राजकीय

अमेरिकेची पोलीस यंत्रणा वाटेल ती नावे पुराव्याशिवाय घालू शकते!

Taxonomy upgrade extras: 

अमेरिकेची दहशतवादासाठी जी संशयितांची यादी आहे (आठ लाख लोक!) तिच्यात कोणाचे नाव घालताना त्या व्यक्तीला बचावाची संधी दिली जात नाही . त्यामुळे एका अर्थी पोलीस यंत्रणा मनमानी करून त्यांना वाटेल ती नावे पुराव्याशिवाय घालू शकते . या मुद्द्यावर रिपब्लिकनांनी काल डेम चे विधेयक फेटाळले . ते योग्य वाटते . आज ज्यांना दहशतवादाच्या नावाखाली विमान प्रवासाची बंदी आहे त्यांना बंदूकही घेता येऊ नये अशा जातीचे विधेयक एक "सौम्य" रिपब्लिकन बाई आणणार आहेत . काय होते बघू या !

दहशतवाद विरोधासाठी अमेरिकेने भारताकडून काय शिकावे?

Taxonomy upgrade extras: 

http://theweek.com/articles/630723/what-america-could-learn-from-india-a...
प्रत्येक गर्दीच्या ठिकाणाने (मॉल, थिएटर , संस्था इत्यादी ) आपली स्वतःची सुरक्षा यंत्रणा उभारावी: सरकारवर अवलंबून राहू नये . सरकार इतक्या प्रचंड आव्हानांना पुरे पडू शकत नाही .

समसंभोगी लोकांना "त्यांच्यावर दया म्हणून" मृत्यूची शिक्षा केली पाहिजे: इमाम

https://www.youtube.com/watch?v=Vev-OzHQy94
समसंभोगी लोकांना "त्यांच्यावर दया म्हणून" मृत्यूची शिक्षा केली पाहिजे असे सेन्ट्रल ओर्लान्डो मशिदीचा इमाम नुकतेच (कत्तली च्या आधी ) म्हणाला . तू-नळी धागा वर दिला आहे . या भडव्या इमामांना निदान अमेरिकेतून हाकलले पाहिजे .

Taxonomy upgrade extras: 

ओर्लान्डो मधील कत्तल : काही निरीक्षणे

Taxonomy upgrade extras: 

ओर्लान्डो मधील कत्तल (पन्नास ठार , त्रेपन्न जखमी (पाच अत्यवस्थ )): काही निरीक्षणे
१. मारेकरी ओमर मातीन (अफगाण वंशाचा , पण अमेरिकेत जन्मलेला व वाढलेला, वय वर्षे तीस ) याने अल कायदा आणि हेजबुल्ला यांच्याशी आपले संबंध असल्याचे भाष्य केले होते (जी पोकळ वल्गना ठरली )
२. ओमारचे एफ बी आय बरोबर ३ इंटरव्यू आणि दहा महिने कसून चौकशी झाली होती . "पुरेसा धोका न आढळल्यामुळे" ती बंद करण्यात आली .
३. स्वयंचलित मशीनगन्सवर बिल क्लिंटन ने बंदी घातली होती . पण ती मर्यादित काळापुरती होती आणि आता अस्तित्वात नाही.ओमर त्यामुळे एक आठवड्यापूर्वी स्वयंचलित मशीन गन विकत घेऊ शकला . (जी "ऑन लाइन " सहज मिळते ).

ब्राह्मण समाजाने आता आरक्षणाची मागणी करावी!!!!

Taxonomy upgrade extras: 

सध्या भारतात नवीनच ट्रेंड आला आहे,ज्या जाती ,जातसमूह उच्च समजले जात होते त्यांनी आता आरक्षण मागायला सुरवात केली आहे.एकतर आरक्षण काढा नाहीतर आम्हालाही आरक्षण द्या अशी मागणी जोर धरु लागली आहे.सुदैवाने किंवा दुर्दैवाने आरक्षणाची कमाल मर्यादा ५०℅ आहे.त्यामुळे नवीन जातसमुहांना आरक्षण देणे अशक्य झाले आहे.

मानव्योत्तरतेचा (Transhumanism) जाहीरनामा

Taxonomy upgrade extras: 

१.मानवी भविष्यावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचंड आणि खोलवर परिणाम होऊ घातला आहे. मानवी मर्यादांचे पुढील प्रकारांनी उल्लंघन होणे स्वीकारार्ह आणि स्वागतार्ह आहे : वार्धक्याचा पराभव ,ज्ञानग्रहणक्षमतेची वाढ,,दु:ख –वेदना यांच्यावर मात आणि पृथ्वीपलिकडे मानवी वस्तीचा प्रसार.
सध्याच्या मानवी अवस्थेच्या आम्ही पलिकडे जाऊ इच्छितो.
२. यापूर्वीच्या सर्व ‘’वादां’’पेक्षा मानव्योत्तरता-वादाचे वेगळे लक्षण म्हणजे मानव्यापलिकडे जाण्यासाठी करण्याचा
तंत्रज्ञानाचा वापर.

"स्त्रीवादाची पश्चिमेतली "तिसरी लाट""

Taxonomy upgrade extras: 

लिंगाधिष्ठीत समाजव्यवस्था , शोषण आणि अत्याचार यांच्या विरोधात उभी राहणारी चळवळ म्हणजे स्त्रीवादी चळवळ होय. याला वैचारिक अधिष्ठान पुरविणारा विचार म्हणजे स्त्रीवाद . स्त्रीवाद तीन सूत्रांवर आधारलेला आहे :
१. मानवी जगाच्या रचनेच्या प्रत्येक पैलूत स्त्रिया महत्वाचे योगदान करतात .
२. समाजाने केलेल्या पद्धतशीर वंचनेमुळे स्त्रियांना आजतागायत आपले योग्य स्थान मिळू शकलेले नाही .
३. स्त्रीवादी चळवळीने वैचारिक संशोधन जरूर करावे , परंतु त्याचा रोख समाज-परिवर्तनाकडे असला पाहिजे .

अमेरिकन निवडणुकीत काय होणार?

Taxonomy upgrade extras: 

ट्रम्प यांना रोखण्यासाठी क्रुझ-कसिच यांची युती

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी पक्षांतर्गत १२३७ प्रतिनिधींची मते आवश्यक आहेत. ट्रम्प यांना तेवढी मते मिळू नयेत यासाठी टेक्सासचे सिनेटर क्रुझ आणि ओगायोचे गव्हर्नर कसिच यांनी जुलै महिन्यात होणाऱ्या क्लिव्हलँड येथील सभेपर्यंत आपसांत न लढण्याचा निर्णय घेतला आहे.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/republican-presidential-race-cr...

फुसके बार – ०५ मार्च २०१६ कन्हैयाची पोपटपंची व भुक्त लोकांची वळवाची दिवाळी

फुसके बार – ०५ मार्च २०१६

कन्हैयाची पोपटपंची व भुक्त लोकांची वळवाची दिवाळी
.

Taxonomy upgrade extras: 

पाने

Subscribe to RSS - राजकीय