश्वात मेलेल्या देवाला मुक्ती नाही
आणिदेवमाणसाला तर नाहींच नाही
--आणि क्षणार्धात तो समाधीत गेला....

--वसंतदत्तात्रेय गुर्जर, प्रास प्रकाशन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कोर्टाचे बरोबर आहे. कविता आहे म्हणून सांगायचं आणि लांबलचक गोष्ट लिहायची याला काय अर्थ आहे ? आणि शुद्धलेखन जर खरोखरीच वर लिहिल्याप्रमाणे(च) असेल (उदा. वाड्यांत, देश कीनेता इंदिरा गांधी, अजितनाथ रेच्या न्यायालयात, आणिदेवमाणसाला) तर नुसतीच बंदी घालून भागायचे नाही. दोन चार वर्ष आत पाठवा की शुद्धलेखनाचे नियम न पाळल्याबद्द्ल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कविता म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताच्या - महायुद्धोत्तर जगाचेच म्हणा - सर्व राजकीय-सामाजिक अपेक्षाभंगांचा इतिहासच आहे. तिला समजून घेणारे आणि कवीच्या बाजूने बोलणारी मंडळी फार कमी आढळतायत हे दुर्दैव आहे. यात गांधी हे राष्ट्रवादी चळवळीतील आशांचे, त्यातील सर्व पवित्र आणि होकारात्मक विचारांचे प्रतीक आहे हे उघड आहे. एकेरी संबोधन त्या विचारांचा सामान्यपणा दर्शवतो. पण तरी "हिस्टॉरिकल पर्सनेजचा अपमान केल्यामुळे" गुर्जरांवर खटला चालवायचा आदेश कोर्टाने दिला म्हणजे कमाल आहे.

पण तसं बघितलं तर कोर्टाने कवितेचा अर्थ बरोबरच लावला हेही म्हणता येईल. संपूर्ण राजकीय एस्टॅब्लिशमेंट वर, तिच्या फोलपणावर ही टीका आहे. अशा वातावरणात गांधींनी पानचट आणि निरर्थक "बापू" चिन्हातच वठून रहाणेच गरजेचे आहे. त्यांना कुठल्याही सर्जनशील कृतीतून पुन्हा जीवंत करणे म्हणजे अडचणच. त्यामुळे असे काही चालणार नाही हाच "एस्टॅब्लिशमेंट" चा (कोर्ट, संघटना, नामवंत वकील, बँका, सगळेच आले त्यात) निर्णय आहे याबद्दल आश्चर्य वाटायला नको.

कला, लेखन, वगैरे भानगडींना अशा एस्टॅब्लिशमेंट मधे थोडीफार सूट असते - सेफ्टी वाल्व सारखी. आपल्या जिवंत लोकशाहीत माध्यमं चर्चा वाद चालवतात तशी, सम्मेलनात वगैरे "साहित्यातील समाजजीवन" वगैरे सदराखाली होतात तशी. त्यात जमेल तितकी, झेपेल तितकी राजकीय-सामाजिक टीका उरकून घ्यायची, उगीच दडपशाहीचा आरोप नको, काय! पण सेफ्टी वाल्व चा अर्थच असा की वाफ आटोक्यात ठेवली पाहिजे. म्हणून मधून मधून अशा खटल्यांची, सेन्सॉरशिपची गरज पडते. एखाद्याला चित्रकाराला देशाबाहेर पलायन करायला लागतं, एकीला आश्रय मिळत नाही, मग प्रकाशकच माफी मागून शहाणे होतात - या आधी लेन प्रकरणात ऑक्स्फर्ड ने नाही का केलं? मग लेखक म्हणतात मरू दे तिकडं, कारण पब्लिक त्यांच्या बाजूला धावून काही येत नाही. अलिकडे पेरुमाल मुरुगन ने स्वत:च न लिहीण्याची शपथ घेतली, अशी अनेक उदाहरणं आहेत. किती लेखक त्यांच्या बाजूने उभे राहिले?

