मिस्टर काय करतात.. ?
स्क्रीन काळा आणि मोठ्ठा गोळा या पुस्तकातून... ऑनलाईन नसल्याने फार कोणी वाचलं नसावं.
........................
आमच्या एक शिक्षिका माझ्या आईची मैत्रीण म्हणजे फ्यामिली फ्रेंडही होत्या. (काय नशीब..! काय नशीब..!! तेव्हापासूनच हे असंच..)
त्यांच्याकडे गेलं की नेहमी त्या एका बरणीतून मारी बिस्कीट काढून द्यायच्या. दहा एक वर्षं मी तिथे जात राहिलो. पण तीच फळी, तोच डबा आणि तेच मारी...
त्यांच्याकडे टायगर म्हणून एक मोठा कुत्रा होता. तो नेहमी उदास दिसायचा. मारी एक्स्प्लेन्स दॅट..
मला कधीतरी तरी ढोकळा, थालीपीठ, गेलाबाजार पोहे वगैरे काही देतील म्हणून मी आशाळभूतपणे वाट बघावी तरी परत मारीच ..च्यामारी... चहा आणि मारी कॉम्बोवरुनच ही शिवी आली असणार..
बुवा नाही दुसरं बिस्किट परवडत, असंही नव्हतं. घरची परिस्थिती अगदी चांगली होती हो त्यांची. बदल म्हणून एखादा दिवस पार्ले जी तरी ठेवायचं. पण नाही. शाळेत मी त्यांना पुरेसा वाव (चांगला वाव दीड वाव) देऊनही बाईंनी मार नाही दिला कधी.. पण मारी भरपूर दिली..
आणखी एक घर. आमच्याच चाळीत दोन खोल्या सोडून पलीकडे.. चांगल्या होत्या हां त्या काकू. पण त्यांचा एक प्रॉब्लेम होता..
त्या नेहमी केक घरी करायच्या (केकपात्र वाळूबिळू घालून गॅसवर ठेवून).
नेहमी केकच. आणि आम्ही नेहमी तो शिरा म्हणून खायचा.
काय हे.. शिरा म्हणून चवीला इतका छान असायचा. पण एकदा तरी त्याची केकसदृश वडी झाली असती तर त्यांना किती बरं वाटलं असतं. उगीचच "जमला नाही नीट केक आज" म्हणण्यात आयुष्य गेलं.
...."आज आवाज साथ देत नाही" म्हणण्यात गायकाचं आयुष्य जातं तसं.
कशाच्याही वड्या करायला गेलं कि वड्यांऐवजी सारणसदृश पदार्थ बनणं आणि तो वाटीत घेऊन चमच्यानं खावा लागणं हे एक प्राक्तन.
माझ्या आईनं एकदा बरंच खपून लोणी, मैदा, चॉकलेट, अंडी वगैरे मिसळून केकचं बॅटर उर्फ सारण बनवलं. ते मिक्सरमध्ये घातलं. ग्राइन्ड केलं. आणखी काही आणायला ती दुस-या खोलीत गेली. मिक्सरवर झाकण नव्हतं. पण पॉवर चालू होती. माझे आजोबा फिरत फिरत तिथे आले आणि उगीच वयानुसार आलेल्या तंद्री कम मंत्रचळाच्या प्रभावाखाली काहीतरी पुटपुटत मिक्सरचं बटन दाबलं. घुईSSS असा आवाज होऊन पातळसर रबडीसदृश केकद्रव पास्कलच्या दाब पारेषणाच्या नियमासारखा सर्व भिंतींवर सम प्रमाणात विभागून फवारला गेला. असो.
आजीनं डोळे अधू झाल्यावर करंजीत पिठीसाखरेऐवजी रांगोळी घातली. मग मी कचकचत्या तोंडानं ते सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं. पण खूप खूप उशीर झाला होता. सगळ्याच टाकून द्याव्या लागल्या.
मधेमधे एखाद्या वर्षी दिवाळी आधी तीन चार दिवस आमच्याकडे एक सुतकी दिवस उगवायचा. माझी आजी (टीम लीडर) आणि आई (टीम मेंबर) उदास चेह-यानं बसलेल्या दिसायच्या.
कॉलेज मधून किंवा नंतर नंतर ऑफिस मधून आल्यावरही.. त्या दोघी अशा बसलेल्या दिसल्या की मला समजायचं की बॅड न्यूज आहे. म्हणजे:"चकल्या तेलात विरघळत आहेत".
