इतर
आसनं समर्पयामि!
हा लेख मायबोलीच्या २०१४ च्या गणेशोत्सवामधे पूर्वप्रकाशित
-------------------------------------------------------------------------------
"या दगडातून काहीतरी करून दे बरं मला वायर वापरून!"
डिसेंबरमधे शूटच्या दरम्यान नदीकाठच्या लोकेशनवर एक दगड दाखवत आमचा डिओपी संजय मेमाणे म्हणाला. दगड होता अगदी गणपतीबाप्पाची आठवण करून देणारा.
01 
स्पर्धा का इतर?
- Read more about आसनं समर्पयामि!
- 25 comments
- Log in or register to post comments
- 12025 views
माझे रिकामपणाचे उद्योग - मधुबनी चित्रकला
विकीवरची माहिती खरी मानायची तर, मधुबनीची पाळंमुळं नेपाळ आणि बिहारच्या उत्तर भागातली. बिहारमध्ये मधुबनी नावाचा जिल्हा आहे , पण हिचं मूळ ते नेपाळच्या मधुबनी-जनकपुर नगरीतलं. जनक राजानं म्हणे सीतेच्या स्वयंवराच्या वेळेस नगर सुशोभित करायला सांगितलं आणि या भित्तीचित्रकलेचा उगम झाला. पूर्वी फक्त लग्नकार्याच्या वेळेस सीमीत असलेली ही कला मुख्यतः ब्राह्मण, कायस्थ व दुसाध (पास्वान) स्त्रियांकडून जोपासली गेली. नंतर मग विसाव्या शतकात भूकंपाच्या वेळेस विल्यम आर्चर नावाच्या एका ब्रिटिश अधिकार्याच्या नजरेस पडली. त्याने त्यावर एका भारतीय-नेपाळी मासिकामध्ये एक लेखही लिहिला.
स्पर्धा का इतर?
- Read more about माझे रिकामपणाचे उद्योग - मधुबनी चित्रकला
- 65 comments
- Log in or register to post comments
- 25389 views
महाराष्ट्रातल्या शहरांमधले तुकडे
दोन महिन्यांच्या भारतवारीत ठाणे, मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये काढलेले काही फोटो. या फोटोंवर सकारण, अकारण, रास्त, बिनबुडाची, छायाचित्रणाचं कौशल्य किंवा त्याचा अभाव अशा प्रकारची टीकाटिप्पणीसुद्धा अपेक्षित आहे. फक्त 'चान चान' म्हणायलाही ना नाही. (मोठ्या फोटोंसाठी फोटोंवर क्लिक करावे.)
१. पहिला फोटो गुर्जीचरणी अर्पण. ठाण्याच्या घरातून बरेच दिवस सूर्योदय बघत होते. (सकाळी लवकर उठण्याची जाहिरात.) त्याचं काय करायचं, हे समजत नव्हतं. आणि मग एक दिवस काढला एकदाचा फोटो.
स्पर्धा का इतर?
- Read more about महाराष्ट्रातल्या शहरांमधले तुकडे
- 20 comments
- Log in or register to post comments
- 8053 views
पावसामध्ये वसन्तसेना
संस्कृत काव्यांमधील आणि नाटकामधील अनेक प्रख्यात उतार्यांमध्ये शूद्रकाच्या ’मृच्छकटिक’ नाटकातील वसन्तसेना चारुदत्ताकडे जात आहे आणि वाटेत मुसळधार पाऊस तिला गाठतो हा प्रसंग आहे. वसन्तसेनेबरोबर तिची छत्र धरणारी दासी आहे पण त्या छत्राचा ह्या पावसापुढे काही उपयोग नाही. ’अंगे भिजली जलधारांनी’ अशी वसन्तसेना आणि तिच्याबरोबर असलेला विट ह्या पावसाचे वर्णन काही श्लोकांनी करीत आहेत असा हा प्रसंग. अजय चक्रवर्तींनी गायलेली मेघ मल्हार रागातील ’गरजे घटा घन कारी री कारी, पावस ऋतु आई दुलहन मन भाई’ ही चीज माझी आवडती आहे आणि मी ती वारंवार ऐकतो तशीच पुनरावृत्ति ह्या प्रसंगाचीहि करतो. त्या श्लोकांचे हे भाषान्तर - मराठीची प्रकृति सांभाळण्याच्या प्रयत्नामुळे कधी कधी काहीसे स्वैर...
कुलस्त्रीणां शोको मदनवरवृक्षस्य कुसुमम्।
सलीलं गच्छन्ती रतिसमयलज्जाप्रणयिनी
रतिक्षेत्रे रङ्गे प्रियपथिकसार्थैरनुगता॥
कमळाशिवाय असलेली जणू लक्ष्मीच, मदनाचे मार्दवयुक्त शस्त्र, घरंदाज स्त्रियांच्या शोकाचे कारण, मदनरूपी श्रेष्ठ वृक्षाचे फूल, मीलनकालाच्या लज्जेसाठी आसुसलेली, अशा लालित्यपूर्ण पावलांनी चाललेल्या ह्या वसंतसेनेमागे रतिक्षेत्रामध्ये तिची इच्छा धरणार्या कामुकांचे थवे चाललेले आहेत.
