मिस्टर काय करतात.. ?
स्क्रीन काळा आणि मोठ्ठा गोळा या पुस्तकातून... ऑनलाईन नसल्याने फार कोणी वाचलं नसावं.
........................
आमच्या एक शिक्षिका माझ्या आईची मैत्रीण म्हणजे फ्यामिली फ्रेंडही होत्या. (काय नशीब..! काय नशीब..!! तेव्हापासूनच हे असंच..)
त्यांच्याकडे गेलं की नेहमी त्या एका बरणीतून मारी बिस्कीट काढून द्यायच्या. दहा एक वर्षं मी तिथे जात राहिलो. पण तीच फळी, तोच डबा आणि तेच मारी...
त्यांच्याकडे टायगर म्हणून एक मोठा कुत्रा होता. तो नेहमी उदास दिसायचा. मारी एक्स्प्लेन्स दॅट..
मला कधीतरी तरी ढोकळा, थालीपीठ, गेलाबाजार पोहे वगैरे काही देतील म्हणून मी आशाळभूतपणे वाट बघावी तरी परत मारीच ..च्यामारी... चहा आणि मारी कॉम्बोवरुनच ही शिवी आली असणार..
बुवा नाही दुसरं बिस्किट परवडत, असंही नव्हतं. घरची परिस्थिती अगदी चांगली होती हो त्यांची. बदल म्हणून एखादा दिवस पार्ले जी तरी ठेवायचं. पण नाही. शाळेत मी त्यांना पुरेसा वाव (चांगला वाव दीड वाव) देऊनही बाईंनी मार नाही दिला कधी.. पण मारी भरपूर दिली..
आणखी एक घर. आमच्याच चाळीत दोन खोल्या सोडून पलीकडे.. चांगल्या होत्या हां त्या काकू. पण त्यांचा एक प्रॉब्लेम होता..
त्या नेहमी केक घरी करायच्या (केकपात्र वाळूबिळू घालून गॅसवर ठेवून).
नेहमी केकच. आणि आम्ही नेहमी तो शिरा म्हणून खायचा.
काय हे.. शिरा म्हणून चवीला इतका छान असायचा. पण एकदा तरी त्याची केकसदृश वडी झाली असती तर त्यांना किती बरं वाटलं असतं. उगीचच "जमला नाही नीट केक आज" म्हणण्यात आयुष्य गेलं.
...."आज आवाज साथ देत नाही" म्हणण्यात गायकाचं आयुष्य जातं तसं.
कशाच्याही वड्या करायला गेलं कि वड्यांऐवजी सारणसदृश पदार्थ बनणं आणि तो वाटीत घेऊन चमच्यानं खावा लागणं हे एक प्राक्तन.
माझ्या आईनं एकदा बरंच खपून लोणी, मैदा, चॉकलेट, अंडी वगैरे मिसळून केकचं बॅटर उर्फ सारण बनवलं. ते मिक्सरमध्ये घातलं. ग्राइन्ड केलं. आणखी काही आणायला ती दुस-या खोलीत गेली. मिक्सरवर झाकण नव्हतं. पण पॉवर चालू होती. माझे आजोबा फिरत फिरत तिथे आले आणि उगीच वयानुसार आलेल्या तंद्री कम मंत्रचळाच्या प्रभावाखाली काहीतरी पुटपुटत मिक्सरचं बटन दाबलं. घुईSSS असा आवाज होऊन पातळसर रबडीसदृश केकद्रव पास्कलच्या दाब पारेषणाच्या नियमासारखा सर्व भिंतींवर सम प्रमाणात विभागून फवारला गेला. असो.
आजीनं डोळे अधू झाल्यावर करंजीत पिठीसाखरेऐवजी रांगोळी घातली. मग मी कचकचत्या तोंडानं ते सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं. पण खूप खूप उशीर झाला होता. सगळ्याच टाकून द्याव्या लागल्या.
मधेमधे एखाद्या वर्षी दिवाळी आधी तीन चार दिवस आमच्याकडे एक सुतकी दिवस उगवायचा. माझी आजी (टीम लीडर) आणि आई (टीम मेंबर) उदास चेह-यानं बसलेल्या दिसायच्या.
कॉलेज मधून किंवा नंतर नंतर ऑफिस मधून आल्यावरही.. त्या दोघी अशा बसलेल्या दिसल्या की मला समजायचं की बॅड न्यूज आहे. म्हणजे:"चकल्या तेलात विरघळत आहेत".
मग "कसे गेले हो?".. .... "काल तर छान होते. माझ्याशी बोलले..भातामटी जेवले.." अशा टोनमध्ये बोलणं चालायचं. आजी "मोहन कमी पडलं वाटतं भाजणीला" असं काहीतरी म्हणत असायची.
इतकी चाळीस पन्नास वर्ष चांगल्या चकल्या केल्यावर अचानक त्या तेलात विरघळायला लागल्या,बिघडल्या ही भावना तिला कशी वाटत असेल ते एक असा सर्जन समजू शकेल ज्याच्या ऑपरेशन टेबल वर आत्ताच पेशन्टचा मृत्यू झाला आहे.
येस..
डेंटिस्टच्या बाबतीत प्रत्यक्ष मृत्यू नसला तरी "दात 'जाणं'... दात वाचवता न येणं..?
"दात जाणं" इन डेंटिस्ट्री इज इक्विव्हॅलंट टू 'डेथ' इन सर्जरी.."
तसंच..
"चकली डिजॉल्विंग इन ऑइल इज इक्विव्हॅलंट टू 'डेथ' इन सर्जरी.."
डॉक्टरची ती जबाबदारी, तो प्रोफेशनॅलीझम अशा दु:खी झालेल्या आजीत, आईत,बायकोत असतो. आणि आपण तिच्याबाबत म्हणतो ..हाउसवाईफ...ती घरीच असते..
..आणि तिला विचारतो "मिस्टर काय करतात?"
..............
.....(बाय द वे, 'मिस्टर' नंतर बरेच दिवस चकल्या स्प्रिंग सारख्या उलगडून खातात आणि "छान झालीय अगं चकली..खरंच..खरंच अगदी.." असं म्हणत राहतात.)
व्वा!
