मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार-भाग ६५

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

वॉट्स अ‍ॅप आल्यापासून ढकलपत्रांचा त्रास फारच वाढलाय. तेच तेच पत्र पुन्हा पुन्हा येत राहातंय. गेल्या वर्षभरात ब्राह्मणांची एकजूट या विषयावर पत्रं फिरताहेत. पत्राचा शेवट हमखास 'जय परशुराम' ने केलेला असतो. शिवाय एक आवाहनही असतं की सर्व ब्राह्मणांनी एकमेकांना अभिवादन करताना 'जय परशुराम' म्हणावं. म्हणजे राम राम, जेशीक्रस्न, हरि ओम, नमो नमः, जय भीम, जय जिनेन्द्र तसंच हे जय परशुराम. मला एक प्रश्न पडलाय की हा परशुराम सर्व ब्राह्मणांचा आदिपुरुष किंवा आदिदेव आहे का? नसेल तर मग सर्व ब्राह्मणांनी जय परशुराम का म्हणावं? शिवाय मला तर परशुराम किंवा पर्शराम म्हटलं की पर्स आणि पर्शिया आठवतो. हा पर्स प्रांतातला कोणी यवन रॅम्सेसे किंवा रमीज़ असेल का? आणि यावनी ज़, झ् वगैरे उच्चार याच्यापासून सुरू झाले असतील का? आणि आम्ही हिंदूंनी नेहमीप्रमाणे याला हिंदू म्हणून गुंडाळून टाकलं असावं काय? अगदी दशावतारात स्थान देऊन?
(विनोदाने किंवा गाम्भीर्याने, कसेही घेतले तरी चालेल.)

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

कॉलेजियम पद्धती ने सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

न्यायाधीश नेमले जातात हा फार रोचक व महत्वाचा टॉपिक वाटला. म्हणून सध्या खणुन काढत आहे. जितक आत जाव तितक रोमांच आहे. या संदर्भात आतापर्यंत तीन महत्वाच्या केसेस झालेल्या आहेत. अती थोडक्यात म्हणायच तर न्यायसंस्था स्वतंत्र असावी तीत सरकारी एक्झीक्युटीव्ह चा हस्तक्षेप नसावा. म्हणुन या न्यायाधीशांच्या नेमणुकीचे अधिकार सीजेआय (चीफ जस्टीस ऑफ इंडीया) च्या व चार सीनीयर जजेस जे राष्ट्रपतीला सल्ला व सुची देतात तो स्टॅम्प मारतो फक्त. व नेमणुक होते. मेरीट चा फेवरीटीझम चा मोठा प्रश्न निर्माण होतो. पण सरकार ला मध्ये घातल तर अजुन च वांदे. एस पी गुप्ता व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया च्या केसमध्ये सीजेआय ने फक्त सल्ला द्यावा इतकाच अधिकार घटनेने दिला आहे गव्हर्मेंट तो सल्ला नाकारु शकते असा निकाल दिला गेला. मग एक बंपर मोठी केस झाली सुप्रीम कोर्ट अ‍ॅडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड ची त्यात ९ जजेस चे बेंच होते ( कातिल भी तुम ) त्यांनी मिळुन पुन्हा पुर्ण पॉवर सीजेआय च्या हातात घेतली. व सल्ला नाही ऑर्डर माना. एक रुमा पाल या माजी जज म्हणतात
The process of appointment of judges to the superior courts was possibly the best kept secret of the country,”
एन जे ए सी चा पर्याय समोर आणण्यात आला त्यात सरकारी हस्तक्षेप वाढतोय.लॉ मिनीस्टर आणि अजुन २ बाहेरचे समितीत येणार त्याची तुलना एन जे ए सी व कॉलेजियम अशी होते
त्याविषयी इथे
http://www.business-standard.com/article/current-affairs/njac-vs-collegi...
जनरल विषयासाठी इथे
https://en.wikipedia.org/wiki/Three_Judges_Cases
ही भव्य केस इन डिटेल इथे
https://indiankanoon.org/doc/753224/
यातील जस्टीस भगवती साहेबांचे कोट्स अत्यंत वाचनीय व मार्मिक आहेत एक देतोच उदा हे बघा
Judges should be stern stuff and tough fire, unbending before power, economic or political, and they must uphold the core principle of the rule of law which says "Be you ever so high, the law is above you." This is the principle of independence of the judiciary which is vital for the establishment of real participatory democracy, maintenance of the rule of law as a dynamic concept and delivery of social justice to the vulnerable sections of the community. It is this principle of independence of the judiciary which we must keep in mind while interpreting the relevant provisions of the Constitution.
फार महत्वाचा विषय आहे प्रचंड कठीण ही आहे पण जाणुन घेण्यासारखा आहे.
खोदकाम चालु आहे सध्या अजुन निष्कर्ष काढण अवघड आहे.
तुम्हास माहीती असल्यास शेअर करावी

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

तंत्रज्ञानातील प्रगती कधीकधी

तंत्रज्ञानातील प्रगती कधीकधी मारक ठरू शकते.
आता तंत्रज्ञानामुळे प्रत्येक सेवादाता ग्राहकांना एस एम एस करून आपल्या दरांतील बदल कळवू शकतात.