मेघा वियुक्तवनिताहृदयानुकारा:।
येषां रवेण सहसोत्पतितैर्मयूरै:
खं वीज्यते मणिमयैरिव तालवृन्तै:॥
विरहिणी स्त्रियांच्या हृदयाचे आकार धारण केलेले असे हे मेघ पर्वतशिखरांवर आरूढ होऊन गर्जना करीत आहेत. त्यांच्या अचानक कानावर आलेल्या आवाजाने दचकून आकाशात उडलेल्या मोरांनी आकाश जणू रत्नखचित ताल वृक्षांच्या समूहाने भरल्यासारखे वाटत आहे.
कण्ठं मुञ्चति बर्हिण: समदनो नीप: प्रदीपायते।
संन्यास: कुलदूषणैरिवजनैर्मेघैर्वृतश्चन्द्रमा
विद्युन्नीचकुलोद्गतेव युवतिर्नैकत्र संतिष्ठते॥
चिखलाने तोंड भरलेले आणि मेघधारांनी त्रस्त झालेले बेडूक जलपान करीत आहेत, मोर कण्ठरव सोडत आहे, मोहरलेला कदम्ब फुलत आहे, कुलकलंकांनी घेरलेल्या संन्यासी व्यक्तीसारखा चंद्र मेघांनी झाकला आहे आणि नीचकुलीन तरुणीसारखी वीज एकत्र टिकून राहात नाही.
कान्त: सहाभिरमते यदि किं तवात्र।
मां गर्जितैरपि मुहुर्विनिवारयन्ती
मार्गं रुणद्धि कुपितेव निशा सपत्नी॥
’मूढे, मेघांनी झाकलेल्या (पक्षी - निकटवर्ती स्तनांच्या) माझ्यासह प्रियकर रमतो ह्याने तुझे काय वाईट होते’ असे विचारणार्या आणि ओरडून मला बाजूस करणार्या रागावलेल्या सवतीप्रमाणे रात्र माझा मार्ग अडवीत आहे.
गणयन्ति न शीतोष्णं रमणाभिमुखा: स्त्रिय:॥
मेघांना वर्षाव करू दे, गर्जना करू दे अथवा विजेचे लोळ सोडू दे. प्रियकराकडे जाणार्या स्त्रिया शीत आणि उष्ण ह्यांची चिंता करीत नाहीत.
स्तनितपटहनाद: स्पष्टविद्युत्पताक:।
हरति करसमूहं खे शशाङ्कस्य मेघ:
नृप इव पुरमध्ये मन्दवीर्यस्य शत्रो:॥
वार्यामुळे वेगवान् झालेला, जाड धारारूपी बाणांचा ओघ सोडणारा, गर्जून ढोलाचा आवाज काढणारा, चमकणारी वीज हीच ध्वजा असलेला मेघ आकाशामध्ये चंद्राचे किरणरूपी कर हिसकावून घेतो, जसा पराक्रमात मागे पडलेल्या शत्रूच्या नगरामध्ये विजेता राजा!
गर्जद्भि: सतडिद्बलाकशबलैर्मेघै: सशब्दं मन:।
तत्किं प्रोषितभर्तृवध्यपटहो हा हा हताशो बक:
प्रावृट् प्रावृडिति ब्रवीति शठधी: क्षारं क्षते प्रक्षिपन्॥
तमालपर्णाप्रमाणे काळ्या, वारा भरल्याने पोटे फुगलेल्या, वीज आणि बगळ्यांच्या सह असलेल्या, गडगडाट करणार्या ह्या मेघांनी मन व्यापलेले असतांना त्याचवेळी प्रोषितभर्तृकेसाठी वधाच्या वेळी वाजणारा जणू ढोलच असा हा करंटा आणि दुष्टबुद्धि बगळा ’प्रावृट्, प्रावृट्’ (पाऊस, पाऊस) असे किंचाळत का बरे जखमेवर मीठ टाकत आहे?
मत्तवारणसारूप्यं कर्तुकाममिवाम्बरम्॥
बगळे ज्याच्या अंगावरच्या झुलीप्रमाणे प्रमाणे दिसत आहेत आणि वीज ज्याच्या चवर्यांप्रमणे भासत आहे असे हे आकाश मदमत्त हत्तीचे रूप धारण करीत आहे.
वल्मीका: शरताडिता इव गजा: सीदन्ति धाराहता:।
विद्युत्काञ्चनदीपिकेव रचिता प्रासादसंचारणी
ज्योत्स्ना दुर्बलभर्तृकेव वनिता प्रोत्सार्य मेघैर्हृता॥
ह्या ओल्या तमालपत्रांसारख्या काळ्या मेघांनी आकाशातील सूर्याला गिळले आहे, त्यांच्या बाणांसारख्या धारांनी हत्ती नमून जावेत तशी वारुळे खाली बसत आहेत, प्रासादाचा अन्तर्भाग उजळवणार्या दिव्याप्रमाणे वीज चमकत आहे आणि दुबळ्या पतीच्य़ा स्त्रीप्रमाणे मेघांनी चांदण्याचा अपहार केला आहे.