डॉक्टरची ती जबाबदारी, तो प्रोफेशनॅलीझम अशा दु:खी झालेल्या आजीत, आईत,बायकोत असतो. आणि आपण तिच्याबाबत म्हणतो ..हाउसवाईफ...ती घरीच असते..
..आणि तिला विचारतो "मिस्टर काय करतात?"
शेवटचं वाक्य अगदी भिडलं बरं का गवि! आई, आजी, आत्या, मामी सगळ्यांना अगदी लागू होतं असं वाक्य.
'च्यामारी'ची कोटिही आवडली.
ननि.. अहो मिस्टर काय करतात
ननि.. अहो मिस्टर काय करतात असा प्रश्न चकल्या घरी करणार्या उर्वरित सुगृहिणींना अजूनही विचारला जातोच.. :)
अगदी आजही मुंबईतसुद्धा.. माझ्या पत्नीला विचारतात तर नेहमी लोक.. ती स्वतः माझ्यापेक्षाही उच्चपदावर उत्तम करियर करत असूनही. (आणि मी बेकार नसूनही ;) )
पण युअर पॉईंट इज टेकन..
उत्तम लेख
हे व्यवस्थापनवाले लेखांना श्रेणी देण्याची सुविधा कधी देणार कोण जाणे. असती तर मी या लेखाला पाचापैकी साडेचार तरी दिली असती. तो अर्धा पाइंट लेख लवकर संपवण्यासाठी.
अवांतर - हा लेख स्टॅंड अप कॉमेडी म्हणून सादर करायला उत्तम मटेरियल आहे. तुम्ही कधी विचार केला आहे असे कार्यक्रम करण्याचा?
+१
हा लेख स्टॅंड अप कॉमेडी म्हणून सादर करायला उत्तम मटेरियल आहे. तुम्ही कधी विचार केला आहे असे कार्यक्रम करण्याचा?
मला हे अवांतर वाटत नाही. गवि, तुमची हरकत नसेल तर भविष्यात मी या मटेरिअलचा वापर करू इच्छिते. (स्टँड अप कॉमेडी असेच नाहीत पण काही कल्पना डोक्यात आहेत.) अर्थातच, लेखक म्हणून तुम्हाला श्रेय देणे हे करता येईल.
हा लेख नुसता घडाघडा वाचून
हा लेख नुसता घडाघडा वाचून दाखवला तर दोन मिनिटात होईल कदाचित. पण परफॉर्मन्स म्हणून केला तर बराच रंगवता येतो. उदाहरणार्थ
त्यांच्याकडे गेलं की नेहमी त्या एका बरणीतून मारी बिस्कीट काढून द्यायच्या. दहा एक वर्षं मी तिथे जात राहिलो. पण तीच फळी, तोच डबा आणि तेच मारी...
त्यांच्याकडे टायगर म्हणून एक मोठा कुत्रा होता. तो नेहमी उदास दिसायचा. मारी एक्स्प्लेन्स दॅट..
हे बोलताना थोडं फुलवलं की खालीलप्रमाणे होईल.
त्यांच्याकडे मला जायला नको वाटायचं. वाईट वगैरे नव्हत्या. वाईट म्हणजे पलिकडच्या कुलकर्णीबाई, त्या महा खवट. क्रिकेट खेळताना त्यांच्या घरी बॉल गेला की विळीवरती छान दोन तुकडे करून द्यायच्या. तशा नाही. प्रेमळ होत्या अगदी. आईने विरजण मागायला किंवा वाटीभर साखर मागायला पाठवलं की अगत्याने बसायला सांगायच्या. एकट्याच होत्या. नवरा सोडून गेला होता. त्यामुळे पोरांशीही बोलायला बरं वाटायचं बहुतेक. 'थांब तुझ्यासाठी तोंडात टाकायला काहीतरी देते' असं म्हणायच्या. आता हे 'काहीतरी' म्हटलं की माझी नजर त्यांच्या फळीवरच्या कोपऱ्यातल्या डब्याकडे जायची. कारण त्यांचा हात तिथेच जाणार हे माहीत असायचं. स्टीलचा डबा. त्यामुळे सुरूवातीला आत काय असेल याचं कुतुहल होतं. पण वीसेक वेळा गेल्यानंतर मला ओळखता यायला लागलं होतं. अगदी सुपरमॅनला असलेल्या एक्सरे व्हिजनप्रमाणे आतमधलं दिसायचं. मारी बिस्किट. त्यावेळी सुपरमॅनसारखी एक्सरे व्हिजन असावी असं वाटायचं, पोरींकडे बघताना तरी... पण माझी पॉवर फक्त त्या डब्यापुरती मर्यादित होती. आणि नेहमीच त्या डब्यातनं फक्त मारी दिसायची. मग माझा चेहरा केविलवाणा व्हायचा.
मग माझी दृष्टी त्यांच्याकडे असलेल्या कुत्र्याकडे जायची. चांगला अल्सेशियन होता. त्याचं नावसुद्धा दणदणीत. टायगर! आता या बाईंकडे अल्सेशियन कुत्रा का असावा हे एक कोडंच होतं. अत्यंत सोवळं घर.सगळीकडे देव, साधू, संत, बाबा यांच्या तसबिरी. चोरसुद्धा घरात शिरताना नमस्कार करून शिरेल असं. त्यांच्याकडे चांगलंसं पामेरियन शोभलं असतं. तर ते असो. हा कुत्रा या घरात वाढून अत्यंत गरीब आणि मवाळ झालेला होता. मी मारी खाताना त्याच्याकडे बघायचो. तोही केविलवाण्या नजरेने बघून माझ्याकडे बघायचा. त्याला माझं दुःख समजायचं. कारण त्याचंही पोषण दिवसरात्र मारी आणि दुधावर झालेलं होतं. या दुधमारीमुळे त्या टायगरचं पार वासरू झालं होतं.
चांगल्या बाई. पण त्यांच्याकडे गेलं की दर वेळी तेच. चहा आणि मारी. चहा आणि मारी. च्यामारी!... च्यामारी हा शब्दप्रयोग त्यांच्या घरी जाणाऱ्या लोकांनीच सुरू केला आहे अशी माझी अनेक वर्षं समजूत होती. महामारीची साथ देखील त्यांच्याच घरातनं येते असाही समज होता.