मला सध्या दररोज ०.५ टक्का कृषी कल्याण सेस लावला जाणार असल्याचा एस एम एस वेगवेगळे सेवादाते पाठवत आहेत. असेच संदेश सर्वच ग्राहकांकडे येत आहेत/असतील.

जेटलींनी कर वाढवला असं पुन्हा पुन्हा जनतेला* सांगितलं जात आहे. (डोळा मारत)

*मोबाईल ७०+ टक्के जनतेकडे असावा.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

आले रे आले

>> मला सध्या दररोज ०.५ टक्का कृषी कल्याण सेस लावला जाणार असल्याचा एस एम एस वेगवेगळे सेवादाते पाठवत आहेत. असेच संदेश सर्वच ग्राहकांकडे येत आहेत/असतील. <<

मला अच्छे दिन आले असावेत, कारण मला आजवर असा एकही निरोप आलेला नाही (स्माईल)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सनी

सनी लिओनी यांनी 69 + सर्विस टॅक्स + स्वच्छ भारत टॅक्स + कृषी कल्याण टॅक्स अशी एक 84 नावाची आधुनिक पोझिशन बाजारात आणली असल्याचे विनोद व्हॉट्सॅपवर फिरत आहेत.

नेणिव(नेणीव?) हा काय प्रकार

नेणिव(नेणीव?) हा काय प्रकार आहे?

नेणिव(नेणीव?) हा काय प्रकार

नेणिव(नेणीव?) हा काय प्रकार आहे?

मलाही माहीत नाही. म्हणूनच वापरलाय. काहीतरी माहीत नसलेल्या पातळीवर केलेली पारख (डोळा मारत)

जॉटर रिफिल असलेलं जॉटर पेन

जॉटर रिफिल असलेलं जॉटर पेन तेव्हा खूप भारी वाटायचं.. साध्या बॉलपेनपेक्षा खूप महाग असायचं.

फाऊंटन पेनमधे शाइ भरायला एक ड्रॉपर मिळायचा.. काही पेनात आतच ड्रॉपरसारखा पंप असायचा..
निबमधे ब्लेड फिरवून साफ करावं लागे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे हाताला शाई लागाणे.. मग कागदात वगैरे पकडून ते टाळायचं..

बॉलपेनच्या रिफीलमधली शाई पण खाली उतरली तर फुंकर मारून पुढे ढकलायची..
फाऊंटन पेनमधली शाइ संपली की पूर्ण खोलून धुण्याचे उद्योग पण चालायचे..
शाईची पातळी बाहेरून दिसणारी पारदर्शक पेनं आवडायची.

पारदर्शक पेने मलाही खूप

पारदर्शक पेने मलाही खूप आवडायची.

दुर्मिळ जमात की एक्स्टिन्क्ट जमात?

सिरीअस प्रश्न आहे - फाऊंटन पेन अजुन अस्तित्वात आहे का? असल्यास ऐसीकरांपैकी कोण नियमित फाऊंटन पेन वापरतात?

त्याला काय होतंय!

भारतातून येताना पाच-सहा फाऊंटन पेन्स बरोबर घेऊन आलो. (बाजारातल्या कॅमल किंवा तत्सम पेन्सना काळे यांचं स्वस्तातलं निब लावल्यास ते पेन जास्त चांगले लिहतात. काळ्यांना सहन करायची ताकद मात्र हवी.) पण अरिझोनातल्या वाळवंटात पहिल्या सेमिस्टरमध्ये उन्हाळ्यामुळे शाई नको तिथे नको तेव्हढी गळू लागली आणि शून्याच्या जवळ जाणार्‍या थंडीत गोठू लागली. त्यामुळे फाऊंटन पेन्स वापरणे बंद झाले.

फाऊंटन पेन चाहत्यांसाठी एक

फाऊंटन पेन चाहत्यांसाठी एक कातिल पेन

https://www.amazon.co.uk/Pelikan-Fountain-Universal-Handers-Feathers/dp/...

अवांतरः फाऊंटन पेनच्या चाहत्यांसाठी नवीन धागा उघडावा.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

काळे पेन्स पुणे

मी नेहमीच फाउंटनपेन वापरतो. पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या शेजारी काळे पेन्समध्ये अजूनही १५-२० रुपयात ४-५ वर्षे टिकणारे उत्तम पेन व ७ रुपयात शाईचे पाकीट मिळते. त्याचा दर्जा इतका चांगला अाहे, की अनेक मित्रांनी मागितल्यामुळे घेऊन दिले अाहे. फक्त दिसायला ही पेन्स अगदी साधी दिसतात. मला किंचित खटकणारी गोष्ट म्हणजे कोणत्याही रंगाचे पेन घेतले, तरी त्याचा गड्डा (निब बसणारा भाग) काळाच असतो. काळे यांचा अॅप्रोच खास पुणेरी अाहे, हे काय सांगायलाच नको. अक्षर सुंदर येते.

