Skip to main content

कादंबरी

"काळे रहस्य"

मकरंद साठे यांची कादंबरी "काळे रहस्य" वाचायला घेण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे लेखकाने या लेखनाचा बाज सस्पेन्स कादंबरी, गुन्हा, पोलिस तपास या अंगाने ठेवलेला आहे. माझ्यासारख्या इतर सामान्य वाचकांप्रमाणे , क्राईम थ्रिलरचं आकर्षण मलाही आहेच. त्यामुळे या कादंबरीबद्दलचं कुतूहल नक्कीच वाटलं.

समीक्षेचा विषय निवडा

नवल- पुस्तक परिचय

नवल.
जानेवारी २०२१ मध्ये प्रकाशित झालेली प्रशान्त बागड यांची ही पहिलीच कादंबरी आहे..

पुस्तकाची बांधणी, मुखपृष्ठ, ब्लर्ब, फॉंट आणि बुकमार्कसाठीची स्ट्रीप हे सगळं एवढं सुंदर आहे की पुस्तक हातात घेतल्यावर लगेच लक्षात आलं की काहीतरी कुलवंत असा प्रकार असणार आहे हा..!

कादंबरीची थीम म्हणाल तर, सोनकुळे आडनावाचा, एक अत्यंत चांगली ॲकॅडमिक गुणवत्ता असलेला तरूण खानदेशातून पुण्यात ग्रॅज्युएशनसाठी येतो, त्याच्या जगण्याचा ऐसपैस तुकडा आहे हा..

समीक्षेचा विषय निवडा

एम अँड द बिग हूम

Em and the Big Hoom

रीटा वेलिणकर वाचल्यानंतर, जेरी पिंटो यांचं 'एम अँड द बिग हूम' वाचणं साहजिक वाटलं. मी मूळ पुस्तक वाचलं, पण शांता गोखलेंनी याचा मराठी अनुवादही केला आहे. आणि शांता गोखलेंबद्दल मिळेल ती माहिती घेताना, त्या दोघांचा एक फार सुंदर व्हिडियो बघायला मिळाला, ज्यात दोघांच्या मैत्रीची झलक बघायला मिळाली. या पुस्तकाला २०१६मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि त्याच वर्षी, अमेरिकेचा विंडहॅम-कॅम्पबेल पुरस्कारही मिळाला.

समीक्षेचा विषय निवडा

“अंतर्यामी खजुराहो”ची मालिका येऊ दे…

गोपाळ आजगावकर यांच्या “अंतर्यामी खजुराहो” कादंबरीविषयी युसुफ शेख : कादंबरी कितीही वेळा वाचली तरी ती नेहमी तेवढीच जिवंत, रसरशीत वाटते व सत्तरीच्या दशकातील कालखंडाची प्रचंड अस्वस्थकारक, घालमेल उडवणारी सफर घडवून आणते.

समीक्षेचा विषय निवडा

रंगमयी...रसमयी बाणाची कादंबरी!!

रंगमयी .... रसमयी बाणाची कादंबरी !!

समीक्षेचा विषय निवडा

ढढ्ढाशास्त्री परान्ने: आधुनिकतेचे खाली डोके वर पाय

काळ उघडी करणारी पुस्तके आणि इ.स. 1900 मधील इ.स. 2000सालची कल्पना हे लेख वाचून माझ्या आवडत्या पुस्तकाची आठवण झाली. त्या पुस्तकाची ओळख करून देणारा हा लेख मुक्त शब्द मासिकात प्रकाशित झाला होता, तो इथे पुनर्प्रकाशित करत आहे.

ढढ्ढाशास्त्री परान्ने

समीक्षेचा विषय निवडा