शक्राज्ञया वारिधरा: सधारा गां रूप्यरज्ज्वेव समुद्धरन्ति॥
विजेच्या लोळांसारख्या दोर्यांनी बांधलेल्या आणि एकमेकांस ढकलणार्या हत्तींसारखे मेघ आपल्या रुपेरी धारांनी इंद्राच्या आज्ञेवरून पृथ्वीला जणू उचलत आहेत.
श्चलैर्विद्युत्पक्षैर्जलधिभिरिवान्त: प्रचलितै:।
इयं गन्धोद्दामा नवहरितशष्पाङ्कुरवती
धरा धारापातैर्मणिमयशरैर्भिद्यत इव॥
सोसाटयाच्या वार्याने फुगलेल्या, रेडयांच्या कळपासारख्या काळ्या, चमकणार्या विजेचे पंख असलेल्या आणि पोटातील पाण्याच्या साठयामुळे ढकलल्या जाणार्या मेघांच्या धारांनी ही मृद्गन्धाने घमघमणारी आणि कोवळ्या हिरव्या कोंबांनी नटलेली पृथ्वी जणू रत्नखचित बाणांनी वेधल्यासारखी दिसत आहे.
प्रोड्डीयेव बलाकया सरभसं सोत्कण्ठमालिङ्गित:।
हंसैरुज्झितपङ्कजैरतितरां सोद्वेगमुद्वीक्षित:।
कुर्वन्नञ्जनमेचका इव दिशो मेघ: समुत्तिष्ठति॥
मोरांनी उंच केकारवांनी ’ये, ये’ असा बोलावलेला, त्वरेने उडून बगळ्यांकडून उत्कण्ठेने आलिंगिलेला, कमळाचा सहवास सोडावयास लागलेल्या हंसांकडून उद्वेगाने पाहिलेला असा मेघ दशदिशा काजळाने माखत वर येत आहे.
विद्युद्भि: क्षणनष्टदृष्टतिमिरं प्रच्छादिताशामुखम्।
निश्चेष्टं स्वपितीव संप्रति पयोधारागृहान्तर्गतं
स्फीताम्भोधरधामनेकजलदच्छत्रापिधानं जगत्॥
ज्याची कमलवने पापण्या लवविणे थांबविलेल्या नेत्रांसारखी भासतात, ज्याच्यामधले रात्र आणि दिवसामधले अंतर नष्ट झाले आहे, चमकणार्या विजेमुळे ज्याचा अंधकार क्षणात नष्ट होतो आणि क्षणात दिसतो, ज्याच्या सगळ्या दिशा झाकोळल्या गेल्या आहेत असे जग निश्चेष्टपणे अनेक मेघांच्या छत्रीखाली मेघांच्या निवासामधील धारागृहामध्ये पहुडले आहे.
वियुक्ता कान्तेन स्त्रिय इव न राजन्ति ककुभ:।
प्रकामान्तस्तप्तं त्रिदशपतिशस्त्रस्य शिखिना
द्रवीभूतं मन्ये पतति जलरूपेण गगनम्॥
दुष्टावर केलेल्या उपकाराप्रमाणे तारका विनाश पावल्या आहेत, प्रियकरापासून विरह झालेल्या स्त्रियांप्रमाणे दिशा निस्तेज झाल्या आहेत, इन्द्रवज्राच्या तेजामुळे आतून तापलेले आकाश वितळून जणू जलरूपाने खाली पडत आहे.
प्रथमश्रीरिव पुरुष: करोति रूपाण्यनेकानि॥
विट - विद्युद्भिर्ज्वलतीव संविहसतीवोच्चैर्बलाकाशतै-
र्माहेन्द्रेण विवल्गतीव धनुषा धाराशरोद्गारिणा।
विस्पष्टाशनिनि:स्वनेन रसतीवाघूर्णतीवानिलै
र्नीलै: सान्द्रमिवाहिभिर्जलधरैर्धूपायतीवाम्बरम्॥
वर जातो, खाली येतो, वर्षाव करतो, गर्जना करतो, अंधकार निर्माण करतो ... हा मेघ एखाद्या नवश्रीमन्तासारखा नाना नाटके करीत आहे.
तो विजांमुळे जणू जळतो, शेकडो बगळ्यांमुळे मोठयाने हसल्यासारखा भासतो, धारारूपी बाण सोडणार्या इंद्राच्या धनुष्याप्रमाणे आवाज करतो, मोठया गर्जनांनी गडगडतो, सोसाट्याच्या वार्यामुळे डोलतो, कृष्णसर्पांसारख्या आकारांनी आकाश धुपारून सोडतो.
स्तनितेन भीषयित्वा धाराहस्तै: परामृषसि॥
हे मेघा, तू खरोखर निर्लज्ज आहेस की जो प्रियकराच्या घराकडे निघालेल्या मला गर्जनांनी घाबरवून धारारूपी हातांनी हाताळतोस.