अक्षर

अक्षर सुंदर येते.

हॅ हॅ हॅ

मी पार्कर काय पण पियरे कर्डिनचे महागडे पेन (भेट म्हणून मिळालेले!) देखिल वापरून पाहिले. अक्षर अक्षरशः तस्सेच!!!!

+१बाकी माझा नी पेनचा संबंध

+१
बाकी माझा नी पेनचा संबंध फक्त चेक वर सही करण्यापुरता वर्ष-सहा महिन्यातून एखाददा येतो. नी सहीसाठी अक्षर जितकं गिचमिड तितकं भारी अशी माझी समजुत मी करून घेतलीये (डोळा मारत)

(तसं तर तर लॅपटॉपचा संबंधही फक्त ऑफिसच्या कामापुरता येतो , बाकी बहुतांश गोष्टी मोबाईल जिंदाबाद!)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाॅलपेनच्या तुलनेत

बाॅलपेनच्या तुलनेत असे म्हणायचे होते. बाॅलपेनचे टोक सर्व बाजूंनी समान (बाॅल) रचनेचे असल्यामुळे व फाउंटनपेनच्या निबच्या विशिष्ट रचनेमुळे हे होत असावे. खासकरून सरळ रेघा मारताना फाउंटनपेनच्या रेघा अाधिक सरळ येत असाव्यात व वळणदार रेघा समान जाडीच्या येत नाहीत. काहीसा कॅलिग्राफीक इफेक्ट मिळत असावा. त्यामुळे अक्षर चांगले येते/ दिसते.

मी वापरते फाऊंटन पेन अजून

मी वापरते फाऊंटन पेन अजून आणि कॅम्लिनची शाई .

आम्ही शाई उकळून घ्यायचो डार्क दिसायला पाहिजे म्हणून..वाट्टेल ते उद्योग केले आहेत शाळेत .

मी वापरते फाऊंटन पेन अजून आणि

मी वापरते फाऊंटन पेन अजून आणि कॅम्लिनची शाई .

जियो! उगाच नाही तू माझी मैत्रिण. नेणिवेच्या सूक्ष्म पातळीवरती, मला पारख आहे. (डोळा मारत)

पेन आजकाल सहीपुरतं लागतं...

पेन आजकाल सहीपुरतं लागतं... हॉटेल्समधली कॉम्प्लिमेंटरी ठेवलेली कींवा हापिसातली पेनं पुरतात.. कोण पैसे घालून पेन महागडी विकत घेणार..
शाळेत असताना पायलट .५ टिपचं पेन फार आवडायचं.. नंतर जेल पेन्स आली होती.. आजकाल या डिटेल्सकडे लक्ष पण जात नाही..

इरेझेबल जेल पेन

शाळेत असताना पायलटचं जेल पेन मला पण आवडायचं. खूप खूप वर्षांनी गेल्या आठवड्यातच पेन वापरण्याचा प्रसंग आला. आजकाल बाजारात इरेझेबल जेल पेन आले आहे (पायलटचेचं आहे पण ०.७ त्यामुळे ०.५ सारखं अक्षर येत नाही पण...). खूपच चांगला अनुभव होता. या पेनांच्या पाठीमागे रबर सदृश्य भाग असतो. त्याने लिहिलेलं पेन्सिलसारखं खोडलं जातं. मस्त! पेपरमध्ये खाडाखोडीचं टेन्शनच नाही.

असेच काही नाही सप्रेकाका. बुट

असेच काही नाही सप्रेकाका. बुट आणि पेन बघुन पुरुष कीती नीटनेटका आणि स्वताकडे लक्ष देउन आहे हे कळते. प्लॅस्टीकची पेन बघीतले की बोर होते.

गेले ते शतक, राहिल्या ह्या...

>> बुट आणि पेन बघुन पुरुष कीती नीटनेटका आणि स्वताकडे लक्ष देउन आहे हे कळते. प्लॅस्टीकची पेन बघीतले की बोर होते. <<

आणि अशा एकोणिसाव्या शतकातल्या बाया आपल्याकडे आकृष्ट होऊ नयेत म्हणून मी (फाऊंटन पेन आवडत असूनही) प्लास्टिकचं पेन वापरतो. (स्माईल)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

+१ आणि च्यायला, आमच्या

+१
आणि च्यायला, आमच्या सारख्या तिन्ही त्रिकाळ फ्लोटर्स वापरणार्‍यांबद्दल काय?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

सहमत, बूट मुर्दाबाद, चपला

सहमत, बूट मुर्दाबाद, चपला झिंदाबाद.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

तरी सॉक्स मेन्शन करायचे राहुन

तरी सॉक्स मेन्शन करायचे राहुन गेले.