---
सगळा लेख म्हणजे किमान दहा मिनिटाचं मटेरियल होईल. हेच शब्द वापरावे असं नाही. प्रत्येकाची शैली थोडी वेगळी असेल. पण स्टॅंडअप कॉमेडीमध्ये एक विषयाची फांदी पकडून तिला छोट्या उपफांद्या, डहाळ्या असं करत करत पुढे जातात. तुमच्या मूळ लेखात तोच आकारबंध आहे. इथे फक्त जास्त बारीक बारीक फांद्या काढलेल्या आहेत.
बरोबर
ही दोन वेगळी माध्यमं आहेत. गविंच्या मूळ लेखनात खूप धारदार विनोद आहेत, वाचताना त्याची सावकाश मजा घेता येते. स्टॅंड अप कॉमेडीसाठी थोडं अघळपघळ, गप्पा मारल्यासारखं, किस्सा सांगितल्यासारखं यायला लागतं. त्यांच्या लेखातही इकडचे तिकडचे किस्से सांगत आपला मुद्दा वाचकाच्या नकळत ठसवण्याची शैली वापरलेली आहे. त्यामुळे ते स्टॅंडअपसाठी चांगलं मटेरियल ठरतं.
माझ्या डोक्यात असं काही-
बाई: "अरे गवि ये ये. किती दिवसांनी... अरे टायगर, हा बघ कोण आलाय?"
गवि (आश्चर्याने): "अरेच्चा! टायगर आहे अजून?" (टायगर कधीच खपला असावा अशा आविर्भावात)
बाई: "हो आहे ना! बस. बस. थांब हं मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते खायला."
(बाई आत जातात)
गवि (प्रेक्षकांना): "घेऊन येते खायला..असं बोलून गेल्या ते काही पोहे, ढोकळा, थालिपीठ आणतील अशा आविर्भावात... पण तुम्हाला सांगतो.. चहा आणि मारी बिस्किटं यांच्याशिवाय काही बाहेर येत नाही बघा यांच्या स्वयंपाकघरातून.
लहानपणापासून बघतो आहे. तेच फडताळ, तीच बरणी आणि तीच मारी बिस्किटं. कधी चुकून पार्ले-जी सुद्धा मिळालं नाही."
(बाई चहा आणि मारी बिस्किटं घेऊन येतात.)
बाई: "घे हो गवि."
गवि (वैतागून): "च्यामारी! मी म्हणालो नव्हतो.."
बाई: "काय म्हणालास?"
गवि (गडबडून): "काही नाही, काही नाही चहा आणि मारी.. चहा आणि मारी असं म्हणालो मी. फार्रर्र आवडतात मला चामारी तुमच्या हातची. गेली दहा वर्षे हीच खातो तुमच्याकडे डोकावलो की."
बाई: "इश्श! अरे मागे केक नव्हता का दिला तुला. मी स्वतः केलेला."
गवि: "हो तर.. मी तो शिरा म्हणून मिटक्या मारत खाल्ला."
वगैर वगैरे वगैरे.... हा संवाद पुढे वाढवत न्यायचा. त्यात मग तो उदास दिसणारा टायगर वगैरेआणता येईल.
वरचे दोन संवाद वापरून एक बनवला आहे.
तो प्रोफेशनॅलीझम अशा दु:खी
तो प्रोफेशनॅलीझम अशा दु:खी झालेल्या आजीत, आईत,बायकोत असतो. आणि आपण तिच्याबाबत म्हणतो ..हाउसवाईफ...ती घरीच असते....आणि तिला विचारतो "मिस्टर काय करतात?"
वरचे वाक्य एकदम भारी हो गवि!
वरवर चिमटे घेणारा हा लेख शेवटी ह्या वाक्याने अगदी मार्मीक लिहून जातो.
संपूर्ण लेख उत्तम जमून आलाय... अगदी गणपाच्या पाकृसारखा!
लेखांना श्रेणी देण्याची सोय
लेखांना श्रेणी देण्याची सोय झाली की एक 'गवि' अशी श्रेणी बनवून टाकायची (प्रतिसादांत धनंजय). गवि, तुमचं लिखाण आवडलं हे वेसांनल. वरची चर्चाही आवडलीच आवडली.
"चकली डिजॉल्विंग इन ऑइल इज इक्विव्हॅलंट टू 'डेथ' इन सर्जरी.."
चकली हसली की सुगरण उदास होणारच. परवाच एक मैत्रीण करंजी हसल्यावर आपण स्वतःच हसली हे पाहून मात्र गंमतच वाटली.
:-)
लेख आत्ताच वाचला आणि आवडला. 'हाऊसवाईफ' हे जे काही नाव आहे ते मला भयंकर अपमानास्पद वाटतं. कोणी कोणाला 'हाऊसवाईफ' असं खाली दाखविण्यासाठी म्हटलं की मला माझी आजी आठवते. जेमतेम नववीपर्यंत शिक्षण झालेली माझी आजी सर्वार्थाने माझ्या आजोबांहून अधिक समर्थ होती. तुम्ही म्हणता तसे प्रोफेशनलिझम तिच्या व्यक्तिमत्वात अगदी कुटून भरलेले होते. स्वयंपाक-शिवणकाम-विणकाम-स्वच्छता-व्यवहार (आर्थिक, सामाजिक) या तिने स्विकारलेल्या जबाबदार्यात तिच्याइतकी प्रविण व्यक्ती मला अजूनही भेटलेली नाही. तिच्या काळात तिला संधी उपलब्ध असत्या तर तिने कोणत्याही क्षेत्रात नाव कमावले असते पण त्या न मिळूनही, ती जाऊन पंचवीस वर्षे उलटली तरी आजही लोक तिच्या हातच्या पदार्थांबद्दल भरभरून बोलतात हे यश नसेल तर काय आहे ते मला माहिती नाही. तिच्या चकल्या काही कधी तेलात विरघळल्या नाहीत (ते अशक्यच होतं!) पण विणकामात दोन दिवस काम केल्यानंतर झालेली एक बारीकशी चूक सापडली तर तिने फराफरा स्वेटर उसवून काढलेला पाहून मलाच अंधेरे आले होते. तिच्यासारख्यांची 'हाऊसवाईफ' म्हणून बोळवण करणे म्हणजे घोर अपमान आहे!
काही डिफेंड वगैरे नाही हो.
