विज्ञान

करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती – डॉ. विनीता बाळ (भाग २)

लस दिल्यानंतर शरीरात काय व्हायला हवं? लस मिळालेल्या लोकांकडून संसर्ग कमी होतो का? हर्ड इम्युनिटी कधी येईल का? यासारख्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत ज्येष्ठ इम्युनॉलॉजिस्ट डॉ. विनीता बाळ.

सजीवता आणि सक्रिय अनुमानाचा सिद्धांत

सजीव असणे म्हणजे नेमके काय? ह्या प्रश्नाचे उत्तर तत्त्ववेत्ते फार पूर्वीपासून शोधत आलेले आहेत. पण भौतिक-रसायन-जीव शास्त्र ह्या प्रश्नाकडे वळून चार-पाच दशकेच झाली आहेत. सजीव प्राणी म्हणजे एक प्रकारची स्वयंनियोजीत संस्था (self-organizing system) असते असा विचारप्रवाह त्यातून निर्माण झाला. तरीही जाणीव (consciousness) आणि विशेषतः स्व-ची जाणीव (self-consciousness) म्हणजे नेमके काय ह्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे अजून मिळत नव्हती. गेल्या दोन दशकांत मज्जातंतू संशोधकांनी इतर सर्व शास्त्रांची मदत घेऊन ह्या प्रश्नांवर संशोधन सुरू केले आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

गुरु-शनी यांची पिधान युती - Great Conjunction

ग्रहांच्या युती अधूनमधून होत असतात ज्यांना पिधान युती असे म्हटले जाते. गुरू आणि शनि या आपल्या सौरमालेतील दोन सर्वात मोठ्या ग्रहांची पिधान युती 21 डिसेंबरला जगभरातून दिसली. दोन मोठ्या ग्रहांची पिधान युती असल्यामुळे याला ग्रेट कन्जंक्शन (Great Conjunction) असे म्हटले गेले. सुर्यास्तानंतर गुरू आणि शनी एकमेकांच्या अत्यंत जवळ, म्हणजे साधारण एक दशांश कोन इतके जवळ आले.

फोटोत गुरूचे तीन चंद्र, शनी ग्रह, शनीभोवती असणारी कडा आणि शनीचा चंद्र टायटन दिसत आहेत.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कोरोना लस - mRNA तंत्रज्ञान

mRNA ह्या प्रकारची लस म्हणजे काय? ती कशी तयार करतात? ही लस अपायकारक तर नाही ना? सांगताहेत सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ योगिनी लेले.

कोरोना लस - तीन विचारप्रवाह

मूळच्या पुण्याच्या आणि आता सिडनीवासी असलेल्या योगिनी लेले यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे व त्याच क्षेत्रात काम करतात. लशीविषयी काही रोचक माहिती देणारी एक लेखमाला त्या 'ऐसी अक्षरे'साठी लिहीत आहेत. त्यातील हा पहिला भाग.

करोनाव्हायरस - टेस्टिंग करून घ्यावे का?

करोनाव्हायरससाठी कोणकोणत्या टेस्ट्स उपलब्ध आहेत? लक्षणे नसताना टेस्ट करून घ्यावी का? सांगताहेत डॉ. अनंत फडके

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

करोनाव्हायरस : विविध वस्तूंवरच्या व्हायरसमुळे संसर्गाचा धोका

नक्की कशामुळे करोनाव्हायरसचा संसर्ग होऊ शकतो, आणि तो टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी? सांगताहेत डॉ. अनंत फडके.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

धुमकेतू - NEOWISE C/2020 F3

सध्या आकाशात एक नुकताच शोधलेला धुमकेतू साध्या डोळ्यांना दिसत आहेत. धुमकेतुचे नाव C/2020 F3 (NEOWISE) असे ठेवण्यात आले आहे.

धुमकेतु नुकताच सुर्यामागून प्रदक्षिणा पुर्ण करून परतीच्या मार्गाला लागला आहे. संपुर्ण प्रदक्षिणेचा काळ साधारण सात हजार वर्षे इतका आहे. सुर्याच्या अजून जवळ असल्याने विषववृत्ताजवळील ठिकाणांहून धुमकेतू दिसणे सध्या अजून थोडे अवघड आहे.

सध्या सुर्योदया अगोदर 30-40 मिनिटे बरोबर ईशान्येस पाहिल्यास धुमकेतू दिसू शकते. दोन-तीन आठवड्यांनी संध्याकाळी सुर्यास्तानंतर दिसेल, पण जस जसा लांबा जाईल तस तसा तो फिका दिसू लागेल. तेव्हा, लवकरात लवकर पाहणे इष्ट.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

१५ ऑगस्टला करोना लस उपलब्ध? - डॉ. मृदुला बेळे

आपली ‘स्वदेशी’ लस स्वातंत्र्यदिनाला येणार म्हणून जनता कृतकृत्य झाली आहे. तर अनेक डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ मात्र इतक्या कमी कालावधीत ही लस येणं अशक्य आहे, असं म्हणत आहेत. या पार्श्वभूमीवर जरा या दाव्यांची सत्यासत्यता तपासून पाहण्यासाठी हा लेखप्रपंच.

करोनाकाळातील वस्त्रहरण

“Torture the data, and it will confess to anything.” – Ronald Coase (British Economist and author)
आंतरजालीय माहितीचा विस्फोट झाल्यानंतर आलेली पहिली साथ म्हणून आपण या कोरोनाच्या साथीकडे बघू शकतो. त्यामुळे कोरोना आणि माहिती अशा दोन साथींना आपल्याला एकत्रित तोंड द्यावे लागते आहे. अशा प्रसंगी अधिकृत व विश्वासार्ह माहिती देणाऱ्या स्रोतांचे वस्त्रहरण कसे झाले ते सांगताहेत डॉ. अनिल जोशी.

पाने

Subscribe to RSS - विज्ञान