लोक घड्याळ आणी गॉगल वर फोकस करतात, पण शुज, सॉक्स आणि पेन त्यांना फार महत्वाचे वाटत नाही.

पण जजमेंटल होण्याइतके मोजे

पण जजमेंटल होण्याइतके मोजे स्पष्टपणे दिसतात?

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

कसे बसायचे ते कळत असेल तर

कसे बसायचे ते कळत असेल तर नाही दिसत मोजे
पण एका पायावर दुसरा पाय आडवा घेउन बसायचे, मग दिसतात मोजे.

पांढरे मोजे पण घालताल लोक फॉर्मल लेदर शुज वर Sad

अरे मोजे काय बघता? मोजो बघा.

अरे मोजे काय बघता? मोजो बघा.

Hope is NOT a plan!

मोजो बघायचा की नाही ते मोजे

मोजो बघायचा की नाही ते मोजे बघुन मग ठरवु

फ्लोटर्स are cool .

फ्लोटर्स are cool .

ढेरे शास्त्री, तुम्ही समोरच

ढेरे शास्त्री, तुम्ही समोरच येऊ नका माझ्या.

आमचे

असे निरीक्षण आहे की बरेच डॉक्टरलोक फाऊंटन पेन वापरतात. मागील सहा महिन्यात पाच वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाणं झालं, त्यातील ३ जण फाऊंटन पेन वापरणारे निघाले.

अस्तित्त्वात आहे आणि पंथ

अस्तित्त्वात आहे आणि पंथ वाढतो आहे. पूर्वीच्या अनेक मर्यादांवर नवीन पेनांनी विजय मिळवला आहे. (उदा. विमानात शाई गळणे, भरताना राहाडे होणे, वगैरे.)

मी (काही अपवाद वगळता) नियमित फाउंटन पेन वापरतो.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

शर्टाचा खिसा

विमानात शाई गळते की नाही ते ठाऊक नाही. पण शाळेत असताना शाईचा डाग असलेला शर्टाचा खिसा हे मुलांमध्ये कॉमन होते.

>>विमानात शाई गळणे, हा बहुधा

>>विमानात शाई गळणे,

हा बहुधा काल्पनिक बागुलबोवा होता. (किंवा बंदिस्त विमानांच्या आगमनाबरोबरच तो नाहीसा झाला).

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

नाही. समजा, जुन्या पद्धतीचं

नाही. समजा, जुन्या पद्धतीचं (म्हणजे inkwell असलेलं, आपण शाळेत वापरायचो तसं) पेन असेल आणि शाई अर्धीच भरली असेल तर विमानातून उतरताना लोचा होऊ शकायचा. तडे जाणे, शाई बाहेर येणे वगैरे. (विमानातून उतरताना अर्ध्या भरलेल्या पाण्याच्या बाटल्या पिचतात तसं काहीसं.)

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

दौत

शाई कुठून भरता? कारण आजकाल स्टेशनरीच्या दुकानात दौती पाहिल्याचे आठवत नाही. पूर्वी असत.

इंक कारट्रीज वापरतो. पण ती

इंक कारट्रीज वापरतो. पण ती ठराविक रंगात मिळतात.

शाईमध्ये वेगळेच रंग पाहिजे असतील तर चेन्नईच्या 'चेलपार्क' नामक कंपनीची शाई बाटली वापरतो. (भारताबाहेर असाल तर वॉटर्मन कंपनीच्या शाई सहज मिळतात.) अशा वेळेला पंप तरी वापरतो किंवा सिरिंज घेऊन रिकाम्या कारट्रीजमध्ये भरतो.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

चेलपार्क

कॅमलपेक्षा मला तरी काळे पेन वाल्यांची शाई आवडत असे. रंग आणि कन्सिस्टन्सी, दोन्ही कॅमल पेक्षा चांगली. पुढे चेन्नईला गेल्यावर चेलपार्क वापरली, तिचा निळा रंग जास्त आवडला. नंतर शीफरची शाई चेन्नईतच रूममेटने विकत घेतली. तिची कन्सिस्ट्न्सी जास्त चांगली होती. तिथून पुढे तीच वापरू लागलो.

शाईसाठी आम्ही कॅम्लिनची फाउंट

शाईसाठी आम्ही कॅम्लिनची फाउंट इंक वापरायचो. थोडी दाट असायची पण अगदी कुळकुळीत काळी. कॅलिग्राफीला बेस्ट इंक. सध्या ड्रॉइंगला चक्क जेल पेनं वापरतो. स्कॅन केल्यावर डार्क लाइन्स येतात हा अ‍ॅडव्हान्टेज. कॉलेज सुटले आणी रोटरिंग, स्टेडलर आयसोग्राफ पण सुटले. एखादा ०.५ चा रोटरिंग घ्यावा असे वाटू लागलेय. आर्ट कार्डवर रोटरिंगसारखी मज्जा कुठे नाही. रोटरिंगची इंक पण फाउंटनपेनात ट्राय मारायला हरकत नाही.