काही डिफेंड वगैरे नाही हो. खुद्द माझ्या घरात गेल्या दोन पिढ्यांमधे स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने आणि बर्याचदा जास्त पगार आणि अधिकाराच्या जागी करियर / व्यवसाय करताहेत. नातेवाईकांत सर्व शाखांमधे.
आजीच्या काळात हे गृहिणी असणं कॉमन होतं.
..आणि तरीही आजच्या काळात गृहिणी किंवा गृहस्थ (!?) असणं, बाय चॉईस, हे कोणत्याही प्रकारे डेरोगेटरी आहे असं मला वाटत नाही. तसं वाटणं म्हणजे निव्वळ स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पनांचा अविष्कार आहे.
एक घर, त्यातली माणसं आणि व्यवस्थापन हे अजिबात कमी दर्जाचं नाही. येस.. गृहिणी हेच करियर हा काही बेस्ट अव्हेलेबल किंवा अधिक उदात्त पर्याय नाही हे अगदी खरं, पण तो पर्याय बळंच डेरोगेटरी ठरवण्यातही मला रस वाटत नाही. गृहस्थ (नोकरी न करता घरी बसणार्या) पुरुषालाही याच्च स्टिरिओटाईप मेंटॅलिटीतून बळंच व्यसनी, निकम्मा, आयतोबा वगैरे मानलं जातं आणि मध्यम-उच्चमध्यम वर्गात नोकरी करणार्या स्त्रीबद्दल नसेल इतके पब्लिक नोकरी न करणार्या पुरुषाबद्दल भोचक असतं.
घरी बसून पुरुष खरोखर किती आवश्यक घरकाम करतात हा प्रश्न एक वेगळाच.. ;) पण त्याचा गृहस्थ आणि गृहिणीपणाच्या डेरोगेटरी असण्याशी संबंध नाही.
तिकडंच डेरोगेटरी इकडे कशाला
तिकडंच डेरोगेटरी इकडे कशाला आणलंत ओ? बघा कोणाच्यातरी भावना दुखावल्या आणि मला एक ऋण श्रेणी मिळाली :-D. ठीकय आता आलेच आहे तर:
ते डिफेंड वगैरे तुमच्यासाठी नव्हतं. गृहिणीपणाचे, घरव्यवस्थापनाचे (माझ्या मते नॉनडिझर्वींग) उदात्तीकरण किंवा कौतुक दिसलं की आम्हाला जरा जास्तीच खुजली येते. उदात्तीकरण थांबवा मग आम्ही डेरोगेटरी म्हणणार नाही.
तसं वाटणं म्हणजे निव्वळ स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पनांचा अविष्कार आहे. >> आणि तसे 'न' वाटणे ही स्वातंत्राची त्यापेक्षाही जास्त चुकीची कल्पना आहे.
प्रतिवाद
ते डिफेंड वगैरे तुमच्यासाठी नव्हतं.
मग कोणासाठी होतं? स्पष्टच विचारते. नाही म्हणजे काय आहे की प्रतिवाद करणे, वाद घालणे हे फार कष्टाचे आणि वेळखाऊ काम आहे. आधी दुसर्याचा प्रतिसाद नीट वाचावा लागतो, त्यातल्या अर्थाच्या छटा समजून घ्याव्या लागतात, विचार करून त्यातल्या विसंगती समजून घेऊन मग त्याचा मुद्देसूद प्रतिवाद करावा लागतो आणि हे सगळं करताना आपले प्रतिसाद व्यक्तिगत आणि टिप्पणीवजा न होता अर्थपूर्ण होतील हे पहावं लागतं (प्रोफेशनलिझमच्या कल्पना मनात पक्क्या असतील तर हे करावंच लागतं). हे सगळं करून मग नंतर कोणी म्हटलं की "ते तुमच्यासाठी नव्हतंच" की मग सगळी मेहनत वाया :-). त्यामुळे माझी अशी विनंती आहे की तुम्हाला जे म्हणायचंय आणि ज्याच्या/जिच्या प्रतिसादाला उद्देशून म्हणायचंय ते त्या प्रतिसादाला उपप्रतिसाद म्हणू लिहिलंत तर प्रतिवाद वगैरे करता येईल.
आणि श्रेण्यांचं सोडा हो...आपल्याला न पटणारे विचार 'ऋण श्रेणी' देऊन दडपायचे नसतात हे नाही समजत काहींना..आपापल्या आकलनाच्या मर्यादा वगैरे.
ते फक्त एकाच कोणालातरी
ते फक्त एकाच कोणालातरी उद्देशून होतं असं का वाटतय?? जेव्हा एकाचाच प्रतिवाद करायचा असतो तेव्हा मी उपप्रतिसाद देते. इतरवेळी ती जनरल ग्रुपला, भावनेला उद्देशून कमेंट असते. ओरीजनल प्रतिसाद नीट वाचला तर कळेल ते कोणत्या ग्रुपला, भावनेला उद्देशून आहे.
आपापल्या आकलनाच्या मर्यादा वगैरे. >> खरंय.
माझे आकलन!
इथे आलेल्या सर्व प्रतिक्रिया आणि तुमचा ओरिजिनल प्रतिसाद पुन्हा वाचला पण तरी तुम्हाला नक्की कोणाला आणि काय म्हणायचं आहे ते काही कळलं नाही! तुम्हाला 'हाऊसवाईफ्स' सरसकट ग्लोरिफाईड आणि बिनकामाच्या वाटत असाव्यात आणि आपण त्यांच्याबद्दल काय म्हणतोय याने लोकांच्या भावना वगैरे दुखावताहेत (ओरिजनल प्रतिसाद नव्हे, पुढचा एक) अशी शंका वगैरे असे काहीतरी वाटले. तुमच्या मूळ प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे "हाउसवाईफ्स कित्तीकित्ती काम करतात, हाऊसवाईफ असणे फार महान आहे (ग्लोरीफिकेशन वगैरे) वगैरे कोणत्याच प्रतिसादकाने म्हटल्याचे दिसले नाही. माझ्या अल्पमतीप्रमाणे प्रतिसादात,
१) अनेकांनी गवींच्या शैलीचे, त्यातल्या खुसखुशीतपणाचे कौतुक केले आहे.
२) काहिंना लेख भिडला वगैरे आहे, हे स्वानुभवामुळे असावे असा माझा कयास आहे.