पब्लिकला देखील स्वत:च्या दुखावलेल्या भावनांची काळजी, आणि लोकशाहीने त्यांना कुरवाळणं देखील किती सोप्पं करून ठेवलंय. दुर्लक्ष तरी कसं करावं या भावनांकडे? कायदा कशाला आहे मग? पब्लिकला सुद्धा हिस्टॉरिकल पर्सनेज म्हणजे कशाशी खातात यात काही इंटरेस्ट नाही - सुटीशी संबंधा आल्याशिवाय तिथीवरून वाद होत नाहीत असं काहीतरी पुलंचं वाक्य आहे ना? बरोबरच आहे ते. जयंती, पुण्यतिथी, हार, मिरवणूक, लाउड्स्पीकर वगैरे काही असल्यास बोला. वॉट एल्स इज हिस्टरी अँड कल्चर फॉर एनीवे?

त्यामुळे कोर्टाला कवितेचा अर्थ नीट कळला नाही आणि म्हणून हा निर्णय दिला गेला हा युक्तीवाद ठिकठिकाणी वाचला, तो मला पटत नाही. बरोबर कळला असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोर्टाचा निर्णय अद्याप वाचलेला नाही, पण मला कळलं त्यानुसार -

  • सुप्रीम कोर्टानं कवितेबाबतचा निर्णय खालच्या कोर्टावर ढकलला आहे. (खालच्या कोर्टानं निकाल द्यायच्या आतच प्रकाशक वरच्या कोर्टात गेले होते)
  • प्रकाशकानं माफी मागितली म्हणून त्याच्यावर कारवाई होणार नाही.
  • कवीनं माफी मागितलेली नाही किंवा आपली बाजूही मांडलेली नाही. ती आता खालच्या कोर्टात मांडावी लागेल.
  • खालच्या कोर्टात सुनावणी पूर्ण होऊन निकाल जाहीर होण्याच्या आतच 'घटनादत्त अभिव्यक्तिस्वातंत्र्याअंतर्गत गांधींवर टीका करणारी कविता तत्त्वतः छापली जाऊ शकते, म्हणून खटला आवरा' असा काहीसा जनरल युक्तिवाद केलेला असावा. त्याऐवजी कोर्टानं 'बदनामी होणं तत्त्वतः शक्य आहे त्यामुळे ती प्रत्यक्षात झाली आहे का, ते तपासा' असा काहीसा निर्णय दिला आहे.
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

खालच्या कोर्टात सुनावणी पूर्ण होऊन निकाल जाहीर होण्याच्या आतच 'घटनादत्त अभिव्यक्तिस्वातंत्र्याअंतर्गत गांधींवर टीका करणारी कविता तत्त्वतः छापली जाऊ शकते, म्हणून खटला आवरा' असा काहीसा जनरल युक्तिवाद केलेला असावा. त्याऐवजी कोर्टानं 'बदनामी होणं तत्त्वतः शक्य आहे त्यामुळे ती प्रत्यक्षात झाली आहे का, ते तपासा' असा काहीसा निर्णय दिला आहे.

हो. एकूण घटनेतल्या कलम १९ आणि क्रिमिनल कोड कलम २९२ आणि २९५ मधील दीर्घकालीन तणावावर कोर्टाच्या निर्णयाचा परिणाम होईल असे दिसते. २९५लाच उचलून धरण्याकडे सुप्रीम कोर्टाचा कल दिसतो, आणि खालच्या कोर्टाच्या सुनावणीवर त्याचा परिणाम होईलच.

निकालातले कलम १०४:

104. The principle that has been put forth by Mr.
Subramanium can be broadly accepted, but we do not intend
to express any opinion that freedom of speech gives liberty to
offend. As far as the use of the name of historically respected
personality is concerned, learned senior counsel, while
submitting so, is making an endeavour to put the freedom of
speech on the pedestal of an absolute concept. Freedom of
speech and expression has to be given a broad canvas, but it
has to have inherent limitations which are permissible within
the constitutional parameters. We have already opined that
freedom of speech and expression as enshrined under Article
19(1)(a) of the Constitution is not absolute in view of Article
19(2) of the Constitution. We reiterate the said right is a right
of great value and transcends and with the passage of time and
growth of culture, it has to pave the path of ascendancy, but it
cannot be put in the compartment of absoluteness. There is
constitutional limitation attached to it. In the context of
obscenity, the provision enshrined under Section 292 IPC has
its room to play. We have already opined that by bringing in a
historically respected personality to the arena of Section 292
IPC, neither a new offence is created nor an ingredient is
interpreted. The judicially evolved test, that is, “contemporary
community standards test” is a parameter for adjudging
obscenity, and in that context, the words used or spoken by a
historically respected personality is a medium of
communication through a poem or write-up or other form of
artistic work gets signification. That makes the test applicable
in a greater degree.

अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या तत्त्वाला केंद्रस्थानी ठेवून त्याला अश्लीलतेचे किंवा अपमानाचे अपवाद ठरवण्याऐवजी "तत्कालीन सामाजिक प्रमाणकां"ना प्रमाण मानून अभिव्यक्तीची चाचणी करण्याकडे जो कल सर्वत्र दिसतो त्यावर उच्चन्यायालयाने महत्त्वाची शिक्कामोर्तब केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी नेमका प्रतिसाद. आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> ही कविता आता गांधींवर साहित्य अकादमीतर्फे निघणार्‍या एका बहुभाषिक लेखसंग्रहात छापली जाणार आहे. <<

नेमाड्यांचं पत्र बहुधा जुनं असावं. खटल्याच्या निमित्तानं त्याचं उत्खनन केलेलं असावं असा माझा अंदाज आहे. त्याचा तसा खटल्याशी प्रत्यक्ष संबंध इतकाच, की बहुधा खटल्यात ते जुनं पत्र कवितेच्या दर्जाचा पुरावा म्हणून सादर केलं गेलं असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे पत्र कुठे छापून आलंय का? वाचायला मिळेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पत्र २१ मार्चचं आहे.
गुर्जर यांचा ‘गांधी’ ग्रंथात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आभार.
गुड फॉर नेमाडे. साहित्य अकादमीने ऐन वेळी "अपरिहार्य कारणांमुळे" पुस्तकच छापायचे रद्द केले नाही तर मिळवले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे याच नावाचे आर्टिकल वाचत असता हा ब्लॉग वाचत आहे.
मला काही दिवस जे हवं होतं ते मिळाल्याचं समाधान आहे, पण भारतीय संदर्भाने कुणी असं काही केलं असल्यास ते वाचायला/करायला मजा येईल. विशेषतः बॅचलरांसाठी आणि एकलकोंबड्यांसाठी :/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

न्युयॉर्करमधला लेख आवडला.
Cooking at home needs to be “less glossy, less sexy, less intimidating.” >> अगदी अगदी. खरंतर फुडपॉर्न मला आवडायचे. पण आजकाल खाण्यापिण्यावर इतके ढीगभर ब्लॉग निघालेत की त्यामुळे या फ्याडचा कंटाळा आला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

LotR चा मराठी अनुवाद येतो आहे. त्याच्या अनुवादिकाबैंनी त्यांचं मनोगत-कम-प्रस्तावना नुकतीच चेपुवर प्रसिद्ध केली. त्यात मूळ लेखकाचा उल्लेख "टॉल्किन्स" "टॉल्किन्स" ऐसा अनेकदा केलेला वाचून अंमळ स्वतःचीच शंका आली. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हायला! मज्जा येणार आहे. Biggrin कोण आहेत अनुवादिकाबाई? एवढी गुप्तता का म्हणे आदूबाळा?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

टोलकी चाहते तुटून (/मोडून) पडू नयेत म्हणून जरा काळजी घेतोय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लेम्मी गेस, मुग्धा कर्णिक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बरोब्बर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मध्यंतरी त्या फौंडेशन सेरीजचं भाषांतर करणार असल्याची खबरही आली होती. (आणि अंमळ धक्का बसला होता.) बाकी या बाई एकूणच रँडभक्त आहेत असे जाणवते. (तसे असल्याशिवाय अ‍ॅटलास श्रग्ड चे भाषांतर कोण कशाला करेल, नैका?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाप रे! धसका बसला..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0