मी इंकजेट प्रिन्टरची शाई

मी इंकजेट प्रिन्टरची शाई फाउंटन पेनात आणि रोलर पेनात वापरून पाहिलेली आहे. पण ती जाड असते. निब चोक होते.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

थत्ते चाचा, मग मी पण एकडाव

थत्ते चाचा, मग मी पण एकडाव फ्लेक्स प्रिंटरची शाई पेनात भऱावी म्हणतो. जास्त पातळ असते ती. नोझल चोक होऊ नयेत म्हणून त्यात काही एजंट पण असतात. सोलव्हन्ट बेस असल्याने कागदापेक्षा कार्डावर वापरावी.

धन्यवाद

धन्यवाद!

अस्तित्वात आहे. मी वापरतो

अस्तित्वात आहे. मी वापरतो अनेकदा.

मॉलमध्ये किंवा एअरपोर्टवर लॅमी वगैरे महागड्या पेनांची दुकाने असतात.
पार्कर किंवा कॅम्लिनची फाउंटन पेन्स अजून मिळतात. शिवाय हिरोचे चायनीज पेन अजून मिळते.
a

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

कोणाला मराठीव्यतिरिक्त इतर

कोणाला मराठीव्यतिरिक्त इतर भारतीय भाषांमधल्या रहस्यकथा/कादंबर्‍या माहीत आहेत का?

बंगाली: फेलूदा (सत्यजित राय), व्योमकेश बक्षी (शरदिंदु बंद्योपाध्याय)
...
..?

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

अ‍ॅडम आणि ईव्ह या जोडीला

अ‍ॅडम आणि ईव्ह या जोडीला उर्दूमध्ये आदम आणि हव्वा असे संबोधले जाते. पुरुष हा अ‍ॅडमचा वंशज म्हणून 'आदमी' असे संबोधन पडले. त्या न्यायाने स्त्रीसाठी संबोधन काय आहे? किंबहुना या प्रकारचे संबोधन आहे की नाही?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

हवीशी

हवीशी (डोळा मारत)

छान यमक विथ खलीसी.

छान यमक विथ खलीसी. (लोळून हसत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

हव्व्यास

हव्व्यास

एकदम रोचक नि उद्बोधक!

एकदम रोचक नि उद्बोधक!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

हव'स

हव'स

तळपायाची आग मस्तकात जाणे -

तळपायाची आग मस्तकात जाणे - यात - तळ्पायात आग कुठुन आली?

माझे तळपाय कायम गरम गरम

माझे तळपाय कायम गरम गरम असतात. पंख्याचा वारा तळपायाला लागला की भारी वाटतं. रेल्वेमध्येही खालचा बर्थ मिळाला तर उघड्या खिडकीत पाय टाकून झोपायला मजा येते.

मुद्दा असा आहे, की माझ्या तरी तळपायात आग आहे. उलट्या शॉकसारखी ती सळसळत मस्तकात जाण्याचा मात्र अनुभव नाही.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

लायनिंगचे शर्ट्स

लायनिंगचे जे शर्ट असतात ना टिपिकल फॉर्मल शर्ट्स...त्यातलं प्रचलित लायनिंग नेहमी उभट का असतं ? आडवे लायनिंग का नसतात ?

टेक्नॉलोजी मुळे. टीशर्ट आणि

टेक्नॉलोजी मुळे.
टीशर्ट आणि शर्टच्या कापडाची टेक्नॉलॉजी वेगळी असते.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

मनोबाचा पूर्वीचा प्रश्न सापडला

बघा बघा मनोबा. कण्ट्रोल ही नै

बघा बघा मनोबा. कण्ट्रोल ही नै होता. (डोळा मारत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

या प्रश्नावरती ऑलरेडी उहापोह

लायनिंग

या प्रश्नावरती ऑलरेडी उहापोह झालेला आहे, सापडल्यास देते.
_______
तेव्हा टीशर्टवर ऊभे पट्टे का नसतात असा काहीसा प्रश्न होता.

आड्व्या लायनिंगमधे लोकं जाड

आड्व्या लायनिंगमधे लोकं जाड दिसतात

मग तर

मग तर चांगलच्चे की. जरा बारिक अंगकाठी असणार्‍या लोकांनी तरी ते घालायला संकोचू नये. किमान काही एक ग्राहक वर्ग त्याही कपड्यांना मिळेल.
.
.
अहो नु, http://www.aisiakshare.com/node/5180#comment-132248 जेंडार स्पेसिफिक आहे की नै ते कसं सांगणार. फार तर मुलांचं असं असतं असं म्हणू शकतो. मुलींचं माहित नाही काये ते.