३) काहींना आपल्या कर्तबगार आणि समर्थ नातेवाईकांना केवळ आर्थिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर "हाऊसवाईफ" म्हणून हिणवून इतरांपेक्षा पक्षी आर्थिक स्वातंत्र्य असणार्या त्यांच्या नवर्यांपेक्षा कमी लेखल्याने त्रास झाला असल्याचे नोंदले आहे.
४) काहींना लेखात व्यक्त झालेला विनोदच आवडलेला आहे.
५)"जनरल ग्रुपला, भावनेला उद्देशून कमेंट असते", हा जनरल ग्रूप आणि भावना कोणत्या ते समजले नाही. हाऊसवाईफ नसणे हे कर्तबगारीचे अथवा प्रोफेशनलिझमचे एकमेव व्यवच्छेदक लक्षण नाही असे समजणार्यांचा ग्रूप असे म्हणायचे असेल तर तो फारच विस्तारीत असावा असे वाटते.
तर माझी तुम्हाला पुन्हा विनंती, तुम्हाला नक्की कोणाला नक्की काय प्रतिवाद करायचा आहे ते स्पष्ट मुद्दे मांडून लिहावे, अर्थात तुम्हाला मुद्दयांवर प्रतिवाद करायचा असल्यास. तुम्हाला कोणाच्या भावना दुखावल्याने मिळणारी खुमखुमी वगैरे असे जर असेल तर मग सॉरी, नॉट माय टर्फ, नॉट माय बॅटल, नॉट माय फोर्टे!
तुम्हाला 'हाऊसवाईफ्स' सरसकट
तुम्हाला 'हाऊसवाईफ्स' सरसकट ग्लोरिफाईड आणि बिनकामाच्या वाटत असाव्यात आणि आपण त्यांच्याबद्दल काय म्हणतोय याने लोकांच्या भावना वगैरे दुखावताहेत (ओरिजनल प्रतिसाद नव्हे, पुढचा एक) अशी शंका वगैरे असे काहीतरी वाटले. >> आकलनाच्या मर्यादा...
तुमच्या मूळ प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे "हाउसवाईफ्स कित्तीकित्ती काम करतात, हाऊसवाईफ असणे फार महान आहे (ग्लोरीफिकेशन वगैरे) वगैरे कोणत्याच प्रतिसादकाने म्हटल्याचे दिसले नाही. >> अवांतर या शब्दाच अर्थ काय असतो ब्वॉ...
तुम्हाला कोणाच्या भावना दुखावल्याने मिळणारी खुमखुमी वगैरे असे जर असेल तर मग सॉरी, नॉट माय टर्फ, नॉट माय बॅटल, नॉट माय फोर्टे! >> वा चालू द्या...
च्या मूळ प्रतिसादात
च्या मूळ प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे "हाउसवाईफ्स कित्तीकित्ती काम करतात, हाऊसवाईफ असणे फार महान आहे (ग्लोरीफिकेशन वगैरे) वगैरे कोणत्याच प्रतिसादकाने म्हटल्याचे दिसले नाही. >> अवांतर या शब्दाच अर्थ काय असतो
तुमच्या स्वतःच्याच प्रतिसादांचे संदर्भ म्हणजे बहुदा अवांतर असावे!
वा चालू द्या...
नाई ब्वॉ, चिडीचा डाव रडी खेळायला आवडत नाही. त्यामुळे भावना दुखावल्या असतील तर सॉरी!
सॉरी कशाला? भावना दुखावल्या
सॉरी कशाला? भावना दुखावल्या नाहीतच आणि दुखावल्या तरी तो माझा प्रॉब असता न/कळत दुखावणार्यांचा नाही.
हा लेख, माझे, इतरांचे प्रतिसाद वगैरे सगळं मनातून इरेज करून टाका.
आता एक बेसिक भारतीय, न्युक्लिअर, मध्यमवर्ग कुटुंबातली गृहीणी घ्या.
ती घरात करणारी कामं, त्यांची मार्केट व्हेल्यु आणि त्या गृहीणीवर होणारा खर्च यांचा लेखाजोखा मांडा. कितीही क्वालिटी वर्क असलं तरी खर्चाचा मेळ लागत नाही. मग शरीरसुख, मोनोगमी, प्रजनन यांच्या किंमतींचा आधार घ्यावा लागतो. जे मला डेरोगेटरी वाटत. इतरांनादेखील ते तसेच वाटावे असे म्हणणे नाही. डील बिटवीन टू पिपल म्हणून ते मान्य करता येतं (न करणारे आपण कोण टिकोजीराव).
पण जेव्हा या स्त्रिया 'नोकरी करणार्या स्त्रियांच घराकडे, मुलांकडे फार दुर्लक्ष होतं', 'तिचा नवरा नीट कमावत नसेल म्हणून ती नोकरी करतेय' वगैर कमेंट पास करतात, स्वतःच्या+त्यांच्या मुलांना पीना मारतात, इतरांच्या घरात कोण आलं गेलं, भोचकपणा, उगाच खिडक्यांतून दारांतून डोकावणे असले काहीतरी करत बसतात. तेव्हा काय? आणि हे असे करणार्या खूपजणी असतात. परत आम्ही कित्तीकित्ती कामं करतो, कोणीकोणी आमचं कौतुक करत नाही वगैरे इमोशनल ब्लेकमेल आहेच.
सो माझं म्हणणं एवढंच आहे की वॉच आउट व्हॉट एक्झेक्टली इज हेपनींग.
: माझ्या पहिल्या प्रतिसादातील अवांतराचा अर्थ हा होता.
-----
म्हणजे त्या स्वतःतर idle life जगतच आहेत + त्या इतरांना ड्यामेज करतायत, नविन पिढीपुढे चूकीच्या कल्पना सोदाहरण, बोलण्यातून मांडतायत. त्यांनी नोकरी करणार्या स्त्रियांबद्दल बोलू नये; मग आम्ही गृहीणींबद्दल बोलणार नाही. आपापल्या स्फिअरमधे आनंदी राहूयात. काय म्हंता?
: हा माझ्या दुसर्या प्रतिसादाचा अर्थ.