मग "कसे गेले हो?".. .... "काल तर छान होते. माझ्याशी बोलले..भातामटी जेवले.." अशा टोनमध्ये बोलणं चालायचं. आजी "मोहन कमी पडलं वाटतं भाजणीला" असं काहीतरी म्हणत असायची.
इतकी चाळीस पन्नास वर्ष चांगल्या चकल्या केल्यावर अचानक त्या तेलात विरघळायला लागल्या,बिघडल्या ही भावना तिला कशी वाटत असेल ते एक असा सर्जन समजू शकेल ज्याच्या ऑपरेशन टेबल वर आत्ताच पेशन्टचा मृत्यू झाला आहे.
येस..
डेंटिस्टच्या बाबतीत प्रत्यक्ष मृत्यू नसला तरी "दात 'जाणं'... दात वाचवता न येणं..?
"दात जाणं" इन डेंटिस्ट्री इज इक्विव्हॅलंट टू 'डेथ' इन सर्जरी.."
तसंच..
"चकली डिजॉल्विंग इन ऑइल इज इक्विव्हॅलंट टू 'डेथ' इन सर्जरी.."
डॉक्टरची ती जबाबदारी, तो प्रोफेशनॅलीझम अशा दु:खी झालेल्या आजीत, आईत,बायकोत असतो. आणि आपण तिच्याबाबत म्हणतो ..हाउसवाईफ...ती घरीच असते..
..आणि तिला विचारतो "मिस्टर काय करतात?"
..............
.....(बाय द वे, 'मिस्टर' नंतर बरेच दिवस चकल्या स्प्रिंग सारख्या उलगडून खातात आणि "छान झालीय अगं चकली..खरंच..खरंच अगदी.." असं म्हणत राहतात.)
लग्न करणे न करणे, मुलगी-मुलगा
लग्न करणे न करणे, मुलगी-मुलगा हे सगळे गौण आहे.
प्रत्येक कमावत्या व्यक्तीने फक्त स्वत:चे असे खाते व सेव्हिंग केलेले असलेच पाहिजे.
काही गोष्टींविषयी फारच जनरल लेव्हलला स्टेटमेंट करुन त्याचा मूळ संदर्भ घालवण्यात अर्थ नाही.
प्रत्येक कमावत्या व्यक्तीने स्वतःचे वेगळे खाते आणि सेव्हिंग केलेच पाहिजे. हे अत्यंत मान्य आणि योग्य. पण लग्न, स्त्रीपुरुष जोडीदार वगैरे याविषयीच्या चर्चेत आर्थिक पैलूविषयी बोलत असताना त्या संदर्भासहितच बोललं पाहिजे.
उदा. पती आणि पत्नी या दोघांनी एकमेकांची सोबत आनंददायी वाटावी म्हणून आपापला लुक, आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता या गोष्टींविषयी जागरुक राहिलं पाहिजे असा विषय असताना ते काही नाही.. लग्न झालेलं असो वा नसो.. वैयक्तिक स्वच्छता, लुक, आरोग्य याची सर्वच बालके, तरुण आणि इव्हन वृद्धांनीही काळजी घ्यावी असा मुद्दा मांडून तो एक वेगळा मुद्दा म्हणून अगदी १०० टक्के सत्य असला तरी मूळ संदर्भाला धरुन राहात नाही. ते हायपरजनरलायझेशन होतं.
(मी अजो झालो काय ??) ;)
अजो, कुठे आहात हो ??
असो.
अं?
हे (हायपर म्हणा वा कसे ते)जनरलायझेशन जाणीवपूर्वक केलेले आहे - कारण मुळ वाक्याला एक अनुचित अंडरटोन आहे - इतकेच सांगतो.
.मुळ वाक्याचा अर्थ लग्न झालेले नसताना मुलींचे सेव्हिंग व खाते नसले तरी चालते - मात्र लग्नानंतर ती स्वायत्त हवीच अशा सुरात मला वाटले. अर्थातच माझी असहमती आहे. लग्न झाले असो नसो प्रत्येकाने हे केले पाहिजे असे माझे मत आहे. तेव्हा ते वाक्य सुटे वाचले तर फक्त जनरलाईज्ड वाटेल मात्र मुळ वाक्यातील स्पेसिफिक अंडरटोनशी सुक्ष्म असहमती दाखवायचा हा एक मार्ग आहे. .
अपुली-गपुली
"भावनेच्या आहारी जाऊन मारे लाडानी, नवर्याला सगळं देऊन बसू नकोस कारण कधीतरी त्याच्या नजरेत तुझं रुप पूर्ण ओसरेल तेव्हा तुझे पैसेच कामी येतील."