मला वाटतं

युरीनेशन चे वेळी केगल मसल्स (स्नायू) वापरात येतात. पाकीस्तानला जायचे वेळी पेल्व्हिक मसल्स वापरात येत असावेत की काय?
____
नॉर्मल डिलीव्हरीचे वेळी एनेमा (का काय) आधी देतात. तेव्हा या स्नायूंच्या जडणघडणीचा अभ्यास डॉक्टरांनी जरुर केलेला आहे.
___

जेंडार स्पेसिफिक आहे की नै ते कसं सांगणार. फार तर मुलांचं असं असतं असं म्हणू शकतो. मुलींचं माहित नाही काये ते.

समांतर - फार पूर्वी (१५ वर्षे तरी झाली) मी एक लेख वाचलेला होता की स्त्रियांना अत्यंत इन्टेन्स ऑर्गॅझम पण शॉर्ट काळाकरता येतं तर पुरुषांना कमी इन्टेन्स पण प्रोलॉन्गड काळाकरता येते. आता हे तरी कसं कळणार पण त्यांनी पुरुषाची स्त्री झालेल्या काही व्यक्तींवर संशोधन करुन (सर्व्हे वगैरे) हे निश्चित केलेले होते. (स्माईल)
बेस्ट ऑफ बोथ वर्ल्डस नाही मिळू शकणार का? (डोळा मारत) यावर खरं संशोधन होणे गरजेचे आहे. (लोळून हसत)

मनोबा, आधीचा तुझा जो प्रश्न

मनोबा, आधीचा तुझा जो प्रश्न आहे त्या तुलनेत नंतरचा प्रश्न एकदमच पांचट आहे. आधी त्याला उत्तर मिळु दे, मग बाकीचे प्रश्न टाक.

+१

एक प्रश्न विचारल्यावर दुसर्‍या प्रश्नाला कंट्रोल करता येणे शक्य असावे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

सू , शी , लघुशंका

लघुशंकेबद्दल एक शंका आहे.
सू करताना शी कंट्रोल करता येणे शक्य असेल तर शी करताना सू कंट्रोल करता यायला हवी.
तसे का नसावे ?

हे जेंडर स्पेसिफिक आहे का?

हे जेंडर स्पेसिफिक आहे का?

आये कुछ अब्र कुछ शराब

आये कुछ अब्र कुछ शराब आये
उसके बाद आये जो अज़ाब आये

ह्या द्विपदीचा अर्थ खूप ठिकाणी "थोडे ढग येवो, थोडी दारु येवो आणि मग काय यायची ती संकटे येवोत" असा लावलेला वाचला.
मला तो अर्थ पटत नाही. "थोडे ढग येतात मग थोडी दारु येते आणि त्या नंतर जे काही येतं ते म्हणजे संकटच असतं (प्रेयसीच्या आठवणीने होणार्‍या त्रासामुळे)" असा त्याचा अर्थ असावा (असायला हवा) असे मला वाटते. फैज़ला कोणता अर्थ अभिप्रेत होता ते कसे कळेल?

Hope is NOT a plan!

'आये' हा शब्द 'आले' आणि

'आये' हा शब्द 'आले' आणि 'येवोत' अशा दोन्ही अर्थाने वापरला जातो. त्यामुळे तत्त्वतः दोन्ही अर्थ शक्य असले तरी 'कुछ शराब आये' मध्ये शराब एकवचनी आहे. त्यामुळे दुसरा अर्थ लागू होत नाही. फैज़ने 'कुछ गिलास आये' असं म्हटलं असतं तर दोन्ही अर्थ खुले राहिले असते.

आये चे तीन अर्थ होतात१.

आये चे तीन अर्थ होतात
१. आले उदा. बादल आये.
२. येतात/येते उदा. मुझे नींद आये / न आये
३. येवोत/येवो उदा. कयामत हो और तू आये.

जेठ की गर्म धूप हो और अचानक ठंडी हवा आये; ऐसे में मचलते दिलों को करार कहॉं से आये?
ह्या वाक्यात आये चा अर्थ आले किंवा येवो असा नाहीय आणि हवा अनेकवचनी नाहीय.

Hope is NOT a plan!

गिलास वगैरे असले नसले तरी

गिलास वगैरे असले नसले तरी चालतात. गालिब म्हणुन गेला आहे.

पिला दे ओक से साकी जो हमसे नफरत है
पियाला गर नही देता न दे, शराब तो दे

-----
मनोबाचा संभाव्य आक्षेप आणि डाऊट : तुला शेर माहीती का असतात, हे फेमिनाइन ल़क्षण नाहीये.

बाकी तसे म्हटले तर संत वगैरे

बाकी तसे म्हटले तर संत वगैरे लोकांच्या पुण्यतिथ्यांची आठवण ठेवणे म्हणजे दु:खद घटनांचे स्मरण ठेवणेच नव्हे काय?