काहीशी सहमती
तुम्ही आता जे सविस्तर म्हणताय त्यातले काही पटण्यासारखे असले तरी त्याचा या धाग्याशी संबंध काय ते स्मजलेच नाही आणि कोणत्या प्रतिसादकांना ग्लोरीफिकेशन करायचे होते तेही समजले नाही. इथे लेखाचा आणि प्रतिसादांचा मुद्दा इतकाच होता की हाऊसवाईफ म्हणून हिणवताना, नवर्याच्या कर्तुत्वावरून एखादीला जोखण्याआधी तिच्याकडे व्यक्ती म्हणून पहावे, तिच्या असलेल्या प्रोफेशनिलझमला (ते असल्यासच) दाद द्यावी. बास!
ठीकय. नवीन सदस्य आहात,
ठीकय. नवीन सदस्य आहात, पहिल्यांदाच प्रतिसाद देताय म्हणून सांगते. पण या धाग्यावर हा शेवटचा प्रतिसाद.
चकल्या करणे, केक/शिरा बनवणे याला सर्जन, डेंटीस्टशी कंपेअर करताय? कशाला किती डोकं लागतं, किती शिकावं लागतं, त्यातून रिटर्नस किती मिळतात, बिघडल्यास काय नुकसान होतं, काही व्हेल्यु अनालिसीस हवं की नको? ललित आहे म्हणून चालून जातं. पण ते गंभिरपणे घेऊन चानचान म्हणायला लागलात अवघड आहे. बनवत बसा चकल्याच आयुष्यभर तिच्याआयला अन् बडवा भाकर्या. तुम्हाला कोण अडवणार.
आत्ता कुठे स्पष्टपणे मनातला
आत्ता कुठे स्पष्टपणे मनातला आक्षेप बाहेर आला.
रास्त आणि रोचक आक्षेप आहे ताई..
पण..
कपड्यांच्या collar देखील घासून मळ काढून धुणे अन भांडी लख्ख घासणे..
साहेबाला वाहतुकीचे सर्व नियम पाळून सुरक्षित ड्राईव्हिंग करुन वेळेत खात्रीने मीटिंगला पोचवणे..
वेळेवर रेल्वेफाटक उघडणे अन बंद करणे.
mall मधे शिरणा-या राव ते रंकापर्यंत कोणाच्याही प्रेशरने विचलित न होता सर्वांचे नीट फ्रिस्किंग करणे..
या आणि अश्या प्रत्येक कामाला लागणारी तथाकथित "अक्कल" आणि ते काय ते व्हॅल्यू अनालिसीस वगैरे फार वेगवेगळे काढता येईल हो..
पण यापैकी प्रत्येकाला आणि doctor engineer ला अन इव्हन पंतप्रधानाला आपापली प्रोसेस तितकीच महत्वाची वाटणं आणि त्या भावनेनं चोख काम करणं याला एकसारखंच महत्व आहे आणि एकसारखीच प्रतिष्ठा असावी हे तत्वच मान्य नसणं हा आपल्या देशाचा फार बेसिक लोचा आहे. यू आर इन मेजोरिटी..
असोच..
.. डॉक्टर वगैरेना प्रतिष्ठा
.. डॉक्टर वगैरेना प्रतिष्ठा असते ती त्याना नसते हे दाखवण्यासाठी धोबी वगैरेन्शी तुलना करायला हवी होती म्हणता?
पण तीनचार दिवस हे लक्षात ठेवून परत इथे येऊन खणखणीत काहीतरी सुचलं तुम्हाला अॅड करायला.. विशेषतः त्याउपर दुसरा
कसलाही प्रतिवादही तिथे नसताना..
.त्यामुळे हलकं वाटलं असेल तर आनंद आहे.
अहो तुमच्याच मते मनापासून
अहो तुमच्याच मते मनापासून केलेल्या सर्व कामांची प्रतिष्ठा एकसारखी असते ना? मग तुम्ही फक्त डेंटीस्ट, सर्जन असे 'आमच्यासारख्यांना उच्च वाटतील' असेच प्रोफेशन का निवडलेत? डेंटीस्ट-धोबी किंवा ड्रायवर-सर्जन असे मिक्स काँबोतरी घ्यायचे.
बाकी रँटींगला उत्तर द्यायची गरज वाटत नाही. पण तुमची काळजी वाटते हो!
पण यापैकी प्रत्येकाला आणि
मी वर जे काही म्हटलंय ते अधोरेखित करुन त्यावर आणखी काही बोलू इच्छितो.
पण यापैकी प्रत्येकाला आणि doctor engineer ला अन इव्हन पंतप्रधानाला आपापली प्रोसेस तितकीच महत्वाची वाटणं आणि त्या भावनेनं चोख काम करणं याला एकसारखंच महत्व आहे आणि [ त्यामुळेच मनापासून आपापलं काम करणार्यांना, त्या गुणासाठी/ पॅशनसाठी] एकसारखीच प्रतिष्ठा असावी
इतरांना ते काम किती महत्वाचं वाटतं त्यापेक्षा "आपल्याला स्वतःला आपलं स्वतःचं" काम किती मनापासून महत्वाचं वाटतं यावर माझा भर आहे.
आणि
ओव्हरऑल सर्व करियर्सना, सर्व व्यवसायांना एकाच लेव्हलचं कौशल्य, एकाच पातळीची बुद्धिमत्ता, तिथे पोचण्यासाठी एकाच पातळीचे कष्ट लागतात म्हणून सर्वांना एकच प्रतिष्ठा हवी (व्हेदर ऑर नॉट दे आर पॅशनेट अबाउट देअर ओन प्रोसेस)
ही दोन एकमेकांपेक्षा वेगळा आशय असलेली विधानं आहेत. दुसर्या विधानाला तुमचा विरोध आहे असं आता वाटतंय.. आणि ते योग्यच आहे. पण माझं विधान पहिल्या प्रकारचं आहे. आपलं काम चोख असावं अशी मनापासून तळमळ असणं या भावनेला चिकाटीला एकसारखं महत्व असावं आणि ते "हाउसवाईफ आहे ती" अशा नकळत तुच्छ टोनमधल्या उद्गारांनी उडवून दिलं जावं हे खटकलं होतं. प्रत्येकाची कुवत वेगळी असते आणि रॉकेट सायंटिस्टची बुद्धिमत्ता सफाई कामगारापेक्षा निश्चितच खूप खूप जास्त ग्रेट असते. पण मी बोलतोय ते त्या पॅशनविषयी, परफेक्शनविषयी.