कालांतराने सर्वच स्त्री-पुरुषांचे रूप ओसरते पण त्यासाठी कोणी जोडीदारावर करत असलेला किंवा एकत्र जगण्यासाठी करत असलेला खर्च थांबवल्याचे पाहाण्यात / ऐकिवात / वाचनात नाही.
तुम्हाला 'घटस्फोटानंतर' असे म्ह्णायचे आहे का?
एकटीच हसतेय :)
मज्जा आली, आणि तोंडाला पाणी पण सुटलं. केकबॅटर, मऊ चकल्या आणि मारी हे पदार्थ मला फार आवडतात (कॉल मी क्रेझी).
लेखभर एकूण सूर फसलेल्या पदार्थांची (आणि ते करणार्यांची) थट्टा केल्यासारखा होता: उदा. केक-काकू, मारी-बाई (त्यांना दुसरं काही स्वयंपाकात गम्य नाही- ढोकळा थालिपीठ नाही, म्हणून मारी आणि मारीच) त्यामुळे शेवट अगदी अनपेक्षित, आणि चिकटवल्यासारखा वाटला.
म्हणजे, जेवायला पंचपक्वान्ने, आणि मुखशु:द्धीला फक्त झोंबरा चुना? टीका करण्याचा मुळीच हेतू नाही, लेख आणि शेवट, हे दोन्ही आपापल्या जागी मस्तच आहेत, पण त्या शेवटासाठी दुसराच लेख हवाय, अशी फर्मायश करते.
आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र
आहे या गोष्टी अभिमानास्पद आहेत. अन त्याहूनही महत्त्वाचे अन मला डाचणारी ही गोष्ट आहे की वणवण करुन, उन्हात फिरुन, रापून, गर्दीत ओंगळवाणे धक्के खाऊन, काही स्पिरिच्युअली लो क्रीचर्स=बॉसचे रेशिस्ट रिमार्क ऐकून नोकरी टिकवणे, रॅटरेसमध्ये टिकून रहाणे, आत्मविश्वास झिरो असताना, अन्य लोकांपुढे तसा आव आणणे, स्वतःचे ज्ञान एक तर अप-टू-डेट ठेवणे किंवा तसे ठेऊ न शकल्याने सतत लागलेली टोचणी मॅनेज करणे, ही सर्व तारेवरची कसरत आहे. परत नोकरी टिकवून धरायला नाना अस्वल-दरवेशी (अस्वल किंवा माकड कौन पैचानो;))खेळ खेळावे लागतात ते वेगळेच. उन्हा तान्हाने/ काळजी-चिंतांनी मूळात विशेष नसलेलं रुपही ओसरतं, अगदी उतरंड लागते अन जगात लोक अगदी नवराही "प्रिमेनापाऊझल = म्हातारी, जाडी,बावळट (स्मार्ट नसणे = आकर्षक नसणे या अर्थी)" म्हणायला मोकळा असतो/मोकळे असतात. हे सर्व त्रास देतेच. तेव्हा इगो असणे हे वाईट नाहीच. किंबहुना इतकं "फक्त स्वतःचे" सेव्हिंग पाहीजे की वरील सर्व अपयशी विशेषणं अन नावं ठेवणारे लोक नमले पाहीजेत.
________
पण तुम्ही सोसलेला त्रास तुम्हाला अन्य कोणाला कमी लेखायची संधी देते,मोकळीक देते, हक्क देते यावर माझा आक्षेप आहे. अन तशी लिबर्टी तू (टिंकू) घेते आहेस असेही म्हणणे नाही माझे. पण होम-मेकर या हुद्द्याबद्दल तुझी काही स्ट्राँग मते आहेत. ती स्ट्राँग आहेत एवढाच आक्षेप :)
_________
मुलीला "खूप शिक-कमव" एवढच शिकवत होते. पण ती शिकवण तर कालबाह्य झाली गं. पुढची पीढी स्वतःच्या पायावर उभी रहाणारच हे १००% सत्य आहे. आता शिकवायचं तर हेच की- जर लग्न केलस तर तुझं खातं वेगळं कर. तुझे वित्त तू मॅनेज कर. भावनेच्या आहारी जाऊन मारे लाडानी, नवर्याला सगळं देऊन बसू नकोस कारण कधीतरी त्याच्या नजरेत तुझं रुप पूर्ण ओसरेल तेव्हा तुझे पैसेच कामी येतील. असो!!!!!
अवांतर झाले असल्यास क्षमस्व.