Skip to main content

दिनविशेष

ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट २०१५: अर्थात आपल्या परसातील/परीसरातील पक्ष्यांची मोजणी

Taxonomy upgrade extras

गेल्या वर्षी आपण याच सुमारास पक्षीनिरिक्षण केले हे आठवत असेलच. याही वर्षी १३ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या दरम्यान जगभरात 'ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट' होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही थोर करायचं नाहिये तर या चार दिवसांत तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला जे जे पक्षी दिसले त्या त्या पक्षांची नोंद करून ती तुम्ही www.ebird.org वर करायची आहे.

१५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश

Taxonomy upgrade extras

नमस्कार
आपणा सर्वांनाच माहिती आहे की १९४७ मध्ये झालेली भारताची फाळणी एक दुर्दैवी घटना होती. पाकीस्तान आणि बांग्लादेशात विभक्त झालेले प्रदेश भारतात उद्या परत आले तर तेही आपल्याला हवेच आहे. जर जर्मनीच पुर्नएकीकरण होऊ शकत व्हिएतनामच होऊ शकत तर भिविष्यातल्या कोणत्यातरी शुभ मुहूर्तावर एक ना एक दिवस पाकीस्तान आणि बांग्लादेशही भारतात येतील अशी आशा करता येईलच. या धाग्याच्या उद्दीष्टाकरता हे शांततामय मार्गाने होत आहे अस गृहीत धरून चालू (इतर मार्गांच्या चर्चेकरता वेगळा धागा काढला जाण्यास माझी ना नाही.)

वटसावित्रीच्या निमित्ताने ...

Taxonomy upgrade extras

मद्रराज अश्वपतिची रूपवान कन्या सावित्रीने राज्यभ्रष्ट राजा द्युमत्सेनाचा राजकुमार सत्यवानाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले. पित्याचा राजमहाल आणि महालातील सर्व सुखांचा त्याग करून सावित्री आपल्या पती आणि सासर्‍यांसोबत वनात राहु लागली. एक पत्नी म्हणून, सून म्हणून येणारी सर्व कर्तव्ये सावित्री अतिशय निष्ठेने पार पाडीत होती. आयुष्य सु़खासमाधानात जात असताना एके दिवशी सत्यवानाला वनात लाकडे तोडत असताना अपमॄत्यु आला आणि त्याचे प्राण घ्यायला आलेल्या यमाला "माझ्या पतीसोबत मी पण येणार.. न्यायचे तर दोघांनाही न्या" असा अवघड पेच घालत सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ..

'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व

Taxonomy upgrade extras

धागा शीर्षकातील 'सर्व'-समावेशक हा शब्द सर्व बॅकग्राऊंडचे -कोणत्याही जाती-धर्म-वंशाचे- लोक एकत्र सहभागी होऊ शकतील या अर्थाने वापरला आहे. जसे की वाढदिवस आहे वाढदिवसास निमंत्रितांवर जाती धर्माची पुटे राहत नाहीत. (पंतप्रधान मोदीतर आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीसाठी वाढदिवसाची वेळ वापरून घेतात) नवीन वर्षाची सुरवात साजरे करणे (जगातल्या कोणत्याही कॅलेंडर नुसार) वस्तुतः निधर्मी असावे. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट हे सण सुद्धा निधर्मी असतात. फ्रेंडशीप डे सारखी कल्पना सुद्धा एक चांगली कल्पना आहे.