न युक्तमेतत्प्रियकाङ्क्षिताया मार्गं निरोद्धुं मम वर्षपातै:॥
अरे मेघा, मी कधी ह्यापूर्वी तुझ्यावर आसक्त झाले होते काय की तू इतका गडगडाट करीत आहेस? प्रियकराची इच्छा करणार्या माझा रस्ता तू आपल्या धारांनी अडवावास हे योग्य नाही.
तद्वन्ममापि दु:खं निरपेक्ष निवार्यतां जलद॥
ज्याप्रमाणे अहल्येसाठी ’मी गौतम आहे’ असे इन्द्ररूपी तू खोटे बोललास, त्याप्रमाणे हे मेघा, माझेहि दु:ख अपेक्षा न ठेवता तू दूर करावेस.
न शक्या हि स्त्रियो रोद्धुं प्रस्थिता दयितं प्रति॥
इन्द्ररूपी मेघा, तू गर्जना कर, पाऊस पाड किंवा शेकडो विजा चमकव. प्रियकाराकडे जाणार्या स्त्रियांना अडविणे तुला शक्य नाही.
अयि विद्युत्प्रमदानां त्वमपि च दु:खं न जानासि॥
मेघ गर्जना करता असला तर करो, पुरुष निष्ठुरच असतात. पण हे विद्युत्, तुलाहि प्रमदांचे दु:ख कळू नये?
(पाऊस पाडणार्या आणि गरजणार्या मेघाला आणि त्याची सहचारिणी असलेल्या विजेला वसन्तसेना नाना दूषणे देत असतानाच बरोबरच्या विटाला चारुदत्ताचा प्रासाद विजेच्या चमचममाटामध्ये दिसतो. तिने केलेले हे साहाय्य वसन्तसेनेच्या ध्यानात आणून देऊन तो म्हणतो...)
शैलस्य मूर्ध्नि लिखितेव चला पताका।
आखण्डलस्य भवनोदरदीपिकेय-
माख्याति ते प्रियतमस्य हि संनिवेशम्॥
ऐरावताच्या वक्षावरील सुवर्णरज्जु, पर्वतशिखरावर लावलेली पताका, इन्द्रगृहातील दिवा अशी ही वीज तुला प्रियतमाचे निवासस्थान दर्शवीत आहे.
स्पर्धा का इतर?
- Read more about पावसामध्ये वसन्तसेना
- 8 comments
- Log in or register to post comments
- 5475 views
माझी काही डिजिटल पेंटिंग्स
फोटोशॉप मध्ये काढलेली काही चित्रे




स्पर्धा का इतर?
- Read more about माझी काही डिजिटल पेंटिंग्स
- Log in or register to post comments
- 3820 views
गीतरामायण ६० वर्षांचे झाले.
उद्या १ एप्रिलला आपणा सर्वांच्या सुपरिचित अशा ’गीतरामायण’ ह्या गदिमालिखित आणि सुधीर फडकेदिग्दर्शित गीतमालिकेचा हीरक महोत्सव आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या पुणे आकाशवाणी केन्द्राने १ एप्रिल १९५५ ह्या दिवशी ’स्वयें श्रीरामप्रभु ऐकती’ ह्या गाण्याने ह्या मालिकेचा प्रारंभ केला आणि एक वर्ष आणि ५६ गीतांनंतर १७ एप्रिल १९५६ ह्यादिवशी तिच्यातील शेवटचे गीत ऐकवले गेले. पुणे आकाशवाणीचा तो पहिला लक्षणीय उपक्रम होता. ह्या विषयावर आता वर्तमानपत्रांमधून दरवर्षीप्रमाणेच लेख येतील. येथे मी गीतरामायणाच्या माझ्या काही वैयक्तिक आठवणी लिहीत आहे.
पहिले गीत शुक्रवार १ एप्रिलला ऐकवले गेले हे वर लिहिलेच आहे. हे पहिले गाणे सकाळी रेडिओवर मी ऐकले आणि गाण्याचा कसलाहि कान नसलेल्या मला ते अतिशय आवडले. तदनंतर दर शुक्रवारी साडेआठला पुढचे गीत ऐकायचे हा नित्याचाच कार्यक्रम होऊन बसला. मला निश्चित आठवत नाही पण बहुधा शुक्रवारी आणि पुन: रविवारी असे आठवडयातून दोनदा एक गाणे प्रसारित केले जाई. पुण्याचा ’केसरी’ दर आठवड्याचे गीत छापत असे आणि माझे आजोबा ते गीत कापून ठेवीत असत. अशा कात्रणांची चळत पुढची कित्येक वर्षे घरात होती. पुढे ती कोठे गेली आठवत नाही.