नाही, उलट त्यांच्या चांगल्या गोष्टींची आठवण काढणे हा परपज आहे ( इन थियरी ).

देवानंद कींवा काका च्या पुण्यतिथीचा दिवस असला की दु:ख वगैरे वाटत नाही, त्यांची चांगली गाणी आठवतात.

हम्म सहमत.

हम्म सहमत.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

दु:ख पाळण्याचे दिवस

प्रतिसाद इथे द्यायचा होता. परंतु तिथे तो अवांतर वाटेल म्हणून इथे टाकला आहे.

मोहरमचे स्मरणरंजन आनंददायी नसते. जेरूसलेमला जाऊन तिथल्या वेलिंग वॉलपाशी जाऊन रडणार्‍या लोकांचे स्मरणरंजनही आनंददायी आजिबात नसते.

मुस्लिम, ज्यू यांच्याप्रमाणे ख्रिस्ती धर्मातही दु:ख पाळण्याचे दिवस ठरलेले आहेत.

हिंदू धर्मात मात्र सर्व सण हे आनंद साजरा करणारेच असतात. दु:ख पाळणारा एकही नाही. असे का?

सर्वपित्री अमावस्या आनंददायी

सर्वपित्री अमावस्या आनंददायी नसावी, मात्र ती किती जूनी माहित नाही

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अमावस्या अशुभ वगैरे मानतात हे

अमावस्या अशुभ वगैरे मानतात हे मान्य. पण नक्की दु:खदायक काय आहे त्यात?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

आपला सगळ्यात मोठा आनंदाचा सण

आपला सगळ्यात मोठा आनंदाचा सण अमावास्येला असतो.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

अर्र हो की. गटारी विसरलोच

अर्र हो की. गटारी विसरलोच होतो.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मी दिवाळीबद्दल बोलत होतो.

मी दिवाळीबद्दल बोलत होतो.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

ऊप्स ओक्के! येस यू आर रैट्ट.

ऊप्स ओक्के! येस यू आर रैट्ट.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

एकतर बॅट्याला गटारीशी काही

एकतर बॅट्याला गटारीशी काही घेणेदेणे नाही तरी असे दिशाभुल करणारे प्रतिसाद देतोय.

माहित नाही. आमच्याकडे या

माहित नाही. आमच्याकडे या दिवशी बाबा कावळ्याला पान ठेवतात. त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या आठवणीने बेचैन वाटते. आजी गेल्याच्या नंतर काही वर्षे हलकेसे रडुही यायचे पान ठेवताना असे लख्ख आठवते. त्यामुळे माझ्या डोक्यात ते दु:खद म्हणून घर करून आहे.
बाकी त्या दिवसाची काहीच माहित नाही

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हम्म. सर्वपित्री म्हणजे सर्व

हम्म. सर्वपित्री म्हणजे सर्व पितरांची. सो असेलही. पण हा अपवादच म्हटला पाहिजे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

कारण वेदनादायक गोष्टींची आठवण

कारण वेदनादायक गोष्टींची आठवण ठेवायला आपल्याला आवडत नाही.

बाकी तसे म्हटले तर संत वगैरे लोकांच्या पुण्यतिथ्यांची आठवण ठेवणे म्हणजे दु:खद घटनांचे स्मरण ठेवणेच नव्हे काय?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

पारंपरिक धार्मिक सण

जयंत्या-मयंत्या हे अलिकडचे. मी पारंपरिक धार्मिक सणांबद्दल बोलत होतो.

सणांसारखेच आपले साहित्यदेखिल. शोकांतिका फारशा रुचत नाहीत आपल्याला!

ग्रीक नाटके शोकांतिकाप्रधान. तर कालिदासप्रभुतींची नाटके सुखांतिकाप्रधान!

हम्म्म्म, पण महाभारत हे

हम्म्म्म, पण महाभारत हे सुखांत कुठे आहे? नाटकांचा माझा फारसा अभ्यास नाही.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

अब्ज

मोठ्या संख्या लिहिताना वर्तमानपत्रांत किंवा इतरत्र 'अब्ज' फारच कमी वेळा का वापरलेले दिसते? ह्याचे कारण काय असावे? हजार, लाख, कोटी ह्याच्या पुढच्या टप्पा म्हणून अब्ज लक्षात ठेवणे इतके अवघड आहे का? (शाळेत गणितात अब्ज म्हणजे किती हे शिकवतात!) उदा. मल्ल्याने नव्वद अब्ज बुडवले म्हणण्याऐवजी नऊ हजार कोटी म्हणले जाते. हे तीन, दोन, दोन, दोन, .. अशा प्रकारे स्थाने विभागण्याऐवजी हे तीन, दोन, दोन, तीन, दोन, .. असे होऊन जाते. कोटीनंतर नाही म्हटलं तर, अब्जानंतर तरी हे हजार आणावे लागतीलच, पण असलेले अब्ज टाळायचे कशाला असा प्रश्न आहे.