"एकसारखीच प्रतिष्ठा" असा शब्द न वापरता दुसरा काही सुचला तर कदाचित इतकी चर्चा किंवा आठवडाभर मनातून गोष्ट न जाणं, लोड होणं असं होणार नाही. दुसरा काही पॉझिटिव्ह शब्द चालेल तिथे.
चकल्या, शिरा करणं या गोष्टीपेक्षा आज पायलट्स, डॉक्टर्स, इंजिनीयर्स अश्या लोकांची जास्त गरज आहे हे मान्यच. त्यामुळे डॉक्टर न बनता गृहिणी बनण्यातच खास काही अचिव्हमेंट आहे असा प्रचार चुकीचाच ठरेल. इनफॅक्ट मीच वर एका ठिकाणी असं म्हटलंय की गृहिणी ही काही बेस्ट अव्हेलेबल करियर मुळीच नव्हे.
पण ज्या आपापल्या बुद्धीनुसार, आयुष्यातल्या बाय डिफॉल्ट सेटिंग्जना चॅलेंज न करु शकल्याने, दिशा न सापडल्याने, तशी जाणीव होण्याची पार्श्वभूमी नसल्याने ऑलरेडी गृहिणी झाल्याच आहेत किंवा गृहिणीअवस्थेत अडकून राहिल्या आहेत असे म्हणू, त्यांच्यातही ही परफेक्शनची पॅशन असते आणि त्या भावनेला मी प्रोफेशनॅलिझम समजतो. खूप खूप मोठ्या प्रमाणात अश्याही गृहिणी आहेत ज्यांना अश्या परफेक्षनची आस नसते, असे भरपूर सफाई कामगार आहेत ज्यांना काचेवरचा प्रत्येक डाग निघण्यात रस नसतो, असे कित्येक ड्रायव्हर आहेत जे दारु पिऊन बेदरकार गाडी चालवतात.. सर्व गृहिणी आणि सर्व ड्रायव्हर आणि सर्व डॉक्टर सारखेच असे होलसेलीकरण मी अजिबात करु इच्छित नव्हतो आणि नाही.
इनफॅक्ट मी उद्या आंत्रप्रिनर या रोलमधून काही उभे करायचं ठरवलं तर अश्या निवडक चार पॅशनने चकल्या करणार्या गृहिणींच्या प्रोफेशनॅलिझमची ताकद वापरुन घेईन. त्यात कदाचित त्या चकल्या आणि शिरा यापेक्षा वेगळं काही करतील.. आणि त्याला मी नक्की "प्रगती"च म्हणेन..
थत्तेचाचा .. इंजिनियर असूनही तुम्हाला इंजिनच्या / सिस्टीमच्या प्रत्येक पार्टचं काम आपापल्या जागी चोख होण्यातलं हार्मोनिक महत्व जाणवू नये याचं वाईट वाटलं. साधे नटबोल्ट किंवा बॉलबेअरिंग्ज चांगल्या रितीने आपापलं काम करतात आणि कॉम्प्रेसर, कॉप्युटर चिप्सही त्याच रिलायेबिलिटीने आणि नियमित चोख काम करतात तेव्हा एखादं यंत्र चालतं, याचा अर्थ नट बोल्ट आणि प्रोसेसर एकच आणि सर्वांनी केवळ नटबोल्टच व्हावे असा नसून, प्रत्येकाची आपापल्या कामात क्वालिटी असल्याने पूर्ण सिस्टीम उत्कृष्ट चालते असा असतो हे सांगायला हवं का?
पण ज्या आपापल्या बुद्धीनुसार,
पण ज्या आपापल्या बुद्धीनुसार, आयुष्यातल्या बाय डिफॉल्ट सेटिंग्जना चॅलेंज न करु शकल्याने, दिशा न सापडल्याने, तशी जाणीव होण्याची पार्श्वभूमी नसल्याने ऑलरेडी गृहिणी झाल्याच आहेत किंवा गृहिणीअवस्थेत अडकून राहिल्या आहेत असे म्हणू, त्यांच्यातही ही परफेक्शनची पॅशन असते आणि त्या भावनेला मी प्रोफेशनॅलिझम समजतो.
पूर्ण सहमत...
अजून एक, आपल्या कामात इनोवेशन करणार्या, आणि मर्यादित संधी असताना सारखं नवीन काहितरी शिकणार्या गृहिणी आणि वर्षानुवर्ष तेच काम तसंच करणार्या इंजिनीअर यामध्ये तुम्हाला कोण भारी वाटेल?
पर्सनली घेतलेले नाही. माझे
पर्सनली घेतलेले नाही. माझे म्हणणे नंतर मांडतो.
तुमच्याशी असलेल्या जालीय आणि अल्प वैयक्तिक परिचयावरुन तुम्ही हे विधान पर्सनली घेणार नाही याची खात्री असल्यानेच तो प्रतिसाद लिहीला होता. मेकॅनिकल इंजिनीयरविषयक तुमचं इथलं प्रोफाईल पिक्चर गेल्या काही दिवसांत पाहण्यात आलं होतं त्यावरुन काहीतरी इमेज तयार झाली असावी.
पण तुम्ही आता सर्वात आधी आवर्जून ते "पर्सनली न घेतल्याचं" सांगितलंत, त्यावरुन मात्र आता बिनशर्त माफी मागण्याची निकड मला वाटते आहे.
पर्सनल झाल्याबद्दल क्षमस्व.
पर्सनली घेतलेले नाही म्हणजे
पर्सनली घेतलेले नाही म्हणजे तुम्ही ते वाक्य पर्सनली मला उद्देशून लिहिलेले नाही याची खात्री होती. पण मी प्रतिसाद देतोय म्हणजे मी पर्सनली घेतले की काय असे वाटू नये म्हणून तसे लिहिलेले होते.
बेसिकली कोणतेही काम परफेक्टली करणे हे चांगलेच आहे. पण काम परफेक्टली करतो/ते म्हणून त्याला/तिला खूप कॉम्प्लिकेटेड आणि निश् स्किलचे काम करणार्या व्यक्तीच्या समान समजता येणार नाही. (संधी मिळाली असती तर आम्ही पण केलं असतं या म्हणण्याला फाट्यावर मारून).