गीतरामायणाच्या यशामध्ये कवि गदिमा, संगीतदिग्दर्शक सुधीर फडके आणि अन्य अनेक प्रथितयश गायक-वादक ह्यांचा वाटा आहेच आणि त्याचा जागोजागी उल्लेख सापडतो. माझ्या मते मालिकेने जनमानसाची पकड घेण्यामध्ये अजून एका व्यक्तीचाहि उल्लेखनीय भाग होता पण ते नाव मात्र आता पूर्ण विस्मरणात गेलेले दिसते. प्रत्येक गाण्याच्या प्रारंभी आत्तापर्यंत होऊन गेलेल्या घटना आणि पुढे काय येणार आहे असे सांगणारे सुमारे पाच मिनिटांचे निवेदन, त्यानंतर गाण्याच्या शब्दाचे गद्यमय वाचन आणि तदनंतर १५ ते २० मिनिटे संगीतबद्ध गाणे असा प्रत्येक कार्यक्रमाचा साचा होता. ह्यामध्ये प्रारंभीचे निवेदन आणि गानवाचन शरद जोशी नावाचे एक आकाशवाणीचे स्टाफ आर्टिस्ट करीत असत. त्यांचा आवाज आणि वाचण्याची शैली ह्यांचेहि खूप चाहते होते आणि तेव्हा अनेक वेळा तसे उल्लेखहि ऐकलेले आहेत. नंतर गीतरामायणाचे सार्वजनिक कार्यक्रम होऊ लागले तेव्हा शरद जोशींचा आवाज आणि त्यांचे निवेदन दोन्हींना स्थान राहिले नाही आणि ते नाव कालानुक्रमाने विसरले गेले. माझ्या मते गीतरामायणाच्या आरंभीच्या यशामध्ये शरद जोशींचा वाटा होता. तो कोठेतरी नोंदवला जावा असे वाटले म्हणून हा मुद्दाम उल्लेख. आकाशवाणीच्या अन्य काही एका कार्यक्रमाच्या संदर्भात शरद जोशी सातार्यास आले होते तेव्हा त्यांचे चाहते त्यांच्याशी बोलण्यासाठी आवर्जून तेथे आले होते अशी एक आठवण आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये सुगम संगीत गायनासारखे कार्यक्रम होत असत तेव्हा पुण्याच्या अनेक चौकांतून असे कार्यक्रम मी ऐकलेले आहेत.
एक लक्षणीय वैयक्तिक संदर्भ नोंदवतो. माझे मेव्हणे डॉ गोपाळ मराठे हे गेली ४५ वर्षे कॅलिफोर्नियामध्ये फॉण्टाना नावाच्या गावात राहतात. ते व्यवसायाने सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत पण त्यांना सुगम संगीत आणि तदनुषंगिक कलांमध्येहि चांगली गति आहे. गेली ३५ वर्षे ते आणि शोभा आंबेगावकर ह्या त्यांच्या सहकारी असे दोघे गीतरामायणाचे कार्यक्रम करीत आले आहेत. असे शंभराहून अधिक कार्यक्रम त्यांनी अमेरिका-कॅनडाच्या जवळजवळ सर्व शहरांमधून केले आहेत. स्वत: सुधीर फडके ह्यांनीहि हे गायन ऐकून त्याची प्रशंसा केली होती. कार्यक्रम विनामूल्य असतात पण श्रोते स्वेच्छेने काही देणग्याहि देतात. ह्या सर्व देणग्यांची रक्कम भारतामध्ये दुर्गम भागांमध्ये चालविल्या जाणार्या ’एकल’ शालाप्रकल्पाकडे पाठविली जातो.
आता ३५ वर्षानंतर ह्या मार्च-एप्रिलमध्ये शेवटचे कार्यक्रम करून डॉ गोपाळ मराठे श्रोत्यांचा निरोप घेणार आहेत. तदनंतर कार्यक्रमाची सूत्रे त्यांच्या शिकवणुकीतून तयार झालेल्या त्यांच्या पुढच्या दुसर्या आणि तिसर्या पिढीकडे जाणार आहेत.
स्पर्धा का इतर?
- Read more about गीतरामायण ६० वर्षांचे झाले.
- 7 comments
- Log in or register to post comments
- 2843 views
भित्तिचित्रे - दिएगो रिवेरा - भाग १
दोन वर्षांपूर्वी मी माझ्या मेक्सिको भेटीनंतर हा लेख येथे लिहिला त्याचवेळी तेथे पाहिलेल्या दिएगो रिवेरा (१८८६-१९५७) ह्यांच्या भित्तिचित्रांवरहि कहीतरी लिहावे असे ठरविले होते. तो प्रकल्प आता पुरा होत आहे. दिएगो रिवेरा हे एख ख्यातनाम भित्तिचित्रकार (Muralist) होते. त्यांची अनेक भित्तिचित्रे अमेरिका आणि मेक्सिको ह्या देशांमध्ये पसरली आहेत.