मला वाटतं अब्ज ही संख्या

मला वाटतं अब्ज ही संख्या सर्वसामान्याला व्हिज्युअलाईज करायला कठीण जात असावी.

मल्लयाने अमुकतमुक पैसे बुडवले या बातमीचा उद्देश वाचकाला "अबब एवढे!" अशी प्रतिक्रिया द्यायला लावणं हा आहे. त्यासाठी ती संख्या किती मोठ्ठी आहे हे कळायला पाहिजे. आज घरांच्या किमती कोटीच्या घरात पोचल्या आहेत. त्यामुळे कोटींचं मॅपिंग डोक्यात झालं आहे. त्याप्रकारे अब्ज या संख्येचं झालं नाहीये.

हे सगळं अर्थातच conjecture आहे, पण हे टेस्ट करायला आवडेल.

माझ्यापुरतं: मला मिलियन मध्ये मोजणं सोपं वाटतं. अमक्याचा टर्नओव्हर वीस मिलियन आहे म्हटलं की झटकन अंदाज येतो. दोन कोटी आहे म्हटलं की येत नाही.

-------
पिडांकाकांसाठी:
सुलभीकरण होणं हे खरं तर बौद्धिक लसावि वाढल्याचं लक्षण आहे. (नाहीतर आज "मुलांना पहिलीपासून मशीन लँग्वेज शिकवा" वगैरे मागण्या झाल्या असत्या.)

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

कारण लोकांचा गणनाचा बौद्धिक

कारण लोकांचा गणनाचा बौद्धिक लसावि दिवसेंदिवस कमी होत चालला असावा.
हल्ली कितीशा जणांना अब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, शंकू, आणि परार्ध म्हणजे नक्की किती हे माहिती आहे?
(स्माईल)

दोन वर्षांपुर्वी माझे श्री

दोन वर्षांपुर्वी माझे श्री मोदींवर असलेले आक्षेप अजून जैसे थे आहेत, पण सरकारने अपेक्षेपेक्षा अनेक बाबतीत चांगले काम केले आहे असेही वाटू लागले आहे (अर्थात अपेक्षा इतकी कमी/वाईट होती की किंचितही केलेले काम त्यावर ठरले असते. पण सद्य सरकार त्याहूनही बरे काम करते आहे)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दोन वर्षांपुर्वी माझे श्री

दोन वर्षांपुर्वी माझे श्री मोदींवर असलेले आक्षेप अजून जैसे थे आहेत,

आक्षेप अजुन तसेच का आहेस? बिहार च्या पराभवानंतर तर ह्या सरकारनी रांगायला सुरुवात केली आहे.
सर्व भिती आता निमाली आहे,

अशी कीती वर्ष गेली की तुमचे आक्षेप कमी होयला सुरुवात होईल?
सर्वच आक्षेप आहे तसेच आहेत की काही कमी झाले? नक्की आता आक्षेप काय राहिले आहेत. ( टॉप ५ वगैरे काही लिस्ट आहे का? )

अजुनही भिती जात नाही म्हणजे काँसंट्रेशन कँप च्या ब्ल्यु प्रिंट वगैरे चुकुन बघायला मिळाल्या की काय?

काय बोलताय तुम्ही? माझे

काय बोलताय तुम्ही? माझे आक्षेप काय आहेत हे अ‍ॅझ्युम करून स्वतःच काहीबाही प्रश्न विचारताय.
हे बघा माझे आक्षेप

तुम्ही जी भिती भिती म्हणून ओरडताय ती भिती मला निवडणुकीच्या आधीही नव्हती. माझी भितीच मुळात वेगळी होती आणि ती अजूनही प्रत्यक्षात आलीये किंवा येईल अशी लक्षणे आहेत

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओक्के. वाचले तुझे आक्षेप.

ओक्के. वाचले तुझे आक्षेप. खालील गोष्टी माझ्यासाठी तरी "झाल्यातर चांगले च" अश्या आहेत.

मोदींच्या कार्यपद्धतीत लोकशाही तत्त्वांचा अभाव/कमतरता.
व्यक्तीकेंद्रीत पक्ष झाला

सर्व राजकारण व्यक्तीकेंद्रीत झाले पाहिजे. लोकशाही सुद्धा देशाचा प्रेसिडेंट, राज्याचा गव्हर्नर आणि शहरांसाठी मेयर पद्धतीने चालली पाहिजे. ही कळीची लोक ( आणि त्यांचा कंपु ) सोडली तर बाकी सर्व कारभार नोकरशाहीने राबवला पाहिजे.

निवडणुक जितकी वरच्या स्तरावर(म्हणजेच प्रचंड मतदार बेस असलेली ) जाते तितकी ती मुद्यांना धरुन होते आणि भ्रष्टाचार, गुंडशाही राबवुन निवडणुक जिंकता येत नाही.