टिंकू यांचा त्रागा बहुधा वेगळ्या कारणाने असू शकेल. नोकरी करणारी बाई तिच्या पारंपरिक (चूल-मूल-रांधा-वाढा) कर्तव्यांकडे दुर्लक्ष करते (उठवळ असते) असा एक समज पसरलेला असतो. तसेच मुलांवर चांगले संस्कार होत नाहीत वगैरेसुद्धा नोकरी करणार्या महिलेस ऐकवले जाते.
[त्या प्रेशरखाली नोकरी करणार्या महिलांना 'सुपरवूमन होण्याचे वेड लागते' आणि त्यांची भयंकर परवड होते].
अर्थात उत्तम चकली करणारीला ऑफीसात कारकुनी पाट्या टाकणार्या महिलेपेक्षा कमी लेखण्याचे काहीच कारण नाही.
http://www.thefreedictionary.
http://www.thefreedictionary.com/botch+up
याचं पास्ट पार्टिसिपल
वरील सर्व चर्चा वाचून माझ्या
वरील सर्व चर्चा वाचून माझ्या मनात आलेल काही विचार -
(१) हाऊसवाईफ असणं किंवा नसणं/ नोकरदार असणं किंवा नसणं हे "इनहेरंटली" चांगले अथवा वाईट नसून, वेळेचा उपयोग कसा केला जातो यावर अवलंबून असते.
(२) फेसबुकवरची एक मस्त पोस्ट मी बराच वेळ शोधली व मिळाली नाही. त्यात एक मार्मिक टोमणा होती - ९-५ काम करणार्या बायकांना कार्यालयीन नेट्नेटकेपणा व्यतिरीक्त बाहेरच्या आयुष्यात फार अक्कल अन मते असली/नसली तरी आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असण्याचा मोठ्ठा "इगो" असतो.
(३) नोकरी करुन कमावते असणे = आर्थिक स्वातंत्र्य हे इतकं सुलभ इक्वेशन नाही. मानसिक कणखरपणा अतिशय आवश्यक असतो.
(४) "नोकरी करणार्या स्त्रिया घरकामात सो सो च असतात" हा देखील एक गैरसमज आहे जसा गैरसमज "नोकरी न करणार्या स्त्रिया घरकामात कुशल असतात" हा आहे.
(५) काही पुरुष नोकरी सोडून घरी असतात तेव्हा स्त्रियांपेक्षाही "परेफेक्ट्=आदर्श" घर चालवून दाखवतात. ...... अनुभव आहे.
(६) नोकरीच्या नावाखाली अफेअर करणार्या अन पाऊल घसरलेल्या व त्यामुले नोकरी सोडावी लागलेल्या स्त्रियाही पाहील्या आहेत तशाच घरी बसून अफेअर करणार्या व "एम्प्टी/रिकामे = भकास" वाटणार्या स्त्रियाही पाहील्या आहेत.
तेव्हा परत एकदा "इनहेरंट" असे काहीच नसते आयुष्य हे विसंगतींनी भरलेले व मजेमजेचे आहे.
(१) मान्य. (२) आर्थिकदृष्ट्या
(१) मान्य.
(२) आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असण्याचा "इगो" का असू नये? आपण ट्रॉफी वाइफ नाही. 'आपल्या अन्न, वस्त्र, निवारा इ. वरचा खर्च डिफेंड करण्यासाठी आपल्याला शरीरसुख, मोनगमी, प्रजनन यांच्या किंमतींचा आधार घ्यावा लागत नाही' हे अभिमानास्पद नाही का?
(३) मान्य.
(४) मान्य.
(५) मान्य.
(६) ठीक.
तेव्हा परत एकदा "इनहेरंट" असे काहीच नसते आयुष्य हे विसंगतींनी भरलेले व मजेमजेचे आहे. >> ते आहेच. पण जेव्हा भारतात फक्त २२% स्त्रियांची स्वतःची कमाई असते, उरलेल्या ७८% परावलंबी असतात; तेव्हा कुठली बाजू सपोर्ट करावी याचादेखील विचार करावा.
>>आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र
>>आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असण्याचा "इगो" का असू नये? आपण ट्रॉफी वाइफ नाही. 'आपल्या अन्न, वस्त्र, निवारा इ. वरचा खर्च डिफेंड करण्यासाठी आपल्याला शरीरसुख, मोनगमी, प्रजनन यांच्या किंमतींचा आधार घ्यावा लागत नाही'
आवडले. विशेषतः (सुखवस्तू) हाउसवाइफवर केला जाणारा खर्च डिस्प्रपोर्शनेटली जास्त असतो हा विचार रोचक आहे. मोनोगामीची अपेक्षा म्यूचुअल झाली की तर तो खर्च आणखीच जास्त आहे.
असाच विचार मागे ऐसीवर उत्पल(?) यांच्या "गृहिणीला घरकामाबाबत मार्केट दराने पैसे द्यावेत का?" या धाग्यावर मी मांडले होते.
सहमती खर्चाच्या प्रमाणाला
:)
सहमती खर्चाच्या प्रमाणाला आहे.
>>खर्च डिफेंड करण्यासाठी आपल्याला शरीरसुख, मोनगमी, प्रजनन यांच्या किंमतींचा आधार घ्यावा लागत नाही'
यातलासुद्धा शरीरसुख आणि प्रजनन यांच्या बाजारभावाने किंमती फारशा (जितक्या प्रमाणात हाउसवाइफवर खर्च केला जातो त्याप्रमाणात) नाहीत. ओन्ली मोनोगामी इज हायली व्हॅल्युएबल. अणि मोनोगामी(ची अपेक्षा/सक्ती) म्युचुअल झाली की तिची व्हॅल्यूसुद्धा कमीच होते.
>>डॉक्टरची ती जबाबदारी, तो
>>डॉक्टरची ती जबाबदारी, तो प्रोफेशनॅलीझम अशा दु:खी झालेल्या आजीत, आईत,बायकोत असतो. आणि आपण तिच्याबाबत म्हणतो ..हाउसवाईफ...ती घरीच असते..
जियो.. एकदम मस्त, हा 'सेन्स ऑफ प्रोफेशनल पर्फेक्शन' बारकाइनं बघितलं तर खूप ठिकाणी दिसतो.