मेक्सिको सिटी येथील प्रमुख चौक ’सोकालो’ (Zócalo) (अधिकृत नाव ’घटना चौक’ Plaza de la Constitución) ह्या जागी स्पेनने जिंकून अॅझटेक संस्कृति नष्ट करण्यापूर्वीचे अॅझटेकांचे मुख्य मंदिर (Templo Mayor) उभे होते. शहराचे तत्कालीन नाव स्थानिकांच्या नाउआत्ल् Nāhuatl भाषेमध्ये 'तेनोश्तित्लान' (Tenochtitlan) असे होते. शेजारीच अॅझटेक राजांचे निवासस्थान होते. १५२० नंतर स्पेनचा अंमल सुरू झाल्यावर म्ंदिर पाडून त्याच जागी ख्रिश्चन कथीड्रल बांधण्यात आले. ते आता मेक्सिकोचे प्रमुख कथीड्रल आहे. विजेत्यांचा नेता एर्नान कोर्तेज् (Hernán Cortés) ह्याने राजवाडयाच्या भग्नावशेषांवर स्वत:साठी निवासगृह बांधले. कालान्तराने त्याही जागेवर अन्य प्रासाद उभारले गेले. पहिली तीनशे वर्षे मेक्सिको देश स्पेनची एक वसाहत होता आणि स्पॅनिश राजप्रतिनिधि (Viceroy) तेथे रहात असे. १८२१ मध्ये मेक्सिको स्वतन्त्र देश झाल्यावर तेच अध्यक्षांचे निवासस्थान बनले. सध्या ह्या प्रासादामध्ये अनेक शासकीय कार्यालये आहेत. येथे मधल्या चौकातून वरच्या मजल्यांकडे जाण्यासाठी एक प्रशस्त दुहेरी जिना आहे. ह्या जिन्याच्या सर्व बाजूंच्या भिंतींवर दिएगो रिवेरा ह्यांनी काढलेली आणि मेक्सिकोचा स्पेन-पूर्व काळापासून आजच्या काळापर्यंतचा इतिहास सांगणारी अशी अनेक भित्तिचित्रे आहेत. ह्या विख्यात भित्तिचित्रांपैकी काहींचा परिचय करून देणे हा हेतु ह्या लेखमालिकेमागे आहे.
एर्नान कोर्तेज् आणि त्याच्या सैनिकांनी ह्या शहराकडे पहिली नजर टाकली तेव्हाच्या दृश्याने ते अचंबित होऊन गेले. युरोपात त्यांनी पाहिलेल्या कोठल्याहि शहराहून मोठे, अधिक वस्तीचे आणि अधिक शिस्तीत बांधलेले हे शहर, त्यातील मंदिरे आणि घरे, गजबजलेल्या आणि विकायच्या वस्तूंनी दुथडी वाहणार्या बाजारांनी त्यांना आपण स्वप्नातच हे पहात आहोत असे क्षणभर वाटले. कोर्तेजचा सहकारी Bernal Díaz del Castillo लिहितो:
"When we saw so many cities and villages built in the water and other great towns on dry land we were amazed and said that it was like the enchantments (...) on account of the great towers and cues and buildings rising from the water, and all built of masonry. And some of our soldiers even asked whether the things that we saw were not a dream? (...) I do not know how to describe it, seeing things as we did that had never been heard of or seen before, not even dreamed about." (The Conquest of New Spain.)
तेक्सकोको नावाच्या विस्तृत पण उथळ अशा पाणथळीच्या जागी मातीदगडांचे भराव घालून निर्माण केलेल्या जमिनीवर हे शहर उभे होते. येथील सर्वात प्रमुख मंदिर पहिल्या चित्रामध्ये दिसत आहे. पायर्यापायर्यांच्या पिरॅमिडवर उभ्या अशा ह्या मंदिरामध्ये अॅझटेकांचा प्रमुख पूजाविधि - सूर्यदेवतेला मानवी रक्ताचा नैवेद्य पोचविणे - हा चालत असे. ह्यासाठी अॅझटेकांचे सैनिक आसपासच्या अन्य वस्त्यांवर हल्ले चढवून तेथून कैदी पकडून आणत असत आणि वर्षामधून कित्येक वेळा अशा कैद्यांना देवळाबाहेर बळी देत असत. बळी देण्यासाठी प्रमुख पुरोहित कैद्याचे पोट ऑब्सिडिअन सुरीने उघडून आत हात घालून कैद्याचे हृदय खेचून बाहेर काढी आणि ते अजून हलत असलेले हृदय सूर्यदेवतेला दाखवून अर्पण म्हणून जळत्या विस्तवात टाकी.
’केत्झल्कोअॅत्ल’ (पिसारा असलेला सर्प) हा तोल्तेक, माया, अॅझटेक अशा सर्व संस्कृतींमध्ये भेटणारा देव येथे दिसत आहे. आपल्या उजव्या हातामध्ये त्याने प्रश्नचिह्नासारखे दिसणारे जे धरले आहे ते त्याचे शस्त्र आहे आणि त्यावर कृत्तिका नक्षत्रातील (Pleiades) सात तारका दिसत आहेत. तो वर्णाने गोरा आहे आणि त्याचे शिरोभूषण केत्झल पक्षाच्या हिरव्या पिसांमधून बनविलेले आहे. त्याच्यामागे सूर्याचा पिरॅमिड आणि डाव्या बाजूस चन्द्राचा पिरॅमिड दिसत आहे. दोन्हीवरून बळी दिलेल्या नरबलींच्या रक्ताचे पाट वाहत आहेत. ( हे दोन्ही पिरॅमिड तेओतिहुआकनमध्ये उभे आहेत.) मधोमध अस्ताला चाललेला सूर्य दिसत आहे कारण त्याचे डोके खालच्या बाजूकडे आहे. त्याच्या पुढ्यात काही पुजारी बसलेले असून त्यांच्यातील एक देवाला मागुए झुडपापासून - निवडुंगाची एक जात - बनविलेले ’पुल्के’ नावाचे मादक पेय अर्पण करीत आहे. सूर्य आणि चन्द्र पिरॅमिडमागे स्फोट होणार्या ज्वालामुखीच्या स्वरूपात अग्निदेवता दिसत आहे. (मेक्सिकोपासून सुमारे ७० किमी अंतरावरच पोपोकातेपेत्ल आणि इझ्ताचिउआत्ल - Popocatépetl and Iztaccíhuatl - नावाचे १७,००० फुटांहून अधिक उंच असे ज्वालामुखी आहेत. पैकी पहिला जागृत असून मधूनमधून त्याचे लहान मोठे स्फोट चालूच असतात. मी तेथे असतांनाहि त्याच्या मस्तकातून धुराचे लोट बाहेर पडत होतेच. त्याचा खरा मोठा स्फोट जेव्हा होईल तेव्हा मेक्सिको शहराचे काय होईल ही चिन्ता सर्वांना जाळत असते.) अग्निदेवतेमागे उडणारा सर्प म्हणजे शुक्रतारा आणि उजव्या बाजूचा उडणारा सर्प म्हणजे पुन: केत्झल्कोअॅत्ल. दोन्ही पिरॅमिडच्या मधोमध चार दिशा दर्शविणारे चारजण आहेत. त्यांच्या डावीकडॆ वजने पाठीवर घेऊन पिरॅमिड चढणारे चौघेजण आणि त्यांच्या डावीकडे पिरॅमिडवर उभा असलेला जाग्वारच्या मुखाचे शिरोभूषण असलेला योद्धा. त्याच्या डावीकडे हातामध्ये लाकडाची गदा (mace) धरलेला एक योद्धा. त्याच्या पायाशी एक युद्धात घेतलेला कैदी आहे. त्याच्या अंगावरील हाडांची चित्रे असलेल्या वस्त्रावरून कळते की कैद्याचा लवकरच बळी चढविण्यात येणार आहे. डाव्या बाजूस सर्वात तळाशी निळ्या रंगातील योद्धा अन्य जमातींशी लढत असून बळी देण्यासाठी कैदी पकडणे हा त्याचा प्रमुख हेतु आहे. चित्राच्या खालच्या मध्यात आणि उजवीकडे मूर्तिकार, चित्रकार, दागिने बनविणारे, विणकरी, शेतकरी अशा कामात गुंतलेले लोक दिसत आहेत.
ह्या चित्रामध्ये कोर्तेज येण्यावेळच्या शहराचे दैनंदिन जीवन दाखविले आहे. चित्रामध्ये सर्वात मागे दूरवर पर्वतशिखरांची रांग दिसत असून दोन्ही ज्वालामुखींची बर्फाने वेढलेली शिखरे दिसत आहेत. त्या रांगेच्या पुढे दोन मंदिरे दिसत आहेत. पैकी डाव्या बाजूच्या मंदिरात दोन देवतांची स्थाने आहेत. निळ्या रंगाच्या उभ्या रेषा असलेले पर्जन्यदेवतेचे मंदिर आणि जांभळ्या रंगातील सूर्यदेवतेचे. सूर्यदेवतेच्या मंदिरावर चारी बाजूस प्रत्येकी पाचापाचाच्या चार ओळी आहेत. बळी दिलेल्यांच्या कवटया अशा मांडून ठेवल्या आहेत. दोन्हीपुढे बळी दिलेल्यांच्या रक्ताचे पाट वाहात आहेत. मूळचे मंदिर ह्याच सोकालो चौकामध्ये होते असे वर म्हटलेच आहे. त्या मंदिराचे जेवढे अवशेष जमिनीखाली उरले त्यांचे उत्खनन करून आता पाहण्यास मिळतात. ह्या दोन्ही मंदिरांच्या जागा तेथे आजहि दिसतात.
चित्राच्या उजव्या अंगाला जे देऊळ आहे त्याच्या शेजारची मोकळी जागा म्हणजे ’चेंडूचा खेळ खेळण्याची जागा’. धार्मिक विधीचा भाग म्हणून रबराच चेंडू वापरून एक प्रकारचा बास्केटबॉलसारखा खेळ दोन गटामध्ये खेळला जाई. हरणार्या बाजूच्या कप्तानाचा नंतर बळी दिला जाई. ह्याचे आपणास आश्चर्य वाटेल पण असे दिसते की असा बळी दिला जाणे हे एक मोठे पुण्यकृत्य मानले जाई आणि पुष्कळ जण आपले वाहते रक्त अर्पण करण्यापासून बळी जाण्यापर्यंत कृत्ये मोठया स्वेच्छेने करीत. सूर्यदेवता ही रोज आपले स्वत:चे रक्त वाहून जगाला जगविते आणि तिला वारंवार नवे रक्त अर्पण केल्याने ती देवता आपले हे नित्यकर्म करीत राहील अशी समजूत ह्या रक्त अर्पण करण्यामागे होती.
उरलेल्या चित्रामध्ये बाजारातले आर्थिक व्यवहार दिसत आहेत. येथे कसलीच नाणी वा चलन वापरात नव्हते. सर्व व्यवहार वस्तूंच्या देवाणघेवाणीने आणि सोन्याच्या वा अन्य मौल्यवान दगडांच्या माध्यमामधून होत असे. चित्रामध्ये एक प्रकारच्या मखरात बसलेला शहराचा निर्माता देव ’तेनोश’ असून चारजणांनी उचलून धरलेल्या पालखीतून तो जात आहे. जवळ त्याचे करवसुली अधिकारी दिसतात. एक व्यापारी एका तांबडे वस्त्र पांघरलेल्या अधिकार्याला सोन्यामध्ये आणि खुणांनी काही कर देत आहे. अनेक जमातींचे लोक बाजारात येत असल्याने काहीजण भाषा बोलू शकत नाहीत. ते बोटाच्या खुणांनी एकमेकांशी बोलत आहेत. बाजारात वेताच्या चटया, फळे, मक्याची कणसे. पिठाच्या चपात्या, मीठ, दूधभोपळ्यासारखॆ लांबट भोपळे अशा अनेक गोष्टींचा व्यापार चालू आहे. अगदी डाव्या खालच्या कोपर्यात एक लहान मुलगी आपल्या धाकटया भावंडाला पाठीवर बांधून मागे एक खेळण्यातला प्राणी ओढत चालली आहे. शेजारीच बापलेक पाठीवरून जड वजने घेऊन चालले आहेत. अॅझटेकांना कोणताच पाळीव ओझ्याचा प्राणी माहीत नव्हता त्याने मनुष्यबळ हेच सर्व कामांना वापरले जात असे. डोक्याभोवती दोरीने सर्व वजन घेऊन उचलण्याची प्रथा सर्वत्र दिसते. उजव्या कोपर्यात खाली एक वैदू एका मुलाच्या तोंडाची तपासणी करीत आहे. शेजारी त्याचे बायको औषधी जडीबुटी विकत आहे.
माझ्याजवळील छायाचित्रांमध्ये वरील फोटोचा खालच्या उजव्या कोपर्यातील भाग दुसर्या फोटोमध्ये गेला आहे. तो येथे दाखवीत आहे. ह्यामध्ये असेच अन्य बाजारव्यवसाय दिसत आहेत. अगदी पुढे मासे, मांस आणि अन्य प्राणी विकले जात आहेत. मागे शिकार करून आणलेले प्राणी दिसतात.
चित्रामधील आकर्षक स्त्री म्हणजे ’होचिकेत्झाल’ (Xochiquetzal) नावाची गणिका आहे. तिच्या आसपास तिचे चाहते तिची खुषमस्करी करीत आहेत. एकजण तिला मानवी हाडातून बनविलेल्या बासरीचे प्रलोभन दाखवीत आहे तर एक लढवय्या त्याने नुकत्याच जिंकून मारलेल्या शत्रूचा उजवा कापलेला हात दिला भेट करण्याची इच्छा धरून आहे. असा हात देणे हे मोठे मानाचे मानले जाई. गणिकेने हातामध्ये धरलेले फूल हे तद्देशीय असून प्रेम आणि आनंदी जीवनाच्या देवतेचे प्रतीक आहे. तिचे पाय गोंदविलेले आहेत.
ह्या गणिकेचा चेहरा प्रसिद्ध मेक्सिकन चित्रकार फ्रिडा काहलो (Frida Kahlo) हिचा आहे. रिवेरोची ही विद्यार्थिनी आणि त्याची तिसरी आणि चौथी पत्नी. (रिवेरोच्या एकूण पाच बायका आणि अनेक मैत्रिणी झाल्या. फ्रिडाचा आणि त्याचा एकदा घटस्फोट आणि पुन: विवाह झाला.) जाड भुवयांमुळे तिचा चेहरा लगेच ओळखून येतो कारण तिच्या भुवया खरोखरच ध्यानात येण्याइतक्या जाड होत्या. नंतरच्या चित्रांमधून फ्रिडा पुन: भेटेल आणि अन्यहि काहीजण ओळखीचे भेटतील.
(ह्यापुढील भागामध्ये अॅझटेकपूर्व काळातील चार संस्कृति पाहू.)
स्पर्धा का इतर?
- Read more about भित्तिचित्रे - दिएगो रिवेरा - भाग १
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4512 views
होळीच्या शुभेच्छा


स्पर्धा का इतर?
- Read more about होळीच्या शुभेच्छा
- 12 comments
- Log in or register to post comments
- 4669 views
दिल्लीतला निवडणूक निकाल


स्पर्धा का इतर?
- Read more about दिल्लीतला निवडणूक निकाल
- 8 comments
- Log in or register to post comments
- 3247 views
डीजिट्ल पेन्टीग प्रक्रिया


स्पर्धा का इतर?
- Read more about डीजिट्ल पेन्टीग प्रक्रिया
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2665 views